वृत्त संग्रह

दोधक!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

उल्लेखानेच दिल वृत्त वृत्त हो गया. आपटे संस्कृत डिक्शनरी पार्ट २ च्या परिशिष्टात अशी चिकार वृत्ते दिलेली आहेत. वृत्तदर्पणाशी परिचय नंतर झाला. तोवर ही अशी एग्झॉटिक वृत्ते त्यातच पाहून ठाऊक होती. नेहमीचे अनुष्टुप, इंद्रवज्रा-उपेंद्रवज्रा-उपजाति, इंद्रवंशा, रथोद्धता, वंशस्थ, स्रग्विणी, भुजंगप्रयात, गीति, शार्दूलविक्रीडित, मंदाक्रांता, वसंततिलका, मंदारमाला, सुमंदारमाला, पृथ्वी, इ. नंतर बोर होत असे. त्यावर उतारा म्हणून दोधक, तोटक, स्वागता, कामदा, श्येनिका, यूथिका, मेघविस्फूर्जिता, प्रमाणिका, समानिका, चामर, पंचचामर, लीलाखेल, शशिकला, झालेच तर प्रहर्षिणी, मंजुभाषिणी, हरिणी, ही समवृत्ते, झालंच तर वैतालीय (हे नक्की अर्धसमवृत्त आहे का? चेकवले पाहिजे.) पुष्पिताग्रा वगैरे अर्धसमवृत्ते, आणि आपटे डिक्शनरीत दिलेले एकच विषमवृत्त पाहून लय भारी वाटायचे. त्यातली वृत्तलक्षणेही संस्कृतात असल्याने खूप मजा येत असे, उदा. तोटकाच्या उदाहरणार्थाची ओळ- 'वद तोटकमब्धिसकारयुतम्|' उगीचच लक्षात राहिलेली आहे. या दुर्मिळ वृत्तांच्या चाली माहिती नसल्याने त्यांना स्वतःच चाली लावीत असे. झालंच तर सर्वांत मोठे वृत्त म्हणजे 'दंडक' तेही वाचून उगीचच भारी वाटत असे. गेले ते दिन........

पुढे अनेक वर्षांनी अन्य भाषांतील छंदःशास्त्रादि गोष्टींबद्दल वाचन करीत असताना येल युनिव्हर्सिटीतील अश्विनी देव यांचा एक पेपर हाती लागला. आणि इतके दिवस जे अप्रत्यक्षपणे जाणवत होते ते आणि नेमके तेच त्याच नीट विवेचन करून सांगितले असल्यामुळे खूप बरे वाटले.

===

व्यवस्थापक: यानिमित्ताने विविध प्रकारची वृत्त, त्यांच्या मराठी व/वा संस्कृत लक्षणांच्या ओळी, मराठी काव्यांत त्याचा झालेला वापर, अल्पपरिचित वृत्तांच्या सदस्यांनी लावलेल्या चाली इत्यादी वृत्तांशी संबांधित चर्चा करण्यासाठी/गप्पा मारण्यासाठी धागा वेगळा काढत आहोत

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

है शाबास!
आपटे डिक्शनरी का ती? कोडं उलगडलं. मी आजोबांच्या कपाटातून एक संस्कृत डिक्शनरी पळवून आणली आहे. तिची पहिली काही पाने गायब असल्याने ती कुठली डिक्शनरी हे कळत नव्हतं. पण परिशिष्टात वृत्तलक्षणं दिली आहेत, म्हणजे ती आपटेच असणार. दोधकतोटकादि अनकॉमन वृत्तांचा परिचय मलाही या परिशिष्टातूनच झाला. मीही या वृत्तांना चाली लावल्या होत्या. वैतालीय अर्धसम नसून आर्या-गीति-पादाकुलक यांच्या जातीतील 'जाति' आहे.
अश्विनी देवांचा कुठला पेपर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीकरिता आभार!!

आपटे डिक्शनरीचं हे अपेंडिक्स इथे बघावयास मिळेल.

http://www.sanskrit-lexicon.uni-koeln.de/scans/csldoc/dictionaries/prefa...

अश्विनी देवांचा पेपर इथे पहावयास मिळेल.

बाकी समानधर्मा पाहून खूप आनंद झाला हेवेसांनल. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चला बॅटोबा/चार्वी आता एक वेगळा धागा काढा बरं. बॅटोबाने दिलेल्या/आपटे डिक्शनरीतल्या अनवट वृत्तांबद्दलचा!
मराठीत त्यात काहि रचना आहेत का? बॅट्या व चार्वी यांनी लावलेल्या चाली (समवृत्तात त्या सारख्याच निघण्याची शक्यातच अधिक Smile )रेकॉर्ड करून टाका वगैरे वगैरे

वेळ होईल तसं प्रतिसादात एकेक वृत्तबद्दल लिहित जा. काही महिन्यात छान संकलन होईल

कोल्हटकर, धनंजयदी समान'वृत्ती' लोकंही आहेतच भर घालायला Smile

==
आम्ही वाचक म्हणून सरसावून बसतोय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्यापेक्षा हेच प्रतिसाद वेगळे काढा, भर घालणे सोपे होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

डन! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पंधरा अक्षरे, सर्वच्या सर्व म गण, अर्थात सर्व अक्षरे गुरू. स्मरण बरोबर असेल तर याच वृत्तास कामक्रीडा की असेच काहीसे नाव आहे. आपटे डिक्शनरीत दिलेला या वृत्ताचा श्लोक अर्धाच लक्षात आहे: (पहिली अन शेवटची ओळ)

मा कान्ते पक्षस्यान्ते पर्याकाशे देशे स्वाप्सी:
................................
................................
तस्माद्ध्वान्ते हर्मस्यान्ते शय्यैकान्ते कर्तव्या:||

याचाच लहान अवतार म्ह. विद्युन्माला. आठ अक्षरे, सर्व गुरू, अर्थात म-म-ग-ग हे गण.

वृत्तदर्पणात परशुरामतात्या गोडबोले याचे लक्षण 'विद्युन्माला ऐसे बोला | जेथे मामा गागा आला ||' असे देतात. बाळकराम मध्ये गडकर्‍यांनी याची पॅरोडी करून 'कविता पाडण्याचे मशीन' की असेच काहीसे जर असेल तर ते या वृत्तात कशी कविता करेल याचे उदा. देताना "पाला नाला जोडा फोडा | बाबा काका मामा आत्या|" असे दिलेले आठवते. स्पष्टीकरण देताना म्हणतात की वृत्तलक्षणात फक्त मामा आलाय, इथे बाकीची नातीही कव्हर झालेली आहेत. वगैरे.

याचेच डायमेट्रिकली अपोझिट उदा. म्ह. शशिकला वृत्त. १५ अक्षरे, न-न-न-न-स. १४ अक्षरे लघु आणि फक्त शेवटचेच गुरू.

"मलयजतिलकसमुदितशशिकला" असा आपटे डिक्शनरीतील श्लोकाचा चतकोरच आठवतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

१५ अक्षरे असलेल्या अक्षरगणवृत्तांना नाव अतिशक्वरी. (शक्कर किंवा शक्वर म्हणजे साखर नसून बैल, सांड असा अर्थ होतो. पंधरा अक्षरी वृत्तांचा बैलांशी काय बरं संबंध असावा?) मालिनी हे बर्‍यापैकी प्रचलित वृत्तही १५ अक्षरी आहे. तूणक, शशिकला आणि लीलाखेल ही आणखी तीन १५ अक्षरी वृत्ते.

लीलाखेल वृत्ताची उदाहरणे (स्मरणातून वगैरे नाही, बघून बघून टाइप करत आहे.)
बॅटमनने दिलेले उदाहरणः
मा कान्ते पक्षस्यान्ते पर्याकाशे देशे स्वाप्सीः
कान्तं वक्त्रं वृत्तं पूर्णं चंद्रं मत्वा रात्रौ चेत् ।
क्षुत्क्षामः प्राटंश्चेतश्चेतो राहुः क्रूरः प्राद्यात्
तस्माद् ध्वांते हर्म्यस्यांते शय्यैकांते कर्तव्या ॥
छोट्या छोट्या शब्दांमुळे इथे चांगला ठेका देता येत आहे. पण याच वृत्ताचं अजून एक उदाहरण पहा -
पायाद्वो गोविंदः कालिंदीकूलक्षौणीचक्रे
रासोल्लसक्रीड्द्गोपीभि: सार्धं लीलाखेलः ।
मंदाकिन्यास्तीरोपांते स्वैरक्रीडाभिर्लौलो
यद्वद्देवानामीशः स्वर्वेश्याभि: खेलंतीभि: ॥

या वृत्ताची लक्षणओळ आहे 'एकन्यूनौ विद्युन्मालापादौ चेल्लीलाखेलः' (ही ओळही याच वृत्तात आहे हे ओघानेच आलं) - म्हणजे विद्युन्मालेच्या दोन पदांत एक अक्षर कमी घेतलं की ते लीलाखेल वृत्त. बॅटमनने सांगितल्याप्रमाणे विद्युन्मालाची सगळी (आठ) अक्षरं गुरू, तशी लीलीखेलाची आठ दुणे सोळा वजा एक पंधरा अक्षरे सगळीच गुरू!

