राष्ट्रवादळ
दिनवैशिष्ट्य
९ डिसेंबर
जन्मदिवस : कोबॉल भाषेची निर्माती ग्रेस हॉपर (१९०६), कवी जॉन मिल्टन (१६०८), भारताची पहिली महिला छायापत्रकार होमाई व्यारावाला (१९१३), अभिनेता कर्क डग्लस (१९१६), सिनेदिग्दर्शक जॉन कासाव्हेटस (१९२९), अभिनेत्री ज्यूडी डेंच (१९३४), अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (१९४६), अभिनेता जॉन माल्कोव्हिच (१९५३)
मृत्यूदिवस : चित्रकार अँथनी व्हॅन डाईक (१६४१), गणितज्ञ हर्मन वाईल (१९५५), वारकरी संप्रदायाचे अभ्यासक सोनोपंत दांडेकर (१९६८), लेखक वा. दा. गाडगीळ (१९७३), छायाचित्रकार बेरेनीस अॅबट (१९९१), खगोलशास्त्रज्ञ पॅट्रिक मूर (२०१२)
---
जागतिक भ्रष्टाचारविरोधी दिन.
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - टांझानिया.
१९०० : डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धांची सुरुवात.
१९४६ : स्वतंत्र भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी नेमलेल्या संविधान समितीची पहिली बैठक.
१९६८ : डग्लस एंगेलबर्टने माऊस, हायपरटेक्स्ट आणि ग्राफिकल यूजर इंटरफेस पहिल्यांदा सार्वजनिकरीत्या दाखवले.
१९७३ : जयवंत दळवी यांच्या 'संध्याछाया' नाटकाचा पहिला प्रयोग.
१९७९ : देवीरोगाचे संपूर्ण उच्चाटन. मानवी संसर्गजन्य रोगांपैकी संपूर्ण उच्चाटन झालेला हा एकमेव रोग आहे.
१९८६ : पॅरिसमधले जगप्रसिद्ध ओर्से संग्रहालय खुले.
१९९० : लेक वॉवेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी.
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- शिवोऽहम्
अरे .. गदिमांना विसरले काय
अरे .. गदिमांना विसरले काय तुम्ही लोकं?
१) रम्य ही स्वर्गाहून लंका
https://m.youtube.com/watch?v=juq16lSm6KA&feature=youtu.be
२) धुंद मधुमती
https://m.youtube.com/watch?v=0SIOaIbL84E
३) जीवलगा कधी रे ...
https://m.youtube.com/watch?v=00eMksT4tPQ
*********
तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत्च्छिथिल बन्धनात |
मूर्खहस्ते न दातव्यं एवम् वदती पुस्तकम ||
अरे .. गदिमांना विसरले काय
.
नाय नाय. ऐसीअक्षरे हे मराठी संस्थळ आहे.
.
म्हणून आम्ही लोक हिंदी गाण्यांवरून आणि हिंदी गायिकांवरून धुळवड खेळत आहोत.
.
गदिमा
काल ऐसीच्या फेसबुक खात्यातून, पानावरून आणि ट्विटरवरूनही गदिमांचा उल्लेख केला होता.
मनीषा, तुम्ही उद्धृत केलेल्या सुभाषिताचे शुद्ध रूप आहे ते असे --
मनीषा,
तुम्ही उद्धृत केलेल्या सुभाषिताचे शुद्ध रूप आहे ते असे --
तैलाद्रक्षेत् जलाद्रक्षेत् रक्षेत् शिथिलबंधनात् ।
मूर्खहस्ते न दातव्यमेवं वदति पुस्तकम् ॥
एक मराठी असामी
बड्डे : अभिनेत्री आशा पारेख
.
.
.
.
राजेंद्रकुमार बरदाश्त करायची तयारी असेल तर हे गाणं बरं आहे. अगदीच काही वाईट नाही.
.
लताद्वेष्ट्यांनी चेंज म्हणून सुमन कल्याणपूर चं गाणं ऐकावं.
.
.
.
.
गदिमा जन्मशताब्दी - आकाशवाणीचा रतीब
पुणे आकाशवाणी व विविध भारतीचा धोबी घाट होऊन युगं लोटली. नवीन टुकार एफ. एम. चॅनेल्सच्या तुटपुंज्या संग्रहातल्या सुमार गाण्यांत लक्षवेधक असं काही नाही. त्यामुळे रेडिओ हा माझ्यासाठी आकाशवाणी पुणे केंद्र किंवा व विविध भारती हीच दोन केंद्रं असतात.
