Skip to main content

ऑलिंपिक २०१२ गप्पा

"ऑलिंपिक २०१२ गप्पा" या धाग्याचा उपयोग ऑलिंपिकसंबंधी बातम्या, घटना, खेळ, खेळाडू यांच्याबद्दल गप्पा मारण्यासाठी करावा.
एखादी माहिती, चर्चा लांबली की त्याचा वेगळा धागा काढता येईलच.

गप्पा मारताना साधारण पाळायचे नियमः
-- नवा विषय सुरू करताना शीर्षकात खेळाचे नाव आधी लिहावे. जर ऑलिंपिकवर इन्-जनरल प्रतिक्रीया असेल तर ऑलिंपिक-२०१२ असे
-- जर आंतरजालावरून माहिती घेत असाल तर मुळ स्रोताचा दुवा किंवा उल्लेख करावा
-- शक्य तितका प्रताधिकार मुक्त चित्रांचा वापर करण्याचा प्रयत्न करावा.

"ऑलिंपिक २०१२" या लेखनप्रकारा संबंधी काही शंका, सुचना असतील तर या धाग्याचा उपयोग करू शकताच शिवाय तुम्हाला या लेखनप्रकारात योगदान करायचे असेल मात्र काही शंका असतील तर 'ऑलिंपिक २०१२' या आयडीला व्यनी करू शकता.

ऋषिकेश Fri, 29/06/2012 - 10:15

आज पाच वेळची जगज्जेती मेरी कोमची छोटिशी मुलाखत डीएनएमधे आली आहे. ती इथे वाचता येईल.
मला आवडलं ते तिचं "हे खेळ (ऑलिंपिक्स) तुझ्यासाठी सर्वात मोठे आव्हान आहे का?" या प्रश्नाला दिलेले उत्तर.
ती म्हणते (स्वैर सारांश):
माझ्या मते हे माझे चौथे मोठे आव्हान आहे. पहिले आव्हान मी जेव्हा बॉक्सिंग खेळायचे ठरवले तेव्हा आहे होते. दुसरे माझे लग्न झाले तेव्हा (जे मला चांगल्या नवर्‍या व सारच्यांमुळे पेलता आले). तिसरे आव्हान माझ्या मुलाच्या जन्मानंतर आले होते ज्याला माझ्या खेळानेच मी उत्तर दिले. आता आत हे चौथे आव्हान आहे

याआधीच्या ऑलिंपिक्स मधे महिला बॉक्सिंग नसल्याने या गुणवंत खेळाडुला त्या पदकापासून वंचित रहावे लागले आहे. यावेळी कोणतेही तांत्रिक, वैद्यकीय विघ्न न येता तीला खेळायला मिळो व एक भारताला सुवर्णपदक मिळो ही आशा, अपेक्षा आणि प्रार्थना!

=====
नुकतेच मेरी कोम हिला मानद लेफ्टनंट कर्नलचा दर्जा बहाल करण्यात आल्याचे वाचनात आले

अभिजितमोहोळकर Fri, 29/06/2012 - 10:22

काय जबरदस्त उत्तर दिलंय तिने....तिचं आणि तिच्या माहेर-सासरचं कौतुकच करायला हवं, तिला ह्या खेळात उत्तेजन दिल्याबद्दल.
मेरी ला पदकासाठी खूप खूप खूप शुभेच्छा..

ऋषिकेश Tue, 03/07/2012 - 11:27

यंदा सौदी अरेबियाने महिलांनाही ऑलिंपिकमधे सहभागी होण्यास मान्यता दिली आहे ही स्वागतार्ह घटना आहे.
त्यांच्याबर सहभागी होताना 'योग्य' अशी वस्त्रे, सतत स्वदेशीय पुरुष सहकार्‍यांबरोबरच बाहेर पडणे आनि इतर देशांतील पुरुष स्पर्धकांबरोबर न फिरणे आदी बंधने असली तरी त्यांचा सहभाग हाच स्वागतार्ह बदल म्हटले पाहिजे. तुम्हाला काय वाटते?

