मंगेशकर भगिनी आणि इतर, स्पर्धा, वगैरे
मूळ धाग्यात चर्चा लांबल्याने आणि धागाविषयाशी अवांतर असल्याने इथे हलवण्यात आली आहे.
माफिया
"लताबाईंनी (आणि आशाबाईंनी सुद्धा) इतर गायिकांची करिअर घडू दिली नाही" असं म्हणणाऱ्यांची नक्की अपेक्षा काय असते?
अपेक्षा काय असते हे मला सांगता येणार नाही. मात्र, गीता दत्त, शमशाद बेगम, इ. अनेक प्रकारच्या गळ्याच्या गायिका असताना, त्यांना गाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं संगीत रचू शकणारे संगीतकार असताना आणि ते आवडीनं ऐकणारे श्रोते असताना मंगेशकर भगिनींनी अनेकविध प्रकारे माफियागिरी केली हे मुंबईच्या चित्रपट व्यवसायातलं खुलं गुपित आहे. अनेक प्रकारच्या गाण्यांसाठी मंगेशकरांची तार स्वरातली गायकी योग्य नव्हती. उदा. 'मुगल-ए-आझम'मधली 'तेरी महफिल में' कव्वाली ऐकली तर शमशाद बेगम आणि लताबाईंच्या कव्वालीतला फरक सरळ समजेल. किंवा क्लबमधल्या गाण्यांसाठी ओपी नय्यरच्या गाण्यांमध्ये गीता दत्त जी जादू करायची ती प्रचंड लोकप्रिय असतानाच हळूहळू तिच्याऐवजी ओपी आशा भोसलेला घेऊ लागला, वगैरे.
जंतू गुरुजी ,
जंतू गुरुजी ,
तुम्ही हिंदी चित्रपट हि कला आहे वगैरे असे मानत असावेत . तो व्यवसाय होता /आहे . आणि त्यात यशस्वी होण्यासाठी व्हॉटएव्हर इट टेक्स ते त्यांनी केले . एवढेच .
त्यांच्या सुरुवातीच्या काळात संगीतकार का वाकले असतील याविषयी काही सांगाल का ? हा दोष उरलेल्यांचा म्हणजे म्युझिक कंपोजर , प्रोड्युसर वगैरेचा असे आपणास नाही का वाटत ?
( बरं एवढं करून त्या कंचन /शारदा वगैरे इतक्या वाईट हि नसाव्यात )
पातळी
त्यात यशस्वी होण्यासाठी व्हॉटएव्हर इट टेक्स ते त्यांनी केले . एवढेच .
धंदा करण्यासाठी कुणी काय करावं आणि करू द्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणत्याही गॉडफादरशिवाय त्यांच्या गायकीच्या जोरावर मंगेशकरांना यश मिळत होतं, पण मक्तेदारी प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी इतर गायिकांहून खालची पातळी गाठली, एवढाच मुद्दा आहे. म्हणजे, टाटासुद्धा बलाढ्य आणि अंबानीसुद्धा, पण जिओ इन्स्टिट्यूट आणि टिआयएफआर यांत पातळी दिसते.
विनम्र प्रश्न
खालची पातळी गाठली म्हणजे काय ? म्हणजे संगीतकरांबरोबर प्रेमप्रकरणे म्हणताय का ? ते असेल तर ही गोष्ट हिंदी चित्रसृष्टीत वर्ज्य मानलेली गेली नसावी .
तसेच टीआयएफआर आणि जिओ इन्स्टिट्यूट ही तुलना पटली नाही . कारण टीआयएफआर ची ( किंवा आयआयएससी ची ) स्थापना ही धंदा / व्यवसाय म्हणौन झालेली नव्हती . जिओ इन्स्टिट्यूट चे वेगळे असावे . बहुधा .
रफी बरोबरचा वाद बहुधा
रफी बरोबरचा वाद बहुधा रॉयल्टीबाबत होता. आपण एकदा पैसे घेऊन गाणे म्हटले की आपला त्या गाण्याशी काही संबंध नाही. त्यावर नंतर रॉयल्टी मागू नये असे रफीचे म्हणणे होते. प्रत्येकवेळी गाणे वाजवले गेले की रॉयल्टी मिळाली पाहिजे असे लताचे म्हणणे होते. त्यावादाचा इतर गायकांच्या करिअरचा काही संबंध नव्हता. इथे लताची वादाच्या मुद्द्यात चूक होती. पण त्यामुळे इतर गायिकांच्या करिअरवर परिणाम झाला नसावा. उलट सुमन कल्याणपूर आणि शारदा यांना संधी मिळाली असेल.
एस डी बर्मनबरोबरचा वाद कशामुळे होता हे ठाऊक नाही.
-------------------------------------
मी समजा एखादी वस्तू कुणाला सप्लाय करीत असेन तर दुसऱ्या कुणाकडून त्याने ती वस्तू खरेदी करू नये म्हणून मी प्रयत्न करणे हा नीचपणा वगैरे असतो का?
नीयत
मी समजा एखादी वस्तू कुणाला सप्लाय करीत असेन तर दुसऱ्या कुणाकडून त्याने ती वस्तू खरेदी करू नये म्हणून मी प्रयत्न करणे हा नीचपणा वगैरे असतो का?
प्रश्न इतका सोपा कधीच नसतो. उदा. विधिनिषेधशून्य माणसाशी स्वार्थापायी तुम्ही कसेही वागलात तरी लोक ते सोडून देऊ शकतात, पण (उदा. रफीसारख्या) उमद्या माणसांशी मतभेदापोटी तुम्ही काय पातळीनं वागता त्यानं तुमची नीयत काय ते लोक ठरवतात.
एक सुचवण
'ऐसी'ने वेळोवेळी इथे कोणाकोणाला आणलेले आहे. (जयंत नारळीकरांपर्यंत.) तसेच लता मंगेशकरांना इथे आणून त्यांना त्यांच्याच शब्दांत त्यांची बाजू का मांडू देत नाही? होऊन जाऊ दे काय दुधाचे दूध, पाण्याचे पाणी व्हायचे ते!
इथे इतरांनी त्यावर वाद घालण्यात काय हशील आहे?
अं...
हे काम कोण करणार ?
जंतूंचे काँटॅक्ट्स असतीलच. (जंतूंचे काँटॅक्ट्स कोणाशी नसतात?)
(जंतूंनाच करू देत.)
म्हणजे त्यावेळी दूर राहिलेले बरे ऐसी पासून ..
Bianca Castafiore? "Ah, my beauty past compare..."
(त्या मिलानीज़ नाइटिंगेल, या हिंदुस्थानी नाइटिंगेल, हाही एक योगायोगच.)
प्रोड्युसर/म्युझिक कम्पोझर्स
प्रोड्युसर/म्युझिक कम्पोझर्स हे गायकाची निवड करू शकत . ते लेचेपेचे होते किंवा अतिसस्खलनशील होते म्हणावे का ? त्यांना का मोकळे सोडता ? यांना फाट्यावर हाणून दुसऱ्या चांगल्या गायिकांना घेण्याचे धैर्य नौशाद वगैरे का दाखवू शकले नसतील ?
शमशाद बेगम या लतापूर्व काळातही होत्या ना ? गीता दत्त ना गाणी द्यायची का थांबवली इतरांनी ?
( ओ पी नय्यर ने तर नंतर एकदा पुष्पा पागधरेंना पण ब्रेक दिला होता , मग आधी का ते जमलं नाही ? )
धंदा?
>> हिंदी चित्रपट हि कला आहे वगैरे असे मानत असावेत . तो व्यवसाय होता /आहे . आणि त्यात यशस्वी होण्यासाठी व्हॉटएव्हर इट टेक्स ते त्यांनी केले . एवढेच .
हे मुद्दा म्हणून बरोबर अाहे, पण त्यांचे चाहते तो त्यांचा व्यवसाय अाहे, असं मानत नाहीत ना! चाहतेच काय बहुसंख्य भारतीयही त्यांच्या कामाला व्यवसायाच्या (पातळीवर?) नजरेने पहात नाहीत. नाहीतर भारतरत्न वगैरे कशाला दिलं असतं मग? अाणि ते स्वर्गीय अावाज, भारताला मिळालेली ईशवरी देणगी वगैरेही अाहेच.
अण्णा, मुद्दा असा आहे की
अण्णा, मुद्दा असा आहे की स्वार्थ कुठे संपतो आणि हव्यास कुठे सुरू होतो ही रेषा महत्त्वाची. ती ओलांडल्यावर तक्रार व्हायचीच. फोन विकण्याच्या धंद्यातही मोनोपोली करून ती टिकवण्यासाठी 'क्ष कंपनीचा फोन विकलात तर आमचा फोन आम्ही तुमच्या दुकानात विकू देणार नाही' असं म्हणून नव्या कंपन्या मारून टाकणं हा गुन्हा आहे. त्याहीपलिकडे फोन कंपन्या आणि गायन या वेगळ्या गोष्टी आहेत. कलेची आराधना, त्यात येणारं पावित्र्य वगैरे यामुळे कलाकाराला अक्षरशः देवपद मिळतं. त्यामुळे स्वार्थ आणि हव्यास यांच्यातली रेषा अधिकच अलिकडे येते असं मला वाटतं.
...
कलेची आराधना, त्यात येणारं पावित्र्य वगैरे यामुळे कलाकाराला अक्षरशः देवपद मिळतं.
इंद्रदेखील कोणी तपाला बसला की त्या रंभा, मेनका, उर्वशी अन कोणाकोणाला पाठवायचाच की, तपोभंग करायला. त्याच्या देवपदावर कोणाच्या लेखी त्यामुळे शष्प फरक पडला काय?
अहो, द होल सिस्टिम इज़ करप्ट, ईव्हन देव्ज़ आर करप्ट... त्या मर्त्य लताबाईंचे काय घेऊन बसलात?
गुरुजी ,
गुरुजी ,
क्षमा असावी . पण ++ स्वार्थ कुठे संपतो आणि हव्यास कुठे सुरू होतो++ हे वाक्य फार म्हणजे फार हे आहे . व्यवसाय आहे आणि त्यात स्वार्थ /हव्यास असे लिहिणे म्हणजे जरा हेच वाटते ( आपल्याबद्दल नितांत आदर भावनेपोटी ' हे ' असे लिहीत आहे हे चतुर असे आपण जाणालच . ) त्या कलेची आराधना वगैरे करत वगैरे असा कुठलाही दावा नाही. एका प्रोफेशनल माणसावर असल्या भावना लादणे योग्य आहे का ?
