ही बातमी समजली का - भाग १६६
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
---
Section 377: Supreme Court
Section 377: Supreme Court will revisit its order banning gay sex
झक्कास.
फक्त दुसऱ्यास इजा करणाऱ्या घटनांचे नियमन करा
उत्तम बातमी. राज्यसंस्थेने फक्त दुसऱ्यास इजा करणाऱ्या घटनांचे नियमन करायचे असते. (उदा. घरात बसून दारू पिण्यावर बंदी नसावी. नशेत बाहेर पडून आपल्या गाडीने दुसऱ्यास उडवण्याबद्दल असावी!). त्यामुळे दोन्ही बाजूंची संमती असेल तर कोणत्याही जातीचे कामसंबंध हे राज्यसंस्थेच्या कक्षेबाहेरचे मानले पाहिजेत.
त्यामुळे दोन्ही बाजूंची संमती
यही तो मै कह रहा हूं, मालिक.
The only purpose for which power can be rightfully exercised over any member of a civilized community, against his will, is to prevent harm to others. His own good, either physical or moral, is not sufficient warrant. ___________ John Stuart Mill
( ऐकीव माहीतीवरून ...... जॉन स्टुअर्ट मिल हा आदर्श लिबरल होता असं नाही पण ..... बऱ्यापैकी लिबरल होता.)
.
नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या "औषधां" वरही बंदी घालणे चुकीचे आहे
याच तत्वाखाली अगदी नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या "औषधां" वरही बंदी घालणे चुकीचे आहे. प्रौढ व्यक्तीने आपल्या "खाजगी आयुष्यात काय करावे" अशा जातीचा "नैतिक" उपदेश करणे आणि त्यासंबंधी कारवाई करणे हा राज्यसंस्थेचा प्रांतच नव्हे. नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या "औषधां" चे "नियमन" करायची खाज असेलच (जी बहुतेक कॉन्झर्व्हेटिव्जना असतेच ) तर ती मुक्तपणे, पण डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन खाली दिली जावीत आणि बाकी औषधांप्रमाणेच त्यांचा क्वालिटी कन्ट्रोल केला जावा - जे हॉलंडमध्ये गेली कित्येक वर्षे चालू आहे. . ( About क्वालिटी कन्ट्रोल: चीन नशा निर्माण करू शकणारी, पण बाकी शून्य शास्त्रीय माहिती असलेली नवी संयुगें अमेरिकेच्या नशा -बाजारात ओतत आहे, जे अत्यंत घातक आहे. अनेकदा तर त्यांचे स्ट्रक्चरही माहिती नसते! तसेच हेरॉईन ची नशा वाढविण्यासाठी चिनी उत्पादक त्यात कार-फेंटानिल नावाच्या संयुगाची भेसळ करीत आहेत . कार-फेंटानिल च्या काही मिलिग्रॅम्स मध्ये हत्ती मारण्याची पोटेन्सी असते. गेल्या वर्षी जे ३३,००० अमेरिकन्स ओपियम जातीच्या औषधांच्या अतिरेकामुळे मेले , त्यातले बरेचसे कार-फेंटानिल भेसळीमुळे मेले असणार असा अंदाज आहे. )
For more on this "elephant-killer" drug, see: https://www.washingtonpost.com/news/morning-mix/wp/2016/08/12/a-new-fron...
अहो आम्ही तर म्हणतो की
अहो आम्ही तर म्हणतो की consensual sex between any two or more living beings should be outside the jurisdiction of governments.
आता एक व्यक्ती व एक हत्ती यांच्यातला सेक्स हा कन्सेन्श्युअल असतो की नसतो हे कसं ठरवणार ही समस्या आहे.
हा हन्त हन्त नलिनीम गज उज्जहार.....
उज्जहार
नलिनीम गज उज्जहार
Did not know "उज्जहार" meant "fxxked".
And नलिनी must be HUGH!
डिपेंड्स
इनीशिएटर कोण आहे, नि रिसीव्हिंग एंडला कोण आहे, यावर सर्व अवलंबून आहे. इनीशिएटर हत्ती नि रिसीव्हिंग एंडला मनुष्य असल्यास यात फारसे काही कठीण नसावे. अदर वे राउण्ड मात्र अडचण आहे खरी.
(बादवे, हत्ती हे 'व्यक्तीं'मध्ये मोडत नाहीत काय?)
..........
(अॅझम्प्शन: एखादी व्यक्ती - नरो वा कुंजरो वा - ही स्वतःच्या मर्जीच्या ख़िलाफ़ दुसऱ्याशी सेक्स इनीशिएट करू शकत नाही. अर्थात, हे गृहीतक चुकीचे निघाल्यास पुनर्विचार करावा लागेलच, परंतु तूर्तास तरी अशी काही केस दृग्गोचर होत नाही.)
As states waive loans, farmer
As states waive loans, farmer default spikes 23 per cent in a year: RBI data
.
आणि तरी मोदी योगी यांना
आणि तरी मोदी योगी यांना समर्थनच आहे, कारण ...
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
कारण एकच - शेतकऱ्यांना दिले
कारण एकच - शेतकऱ्यांना दिले गेलेले बेलआऊट्स हे राज्यसरकारांकरवी दिले गेले. केंद्रसरकारांकरवी नाही.
जर प्रत्येक ग्राम पातळीवर एक फंड काढला व त्यातून शेतकऱ्यांना कर्जमाफी/मुक्ती देण्याची योजना राबवली तर ते अधिक चांगले. या फंडातले सर्वच्यासर्व पैसे त्या त्या ग्रामातल्या लोकांकडूनच वसूल करावेत. असे केले तर मी मोदींचा आणखी फॅन होईन.
असे करण्याने काय साध्य होईल ? - हा प्रश्न पडलाय का ?
.
मी तुम्ही मोदी "योगी" समर्थक
मी तुम्ही मोदी "योगी" समर्थक आहात असं म्हटलं
आणि कर्जमाफी जाहीर तर मोदींनीच केली होती.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
The Decline of Anti-Trumpism
The Decline of Anti-Trumpism - The New York Times
सूश्री अनु राव यांच्या श्रीचरणी समर्पित.
.
रेचल मॅडो
लेखातला काही भाग -
पत्रकारितेमधल्या नीचभ्रूपणाबद्दल लेखात उल्लेख आहेत. ट्रंपविरोधक आणि ट्रंपसमर्थक दोन्ही बाजू अशा गोष्टी करतात, हेही सहज मान्य होण्यासारखं. काही महिन्यांपूर्वी (एनबीसी या वाहिनीवरची ट्रंपविरोधी मुलुखमैदान तोफ) रेचल मॅडोवर 'न्यू यॉर्कर'नं प्रोफाईल प्रकाशित केली होती. त्यात असे शब्द धडधडीतपणे वापरले नसले तरीही तसं सुचवणारे बरेच उल्लेख लेखात होते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
Trump is America's id - the uncivilized, self-seeking part
You will have to combat lowbrowism WITH lowbrowism, to penetrate that population. Otherwise you get dubya, who had deliberately cultivated a lowbrow persona to appeal to the truck driver and the plumber (He was actually far more intelligent than that. He was also DECENT!). Trump is America's id - the uncivilized, self-seeking part of the soul- who can blurt out the first thing that comes to their mind without reflection. He is not atypical. Actually he is a VERY typical American. You have only read the extremely vulgar reactions to debates under news columns to see that. There is a vast WHITE "loser" class in this country. Trump is their creation.