नक्की रेडिओ ऐकण्याची वेळ म्हणजे कामावर जाताना - परत घरी येताना. एरवीही आठवड्यात एकदा (वार - वेळ नाही सांगता येणार) गदिमांच्या एकेका गीताचा आस्वाद - निरुपणच म्हणावं असं शंकर अभ्यंकर सांगत आणि मग ते गाणं कडव्याकडव्याने लावत. त्यातलं शेवटचं ३० सप्टेंबरला होतं. एकूण चांगला होता तो कार्यक्रम.
१ ऑक्टोबर उजाडला आणि गदिमा जन्मशताब्दीच्या गंगेत ज्याने त्याने हात धुवून घेतले. एकेका गाण्याचं प्रायोजकत्व !! शेंडेफळ कन्येच्या त्याच आठवणी अनेकवार.
कहर म्हणजे संध्याकाळी दुसऱ्याच कोणाच्या तरी आवाजात - आधी सांगितलं असलं तरी लक्ष नव्हतं आणि नंतर नाव सांगितलं नाही - "स्वये श्रीरामप्रभू ऐकती" हे गाणं अत्यंत बेसूर, शब्दोच्चार ढिसाळ, काही ठिकाणी विपर्यस्त. आणि स्टुडिओत उद्घोषकाने अजीर्ण होऊन कान बंद केले असावेत नाही तर अख्खा कार्यक्रमच आयता आयात असावा त्यामुळे मधे पडून गाणं थांबवणं शक्य नसावं. छळ होता ते गाणं ऐकणं म्हणजे.
वूडहाऊस, मारिओ पुझो, फुको,
वूडहाऊस, मारिओ पुझो, फुको, कलाम, नारायण सुर्वे कसल्या कसल्या सॉलिड भारी माणसांचा जन्मदिवस आहे आज!!
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
स्मिता पाटील - एक सुंदर व गुणी अभिनेत्री
Embrace your inner sloth.
धन्यवाद!
गोड मराठी गाणं लावलं आहे बोर्डावर. अभिनय किती गोड, गाणं किती श्रवणीय. अनेक धन्यवाद. यु मेड माय डे!!
प्रेमा, काय देऊ तुला ? भाग्य दिले तू मला
Embrace your inner sloth.
लेखक कार्ल सेगन
सेगनाचार्यांना अभिवादन!!
केवळ लेखक म्हणणे ही कार्ल सेगनची बोळवण करणे वाटते. त्याचे काम किती विविधांगी, मूलभूत स्वरूपाचे होते याची कल्पना अनेकांना असेल. खगोलतज्ज्ञ, सायन्स एज्युकेटर, तत्वचिंतक, विवेकवादी कार्यकर्ते असे अनेकविध आयाम त्यांच्या व्यक्तिमत्वाला होते असे वाटते.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
विवेक
सेगनचा विवेक आता डॉकिन्सच्या जमान्यात आणखी उठून दिसतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
'सारे जहाँ से अच्छा'कार कवी
बायेनीचान्स 'चीनो अरब हमारा'कार१ कवी इक्बाल म्हणायचे आहे काय?
..........
१ बोले तो, वरिजनल 'चीनो अरब हमारा'. साहिरचे विडंबन नव्हे.
लेखक केशव मेश्राम (१९३७)
फक्त लेखक? मेश्राम मूळचे कवि ना!
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
नाटककार यूजीन आयोनेस्को (१९०९
"खुर्च्या..." चा लेखक, राईट?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
गेंडा
आणि गेंडासुद्धा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सोनाली शेरतुकडे स्टारर ना?
सोनाली शेरतुकडे स्टारर ना? त्याचा लेखक 'उसनेस्को' असा दिलाय मूळ स्रोतांत.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
नादिरा - जन्मदिन (५ डिसेंबर)
नादिरा - जन्मदिन (५ डिसेंबर)
https://www.youtube.com/watch?v=vy-Gd2bbb4w
.
आन हा सिनेमाही छान होता.
Embrace your inner sloth.
१५ डिसेंबर जन्मदिवस : लेखक रोशफूको (१६१३)
बोले तो हाच का? (सहज शोधला.)
पण विकी तर याची जन्मतारीख १५ सप्टेंबर सांगतोय; १५ डिसेंबर नव्हे.
बादवे, 'रोशफूको' बोले तो जर Rochefoucauld असेल, तर मग 'रास्तारोको' म्हणजे काय Rastaroucauld काय?
रोशफूको
हाच तो. चूक दुरुस्त केली आहे.
Rastaroucauld - रास्तारूको 'रोको' नव्हे
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हम्म्म्म्म्...
अंमळ चुकलेच.
Rastarocauld म्हणू या.
२२ डिसेंबर
रुड़की.
बाकी चालू द्या.