हां , तुम्ही " त्यांनी कलेच्या प्रसाराकरिता काहीही काम केले नाही , त्या भुक्कड क्षुद्र मनोवृत्तीच्या होत्या , लबाड होत्या वगैरे लिहिलंत तर त्याबददल सहमत आहेच . शिवाय
++कलेची आराधना, त्यात येणारं पावित्र्य++ ये क्या है ? थेट बाळ कोल्हटकरांच्या जुडीतील वाक्य काय ?
++देवपद मिळतं++ ते काय थोडा प्रचार केला कि कोणालाही मिळत असावं . आमच्या देशातील रजनीकांतहुनही मोठा देव सध्या राज्य करतो पण त्याचं काय करू आम्ही ?
गुरुजी कळावे , आपला ,
माफी मागून एक विद्यार्थी .
बरं, ते सगळं सोडा. मोनोपोली
बरं, ते सगळं सोडा. मोनोपोली वापरून इतर कंपन्या मारून टाकणं या गुन्ह्याचं काय? ते 'गंदा हय पर धंदा हय' म्हणून सोडून देता येत नाही.
बायदवे, त्यांना कलाकार, कोट्यवधी चाहते आहेत म्हणून अनेक फायदे मिळालेले आहेत. कुठलातरी पूल कुठेतरी बांधावा की नाही याबद्दल गहन चर्चा झालेली आहे. असे फायदे कलाकार म्हणून द्यायचे, आणि कलाकार म्हणून अधिक जाचक लोकापेक्षा ठेवायच्या नाहीत, हे चालत नाही. लोकांच्या प्रेमाची तलवार दुधारी असते.
मोनोपोलीचं तुम्ही दिलेलं
मोनोपोलीचं तुम्ही दिलेलं उदाहरण- दुसऱ्याचा माल दुकानात ठेवला म्हणून आमचा माल विकू देणार नाही - हे आज तरी भारतात गुन्हा समजलं जात नाही. एक्स्क्लूझिव्ह ऑथराइज्ड डीलर डिस्ट्रिब्यूटर ही कन्सेप्ट अस्तित्वात आहे. दुसरे म्हणजे असे जो म्हणतो त्याचं तितकं गुडविल/मार्केट पुल असेल तरच अशा गमजा चालतात. अन्यथा समोरचा डीलर "थँक यू व्हेरी मच, निघा आता" असं म्हणू शकतो. तर लता आणि आशा यांना तसं म्हटलं गेलं नसेल.
>>कुठलातरी पूल कुठेतरी बांधावा की नाही याबद्दल गहन चर्चा झालेली आहे. असे फायदे कलाकार म्हणून द्यायचे,
त्यांच्या ऑब्जेक्शनला फाट्यावर मारण्यात आले.
तुम्ही उदाहरणाकडे का बघता?
तुम्ही उदाहरणाकडे का बघता? मोनोपोलीचा गैरफायदा घेऊन स्पर्धकांना मारणं हा गुन्हा आहे.
लता-आशांना कोणी 'खड्ड्यात जा' म्हटलं नाही, याचा अर्थ त्यांचा पुल मोठा होता असा होत नाही का?
पूल बांधण्याचंही उदाहरणच होतं, त्यांतून त्यांचं म्हणणं विचारात घ्यावं इतका तरी त्यांना जनाधाराचा 'पुल' मिळाला होता हेच अधोरेखित करायचं होतं. ते तुम्ही नाकारता का? त्या रस्त्याचं काहीही होवो... पण उद्या अबापट बोंबलले, 'या रस्त्यामुळे मला त्रास होईल' तर पेपरवाले येऊन छापतील का?
तेव्हा उदाहरणांकडे का बघता, मूळ मुद्द्यांकडे पाहा की.
ते पूल वगैरे बाबतीत त्यांना
ते पूल वगैरे बाबतीत त्यांना कोलून वगैरे...
मी त्यांच्या वैयक्तिक फालतूपणाची कुठलीही बाजू घेत नाहीये. मी त्यांचा फ्यान वगैरेही अजिबात नाही. मी फक्त या व्यवसायाला कला संबोधून कैच्या कै अपेक्षा बाळगण्याचा विरोध केला.एवढेच. त्यामुळे त्यांच्या उर्वरित कर्तृत्वाबद्दल ... असो.
एकेकाळी बऱ्या गात. आणि बास फुलस्टॉप वगैरे.
मोनोपोली विरोधी कायद्यात त्यांना कसं बसवायचं वगैरे नीटसं लक्षात येत नाहीये.
बायदवे, ते सोलह सावन बहके
बायदवे, ते सोलह सावन बहके नाही, शोला सा तन बहके आहे.
लोकप्रियता हेच ज्यांच चलन असतं, ते लोक आपल्या प्रतिमेची काळजी घेतातच. त्यांना स्वार्थ विरुद्ध हव्यास यातला ब्यालन्स साधावा लागतो. मला एक सांगा, लताजींनी जाहीर का केलं नाही, 'या संगीतकाराने दुसर्या गायिकेला गाणी दिली म्हणून मी त्याच्यासाठी आता गाणार नाही?'. त्यांनी जे काही करायचं ते गुपचुप केलं. सांगा पाहू का?
'एस ओ आर डबल ई, सॊरी'
'एस ओ आर डबल ई, सॊरी'
'नाही हो, एस ओ डबल आर ई, सॊरी!' (ऐकणारे लोक पहिल्याने कशी चूक केली म्हणून जोरात हसतात.)
'फादर, ते एस ओ डबल आर वाय आहे!' इति शंकर्या. (ऐकणारे लोक आता कसनुसं, दबून हसतात, कारण त्यांनी पहिल्याची चेष्टा करताना दुसर्याची चूक केलेली असते.)
- 'असा मी असामी' च्या वाचनातला अनुभव.
एकदा नाही बऱ्याचदा
इतर गायिकांची
मला इथे हा मुद्दा महत्वाचा वाटतो. एखाद्यावेळी उमेदीच्या काळात झाले असेल तर ठीक आहे. व्यावसायिक बाब म्हणता येईल. पुन्हा पुन्हा अशा गोष्टी घडल्या की मग त्यांची चर्चा होते. नाहीतर पद्मजा फेणाणी फक्त दोन सुपरहीट गाणी गाउन एकदम बाजूला नसती गेली.
- ओंकार.
व्यवसायांवर अतिरेकी निर्बंध
- व्यवसायांवर अतिरेकी निर्बंध लावलेले आहेत ते सगळे उठवले पाहिजेत. काँपीटीशन कमिशन ऑफ इंडिया हे बरखास्त केले पाहिजे.
- तुमच्यावर हल्ला झाला तर तुम्हाला वाचवणारी एकच संस्था असते - पोलिस. ही मोनोपोलीच.
- तुम्ही असं म्हणू शकता की सीआरपीएफ, होमगार्ड, एसार्पी वगैरे आहेत. पण ते सगळे एक किंवा जास्तीतजास्त दोन संगठनांच्या अधिपत्याखाली येतात. ड्युओपोली म्हणा हवंतर.
- आशा व लता यांची ड्युओपोलीच होती.
- तुम्हाला दिवसातून छप्पन्न वेळा लागणारी वस्तू - चलन - हे पुरवणारी एकच संस्था आहे - आर्बीआय. मोनोपोली.
- फेअर काँपीटीशन हा तर मोठ्ठा विनोद आहे.
- तुमच्या घरी प्लंबर हवा असेल तर हायरिंग करताना सगळ्या धर्माच्या, जातीच्या, सेक्श्युअल ओरिएंटेशन च्या लोकांना तुम्ही विचारात घेत नाही. चांगलं काम करणारा आणि कमीतकमी दाम लावणारा असा सर्वसामान्य क्रायटेरिया असतो. तिथे सुद्धा तो तृतीयपंथी असेल तर तुम्ही सरळ नाही म्हणू शकता (कोणीही काहीही आक्षेप घेत नाही.)
- शेतकऱ्याने त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या शेतमजूराला मिनिमम वेज दिलं नाही तर कोणीही बोंबलत नाही.
.
आता नेहमीप्रमाणे गब्बर प्लंबर ची तुलना मोठ्या कॉर्पोरेशन शी करत आहे असा आरडाओरडा होईल.
.
लता-आशा
यांच्या मोनोपोली बद्दल बरंच वाचलं आणि ऐकलं आहे. त्याबाबत काही संगीतकारांची मतंही मला माहिती आहेत.
पण शेवटी प्रश्न उरतो तो दर्जाचा आणि पर्फेक्शनचा! त्या दोघींपेक्षा सरस कोणी स्त्री गायिका आल्या असत्या, तर त्यांची मोनोपोली टिकली नसती. खरा कानसेन, डोळे मिटून सुद्धा, सुमन कल्याणपुरांनी किंवा अन्य कुणी गायलेलं गाणं ऐकून मनातल्या मनांत तुलना करतो, जे पट्टीचे संगीतकारही करत असणारच. आपला प्रॉडक्ट(सिनेमा) जास्तीतजास्त चालावा असं वाटत असेल तर कोणीही दर्जाबद्दल तडजोड करणार नाही.
दर्जा आणि सिनेमा व्यवसाय
सिनेमा व्यवसायाचे गणित दर्जावर अवलंबून नसते. लताबाईंचा दर्जा चांगला आहे याबद्दल वाद नाही. लताबाईंची काही गाणी कल्याणपूर गाउ शकल्या नसत्याही. पण काही गाणी हिट झाल्यामुळे त्या अजून चालल्या असत्या. प्रोड्युसर म्हटले असते लोकांना आवडतायत तर घ्या सुमन कल्याणपूर. तसेही सिनेमातली सगळी गाणी गायला उच्च दर्जा लागतो असे नाही.
- ओंकार
लताशी भांडण झाले म्हणून
लताशी भांडण झाले म्हणून डायरेक्ट शारदा नामक बेडकीला गाणे देणाऱ्या संगीत दिग्दर्शकाबद्दल मला अतोनात आदर आहे.
हे म्हणजे बायकोने अबोला धरला म्हणून टॉयलेट पेपरच्या आतल्या पुठ्ठ्याच्या नळकांड्यासोबत शृंगार करून 'बघ तुझ्याशिवायसुद्धा माझं काम होतंय' असं दाखवण्यासारखं आहे.