शशिकला वृत्ताचे उदाहरणः (बघून टाइप करत आहे)
मलयजतिलकसमुदितशशिकला
व्रजयुवतिलसदलिकनगनगता ।
सरसिजनयनहृदयसलिलनिधिं
व्यतनुत विततरभसपरितलम् ॥

लक्षणओळः गुरुनिधनमनुलघुरिह शशिकला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आहाहा, अनेक धन्यवाद. शशिकलेच्या शेवटच्या ओळीतला 'व्यतनुत' आणि 'वितत' हे शब्द उगीचच लक्षात राहिले होते. लीलाखेलाचे दुसरे उदाहरण प्रथमच पाहिले.

बाकी, गुरुसाठी अर्धचंद्र आणि लघुसाठी डॅश ही चिन्हे वापरून ती एका ओळीत लिहिल्यास जी आकृती तयार होईल तिचा त्या वृत्ताच्या नावाशी काहीएक संबंध असावा असे वाटत असे, उदा.

UUU UUU --- U-- U--

हे मालिनी वृत्ताचे उदा. एकूण रचना पाहता माळ असावीसे वाटते. किंवा प्रमाणिका. -U-U-U-U यात लघुगुरू नुस्ते ईक्वल नंबरमध्ये नसून ईक्वली डिस्ट्रिब्यूटेडही आहेत. त्यामुळे प्रमाणिका नाव बरोब्बर आहे. भुजंगप्रयात म्हणजे U--U--U--U-- , अर्थात सापाचे डोके आणि मागील भाग U-- असे असून तो जणू चाललाय कुठेशीक असे वाटते. इत्यादि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे! हे अजिबात कधी डोक्यात आलं नसतं! भारी आहे. शशिकला - चंद्राच्या कलांसारखे बरेच अर्धचंद्र, विद्युल्लेखा, विद्युन्माला - वीजेच्या रेघेसारख्या रेघा, मणिमध्य -uu---uu- मध्यभागी पदक असलेली माळ.
म्हणजे लघु-गुरु दर्शक चिन्हे वृत्तांच्या नावांहून प्राचीन आहेत की काय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

माहिती नाही नक्की करस्पाँडन्स कसा आहे ते. बहुधा मी लावलेले लॉजिक हा एक योगायोगच ठरण्याची शक्यता जास्त वाटते, पण एशियाटिकचे खास संस्कृत प्रोसोडीच्या इतिहासावरचे एक पुस्तक आहे ते पाहिले पाहिजे याबद्दल काय सांगते ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"यु" अक्षर/आकार असण्याची शक्यता किती आहे?.
का "०" (एक छोटा गोल) योजत असावेत? तो योजला तरी वरील थियरीला बाधा नाहीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बहुतेक ग्रंथकारांनी अर्धचंद्र फॉर लघु आणि डॅश फॉर गुरु हेच कन्व्हेन्शन पाळलंय. पण किमान एक असे उदा. आहे ज्याने हे बरोब्बर उलट आहे असे सांगितलेय. बाकी अर्धचंद्रच का वापरला हे माहिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ही वृत्ते मराठीत कोणी वापरलीयेत का?

==

नसेल तर धनंजय/जयदीप आदींना सांगून एकेक कविता 'पाडून' घेतली पाहिजे Wink (गंमत सोडली तरी मराठीत वृत्त आले की मला तरी समजायला अधिक सोपे जाते, अंगभूत चाल सहज जाणवते) त्यांना तसही अशी च्यालेंजेस घ्यायला आवडतील असा अंदाज

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जुन्या पंडित कवींनी क्वचित वापरलीत. आम्ही उगीच खाज म्हणून एकदोनदा वापरून सोडून दिली. "या वृत्तातही अर्थपूर्ण वगैरे कविता करता येते" असे स्वतःच स्वतःशी ब्रॅगिंग राईट्स मिळवल्याबद्दल पाठ थोपटण्यापुरतेच काय ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे दे ना मग इथे. Smile दे दे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्ण, चांगली कविता या वृत्तात पाडणं जरा अवघड. तूर्तास खास तुमच्यासाठी नुकत्याच पाडलेल्या मराठी लक्षणओळी:

* लीलाखेला वृत्तामाजी मात्रा सार्‍या दीर्घा त्या!

* लघु-सकल-अखर म-गुरु शशिकला Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या धाग्यावर गालबोट लावून ठेवतेय, मनात पाप नाही याची खातरी असो द्यावी. मलाही वृत्तांबद्दल वाचायला आवडतं. तरी हे अस्थानी वाटल्यास जरूर मिटवावे. Sad
***
पण अशी अक्षरं नि लघुगुरुत्व मोजून कविता कशी बॉ करायची हे मला काही केल्या न झेपलेलं उत्तर आहे. म्हणजे जे काही कसरतसदृश प्रकार कराल, ते ऐकायला गोड लागेल, शिस्तीत वागेल, रस्त्याच्या कडेनं चालेल, गाडीत बसलंच तर खिडकीबाहेर हात काढणार नाही, वाटेत खायलाही मागणार नाही... पण त्याला कविता का म्हणायचं??? हातात फुटपट्टी घेऊन प्रियकरासोबत बसावं, त्याच्या निरनिराळ्या सुडौल आणि सुघड अंगांची मापं घेऊन जगाला तथाकथित रसिकतेनं सांगावीत आणि ही मोजमापं चालू असताना त्यानं कंटाळून काही कुरबुर वा चुळबुळ केलीच, तर त्याच पट्टीनं त्याच्या पोटरीवर सण्णदिशी फटका मारावा, तसलं काहीतरी वाटतं वृत्तबद्ध काव्य म्हणजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

असे वाटणे साहजिक आहे कारण वृत्त म्हणजे तसेच शिकवले जाते. पण ते चूक आहे. भीमसेन जोशी गातात तेव्हा हवेच्या प्रेशरमध्ये थोडा बदल होतो (त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येतात), पण याचा अर्थ गाणे म्हणजे हवेच्या प्रेशरमध्ये बदल ही व्याख्या केली तर कसे? तोच न्याय इथेही. वृत्त म्हणजे बेसिकली एक चाल आहे. त्या चालीचे फॉर्मलाईझ्ड रूप म्हणजे हे लघुगुरू इतकेच. हा फक्त स्पेसिफिकेशनचा एक प्रकार आहे. जर चाल माहिती असेल तर त्यात कविता बसवणे तितके अवघड नसते.

अर्थात मी सुरुवातीला वृत्तात बसवताना लघुगुरूच फॉलो करीत असे तो भाग वेगळा. पण त्या मार्गाने गेलं तरी प्रॅक्टिस हे एकमेव उत्तर आहे. ते फार अवघडही नाही. सर्वांना ते जमेल असं नाही, पण तरी माझे काही अन्य मित्रही आहेत त्यांनाही हे फार जगावेगळं वाटलेलं दिसत नाही. त्यांची संख्या २-३ पेक्षा जास्त नाही, पण हे फक्त माझे एकट्याचे मत नाही इतके सांगण्याकरिता हे पुरेसे आहे असे मला वाटते. जुन्या पिढीत तर हे सर्रास चालायचे. त्यात परत हरेक वृत्तात काही पेट्ट शब्द यायचे ते आशय बसवण्याकरिता एकदम कारीगर असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हं, व्हेन यू पुट इट लैक द्याट... चालीबद्दल कबूल आहे. उदाहरण द्या की एखादं. Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सर्वांत सोपे- अनुष्टुप वृत्त घ्या. प्रणम्य शिरसा देवम् ची चाल. अनुष्टुपाचे चार चरण असतात, त्यात प्रत्येक चरणात पाचवे अक्षर लघु पाहिजे. दुसर्‍या आणि चौथ्या चरणात अक्षर क्र. ५-६-७-८ हे अनुक्रमे ल-ग-ल-ग असेच असतात. प्रत्येक चरण ८ अक्षरांचा असतो. आता यांपैकी कुठल्या स्पेसिफिकेशनने अनुष्टुपात कविता करणे सोपे जाईल ते सांगा. ज्यांना वृत्त म्हणजे फक्त लघुगुरू सीक्वेन्स इतकेच माहिती असते त्यांना ही बाजू माहिती नसल्याने अवघड वाटणारच यात डौट नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे इंट्रेष्टिंग आणि समजायला कमी कठीण आहे. आभार.
(पण तरीही गाणं आणि कविता या दोन्हीत एक मूलभूत फरक आहे. तो तरी वृत्तबद्ध मजकूर आणि वृत्तबद्ध/छंदोबद्ध/मुक्तछंदातली कविता यांच्यात करावा असं माझं मत अजून बदललेलं नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कविता अन गाणे यात फरक इतकाच की कविता गेय असावीच असेही नाही, बरोबर? म्हणजे गाणे हा कवितेचा सबसेट आहे. 'गेय कविता' या लेबलखाली येणारा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अं... नाही. गाणे गेय असते इतकेच बरोबर. पण 'तारंपंपं रंपंपंपं रंपं चलो उसको ढूंढेंगे हम' हे गाणे आहे का? आहे. कविता आहे का? स्वारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अशी असावी कविता म्हणून
तशी नसावी कविता म्हणून
सांगावया कोण तुम्ही कवीला
आहात मोठे, पुसतो तुम्हांला