सुश्री
तुम्हाला सुश्री अनुराव यांचे श्रीचरणी, असे म्हणायचे आहे का ?
धन्यवाद. बदल केलेला आहे.
धन्यवाद. बदल केलेला आहे.
सामान्य मतदार/नागरिक कुणालाच
सामान्य मतदार/नागरिक कुणालाच पाताळात ढकलत नाही अथवा डोक्यावर बसवत नसतो कायमचा.
Emmanuel Macron breaks French
Emmanuel Macron breaks French taboo on farm subsidies
.
ह्येबगा .... सादी ऱ्हानी ... अन उच्च विचार्सर्नी असावी बगा मान्साची.
.
Being treated like a common
Being treated like a common prisoner, Lalu complains to special CBI judge
सेक्युलरांचे अध्वर्यू, फुर्रोगाम्यांचे मेरूमणी लालू यांना
सामाजिक न्यायसमानता नकोय...
लाल "कंदील" याला कुणी दाखवा
कुणी माझ्या रायाला शानपन शिकवा
.
He is none of that, and no secular is claiming him to be.
सेक्युलरांचे अध्वर्यू, फुर्रोगाम्यांचे मेरूमणी लालू : He is none of that, and no secular is claiming him to be. A man with 11 kids!!!!!
किताब-ए-माज़ी के औराक़ उलट के
किताब-ए-माज़ी के औराक़ उलट के देख ज़रा
न जाने कौन-सा सफ़्हा मुड़ा हुआ निकले
-------
लालू यादव यांच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही. खरंतर लोकसंख्या ही समस्या नाहीच असा आमचा दावा आहे. तेव्हा ११ मुलं होणं हे समस्याजनक नाहीच.
किताब-ए-माज़ी के औराक़ उलट के देख ज़रा
किताब-ए-माज़ी के औराक़ उलट के देख ज़रा
न जाने कौन-सा सफ़्हा मुड़ा हुआ निकले
kya baat hai! Wahwa!
शायर - वसीम बरेलवी
शायर - वसीम बरेलवी
जग्गू ने मस्त गायलिये ती गझल. "मै चाहता भी यही था के वोह बेवफा निकले".
खरंतर लोकसंख्या ही समस्या
खरंतर लोकसंख्या ही समस्या नाहीच असा आमचा दावा आहे. >> याबद्दल वेगळा लेख पाडा....
याबद्दल वेगळा लेख पाडा....
जोरदार मारलात ओ !!!
ठोसा, गुद्दा, दणका, तडाखा, घूँसा.
.
शब्द जाऊदेत; पण वेगळा लेख
शब्द जाऊदेत; पण वेगळा लेख लिहाच कारण लोकसंख्या हि समस्या आहे असे बर्याचजनांना वाटते (मलापण)!
पण वेगळा लेख लिहाच कारण
तुमच्या दृष्टिने ही समस्या काय आहे ते सांगा. म्हंजे उत्तर एका ओळीत लिहायचे की एका परिच्छेदात की वेगळा धागाच काढायचा ते ठरवता येईल.
.
जाताजाता - अनेकदा मला असं वाटतं की - सरकारने जाहीर करावं - की - कृषिमालाला योग्यभाव मिळत नाही ही समस्या नाही व ही समस्या सोडवण्यासाठी सरकार काहीही प्रयत्न करणार नाही.
.
At some point, let us post
At some point, let us post officers at each other’s combatant commands
India Services PMI returns to
India Services PMI returns to growth in December
The seasonally adjusted business activity index stood at 50.9 in December, up from 48.5 in November.
A reading above 50 indicates economic expansion, while a reading below 50 points toward contraction.
--------
India manufacturing PMI rises to 5 year high in December
CJI silent, opinion divided
CJI silent, opinion divided as 4 judges publicly question SC's functioning
ह्याला मोदी जबाबदार आहेत असा आरडाओरडा कसाकाय झालेला नाहीये ?
मोदी जबाबदार असावेतच. कारण
मोदी जबाबदार असावेतच. कारण ऑलरेडी नेहमीच्या ट्रोलांकडून मोठाले पो पाडून भक्तांकरवी शेअरले सुद्धा गेलेत.
थोडं खाई त्याला खवखवे सारखे आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
रोख
रोख तोच आहे. यातल्या कथित भ्रष्टाचारामधेही मोदींचा हिस्सा आहे, असे आरोप होतील.
कायदा मंत्र्यांनी संकेत
कायदा मंत्र्यांनी संकेत दिलेले आहेत की कार्यकारी मंडल यात हस्तक्षेप करणार नाही.
मला हे बघायचंय की यात हस्तक्षेप करण्याची टेम्प्टेशन मोदी आणि कंपनी टाळतात का ते.
अर्थात कोणत्याही परिस्थितीत मोदींवर आरोप करायचाच अशी जिद्द असलेले लोक काय .... "मोदी पडद्यामागून सूत्रे हलवत असतीलच" किंवा "मोदींचा पाठिंबा असल्याशिवाय त्या ४ न्यायाधीशांनी ही पत्रकार परिषद घेतलीच नसती" वगैरे दावे करतीलच.
-----
रागांची पत्रकार परिषद बघितली.
या प्रकरणाची इन्व्हेस्टिगेशन व्हायला हवी असं म्हणतायत.
अहो, कोणी करायची ती तैकिकात ? सगळ्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज कार्यकारी मंडलाला रिपोर्ट करतात. जर चौकशी करायची तर कार्यकारी मंडलाला इन्व्हॉल्व्ह व्हावेच लागेल नैका ?
नुसती डिबेट करायची म्हंटलं तर ती संसदेत करणार. म्हंजे कायदेमंडल (विधिमंडल) पण इन्व्हॉल्व्ह होणार.
जर कांग्रेसने इंपीचमेंट आणली
जर कांग्रेसने इंपीचमेंट आणली सरन्यायाधीशांविरुद्ध तर काय होईल ते रोचक असावे. नक्की किती आकडे लागतात ते नाही माहिती पण विरोधकांकडे नसावेत तेवढे आकडे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
विरोधी पक्षांना
विरोधी पक्षांना सरन्यायाधीशांविरुद्ध महाभियोग प्रक्रिया सुरु करण्याचा अधिकार असतो का ? की तो अधिकार कार्यकारी मंडलाला असतो ? कारण विरोधी पक्ष हा कार्यकारी मंडलाचा हिस्सा नसतो व फक्त कायदेमंडलाचा हिस्सा असतो.
आणि महाभियोग चालवण्यासाठी बळकट केस नाही असं वाटतंय. आयमिन दुर्वर्तन, भ्रष्टाचार असं काही नाही असं वाटलं. ते पत्र वाचून.
--------
former Chief Justices of India said the government should not “interfere” in the matter, and that the CJI should “resolve the crisis with statesmanship”.
