अभिनंदन!
ऑलिंपिक Live! धाग्यावर याचे दर दोन मिनिटाला अपडेट्स देत होतोच. हा धागा गगन नारंग तसेच यापुढे पदक जिंकणार्या भारतीय खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी धागा काढला आहे.
३० जुलै २०१२
गगन नारंग याने नुकतेच १० मी रायफल नेमबाजी स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल मिळवले आहे. त्याचे हार्दिक अभिनंदन!!!!
०३ ऑगस्ट २०१२
विजय कुमार याने नुकतेच २५ मी रॅपिड फायर मध्ये रौप्य पदक मिळवल्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन!
०४ ऑगस्ट २०१२
बॅडमिंटन मध्ये कांस्य पदक मिळाल्या बद्दल सायना नेहवालचे मनःपूर्वक अभिनंदन!!
०९ ऑगस्ट २०१२
मेरी कोम हिने महिला बॉक्सिंग स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. तिचे मनःपूर्वक अभिनंदन!
११ ऑगस्ट २०१२
योगेश्वर दत्त याने कुस्तीत (पुरूष, ६० किलो गट) कांस्य पदक मिळवले. त्याचे अभिनंदन.
१२ ऑगस्ट २०१२
सुशील कुमार याने कुस्तीत (पुरूष, ६६ किलो गट) रौप्य पदक पटकावले आहे. वैयक्तीक क्रीडाप्रकारात दोन ऑलिंपिक पदके मिळावणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. त्याचे मनःपूर्वक अभिनंदन!
=============
०४ सप्टेंबर २०१२:
यंदाच्या पॅरालंपिक्स स्पर्धेच्या उंच उडी या क्रीडाप्रकारात गिरिष नागराजगौडा या खेळाडूला रौप्य पदक मिळाले आहे. त्याचे मनःपूर्वक अभिनंदन!
=============
२९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१३
स्पेशल विंटर ऑलिम्पिक्समध्ये भारताने ४६ पदकांची लयलूट केली आहे. त्याबद्दल सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन!
गगन नारंग बद्दल
गगन नारंग बद्दल थोडं:
पंजाब-द-पुत्तर असणारा गगन हा खरंतर भारताचा सर्वोत्तम शुटर. अमृतसरच्या या नेमबाजाने त्याने आत्तापर्यंत अनेक जागतिक स्पर्धा गाजवल्या आहेत. इतकेच नाही तर १० मी एअर रायफर स्पर्धेचा 'विश्वविक्रम' या खेळाडूच्या नावावर आहे. त्याने ६०० पैकी ६०० गुण मिळवले आहेतच. त्यातही अभिमानाची बाब अशी की या विश्वविक्रमाला त्याने दोनदा गवसणी घालून तो 'फ्लुक' नव्हता हे सिद्ध केले आहे. ६००/६०० चा पराक्रम दोनदा करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.
२००४ अथेन्स ऑलिंपिक मधल्या भारतीय चमुतील सर्वात लहान खेळाडू मह्णून तो पहिल्यांदा प्रकाशात आला. मात्र ही ओळ्ख मागे टाकत भारताचा पदकाचा दावेदार ही ओळख लवकरच त्याने मिळवली- कमावली. २००८ च्या बिजींग ऑलिंपिक्सला गगन नारंग हा पदकाचा मजबूत दावेदार समजला जात होता. बहुतांश काळ भारताबाहेर राहिल्याने 'अभिनव बिंद्रा' हे नाव त्यावेळी फारसे परिचितही नव्हते. मात्र ऐन वेळी गगनला एका शॉट ने हुलकावणी दिली.
आतापर्यंत गगनने जिंकलेली पदके अशी होती
-- अॅफ्रो एशियन सुवर्ण
-- वर्ल्ड कप २००६ विजेता
-- वर्ल्ड कप २००८ विजेता (विश्वविक्रमासहीत विजेता.. तेही ४ नोव्हेंबरला ज्या दिवशी ओबामा निवडून आले होते :) )
-- राष्ट्रकुल स्पर्धेत ८ सुवर्णपदके
व इतर अनेक सुवर्ण - विजय
मात्र या सगळ्यात ऑलिंपिक पदकाने मात्र गगनला दोनदा हुलकावणी दिली होती. आता त्याच्या पदकांच्या मंदीयाळीत ऑलिंपिक मधील पदक जोडले जाऊन त्याने सर्व महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये जिंकलेली असतील.