२५ डिसेंबर जन्मदिवस
'पाकिस्तानचे संस्थापक' इथवर ठीक आहे, परंतु 'स्वातंत्र्यसैनिक' कशापायी? स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे नेमके योगदान काय?
'ख्रिसमसला जन्मलेला आणि ९/११ला मरण पावलेला महात्मा' इतकेच म्हणू या फार तर.
कैद-ए-आझम नव्हे. काइद-ए-आझम (किंवा कायदेआझम). काइद बोले तो नेता. आझम बोले तो ग्रेट. कायदेआझम यानी कि थोर नेता.
(खरे तर क़ाइद-ए-आझम. क़ाइदमधला क़ नरड्यातला आहे.)
त्याला महात्मा तरी का
त्याला महात्मा तरी का म्हणायचे? टिळकांचे वकीलपत्र एकदोनदा घेतले इथवर म्हणायचे तर म्हणू बापडे, पण त्यापलीकडे नाही....
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
खुलासा
येथे महात्मा हे व्याजोक्तिपूर्वक/व्याजस्तुतिपर/सार्क्यास्टिकत्वेकरून म्हटलेले आहे.
२१ फेब् - सूर्यकांत त्रिपाठी 'निराला'
२१ फेब् - सूर्यकांत त्रिपाठी 'निराला' यांचा जन्मदिवस -
'यमुना के प्रति' ही नितांत सुंदर कविता -
https://www.anhadkriti.com/suryakant-tripathi-nirala-yamuna-ke-prati
Embrace your inner sloth.
जॉर्जिआ ओकीफ यांचा मृत्यूदिवस/चिंता आपल्या या
चित्रकार जॉर्जिया ओ'कीफ यांची चित्रे फार आवडतात. अतिशय व्हायब्रंट असतात. चिंता आपल्या या चित्रकाराविषयी माहीती असल्यास इथे जरुर शेअर करावी.
.
.
अनेकदा समीक्षकांनी तिच्या फुलांच्या चित्रांना, 'स्त्रीचे लैंगिक अवयव' असा रंग दिला. निदान त्यांना ती चित्रे तशी जाणवली. त्यांची चूक नाही खरच तशी वाटतात. परंतु १९४३ मध्ये तिने स्पष्ट केले की लोक/चाहते/समीक्षक, तिच्या फुलांच्या चित्रांवरती स्वत:च्या समजूती आरोपित करत आहेत. त्यांना ती चित्रे स्त्रीच्या लैंगिक अवयवांसम वाटतात.पण ती त्या धारणेशी संमत नाही.
.
.
Embrace your inner sloth.
ब्रेकिंग बॅडमुळे हे नाव
ब्रेकिंग बॅडमुळे हे नाव पहिल्यांदा ऐकलं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मीही!
मग सांता फेला गेलो होतो तेव्हा बरा अर्धा इतिहासाच्या संग्रहालयात आणि मी जॉर्जिया ओ'कीफच्या चित्रप्रदर्शनाला, असा बेत केला. त्या संग्रहालयाचा हा दुवा.
शुचे, जॉर्ज सरोवराची तिनं काढलेल्या चित्रांमधले रंग एवढे भडक नाहीत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
महिला दिन + न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंजची स्थापना.
Embrace your inner sloth.
मुलगी आणि सांड...
१. ती मुलगी आता बैलासमोरून (खरे तर सांडासमोरून) हलवली आहे. आता एनवायएसईच्या बिल्डिंगीसमोर, एनवायएसईच्या बिल्डिंगीकडे तोंड करून उभी असते. (मागच्याच आठवड्यात पाहून आलो.) (बातमी)
२. (त्या सांडाखाली झुकून) त्या सांडाच्या गोट्यांना हात लावून त्या अवस्थेत फोटो काढून घेणे ही एक टूरिष्टी प्रथा आहे. देवळासमोर देवाच्या (किंवा नंदीच्या) दर्शनासाठी लागणार नाही, असली हीऽ मोठ्ठी लाईन लागते त्या सांडाच्या मागच्या बाजूस, या कारणाकरिता. (दुवा)
(पुढील परिच्छेद विकीवरून.)
आज डाउन सिंड्रोम डे आहे वाटतं
आज डाउन सिंड्रोम डे आहे वाटतं. आज मोजे विजोड घालायचे असतात. A conversation starter. आणि मग त्या संवादातून लोकांना, मित्र मैत्रिणिंना डाउन सिंड्रोमबद्दल जागरुक करायचे.
Embrace your inner sloth.
मोजे??
लोकांना मोजे दिसतात?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हाहाहा लॉजिके.पण आमच्या
हाहाहा लॉजिके.पण आमच्या ऑफिसच्या इमेलमध्ये तसेच लिहून पाठवले होते
Embrace your inner sloth.