हे मला फार आवडले. अत्यंत.
५० राज्यसभेचे किंवा १००
५० राज्यसभेचे किंवा १०० लोकसभेचे सदस्य महाभियोग सुरू करायला पुरेसे आहेत. पास व्हायला २/३ लागतात असं दिसतय.
https://www.lawteacher.net/free-law-essays/constitutional-law/the-proces...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मला वाटतंय कि सरन्यायाधिशांना
मला वाटतंय कि सरन्यायाधिशांना इम्पीच करावे वगैरे अशी अपेक्षा या चार जजेस ची सुद्धा नसावी . काँग्रेस ने या भानगडीत पडू नये . ते नक्की अयशस्वी होतील.
(आणि ढेरे , झोला वाल्यांच्या ताब्यातून गेलेल्या सोशल मीडिया /व्हाट्स ऍप वर या चार देशद्रोही जजेस नाच आल्रेडी इम्पीच केलंय कि , काल दुपार पासूनच . वाचलं नाहीत का ? )
न्यायालयात काय होतय याबद्दल
न्यायालयात काय होतय याबद्दल कोणा पक्षाला घेणं देणं नाही. ईट इज आल पालिटीक्स. बाकी डी. राजा हे राजकीय नेते काल प्रेस कांफरन्स नंतर चेलामेश्वरांच्या घरी दिसले असं काही बातम्या म्हणतायत.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
दाखवलं tv वर डी राजा
दाखवलं tv वर डी राजा त्यांच्या घरातून बाहेर पडताना
बाकी डी. राजा हे राजकीय नेते
कॉमी मंडळींना आजकाल दुसरा उद्योग नसावा ....
-----
मला विशेष हे वाटतं की इव्हन रविशंकर प्रसाद (कॅबिनेट रँक) यांनी सुद्धा कोणतंही स्टेटमेंट दिलेलं नाहिये.
कायदा राज्य मंत्री चौधरी यांनी स्टेटमेंट दिलंय.
Supreme Court crisis: Bar
Supreme Court crisis: Bar Council cautions political parties against meddling with judiciary
आवडलं. फार आवडलं. सरकारवर अप्रत्यक्ष दबाव आहे की हस्तक्षेप करू नका.
.
------
.
Judges versus CJI: Govt steers clear, BJP says Congress out to politicise crisis
नाही आवडलं.
.
------
.
मुद्दा हा आहे की संसदेमधे अनेकदा वादावादी, शाब्दीक चकमकी होतात, सभात्याग होतात. याहीपेक्षा पराकोटीच्या घटना (उदा. खुर्च्यांची फेकाफेकी व एकमेकांना वस्तू फेकून मारण्याचे यत्न) घडलेल्या आहेत. काम ठप्प होते. तेव्हा न्यायपालिका त्यात हस्तक्षेप करत नाही. जननिर्वाचीत प्रतिनीधी (संसदसदस्य) हे चर्चा, देवाणघेवाण, क्विडप्रोक्वो इत्यादी च्या माध्यमांतून मार्ग काढतात. संसदसदस्य हेच मार्ग अवलंबतात व जनता त्यांचे ट्रॅक रेकॉर्ड पाहून मतदान करते. हे अनेक वेळा दिसलेले आहे. न्यायपालिकेत असे क्वचितच घडलेले आहे. पण न्यायाधीश मंडळी चर्चा, व वाटाघाटींच्या माध्यमातून पेचप्रसंग सोडवू शकतात. आयमिन त्यांचे adjudication हेच मुख्य कौशल्य आहे. म्हणून कार्यकारी मंडलाने हस्तक्षेप करू नये.
PM Narendra Modi’s move on
PM Narendra Modi’s move on FDI underlines RSS faultlines
संपूर्ण लेख वाचनीय. आरेसेस ची विचारसरणी नेमकी काय आहे ते ....
अगदी न्यायाधिश जेव्हा खुर्चीत
अगदी न्यायाधिश जेव्हा खुर्चीत नसतो तेव्हा कोण असतो?- एक सरकारी पगारदार कर्मचारी.
वरून टेबलावर येणारा आदेश १)पाळणे/ २)राजिनामा देणे दोन पर्याय असतात.
टि एन शेषन् यांचे काय झाले? एक आइएएस अधिकारी आणि न्यायाधिश यांना वेगळे नियम लागतात का? शिवाय चौघांनी एकदम एकत्र विरोध केला याचा अर्थ वेगळाही निघू शकतो का?
आचरट बाबा , नक्की काय
आचरट बाबा , नक्की काय विचारताय तुम्ही ? आय ए एस आणि न्यायाधीश यांच्यात कसलीही तुलना नाही . त्यांचे नियम ? काही साम्य नाही .
भारतीय न्यायव्यवस्था ही एक घटनादत्त स्वायत्त संस्था आहे . त्यांना वरून / खालून कुठूनही आदेश वगैरे येत नाहीत . सरन्यायाधीश हा सुद्धा इतर न्यायाधीशांचा बॉस वगैरे नसतो . तो फक्त सेवाज्येष्ठ असतो . सध्याचे सर न्यायाधीश मिश्रा आणि चेलमेश्वर हे एकाच दिवशी सुप्रीम कोर्ट न्यायाधीश झाले ( त्यापूर्वी च्या करियर मध्ये चेलमेश्वर सिनियर होते) मिश्रा यांचा शपथ विधी म्हणे चेलमेश्वर च्या आधी काही मिनिटे झाला( म्हणे )म्हणून सेवाज्येष्ठता त्यांना मिळाली म्हणे .
कृपया सनदी नोकर ( आय ए एस आणि न्यायाधीश यांच्या अधिकार, जबाबदाऱ्या यांच्या त गल्लत करू नका )
खटले अमुकएकाकडे पाठवले( वाटले
खटले अमुकएकाकडे पाठवले( वाटले,assign) म्हणजे डिपार्टमेंट प्रकार झाला ना?
तक्रार आली तर डिपार्टमेंटल इनक्वाइरी होणार. पण न्यायालयात चौघांनी खटला दाखल केला तर चौघे सामान्य वादी होतील. ते चौघे विरुद्ध ज्युडिशिअरी असे स्वरुप येते. मग जो कोणी त्या निवाड्यासाठी खुर्चीत बसेल त्याचा निर्णय सन्मान्य न्यालयाचा निर्णय ठरेल.
Benjamin Netanyahu set to
Benjamin Netanyahu set to visit India, PM Modi to host dinner for the Israeli PM
झक्कास.
टेररिझम ला आमंत्रण, दुसरे काय?
वादग्रस्त प्रदेशात ज्यूंच्या वसाहती वाढवून यांनी पॅलेस्टिनींचा प्रदेश इतका पोखरून काढला आहे की त्यांना त्यांचा देश म्हणून देण्यास एक सलग भूप्रदेश उरलेलाच नाही. त्यामुळे वेगळे, सार्वभौम पॅलेस्टिनी राज्य ही संकल्पनाच मोडीत निघाल्यासारखी परिस्थिती आहे. टेररिझम ला आमंत्रण, दुसरे काय?