दुर्दैव असे की २००६ पासून सातत्याने उत्तमोत्तम खेळुन देखील खेलरत्न पुरस्कारासाठी त्याला डावलले जात होते. त्याने ही खंत एकदा (बहुदा दुसर्यांदा विश्वविक्रम केल्यावर) जाहिरही बोलून दाखवली होती. पुढे २०१० मध्ये त्याला खेलरत्न पुरस्कार देण्यात आला.
आता नारंग ५० मी रायफल प्रोन आणि ५० मी रायफल ३ पोसिशन्स स्पर्धांसठी तयार होईल. या स्पर्धांमध्ये देखील तो भारतातर्फे खेळेल. या स्पर्धांत त्याने राष्ट्रकुल पदके मिळवली आहेत.मात्र इतर जागतिक स्पर्धेत फार चमक दाखवता आलेली नसली तरी अनेकदा सर्प्राईजेस दिली आहेत. अशी आशा करूया की तो असेच सुखद सरप्राईज देऊ शकेल आणि दोन वैयक्तिक पदके मिळवणारा पहिला भारतीय ठरेल!
गगन नारंग याचे पुनश्च अभिनंदन
गगनचं अभिनंदन
आता नारंग ५० मी रायफल प्रोन आणि ५० मी रायफल ३ पोसिशन्स स्पर्धांसठी तयार होईल. या स्पर्धांमध्ये देखील तो भारतातर्फे खेळेल. या स्पर्धांत त्याने राष्ट्रकुल पदके मिळवली आहेत.मात्र इतर जागतिक स्पर्धेत फार चमक दाखवता आलेली नसली तरी अनेकदा सर्प्राईजेस दिली आहेत. अशी आशा करूया की तो असेच सुखद सरप्राईज देऊ शकेल आणि दोन वैयक्तिक पदके मिळवणारा पहिला भारतीय ठरेल!
ह्या ऑलिंपिक २०१२ ह्यांच्या प्रतिसादाशी सहमत आणि अत्यंत आशेने वाट बघतो आहे. गगनला शुभेच्छा!!!
अभिनंदन!
मेरी कोम हीने कांस्य पदक जिंकलं आहे.. तिने तिचे चौथे मोठे आव्हानही यशस्वीपणे पेलल्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या वजनी गटाहून वेगळ्या वजनी गटात खेळणे हे कोणत्याही बॉक्सरला कठीण असते. त्यातही वजन वाढवण्यासाठि 'खाणे' हा उपाय वर्ज्य असतो. कारण नुसते खाऊन वजन वाढले व बॉक्सिंग केल्यास इतर कॉप्लिकेशन्स होतात. अश्या वेळी २ किलो वाढवणे प्रचंड कठीण असते (असे म्हणतात ;) ). तरीही वेगळ्या वजनी गटातही पदक मिळवून दाखवून तिने कमाल केली आहे
योगेश्वर दत्तचे कांस्य
योगेश्वर दत्तचे कांस्य पदकाबद्दल अभिनंदन.
http://zeenews.india.com/sports/london-olympics-2012/india-at-olympics/…
कुस्ती
एका तासात तीन कुस्त्या....आणि प्रत्येक कुस्तीत विजयी....अशा योगेश्वर दत्तला जरी कांस्यपदक मिळाले असले तरी नक्की वाटते की तो सुवर्णपदकास पात्र ठरू शकला असता [पदक घेताना तो जखमी झाल्यासारखा दिसत होता.....उजवा डोळा चांगलाच सुजला होता] पण असो...कुस्तीसारख्या पक्क्या भारतीय खेळात आमची ऑलिम्पिक पाटी कोरी राहीली नाही.
अभिनंदन. [हरियाणा सरकारने एक कोटीचे बक्षीस लागलीच जाहीर केले, तेही अभिनंदनीय मानले जावे]
योगेश्वर दत्त याचे मनःपूर्वक
योगेश्वर दत्त याचे मनःपूर्वक अभिनंदन!