३ एप्रिल - नाझिया हसन
.
Embrace your inner sloth.
१९८०ज़मध्ये...
...कॉलेजवयीन तरुण होतो. तेव्हा (त्या वयात) बरी वाटायची ही/असली गाणी. आता स्टुपिड वाटतात.
(खरे तर तेव्हाच स्टुपिड वाटायला पाहिजे होती. आत्यंतिक पर्पज़शून्य गाणी. कदाचित आमच्या तत्कालीन पर्पज़शून्य, अक्कलशून्य तथा यूसलेस आयुष्याचे प्रतिबिंब म्हणूनही भावत असतील त्या काळी, कोण जाणे. आजची तरुण पिढी ही असली गाणी खपवून घेईल, याबद्दल प्रचंड साशंक आहे. असो चालायचेच.)
४ एप्रिल -कवि अज्ञेय /असाध्य वीणा
http://aisiakshare.com/node/2760
अज्ञेय यांचे संपूर्ण नाव ( सच्चिदानंद वात्स्यायन ) माहीत नव्हते. ते आज कळले.
Embrace your inner sloth.
आजचे जन्मदिवस...
ही बोले तो बाँबे डाइंगचे टॉवेल गुंडाळून नागडी बसायची, तीच ना?
आंघोळीला जाताना टॉवेलच्या आत
आंघोळीला जाताना टॉवेलच्या आत नागडे असणे सर्वसामान्यच नव्हे काय ?म्हणजे ... नऊवरीवरून टावेल गुंडाळलेली लिसा रे दिसली तर संस्कृती बुडणार नाही का ?
परंपरेनुसार आंघोळीला जाताना टावेलच्या आत नागडे असणे असेच रितीनुसार होईल.
कसें ?
अर्थात.
आक्षेप असा काहीच नाही. (आमचा कशाबद्दल आक्षेप असणार?) फक्त, वस्तुस्थिती नोंदविली, इतकेच.
पुलित्झर कंपनी???
ही कुठली कंपनी ब्वॉ?
(आपल्याला बायेनीचॅन्स 'पुलित्झर पारितोषिका'चा जिक्र करावयाचा होता काय?)
१७३१ : सातारचे शाहूराजे आणि
अभिवादन.
नावात काय आहे?
विश्वास, की बिस्वास?
बिस्बास
बिस्बास
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
(खरे तर...)
...उच्चारी 'बिश्शाश' असायला हवे, नै?
करेक्ट.... बिश्शाश
करेक्ट.... बिश्शाश
"बॉब बिस्सास" अशी कहानी पिच्चरमधील सुपारीकिलर स्वत:ची ओळख करून देतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नूतन - जन्म ४ जून्
वाह!!! 'कालीघटा छाये मोरा जिया तरसाये .....' गाणे बोर्डावर लावले आहे
............. नूतनचे डोळे पहात रहावे. संपूर्ण अभिनय ताकदीचा आहेच पण डोळे तर इतके बोलके!!!
Embrace your inner sloth.
...
बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन|
कुतूहल
यावरून सहज कुतूहल: ब्रिटिशपूर्व हिंदुस्थानात वेगवेगळ्या काळी अग्निशमनाकरिता नागरी/सार्वजनिक व्यवस्था काय होती? पेशवेकाळात? शिवछत्रपतींच्या काळात? सातवाहनकाळात? मौर्यकाळात? वेदकाळात?
जसे, पोलिसांच्या ठिकाणी कोतवाल, राजाचे शिपाई किंवा तत्सम काही वेळोवेळी असावेच. पण मग तसे पाहायला गेले, तर घरांना, इमारतींना इ. आगी लागणे (आणि त्यातून अपरिमित नुकसान होणे - केवळ आग लागलेल्या मूळ इमारतीचेच नव्हे, तर एका इमारतीची आग इतर इमारतींना पसरत जाऊन संपूर्ण मोहल्ल्याचे) ही बाब तर गेला बाजार जगातल्या सर्वात जुन्या व्यवसायाइतकी तरी जुनी असावी; चार मानवे टोळ्यांसह भटकायची सोडून एका ठिकाणी वस्ती करून राहू लागल्यापासूनची ही सामायिक समस्या असावी. मग त्या परिस्थितीत, राज्ये, नगरव्यवस्था वगैरे स्थापन होऊ लागल्यापासून अग्निशमनाची काही सार्वजनिक व्यवस्था न ठेवता, स्वत:च्या मालमत्तेस आग लागल्यास तिच्या निवारणाची डोकेदुखी त्या पीडितावर ढकलणे हे सयुक्तिक वाटत नाही; किंबहुना, आगीच्या बंबवाल्याचा व्यवसाय हा जगातल्या पुरातनतम व्यवसायाइतकाच पुरातन नसण्याचे काहीच कारण दृग्गोचर होत नाही. आणि म्हणूनच, वेदकाळातच मोठमोठे शोध लावलेल्या आपल्या या थोर संस्कृतीत आदिम स्वरूपात का होईना, परंतु इतकी मूलभूत सुविधा१ उपलब्ध होण्याकरिता युरोपियनांच्या२ आगमनाची वाट पाहावी लागली, हे पटत नाही. सबब, या भारतवर्षात वेगवेगळ्या कालावधींत अग्निशमनाच्या नागरी सुविधा कशा प्रकारच्या होत्या, हे जाणून घ्यायला आवडेल.