-केशवसुत. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

केशवसुतांचं काय कौतुक सांगता आणि ब्याटूआण्णा! 'एक तुतारी द्या मज आणुनी' ही तरी काय कविता आहे होय! जाऊ दे झालं. ही कविता असेल, तर वृत्तात बसवायला हवीच ती. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'एक तुतारी द्या मज आणुनी' ही तरी काय कविता आहे होय!

उगीच?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे मूळचं माझं मत नाही. गुरुनाथ आबाजींचं आहे. इतकं पटलं, की तसंच्या तसं उचललं. अर्थात ते तिथेच शोभतं, हे कबूल आहे. सांगायचा मुद्दा असा की काव्यगुण म्हणजे छंदोबद्धता वा सामाजिक जबाबदारी वा गेयता वा चंद्र-तारे-वारे इ. नेहमीचे यशस्वी... यांपैकी कोणतीच व्याख्या लागू होत नाही. नियम मोडण्याचे नियम घेऊन त्यांच्याशी खेळणे हा कलेचा एकमात्र नियम कवितेला सर्वाधिक लागू. पण हे वृत्तांबद्दल बोलताना काहीसं अवांतर आहे, हे मला कबूल आहे.

इथे फक्त नोंद व्हायला हवी होती, या मताची. बाकी वाद संभवत नाही. थांबते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

गुरुनाथ आबाजी बाकी काहीही सांगोत, परंतु या टिकानी साफ गंडल्येत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> भीमसेन जोशी गातात तेव्हा हवेच्या प्रेशरमध्ये थोडा बदल होतो (त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येतात), पण याचा अर्थ गाणे म्हणजे हवेच्या प्रेशरमध्ये बदल ही व्याख्या केली तर कसे? तोच न्याय इथेही. वृत्त म्हणजे बेसिकली एक चाल आहे. <<

एक मूलभूत प्रश्न - शास्त्रीय संगीत असो किंवा लोकधुना वगैरे असोत. पिढ्यानपिढ्या अनेकांनी माणसाच्या कानांना काय गोड वाटतं ह्याचा विचार करून किंवा ते शोधून काढून त्याचं काही एक शास्त्र बांधलं आणि त्यातून हे नियम किंवा शास्त्र वगैरे निर्माण झालं. ते संस्कृतिसापेक्ष असू शकेल, पण त्याचा कानांना गोड लागण्याशी संबंध आहे. त्यामुळे भीमसेन जोशी गातात तो निव्वळ हवेच्या प्रेशरमध्ये बदल नसतो; तर भारतातल्या मोठ्या भूभागातल्या लोकांना जे ऐकायला गोड वाटतं ते विचारात घेऊन तशी त्याची बांधणी केलेली असते म्हणून ते त्याहून वरच्या पातळीला पोचतं, असा ह्याचा प्रतिवाद केला जाऊ शकतो (केला जातोही).

त्यामुळे माझा प्रश्न - असा वृत्तांच्या बाबतीतही काही संबंध लागतो का? म्हणजे ह्या प्रकारच्या (जाचक वाटू शकतील अशा) नियमांत पद्य बसवलं तर ते मूलतःच गोड होतं वगैरे? (पुन्हा, काय गोड हे संस्कृतिसापेक्ष वगैरे मान्य करून, अमुक एका संस्कृतीतल्या पुष्कळशा लोकांना ते गोड वाटेल असंच इथे धरा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्यामुळे माझा प्रश्न - असा वृत्तांच्या बाबतीतही काही संबंध लागतो का? म्हणजे ह्या प्रकारच्या (जाचक वाटू शकतील अशा) नियमांत पद्य बसवलं तर ते मूलतःच गोड होतं वगैरे? (पुन्हा, काय गोड हे संस्कृतिसापेक्ष वगैरे मान्य करून, अमुक एका संस्कृतीतल्या पुष्कळशा लोकांना ते गोड वाटेल असंच इथे धरा.)

माझ्या मते तुमच्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे. काही वृत्तांची चाल अशी असते की तो गोडवा जास्त वाटतो, उदा. वसंततिलका, पृथ्वी, शिखरिणी, वगैरे. तुलनेने काही वृत्ते वीररसादिंकरिता जास्त सूटेबल वाटतात, उदा. शार्दूलविक्रीडित. मंदपणे सटल भाव व्यक्त करण्याकरिता मंदाक्रांता. वगैरे. वृत्तबद्ध काव्य रचण्याचा थोडाथोडका अनुभव गाठीशी असल्यामुळे मला यात तथ्य दिसते.

अर्थात ही मांडणी आजिबात वॉटरटाईट नाही, उदा. शार्दूलविक्रीडितात अगदी करुणरसाने ओथंबलेले श्लोकही रचले गेलेले आहेत. उपजाति वृत्त हे अतिशय व्हर्सटाईल आहे असे माझे मत, त्यात जवळपास कुठलीही इमोशन कोंबता येते.

पण हे सगळे फक्त हवेतच नसून पिंगलछंदःशास्त्रावर टीका लिहिणारा हलायुधही अशाच अर्थाचे काहीसे बोलतो तेव्हा यात तथ्य आहे असं वाटतं. (हे सेकंडहँड ज्ञान आहे, त्याची टीका मी वाचलेली नाही.)

करेक्ट मी इफ आयॅम राँग, पण संगीतातही अमुक राग आणि तमुक भाव यांची सांगड असतेच. आणि तीही पूर्ण वॉटरटाईटच असते असेही नाही, तरी साधारणपणे त्यांचे असोसिएशन मानले जाते त्यातलाच हाही प्रकार.

टेक्निकली स्पीकिंग, हा सिलेक्शन बायसचाही प्रकार असण्याची शक्यता आहे असे विडंबनाच्या अनुभवामुळे वाटते. आता उद्या सफिशियंट नंबर ऑफ श्लोक जर नेमक्या त्या त्या वृत्ताच्या विपरीत आशयाकरिता रचले गेले तर रेगुलर पर्सेप्शनला तडा जाईल, त्यामुळे प्राप्त पुरावे आणि जनसमजुती यांच्या आधारे काहीएक असोसिएशन असते असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुलनेने काही वृत्ते वीररसादिंकरिता जास्त सूटेबल वाटतात, उदा. शार्दूलविक्रीडित.

अर्थात ही मांडणी आजिबात वॉटरटाईट नाही, उदा. शार्दूलविक्रीडितात अगदी करुणरसाने ओथंबलेले श्लोकही रचले गेलेले आहेत.

मंगलाष्टके ही शार्दूलविक्रीडितात असतात. आता ती यांपैकी नेमक्या कोणत्या क्याटेगोरीत कोंबायची?

----------------------------------------------------------------------------------------------------------------

फॉर द्याट म्याटर, 'या कुन्देन्दुतुषारहारधवला' हेसुद्धा शार्दूलविक्रीडितात आहे. पण ते वीररसपूर्णही नाही, आणि करुणरसाने ओथंबलेलेही नाही. सेम विथ 'आम्ही कोण म्हणोनि काय पुसता' (केशवसुतांचे किंवा केशवकुमारांचे, कोणतेही.)