PM Modi will break protocol,
PM Modi will break protocol, to receive Netanyahu at airport
फक्त एक करा - पॅलेस्टिनी प्रधान मंत्री किंवा अध्यक्ष यांना बोलवून त्यांना समान वागणूक द्यायच्या फंदात (म्हंजे ते आल्यावर पण प्रोटोकॉल सोडून रिसिव्ह करायला जाणे) पडू नका.
इस्रायल च्या नेत्याला पॅलेस्टाईन च्या नेत्यापेक्षा अधिक सन्मान द्यावा.
.
Congress mocks PM Modi's
Congress mocks PM Modi's hugplomacy in video
काँग्रेसवाल्यांना हग्प्लोमसी का डाचते ?
परदेशांतील पाहुणे आले तर त्यांना आलिंगन देणे हे स्नेहाचे द्योतक नसते का ? का प्रोटोकॉल चा च प्रश्न आहे फक्त ?
.
काँग्रेसवाल्यांना हग्प्लोमसी का डाचते ?
Becaue Modi Saheb, whom they consider a bit of a buffoon in these matters, is doing it.
हॅहॅहॅ. बफून ? रियली ?
हॅहॅहॅ. बफून ? रियली ?
Modi is an excellent example of someone who pushed himself out of his comfort zone and paid visit to so many countries in the first year of his tenure. It was almost a record of sorts. मोदींना स्वत:च्या लिमिटेशन्स चे चांगले ज्ञान होते व आहे. मे २०१४ मधे त्यांना हे माहीती होतं की त्यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार क्षेत्राचा अनुभव शून्य आहे. व त्याचा हँडीकॅप होऊ नये म्हणून सुद्धा त्यांनी हे दौरे केले व स्वत:चे एक ट्रॅक रेकॉर्ड तयार केले. हे दौरे कौशल्य बिल्ड करण्यासाठी उपयोगी होते.
केंब्रिज मधून डॉक्टरेट केलेल्या, व आयमेफ मधे काम केलेल्या तुमच्या आवडत्या पंतप्रधानाची दातखीळ बसायची महत्वाच्या मुद्द्यांवर. ते सुद्धा देशातल्या देशात, एतद्देशीय मुद्द्यांवर बोलताना.
तिसरं म्हंजे नेतानयाहू हे संभाषण कौशल्यात, जनसंपर्कात प्रवीण असलेले नेते आहेत. व अशा नेत्याशी मैत्री वाढवणे हे मोदींची व्यावहारिक सूझबूझ दर्शवणारेच आहे. २००८ मधे माझ्या वर्गात एक इस्रायली मुलगा होता. तो म्हणाला की Israel does not need a strong prime minister. Israel needs a strong PR person. And Bibi is exactly that kind of a guy.
.
.
US President Donald Trump has
US President Donald Trump has become the unlikely recipient of a 'Medal of Bravery', which has been bestowed on him by 300 Afghans, for his tough stance on Pakistan, reported RadioFreeEurope Radio Liberty (RFE/RL).
सूश्री अनु राव यांच्या समालोचनाच्या प्रतीक्षेत.
.
Trump condo prices down 12%
Trump condo prices down 12% in 2017
Evidence of a Toxic
Evidence of a Toxic Environment for Women in Economics
.
Foreign tourist arrivals hit
Foreign tourist arrivals hit new high of one crore, earnings cross $27-billion mark
पण भारतात वाढती असहिष्णुता होती ना ?? मग वाढती असहिष्णुता असताना एवढे लोक पर्यटक म्हणून कसेकाय आले ? त्यांना भीती नाही वाटली ?
.
2009 5.11 Million
2010 5.58 Million
2011 6.3 Million
2012 6.648 Million
2013 6.848 Million
2014 7.679 Million
2015 8.016 Million
2016 8.89 Million
2017 10 Million
CAGR (UPA) 7.59%
CAGR (NDA) 9.93%
असहिष्णुता देशातल्या
असहिष्णुता देशातल्या अल्पसंख्यांक आणि मागासांबाबत वाढली आहे. बाहेरच्यांबाबत जोरात पायघड्या चालू आहेत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
+१
सहमत.
यूपीएच्या पाच वर्षात दोन वेळा
यूपीएच्या पाच वर्षात दोन वेळा १२टक्क्याहून जास्त आणि एकदा ९ टक्क्याहून जास्त ग्रोथ होती. २०११ व २०१२ मध्ये ग्रोथ कमी होती. अनुक्रमे साडेपाच आणि तीन टक्के.
एनडीएच्या तीन वर्षापैकी पहिल्या वर्षात ग्रोथ ४.४ टक्के होती दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात १०.९ व साडेबारा टक्के होती.
क्लिअरली अण्णा हजारे यांच्या आंदोलनांचा २०११ आणि २०१२ च्या कमी ग्रोथमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. कारण ती दोन वर्षे सोडली तर यूपीएची कामगिरी एनडीएच्या ॲट पार आहे.
तुमचा ॲव्हरेज ग्रोथ रेट वेगळा का येतो? माझ्या आकडेमोडीप्रमाणे तो यूपीए चा ८.४८ आणि एनडीएचा ९.२० येतो. (शेवटच्या वर्षातील प्रवासी भागिले पहिल्या वर्षातील प्रवासी) रेज्ड टु (वन अपॉन नंबर ऑफ इअर्स) या फॉर्म्युल्याने.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
क्लिअरली अण्णा हजारे यांच्या
याच्यामागचा कार्यकारण भाव काय आहे म्हणे ? अण्णांचे आंदोलन हिंसक नव्हते (कोणत्याही अर्थाने). पर्यटकांना घाबरण्याचे कोणते कारण होते ?
.
----
.
२०१४ चे ५ महिने युपीए व ७ महिने एन्डीए होते. तेव्हा २०१४ सोडून देऊ.
२०११ ते २०१३ ही युपीए ची ३ वर्षे घेऊ.
२०१५ ते २०१७ ही एन्डीए ची ३ वर्षे घेऊ
ही ॲपल्स टू ॲपल्स तुलना होऊ शकते.
CAGR UPA ((B6/B4)^(1/(A6-A4))-1) = 4.26%
CAGR NDA ((B10/B8)^(1/(A10-A8))-1) = 11.69%
एवढा वृद्धीचा दर हा असहिष्णुता वाढल्याचे द्योतक कसे काय असतो हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. अगदी आतल्या लोकांविरुद्ध असहिष्णुता वाढली असेल तर ते बाहेरच्या लोकांच्या पर्यटनाच्या निर्णयांमधे फॅक्टर इन का होणार नाही ??
.
व असहिष्णुता वाढल्याचे परदेशी गुंतवणूकदारांना पण वाटत नाही कारण बाहेरून येणारी गुंतवणूक वाढलेली आहे. (Details
.
पांढरा झेंडा ?
Donald Trump isn't losing it
The Point: Trump's temperamental fitness for the job remains a very open question. But his mental fitness no longer should be. Critics should focus on what he does in office rather than engaging in unfounded attacks on his mental acuity.
________ Chris Cillizza, CNN Editor-at-large
.
गोऱ्या वंशवादाचे तत्वज्ञान: एकाच वेळी डाव्या आणि उजव्याना भीती !
