बिअर पिल्याने खरंच वजन वाढते का?
दारू[मराठीत बिअर साठी वेगळा शब्द नाही असल्यास सांगणे] पिल्याने वजन वाढते का?
मी २२ वर्षाचा 'तरुण' असून सध्या आफ्रिकेत नोकरी करतो याआधी बंगळूर आणि मुंबई मध्ये सुद्धा होता. अडचण ही आहे की माझं वजन वाढतच नाही ३ वर्षापासून ५०-५५ या मध्येच खेळत आहेत.
तसा मी लहानपणापासूनच सुका आहे. परंतु आजपर्यंत भरपूर लोकांनी मला बिअर प्यायचा सल्ला दिला आहे. एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्याने दारू पिणे हे वाईट एवढाच मला माहित आहे.
* तुम्ही सांगा तुम्ही कधी प्यायला सुरवात केली? का?
*शरीरावर काय फरक झाला का म्हणजे भूक वाढ इत्यादी ?
*दुष्परिणाम? सरासरी खर्च?
*घरी समजल्यावर त्यांची प्रतिक्रिया? माझं लग्न व्हयंच अजून!!
प्रतिक्रिया
कायतरी प्रश्न
नवीन दिसता. किंवा जुनेच पण नवीन आयडी घेतलेले दिसता .
कायतरी प्रश्न . यावर सगळीकडे पुरेसे चघळून झाले आहे तरी पण हा प्रश्न का पडला तुम्हाला ?
बियर प्यावी आवडत असेल तर . बाकी आफ्रिकेत कुठे आहात ? इकडे न मिळणाऱ्या बरेच चांगले ब्रँड तिकडे मिळतात . याबाबत माहिती सांगू शकतो .
>>तसा मी लहानपणापासूनच सुका आहे.
लहानपणापासून बहुतेक सर्वच मध्यमवर्गीय सुकेच असतात .
>>>शरीरावर काय फरक झाला का म्हणजे भूक वाढ इत्यादी
भूक बिक काही वाढत नाही बियर प्यायल्याने . बियर पेक्षा त्याच्या बरोबरच्या चखण्यामुळे वजन वाढते असे म्हणतात .
>>दुष्परिणाम?
अति खाल्या पिल्या मुले होणारे सगळे दुष्परिणाम बियर प्याल्याने होतातच.
>> घरी समजल्यावर त्यांची प्रतिक्रिया?
घरी कशाला समजायला पाहिजे , पुरेसे लांब राहता ना घरापासून ?
सोडा ते सगळं .
छान बियर पिऊन बघा , आवडली तर पीत राहा ...
इकडे दारू आईसक्रीम पेक्षा स्वस्त आहे राव!
म्हणूनच हा प्रश्न पडला।
चखण्याचा प्रॉब्लेम नाही. बेवड्यासोबत नेहमी बसतो आपण. सर्व चखना आपल्याच घशात असतो.
टांझानिया-दार एस सलाम
वा , वा ... दारेसलामात का ,
वा , वा ... दारेसलामात का , छान . होतो तिथे नोव्हेंबरात . पुन्हा चुकून आलो तर कळवीन . बियर पिऊ तिथे . ( तोपर्यंत तिथली लोकल किलीमांजारो बियर पिऊन बघा . बरी आहे ... )
घरी कशाला समजायला पाहिजे ,
आफ्रेएकेत त्यांनी एखादा घरोबा केला असला तर बापटण्णा. तुम्ही अंडरएस्टीमेट करु नका त्यांना त्यांच्या नावावरुन्.
ह्या बद्दल कॉमेंट करणार होते पण गब्बु ला बायकांनी "अश्या" प्रकारच्या कॉमेंट केलेल्या आवडत नाहीत, म्हणुन नाही करत्.
ह्या बद्दल कॉमेंट करणार
ओ, माझ्या नावावर बिल फाडू नका.
सुका असण्यात इतकं काही आक्षेपार्ह/अश्लील नाहि.
बिन्धास्त कॉमेंट करा.
आहाराने वजन वाढते. बिअरने
आहाराने वजन वाढते. बिअरने नाही.ते कारण पुढे करून प्यायची तर प्या. त्याबरोबर चिज सॅनविज,मेदुवडा,पंजाबि समोसा,पुडिंग,फरसाण जिलबि,बटर पराठा असा सहा दिवस बदल करा. एक दिवस ब्रेडबटर. महिन्याला तीन किलो वाढण्याची ग्यारंटी.
लेखाचा विषय बिअर /वजन आहे नाहीतर चा(छा नव्हे) चालतो.