लता आशाच्या उच्चीच्या काळातच
लता आशाच्या उच्चीच्या काळातच सुमन कल्याणपूर यांना संधी मिळतच होती. शिवाय ज्यांना त्यांचे दर परवडत नव्हते त्यांनी हेमलता, उषा उथुप यांना संधी दिलीच. अनुराधा पौडवाल यांनाही संधी मिळाली.
.
यही तो मै कह रहा हूं, मालिक.
.
निर्माता दिग्दर्शक यांना ग्राहकांची आवड निवड आणि धंद्याचं गणित कळत नाही आणि मोनोपोलीच्या विरोधकांनाच तेवढी कळते - असं काहीसं गृहितक आहे.
.
अवांतर : अमेरिकेतल्या शेरमन ॲक्ट वर असलेला एक आक्षेप असा आहे की - मक्तेदारी विरोधी कायदे हे खरंतर स्पर्धा प्रक्रिया अबाधित ठेवण्यासाठी असावेत. स्पर्धा प्रक्रियेच्या डायनॅमिक्स आणि प्रेशर्स पासून स्पर्धकांचे रक्षण करण्यासाठी नसावेत. आणि Law of unintended consequences असं सांगतो की स्पर्धक मंडळी हे कायदे एकमेकांविरोधी वापरतात व आपल्या कॉस्ट्स सरकारकडे संक्रमित करतात. पाहुण्याच्या काठीने विंचू मारता आला तर बरंच आहे - हा प्रकार चालतो.
.
थेरडीच्या आवाजाचा कानांना आणि मेंदूला त्रास होतो.
हे गाणं ऐका, १९९४ सालच्या सिनेमातलं आहे. मूळ गाणं म्हणे कविता कृष्णमूर्तीनंही गायलं होतं. संगीत प्रकाशित झालं तेव्हा तिला समजलं की तिचा पत्ता कट झाला; तिला कळवण्याची तसदी घेण्याइतका सभ्यपणाही या लोकांकडे नव्हता. तेव्हा लताबाईंचं वय होतं ६५ वर्षं, आणि कविता कृष्णमूर्तीचं वय होतं, ३६. तरुण मुलीचं दुःख पडद्यावर दाखवत असताना पार्श्वभूमीला कोणाचा आवाज तिथे योग्य वाटणार, याचं अंकगणित किती कठीण आहे? अंकगणिताचं संगीतात काय काम म्हणायचं असेल तर त्या गाण्याचा पहिला शब्द 'कुछ' ऐकला तरी कुमार सानूच्या आवाजातलं तेच गाणं हवंहवंसं होतं. होय, होय, कुमार सानूबद्दल बरं बोलावं लागतं!
स्मरणरंजन म्हणून वयस्कर फरीदा खानुमचं एखादं आज जाने की जिद ना करो ऐकावं लागलं तर ठीक आहे. तरीही ऐकवत नाही. ते मूर्तीभंजन झालं नसतं तर बरं झालं असतं. म्हातारी लता 'अनदेखा अनजाना सा पगला सा दीवाना सा, जाने वो कैसा होगा रे' म्हणायला लागली की पांढरी साडी नेसलेली भुताळी आपले पांढरे, लांबडे, म्हातारे केस मोकळे सोडून रानावनांत पोरासोरांचा पाठलाग करून त्यांना घाबरवत्ये, असली चित्रं डोळ्यांसमोर येतात.
वयानुसार येणारा समजुतदारपणा सोडूनच द्या लताबाई साठी उलटली तरी एकेकाळच्या मोनोपॉलीच्या जोरावर तरुण गायिकांच्या करियर आणि पर्यायानं आयुष्यांशी तरुण वयात खेळले तसलेच हिणकस खेळ करत होती; नव्या पिढीच्या तरुण गायिकांनी अनेक तऱ्हेची गाणी म्हटली असती, त्यांच्या लोकप्रियतेमुळे संगीतात अनेक निरनिराळे प्रयोग होऊ शकले असते जे १९८०-९०च्या दशकात झाले नाहीत मात्र आता होतात; बाईंचा आवाज शिकाऊ लोकांनी वाजवलेल्या व्हायलिनसारखा झाला तरी त्याच आवाजाच्या जोरावर पैसा छापत होती; वर पुन्हा त्याच-त्या मोनॉपोलीच्या आधारावर पेडर रोडच्या फ्लायओव्हरचं राजकारण वगैरे गाढवाच्या गांडीचा मुका घेण्याचे चाळे झालेच. स्वतः एकटीनंच चाळे केले असते तर ठीक, काय फरक पडतो. पण काय भिकार गाणी आणि आवाज ऐकायला लागायचे १९८०-९०च्या दशकात!
पुढे तो ए. आर. रहमान आला, सुनिधी चौहानला लोकप्रियता मिळाली, संदेश शांडिल्य, संदीप चौटासारखे एकेका सिनेमात चमकलेले संगीतकार आले आणि या मंगेशकरांची मिरासदारी संपायला लागली. नाही तर अजूनही राधा मंगेशकर वगैरे प्रकार सहन करावे लागले असते. सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवालपासून, शारदा आणि कोणकोणत्या मागे ढकललेल्या गायिकांच्या क्षमतांबद्दल शंका घ्यायला काहीच हरकत नाही, मात्र मंगेकरांच्या मोनोपॉलीमुळे भारतीय संगीताचं नुकसान नक्कीच झालं. दुर्दैवानं तेव्हा खाऊजा, इंटरनेट प्रकरणं झालेली नसल्यामुळे 'थेरडी नको असेल तर ऐकू जोनी मिचेल' असा पर्याय नव्हताच. जोनी मिचेलच्या संगीताचा आणि मुख्य तिनं लिहिलेल्या काव्याचा, त्या संदर्भांचा यथार्थ वापर 'लव्ह अॅक्चुअली' या चित्रपटात केला आहे.
जोनी मिचेलची आठवण निघाली आहेच तर तिनंच लिहिलेलं, गायलेलं गाणं आहे - Both sides now. हे तरुण वयात, (२४ वर्षं) गायलेलं, हे आणखी मध्यमवयात (५७ वर्षं). मला मोठेपणी गायलेलं व्हर्जन अधिक आवडतं; त्या शब्दांसाठी २०० वाद्यांचा मेळ आणि तिच्या आवाजाची खालची पट्टी अधिक शोभून दिसते. ही बुद्धी लताबाईंना सत्तरी उलटली तरी रहमानच्या 'जिया जले'शिवाय येऊ नये? सॉरी, मदन मोहनचं 'वीर झारा'चं संगीत अत्यंत रटाळ आहे. That doesn't count. रहमाननंच आशा भोसलेच्या आवाजाचा खालच्या पट्टीत 'रंग दे'मध्येही किती सुंदर वापर केलाय!
अनुराधा पौडवालला चित्रपटांत ओरिगिनल गाणी मिळाली असती तर किती भिकार भजनांपासून आपली सुटका झाली असती ... तिच्या मुलानं संगीत दिलेला एक आल्बम मागे आला होता, अनुराधा पौडवालच्या आवाजातली गाणी होती. अगदी वाईट नव्हता.
कलाकारांनी त्यांची कला आणि पर्यायानं समाज पुढे न्यावा अशी अपेक्षा असते. एके काळी लताबाईंनी तरुण स्त्री असून पुरुषप्रधान इंडस्ट्रीत उपजत गुण आणि कष्ट करून नाव कमावलं. आणि तेवढं झाल्यावर स्वतःची, बहिणी-भावाची मोनोपॉली सांभाळत स्वतःच पुरुष बनली. दैव-कर्म देतं आणि स्वतःचं कर्म नेतं, त्यातली गत. लताबाईंनी संगीत व्यवसाय आणि संगीतकला पुढे नेण्याजागी मागे नेली.
!
बऱ्यापैकी सहमत आहे; एरवी 'मार्मिक'सुद्धा दिली असती, परंतु
पेडर रोडच्या फ्लायओव्हरचं राजकारण वगैरे गाढवाच्या गांडीचा मुका घेण्याचे चाळे
या वाक्यामुळे... रसभंग झाला असे नाही म्हणणार, परंतु भलताच रस निर्माण झाला.
(गाढवाच्या नव्हे, उंटाच्या. वाक्प्रचार वापरायचाच झाला, तर किमानपक्षी तो बरोबर वापरावा, अशी माफक अपेक्षा आहे. अन्यथा, ते - आता झाले तसे - हास्योत्पादक ठरते. त्यामुळे, नाइलाजाने 'विनोदी' अशी श्रेणी देणे भाग पडत आहे. असो.)
..........
बाकी, प्रतिसादाबद्दल...
१९६०-७०पर्यंतची लता श्रवणीय वाटायची. आवडायचीसुद्धा. तिथून पुढे मात्र डाउनहिल मामला सुरू झाला. आणि, आता तर तिने गाऊ नये, असे वाटते; असह्य होते.
पांढरे केस मोकळे सोडून पोरासोरांना भिववत फिरणाऱ्या थेरडीची उपमा आवडली. शिकाऊ व्हायोलिनवादनाची उपमा केवळ घरातले पोर एकेकाळी शिकाऊ असताना पॉइंटब्लँक रेंजमधून ऐकावे लागल्यामुळे भावू शकली. (आता बरा वाजवतो.) इतरांना ते दुःख कदाचित समजू शकणार नाही. माणूस माणसाला चंद्रावर पाठवू शकला, परंतु व्हायोलिनकरिता व्हॉल्यूम कंट्रोलचा शोध लावू शकला नाही. असो चालायचेच.
(१) लताबाईंनी आपली मोनोपोली
(१) लताबाईंनी आपली मोनोपोली वापरून इतर तरूण होतकरू कलाकारांची करियरं बरबाद करण्यासारखी कृत्यं केली असतील तर आमचा त्यांना सिरियस, जोरदार पाठिंबा. ही मोनोपोली अनेक मार्गांनी केली असेल - उदा. प्रिडेटरी प्रायसिंग, एक्स्क्लुझिव्ह डीलिंग, बंडलींग, रिफ्युजल टू डील वगैरे, वगैरे, वगैरे.
(२) आजकाल ॲमेझॉन च्या विरुद्ध लिना खान या किल्ला लढवत आहेत. खान बाईंचं म्हणणं असं आहे की कुठला ना कुठला कायदा शोधून काढुया की जो ॲमेझॉन च्या विरुद्ध वापरता येईल व ॲमेझॉन ची वाढत जाणारी बार्गेनिंग पॉवर मोडून काढता येईल. आमचा खानबाईंना जोरदार विरोध.
.
