बरेलॊ के बाजार मे 3

भाग १
भाग २
शेवटी 3 ऑगस्ट म्हणजे जॉईन होण्याचा दिवस आला. माझी ड्युटी 10 ते 7 होती. मध्ये एक तास लंच टाईम. काका काकू घरी असेपर्यंत मी घरी जेवायला जाणार होते. रात्री ब्रेड आणून ठेवला होता तोच नाश्त्याला खाल्ला कारण एवढ्या लौकर कोणतच दुकान उघडत नाही. पावणे दहाला निघाले. चालत दहा मिनिटात लॅबमध्ये पोचले.आश्चर्य म्हणजे एवढया जवळ जाताना मला दोन्ही बाजूंना फक्त लॅब्स आणि हॉस्पिटल लागत होती.
आपली उत्तर प्रदेश बद्दल किती चुकीची कल्पना होती हे आठवून मला हसू आले. लॅब मध्ये जाताच सगळे जण उठून उभे राहिले. एकदम आपण कोणीतरी झाल्यासारखे वाटले. मुंबईत असे कोणी उठून उभे राहत नाही.
आतमध्ये दोन technician होते. एक सिनिअर आणि एक मुलगी त्याची असिस्टंट. तोच रिपोर्ट टाईप करायचा. काम तसे कमीच होते.
मी HR ला फोन करून विचारले माझ्या घरी इन्व्हर्टर लावायचा आहे. हा मॅडम आज काम हो जायेगा. पैसे अभी सेंटर देगा। आपकी सॅलरी से कट होंगे। बरेली साठी त्यांनीच कार्ड घेऊन दिले होते. ते सुद्धा activate झाले. त्यात डेटा सुद्धा होता आणि माझ्या फोन मध्ये दोन कार्डसची सोय होती. त्यामुळे कार्ड घातले आणि लगेच माझे व्हाट्सअँप सुरु झाले.
त्याने मी फारच खुश झाले कारण नंबरही तोच राहिल्यामुळे सगळ्या ग्रुपचे मेसेज मिळायला लागले. मी एक महिना झाल्याशिवाय कोणालाच सांगणार नव्हते.
नंतर टिफीन ची चौकशी केली. लगेच माणूस हजर. त्याला 4 दिवस दुपारी 2 आणि नंतर एक टिफिन सांगितला.
दुपारी टिफिन घेऊन घरी गेले तर इन्व्हर्टर लागलेला.गिझर सुद्धा लागलेला. माझा विश्वासच बसत नव्हता. आता फक्त गॅसची कमी होती.
बाहेर खाणे जास्त दिवस शक्य नव्हते.
दुसऱ्या दिवशी सिलेंडर साठी फॉर्म घेऊन सेंटर मधले एक जण आले आणि लौकरच सिलेंडर मिळवून देतो म्हणून सांगून गेले.
४ दिवसांनी माझे काका काकू परत गेले आणि माझे रुटीन चालू झाले. लॅब चे काम हळूहळू वाढत होते आणि टेक्निशियन ची कुरकुर सुद्धा.
रोज आल्यावर पहिले वाक्य म्हणायचा मैं कल से नही आऊंगा। त्याला काम आणि रिपोर्ट टायपिंग जास्त वाटत होते. त्या मुलीला काहीच येत नव्हते. मग मी रिपोर्ट टायपिंग चे सॉफ्टवेअर शिकून रिपोर्ट काढायला सुरुवात केली.
पण डेंग्यू ची साथ आल्याने काम सतत वाढत होते. रोज मला घरी यायला 9.30/10 वाजत होते.
मधेच त्या गृहस्थांनी मला खरोखरच सिलेंडर मिळवून दिला आणि मी नाश्ता करून आणि टिफीन घेऊन यायला लागले. पण रात्री एवढा उशीर व्हायचा कि बाहेरच खावे लागायचे. तेसुद्धा लॅबमध्येच मागवून.
घरात एकूण एक गोष्ट घ्यायची होती. मधेच बाहेर पडून किचन मधल्या वस्तू, आरसे, वॉटर फिल्टर असे हळूहळू घेत होते.
मुंबईत रोज योग करायचे त्याची चटई बरोबर आणली होती. त्यावरच झोपत होते.
शेवटी टेक्निशियन ने एक सप्टेंबर ला काम सोडणार म्हणून सांगितले.
मला काम कितीही करावे लागले तरी काहीच वाटत नव्हते कारण मुंबईत मी ह्यापेक्षा खूपच जास्त काम केले होते. पण सारखी वीज जाणे, इन्व्हर्टर डिस्चार्ज होणे, जनरेटर लावणे हे मी कधीच अनुभवले नव्हते.
तरीही एक वर्ष काम करण्याचा निश्चय केल्याने मी काम करत होते.
बरेली शहर मी अजून बघितलेच नव्हते. झुमका गिरा रे गाण्यातला तो बरेली चा बाजार बघण्याची उत्सुकता होती. पण मी घर ते लॅब आणि थोडी दुकाने या पलीकडे काहीच पहिले नव्हते.
असाच एक महिना गेला. काम वाढल्याने सर खुश होते पण मी ते कसे पार पडतेय माझे मलाच माहित होते. तो टेक्निशियन गेला. नवे 3आले. पण एकजण आले त्याच दिवशी डेंग्यू होऊन ऍडमिट झाले. ती मुलगी HR शी भांडून सोडून गेली.
दुसऱ्या दोघांना काहीच येत नव्हते. माझे टायपिंग चालूच होते. अचानक त्या दोघांना गपचूप डेंग्यूची महाग टेस्ट करताना पकडले आणि चक्क काढून टाकले.
नशीब तोपर्यंत डेंगूतून बरा होऊन पहिला टेक्निशियन आला होता. एक typist आली होती. तिला सॉफ्टवेअर शिकवणे आणि स्वतः टेस्टिंग शिकणे हा माझा प्रोग्रॅम सुरु झाला.
मधल्या काळात फक्त एका रविवारी त्या टेक्निशियन मुलीबरोबर फिनिक्स मॉल मध्ये एक सिनेमा पहिला होता. त्यापलीकडे मनोरंजन काही नाही.
तरीही केवळ निश्चयाच्या बळावर मी काम करत होते.