चा(छा नव्हे) चालतो. हाहाहा
हाहाहा
हो आणि
अफ्रिकेमधे, एका बिअरच्या बदल्यात, काय काय मिळते म्हणे! त्याचाही अनुभव घ्या. अशा गोष्टी लोकांना विचारु नयेत्. अनुभव घेणे, हाच उत्तम पर्याय आहे.
इकडची पोर फार अभ्यासू १७
इकडची पोर फार अभ्यासू १७ वर्षापासून प्रात्यक्षिक करतात. आपण पुस्तकी किडे!!
ते सुद्धा मिळते बाटली च्या बदल्यात
>>ते सुद्धा मिळते बाटली च्या
>>ते सुद्धा मिळते बाटली च्या बदल्यात
त्याने पण वजन वाढते असे म्हणतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अनुभव???
तुमचा काही अनुभव? त्याबाबत? वजनाशी संदर्भात
एक मध्यमवर्गीय कुटुंबातून
सब समस्याओंकी जड! अय्याशी करा जरा मग वजन पण वाधेल
लंगडा आला रे
अय्याशी म्हणजे नेमकं काय?
???
आईने पाजलं ,भरवलं ते/तेच
आईने पाजलं ,भरवलं ते/तेच आयुष्यात प्यावं खावं.
( टिपि धाग्यावर फाउल करतोय संभाळून घ्यावे)
आलं का अनु राव?
जगण्याकरता सारेच खातात हो
जगण्याकरता सारेच खातात हो,
तुम्ही आधी खाण्यासाठी जगायला शिका.
वय फक्त २२? मग टेन्शन
वय फक्त २२? मग टेन्शन घेऊ नका. माझेही वजन साधारणपणे २३ वर्षांचा असेपर्यंत याच ५०-५५ रेंजमध्ये होते. काही केल्या वाढत नव्हते.
लॅपटॉप जसा खरेदी केला तसे हळू हळू वजन वाढत गेले. तासन्तास लॅपटॉपसमोर बसणे सुरू झाले. त्यानंतर आंध्रा मेसमध्ये भात हादडणे सुरू झाले. परिणामी आज २९ वय असताना वजन आजमितीस ७२ पेक्षा जास्त आहे. दारूबिरू प्यायची वट्ट गरज नाही. उलट मी म्हणेन व्यायाम सुरू करा. जरा जिम वगैरे सुरू केली तर वजन हळू हळू वाढेल आणि ते मसल मास असेल. फ्याट नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आल्टरनेटिव्ह फॅक्ट्स:
आल्टरनेटिव्ह फॅक्ट्स:
...लॅपटॉप जसा खरेदी केला तसे हळू हळू वजन वाढत गेले.
रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ लॅपटॉप वापरून बायसेप्सचे सेट मारत असे. सुरुवातीला दोन्ही हातात लॅपटॉप धरूनही रूममेट सपोर्ट द्यायला लागे. पाठीचा कणा ताठ ठेवण्यासाठी लॅपटॉपची जाड पॉवर केबल पाठी-पोटाभोवती गुंडाळून घेत असे. मग हळुहळू रूममेटच्या सपोर्टशिवाय, मग काही दिवसांनी एका हाताने, मग शेवटी चिमटीने लॅपटॉप उचलणं जमायला लागलं. हल्ली पापण्यांनी लॅपटॉप वरखाली करतो. याने आता बायसेप्सचं वजन वाढलेलं आहे.
हे बायसेप्सचं. थाईजसाठी डोक्यावर लॅपटॉप धरून बैठका काढत असे. लॅपटॉपचं वजन वाढवण्यासाठी स्क्रीनवर वजनदार गोष्टी पाहणे हा उपाय आहे. त्यासाठी खट्याळ अमेरिका किंवा चिसौकां वचुमं सनीताईंचा व्हिडियो लावून बैठका काढाव्यात. घट्ट लंगोट घालायला विसरू नये. (घट्ट लंगोटाचा संबंध बैठकांशी असतो. चिसौकां वचुमंशी नाही.)
सौ अन्नपूर्णा धोंडो जोशींप्रमाणे युनिकोड ज्ञानेश्वरी उघडून लॅपटॉप डोक्यावर घेऊन चालायचाही प्रयत्न केला. चाल सुधारली नाही.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
हा हा हा हा
खट्याळ अमेरिकेमुळे तर "मृत्यू" होतो असं ऐकिवात आहे ना पण.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हा हा हा
हल्ली लॅपटॉप घेऊन, ४५ मिनीटं चालणं होतं; आठवड्याचे पाच दिवस. वजन कमी व्हायला आणि पाठीचे स्नायू धडधाकट व्हायला मदत होत असावी, असा तर्क आहे. म्हणूनच मला मॅकबुक एयर आवडत नाही.