जेव्हा तुम्ही पब्लिक फेसिंग
जेव्हा तुम्ही पब्लिक फेसिंग म्हणजे प्रसिद्धीच्या झोतातलं आयुष्य निवडता तेव्हा एक तर तुम्हाला खूप गोष्टींचा, खाजगीपणा वगैरे त्याग करावा लागतो शिवाय पी आर हे कौशल्य अगदी मस्ट असतं. त्यांनी त्यांचे पी आर कौशल्य वापरुन, योग्य त्या खेळी केल्या. त्यांचे फासे चांगले पडले. बाकी अन्य गायिका धुतल्या तांदळासारख्या होत्या किंवा भोळ्याभाबड्या होत्या असे काही गैरसमज आहेत का? त्यांनी भरपूर कावकाव केलेली असणारच त्यांचे धूर्त कौशल्य कमी पडले इतकच.
__________________________
मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो ते असे.
आणलात की तुम्ही!
तुम्ही असल्यामुळे कल्जि क्रत नाही.
अवांतर: काल निराळ्याच संदर्भात झालेल्या एका संवादात पुन्हा एकदा सिमोन दी बोव्हारच्या मुलाखतींची मला आठवण झाली. मात्र ते वाक्य इथेही तेवढंच लागू पडतं. एका मुलाखतीत ती म्हणते, "इंदिरा गांधी किंवा मार्गारेट थॅचर या स्त्रिया देशाच्या सर्वोच्च पदावर आल्यामुळे सामाजिक न्यायाची साथ त्या-त्या देशांत बोकाळली नाही."
या दोघींची मोनोपोली संपल्यावर
या दोघींची मोनोपोली संपल्यावर पन्नासेक गायिका फेअर कॉम्पिटिशन करत आहेत की त्यातही दोन तीनच गायिका सुनिधी चौहान, श्रेया घोषालच पुढे आहेत? माझ्या मते खूप गायिका आहेत पण त्या दोन चार गाणी गाऊन शांत होतात. या दोघी दीर्घकाळ टिकून आहेत. सो इंडस्ट्रीवर दोन तीन व्यक्तींचेच वर्चस्व राहणे हे काही विशेष नाही.
---------------------------------------------
अवांतर: वर माझ्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे त्याच काळात पुरुष गायकांमध्ये रफी मुकेश आणि किशोरकुमार हे तीनच गायक राज्य करीत होते. बाकी हेमंतकुमार आणि मन्ना डे हे खूप कमी गाणी गात होते. त्याबाबतीत रफी किशोर यांनी कॉम्पिटिशन खच्ची केल्याची तक्रार कुणी करत नाही.
मोनोपोली असण्याला विरोध नाही.
मोनोपोली असण्याला विरोध नाही. ती कशी निर्माण केली जाते याला विरोध आहे.
अवांतर: वर माझ्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे त्याच काळात पुरुष गायकांमध्ये रफी मुकेश आणि किशोरकुमार हे तीनच गायक राज्य करीत होते. बाकी हेमंतकुमार आणि मन्ना डे हे खूप कमी गाणी गात होते. त्याबाबतीत रफी किशोर यांनी कॉम्पिटिशन खच्ची केल्याची तक्रार कुणी करत नाही.
एक्झॅक्टली. यांचे असे किस्से कोणीच बोलत नाहीत. फक्त मंगेशकरांबद्दल या चर्चा होतात. कारण त्या घटना घडल्या आहेत. अभिनेत्यांच्या बाबतीतही असे किस्से आहेत.
(अतिअवांतर: यावरून् गॉडफादर मधला johnny fontane never gets that movie हा सीन आठवला.)
- ओंकार.
या दोघींची मोनोपोली संपल्यावर
या दोघींची मोनोपोली संपल्यावर पन्नासेक गायिका फेअर कॉम्पिटिशन करत आहेत की त्यातही दोन तीनच गायिका सुनिधी चौहान, श्रेया घोषालच पुढे आहेत? माझ्या मते खूप गायिका आहेत पण त्या दोन चार गाणी गाऊन शांत होतात. या दोघी दीर्घकाळ टिकून आहेत. सो इंडस्ट्रीवर दोन तीन व्यक्तींचेच वर्चस्व राहणे हे काही विशेष नाही.
लताबाईंनंतर बराच काळ अलका याग्निक, कविता कृष्णमूर्ती वगैरे गायिकांनी काळ गाजवला. रेहमान आल्यावर चित्रा वगैरे सौदिंडियन नावंही दिसायला लागली. आजकाल गायक/गायिका कोण आहे यापेक्षा गाण्याचा मूड आणि साऊंड याला कंपॅटिबल आवाजाचे गायक/गायिका शोधले जातात असं वाटतं.
असा कोणता काळ होता - पोस्ट
असा कोणता काळ होता - पोस्ट आशा लता किंवा रफी किशोर जो दोन किंवा तीनाहून जास्त गायक किंवा गायिकांनी गाजवला?
लता - आशा - रफी - किशोर
अनुराधा पौडवाल- अलका याग्निक - कुमार शानू- उदित नारायण
वगैरे.......
आज सुनिधी चौहान - श्रेया घोषाल - अरिजित सिंग- सोनू निगम
तुम्ही आजकालची श्रेयनामावली
तुम्ही आजकालची श्रेयनामावली काढून पहा... पूर्वी रफी - किशोर - उदित - कुमार/अलका - कविता - अनुराधा एवढीच नावं दिसायची. आता किती दिसतात? आजकाल मिका सिंग किंवा बादशहासुद्धा हिट गाणी देऊन जातो. लताबाईंच्या काळात रियालिटी शोज किंवा यूट्यूब असतं तर त्याही कदाचित एवढ्या पाप्युलर झाल्या नसत्या.
कुठच्याही यादीत सर्वात वरचे
कुठच्याही यादीत सर्वात वरचे दोन किंवा तीन शोधून काढता येतात, आणि बाय डेफिनिशन 'त्यांनी तो काळ गाजवला' म्हणता येतं. योग्य पद्धतीने विचार करायचा झाला, तर ते डिस्ट्रिब्यूशन किती स्क्यूड आहे ते पाहायला हवं. म्हणजे गेल्या पाच वर्षांतली सगळ्यात गाजलेली दोनशे गाणी पाह्यली, तर त्यातली किती टक्के सर्वात वरच्या दोघांनी किंवा तिघांनी गायलेली आहेत? या प्रकारच्या मोजमापीवर सत्तरीच्या दशकातली हिंदी सिनेमात स्त्रियांनी गायलेल्या गाण्यांपैकी सुमारे ऐशी टक्के फक्त लता आणि आशाच्या नावावर दिसतील. पुरुषांच्या बाबतीत रफी, किशोर, मुकेश, मन्नाडे, हेमंतकुमार या नावांत 95% गाणी संपतील. आज ते चित्र आहे का?
अवघड नाही खरंच आहे. पुढील
अवघड नाही खरंच आहे. पुढील प्रश्नांची उत्तरं द्या
१. आज ज्या विविध ढंगाची आणि रंगाची गाणी बनतात तितकी विविधता खरंच लताबाई-आशाबाईंच्या काळात होती का? त्या काळात गाणी मेलडिअस असली तरी वाद्यमेळ आणि संगीताचा बाज यातील विविधता कमी होती.
२. आजकालच्या काळात बनलेली आणि सोना मोहपात्रा, शाल्मली खोलगडे, शिल्पा राव, नीती मोहन यासारख्या गायिकांनी गायलेली गाणी लता-आशा-उषा-कविता-अलका यांपैकी कोणालाही गाता आली असती का? किंवा त्यांनी गायलेली ती गाणी चांगली वाटली असती का?
लागोपाठ दोनदा बघितला व्हिड्यो
लागोपाठ दोनदा बघितला व्हिड्यो. इथे आपण जी चर्चा केली तिचा मतितार्थ एका वाक्यात तिने सांगितला, 'जहा मै हू, वहा किसी और की जरूरत ही क्या है?' यावर म्यूझिक आणि फिल्म इंडस्ट्रीतले दिग्गज उमजून हसले. आणखीन काय पाहिजे?
अधूनमधून तिने जी चवचाल गाणी, ज्या शैलीत गाऊन दाखवली, त्यातून तिला निश्चितच 'हे असलं काही गाऊ शकेल तुमची दीदी? किती काळ तेचतेच गोग्गोड दळण दळत बसायचं?' हे सांगायचं होतं.
जुनाट झालेल्या आयकॊनांची पूजा करत बसण्यापेक्षा त्यांच्या चिंधड्या उडवणार्या क्लास्टांचा विजय असो.
+1
फक्त दिद्दीच नव्हे, अनेक गाण्यांंमध्ये 'यशराज'चं टिपिकल 'आऽऽआऽऽ' उगाच कुठेही, अस्थानी डकवून देण्यामुळेही मजा आल्ये. सिनेमाचा विषय काय असतो, तर नवतरुणांच्या आयुष्यातले प्रश्न. मग तसल्या सिनेमाच्या सुरुवातीला दिद्दी 'आऽआऽ' करून चिरकायला कशाला पाहिजे!
सुगंधा मिश्रा रॉक्स!
अवांतर: वर माझ्या प्रतिसादात
अवांतर: वर माझ्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे त्याच काळात पुरुष गायकांमध्ये रफी मुकेश आणि किशोरकुमार हे तीनच गायक राज्य करीत होते. बाकी हेमंतकुमार आणि मन्ना डे हे खूप कमी गाणी गात होते. त्याबाबतीत रफी किशोर यांनी कॉम्पिटिशन खच्ची केल्याची तक्रार कुणी करत नाही.
एक्झॅक्टली. यांचे असे किस्से कोणीच बोलत नाहीत.>>>
अहो त्या तीन शेंबड्यांपैकी कोणात इतरांना खच्ची करण्याएवढी पॉवर तरी होती का? किशोरकुमारचा एक आराधना की अमर प्रेम हिट काय झाला, नि रफीचा बाजार बसला. दुसरा कोणी आला असता तर किशोरचा बसवला असतान. स्वत:त संभोग करायची ताकद नाही त्यांनी अल्फा मेल/फिमेल किती पोरं काढतायत म्हणून विव्हळू नये.
गावठी ॲक्सेंटमध्ये (सुरवातीला) गाणाऱ्या दोन मराठी बायांच्या तालावर अख्खी फिल्मिन्डस्ट्री का नाचली असेल?