बाकी, भारताच्या खेळाडूंना चालायचे बुट देखील स्वतःच्या खर्चाने घ्यावे लागत आहेत अश्या अस्थाची सनसनाटी बातमी टॉईमध्ये झळकते आहे. त्यावर कोणाला काही म्हणायचे आहे काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 24/07/2012 - 03:57

In reply to by ऋषिकेश

सौदी अरेबियासंदर्भातला हा बदल स्वागतार्हच म्हटला पाहिजे. काही महिन्यांपूर्वी ब्रिटीश यजमान पिअर्स मॉर्गनच्या टॉक-शोत सौदी युवराज्ञीने महिलांना गाडी चालवण्याबद्दल काही प्रयत्न सुरू केल्याचं सांगितलं होतं.

बाकी, भारताच्या खेळाडूंना चालायचे बुट देखील स्वतःच्या खर्चाने घ्यावे लागत आहेत अश्या अस्थाची सनसनाटी बातमी टॉईमध्ये झळकते आहे. त्यावर कोणाला काही म्हणायचे आहे काय?

बाप रे! हे भयंकर आहे.

गेल्या आठवड्यात ब्लूमबर्गवर अमेरीकन राजकारणी ऑलिंपिकचं राजकारण कसं करत आहेत त्यासंदर्भात हा लेख वाचला. राल्फ लॉरेनकडून आलेले कपडे चीनमधे बनलेले आहेत त्यावरून आरडाओरडा सुरू झालेला आहे.

ऋषिकेश Mon, 23/07/2012 - 09:49

एकेकाळी हमखास सुवर्ण पटकावत असु त्या 'हॉकी' मधे गेल्यावर्षी पात्रही न होऊन आपण नीचतम पातळीला पोचलो होतो. त्यामुळे त्यातून तावून-सुलाखून निघालेला संघ यंदा पात्र ठरला आहे.
संघाचे कोच मायकल नॉब्ज यांचा दृषीकोन अत्यंत 'प्रॅक्टीकल' वाटतो. भारताला बाद फेॠत जाण्याची किती शक्यत आहे याला ते उत्तर देतातः

अजिबात नाहीत. आमच्या गटात नेदरलँड्स, न्यूझीलंड, जर्मनी व दक्षिण कोरिया हे बलाढय़ संघ आहेत. नेदरलँड्स व न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळविणे अशक्य आहे किंबहुना त्यांच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारली तरी पदक मिळविण्याइतकाच आनंद मला होईल.

शिवाय स्वतःच्य अमर्याद आहेत हे कबूल करतानाच ते हे ही स्पष्टपणे नमूद करतात की,

हॉकी हा सांघिक कौशल्य दाखविण्याचा खेळ आहे, हे आजपर्यंत मी अनेक वेळा भारतीय खेळाडूंना सांगितले आहे. असे असूनही संघातील काही वरिष्ठ खेळाडू वैयक्तिक महत्त्वाकांक्षा समोर ठेवीत खेळत आहेत, असेही नॉब्ज यांनी सांगितले.

लोकसत्तामधील संपूर्ण बातमी इथे वाचता येईल

भारतीय हॉकीच्या यंदा उतरलेल्या संघाबद्दल तुम्हाला काय वाटते?

ऋषिकेश Thu, 26/07/2012 - 13:41

या ऑलिंपिक्स मधे भारतीय खेळाडूंचे सामने कधी कधी आहेत हे या लोकसत्तामधील लेखात वाचता येईल.
अधिक तपशीलआंसाठी अर्थातच ऐसीवरचे ऑलिंपिक Live! आहेच :)

अशोक पाटील Mon, 30/07/2012 - 12:57

ऑलिम्पिक्सच जलतरणातील एक उपप्रकार "डायव्हिंग - सूर" आम्हा भारतीयांसाठी हजारो कोस दूर राहिलेला क्रीडाप्रकार (जिमनॅस्टिक्सबरोबरीने). विशिष्ट उंचीच्या (१० आणि ३ मीटर बोर्ड) मानवी देहाला हवेमध्ये असतानाच विलक्षण अशा गतीने लयबद्ध आकार देवून पाण्यात एखाद्या अर्जुनी-बाणाप्रमाणे घुसताना पाहणे ही एक अत्यंत नेत्रसुखद अशी घटना. जलतरणामध्ये भारत किमान उतरतो तरी, पण डायव्हिंग हे आमच्यासाठी फक्त टीव्हीमाध्यमातून पाहणे इतपतच आहे.