या मनुष्याच्या "राजकीय तत्वज्ञाना" ची भीती वाटायचे कारण की त्याला जवळजवळ राजकीय तत्त्वज्ञानच नाही . गोऱ्या वंशवादाचे तत्वज्ञान एकाच वेळी डाव्या आणि उजव्याना भीती वाटावे असे आहे. काळे, मुसलमान , हिस्पॅनिक , ज्यू, समलिंगी , कॅथॉलिक या सर्वांच्या द्वेषाची मोठी जंत्री त्याच्यात आहे. जिथे या तत्वज्ञानाचा प्रादुर्भाव आहे तिथे मोठ्या कोर्पोरेशन्स (उदा. वॉलमार्ट ) जात नाहीत. विकासाला तो एक मोठा अडसर आहे.
exclude nations he considered “shithole countries.”
WASHINGTON (The Borowitz Report)—Donald J. Trump demanded on Thursday that the poem at the base of the Statue of Liberty be revised immediately to exclude nations he considered “shithole countries.”
Speaking to reporters, Trump said that the poem as it currently stands “is basically an open invitation that says, like, if you come from a shithole country, welcome aboard.”
“I don’t know the entire poem, but it’s something like ‘Give us your tired, your poor, your yadda yadda yadda,’ ” he said. “We could keep all that but then put in, right at the end, in big letters, maybe, ‘except if you’re from a shithole country.’ ”
“I think if a boat from a shithole country came and saw that poem with those words at the end, they would turn around and go right back to wherever they came from,” he said.
Shortly after Trump made his remarks about “shithole” countries, representatives of the countries he designated as such released a joint response.
“We do not understand President Trump’s aversion to so-called ‘shithole countries,’ since he is doing his best to turn the United States into one,” the statement read.
Andy Borowitz in the New Yorker today
गरीब वाटण्यामुळे होणारे दुष्परिणाम
('न्यू यॉर्कर'च्या मानानं) बारकाच लेख आहे. 'आपण आपल्या आजूबाजूच्या, ज्यांच्यात मिसळतो त्या लोकांपेक्षा गरीब आहोत' असं वाटायला लागलं की त्याचे दुष्परिणाम होतात; मात्र सुखवस्तू, वा श्रीमंत वाटण्यानं, असण्यानं फार काही फायदा होत नाही; यामागचं मानसशास्त्र थोडक्यात मांडणारा लेख.
The Psychology of Inequality
Researchers find that much of the damage done by being poor comes from feeling poor.
उदाहरणार्थ, एके काळी 'गरीबीतून वर आलेला' मानसशास्त्रज्ञ कीथ पेन -
श्रीमंतांचा अभ्यास करणारी रेचल शेरमन आणि तिच्या अभ्यासाबद्दल -
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
?
(शीर्षकावरून)
१. गरीब कोणाकोणामध्ये वाटले की हे दुष्परिणाम दिसून येतात?
२. गरीब पाट्यावरवंट्याखाली वाटण्याऐवजी मिक्सरमध्ये वाटून हे दुष्परिणाम टाळता येतील काय?
(वाटणघाटणावर इतका अनाठायी भर आहे बोले तो गरीब वाटणारे सारस्वत की सीकेपी?)
रगाडा
वाटाड्यांत पाचकळशी ज्ञातीचा समावेश न केल्याने माहितीपूर्ण श्रेणी दिलेली नाही.
क्षमस्व!
अज्ञानापोटी अशी आगळीक झाली, याबद्दल दिलगीर आहे.
तरी सर्व गाळीव वाटसरूंनी (१) क्षमा करावी, आणि (२) आत्ताच stand up and be counted, ही (आगाऊ) विनंती.
हे पाच कळशी काय प्रकर्ण आहे ?
हे पाच कळशी काय प्रकर्ण आहे ? काहीतरी दमदार दिसतय , न बा नि डायरेक क्षमा मागितली म्हणजे
प्रचंड पैसे असल्यास त्याने फक्त पैशाचे प्रश्न सुटतात
दुसर्याशी तुलना करण्याचा मूर्खपणा हे याचे महत्वाचे कारण सोडल्यास दुसरे एक म्हणजे प्रचंड पैसे असल्यास त्याने फक्त पैशाचे प्रश्न सुटतात. बाकी तुमची "मानवी स्थिती" आहे तशीच राहते: उदा. तुमची वार्धक्याकडची वाटचाल थांबत नाही, मानवी संबंधात फरक पडत नाही. त्यामुळे 'यात काही विशेष नाही" असे वाटणे स्वाभाविक आहे.
मुद्दा
लेखाचा मला समजलेला गाभा -
कोणाकडे किती पैसे आहेत, हा मुद्दा फार महत्त्वाचा नाही. आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांपेक्षा गरीब आहोत, किंवा समान कामाचं समान वेतन मिळत नाही, अशा उपेक्षित असण्याच्या धारणांमधून माणसांचा, पर्यायानं सदर गट, समाजांचा तोटा होतो. लेखाच्या सुरुवातीलाच कॅलिफोर्निया राज्याच्या नोकरदारांचं उदाहरण दिलेलं आहे. मात्र आपल्याला अधिक पैसा मिळतो या भावनेतून कोणी अधिक काम करत नाही.
समजा, एकच काम करूनही मला तुमच्यापेक्षा अधिक पगार मिळतोय, तर ते तसं राहू देण्यासाठी मी अधिक प्रयत्न करणार नाही; मात्र तुम्हाला कमी पगार मिळतो म्हणून तुम्ही कमी काम कराल. यात आस्थापना, समाजाचा तोटा आहे. मला अधिक पगार देऊन आस्थापना, समाजाचा काहीही फायदा होत नाही. (स्त्रियांना कमी पगार देऊन त्यांच्याकडून काम करवून घ्यावं म्हणणाऱ्या लोकांची मतं फक्त मतंच आहेत आणि त्यामागे काही ठाम विदा-विश्लेषण नाही; फक्त एवढंच नाही, तर असा विचार समाज/आस्थापनाघातकी आहे.)
माझा अंदाज असा की आपल्याला उपेक्षित ठेवलं जातं किंवा आपण बळी पडलेल्या आहोत, अशा विचारांमुळेही समाज, गट, आस्थापनांचं नुकसान होतं. (थोडक्यात उदाहरण - अझीझ अन्सारीची बदनामी टाळली गेली पाहिजे.)
इतरांशी तुलना करणं हा मूर्खपणा आहे का नाही, हा प्रश्नच नाही. तो मानवी स्वभाव आहे. स्वभावाला औषध नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
स्त्रियांना "त्याच कामासाठी" कमी पगार देण्यामागचे अर्ग्युमेण्ट
स्त्रियांना "त्याच कामासाठी" कमी पगार देण्यामागचे व्यवस्थापनाचे अर्ग्युमेण्ट असे (मी याच्याशी सहमत नाही): घरच्या इतर व्यवधानांमुळे स्त्रिया जेव्हढ्यास तेव्हढे काम करून वेळेत घरी पळण्याच्या मागे असतात. त्या ११० % कमिटमेन्टने काम करत नाहीत, आणि ठरलेल्या वेळेबाहेर (संध्याकाळी , वीकांताला ) काम करायलाही तयार नसतात. त्यामुळे हे होते.