तेव्हा, धिस मांडणी इज़ परह्याप्स नोव्हेअर नियर वॉटरटाइट, अशी शंका येऊ लागते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------

वॉटरटाईट मरो. 'जिन्हें नाज़ है हिन्द पर, वो कहाँ है', 'ये दुनिया अगर मिल भी जाए, तो क्या है', 'अकेले अकेले कहाँ जा रहे हो', 'प्रिया आज माझी नसे साथ द्याया', 'नको भव्य वाडा, नको गाडिघोडा' आणि 'सदा सर्वदा योग तूझा घडावा' हे सगळे एकाच वृत्तात आहेत. (याबद्दल शंका असल्यास मनाचे श्लोक यांपैकी कोणत्याही चालीवर म्हणून पाहावेत. वृत्ताचे नाव विसरलो.) आहे काही वृत्ताचा आणि भावाचा संबंध? (एकाच वृत्तात लिहूनदेखील समर्थ रामदास आणि साहिर लुधियानवी हे एकमेकांसारख्या रचना करू शकले असते, असे वाटत नाही. पण हे अतिअतिअवांतर झाले.)

'कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या', 'मुहब्बत ऐसी धडकन है, जो समझायी नहीं जाती', 'जगी हा खास वेड्यांचा पसारा मांडला सारा', 'ज़रा नज़रों से कह दो जी, निशाना चूक ना जाए', 'यहाँ बदला वफा का बेवफ़ाई के सिवा क्या है'. जुळवा संबंध!

थोडक्यात, वृत्त आणि भाव यांच्यातला काही संबंध इज़ सिंब्ळी अ फिगमेंट ऑफ वन्स पर्सेप्शन अंडर द ह्याण्डिक्याप ऑफ अ रिष्ट्रिक्टेड श्याम्पलशेट, असा एक विचार मनास चाटून जातो, इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडक्यात, वृत्त आणि भाव यांच्यातला काही संबंध इज़ सिंब्ळी अ फिगमेंट ऑफ वन्स पर्सेप्शन अंडर द ह्याण्डिक्याप ऑफ अ रिष्ट्रिक्टेड श्याम्पलशेट, असा एक विचार मनास चाटून जातो, इतकेच.

काही अंशी तसे वाटते. पण मग स्वरचित काव्यात काही वृत्ते काही गोष्टींकरिता सुकर वाटल्याचीही अनेक उदा. आहेत. म्हणूनच एकदा याची शहानिशा करावयाची आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण मग स्वरचित काव्यात काही वृत्ते काही गोष्टींकरिता सुकर वाटल्याचीही अनेक उदा. आहेत.

ते ठीकच आहे. बोले तो, शर्करा ही चहा गोड बनविण्यासाठी उत्कृष्ट आहे, यात वाद नाहीच. परंतु तिचा मद्यार्क बनविण्याकरितासुद्धा उत्तम उपयोग होऊ शकतो (आणि होतो), हेही आहेच. कोणी असा करावा, तर कोणी तसा करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरंच की! वरच्या दोन संचातली गाणी खरंच एकमेकांच्या चालीत सुखाने म्हणता येतात - मौज आहे खरी! त्यातल्यात्यात दुसर्‍या संचामधली गाणी तर जास्तच स्मूथली. नबा, हि माहीती कुठे मिळाली, ओव्हर टाईम तू केलेलं संकलन, आत्ताच्या आत्ता आठवून लिहिली......??? शेवटचा पर्याय खरा असेल तर प्रणाम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

मुद्दाम लघुगुरुत्व मोजुन कविता होत नाही हे बरोबर पण सुचलेल्या कवितेतील शब्द लघुगुरुत्व मोजून finetune केल्यास गेयता वाढत असावी. शेवटी वृत्त म्हणजे संगीतातील रागांप्रमाणे काही पॅटर्न्स आहेत ज्यांची गेयता सिद्ध आहे. आणि कुठल्याही वृत्तात बसवण्यासाठी शब्दांशी तडजोड करायची नसेल तर मुक्तछंद आहेच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठल्याही वृत्तात बसवण्यासाठी शब्दांशी तडजोड करायची नसेल तर मुक्तछंद आहेच (स्माईल)

संस्कृतात एकाच शब्दाला अनेक समानार्थी पर्याय असतात, त्याचे कारण बहुधा हेच असावे!

अन्यथा, नॉर्मलायझेशनच्या तत्वाशी विसंगत अशी गोष्ट भाषेत असतीच ना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गद्यातील व्याकरणाच्या नि प्रमाणलेखनाच्या नियमांवर प्रेम असणार्‍यांनी तरी ही तक्रार करू नये! तिथे नियमांची वृत्तापेक्षाही निरुपयोगी (प्रसंगी हास्यास्पद व धुसर) चौकट चालते नि इथे नाही? का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तसे नव्हे. कुठल्याच लेखननियमांवर प्रेम नाही. उद्या शासनाचा नियम गैरलागू होऊ द्या, लग्गेच आम्हीही आमचे दुकान गुंडाळून टाकू! तसेच, इथेही नियमचौकटींवर प्रेम नाही वा द्वेषही नाही. पण या फुटपट्ट्यांच्या आधारे कुणीही वाणपुड्या बांधू शकतो आणि कविता नामक जिवंत गोष्टीचा अपमान करीत खपवू शकतो, म्हणून हरकत घेणे भाग!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पण या फुटपट्ट्यांच्या आधारे कुणीही वाणपुड्या बांधू शकतो आणि कविता नामक जिवंत गोष्टीचा अपमान करीत खपवू शकतो, म्हणून हरकत घेणे भाग!

त्याला फारतर वाईट कविता म्हणा. एखादा माणूस दुष्ष्ष्ट वैट्ट वगैरे असेल तर त्याला हरामखोर का होईना पण माणूसच म्हणतो त्यातलाच प्रकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अतिशय संतुलित आणि खेळकर प्रतिसाद. सहमतीवाचून सापडेना सोय! (बादवे, तू कोण आहेस आणि आमच्या बॅट्याचं काय केलंस बर्‍या बोलानं सांग! Wink)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

यात जाति, छन्द यांचाही समावेश असावा. वर अनुष्टुभ् चा उल्लेख आहे म्हणजे असेलच.
जाता जाता, 'अयि नराङ्गमलशोणितभक्षिके, वसुपरीक्षितहारकतक्षिके' हे कोणते वृत्त किंवा काय आहे? ( हे आ. अत्रेकृत विडम्बन आहे हे ठाऊक आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अयि नराङ्गमलशोणितभक्षिके, वसुपरीक्षितहारकतक्षिके'

द्रुतविलंबित. न-भ-भ-र.

प्रथम चरणात ग पूर्ण असले तर वृत्त गंडते. अर्धे असेल तर जमते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अशि कशी उमलली कलिका जरी
उगवला न अजुनी सविता तरी.
अशि कशीचे काय करावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशि कशी उमले कलिका तरी
उगवला नच पैं सविता जरी

एक प्रॉब्लेम असा आहे की ही वृत्ते डिझाईन्ड आहेत संस्कृतासाठी. मराठीच्या लकबी शक्यतो इग्नोरवून यात श्लोक रचले जातात. खास मराठी म्हणजे ओवी, दिंडी, साकी, परिलीना (यच्चयावत आरत्यांचे वृत्त) अशी काही वृत्ते आहेत. त्यात एकदोन अक्षरे, थोडे लघुगुरू पुढेमागे चालते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अयि नराङ् गमलशो णितभक् षिके
अशि कशी उमलली कलिका जरी
अशि कशी उमले कलिका तरी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द्रुतविलंबितात १२ 'सिलॅबल्स' अपेक्षित आहेत. तुम्ही दिलेल्या पहिल्या २ मध्ये १३ आहेत. यती बरोबर ७ व्या अक्षरावर आहे पण अक्षरे वाढलीत त्यामुळे वृत्त गंडते. (मान्य, जरा रेटून नेले की होते पण शक्यतोवर वृत्त पाळावे असे माझे मत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे कुठलंच अक्षरगणवृत्त नाही. साधारण मात्रांची बेरीज सारखी करण्याचा प्रयत्न केलाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नीट बघा ओ, पयल्या लायनीत अंमळ गंडलेले द्रुतविलंबित आहे ते.