गावठी ॲक्सेंटमध्ये (सुरवातीला
गावठी ॲक्सेंटमध्ये (सुरवातीला) गाणाऱ्या दोन मराठी बायांच्या तालावर अख्खी फिल्मिन्डस्ट्री का नाचली असेल?
.
जोरदार सहमती.
.
ह्यबगा - आमच्याकडे त्या दोघींनी केलेल्या दहापंधरा मिष्टेकांची लिष्ट आहे. तेव्हा त्या दोघी ऑप्प्रेसिव्ह असणारच. आणि म्हणून त्या दोघींची बाजारातली बार्गेनिंग पॉवर मिथ्या आहे. आणि म्हणून त्या दोघींची गुणवत्ता सुद्धा मिथ्या आहे.
.
निर्माताच ठरवतो कुणाकुणाला
निर्माताच ठरवतो कुणाकुणाला घ्यायचं सिनेमात, गाणी कुणाची इत्यादि.
त्यामुळे इतर काही आरोप झाले असले मंगेशकरांवर ( आपली आणि बाबांची स्तुती, इतर कोणी गायकाची नाही) तरी त्यांनाच गाणी मिळाली हा त्यांचा दोष नाही.
ए आर रेहमानने आशा भोसले कडून कसे गाणे उरकले हा किस्साही आशाताईच सांगतात. इतका संगीत दिग्दर्शकाचा दबदबा असतो गाण्यावर.
आता सोनी आइडल रिअॅलटी शोमधून (/ झी / स्टार)वेगळ्या आवाजाचे गायक निवडतात. लता आशासारखे गाणाऱ्यांना डच्चू मिळतो.
बाकी पोरंटोरं उपमा काही समजल्या नाहीत लेखाच्या विषयाला धरून. सोयासॅास म्हणता येईल.
प्रासंगिकता?
या चर्चेची प्रासंगिकता समजली नाही. या गोष्टी प्रत्यक्षात सुरु असताना ( म्हणजे तीस चाळीस वर्षांपूर्वी) याबाबत कोणी (ऑफिशियल हां )बोललं -लिहिलं असेल तर ते जाणून घ्यायला आवडेल. नाहीतर आज या आपल्या चर्चेला कितपत अर्थ आहे समजत नाही. उलट आजच्या संगीत क्षेत्रात चालू असलेल्या काही चुकीच्या (!) , अनैतिक वगैरे गोष्टींविषयी आजच आपण चर्चा करू लागलो तर त्याला काही अर्थ असेल. कारण लता-आशा यांचा जमाना ( सामाजिक-राजकीय-सांगीतिक माहौल या अर्थाने ) कधीच संपलेला आहे. राहिल्या आहेत त्या रेकॉर्डस् आणि आठवणी !
मुक्ताफळे
धाग्यावरची एकेक मते म्हणजे मुक्ताफळांपेक्षा वेगळी नाहीत. मंगेशकर भगिनी, त्यातही लता, ह्यांस दैवत्व बहाल केले गेले. तसे ते सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन ह्यांनाही केले गेले. अवास्तव व्यक्तीपूजेत भारतीय अग्रणी आहेत, किंबहुना भारतीयच हे करत असावेत. मी काही इतर देश फिरलो नाही, इथल्या मंडळींनी ह्यावर भाष्य करावे.
शास्त्रीय गायन हे अभिजात, अभिजनांचे गणले जाते. बहुजनांपासून राखून ठेवण्यासाठी भारतीयांत जो काही elitism आहे त्याचा मापदंड शास्त्रीय संगीत आहे. शोभा गुर्टू, गंगूबाई हनगल, कुमार गंधर्व, इतकेच काय तर भीमसेन जोशींची बरीच गाणीही; गाण्यातून मिळणारा निखळ आनंद, (मग तो कोणत्याही रसातला असो) देणारी नाहीत. बहुधा, गेली तीस वर्षे तरी अशा मैफिलींमध्ये शास्त्रीय संगीत अभ्यासक, हौशी अशाच लोकांची भरती असते. लावणी, वगनाट्य, तमाशा इ. चे रसिक इथे फिरकत नाहीत. बहुधा आपल्याला जे (बारीक ताना, झमझमे, मुरक्या) जमले नाही त्याची वाहवा अशा हौशींकडून होत असावी.
ही दरी मिटायला सुरुवात झाली, तेव्हा दीदींचा सुवर्णकाल संपू लागला असे इथे मत दिसते. विक्षिप्त अदिती ह्यांनी दिलेल्या दुव्यातील गाण्यात पहिली ओळ दीदींनी चपखल गायलेली आहे. त्यांचे त्यांच्या तरुणकालातले धारदार आलाप त्या जेव्हा नंतर घेतात तिथेच त्यांचे वय दिसते, आणि तेही अतिशय दर्दी, बारकाव्यानिशी किंवा थोडी पूर्वग्रहदूषित दृष्टी असल्यासच. इथे मुद्दाम मी 'भोर भये पनघट पे', 'यारा सिली सिली', 'तेरे बिना जिंदगी से शिकवा' इ. प्रतिउदाहरणे देता येतीलच.
सारांशत: माझे मत असे, की एकाधिकारशाही करायला लतादीदी,आशाताई काही निजाम नव्हत्या. त्याहिशोबाने हृदयनाथांनी अगदी स्वर्गीय अशा चाली लावूनही हातांच्या बोटावर मोजण्याइतकीच गाणी केली. तरीही दीदींची एकाधिकारशाही खपवून घेण्यासाठीही तितकेच कारण होते. त्यांचे गाणे हे अभिजन आणि बहुजनांच्या मधल्या वाटेने जाणारे होते. किशोरकुमार आणि रफी ह्यांचेही तसेच.
आज जीबीपीएस मध्ये वेग असणारे इंटरनेट सगळ्यांकडे आहे, म्हणून पर्याय अतिशय झालेले आहेत, ह्या पार्श्वभूमीवर गावातल्या एखाद्या थिएटर मध्ये लागून महिनोन महिने चालणारा एखादाच चित्रपट अतिशय भाव खाऊन जाणार, त्यातली गाणी (अभिनेते, दिग्दर्शक वगैरे सगळेच खरेतर) अतिशय गाजणार हे ओघाने आलेच. ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन एका अतिशय चांगल्या गायिकेने अक्षरश: राज्य केले तर चुकले कुठे? आजही अत्यंत पटींनी आणि अनंत मितींमध्ये गाण्यांचे उत्पादन होत असताना, बॉलीवूडात करण जोहर-सूरज बडजात्या-महेश भट-सलमान खान इ.नी केलेलेच चित्रपट अग्रणी असतात, आणि पर्यायाने त्यातली गाणीही. युट्यूबचे 'ट्रेंडींग' पान हे त्याचे चांगले निदर्शक आहे.
लतादीदींच्या आवाजावर एक रसिक म्हणून टिप्पणी करताना हे भान ठेवले पाहिजे, की फक्त प्रसिद्धी, गाण्यांची संख्या ह्याच्या बळावर हे 'रसिकांच्या मनावर अधिराज्य' इ. गाजवता येत नाही. फक्त तरुण आहेत म्हणून कोणतेही करुण प्रकार जनता कधीच खपवून घेत नाही. आजही आतिफ असलम, शर्ले सेटीया, जोनिता गांधी, रफ्तार, हिमेश रेशमिया ह्यांचा एक स्वतंत्र चाहतावर्ग आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही की, त्यांना फक्त एका दशकातले लोक ओळखतील. त्यांना भारतरत्न मिळणार नाही. त्यामुळे लतादीदींनी कोणा तरूण लोकांच्या कारकीर्दी संपवल्या असतील, तर ते लोक त्याच लायकीचे होते असे म्हणणे भाग पडते. आजही माझ्या वडिलांच्या पिढीतल्या अनेक लोकांचे हे मत आहे की सुमन कल्याणपूर ह्या दीदींपेक्षा कित्येक पट उजव्या गायच्या. पण दीदींनी ना त्यांना पानातून शेंदूर खायला घातला, ना त्यांचा तंबोरा वगैरे फोडून टाकला. दीदींनी जे केले, ते जनमताचा आणि त्यांच्या क्षमतेचाच परिपाक होता.
व्राँग नंबर...
विक्षिप्त अदिती ह्यांनी दिलेल्या दुव्यातील गाण्यात पहिली ओळ दीदींनी चपखल गायलेली आहे.
चपखल गायला काय, चार-आठशे हजार ओळींचा पायथन कोड लिहून माझं गाणंही चपखल बनवता येईल. शेर इफेक्टसारखा 'ताना इफेक्ट' लिहू आपण. पण म्हातारा आणि चिरका आवाज ऐकून अंगभर खाज उठते त्याचा काय इलाज?
एकाधिकारशाही करायला लतादीदी,आशाताई काही निजाम नव्हत्या.
हा हा हाहा ... शुक्रवार आहे आज.
कविता कृष्णमूर्तीच्या आवाजात रेकॉर्ड सुरुवातीला झालेलं गाणं प्रकाशित होताना लताबाईंच्या आवाजात येतं, ही तर (खरडफळ्यावर डकवलेल्या) साईरामाची कृपा हो!
बरं.
माझे मत आहे वय तितकेसे दिसत नाही. नंतरही त्यांनी अनेक दर्जेदार गाणी गायलेली आहेत. माझ्या मते खोलगडीण हिडीस गाते. तिला गाण्यातले शष्प कळत नाही.
कृष्णमूर्तींबाबत ऐकलेले नाही. तुमचा स्रोत डकवा. ती घटना खरी जरी मानली तरी काही फरक पडत नाही. बेकायदेशीर काही झालेले नाही. ओपी नय्यरनाही हे करावे लागले होते. त्यांच्या पहिल्या रेकॉर्डवर, चक्क त्यांचेच संगीत वापरून दुसऱ्याचे नाव डकवलेले होते, फक्त प्रसिद्धीच्या कारणांसाठी. त्या तुलनेत ही घटना सौम्यच.
या वाक्याने
आजही माझ्या वडिलांच्या पिढीतल्या अनेक लोकांचे हे मत आहे की सुमन कल्याणपूर ह्या दीदींपेक्षा कित्येक पट उजव्या गायच्या.
या वाक्याने अचंबित! एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून, ' अजहुन आये बालमा' या द्वंदगीताचा विचार करु. रफीच्या दमदार सुरवातीनंतर, पहिल्याच ओळीत सुमनताई सुरांत कांपल्या आहेत. माझ्या गाण्याच्या अल्पसमजेनुसार हे लिहीत आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
देवा, तू आम्हाला दर्दी लोकांसारखे कान का दिले नाहीस रे ? खरंच जन्म व्यर्थ गेला.