सध्या लॅपटॉप आणि पावर केबल घेऊन बायसेप्सचे सेट मारते मी. पापण्यांपर्यत जाण्याआधी मी नखांची शक्ती वाढवणारे, उगाच आबाशी स्पर्धा का करा!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हाहाहा !!
हाहाहा !!
बीअरच्या प्रत्येक
बीअरच्या प्रत्येक मिलिलीटरमध्ये सुमारे अर्धी कॅलरी असते. काहीवेळा जास्तच. जर हजार एमेल बीअर प्यायली तर किमान पाचशे क्यालऱ्या चढतात. (त्या काढून टाकायच्या असतील तर तासभर धावावं लागतं) असं पंधरासोळा वेळा केलं की एक किलो वजनाइतक्या क्यालऱ्या मिळतात. त्याचबरोबर आरबटचरबट चकणा, हादडलेलं जेवण, बुडावर बसून राहाण्याची इच्छा या सगळ्या गोष्टी जमेला धरल्या की मग वजन वाढणार नाही तर काय?
थंडीत बंडी घालावी.
शिवाय थंडी वाजू देऊ नये; थंडी वाजली की शरीर गरम ठेवण्यासाठी शरीरालाच उष्मांक (क्यालऱ्या) जाळाव्या लागतात. शरीराचं तापमान वाढवण्यासाठी फक्त घोंगडीच वापरावी, तंगडीचे दुष्परिणाम होऊ शकतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बियर ये शराब की छोटी बहन है
भेजा फ्राय मधला डायलॅाग आठवला.
आणी गब्बर मुळे थेट राव आपली अभिव्यक्ती रोखुन धरतात ?
यामुळे गब्बर चा दरारा कीत्ती दुर दुर तक आहे या विचाराने
अंमळ धास्तावुन गेलो.
पचास पचास कोस दूर ....
गब्बर के ताप से तुम्हे सिर्फ एक ही आदमी बचा सकता है ..... खुद गब्बर !!!
आता
भटक्या कुत्रा.. वेलकम हो!
प्राणिमात्रांची संख्या वाढतेय इकडे.
गुड गुड.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
हम भी आये..
हम भी आये..
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
बाहेर चा रस्ता
क्यालरीज पोटात शिरून फ्याट वाढवायच्या आत मुतल्यास काय होते? (आमचा आपला जेन्युवीन कोशचन आहे , मुतल्यास या शब्दाबाबत आक्षेप असल्यास स्वतःकडे ठेवावा, निषेधाचे फलक आणून मोर्चा काढण्यास आमची हार्कत न्हाई )
------------------------------------
लगाव बत्ती !
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
तहान लागते.
तहान लागते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
दारू[मराठीत बिअर साठी वेगळा
माहीत नाही.. पण लई मजा येती त्यामुळे पीत जावा. आम्ही आधीपासूनच लई 'भारी' असल्याने बियर पिऊन किती फरक पडला माहीत नाय.
तिन्ही प्रश्नांना उत्तर खाली आहे...
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
बियर प्या,बाहेरचे विशेषतः
बियर प्या,बाहेरचे विशेषतः स्ट्रीट फूड खा.आणि एखादी काळी कळकट सेक्सला बळकट " मैत्रिण मिळवा आणि भरपुर सेक्स करा.फक्त तिला कानात सांगा size doesn't matter.
™ ग्रेटथिंकर™
तिला पण दारू पाजा
स्वतः दारू प्यायची आणि बळकट मैत्रिणीला नाही ???
अन्याव हाये ह्यो !
-----------------------------------
लगाव बत्ती !
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
सेक्स
म्हणजे सेक्स केल्यावर पण वजन वाढतं का ह्या वर अजून एक धागा बनवा. अजून खवाट कमेंट येतील.
आस्तिक नास्तिक लोकांनी एकमेकांच्या परंपरेचा काचून नव्हे पण निदान वरवर आदर करणं महत्वाचं वाटतं. सिंगल लोकांनी कपलचा आदर करण्याचं सौजन्य निदान दाखवावं ह्यात वावगं काही नसतंय.
?
कोणाचं?
नाही म्हणजे, It takes two to tango असं कायसंसं ऐकलं होतं ब्वॉ! आता ते एक आणि दुसरा तो एक Law of conservation of mass एकत्र घ्यायचे म्हटले तर...