बादवे अक्षरगणवृत्तात मात्रांची बेरीज सारखीच येणे ऑब्व्हियस नाही का? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चौथीच ओळ 'क्या हुवा अफसोस मक्षिके' आहे. अक्षरे दहा.
पहिल्या दोन ओळी नाही, पूर्ण कवितेचं म्हटलं मी. कितीही अक्षरे, कुठल्याही क्रमाने आहेत. कितीतरी कडव्यांचं पहिलं अक्षरच गुरू आहे. अंमळ नाही, चांगलंच गंडलेलं आहे.
अक्षरगणवृत्तात मात्रांची बेरीज सारखी येणार, पण क्रम ठरलेला. मात्रावृत्तात क्रमापेक्षा बेरजेला महत्त्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वृतावर बेसिक माहिती कुठे मिळेल, काहीच कळत नाहिए.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा ठोकळा डौनलोड करून भक्तिभावाने वाचू लागा. काय जे पाहिजे ते सर्वच दिलेले आहे यात.

https://archive.org/details/Chhandorachanaa

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऐसीच्या मुखपृष्ठावर आहे हा दुवा. आणि शब्दकोशांचे दुवे देखील आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पुस्तक चाळता चाळता, एका पानावर "महालोल" नावाचे वृत्त दिसले. विनोदी/ विडंबनी कवितांसाठी हे वापरायला हवे !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

मरणासन्न झालेल्या संस्कृत भाषेचा काय सोस असतो लोकांना,कुठली तरी स्तोत्राची दहा पाच रुपयांची पुस्तके काखोटीला मारुन चवली पावलीसाठी बोंबलत फिरण्यापलीकडे या भाषेचा फारसा उपयोग नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

धागा वृत्तांवर आहे.. मराठी काव्यालाही ती लागू होतात..
आणि संस्कृत मरणासन्न वगैरे दृष्टीकोन आहे.. ज्यांना त्या भाषेच्या गोडव्याचा त्यातील काव्याचा आस्वाद घ्यायचाय त्यांना घेउद्या की !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संस्कृत भाषा मृतप्राय आहे. पण गेलेल्यांच्या आठवणी आपण काढतोच ना.
पळ्ळी/पळी/पाली सुद्धा मृत आहे. पण बौद्ध धर्माचा अभ्यास करायचा तर ती थोडीतरी माहीत असणे आवश्यक आहे. (त्यासाठी संस्कृत जाणणे सुद्धा आवश्यक आहे.) तेच जैनप्राकृत, अर्धमागधी, माहाराष्ट्रीबाबत. ब्राह्मी-खरोष्टी-मोडी या लिप्या आज अस्तंगत आहेत. पण त्या त्या काळी त्यात काय लिहिले गेले होते ते जाणण्याची उत्सुकता असेल तर त्या शिकायला हव्यात. हडाप्पा चिह्नांचा उलगडा करण्यासाठी जगभरचे विद्वान जंगजंग पछाडताहेत. ते कशासाठी? आणि आजच्या घडीला भारतातले आणि परदेशातले अनेक विद्वद्वर्य बौद्धधर्म/तत्त्वज्ञान/इतिहास/प्रसार/वाङ्मय यांच्या अभ्यासात गढून गेले आहेत ते कशासाठी?त्यासाठी अगदी जुनी तमिळ आणि जुनी सिंहलीसुद्धा शिकतात ते. खर्‍या विद्वत्तेला काहीच वर्ज्य नसते.
एखादी गोष्ट शिकणे म्हणजे तिचे उदात्तीकरण करणे नव्हे ना?
क्यूरिऑसिटी हा माणसाचा अंगभूत विशेष आहे, म्हणून हे सगळे घडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वृत्ताने सहसा काय होत असावे तर रचनेला लय मिळते. चाल असो वा नसो, एखाद्या ठेक्यावर का होईना पद्य म्हणता येते. उदा. सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची हे 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' असं आघात करून चालीत न म्हणता नुसतं ठेक्यावरही म्हणता येऊ शकेल. पण तेच त्यात अर्थाबरहुकूम 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी' असं म्हटलं तर मीटर गंडतं आणि चालीत/लयीत म्हणता येत नाही. पूर्वसूरींनी हे कदाचित तत्कालीन मौखिक परंपरेला साहाय्य्भूत होण्यासाठी, म्हणजेच पाठांतर सुलभ व्हावे, म्हणून वृत्तबद्ध रचना करायला सुरुवात केली असावी. अर्थात हे सर्व माझे तर्क आहेत. अधिक प्रकाश पाडण्यासाठी बॅटमॅन वगैरे मंडळींना साद घालण्यात येत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चाल आणि लय यात फरक काय? (अतिबेसिक प्रश्न हे माहितीये पण फरक ठाऊक इल्ले.)

सुखकर्ता इ. मध्ये एका चरणात एक ग्राम्याटीकल सेण्टेन्स बसवले नाही. तसे कैक ठिकाणी पहावयास मिळते.

बेसिकली येस, पाठांतर सुलभ व्हावे, नीट लक्षात रहावे म्हणून चालबील बसवायचा खटाटोप. हे बेसिक आहे. पण यातील जे पुढे बारीकसारीक भेद आहेत ते वेद नीट पाठ करता यावेत म्हणून केलेल्या विचारातून उत्पन्न झाले. वेद सोडून अन्य ठिकाणीही यांचे पुढे अ‍ॅप्लिकेशन झाले इतकेच. सध्याच्या काळातील वृत्तांमध्ये वैदिक वृत्ते, उदा. गायत्री इ. नसतात. (आता गायत्री हे वृत्त आहे की वृत्तप्रकार, हे पाहिले पाहिजे. वैदिक वृत्तांचा माझा अभ्यास नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चाल आणि लय यात फरक काय? (अतिबेसिक प्रश्न हे माहितीये पण फरक ठाऊक इल्ले.)

त्याचबरोबर आणखी एक अतिबेसिक वाटेल असा प्रश्न..

ताल आणि ठेका यात फरक काय??

ठेक्याचाही उल्लेख वरील प्रतिसादात आल्याने हा प्रश्न उचंबळून आला..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहा, तोही एक प्रश्न आहेच म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तांत्रिकदृष्ट्या खालील उत्तर माहित आहे पण ते डोक्यात शिरत नाहीये नीट..

ताल हा मात्रांचा समूह.. (मात्रा म्हणजे ठराविक इंटर्वल) प्रत्येक मात्रेत एखादा (शून्य कींवा जास्त) बोलसमूह ..

ताल हा क्लास मानला तर ठेका हे ऑब्जेक्ट.. इथपर्यंत ठीक वाटतं.. कारण ठेक्यात बोलांत विविधता आणता येते.. ताल फिक्स असतो..

पण काही नुसतेच ठेके असतात.. कुठल्याही तालात नसलेले.. इथे दांडी उडते..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ताल हा क्लास आणि ठेका हा ऑब्जेक्ट. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे लॉजिक बरोबर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुताईंशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

उलट हवे. ठेका आधी. नुसता आरतीला टाळ्यांनी धरतात तो ही ठेकाच असतो. तिथे ताल असतोच असं नाही. शिवाय बहुतांश ठिकाणी पूर्वी ताल आणि ठेका हे शब्द इंटरचेंजिबली वापरले जात. त्यामधली सीमारेषा तशी धूसर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

किती मात्रा?? कुठे टाळी?? कुठे खाली?? याचे गणित तालामधे असते. तालात मूळ बोल कुठले हे देखिल ठरलेले असते. आता त्याच गणितात वजन सांभाळून बोल बदलले की त्याच तालातील ठेक्यात विविधता आणतात. या हिशोबाने ताल हा क्लास व ठेका ऑब्जेक्ट असा माझा विचार झाला.
पण काही नुसतेच ठेके असतात त्याचं यातून उत्तर मिळत नाही हे खरं. म्हणजे ४ मात्रांचे खूप ठेके आहेत पण ते ४ मात्रा म्हणून सगळे केरवा होत नाहीत..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाव्हा च्या भाषेत बोलताय का? होय बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोले तो इम्पोर्टंट प्रश्न ताल आणि लय यातला फरक काये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लय म्हणजे वेग. साधे सोप्पे उत्तर.

लय फक्त तालाचीच नसते तर प्रत्येक गोष्टीची असते. बोलण्याची पण असते.

ताल म्हणजे नियमांमधे बांधलेल्या बोलांचा ( तालवाद्यांवरच्या )समुह. नियम म्हणजे बोलांचे कीती समुह आहेत. सुरुवात कुठल्या बोलानी आहे वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हे ओव्हरसिम्प्लिफिकेशन झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तालसुरन की विद्या कठीणभेद
अवगुणी ना जाने, जो जाने सोही जाने.

असा काहीतरी एका बंदीशीचा अंतरा आहे.

