बरेलॊ के बाजार मे 4

भाग १
भाग २
भाग‌ ३
असा दीड महिना गेला. मधल्या काळात मी बेड, गाद्या वगैरे घेऊन निदान आरामात झोपू लागले होते. काम खूपच होते पण आता 8 पर्यंत घरी येत होते.
हिवाळ्याची वर्णने ऐकू येत होती. व्हाट्स ऍप वरच्या सर्व ग्रुपना माझ्या बरेली च्या वास्तव्याबद्दल सांगितले होते. सगळ्यांनाच काळजी वाटत होती.
मला एकाच गोष्टीचे समाधान होते कि मला FNAC भरपूर करायला मिळत होत्या. रोज एक कमीत कमी. हिंदीत हिवाळ्याला जाडोंका मौसम म्हणतात. रश्मी मला म्हणाली यहां अभी जाडे गिरेंगे आणि मला हसू आवरणे कठीण गेले. मग आमच्या बालमोहनच्या ग्रुपवर त्यावरून विनोद सुरु झाले.
पण मी कधीच मुंबईच्या बाहेर गेले नसल्याने मला इथल्या थंडीची भीती वाटत होती.
वूलन कुरते, थर्मल सगळे दुकानांत दिसायला लागले. मुंबईत प्रचंड उन्हाळा असताना इकडे पंखे बंद झाले.
नवरात्र जवळ येत होते. मी एकही साडी बरोबर आणली नव्हती. त्यामुळे इतक्या दिवसांनी पहिल्यांदा बरेलीच्या बाजारात रश्मीबरोबर गेले.
इकडे वाहने 3 प्रकारची आहेत. सायकल रिक्षा, ज्याला इथे रिक्षा म्हणतात, ऑटो रिक्षा ज्याला ऑटो म्हणतात आणि जुगाड नावाचा एक प्रकार आहे.
ऑटो फक्त दोन समांतर सरळ रस्त्यावर जातात. सवारी चे 8 ₹ फक्त पण पुढे रिक्षा करावी लागते. आम्ही पूर्ण रिक्षाने गेलो. बाजार खूपच मोठा आहे पण मी लॅबमधून आल्यावर म्हणजे 5 नंतर गेलो होतो आणि अंधार खूपच लौकर पडायला लागला होता. त्यामुळे फक्त दोन साड्या घेऊन आलो. पितृपक्ष असल्यामुळे रश्मीने काहीच खरेदी केली नाही.
नवरात्रात इथे बायका ९ दिवस व्रत म्हणजे उपास करतात. उपासाला मीठ चालत नाही. सैंधव चालते. मी पहिल्या दिवशी उपास केला होता. संगमरवरी देवी आणि देव्हारा (मंदिर) घेतले. रश्मीने फराळाला बोलावले होते. चक्क साबुदाणे वडे केले होते. मी खुश झाले.
साडीवर ब्लाउज शिवून मिळेपर्यंत दसरा होऊन गेला. दसऱ्याला पण भरपूर काम होते आणि बऱ्याच जणांच्या सुट्ट्या. त्यामुळे सण होता असे वाटलेच नाही.
दसऱ्या नंतर दोन तीन दिवसांनी लॅबमध्ये साडी नेसून गेले. बस.
आणि करवा चौथ च्या दिवशी वेगळे काही घडले. आदल्या दिवशी १०० पेशंट होते. आणि त्या दिवशी 50! बायका कडकडीत उपास करतात. त्यामुळे कोणीच बाहेर पडत नाही. पहिल्यांदा मी साडेसहाला घरी गेले. माझा उपास नव्हताच. मस्तपैकी काहीतरी बनवून खाल्ले.
दुसऱ्या दिवसापासून कामाला ओहोटी लागली. Sample ची संख्या 20 वर आली. हेसुद्धा मला नवीनच होते. पण त्यामुळे रोज 5 ला बाहेर पडून मी बरेली मध्ये फिरायला लागले.
थंडी वाढत होती. आधी थर्मल, त्यावर वूलन कुर्ता, मग स्वेटर आणि त्यावर कोट यातूनही थंडी वाजत होती. इथे कॉफी फक्त थंडीत मिळते. ती प्यायचे.
पण इथले लोक म्हणत होते इस बार जाडे गिरे हि नाही। मग मी आणखीनच घाबरायचे.
मी इकडे येण्यापूर्वी मेडीकल कॉलेज च्या गेट टुगेदर साठी पैसे भरले होते पण मला सुट्टी मागायची हिम्मतच होत नव्हती. ती मागितली आणि मिळाली. त्यामुळे जाण्या येण्याचे ट्रेनचे रिझर्वेशन करून टाकले. एक मन सांगत होते कि आता जाते आहेस ती परत येऊच नकोस. पण दुसरे मन मात्र इथे यायला उत्सुक होते. शेवटी मी दोन गाड्या बदलून मुंबईला गेले, पुण्याला गेट टुगेदर ला गेले, शाळेतल्या मैत्रिणींना भेटले आणि शेवटी बरेलीला परत आले.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