कैच बोलत नै बै!
हा लेख असल्या जुन्या तक्रारी न काढता, अशा वृत्तीमुळे नक्की कोणाचं आणि कसं नुकसान होतं याबद्दल आहे. तुम्ही लेख वाचून, निदान चाळून विषयानुरूप का बोलत नै बै? अशानं तुम्ही ट्रंपसारखे वागता, असा संशय येतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
India test-fires nuclear
India test-fires nuclear-capable ICBM Agni-V
झक्कास ओ झक्कास.
.
प्र. का टा आ. .
प्र. का टा आ.
.
.
.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
the-12-most-desperate-stunts
the-12-most-desperate-stunts-cities-have-pulled-to-woo-amazons-new-hq.
ॲमेझॉन कंपनी ने दुसरं (अतिरिक्त) मुख्य कार्यालय निर्मीती चा निर्णय घेतलेला होता. हे कोणत्या शहरात असावे यावर चर्चा सुरु झाली. अनेक शहरांची सरकारं ॲमेझॉन कंपनीच्या समोर शेपटी हलवायला लागली. शेपटी हलवण्यामागचा उद्देश हा की हे अतिरिक्त कार्यालय त्या शहरात यावं. व या शहर सरकारांनी कायकाय केलं त्याचा आढावा.
मला हे खूप आवडलं. सरकारांनी उद्योगपतींच्या समोर शेपुट हलवली पाहीजे.
उद्योगपतींना अतिमहाप्रचंड सन्मान, मान, मरातब मिळायला हवा.
.
हे आमचं अनियन, आमचा यावर भारी जीव
Confident Philadelphia Officials Preemptively Raze Center City To Make Room For Amazon Headquarters
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हाहाहा.
हाहाहा.
२०१४ मधे (डावीकडे झुकणारे अर्थशास्त्री) पॉल क्रुगमन यांनी "ॲमेझॉन वर निर्बंध घालावेत" अशी मागणी केली होती. कारण ॲमेझॉन कडे मोनॉप्सोनी पॉवर आहे म्हणे. मोनॉप्सोनी म्हंजे पॉवर ओव्हर सप्लायर (मोनोपोली म्हंजे पॉवर ओव्हर कस्टमर).
आता या शहरांच्या केस मधे पॉवर ओव्हर गव्हर्नमेंट झालेलं आहे. हे स्वागतार्ह आहे.
.
अनियन झिंदाबाद
अॅमेझॉनच्या जेफ बेझॉसनं नवा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना दिलेला सल्ला वाचा. (दुवा)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जाताजाता : Jeff Bezos donates
जाताजाता : Jeff Bezos donates $33 million to scholarship fund for ‘dreamers’
राहून राहून
राहून राहून: द अनियन नियमितपणे वाचत चला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नियमीत नाय ... पण अधून मधून
नियमीत नाय ... पण अधून मधून वाचतो.
पॉर्नहब
पॉर्नहबनं जाहीर केलेली विदा आणि तुलना - 2017 Year in Review
ऑफिसात हा दुवा उघडायला हरकत नाही. पॉर्न आणि त्यासंबंधित शब्द वगळता बाकी काही 'मजा' या दुव्यात नाही.
भारताबद्दल, आणि विशेषतः भारतीयांच्या 'वाळवंटी प्रेमा'बद्दल -
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सर्चेस मधे एक नंबर वर जे आहे
सर्चेस मधे एक नंबर वर जे आहे ते पाहून - "मालकीणबाई .... बघा बघा .... तुमची जनता बघा कशी जागृत होत्ये !" असं (पुलं कृत म्हैस मधून साभार) म्हणावंसं वाटलं.
हलकेच घेणे.
मालकोबा?
मालकोबांना विचारा, जनता 'जागृत' होत आहे यातलं अश्लैल्य म०म०व० जंतेला सहन होणार का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
का नाही सहन होणार ?
का नाही सहन होणार ?
माणसांस चालते तर मग म्हैशीनेच काय घोडे मारलेनीत ??
या अरब प्रेमामागील नंबर एकचे
या अरब प्रेमामागील नंबर एकचे नाव बहुधा हे असावे.
https://en.wikipedia.org/wiki/Mia_Khalifa
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
Americans have been devouring
Americans have been devouring news about Stormy Daniels and her alleged relationship with Donald Trump for days.
STORMY DANIELS' POPULARITY ON PORNHUB SKYROCKETS AFTER DONALD TRUMP AFFAIR ALLEGATIONS
पण एखाद्या व्यक्तीचा खाजगी तपशील असा उघड करणे योग्य आहे का ?
.
Freedom of expression supreme
Freedom of expression supreme, says SC, tells states to give security for Padmaavat release
सर्वोच्च न्यायालयाने (गुजरात, राजस्थान, हरयाणा, मप्र) राज्यसरकारांचा बँड वाजवलाय.
.
.
मतदारांना भुलवणाऱ्या घोषणा करता याव्या म्हणून निवडणुकांच्या तारखा जाहीर करायला उशीर केला.
२० आमदार एका फटक्यात अपात्र ठरवले.
काही नाही !! असंच आपलं !!!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पिक्चरची ष्टोऱी
पण २जी निर्णयापासून मी आशा सोडली आहे सो.गा/रा.गा तुरुंगात जातील याची.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
ढेरे सर असे निराशावादी होऊ
ढेरे सर असे निराशावादी होऊ नका . होईल शिक्षा त्यांना , आणि तुमच्या हिट लिस्ट वरती असलेल्या चिदु वगैरे ला पण . अनु तैं चे काका आहेत का शिक्षा व्हायला पाहिजे लिस्ट मध्ये ?
या सगळ्या भ्रष्ट मंडळींना व्हायलाच पाहीजेलाहे जबर शिक्षा . देशाला लुटलंय त्यांनी .
बाकी हिंसाचारी / दंगल घडवून आणणारे / लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांना शिक्षा व्हाव्यात का ? तुमचं काय मत यावर ?
ती एखादी
क्लीन चिट वालीलिस्ट आहे का तुमच्या कडे ?गोधरात रेल्वेचे डबे आणि आतील
गोधरात रेल्वेचे डबे आणि आतील माणसं जाळली त्याबद्दल बोलताय का?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
होय होय , तेच ते आणि इतरही
होय होय , तेच ते आणि इतरही किरकोळ दंगली उदाहरणार्थ मुंबई वगैरे . मी क्लीन चिट वाल्या दंगलींचं नाही विचारत आहे .
तर आहे का अशी काही लिस्ट ?
ABVP member hacked to death
ABVP member hacked to death by unidentified gang in Kerala
सहिष्णुता. दुसरं काय ?
.
The Secret of Israel's Water
The Secret of Israel's Water Miracle and How It Can Help a Thirsty World
अशा गुणी इस्रायल सारख्या राष्ट्राच्या नेत्यांना पायघड्या अजिबात घालू नयेत ??? .... कारण अशाने असहिष्णुता वाढीस लागते म्हणून ??