ग्रीको रोमन स्पर्धांनी योगेश्वरने खेळायला सुरवात केली होती. त्याच्याकडे या प्रकारातही दोन राष्ट्रकुल रौप्य आहेत. मात्र मग तो भारतीयांना अधिक मानवणार्या फ्रीस्टाईल कडे वळला. बर्यापैकी सिनियर खेळाडू (आता वय २९), राष्ट्रकुल स्पर्धांमधील पाच सुवर्ण, आशियायी सप्र्धामध्ये एक सुवर्ण, एक कांस्य पदक असूनही ऑलि़ंपिक मेडल नव्हते.
ते आता मिळाले आहे!
त्याचे पुन्हा एकदा अभिनंदन!
अभिनंदन!
गेल्या वेळी कांस्य पदक मिळवून न थांबता जागतिक अजिंक्यपद आणि आता रौप्य पदक जिंकून सुशीलकुमारने वैयक्तीक क्रीडाप्रकारात पहिल्यांदाच दोन ऑलिंपिक पदके मिळविणार्या भारतीयाचा मान पटकावला आहे.
पदक रौप्य असले तरी भरतीय इतिहासात सुशील कुमारचे हे यश सुवर्णाक्षराने लिहिले जाईल हे नक्की
सुशीलकुमार याचे मनःपूर्वक अभिनंदन!!
अभिनंदन
"ऐसी अक्षरे वर एकहाती ऑलिंपिकची धुरा वाहणाऱ्या ऋषिकेशचंही अभिनंदन......"
~ अगदी मनातील भावना इथे लिहिली गेली आहे श्री.घासकडवी यांच्याकडून. तक्त्यातील माहिती आणि ते अद्ययावत करण्यासाठी जो वेळ खर्च केला आहे आणि जे परिश्रम लेखकाने घेतले आहे त्याबद्दल त्यांचे [तसेच त्याना त्यासाठी कुणी सहकार्य करणारे असतील त्यांचेही] कौतुक करावे तितके थोडेच.
~ ब्राझिलप्रसंगी परत इथे येवूच.
अशोक पाटील
भारताला अजून एक रौप्य!
२०१२ च्या पॅरालंपिक्स स्पर्धेच्या उंच उडी या क्रीडाप्रकारात गिरिष नागराजगौडा या खेळाडूला रौप्य पदक मिळाले आहे.
त्याचे मनःपूर्वक अभिनंदन!
गिरिष हा कर्नाटकात राहणारा २४ वर्षीय खेळाडू! हा डाव्या पायाने अधु आहे. याने १.७४मीटर्सच्या उडीसह रौप्य पदक पटकावले. गंमत अशी की सुवर्णपदक व कांस्यपदक विजेत्यांनीही १.७४मी ची उडी मारली. मात्र त्याआधी १.७१ च्या उडीच्या वेळी गिरिषला दुसर्या प्रयत्नात यश आले होते तर फिजीच्या खेळाडूला पहिल्याच त्यामुळे गिरिशला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. (१.७४ ची उडी दोघांनीही पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे मारली तर १.७७ मी ची उडी दोघेही मारण्यात अयशस्वी ठरले).
राष्ट्रकूल स्पर्धा २०१४,
राष्ट्रकूल स्पर्धा २०१४, मध्ये पहिल्या दिवशी भारताला पुढिल खेळाडूंनी पदके मिळवून दिली. त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदनः
सुवर्णः
एस. खुमुक्चम (भारोत्तोलन ४८ किलो वजनी गट, महिला)
एस. डे (भारोत्तोलन ५६ किलो वजनी गट, पुरूष)
रौप्यः
एम. चानु सैखोम (भारोत्तोलन ४८ किलो वजनी गट, महिला)
एस. लिकंबम (ज्युडो ४८ किलो वजनी गट, महिला)
एम. चाना (ज्युडो ६० किलो वजनी गट, पुरूष)
कांस्यः
के. थौडम (ज्युडो ५२ किलो वजनी गट, महिला)
जी माळी (भारोत्तोलन ५६ किलो वजनी गट, पुरूष)
गगन नारंग
गगन नारंग याचे अभिनंदन