देखण्या अशा या क्रीडाप्रकारात शेजारच्या चीनने जी गरुडभरारी मारली आहे ती पाहताना/वाचताना जलतरणप्रेमी थक्क होऊन जातात. काल चीनच्या 'वू मिनझिया' या तरुणीने ३ मीटर सिन्क्रोनाईझ्ड डायव्हिंगमध्ये 'सुवर्णपदक' मिळवून जलतरण गटात आपल्या देशाचे खाते उघडले. जलतरण स्पर्धेतील चीनचे पहिले गोल्डमेडल मिळविले एवढ्यासाठीच वू मिनझियाची महती नाही तर या प्रकारात तिचे हे तिसरे ऑलिम्पिक गोल्ड मेडल आहे. १९८५ चा जन्म असलेल्या वू मिनझियाने २००४ च्या "अथेन्स, ग्रीस" मध्ये या गटात प्रथम सुवर्णपदक जिंकले, त्यावेळी ती १९ वर्षाची होती....तर २००८ मध्ये आपल्याच देशातील 'बिजिंग ऑलिम्पिक्स' मध्ये पुन्हा 'सुवर्णपदक'.....आणि आज ती चक्क २७ वर्षाची असूनही 'लंडन ऑलिम्पिक' मध्ये त्याच उत्साहाने उतरली....उतरली नव्हे तर सुवर्णपदकाची हॅटट्रिकही करून दाखविली.

सलामच करावा लागेल 'वू मिनझिया' या सूरपटू राणीला.

अशोक पाटील

ऋषिकेश Mon, 30/07/2012 - 13:55

In reply to by अशोक पाटील

"डायव्हिंग - सूर" आम्हा भारतीयांसाठी हजारो कोस दूर राहिलेला क्रीडाप्रकार

खरे आहे. यासाठी जलतरण तलावांची अनास्था - अभाव हे कारण आहेच (बहुदा तुम्हीच मागे मीमराठीवर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे) जलतरण तलावात तापमान कंट्रोल पासून इतर अनेक सुविधांचा अभाव आहे.

त्याच बरोबर आहेत ते पुल चालु नसणे हा तर अधिक गंभीर प्रकार आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईतील शासकीय जलतरण तलाव काही ना काही कारणे काढून महिनोन महिने बंदच असतात. मुंबईत शासकीय जलतरण तलाव किती व त्यातील किती चालु आहेत व बंद असल्यास का? अशी विचारणारा RTI अर्ज मागवला होता. त्यातून तत्क्षणी केवळ मोजके तलाव (अख्ख्या मुंबईत) चालु होते :( या तलावांची जागेवर बिल्डर लॉबीचा डोळा असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे तलाव चालत नाहीत, चालवणे प्रचंड महाग आहे असे दाखवण्यासाठी वारंवार कामे काधली जातात असाही मतप्रवाह आहे (अर्थातच पुरावे नाहीत - व ते तसे मिळणे शक्यही नाही :()

त्याच बरोबर सामान्यजनांमध्ये पोहोणे याच्याकडे 'बारीक होण्यासाठी व्यायामप्रकार' किंवा 'गुडघेदुखीवरील उपाय' यापलिकडे गांभिर्याने न बघणे देखील आपले काम करत आहे.

असो.

बाकी, 'युनिव्हरसिटी' कोटा वापरून एका नवख्याला ऑलिंपिकला पाठवण्याच्या अत्यंत संतापजनक निर्णयाबद्दल काय म्हणणे आहे? :(