सुमन कल्याणपुर
तुम्ही इथे "अजहुन आए... " चा उल्लेख केलात म्हणून पुन्हा एकदा गाणं ऐकलं. सुमन कल्याणपुरांचा आवाज/सूर कापल्यासारखा वाटतो असं तुम्ही लिहिलं आहेत , पण मला तरी तसं जाणवत नाही. सुमन कल्याणपूर या ( जुन्या पिढीच्या नव्हे माझ्या कानांवर भरोसा ठेवून ) निर्विवादपणे अप्रतिम भाव प्रकट करणाऱ्या गायिका आहेत ( होत्या ). तरीही व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने त्यांचा आवाज ना आवडणं शक्य आहेच !
या संदर्भात खरं तर एखादा - म्युजिकॉलॉजिस्ट - जर या दोघींच्या आवाजाचं विश्लेषण करू शकला तर फार बरं ! आहे का कोणी असा ऐसीचा म्युजिकॉलॉजिस्ट?
मंगेशकर मोनोपली हा मराठ्यांच्या वादविश्वातील टिपीकल तुरा आहे.
मराठ्यांच्या ( म्हणजे महाराष्ट्रीयन म्हणायचय) ऑल टाइम फेव्हरीट चघळचर्चेतला हा मंगेशकर मोनोपली वाद इथे ही आला बघुन
मोठा आनंद झाला.
मराठ्यांचे उदा. इतर लोकप्रिय चघळचर्चा विषय म्हणजे उदा. मराठी माणुस धंद्यात का पडतो ? वगैरे वगैरे एकदा याची एक यादी बनवावी म्हणतो.
मराठे या विषयाने बऱ्यापैकी उत्तेजित होतात असे बघण्यात आलेले आहे.
अहो आपली राधिका आपटे नाही का
आठवत तुम्हाला
शिवाय आपलाच जितेंद्र जोशी नायकनिकटमित्रपात्रा ची लक्ष्मीकांतीय दैदिप्यमान परंपरा त्याने सॅक्रेड गेम्स मध्ये चालवलेली दिसली नाही तुम्हाला ?
शिवाय हिंदीतला तळपता तारा तळपदे श्रेयस्
शिवाय उत्कृष्ठ चरित्र अभिनेत्री माधुरी दिक्षीत
शिवाय एव्हरग्रीन नाना पाटेकर
शिवाय अधुनमधुन अतुल कुलकर्णी फार पुर्वी आटपलेला अतुल अग्निहोत्री
गेला बाजार मातोंडकर
शिवाय रजनीकांत आणि इव्हन काजोल ही "आपले" च नाही का ?
अजुन सापडतील पाहीजे फक्त अभिमानी बाणेदार नजर
तीच नसेल तर वांधे च आहेत्
झ'वी बाजू..........
झ'वी बाजू..........
चित्रपट संगीत ही धंदेवाईक ॲक्टिव्हिटी आहे. त्यामुळे त्यात कलाकाराच्या दर्जासोबत इतर प्रोफेशनल गुणांनाही महत्त्व असते. लता-आशा या दोघी त्या गुणांबाबतही "त्यांच्या कलेच्या दर्जाइतक्याच" उत्तम असतील- त्या प्रोफेशनल बाबींना महत्त्व देत असतील आणि तिथे चुकत नसतील. त्यामुळे त्यांची कला थोडीशी कमी झाली तरी त्यांना प्राधान्य दिले जात असेल. उदा. गाणे बनताना संगीतकाराबरोबरच्या बैठका, रिहर्सल्स, त्यावेळी तसेच प्रत्यक्ष रेकॉर्डिंगच्या वेळी वक्तशीरपणा पाळणे, रेकॉर्डिंगला येताना पुरेशी रिहर्सल करून येणे- यात नुसत्या चालीवरची हुकुमतच नाही तर एकूण वाद्यमेळातील आपला गाण्याचा रोल परफेक्ट करणे त्यात कधीच न चुकणे. या सगळ्या गोष्टी ज्या काळात लाइव्ह रेकॉर्डिंग केले जात असे त्या काळात खूपच महत्त्वाच्या असतील. रेकॉर्डिंग स्टुडियो बुक केल्यावर रेकॉर्डिंग करताना जितके अधिक टेक घ्यावे लागतील तितके स्टुडिओचे भाडे वाढणार वगैरे ऑबव्हिअस गोष्टी आहेत. तसेच ठरलेल्या दिवशी रेकॉर्डिंग झाले नाही तर पुन्हा ५० वादकांची, संगीतकाराची वेळ, स्टुडीओची उपलब्धता या गोष्टी जुळवून आणणे किती अवघड असेल याची कल्पना आपण करू शकतो. अशा परिस्थितीत जो गायक गायिका व्यावसायिकता पाळत असेल तो निर्माते आणि संगीतकार प्रेफर करणार हे उघड आहे.
---------------------------------
नुकत्याच माझ्या टीममधील एका प्रोग्रॅमर मुलीने राजीनामा दिला. माझ्या आजवरच्या अनुभवातील प्रॉग्रॅमर्सपैकी टॉप तीन मध्ये ती बसेल. तिची प्रोग्रॅमिंगचीच नव्हे तर एकूण प्रोग्रॅम लिहून जे साधायचे आहे त्याची समज अमेझिंग आहे. परंतु ती इतकी अनियमित* आहे की तिला रिटेन करावे का अशी विचारणा कंपनीने माझ्याकडे केली असता मी तिला रेटेन करावे अशी शिफारस केली नाही. त्या ऐवजी एखादा/दी प्रोग्रॅमर ठीकठाकच आहे पण
*ती वेळेवर ऑफीसला येत नाही. एखाद्या कामाला किती वेळ लागेल याची कमिटमेंट देत नाही. चार दिवसात होईल का? असे विचारल्यावर नेहमी प्रयत्न करेन असेच उत्तर देते. नंतर ते काम ती दीड ते दोन दिवसातच करते. पण कमिट करत नाही. प्रोजेक्ट चालवणाऱ्यासाठी हे अनप्रोफेशनल** आहे.
मी आता दोन दिवस येणार नाही असे केव्हाही सांगून गायब होते वगैरे.
**मला ज्या बाबतीत सहानुभूती असते - कुटुंबाच्या/मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या हे तिच्याबाबतीत लागू नाही.
---------------------------------
माझ्या एका गायक मित्राने सुरेश वाडकर याच्याबरोबरच्या रेकॉर्डिंगचा किस्सा सांगितला होता. गाण्यातली एक ओळ दोनदा म्हणायची होती. परंतु वाडकर यांनी ती ओळ दोनदा न म्हणता गाणे थांबवले. दुसऱ्या वेळी ओळ म्हटल्यानंतर इंटरल्यूड चालू होणार होते. यांनी ओळच न म्हटल्याने नुसती बॅकग्राऊंड वाजत राहिली. मग रेकॉर्डिंग थांबवून पुन्हा टेक घ्यावा लागला. म्हटलं तर ही छोटीशी चूक होती. पण अशी चूक वाडकर वारंवार करत असतील तर संगीतकार त्यांना टाळण्याची शक्यता बरीच वाढेल.
---------------------------------
लता, आशा या तशी व्यावसायिकता पाळणाऱ्या होत्या की नाही (किंवा इतर गायिका तशा नव्हत्या ) हे मला ठाऊक नाही.
मी फक्त आणखी एक झ'वी बाजू मांडली.
ही दोन गाणी एका
हे लताने गायलंय
हे अनुराधाने गायलंय
दोन्ही चांगलीच आहेत. पण लताचे निर्विवाद जास्त श्रवणीय आहे.
अनुराधाने 'जिंद' हा शब्द वारंवार अगदी शेवटपर्यंत चुकीचा उच्चारलाय. तिचा उच्चार बोचतो कानांना. गाणे सुरू होते त्या दोन ओळी तिने बेसू-या गायल्यात कारण तिला त्या दोन ओळी झेपल्या नाहीत.
ज्यांना क्वालिटी परवडत होती व तिचे महत्व माहीत होते ते लताला शरण गेले.
ज्यांना क्वालिटी परवडत नव्हती ते क्वालिटीचे महत्व माहीत असूनही इतरांकडून गाणी करून घेत राहिले. राजश्री प्रोड्युक्षनने कायम नव्या गायकांना गायच्या संधी दिल्या. ती गाणीही हिट झाली. पण म्हणून हेमलता, मला लताने खाली दाबले नाहीतर मी कुठल्या कुठे गेले असते म्हणत असेल तर तिला गाण्यातले काहीही कळत नाही म्हणायला हवे.
लताच्या समकालीन खूप चांगल्या गायिका होत्या. पण त्या सगळ्यांचे दुर्दैव हे की त्यांना लताशी स्पर्धा करावी लागली. जर लता नसती तर त्यांच्यापैकी प्रत्येकजण स्वतःचे काहीतरी स्थान निर्माण करू शकली असती. पण लता माउंट एव्हरेस्ट सारखी होती. ती उंची कुणी गाठू शकले नाही. म्हणून आता कुणी माऊंट एव्हरेस्ट पाताळयंत्री, त्याने कोणाला स्वतःपेक्षा वरचढ होऊ दिलेच नाही म्हणत असेल तर त्याला मुळात पर्वत काय असतात हेच कळले नाही म्हणायला हवे.
आज चित्रपट सृष्टीत लताच्या सामर्थ्याची एकही गायिका नाही, त्यामुळे भरपूर गायिका गाताहेत. श्रेया, सुनिधी खूप उत्तम गायिका आहेत. पण त्यांन मर्यादाही आहेत. त्या स्वतः स्वतःच्या मर्यादा ओळखून आहेत. त्या दोघीही त्यांना सहजतेने गाता येतील तीच गाणी गातात, त्यांच्या गाण्यांवर नजर फिरवली तर लक्षात येईल की त्यांनी खूप लिमिटेड जॉनर हाताळलेत.
लता यश चोप्राच्या चित्रपटात आ S S करते म्हणणे त्या चित्रपटांच्या संगीतकरांवर अन्याय करण्याजोगे आहे. ते जी चाल देणार तेच लता गाणार. आता लता गात नसतानाही अजून एकही संगीतकार असे म्हणाला नाही की लता आमच्या चाली बाजूला ठेऊन स्वतःच मनाला येईल ते गात असे.