.
मला इंद्रप्रस्थाची कहाणी आठवली. जेव्हा हस्तिनापूर चे विभाजन झाले व पांडवांना arid खांडववन दिले गेले तेव्हा योगेश्वर युधिष्ठिरास म्हणाला होता की - "तुम्हाला खांडववन ही तुमची कर्मभूमी मिळालेली आहे. कर्मभूमी.".
.
सोयीसवडीनं इस्रायल.
लेखातले मला दिसलेले "महत्त्वाचे" मुद्दे -
१. स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी व्यवस्थापनाचे फार अधिकार न देता, केंद्रीय पद्धतीनं व्यवस्थापन करणं.
२. बागा, उद्यानं बनवायला अजिबात प्रोत्साहन न देणं, आंघोळीसाठी पाणी जपून वापरण्याचे सल्ले देणं, कमी पाणी वापरणारे संडास वापरण्याची सक्ती, अशा प्रकारच्या "मूलभूत" मानवी स्वातंत्र्यांचा संकोच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
स्थानिक स्वराज्य संस्थांना
प्राथमिक पातळीवर तरी हा मुद्दा एकदम सॉलीड आहेत तुमचा.
स्थानिक स्वराज्य संस्था ह्या सरकारच असतात आणि पाणी व वीज या दोन बाबतीत आवश्यक ठरतात कारण - सरकारची गरज ही आहे की मोनोपोलायझेशन रोखणे. व पाणी पुरवठा व वीज पुरवठा या दोन मधे मोनोपोलायझेशन रोखणे कठीण** असते. व म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्था ह्याच मुळी केंद्रिकरण असते. ते राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरचे केंद्रीकरण नसते हे उघडच आहे. पण ते केंद्रिकरण असते कारण त्यांच्या दरांचे नियमन केलेले असते. त्यांना हवेतसे दर वाढवता येत नाहीत. कोणत्याही वेळी त्यांना दर वाढवायचे असतील तर त्यांना संबंधित कमिशन कडून पूर्वपरवानगी घ्यावी लागते.
---
तुमच्या (२) मधल्या मुद्द्यांचा केस-बाय-केस विचार होणं गरजेचं आहे.
(अ) बागा व उद्यानं ही एनिवे सरकारची जबाबदारी नसावी व प्रायव्हेट उद्यान असल्यास तिथे पाण्याचे काँन्झर्व्हेशन होईलच. कारण प्रायव्हेट उद्योजक हा नफ्याकडे डोळे लावून असेल व त्याला जर उद्यानाच्या डे टू डे ऑपरेशन साठी पाणी विकत घ्यावे लागत असेल (आणि सरकार सब्सिडाईझ्ड रेट ने पाणी पुरवत नसेल) तर त्याच्या कॉस्ट्स वर त्याची नजर असेलच. तो कॉस्ट्स कमी करण्याकडे लक्ष देईलच. And water usage will become less policy relevant.
(ब) आंघोळीसाठी पाणी जपून वापरण्याचे सल्ले देणं - आंघोळ करणाऱ्याला जर पाण्याचे strictly pay-per-use पैसे द्यावे लागत असतील व सरकार हे पाणी सब्सिडाईझ्ड रेट ने पुरवत नसेल तर आंघोळ करणाऱ्या/रीला पाण्याचा वापर रॅशन करणे भाग पडेल. And as a consequence - the disadvantages of centralization will not matter from the policy standpoint.
(क) कमी पाणी वापरणारे संडास वापरण्याची सक्ती - हे तर सरकारने केलेले जबरदस्त उल्लंघन आहे. पाणी वापरणाऱ्याला strictly pay-per-use पैसे द्यावे लागत असतील तर ह्याची गरज पडणार नाही. Because this will become less-policy relevant.
----
** Because -
(१) (in case of electricity) it is difficult to have multiple wires of electricity running across in a given city.
(२) And in case of water this is even more difficult. We cannot have multiple pipelines of water running under the ground.
----
आता मूळ प्रश्न - मी इस्रायल ची स्तुती का करतोय ?
.
अहं.
मूळ प्रश्न चुकलाय आणि खऱ्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे.
मुस्लिमद्वेषाचं गाडं पुढे सरकवता यावं म्हणून इस्रायलमध्ये चालणारं केंद्रीय व्यवस्थापन आणि (स्वतःच्या ज्यू) नागरिकांच्या(ही) स्वातंत्र्याची गळचेपी करून, काही प्रमाणात पर्यावरणपोषक पर्यायांचीही भलामण करत आहात. त्यातल्यात्यात कमी वाईट पर्याय तुम्ही कसे निवडता, हे वरच्या प्रतिसादातून दिसतंय.
ती निवड योग्य का अयोग्य किंवा कसं याबद्दल मतप्रदर्शन करण्याची इच्छा नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मुस्लिमद्वेषाचं गाडं पुढे
हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. सहर्ष मान्य आहे.
ऐसी जॉईन झाल्यापासून मी माझे अंतस्थ हेतू कधीच लपवले नव्हते. ते सूर्यप्रकाशापेक्षा अधिक स्पष्ट केलेले होते व आहेत.
तेव्हा तुमचं म्हणणं बरोबर असलं तरी overly बेसिक आहे.
---
मला स्पष्टपणे हे च म्हणायचं आहे की इस्रायल व त्याच्या प्रतिस्पर्ध्यांची तुलना केल्यास इस्रायल अधिक चांगला (म्हंजे आपल्याला अधिक फायदेशीर) आहे का हे पहावे. फायदेशीर असल्यास उत्साहाने मैत्री करावी. व उगीचच सगळे समान असतात आणि आम्ही सगळ्यांना समान आदर देतो चा बाष्कळपणा करू नये.
.
----
उदाहरणार्थ खाली अफगाणिस्तान ची बातमी मी दिलेली आहे. पाकिस्तानच्या विरोधी रान उठवण्यासाठी अफगाणिस्तानशी मैत्री आपण करतच आहोत. इतर उद्देश असतीलच. पण हा सध्या महत्वाचा.
.
----
.
बरोबर.
मला हेच म्हणायचं आहे.
.
ऐसीच्या परराष्ट्र खात्यात
ऐसीच्या परराष्ट्र खात्यात तुमची बदली करायला हवी( फाइनान्समधून, तिकडे अनुराव आहेतच॥ ढेरेसर आहेत)
अनिअन वाचताना डोळ्यांत पाणी
अनिअन वाचताना डोळ्यांत पाणी येतं का?
काही काही वेळा हसून वगैरे
काही काही वेळा हसून वगैरे येतं डोळ्यातून पाणी , अनियन वाचताना .
आचरट बाबा , तुम्ही कधी मॅड नावाचं मॅगझीन वाचलं आहेत का ?