भाग ४

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान अनुभव आहेत. नविण किंवा बदललेली नौकरी एक महिना न सांगण्याची प्रथा अजून आहे कळलं. तेवढं भाग ३,४ चे शिर्षक...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

नविण किंवा बदललेली नौकरी एक महिना न सांगण्याची प्रथा अजून आहे

हैला! अशी प्र‌था अस‌ते होय‌!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मग मग, खूपदा ऐकलंय...त्यामागची कारणे बदलू शकतात, धागा सुरूवातकर्त्यांकडून त्यांच ऊत्तर अपेक्षीतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

अचानक त्या दोघांना गपचूप डेंग्यूची महाग टेस्ट करताना पकडले आणि चक्क काढून टाकले.

हे स‌विस्त‌र सांगाय‌ला ह‌वे होते. म्ह‌ण‌जे ते बाहेरून खास‌गी काम आण‌त होते का? ते क‌से स‌म‌ज‌ले, त्यांन‌ क‌से प‌क‌ड‌ले, त्यांची प्र‌तिक्रिया काय होती, अन तुम्हाला यूपीत न‌वीन अस‌ताना व‌रिष्ठांच्या स‌ल्ल्याशिवाय अशी कार‌वाई क‌राय‌ला भीती वाट‌ली नाही का? याव‌र त‌सेच या स‌ग‌ळ्या पात्रांच्या स्व‌भाव, भाषा याव‌र लिहीता आले अस‌ते असे आप‌ले वाट‌ले. हाही भाग आव‌ड‌लाच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0