अशा प्रकारची काही माहिती कोणास आहे काय? किंवा कोठे मिळू शकेल? ('काळ उघडा करणारी पुस्तके'-टैप सदरांसाठी हा चांगला संशोधनविषय आहे.३)
----------
१ नागरी रुग्णवाहिका-सुविधेबद्दल (बोले तो, गंभीरपणे आजारी झालेल्या रुग्णास बैलगाडीवर घालून का होईना, परंतु शक्य तितक्या त्वरित जवळच्या वैद्याकडे घेऊन जाण्याची नागरी व्यवस्था - जिला निरोप्याकरवी वर्दी देऊन त्वरित पाचारण करता यावे.) पुढच्या खेपेस विचारेन. (तेही कुतूहल आहेच.)
२ यात अलेक्झांडरास गणू नये. तो हिंदुस्थानात आगी लावण्याकरिता आलेला असू शकेल, परंतु हिंदुस्थानातील अग्निशमन हे त्याच्या अजेंड्यावर खचितच नसावे.
३ नाही, सीरियसली!
सपशेल असत्य!
हे धादान्त खोटे आहे!
बोले तो:
- महात्मा गांधी द. आफ्रिकेतील आगगाडीत तिकीट काढून पहिल्या वर्गाच्या डब्यात बसले: - हे सत्य आहे.
- दक्षिण आफ्रिकेत त्यावेळी वंशभेदाचा कायदा होता: - पहिल्या वर्गाच्या डब्यात गौरेतरवर्णीयाने बसू नये, असा कागदोपत्री कायदा होता, किंवा कसे, याबद्दल खात्रीशीर कल्पना नाही. (अन्यथा, मुळात त्यांना पहिल्या वर्गाचे तिकीट विकलेच कसे गेले, असा प्रश्न पडतो.) मात्र, तत्कालीन तद्देशीय सामाजिक परिस्थितीस अनुसरून, तसे करण्याचे अलिखित दुष्परिणाम तसे करणाऱ्यावर होत असावेत, हे गांधीजींच्या अनुभवावरून स्वयंसिद्ध आहे. हे अलिखित दुष्परिणाम कायद्यास धरून असतीलही, किंवा नसतीलही. मात्र, ते कायद्यास धरून नसावेत, असे जरी मानले, तरीही, कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, अशांचाच जर या प्रथेत सहभाग असेल, आणि/किंवा पीडितांप्रति त्यांची सहानुभूती नसेल, तर असे दुष्परिणाम हे कायद्यास धरून नसले, तरीही पीडिताच्या दृष्टीने त्याने काही फरक पडू नये; पीडितास फटका तरीही बसणारच. वंशभेदाचा सरसकट कायदा कागदोपत्री कदाचित नसेलही; वेगवेगळे विशिष्ट कायदे कदाचित वंशभेदमूलक असतील किंवा नसतील, किंवा त्यांची अंमलबजावणी कदाचित वंशभेदात्मक रीतीने होत असेल. ते काहीही असो, परंतु सामाजिक रूढींवर तथा समाजव्यवस्थेवर वंशभेदात्मक विचारसरणीचा पगडा होता, हे निश्चित. त्यामुळे, टू दॅट एक्स्टेण्ट, 'दक्षिण आफ्रिकेत त्यावेळी वंशभेदाचा कायदा (इन लेटर कदाचित नसला, तरीही इन स्पिरिट) होता', हा मुद्दा ग्राण्ट करावयास मी तयार आहे.
- वंशभेदाचा (कदाचित अलिखित) कायदा मोडल्याबद्दल गांधीजींना गाडीबाहेर काढण्यात आले: - हे सत्य आहे.