म्ह्णुन अवगुणी लोकांनी फंदातच पडु नये सुर-तालाच्या. किंवा ज्यांना असे प्रश्न पडतात त्यांनी स्वताला अवगुणी समजावे

ROFL Angel

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रथम सूर साधे, साधे रटे नाम जो लो रहे
याही घट में प्रगट प्रान आदे

सप्त सूर तीन ग्राम, गुनीजन बखाने
आवन गवन की विद्या कठीन भेद पावे
गुरु न सेवे आदे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी म्हणतीय ती बंदीश, मालकंस सारखा दुसरा कुठला राग आहे, फक्त नि शुद्ध आहे तो , त्यातली आहे.

आठवला चंद्रकंस मधली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आय सी. मी दिलेली रागेश्रीमध्ये आहे. अशीच एक भूपमध्ये पण आहे. जयपूरवाले गातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ताल आणि ठेका यात फरक काय??

ठेके हे मुळ आहेत. २,३,४ मात्रांचा वेगवेगळ्या बोलांनी आणि वजनानी वाजवण्याचे समुह म्हणजे ठेके.
हे तालाच्या नक्की आधीपासुन अस्तीत्वात असणार. अगदी आदीवासी असल्यापासुन.

ताल तयार झाल्यावर पण वरचे ठेक्यांचे लॉजिक वापरुन पण तालाचे नियम न मोडता वेगवेगळे बोल आणि वजने वापरुन आणलेली विविधता म्हणजे ठेके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लयीची साधारण व्याख्या ठराविक लांबीचा पुनरावृत्ती होणारा कालावकाश अशी करता येईल (टाईम क्वांटा). प्रत्येक कालावकाशाची सुरुवात दाखवण्यासाठी काहीतरी इंडिकेशन असतं (बीट, टाळी, तोंडाने म्हटलेला आकडा इत्यादी). वसंतराव देशपांड्यांचं 'लय' या विषयावर एक व्याख्यानाचं रेकॉर्डिंग आहे (मी खूप पूर्वी मिपावर शेअर केलं होतं). त्याचा दुवा सापडला की देतो. त्यात लय लय भारी समजावलीये.

कालावकाशांना ठराविक संख्येने बांधलं (जसे ७, ८, १२, १६) आणि प्रत्येक कालावकाशाला तालवाद्याचे एक एक बोल दिला की जे बनतं तो ताल. उदा. त्रिताल

धा(१) धिं(२) धिं(३) धा(४) धा(५) धिं(६) धिं(७) धा(८) धा(९) तिं(१०) तिं(११) ता(१२) ता(१३) धिं(१४) धिं(१५) धा(१६)

तालाला तालवाद्याचे बोल असल्याने स्वतःचं एक वजन असतं. जे गाण्यातून वगैरे दिसतं आणि गाण्याला पूरक होतं. कुठल्याही तालाच्या मूलभूत कालावकाशाची लांबी कमी किंवा जास्त केली की आपण लय वाढली किंवा कमी केली असं म्हणतो. मात्र हा बदल युनिफॉर्म असतो. उदा. त्रितालात धा नंतर धिं अर्धा सेकंदाने वाजवला तर धिं नंतरचा पुढचा धिं सुद्धा अर्ध्या सेकंदानेच वाजला पाहिजे.

आता या तालात एखादी स्वररचना बसवली की जे बनतं ती चाल. त्या चालीबरहुकूम शब्द म्हटले की बनतं गीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका मात्रेचा कालावधी ठरवणे (baseline)म्हणजे लय असू शकेल का??

कारण एकदा एक लय पकडली की ती विलंबित (१/२, १/४, १/८), मध्य (१), द्रुत (दुप्पट, तिप्पट), अतिद्रुत (चौपट, आठपट, सोळापट) अशीच वाजवतात..
०.९, १.१, १.२ झाल्यास लय बदलली असं म्हणत असावेत का??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय. अशी बेसलाईन ठरवणे म्हणजेच लय. पण ती बेसलाईन कोणीही कशीही गरजेनुसार ठरवू शकतो. त्यानुसार मग विलंबित, अतिविलंबित, मध्य, द्रुत, अनुद्रुत वगैरे लयीचं वर्गीकरण होतं.

कारण एकदा एक लय पकडली की ती विलंबित (१/२, १/४, १/८), मध्य (१), द्रुत (दुप्पट, तिप्पट), अतिद्रुत (चौपट, आठपट, सोळापट) अशीच वाजवतात..

ह्या ढोबळ, सहज समजण्यासारख्या पटी झाल्या. याहून क्लिष्ट अशा अडीचपटी, दीडपटी, तिपटी पण करता येतात.

०.९, १.१, १.२ झाल्यास लय बदलली असं म्हणत असावेत का??

होय. किंबहुना गाताना/वाजवताना लय वाढवणे हे नेहेमीच काही १/२, १/४ किंवा २,४ वगैरे असे नसते. प्रत्येकजण स्वतःच्या मांडणीला पूरक अशा प्रकारे लय कमी जास्त करत असतो. शेवटी वर अनुरावांनी म्हटल्याप्रमाणे लय म्हणजे एका अर्थी वेगच. फक्त त्याला कालावकाश आणि पुनरावृत्तीचा भाग असल्याने तो समजायला थोडा जड जातो. सोप्यात सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर सैनिकांच्या लेफ्ट-राईट करत चाललेल्या मार्चिंगलाही ड्रमच्या ठोक्याने किंवा तोंडाने '१-२, १-२' म्हणतात ती लयच असते. वरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे लय दाखवणारा इंडिकेटर बदलतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद! थोडे थोडे समजून घ्यावयाचा प्रयत्न करतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कसं आहे की संस्कृतात वाक्यरचनेत 'कर्ता कर्म क्रियापद' असे शब्दांचे क्रम ठरलेले नाहीत. पण संस्कृतचा एक विशेष असा की सर्व विशेषणे (नामसाधित, धातुसाधित, क्रियाविशेषणे.. सर्व) विशेष्याप्रमाणे चालतात. म्हणजे अव्ययें, तुमन्त, त्वान्त वगैरे काही शब्द आणि क्रियापदे सोडून बाकी सगळ्यांना विभक्तिप्रत्यय लागतात. त्यामुळे अन्वय ठरवता येतो. मराठीतही बराच काळपर्यंत ही पद्धत होती. जर्मनमध्ये अजूनही आहे. त्यामुळे लांबच लांब जर्मन वाक्यामधले क्रियापद शोधावे लागते. अर्थ असतोच. आणि व्याकरणही बरोबर असते.
सुलभ पाठांतरासाठी शब्दांची अशी सैलसर फिरवाफिरव नक्कीच उपयुक्त ठरली असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संगीतात अजिबात गती नसल्याने वृत्त आणि लय (किंवा ताल) असा कधीच विचार केला नव्हता. डोक्याला चालना दिल्याबद्दल मणभर आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी निर्माण केलेली आणि ३१ वृत्ते त्या त्या वृताच्या मी शिकलेल्या चालीत दर्शविणारी क्लिप https://www.youtube.com/watch?v=CNnUhll0zzA येथे यूटयूबवर उपलब्ध आहे. सुरुवातीस थोडया शब्दांमध्ये वृत्तांचे विवरण आणि नंतर ओळीने ३१ वृत्ते असे हे संकलन आहे. सर्व उदाहरणे संस्कृत काव्यांमधून घेतली आहेत.एकूण लांबी सुमारे १५ मिनिटे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे लिंक दिल्याबद्दल अनेक धन्यवाद, हा व्हिडिओ पाहिला होता अगोदर. काही चाली वेगळ्या आहेत मला ठाऊक असलेल्या चालींपेक्षा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण अशी अक्षरं नि लघुगुरुत्व मोजून कविता कशी बॉ करायची हे मला काही केल्या न झेपलेलं उत्तर आहे. म्हणजे जे काही कसरतसदृश प्रकार कराल, ते ऐकायला गोड लागेल, शिस्तीत वागेल, रस्त्याच्या कडेनं चालेल, गाडीत बसलंच तर खिडकीबाहेर हात काढणार नाही, वाटेत खायलाही मागणार नाही... पण त्याला कविता का म्हणायचं??? हातात फुटपट्टी घेऊन प्रियकरासोबत बसावं, त्याच्या निरनिराळ्या सुडौल आणि सुघड अंगांची मापं घेऊन जगाला तथाकथित रसिकतेनं सांगावीत आणि ही मोजमापं चालू असताना त्यानं कंटाळून काही कुरबुर वा चुळबुळ केलीच, तर त्याच पट्टीनं त्याच्या पोटरीवर सण्णदिशी फटका मारावा, तसलं काहीतरी वाटतं वृत्तबद्ध काव्य म्हणजे.