बाकी लता, आशा किंवा अजून कुणीही, चित्रपटसृष्टीत चॅरिटी करायला आले नव्हते/नाही. आपापले स्थान झगडून मिळवले व ते टिकवून दाखवले.
उद्या अशीही चर्चा होईल की सचिन स्वतःच्या नावावर ढिगांनी शतके गोळा व्हावीत म्हणून आउट व्हायचे नाकारून पॉलिटिक्सने बॅटिंग करत राहिला. त्याने मोठ्या मनाने दरवेळी 20-25 चेंडू खेळून आऊट व्हायचे मनावर घेतले असते तर त्याच्यानंतर नंबरावर येणाऱ्या खेळाडूंना चान्स मिळाला असता खेळायचा व कित्येक सचिन निर्माण झाले असते. पण सचिनने पॉलिटिक्स सोडले नाही. शोभत नाही हो त्याला असे वागणे.
माझ्या मते 'लता उत्तम गाते,
माझ्या मते 'लता उत्तम गाते, निदान एका विशिष्ट काळापर्यंतती गायची' याबाबत बहुतेकांचं एकमत आहे. मात्र 'सगळीच गाणी लताच सर्वोत्तम गाईल' हे विधान करणं योग्य नाही. पण त्या काळात तेच सत्य मानलं गेलं. एखाद्या झाडाच्या एक सोडून सगळ्या फांद्या छाटत गेलं तर ती फांदीच फक्त वाढून आपण आख्खं झाड आहोत असं भासवते. तसं काही तरी झालं. प्रत्येक गाणं लताच्याच आवाजात ऐकण्याची सवय झाली म्हणून 'गायिका व्हायचं तर प्रतिलता व्हायचं' हा निकष ठरला गेला.
लताच्या आवाजालाही मर्यादा आहेत. सुगंधा मिश्राने गमतीदार शैलीत 'ही ही गाणी लताला म्हणता येणार नाहीत' हे दाखवून दिलेलं आहे. माझ्या मते 'तेरी नीयत खराब है' हे गाणं लताला तिच्या ऐन उमेदीच्या काळातही म्हणता आलं नसतं. त्यामुळे तशी गाणी बनतच नसत. आता वैविध्यपूर्ण गाणी बनतात आणि ती गाण्यासाठी योग्य आवाज आणि अटिट्यूड असलेल्या गायिका ती गातात.
लताला जी गाणी जमणार नाहीत
लताला जी गाणी जमणार नाहीत (असं संगीतकाराला वाटेल) ती गाणी आशा गात होती. परत "लताला न जमणाऱ्या" जॉनर ची गाणी आशापेक्षा चांगली गाऊ शकेल अशी गायिका दृष्टीपथात होती का?
अजून एक मुद्दा जो आत्ताच साधना यांनी मांडला आहे तो बजेट नाही म्हणून क्वालिटीशी तडजोड करणाऱ्या निर्मात्यांचा. त्यातलं राजश्री प्रॉडक्शनचं उदाहरण घेतलं तरी ज्याक्षणी त्यांनी बजेटची मर्यादा ओलांडली त्या क्षणी त्यांनी फुटक्या व्हायोलिनसारख्या आवाजाच्या लताबाईंकडून गाणी गाऊन घेतली. याचे कारण काय असेल? त्यांनी कधीच लताबाईंच्या आवाजात गाणी केली नव्हती. त्यांचे संगीत दिग्दर्शक राम लक्ष्मण तर उषा मंगेशकरांच्या आवाजात दादा कोंडक्यांच्या चित्रपटाची गाणी बनवत होते. म्हणजे इथे लीगसी नव्हतीच. शिवाय एक चित्रपट तसा केला म्हणावं तर (त्या अनुभवातून "शहाणे" होऊन) पुन्हा नंतर हम आपके हैं कौन च्या वेळी तो फुटक्या व्हायोलिनचा आवाज टाकून दिला नाही.
आर डी बर्मनचं करिअर आशाच्या गायकीवर बहरलं. तरी रैना बीती जाये मात्र त्यांनी लताबाईंकडून गाऊन घेतलं. पण हे उदाहरण घिसेपिटे म्हणून सोडून देऊ.
ओ पी नय्यर यांनी लताला टाळून आपलं संगीत बनवलं पण त्यात वैविध्य कमी होतं हे दिसून येतं.
पॉइंट इज - फुटक्या व्हायोलिनसारख्या आवाजाच्यासुद्धा जवळपास पोचणारं संगीतकारांना कोणी सापडत नव्हतं.
प्रतिलताबाबत म्हणाल तर क्रिकेटमध्येही मुले प्रतिसचिन होऊ पाहतात. ते सचिनने इतरांचं करिअर नष्ट करून स्वत:चं महत्त्व वाढवलं म्हणून नव्हे.
बधाई हो, बाबूजी मिल गये।
त्यातलं राजश्री प्रॉडक्शनचं उदाहरण घेतलं तरी ज्याक्षणी त्यांनी बजेटची मर्यादा ओलांडली त्या क्षणी त्यांनी फुटक्या व्हायोलिनसारख्या आवाजाच्या लताबाईंकडून गाणी गाऊन घेतली
राजश्री आणि निरागसपणा यांचं नातं म्हणजे हॉटेलातल्या पंजाबी भाज्या आणि ग्रेव्हीसारखं. जन्मजन्मांतरीचं.
बाकी फुटकं व्हायलिन कसं वाजतं हे माहीत नाही; कसं फुटलंय त्यावर अवलंबून असावं. नवशिकं व्हायलिन निराळं. आजूबाजूच्या लोकांचं डोकं सस्त्यात उठवण्याचा सोपा प्रकार.
व्यापक विषय
लताला जी गाणी जमणार नाहीत (असं संगीतकाराला वाटेल) ती गाणी आशा गात होती. परत "लताला न जमणाऱ्या" जॉनर ची गाणी आशापेक्षा चांगली गाऊ शकेल अशी गायिका दृष्टीपथात होती का?
खरं तर हा एका स्वतंत्र लेखाचाच विषय आहे, पण अगदी थोडक्यात सांगायचं तर हिंदी सिनेमातली जुनी गायकी (सिनेमा बोलपट झाला तेव्हाची) ही जुन्या कोठ्यांवरच्या गायकीसारखी होती. शमशाद बेगम, अमीरबाई कर्नाटकी, राजकुमारी, जद्दनबाई (नर्गिसची आई) यांसारख्यांना ऐकलं तर हे सहज लक्षात येईल. ही गायकी लताला गाण्यासारखी नव्हती (म्हणून तिला 'वरणभाताचा आवाज' म्हणून हिणवलं जाई.) पण हळूहळू तिच्या आवाजासाठी गाणी लिहिली जाऊ लागली. आणि ती वेगळी गायकी गैरफिल्मी गाण्यांत राहिली. उदा. खरी उमराव जान कधीही खय्यामनं आशासाठी केलेली गाणी गाणार नाही, पण खय्यामनंच बेगम अख्तरला घेऊन केलेली गैरफिल्मी गाणी ऐकून बघा.
बजेट नाही म्हणून क्वालिटीशी
बजेट नाही म्हणून क्वालिटीशी तडजोड - हा मुद्दा मान्य नाही. राजश्रीच्याच (किंवा तत्सम लो बजेट) सिनेमातून, रफी किशोर परवडत नाहीत म्हणून सुरेश वाडकरला संधी मिळाली. तो त्यांच्याइतका मोठा झाला नाही हे खरं, पण त्याने इंडस्ट्रीत गेल्या चाळीस वर्षांत स्थान कमवलेलं आहे.
मला तर वाटतं की बिग बजेटवाल्यांनीच रिस्क टाळण्यासाठी नेहेमी चालणारं नाणंच चालवलं. क्वालिटीसाठी त्या त्या गाण्यांना सुयोग्य आवाज निवडण्यापेक्षा वन साइझ फिट्स ऒल असा लताचा आवाज वापरला. थोडीशी उत्तान गाणी आशाला, असा तोंडीलावण्यापुरता फरक.
त्यामुळे मोनोपोली तयार झाली,
त्यामुळे मोनोपोली तयार झाली, व ती वापरता आली. ती तशी वापरली गेली हा मुद्दा शिल्लक राहातो. 'गायक/गायिका सापडलेच नाहीत कारण ते नव्हतेच' हा मुद्दा मागे पडतो. उगवून मोठ्या होऊ शकणार्या इतर फांद्या खुडून टाकल्यामुळे एकच फांदी आख्खं झाड म्हणून शिल्लक राहिली.
खरं म्हणजे कॉम्पिटिशण खुडून
खरं म्हणजे कॉम्पिटिशण खुडून टाकण्यासाठीच लता बैंनी जिन्नांना आणि न्हेरूंना सांगून फाळणी करवली* ताकी नूरजहां पाकिस्तानात जाईल आणि इकडे मोकळं रान मिळेल.
*सावरकरांशी कै दीनानाथांचे चांगले संबंध होतेच त्याचा वापर करून सावरकरांना मुस्लिमद्वेष करायला लावून फाळणीच्या मागणीत तेलही ओतून घेतलं !!! =))
बाकी सुरेश वाडकरच्या करिअरला लताबैंचा हातभार लागला हे नोंदवू इच्छितो.
पॉइंट इज़...
...शिकाऊ१ व्हायोलिनची उपमा सत्तरोत्तरी दशकांतल्या लताच्या आवाजास लागू आहे. 'रैना बीती जाए' हे 'अमर प्रेम'मधले अर्थात १९७२च्या आसपासचे म्हणजे टेक्निकली सत्तरोत्तरी असले, तरी ते बॉर्डरलाइन तथा केवळ टेक्निकलीच सत्तरोत्तरी म्हणता यावे; किंबहुना, अॅनालिसिसच्या सोयीकरिता त्यास अगोदरच्या कालखण्डीय गाण्यांत गणावयास प्रत्यवाय नसावा. (तशीही ती सीमारेषा धूसरच आहे.) सबब, शिकाऊ व्हायोलिनची उपमा त्यास लागू होऊ नये.