अशोक पाटील Tue, 31/07/2012 - 11:30

In reply to by ऋषिकेश

खरंय ऋषिकेश.....जलतरण असो वा धावपटूंसाठीच्या सरावासाठीची मैदाने असोत....शासकीय पातळीवरून हमेशा अनास्थेची ही शिकार झालेली आहे. या देशात क्रिकेटच्या मैदानाची हिरवळ बारमाही टवटवीत ठेवण्यासाठी जितका पैसा खर्च करण्यात येतो त्याचा दहा टक्के जरी अ‍ॅथलेटिक्स ट्रॅक्सकरता क्रीडा खात्याने उपलब्ध करून दिला तर आज ना उद्या ऑलिम्पिक्सच्या तोडीचे धावपटू या एकट्या महाराष्ट्र राज्यात तयार होतील असे मी फार जबाबदारीने म्हणू शकतो. मी स्वतः शिवाजी विद्यापीठाचे जलतरण स्पर्धेत कॉलेजच्या जमान्यात प्रतिनिधित्व केले असून जवळपास डझनभर राज्यातील तरण तलावांचा अनुभव घेतला असून स्वानुभावाने सांगतो की त्यातील एकही आंतरराष्ट्रीय पातळीच्या जवळपासही जाऊ शकत नव्हता....ही बाब ७०-८० च्या दशकातील. स्वीमिंग टीम मॅनेजर म्हणून सोबत येणार्‍याला 'वॉटर गॉगल' म्हणजे काय हेही माहीत नसते, अशी अवस्था कित्येक विद्यापीठात आहे. मॅनेजरचे काम फक्त स्पर्धा ठिकाणी जाऊन तिथे स्पर्धकाच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था पाहायची आणि चमूला स्पर्धेच्या ठिकाणी मिळेल त्या वाहनाने घेऊन जाणे इतपतच असायची. इंदूर येथील स्पर्धेच्या वेळी तलावातील टेकऑफ ब्लॉक मोडक्या फुटलेल्या अवस्थेत होता आणि १०० मी.फ्री स्टाईलसाठी माझा सहकारी तयार होत असताना त्याला ती स्पीड अ‍ॅक्शन घेताना पाय स्लीप होऊ लागला म्हणून त्याने आमच्या मॅनेजरकडे तक्रार केली, पण आयोजकाकडे 'प्रोटेस्ट' कसा लॉन्च करायचा, तो फॉर्म कसा भरायचा हे तर माहीत नव्हते या मॅनेजर्सना, पण इतकेच नव्हे त्यासाठी आवश्यक असणारी फी देखील यांच्या बजेटमध्ये नसते. आजही या परिस्थितीत कसलाही बदल झालेला नाही. विधानसभेत असो वा लोकसभा असो, कोणताही आमदार-खासदार या स्थितीविषयी चकारही शब्द काढत नाहीत....कारण ? कारण, परत तेच....क्रिकेट झाले की देशाचा "क्रीडा' विषय पुरता संपुष्टात आलाच म्हणा.

असो....जितके लिहिल तितके कमीच आहे या विषयावर आणि मनस्तापाशिवाय त्यातून काही निष्पण्णही होत नाही.

खेळाडूंची अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी "युनिव्हर्सलिटी कोटा" चा नियम आंतरराष्ट्रीय जलतरण समितीने एकमताने मंजूर केला असल्याने त्याला विरोध करूनही चालत नाही. कर्नाटकच्या ज्या जलतरणपटूची त्या नियमांतर्गत भारताचा प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे, त्याने टाईमटेस्ट हीट्समध्ये अन्यांपेक्षा चांगली वेळ दिली ही एकच बाब त्याच्या निवडीशी संबंधित आहे. त्याला शुभेच्छा देत असतानाच हेही माहीत आहे की त्याच्याकडून 'चमत्कारा'ची अपेक्षा शून्य आहे.