मात्र:
- पहिल्या वर्गाचे तिकीट काढून नि त्यानंतर पहिल्या वर्गात बसून वंशभेदाचा कायदा मोडून गांधीजींनी सविनय कायदेभंग केला: हे अजिबात खरे नाही. पहिल्या वर्गाचे तिकीट काढण्यामागे गांधीजींचा उद्देश बाकी काहीही असो१, परंतु एका अनिष्ट कायद्याच्या निषेधार्थ जाणूनबुजून कायदा मोडून सविनय कायदेभंग करणे हा त्यांचा उद्देश खचितच नसावा. (किंबहुना, या प्रवासास सुरुवात करण्यापूर्वी, आपल्या या कृत्यातून एखाद्या अनिष्ट कायद्याचा वा अन्याय्य अलिखित नियमाचा भंग होऊ शकेल, हे गांधीजींच्या गावीही नसावे, असे मानावयास जागा आहे.) त्यामुळे, हा गांधीजींचा 'अडवलीस तू सीट बूडभर, अन्यायाचा खचला पाया' मोमेंट खचितच नव्हता, असे म्हणावेसे वाटते. (तसला मोमेंट बऱ्याच वर्षांनंतर, दांडीयात्रेच्या वेळेस आला. ते जाणूनबुजून केलेले कृत्य होते. आगगाडीतून फेकले जाण्याचा प्रसंग हा फार फार तर 'आलिया भोगासी असावे सादर' मोमेंट होता.)
सबब, गांधीजींबद्दल आणि त्यांच्या सविनय कायदेभंग चळवळीबद्दल संपूर्ण आणि नितांत आदर राखूनसुद्धा, वाट्टेल ते नसते पराक्रम गांधीजींच्या नावावर खपवून देऊ नका, असे कळकळीने सांगावेसे वाटते. असल्या असत्य दाव्यांतून गांधीजींचा रेझ्युमे एंबेलिश करण्याने गांधीजींची थोरवी वाढत नसून, गांधीद्वेष्ट्यांच्या वाइल्डेस्ट वेटड्रीम्समध्येसुद्धा होणार नाही, असा त्यांचा अनादर होतो. तेव्हा, कृपया आवरा!
इत्यलम्|
----------
१ बहुधा, पहिल्या वर्गाचे तिकीट (काढू शकणाऱ्या, आणि) काढणाऱ्या कोणत्याही सामान्य मनुष्याचे पहिल्या वर्गाचे तिकीट काढण्यामागे जे-जे म्हणून उद्देश असू शकतात, त्यांपैकीच एक किंवा एकाहून अनेक उद्देश गांधीजींचेही असावेत, असा आमचा कयास आहे. बोले तो: कम्फर्ट; परवडते आहे, तर का नाही; प्रवास करेन, तर स्टाइलमध्ये करेन; कदाचित स्टेटससुद्धा. यात अन्यायाचा निषेध करण्याकरिता औट-ऑफ-द-वे जाऊन तिकीट काढणे हे कोठेही येत नाही, याची कृपया दखल घ्यावी.
तळटीपांनी युक्त प्रतिसाद
पहिला सविनय कायदेभंग बहुधा पासेस जाळण्याच्या प्रसंगी* केला असावा.
*सदर प्रसंग श्री. रिचर्ड अटेनबरा यांनी निर्माण केलेल्या सिनेमातून आम्हांस कळला. अन्यथा गाडीतून फेकणे ते १९१९ ची असहकार चळवळ या मधल्या काळात गांधी काय करीत होते याची आम्हांस काहीच कल्पना** नव्हती.
**आपणास विज्ञान शाखेत*** जायचे असून इतिहास, भूगोल वगैरे विषय हे त्या मार्गातली धोंड**** आहे अशी आमची समजूत होती/समजूत करून देण्यात आली होती.
*** यात आपल्या देशातील थेरडेशाहीचा काही हात नव्हता हे येथे नमूद करून ठेवतो.
**** "स्त्री ही मोक्षाच्या मार्गातील धोंड आहे" या चालीवर वाचावे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
उल्लेखनीय तळटिपा या नेहमी
उल्लेखनीय तळटिपा या नेहमी आकडेसंपृक्त असतात ना थत्ते....
त
Evolution
आकड्यांऐवजी ॲस्टेरिस्कमालिका ही जुनी पद्धत झाली. त्यातूनच कालांतराने आकड्यांची प्रथा इव्हॉल्व्ह झाली. त्यामुळे, थत्त्यांच्या ॲस्टेरिस्का ग्रँडफादर करावयास प्रत्यवाय नसावा.
तळटीपा
तळटीपांमुळे मूळ मुद्दा "पहिला सविनय कायदेभंग बहुधा पासेस जाळल्याच्या प्रसंगी केला" हा दुर्लक्षित झाला त्यामुळे तळटीपांचा वापर उगाच करू नये हे दिसून आले.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अभिनेत्री डिंपल
https://youtu.be/4t5pJheDkOU
*********
तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत्च्छिथिल बन्धनात |
मूर्खहस्ते न दातव्यं एवम् वदती पुस्तकम ||
बंकिमचंद्र चटर्जींचा जन्मदिनांक संदिग्ध?