आपण लेख, कविता, कथा वाचतो तेव्हा मनातल्या मनात वाचतो. पण मूकवाचनाचा, एकट्याने वाचण्याचा उदय आपल्याकडे अलीकडल्या काळातला म्हणजे १९व्या शतकातला असावा. तोपर्यंत पोथ्या वगैरे मोठ्यानेच वाचत असत. वाचन हा शब्दच वच् या क्रियापदाशी संबंधित आहे. आपलं बरंच साहित्य पद्यात असण्याचं कारण (वर कुणीतरी दिलंय तसं पाठ करण्याची गरज हे आहे तसंच) मोठ्याने वाचन करणं हेही असावं. वाचन केवळ ज्ञानप्राप्तीसाठी/मनोरंजनासाठी केलं जात नव्हतं, तर तो एक प्रकारचा performance होता. (* हा वीणा नारेगल यांचा सिद्धांत आहे.) एकच जण (पुराणिक वगैरे) मोठ्याने वाचत आहे आणि बाकी लोक ऐकत आहेत या सिच्युएशनमधे गद्य वाक्यांपेक्षा पद्यात, लयीत वाचणं-ऐकणं-समजणं जास्त सोपं होत असेल असा एक अंदाज आहे.

मोडी लिपी सलग, दोन शब्दांत अंतर न ठेवता लिहितात, हे अनेकांना माहीत आहेच. पण बाळबोध (नागरी/देवनागरी) लिपीतील ग्रंथही दोन शब्दांत अवकाश न सोडता लिहित असत. मूक वाचन आणि सलग शब्द हे एकमेकांना पूरक नाहीत. मात्र मोठ्याने वाचताना सलग शब्द तितकेसे बाधक ठरत नाहीत.

तर हे पुराण लावण्याचा मतलब हा, की एकल आणि मूकवाचनासाठी गद्य जितकं सोपं असतं, तितकं मोठ्याने वाचण्यासाठी नसावं. किंवा वाचनाचा हेतूच जर performance असेल, तर पद्य - वृत्तबद्ध कविता ह्या आवश्यक होत्या.

कविता म्हणजे मनातलं गुज वाचकाला सांगणे/ मनातले भाव व्यक्त करणे वगैरे असा अर्थ मेघनाला अपेक्षित असावा असं मी गृहीत धरते. पण हा अर्थच कविता या साहित्यप्रकाराला मिळाला तो साधारण एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात. त्यापूर्वी कविता हा रचनाप्रकार होता, तो कुठल्याही प्रकारचा ग्रंथ रचण्यासाठी वापरला जात होता. शास्त्रीय ग्रंथही (उदा. व्याकरण) पद्यात रचले जात होते. इथे अर्थात पाठांतराला सुलभ हा हेतू होता. जसजसा छपाईचा प्रसार होत गेला, तसतशी गद्य ग्रंथांची संख्या आपोआप वाढली. कवितेला या प्रकारातून बाहेर पडायला आणखी वेळ लागला.

वृत्तबद्धता आशय व्यक्त करण्यात अडथळे आणते, हे खरं असलं, तरी अडथळे आणेलच असं नाही. तसंच गद्यात लिहिलं, तर जास्त स्वातंत्र्य मिळेलच असं नाही. काही संस्कृत कवींचा काव्य रचण्यामागचा हेतू तर आपलं पांडित्य पाजळणं हा होता असं वाटतं. तिथे त्यांनी पद्याशी कुस्ती केली तशी गद्याशीही केली. बाणाची कादंबरी गद्य आहे, पण त्याला असणारा समासांचा सोस? वृत्तं जशी अभिव्यक्तीवर बंधनं घालतं तश्या प्रकारची बंधनं या कवींनी गद्यातही घालून घेतलीच.

कुठलाही चांगला कवी वृत्तबद्ध कविता करताना लघु गुरु मोजून मोजून करत असेल असं वाटत नाही. वृत्तांना विशिष्ट चाली लागतात. ती चाल, यति कुठे असणार हे व्यवस्थित आत्मसात असलं तर अक्षरांची संख्या, त्यांचे गण, मात्रा यांची मुद्दाम गणना करावी लागत नाही. आशय डोक्यात असेल तर जितक्या झरझर गद्य्/मुक्तछंद उतरेल, तितक्याच झरझर वृत्तबद्ध कविताही उतरू शकते.

मुक्तछंद नियममुक्त असला तरी प्रत्येक गद्य वाक्य मुक्तछंदातील कविता होणार नाही. बर्‍याच मुक्तछंदी कविता पाहिल्या तर त्यांनाही एक लय, गेयता असते असं लक्षात येईल. मग मुक्तछंदही पूर्ण मुक्त नाही असं म्हणता येईल. ही गेयता, लय असणं दर वेळेस बंधनंच घालेल असं नाही.

माझे बोलणे इतक्या वेळ शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल मी आपले आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद अतिशय आवडला, धन्यवाद.

माझे बोलणे इतक्या वेळ शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल मी आपले आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र!

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतक्या सहनशीलपणे प्रबोधन केल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

कविता म्हणजे मनातलं गूज सांगणं असा अर्थ मला अभिप्रेत नाही. उत्कट भावनेचा वा साक्षात्काराचा भाषिक दृष्ट्या काहीसा दिपवून वा हलवून टाकणारा आविष्कार अशी व्याख्या केली तर ते पुरेसं होईल का? पण हा अर्थच मुळी 'रचना' या अर्थाहून निराळा आणि अर्वाचीन आहे, हे कबूल आहे. शिवाय वर बॅट्यानं लिहिलं आहे, तद्वत असल्या वृत्तांचा आधार घेऊन केलेल्या पद्यकुस्तीला वाईट कविता म्हणू या, पण कविताच नाही हे जरा कर्मठ होईल, हेही कबूल आहे.

मुक्तछंदाबद्दलचा मुद्दा टोटल ग्राह्य.

एकूण व्याख्येतच भेद असल्याचं नोंदून घेत, कर्मठपणा म्यान करत शांत बसते आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रतिसाद एकदम आवडला. गद्य झाले म्हणजे ते सोपे असतेच असे नाही याकरिताचे उदा. एकदम राम'बाण' आहे. Smile

वृत्तांत ये बंधन पैं अपार
तैं छंदकाव्यें पुरती असार
तया उपायो परि मुक्तछंदी
तयातल्या सर्वचि छंदफंदी

मानोनि ऐसे कविता कराया
बैसोनि पैं दाखवि येथ राया
काही तुवां बंधन ते तिथेही
आहे जसे ते पुरते इथेही

गावे, न गावे, मनि जे गणावे
तेणेगुणें अंमळसे कण्हावे
हे क्रंदणे दोहिंकडेही आहे
दुर्लक्षिणे त्यां जगिं पाप आहे

बाणापरी वाक्यसमुच्चयासी
रचोनि काव्याख्य वदा तयासी
तरी सुसूत्रीस न अन्यथा तैं
ठेवा मनी हे, परि मेघनातै!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दंडवत घ्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यामारी बॅट्या! काय नेमकं आहे हे!!!!

बाकी, चार्वीचा प्रतिसाद प्रचंडच आवल्डा! त्यावर अधिक काही बोलायला उरलेच नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ब्याटोबांना दंडवत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(बॅटोपंतांना दंडवत घालून आणि 'शरीराला शरीराची ऋतुसापेक्ष ओढ लागते, आणि बेघर पारवे असे बेधडक सूर्याला सामोरे जातात...' ही पेठेबाईंची ओळ साभार स्मरून. (उर्फ ढापून!)

शब्दाला हुंकाराची अनिवार ओढ लागते
आणि बेघर कवी असा बेधडक अर्थाला सामोरा जातो.
काही अनुप्रास, काही यमके.
काही उपमा, उत्प्रेक्षा आणि रूपके.
अवघे तंत्राचे लोढणे...
जाताजाता पेरत जातो,
जमीन हिरवी करत जातो.
शब्दकोश नि व्याकरणे.
प्रमाणलेखन आणि संदर्भासह स्पष्टीकरणे.
जाणून असतो तो सार्‍या संचिताची पुण्याई
पण त्याच्या ललाटी वाटा मोडीत,
नवे प्रदेश ढुंढाळणे.
नियमभंगाचे त्याला वावडे नाही
पापालाही पुण्यापरते करीत जाई
यंत्रातंत्राच्या आणि पापापुण्याच्या पल्याड,
शब्दा-अर्थाच्या क्षितिजावरून
- कवी आकाशात उडून जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वृत्तात सूत्रे उभयप्रकारी
शब्दास अर्थासहि बंध भारी
म्हणोनि ऐसे रचि मुक्तछंदा
तयांतही पाळि अनेक बंधां!