अशोक पाटील

ऋषिकेश Tue, 31/07/2012 - 12:48

जलतरणामध्ये यंदा सर्वाधिक धक्के बसले असावेत असे आता वाटु लागले आहे.
यात झालेल्या उलटफेरांचा हा धावता आढावा:
-- जलतरण स्पर्धा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी लॉच (Lotche) आणि फेल्प्स ४००मी एकेरी मेडली स्पर्धेत समोरासमोर भिडणार म्हणून सरसावून बसलेल्या प्रेक्षकांना फेल्प्स ने पहिला धक्का दिला. त्याने सुवर्ण सोडा, एकही पदक न जिंकता चौथ्या क्रमांकावर आला.
-- चीनी खेळाडूंचे बाकी पहिल्या दिवसावर वर्चस्व राहिले. ४०० मी फ्रीस्टाईल मध्ये सुन यांग याने ऑलिंपिक रेकॉर्ड केला. तर महिलांच्या ४०० मीटर एकेरी मेडली मध्ये चीनी खेळाडू "ये" ने जागतिक विक्रमासह सुवर्ण पटकावले.सांघिक मेडली मध्ये मात्र पारंपारीक विजेते ऑस्ट्रेलियाने ऑलिंपिक रेकॉर्डसह विजेतेपद राखले
-- दुसर्‍या दिवशी १०० मी बटरफ्लायमध्ये बिजिंग ऑलिंपिक्सला क्वालिफायच न होऊ शकलेल्या अमेरिकेच्या डेना वोल्मेर ने जागतिक विक्रमासह सुवर्ण पटकावले
-- फ्रेन्च महिलांनी दुसर्‍या दिवशी अमेरिकेला मोठा झटका दिला. ४०० मी फ्रीस्टाईअल मध्ये गतविजेत्यांना मागे टाकत केमिली मफ्फत या फ्रेन्च खेळाडूने ऑलिंपिक रेकॉर्डसह सुवर्ण पटकावले. शिवाय ४X१०० फ्रीस्टाईलमध्ये अमेरिकेच्या टिमला ऐन क्षणी मागे सारत सुवर्णावर नाव कोरले
-- तिसर्‍या दिवशी फ्रेन्चांनी आपले धकासत्र सरूच ठेवले आणि फ्रेन्च टिनएजर रुटा हीने १००मी ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्ण पटकावले.

एकूणच जागतिक जलतरणाच्या मंचावर महिल्या तीनच दिवसांत या ऑलिंपिक्सने नवे 'हिरोज' निर्माण केले आहेत. आता पुढे अजून कोण कोणते धक्के देते ते बघायचे

ऋता Thu, 02/08/2012 - 00:06

In reply to by ऋषिकेश

अवांतर आहे..पण रहावत नाहीये म्हणून विचारते..'माय बॅड' हा काय प्रकार आहे? आधी एका धाग्यात अदितीने वापरला तेव्हा पहिल्यांदा वाचनात आला.

ऋषिकेश Wed, 01/08/2012 - 10:58

गेल्यावर्षी चीनने सुवर्णपदकांमध्ये अमेरिकेला निर्विवादपणे मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला होता.
मात्र तेव्हा (अमेरिकन मिडीयापैकी)अनेकांनी त्याचं कारण "होस्ट कंट्री" असल्याने अधिक खेळाडूंनी घेतलेला सहभाग असे दिले. शिवाय सुवर्णपदके असली तरी एकूण पदके अमेरिकेपेक्षा कमीच आहेत असे (नाक वर करून) म्हटले होते.

कालच्या दिवसाखेरची पदक तालिका बघितली तर चीन सूवर्णपदकांत पुढे आहेच शिवाय एकूण पदकांतही 'कांटे की टक्कर' आहे. स्विमिंग सारख्या स्पर्धांमधे अमेरिकेला काही अनपेक्षित धक्के बसले आहेत हे कारण तर आहेच मात्र एकूणच चीन व्यतिरिक्त इतर राष्ट्रांच्या पुढेसुद्धा अनेकदा अमेरिकन खेळाडू अनपेक्षित रित्या हरत आहेत

अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा सुरू झाल्यावर बघायचे अमेरिका किती पुढे जाते / जाऊ शकतेय का? नाहितर अनेक वर्षांनी सुवर्णपदके तसेच एकूण पदके या दोन्ही प्रकारात मागे पडल्याचे दिसते आहे का हे बघायचे? असे झाल्यास ही अमेरिकेच्या पिछेहाटीची (व चीनच्या उदयाची) सुरवात आहे असे म्हणता येईल का?

अशोक पाटील Wed, 01/08/2012 - 19:07

मायकेल फेल्प्स.

जलतरण देवतेचा लाडका पुत्रच जणू.....म्हणून याला फक्त 'अमेरिकन खेळाडू' असे न मानता जगभरातील कोट्यावधी क्रीडाप्रेमींच्या हृदयात आता ध्रुवासम अढळ स्थान मिळविणारा एक अचाट मानवच म्हटले पाहिजे.

११६ वर्षाच्या ऑलिम्पिकच्या इतिहासात कधीही घडू न शकलेला डोळे विस्फारून टाकणारा विक्रम करणारा हा या ग्रहावरील न वाटणारा महान खेळाडू.