‛चटर्जीं’ची काल (26 जूनला) जयंती साजरी झाली ना? की खरी आज आहे? म्हणजे काल मी तसं रेडीओवर (FM Goldवर) काल होती म्हणून ऐकलं होतं.
काही संदर्भ ‛26 जून’ तर काही संदर्भ ‛27 जून’ सांगताना दिसत आहेत. म्हणजे अजूनही याबाबत संदिग्धता आहे का?
‛ब्रिटॅनिका’वर जन्मदिनाच्या 26जून किंवा 27जून अशा दोन्ही तारखा सांगितल्या आहेत.
डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…
अपभू की अपसूर्य?
‛अपभू’ हा शब्द मराठीत तरी इथे योग्य वाटत नाही. तो इंग्रजीतील apogee या शब्दाला पर्याय म्हणून जरी पुढे आला असला आणि त्याचा अर्थ ‛खगोलीय वस्तुंमधील जास्तीत जास्त अंतराची स्तिथी’ असा जरी बिनचूक असला तरी त्याचा शालेय शिक्षणातील अर्थ ‛चंद्राची पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असलेली स्थिती’ असा आहे. थोडक्यात, चंद्र-पृथ्वी संदर्भात ‛अपभू’ (apogee) हा शब्द वापरला जातो; तर अशाच प्रकारे पृथ्वी-सूर्य संदर्भात ‛अपसूर्य’ (aphelion) हा शब्द वापरला जातो.
मोल्सवर्थ शब्दकोशानुसार apogee म्हणजे उच्च आणि aphelion म्हणजे मंदोच्च असा स्पष्ट अर्थ सांगितला आहे. मराठीत पर्याय म्हणून हा संदर्भ इथे जास्ती योग्य वाटतो.
व्युत्पत्तीच्या दृष्टीनेही apogeeचा (अपभू/उच्चचा) अर्थ काढायचा झाला तर ‛पृथ्वीपासूनचा त्याच्या कक्षेतील लांबचा बिंदू किंवा तशी स्थिती’ असा व aphelionचा (अपसूर्य/मंदोच्चचा) अर्थ काढला तर ‛सूर्यापासूनची त्याच्या कक्षेतील लांबचा बिंदू किंवा तशी स्थिती’ असा येईल.
थोडक्यात इथे अपसूर्य/मंदोच्च असा शब्द जास्ती योग्य राहील.
चू.भू.द्या.घ्या.
डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…
अगदी अचूक
चंद्र उप/अपभू असतो, आणि पृथ्वी उप/अपसूर्य. इ. सहावी भूगोल. मी एका शिक्षकांची जवळपास नोकरी घालवलेली हा वाद घालून. (सहावीतच, अर्थातच.)
किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||
१४ जुलै
संगीतकार मदन मोहन
https://youtu.be/p5zG33Jll14
*********
तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत्च्छिथिल बन्धनात |
मूर्खहस्ते न दातव्यं एवम् वदती पुस्तकम ||
दे दान सुटे गिराण
चंद्रावर माणसानं पाऊल ठेवल्याला आज ५० वर्षं पूर्ण झाली. योगायोगानं आज खंडग्रास चंद्रग्रहणही होतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
याबद्दल अनेकदा वाचलं.
याबद्दल अनेकदा वाचलं. चंद्रावर उतरेपर्यंतचा घटनाक्रम नीट समजतो.
परत येताना चंद्राच्या पृष्ठभागावरुन परतीचं उड्डाण, त्या मॉड्युलने चंद्राभोवती फिरत राहिलेल्या मॉड्युलला जाऊन मिळणं, मनुष्याचं या मॉड्युलमधून त्या मॉड्युलमध्ये स्थानांतरण.. आणि परत पृथ्वीकडे प्रयाण.. या परतीच्या प्रवासात चंद्र हे लॉन्च होण्याचं ठिकाण असूनही आवश्यक ती अचूकता आणि नॅविगेशन कसं जमवलं ते नीट समजून घ्यायचंय. व्हिडीओ वगैरे शोधावे लागतील.
१४८७ : नेदरलंड्समधल्या
हे दिनविशेषात येण्याइतकं महत्वाचं का म्हणे?
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
फ्रिझीलँडची राजधानी आहे
फ्रिझीलँडची राजधानी आहे.स्वतःला सर्वात शाने समजणारे लोक.
पेठेत शोभतील असे फ्रिजी.
बाकी माहीत नाही.
