Skip to main content

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १४

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

नेमका अश्लीलता, नग्नता आणि मादकता यात फरक काय असावा? प्रत्येक व्यक्ती साठी याचा अर्थ वेगळा असू शकतो, ह्या गोष्टी संस्कृती सापेक्ष आहेत ही कारणं सोडून काही मानसशास्त्रीय/ वैज्ञानिक निकष ?
फार दिवसांपुर्वी विंदाची तीर्थाटण नावाची कविता/ देव-डी सिनेमा( माही गिल/पारो ची एंट्री, सिनेमाची सुरुवात) अश्लिल अशी आम्हा मित्र-मैत्रिणींची चर्चा झाली मला दोन्हीमधे काहीच अश्लील वाटलं नाही, पण बर्याच जणांना दोन्ही गोष्टी अश्लिल वाटत होत्या.

तीर्थाटण - विंदा करंदीकर

तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी;
अन तुझिया देहात गवसली
सखये मजला तीर्थे सारी

अधरावरती तव वृंदावन
प्रयाग सापडले नेत्री;
भालावरती ते मानसरोवर,
मानेवरती गंगोत्री

गया तुझ्या गालात मिळाली
रामेश्वर खांद्यावरती
मिळे द्वारका कमरेपाशी
अन काशी अवतीभवती

मोक्षाचीही नुरली इच्छा
नको कृपा याहून दुसरी
तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी.

नंदन Tue, 17/06/2014 - 16:24

In reply to by मन

या मायकल पोलनच्या पुस्तकात साधारण याच प्रश्नावर चर्चा आहे. त्यातून 'पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण' छापाची उत्तरं जरी नाही मिळाली, तरी काही नेमके मुद्दे समोर येतात.

हे पुस्तक ऑनलाईन पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असावे. नसल्यास गूगल बुक्सच्या दुव्यावर 'the ethics of eating animals' या सतराव्या प्रकरणातील काही पानं वाचता येतील. या चर्चेत रस असणार्‍यांसाठी नक्कीच वाचनीय.

आनंद घारे Tue, 17/06/2014 - 23:20

In reply to by मन

आमच्या बाजारातल्या कोंबडीवाल्याकडून ती आणतांना अनेक वेळा माझा दोन तीन वर्षाचा मुलगा माझ्याबरोबर असायचा. त्या कोंबडीचे कापणे, सोलणे, साफ करणे वगैरे माझ्याने पहावले जात नसे म्हणून मी तोंड फिरवून दुसरीकडे पहात असे, पण त्या लहान मुलाची पाटी कोरी होती. त्याला पाप पुण्य वगैरे काही ठाऊक नव्हते, मात्र कुतूहलच जास्त असे. तो सगळ्या क्रिया लक्षपूर्वक पहात असे आणि मला मध्ये मध्ये त्यावर प्रश्नही विचारत असे.

ॲमी Mon, 16/06/2014 - 14:25

पुणे ५२ बघताना सतत जाणवत होतं, अरे हा नायक 'आपटे' वाटत नाहीय. त्यानंतर मनोबाच्या इब्राहीम धर्म लेखमालेत थत्तेंचा एक प्रतिसाद वाचला, गोरे घारे चित्पावन मूळ भारतीय नाहीत असे कुठल्यातरी पुस्तकात आहे वगैरे. तर भारतीय न वाटणारे असे अजून कोणकोणते समाज/जाती आहेत? गोरेपणापेक्षा डोळ्यांचा रंग काळा/तपकीरीशिवाय इतर कोणतातरी असणे हे भारतात दुर्मिळ वाटतेय.

गब्बर सिंग Tue, 17/06/2014 - 01:53

In reply to by ॲमी

गोरे घारे चित्पावन मूळ भारतीय नाहीत असे कुठल्यातरी पुस्तकात आहे वगैरे.

इरावती कर्वे यांचे पुस्तक आहे अशी माझी ऐकीव माहीती आहे.

Nile Tue, 17/06/2014 - 22:25

In reply to by गब्बर सिंग

मराठी आंतरजालावर याबाबत कित्ती कित्ती काथ्याकूटला गेला आहे. या आजच्या पिढीला अभ्यास म्हणून करायची सवय नाही. 'चित् पावन' असा शोध करून पहा.

ॲमी Wed, 18/06/2014 - 07:13

In reply to by Nile

चित्पावन शोधून काय मिळणार? हिरवे, निळे डोळे असणारे भारतीय समाज कोणते हा विचार करतेय मी. मंजे ऐश, बेबो वगैरे आहेत; पण जर एका जातीत/भागात तसे जास्त लोक दिसत असतील तर ते हवे आहे.

Nile Tue, 17/06/2014 - 22:26

आम्ही लहानपणी गांडूळाचे तुकडे करून नायलॉनच्या दोर्‍याला जोडलेल्या गळाला लावून विहरीतले मासे पकडायचो (आणि मग पुन्हा सोडून द्यायचो, का ते जाऊंद्या!) आणि ह्या आजच्या पिढीला गुबगुबीत कुशनवर बसून तलावातले मासे ऑटोमॅटिक गळाने पकडता येत नाहीत! छ्या! अजून काय काय दाखवणार आहेस रे विष्णूच्या अवतारा!!

नंदन Wed, 18/06/2014 - 00:59

In reply to by Nile

गळाला लावून विहरीतले मासे पकडायचो (आणि मग पुन्हा सोडून द्यायचो, का ते जाऊंद्या!)

मध्यमवर्गीय व्हॅलेंटाईनच्या पार्श्वभूमीवर हे रूपक फ्रॉयडियन की कायसेसे वाटले ;)

नंदन Wed, 18/06/2014 - 05:50

In reply to by Nile

छे! तट-स्थ राहून अधूनमधून खडा टाकून पाहणे ;)

अमुक Wed, 18/06/2014 - 06:24

In reply to by नंदन

छे! तट-स्थ राहून अधूनमधून खडा टाकून पाहणे
..........Stop being so bait. ;)