१. अथेन्स, ग्रीस, ऑलिम्पिक २००४ : जलतरण ६ सुवर्णपदके, २ कांस्यपदके
२. बिजिंग, चीन, ऑलिम्पिक २००८ : जलतरण ८ सुवर्णपदके,
३. लंडन, इंग्लंड, ऑलिम्पिक २०१२ ; जलतरण १ सुवर्णपदक, २ रौप्यपदके {या क्षणापर्यंत)

= १५ सुवर्णपदके ? एका खेळाडूने जिंकायची, अन तीही चक्क १२ वर्षे स्टॅमिना राखून...! ही विलक्षण आहे.
करीअरमध्ये एकूण १८ पदकाचा विश्वविक्रम होता रशियाच्या लरिसा लॅटिनीना या जिमॅनॅस्टच्या नावे; पण आज १९ व्या पदकाला हात घालीत या जलतरणपटूने जो नवा किर्तीमान स्थापित केला आहे, त्याबद्दल त्याच्या या 'सुवर्ण' मिळकतीला सलाम !

अशोक पाटील

ऋषिकेश Thu, 02/08/2012 - 09:36

In reply to by अशोक पाटील

खरे आहे.. फेल्प्स काय, शुमाकर काय, लान्स आर्मस्ट्रॉन्ग काय किंवा आपला सचिन काय.. त्यांनी लक्ष्याला इतक्या उंचीवर नेऊन ठेवले आहे की त्या लक्ष्यालाही अभिमान वाटावा

फेल्प्स याचे अभिनंदन आणि सलाम!

आवाजकुणाचा Wed, 01/08/2012 - 23:33

महाराष्ट्रातील किती खेळाडू यंदाच्या २०१२ ओलिम्पिक मध्ये सहभागी आहेत याची कोणाला माहिती आहे का?
राही सरनोबत एक ठाऊक आहे...बाकी कोणि आहे का?निदान होकी टीम मध्ये एखादा तरी...?

ऑलिंपिक २०१२ Thu, 02/08/2012 - 09:09

In reply to by आवाजकुणाचा

या व्यतिरिक्त तुषार खांडेकर आहे. बाकी महाराष्ट्रातील खेळाडू असल्याचे पटकन आठवत नाही. बघावे लागेल

अशोक पाटील Thu, 02/08/2012 - 10:59

In reply to by ऑलिंपिक २०१२

तुषार खांडेकर फक्त "आडनावा"ने महाराष्ट्राचा आहे. पण प्रत्यक्षात तो आहे उत्तर प्रदेशचा. झांसी हे त्याचे जन्मगाव. देशी स्पर्धेत तो खेळतोही सर्व्हिसेसकडून.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 02/08/2012 - 10:10

भारताला आत्तापर्यंत एकच, ते ही कांस्य पदक मिळालेलं आहे म्हणून आपल्याकडे किंचित त्रागा व्यक्त होत आहे. सध्या पदकतालिकेत चीन अग्रेसर आहे. पण ही बातमी थोडी धक्कादायक वाटली.
http://www.bloomberg.com/news/2012-08-01/for-chinese-olympians-winning-…

एका चीनी वेटलिफ्टरला रौप्य पदक मिळालं आणि मुख्य म्हणजे सुवर्ण पदक मिळालं नाही म्हणून त्याने देश आणि देशवासियांची जाहीर माफी मागितली. याच लेखातला एक परिच्छेदः
And what of the silver and bronze winners? They’re mostly forgotten. On Saturday, CCTV viewers watching the women’s 10-meter air-rifle competition witnessed an interviewer brush past Yu Dan, the Chinese bronze medal winner, to get to Yi Siling, the gold medal winner. China's microbloggers picked up on the egregious example of “gold fever.” “This warm and quiet girl sensibly left without a fuss,” tweeted a user of Sina Weibo, China’s most popular microblog. “You paid for this nation’s fragile vanity.”

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 02/08/2012 - 10:40

In reply to by ऋषिकेश

इथे हे कदाचित थोडं समांतर-अवांतर ठरेल.