U.S. Air Force Weighs
U.S. Air Force Weighs International Squadrons to Strike Terror Targets
न्यूड सेन्सर सर्टिफाईड
'न्यूड'ला सेन्सर प्रमाणपत्र मिळाल्याच्या निमित्ताने सचिन कुंडलकर 'टाइम्स'मध्ये - Should we celebrate Nude's certification or be concerned?-
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
Darwin’s theory of evolution
Darwin’s theory of evolution is ‘scientifically wrong’, says Union Minister Satyapal Singh
हल्लीच्या पंजाबी धांगडधिंगा
हल्लीच्या पंजाबी धांगडधिंगा गाण्यातल्या पोरी अर्ध्रा चड्ड्यांत असतात. डार्विनची थिअरी तिथपर्यंत पोहोचवली का तोकडी पडली?
बरेचसे रिटायर्ड सरकारी अधिकारी बोलतात ती वचने नसतात,मागची{ दाबून ठेवलेली} उबळ असते.
मोहीम
सत्यपाल सिंग यांनी केलेली अंदाधुंद वाक्यं/वक्तव्य मागे घ्यावं म्हणून वैज्ञानिकांनी ऑनलाईन मोहीम सुरू केली आहे.
सदर पत्र इथे सापडेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
१. मला वाटतं सत्यपाल सिंग
१. मला वाटतं सत्यपाल सिंग किंवा ते गाय ऑक्सिजन सोडते बोलणारे राजस्थान चे मंत्री यांना हे बोलू द्यावं . त्या शिवाय ते किती x त्ये आहेत हे पब्लिक ला कळणार कसे ?
२. शास्त्रज्ञ वगैरे अशा (फडतूस) लोकांच्या पत्रामुळे हलून जायला हे सरकार काही लेचेपेचे नाही . आम पब्लिक मध्ये व्हाट्स आपस्त्र , मध्यमवर्गीयांना रिपब्लिकास्त्र (ममव ना भाऊ तोरसेकरस्त्र/ शेफाली वैद्यास्त्र) फेकून मारून गप्प करायला कितीसा वेळ लागणार ?
बोलू द्या त्यांना , लोकांना कळू दे काय थोर लोकं आहेत ही ते ...
हल्ली आनंद देवधरास्त्र आणि
हल्ली आनंद देवधरास्त्र आणि
अजून एक अस्त्रसंजीव पेडणेकरास्त्र पण आहे.अमृता वैनींना ट्रोल केल्यामुळे वैद्यास्त्र एक्सपायर झाले/केले असण्याची शक्यता वाटते.
शेफाली वैद्य उवाच
Getting increasingly jaded with writing about politics. Feel like traveling across the length and breadth of India writing about our culture, festivals, arts and crafts, textiles, temple and people!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मस्त आहे हे थत्ते !!! आता
मस्त आहे हे थत्ते !!! आता बाणेदार पत्रकार भाऊसाहेब यांचा कधी नंबर लागणार? एखादे वेळी नाही सुद्धा लागणार , तसे चपळ आणि हुशार आहेत ते . उत्साहाच्या भरात नाही त्या शेपटावर पाय नाहीत देणार , पण कुणी सांगावं , मूळचे शिव सैनिक ते .. देतील ही कधी
काहीच गरज नव्हती वैणींना
काहीच गरज नव्हती वैणींना ट्रोल करायची. उगाच स्वतःचा विनोद कांबळी करून घेतला शेफूताईंनी.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
विनोद कांबळींचा संदर्भ समजला
विनोद कांबळींचा संदर्भ समजला नाही.
पुर्वी गडकिल्ले तोफा नव्हत्या
पुर्वी गडकिल्ले तोफा नव्हत्या तेव्हा अजिंक्य समजले जायचे. तोफेचे गोळे किल्यात जाऊन पडतील अशा बाजुच्या बय्रापैकी उंचीच्या डोंगरावर तोफा नेऊन मारा करत (उदा० रायगडाजवळचा पोटल्याचा डोंगर.) तसं नसेल तर कृत्रिम उंचवटा बांधत ( = दमदमा.) विनोद कांबळी हा मोठ्या खेळाडुंवर मारा करण्यासाठीचा चानेलवाल्यांसाठी दमदमा झाला होता असा मला दाट संशय होता.
कांबळी करून घेणे = प्रथम
कांबळी करून घेणे = प्रथम स्वतःला indispensable समजणे, आणि मग dispense होणे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
धन्यवाद
रघु राजन ची संहत आवृत्ती म्हणा की.
जागा हो जागा.
शेफूताईंचा मुद्दा 'योग्य'च होता. पण त्या जागा चुकल्या.
आता कोणी इतिहास-अभ्यासातून विव्हळ होणारे प्राध्यापक आहेत. त्यांच्या 'फॅन' झाल्यात शेफूताई! शेफूताईंचं पोस्ट वाचून मी विचार केला, "काय भारी आहे हा सापेक्षतावाद. आजपासून मी आइनस्टाइनची फॅन झाल्ये."
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हाय, अमेरिकेची री ओढणं.
अनेक गोष्टींबाबत आपल्याकडे अमेरिकेचं अंध अनुकरण सुरू असतं, त्यासोबत हा खुळचटपणा आपल्याकडे येण्याबद्दल वैषम्य वाटलं. काल-परवापर्यंत चाललेला 'वेदों मे विज्ञान' हा वायझेडपणा असला तरीही त्यात निदान सिद्ध झालेलं विज्ञान आपलंसं करणं होतं; विज्ञान नाकारत नव्हते, बहुतेकांना जी फार झेपत नाही ती वैज्ञानिक पद्धत फक्त नाकारत होते. सत्यपाल सिंगांना मोडीत काढणं गरजेचं होतं ते त्यासाठी.
गेल्या आठवड्यापर्यंत, उत्क्रांती नाकारणं ही अमेरिकी खुळचटांची मक्तेदारी वाटत होती. सत्यपाल सिंग यांनी त्या मक्तेदारीवर हल्ला केल्यामुळे (त्यामुळे अमेरिकेची टिंगल करण्याची सोय न राहिल्यामुळे) त्यांना खुलं पत्र लिहीणारा अनिकेत सुळे चिडला असावा. ( आणि म्हणून तो आमचा हीरो. हा सिद्धांत त्याला खाजगी निरोपातून कळवण्यात येणार आहे.)
असो. हा आमचा अनिकेत. आमचं त्याच्यावर भारी प्रेम. अनिकेत ऐसीवर नाही.
Aniket Sule, the scientist who torpedoed Satyapal Singh’s grand plan on evolution
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कोणते मंत्रीबिंत्री नसते तर
कोणते मंत्रीबिंत्री नसते तर विधानाचा गाजावाजा झाला असता का?
( प्रोफेसर सुळेंचा मुलगा - अनिकेत?)
वाह , अनिकेत सुळे यांचे
वाह , अनिकेत सुळे यांचे अभिनंदन . बरे वाटले , कुणीतरी बिनधास्त उभा राहून नडतोय ते बघून.
मराठी पाऊल पडते पुढे
इथेही शेवटी मराठी माणूसच पुढे आला. एक नंबर.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
Government set to hit
Government set to hit divestment goal 1st time post Rs 36,915 crore ONGC-HPCL deal
.
एका खिशातलं दुसऱ्या खिशात ठेवलं आणि आम्ही बरंच काही साध्य केलं असं म्हणताय ?
.
India, US and Afghanistan
हा प्रतिसाद इथे हलवला आहे.