Please read it as No 4

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुरुस्ती केली आहे. धाग्याला स्व‍-संपाद‌नाची सोय आहे. त्यामुळे तुम्हीही ब‌द‌ल‌ क‌रू श‌क‌ता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे 'बरेलॊ' काय असते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

पुन्हा तेच्...तुम‌च्याक‌डे स‌विस्त‌र‌प‌णा नै हो!
ब‌रेलीच्या बाजारात जाऊन आलात प‌ण गेलाबाजार तुळ‌शीबागेसार‌खा त‌री होता का हे सांगित‌लंछ नाहीत! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिथ‌ल्या स‌माज‌जीव‌नाब‌द्द‌ल लिहिलेत जास्त डीटेल म‌धे त‌र आव‌डेल्. स्पेसिफिक‌ली म‌राठी लोकात ( प्.म म‌ध‌ल्या नाग‌री ) त्याभागात‌ल्या लोकांची जि इमेज आहे त्याला अनुस‌रुन्. उदा
१. स्त्रीयांचे जीव‌न, त्यांना मिळ‌णारे स्वातंत्र्य इ. इ. पुरुष मान‌सिक‌ता.
२. कामाच्या ठिकाण‌चे क‌ल्च‌र्
३. गुंङगिरी, मुलींना/स्त्रीयांना असुर‌क्षीत वाट‌णे.
४. शिक्ष‌णाचा द‌र्जा.
५. भ्र‌ष्टाचार, नाग‌री सुविधा व‌गैरे व‌गैरे.

------------------
आत्ता प‌र्यंत तुम्ही जे व‌र्ण‌न लिहीले आहे त्याप्र‌माणे पुण्यापेक्षा ब‌रेली/कान‌पुर म‌धेच नोक‌री क‌राय‌ला ह‌वी होती असे वाट‌ते. प‌ण त‌से न‌क्कि न‌सावे त्यामुळे एकुण लिखाणात काहीत‌री मिस‌त‌य असे वाट‌ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+++११११

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

स‌र्वात काय आव‌ड‌ले असेल त‌र, तिस‌ऱ्या भागाच्या खाली दिलेली चौथ्या भागाची लिंक‌.
आम्हाला ल‌हान‌प‌णी, शाळेच्या गृह‌पाठात‌, रोज‌निशी लिहाय‌ला लाव‌त. दिवाळीच्या सुट्टीत‌, स‌ग‌ळी सुट्टी म‌जा क‌रुन, शेव‌ट‌च्या दिव‌शी,
' मी स‌काळी ल‌व‌क‌र‌ उठ‌लो. शौच्च‌मुख‌मार्ज‌न‌ क‌रुन‌, अभ्यास‌ केला, अंघोळ‌ केली. दुपारी जेव‌लो. चार‌ वाज‌ता च‌हा पिऊन‌ क्रिकेट‌ खेळाय‌ला गेलो. सात वाज‌ता, हात‌पाय धुवून‌, राम‌र‌क्षा म्ह‌ट‌ली, पाढे म्ह‌ट‌ले. रात्री साडेआठ‌ वाज‌ता जेव‌लो आणि साडेन‌ऊ वाज‌ता झोप‌लो.(त्यावेळेला उत्सुक‌तेने, हा श‌ब्द माहीत‌ न‌व्ह‌ता) ह्या ओळी तार‌खेनुसार‌ पंच‌वीस‌ वेळा लिहून‌ काढ‌ल्या.
रोज‌निशी वाचून बाईंनी क‌पाळाव‌र‌ हात‌ मार‌ला!
त‌र असे लेख‌न‌ टाळून, अनुरावांनी लिहिलेल्या मुद्द्यांना स्प‌र्श‌ क‌रावा, ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0