जागतिक आणि स्थानिक
एकोळी दिनविशेषात हे सांगता येणं कठीण आहे, पण ह्याला आजच्या 'स्थानिक उद्योजक / शेतकरी / उत्पादक वगैरे टिकावेत ह्यासाठी परकीय उत्पादनांवर बंदी / निर्बंध घालावेत का?' ह्या वादांचा संदर्भ आहे. ह्या प्रकारच्या प्रश्नावरून दंगा होऊ शकतो ह्याचं हे खूप जुनं (कदाचित इतिहासात नोंदलेलं पहिलंच) उदाहरण आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हे दिनविशेषात येण्याइतकं
डच माणसाने बियरवर बहिष्कार घालणं ही दुर्मीळ गोष्ट आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
संगीतकार
संगीतकार भूपेन हजारिका
*********
तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत्च्छिथिल बन्धनात |
मूर्खहस्ते न दातव्यं एवम् वदती पुस्तकम ||
पं. जितेंद्र अभिषेकी
इतना तो करना स्वामी
*********
तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत्च्छिथिल बन्धनात |
मूर्खहस्ते न दातव्यं एवम् वदती पुस्तकम ||
तांत्रिक??????
'तांत्रिक' बोले तो?
काही कोंबडी कापणे, जारणमारण मंत्र वगैरे प्रकार घडले होते काय या दुसऱ्या राज्याभिषेकात? की काही सुरापान, ओली पार्टी वगैरे?
पहिला राज्याभिषेक रायगड वर
पहिला राज्याभिषेक रायगड वर राजधानी वसविल्या नंतर इथल्या शास्त्री,पंडितांनी केलेला आणि दूसरा काशी चे पंडित गागाभट्ट यांनी केलेला, असे आहे का?
गागाभट्टांनी म्हणे राज्याभिषेका चा विधी सिद्ध करण्या आधी अनेक पोथ्या पुराणे आभ्यासिली. कारण बऱ्याच मोठ्या काळानंतर (म्हणजे बहुदा देवगिरीचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर), एका हिंदू राजाला प्रथमच राज्याभिषेक होणार होता.
*********
तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत्च्छिथिल बन्धनात |
मूर्खहस्ते न दातव्यं एवम् वदती पुस्तकम ||
पहिला गागाभट्टांनी वैदिक
पहिला गागाभट्टांनी वैदिक पद्धतीने केला. सिद्ध/सत्पुरुष कॅटेगरीतील एक तांत्रिक विद्येतील पारंगत गृहस्थ तेथे महाराजांचे निमंत्रणावरून उपस्थित होते. त्यांना बहुधा गागाभट्टांना किंवा जनरल वैदिक पद्धतीला मिळणारा सन्मान बघून पोटात दुखले आणि त्यांनी महाराजांना भेटून "तुम्हारे राज्याभिषेक के टैमपे ऐसे ऐसे अपशकून हुवे. मै तांत्रिक पद्धतसे राज्याभिषेक कर सक्ता, जिससे अप्शकून टळ सकते, पण तुमकू चाहिए तोईच. बाद में मेरेकू बोल्ने का नै" असे काहीसे सांगितले. त्याला वैतागून / त्यांचा अपमान होऊ नये म्हणून महाराजांनी तांत्रिक पद्धतीनेही एक राज्याभिषेक २-३ दिवसांनंतर करून घेतला.
लता मंगेशकर
चित्रपट - गाईड
*********
तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत्च्छिथिल बन्धनात |
मूर्खहस्ते न दातव्यं एवम् वदती पुस्तकम ||
८ ऑक्टोबर: मृत्यूदिवस
हे सद्गृहस्थ त्या वर्षी दोनदा वारले, असे अंधुकसे आठवते. (पैकी, ८ ऑक्टोबर हा कितवा मृत्यूदिवस, हे मात्र नक्की आठवत नाही. बहुधा दुसरा असावा. (चूभूद्याघ्या.))
(अवांतर: "Cowards die many times before their deaths; The valiant never taste of death but once." ही सीझेरियन शेक्सपियरोक्ती (की शेक्सपियरियन सीझरोक्ती?) या निमित्ताने उगाचच आठवून गेली.)
(अतिअवांतर: सध्याच्या काँग्रेसचा फॅन नाही; परंतु तरीही, काँग्रेसच्या राज्यात कधी इतका वाईट फॉ पा झाल्याचे आठवत नाही. (अगदी राजीव गांधींच्या राज्यातसुद्धा.) (चूभूद्याघ्या.))
क्रांतिसिंह नाना पाटील
6 डिसेंबर :
इथे क्रांतिसिंह नाना पाटील add करता येतील का?
डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…