अलिकडेच कानावर आलं, अमेरिकेत रहाणार्‍या आमच्या ओळखीच्या एकाने घर बदललं. आधीच्या पत्त्यामुळे ज्या शाळेत मुलीला जावं लागत होतं त्या शाळेतली मुलं फार अभ्यासू नव्हती. आता घर बदलून भारतीय आणि चीनी लोकं अधिक असणार्‍या भागात रहायला गेले आहेत. कारण त्या भागातल्या शाळांमधली मुलं अभ्यासू आहेत. (त्यांनी वापरलेला शब्द competitive)

... Thu, 02/08/2012 - 11:28

चीनचा खेळातली प्रगती हा औसक्युचा विषय जरी असला तरी आपल्या खेळाडूना स्पोर्टिग स्पिरीट शिकवण्यास विसरले असावेत
कालच त्यांच्या बँडमिँटनपटूना रडीचा डाव खेळल्याबद्दल बँन केल्याच पाहिले
अशाने फक्त खेळाडू जिँकतात खेळ नव्हे
या प्रकाराचा तीव्र निषेध

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 02/08/2012 - 19:46

In reply to by ...

फक्त चीन नव्हे, कोरियन आणि इंडोनेसियन खेळाडूंनाही तंबी मिळाल्याचं वाचलं.

जिथे सुवर्ण पदकाचा तगडा दावेदार समजला गेलेला वेटलिफ्टर रौप्य पदक मिळालं म्हणून देशाची माफी मागतो, दु:खी होतो तिथे खिलाडूवृत्ती कुठून येणार? दुसर्‍या आणि तिसर्‍या नंबरांनाही तिकडे स्थान नसेल तर खेळाडूंवर किती दडपण असेल? या चीनी बॅडमिंटनपटूंनी असा प्रकार आपल्या देशाच्या दुसर्‍या टीमशी अंतिम सामन्यातच मुकाबला व्हावा म्हणून केला.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 02/08/2012 - 20:28

काही महिला बॅडमिंटनपटूंनी लौकिकाला साजेसा खेळ न खेळल्याबद्दल त्यांना शिक्षा होण्याच्या बातम्या आहेत तर दुसरीकडे शिकाऊ ज्यूडो खेळाडूला स्पर्धेत उतरू दिलं जात आहे. ही ज्यूडोपटू सौदी अरेबियाची आहे. अरब देशांमधून महिला खेळाडू मोठ्या प्रमाणावर पाठवले जात नाहीत; सौदीने दोन महिलांना ऑलिंपिकमधे भाग घेण्यासाठी पाठवलं आहेत त्यात ही निळा बेल्टवाली ज्यूडोपटू आहे. तिच्या डोक्यावरून रूमाल घेऊन खेळण्यावरून ज्यूडो संघटनेने आक्षेप घेतला. रूमालाचं डिझाईन बदलून आता रूमाल चालवून घेतला जात आहे.

बातमीचा दुवा: http://www.bloomberg.com/news/2012-08-01/three-cheers-and-one-hijab-for…

ऋता Sat, 04/08/2012 - 14:21

बॉक्सिंगच्या निकालांच्या विश्वासार्हते बद्दल शंका येऊ लागली आहे..त्यातून २ निर्णय भारतीय खेळाडूंच्या विरोधात गेल्यामुळे जास्तच वाईट वाटत आहे. जर प्रत्यक्ष सामना पाहून पंचांना निर्णय देणं अवघड असेल तर मग रिप्ले पाहूनच मग निर्णय द्यावेत...उगाच आधी एक विजेता मग नंतर दुसराच..
आणि हे दोन निर्णयच नाही तर आणखीनही निर्णय आहेत जे वादग्रस्त ठरले आहेत. उदाहरणार्थः हे आणि हे सुद्धा.
हे वाद तर बॅडमिंटन महिला दुहेरी मधे झालेल्या वादापेक्षा जास्त गंभीर वाटत आहेत.

हे सगळं होत असताना आपल्या मनावर ताबा ठेवून उत्तम खेळ सतत्यानं करणं म्हणजे खेळाडूंची परिक्षा आहे.

ऋषिकेश Sat, 04/08/2012 - 15:24

In reply to by ऋता

सहमत आहे. एकूणच पंचांची कामगिरी बॉक्सिंग व बॅडमिंटनमध्ये ढिसाळ वाटली.
आपल्याही एका सामन्यात आपला पराभव १५-११ ने झाला असे घोषित झाले होते. ऑफिशिय पत्रात मात्र १५-१४ दाखवले होते :(