किंबहुना, 'ये जिंदगी उसी की है'मधला निर्वाणीचा 'अलविदा' घ्या, किंवा 'सीने में सुलगते हैं अरमाँ'मधल्या 'कुछ ऐसी आग लगी मन में, जीने भी न दे मरने भी न दे' या पंक्तीतील शेवटची तान घ्या. कोणाची बिशाद आहे त्यांस शिकाऊ व्हायोलिनची उपमा देण्याची! किंबहुना, तितकी उंच पट्टी कोणी गाठण्याचा प्रयत्न करून दाखवावाच; आवाज चिरकण्याबरोबरच पार्श्वभागी रक्तधारासुद्धा लागण्याची शाश्वती. परंतु बाईंनी त्या जागा आत्यंतिक सहजगत्या व लीलया हाताळल्या आहेत. आणि त्याबद्दल आम्ही त्यांना मानतोच. परंतु म्हणून चिरकत्या आवाजातले 'कोयल कूऽऽऽऽऊऽऽऽऽके, कूऽऽऽऽऊऽऽऽऽके, गाऽऽऽऽआऽऽऽऽए मल्हाऽऽऽऽआऽऽऽऽर'सुद्धा सहन करायचे???
..........
१ फुटक्या नव्हे. अर्थात, तुमच्या घरात (किंवा गणगोतात) कोणा शाळकरी पोराने (किंवा पोरीने) व्हायोलिन शिकण्याचा प्रयत्न कधी केला नसावा, हे उघड आहे. अन्यथा असा प्रमाद तुम्ही केला नसतात. शिकाऊ व्हायोलिनवादकाचे प्रॅक्टिस व्हायोलिनवादन जवळून ऐकणे हे 'क्रुएल अँड अनयूज्वल पनिशमेंट' या सदरात मोडते. अर्थात, शिकाऊ व्हायोलिनवादक घरचा/चीच असल्यास दुसरा पर्यायही नसतो. आणि, यात व्हायोलिन फुटके नसते; चांगले धडधाकट असते. किंबहुना, यात व्हायोलिनचा काहीच दोष नसतो, असेही म्हणता येईल. असो.
त्या काळात बनायचे तसे चित्रपट
त्या काळात बनायचे तसे चित्रपट तरी आज बनताहेत का?
तेव्हा 90 टक्के चित्रपट एकाच कथेवर आधारित असायचे. बेसिक गोल्डन ग्रेव्ही तीच, फक्त वरून टाकायची भाजी वेगळी.
त्या सगळ्या चित्रपटात एक देवाचे गाणे, एक नायक नायिका भांडण, 1 प्रेमाचे युगलगीत, 1 विरहाचे हृदय पिळवटणारे इतकी बेसिक गाणी फिक्स असत.
मग ग्रेव्हीत घातलेल्या भाजीनुसार त्यात कोठ्यावरचे, शाळेतले, राष्ट्रप्रेमाचे, भावाबहिणीचे इत्यादी जास्तीच घातली जात.
आजच्या चित्रपटात यातली किती गाणी येतात? ज्या प्रकारचे चित्रपट येतात त्याला साजेसे संगीत असते. गंग्स ऑफ वासेपुर मध्ये कसली गाणी येणार? तर ज्या प्रकारची येणार त्या प्रकारचे संगीतही त्यात आले व ते गाणारे गायकही आले.
सुनिधी/श्रेयाने कितीशी हृदय पिळवटून टाकणारी विरहगीते गायलीत? म्हणून त्यांचा दर्जा कमी होतो का? त्यांच्या जमान्यात असली गाणी प्रत्येक चित्रपटात नाहीत. जिथे आहेत तिथे ती गायला योग्य गायक आहेत.
आता नव्या जमान्यातल्या बदलांशी जुन्या लोकांची तुलना करून त्यांची उंची कमी करायचा प्रयत्न का केला जातो?
अस्सं गाणं निरागस बाई कोंडोनी मारीतं.
तेव्हा 90 टक्के चित्रपट एकाच कथेवर आधारित असायचे. बेसिक गोल्डन ग्रेव्ही तीच, फक्त वरून टाकायची भाजी वेगळी.
जुन्या काळात सगळं तेचते, अत्यंत निरागस(!) असायचं, हे मान्यच आहे.
मात्र वर प्रतिसादात जंतूनं शमशाद बेगम यांची कव्वालीगायकी, गीता दत्त यांचं तत्कालीन भारतीय जॅझ यांचा उल्लेख केला आहे. सतत उप्पर-से गाण्याच्या गायकीनं आणि मोनॉपोली करून भगिनींनी होतं नव्हतं तेही वैविध्य काही दशकं बासनात बांधून टाकलं. १९७०-८०च्या शतकात आवाजाचं नवशिकाऊ व्हायलिन झालेलं असूनही!
वर सोनू कक्कडच्या आवाजातल्या 'हिचकी' गाण्याचा दुवा दिला आहे. मूळ गाणं उषा मंगेशकरांच्या आवाजातलं. सोनू कक्कडच्या आवाजातून दिसणारी बेपर्वाई, बेमुरवतखोरपणा 'पदरावरती जरतारीचा'मध्येही ऐकू येतात; मात्र भगिनी तेल-तूप-वेणींतच अडकून राहतात. गाण्यातून जो काही अभिनय दिसायला हवा तो मंगेशकर बहिणींकडे त्या ठरावीक ग्रेव्हीपलीकडे नव्हताच.
१९८०च्या दशकात भारतात रॉक संगीत आलं होतं; किशोरकुमार यॉडलिंग वगैरे करत होता. भारतात स्त्रीमुक्ती वगैरे प्रकार १९६०च्या दशकात आले. आशा भोसलेनं थोडातरी 'दम मारला'; मात्र नवे काही प्रयोग स्त्रियांच्या आवाजात होण्यासाठी आणि ते टिकून राहण्यासाठी, सुनिधी चौहान - अदिती शर्मा - सोना मोहपात्रा अशी मोठी रांग तयार होण्यासाठी भगिनी बाजूला होईपर्यंत जागा नव्हती. प्रत्यक्षात असा निरागसपणा संपायला सुरुवात झाली होती. महाराष्ट्रापुरतं बघायचं तर मराठी साहित्यात तेव्हा गौरी देशपांडेंची बंडखोरी, राजकारणात पुष्पाबाई भाव्यांची आंदोलनं, समाजकारणात अनुताई वाघांचं कोसबाडचं काम यांमुळे नवे विचार स्थिरावत होते. मात्र तरुण वयात सिनेजगतात आपलं स्थान वगैरे निर्माण करणाऱ्या लताबाई ग्रेव्ही गाण्यांची गिरमीट गिरणी इमानेइतबारे रेमटत होत्या. इतर गायिकांना मागे सारणं निराळंच!
म्हणा, गौरी, पुष्पाबाई, अनुताई या आणि अशा स्त्रिया फक्त मुंबई-पुण्यापुरत्या मर्यादित होत्या, असाही एक आक्षेप घेता येतो. आजही प्रयोगशील, वेगळ्या धाटणीचे, 'आंखो देखी' किंवा 'धोबी घाट'सारखे सिनेमे परभणी किंवा लातूरमध्ये चालत नाहीतच; तिथे सलमान खान चालतो. सलमान खानला कोणी थोर अभिनेता वगैरे म्हटल्याचं मात्र ऐकीवात नाही.
आज बघायचं तर शिल्पा शेट्टी, प्रिती झिंटा आयपीएलची टीम चालवतात; फराह खान नाचून झाल्यावर सिनेमे दिग्दर्शित करते; दिया मिर्झा, पूजा भट सिनेनिर्मिती क्षेत्रात आहेत; अनुष्का शर्मा अभिनेत्री म्हणून काम करत असतानाही निर्मितीक्षेत्रात आहे; जुही चावला रीतसर शास्त्रीय संगीत शिकते. सिनेमा व्यवसायातल्या या स्त्रियांची अल्लड वयं संपल्यावर व्यक्ती म्हणून वाढ झालेली दिसते.
आपल्या मर्यादा ओळखून तेवढंच गाण्याबद्दल अजिबात आक्षेप नाही; खरंतर आपल्या मर्यादा समजणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. १९७०पासून पुढची लताबाईंची गाणी ऐकल्यावर या बाईंचे कान 'फ्लॉरेन्स फॉस्टर जेनकिन्स' (आर्सेनिक वगैरे पदार्थ औषध म्हणून खाल्ल्यामुळे जेनकिन्स tonedeaf झाल्या होत्या) झाल्येत का अशी शंका येते. या प्रकाराची टिंगल करायची नाहीतर काय करायचं?
अवांतर - ते 'जिंद ले गया' ऐकायचा प्रयत्न केला. मला दोन्ही गाणी सहन झाली नाहीत. १९८०चं दशक म्हटलं की गाणं म्यूट करूनही बघवत नाही. स्मिता पाटील असूनही(!) नाही.
आवाजातला बदल
इथे अनेक जणांना साठच्या दशकातला लताबाईंचा आवाज आवडत असावा असं वाटतं. तुलनेसाठी म्हणून नौशादसाठीच लताबाईंनी गायलेली दोन वेगवेगळ्या काळांतली गाणी ऐकून पाहा. ह्यात तुम्हाला जर आवाजाचा ऱ्हास जाणवला नाही, तर मग ह्या मुद्द्यावर आणखी काही सांगण्यात हशील नाही.
१. आन (१९५२)
२. संघर्ष (१९६८)
दोघे दोषी
सारखं सारखं वरच्या पट्टीत गायल्यामुळे त्यांच्या आवाजावर परिणाम झाला असावा का, किंवा तुलनेने लवकर फाटला असावा का ? आणि याबद्दल संगीतकार मंडळी का जागरूक नसावीत हे जरा आश्चर्याचं आहे .
माझ्या मते इथे दोन संगीतकारांवर जबाबदारी टाकायलाच हवी. नौशाद आणि शंकर-जयकिशन यांनी आवाज चढू शकतो म्हणून रफी आणि लता दोघांसाठीही खूप वरच्या पट्टीत चाली बांधल्या. त्याचा परिणाम झालेला असणं अगदीच शक्य आहे. उदा. हे ऐका. सबंध गाणं (त्यातल्या वाद्यवृंदासकट) सतत धावतं आणि वरच्या पट्टीत आहे. गाणं सुंदर आहे, पण गळ्याला ताण देणारं -
किंवा हेसुद्धा -
"लताबाईंनी (आणि आशाबाईंनी
"लताबाईंनी (आणि आशाबाईंनी सुद्धा) इतर गायिकांची करिअर घडू दिली नाही" असं म्हणणाऱ्यांची नक्की अपेक्षा काय असते?
मुकेसभाईंनी ग्राहकांना सांगावं की घरात चार फोन घेणार असाल तर एक व्होडाफोन आणि एक एअरटेलचा पण घ्या; मग वाटल्यास दोन जियोचे घ्या