क्वचित् कुठे ते यमकांस पाळी
अर्थास कोठे न कधीहि टाळी
तैं प्रश्न येई "परि काव्य ऐसे
अर्थे कुण्या मुक्त म्हणू अपैसे?"

लघूगुरूंची नच बंधने त्या
हे मानितो, मुक्ति मिळे न पैं त्यां
शब्दार्थिच्या त्या क्षितिजावरूती
कोणीं उडेना, भुविं राहताती

शब्दार्थमर्यादित काव्य नाही
छंदांत ऐसे जमणेचि नाही
ऐसे जधीं ते मनि पैं गमावे
गीर्वाणकाव्यासि तदा पहावे

छंदासि पाळोनिहि ये उडाया
चाला-उडा भेदचि त्यात जाया
स्फुरे जधीं पैं प्रतिभा अपैशी
भेदांचिया होतचि ऐशितैशी

असो मनी छंदचि कोणताही
ती साधने, साध्य पैं खास नाही
जो आशयो, तोचि महत्त्वपूर्ण
तत्साधने सर्वचि ती अपूर्ण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे कहर आहे. अपैसे म्हणजे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपसूक, आपोआप, जस्ट लाईक दॅट, इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असो मनी छंदचि कोणताही
ती साधने, साध्य पैं खास नाही
जो आशयो, तोचि महत्त्वपूर्ण
तत्साधने सर्वचि ती अपूर्ण

पर्फे़क्ट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

फारच छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॅटमॅन, ती भुजंगाष्टकं सगळी भुजंगप्रयात वृत्तात असतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भुजंगाष्टकं म्हणजे कुठली स्तोत्रं? एक दोन ओळी दिल्यात तर वृत्त सांगता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थांबा पाहून सांगते चार्वी.
___

॥ श्रीसुब्रह्मण्यभुजङ्गप्रयातस्तोत्रम् ॥

भजेहं कुमारं भवानी कुमारं
गलोल्लासिहारं नमस्कृद्विहारं ।
रिपुस्तोमसारं नृसिंहावतारं
सदानिर्विकारं गुहं निर्विचारं ॥ १॥

इथे तर चक्क भुजंगप्रयात्स्तोत्रच म्हटले आहे. इथे शंकाकुशंका नाहीच
____
न जानामि शब्दं न जानामि चार्थं
न जानामि पद्यं न जानामि गद्यम् ।
चिदेका षडास्य हृदि द्योतते मे
मुखान्निःसरन्ते गिरश्चापि चित्रम् ॥ २॥
हां हे फार आवडतं स्तोत्र आहे ........................ याला श्रीसुब्रह्मण्य भुजङ्गम् म्हटले आहे....................................................................... हे भुजंगप्रयात वृत्तच आहे का?
___________
विचित्रस्फुरद्रत्नमालाकिरीटं
किरीटोल्लसच्चन्द्ररेखाविभूषम् ।
विभूषैकभूशं भवध्वंसहेतुं
गणाधीशमीशानसूनुं तमीडे ॥ ४॥
हे गणेशभुजंगम....................................................................... हे भुजंगप्रयात वृत्तच आहे का?
______
उमाङ्गोद्भवं दन्तिवक्‍त्रं गणेशं भजे कङ्कणैः शोभितं धूम्रकेतुम् ।
गले हारमुक्‍तावलीशोभितं तं नमो ज्ञानरूपं गणेशं नमस्ते ॥ १॥
याला तर चक्क ढुंढीराज्भुजंगप्रयात म्हटले आहे. इथेही शंका नाही.
_______
विशुद्धं परं सच्चिदानन्दरूपम्
गुणाधारमाधारहीनं वरेण्यम् ।
महान्तं विभान्तं गुहान्तं गुणान्तं
सुखान्तं स्वयं धाम रामं प्रपद्ये ॥ १
हे रामाचे भुजंगस्तोत्र. ...................................................................... हे भुजंगप्रयात वृत्तच आहे का?
_____
ठेक्यात म्हटली तर एकाच प्रकारची वाटताहेत खरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो. सगळी भुजंगप्रयातच आहेत. भुजंगप्रयातची (शाळेत शिकलेली) लक्षणओळः तरी दाखवावा भुजंगप्रयात
ल-ग-ग ल-ग-ग ल-ग-ग ल-ग-ग
म्हणजेच चार 'य' गण.

गण ओळखण्याचा सोपा फॉर्म्युला:
यमाताराजभानसलगा

य = यमाता = लघु गुरु गुरु
म = मातारा = गुरु गुरु गुरु
त = ताराज = गुरु गुरु लघु
and so on

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही याऐवजी यरतनभजसम इतकेच पाठ केले होते. ते उभे लिहून ट्रूथ टेबल लिहायचे. { आधी 'ल'(लघु) ला डावीकडून उजचीकडे सरकरवत न्यायचा. मग सगळे ल. तसेच 'ग'(गुरू)चे करायचे)
य>> ल-ग-ग
र>> ग-ल-ग
त>> ग-ग-ल
न>> ल-ल-ल
भ>> ग-ल-ल
ज>> ल-ग-ल
स>> ल-ल-ग
म>> ग-ग-ग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

येस... 'यरतम भजसम हा' अशी काहीतरी ओळ पाठ केल्याचे आठवते.

बेसिक प्रश्न - छंद आणि वृत्त यात फरक काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही फरक नाही माझ्या मते. छंद ही संज्ञा मात्रा बेस्ड वृत्तांना जास्तकरून वापरतात तर वृत्त ही संज्ञा अक्षरगणवृत्तांना. म्हणजे आर्या, दिंडी, पदे, इ. मात्रांचा हिशेब सांभाळणारी वृत्ते ही छंद क्याटेगरीत तर शार्दूलविक्रीडितादि वृत्ते ही वृत्त क्याटेगरीत घालतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छंद हा सुपरसेट
प्रत्येक अक्षराचे लघुगुरू ठरलेले, ते वृत्त,
ओळीतल्या एकूण मात्रा ठरलेल्या, त्या जाति
उरलेल्या छंदांत अक्षरांची संख्या ठरलेली असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचीच वाट पहात होतो. Smile

थन्क्स फॉर करेक्शन! हे अंमळ विसरलोच होतो त्याची या प्रतिसादाच्या निमित्ताने आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

यमाताराजभानसलगम
म्हणजे काय ते आता विसरले पण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भुजंगप्रयातची (शाळेत शिकलेली) लक्षणओळः तरी दाखवावा भुजंगप्रयात
ल-ग-ग ल-ग-ग ल-ग-ग ल-ग-ग
म्हणजेच चार 'य' गण.

भुजंगप्रयात!!!

तेच ते, मनाचे श्लोक, 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे', 'अकेले अकेले कहाँ जा रहे हो' आणि 'जिन्हें नाज़ है हिंद पर वो कहाँ हैं'-वाले वृत्त, ज्याचे नाव वर आठवत नव्हते. आठवण करून दिल्याबद्दल बहुत बहुत आभार!
----
(बॅटमॅन: पाहा, मी सांगितले नव्हते, की वृत्ताचा नि भावाचा काहीही संबंध नसतो म्हणून? इथे 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे' आणि 'जिन्हें नाज़ है हिंद पर वो कहाँ हैं' दोन्हीं एकमेकांच्या चालींवर फिट्ट बसताहेत - आणखी काय पुरावा पाहिजे? अगदी पाहिजे तर त्या 'जिन्हें'मधल्या त्या निर्वाणीच्या आर्त 'कहाँ हैं, कहाँ हैं, कहाँ हैंऽऽऽऽ'च्या ठिकाणी 'नमस्ते, नमस्ते, नमस्तेऽऽऽऽ' घालून पाहा; पाहा तुम्हाला माझा मुद्दा पटतो की नाही ते.)
----
(फार कशाला, 'आनंदकंद ऐसा'(वृत्त: आनंदकंद) आणि 'मिली ख़ाक में मुहब्बत' एकमेकांच्या चालींवर म्हणून पाहा, नि मग सांगा मला, वृत्ताचा नि भावाचा काही संबंध असतो किंवा कसे ते.)
----
(मनाचे खेळ आहेत हो सगळे!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाददुसर्‍या सिलॅबलची चूक वगळता सहमत व्हावेसे तूर्त वाटतेय, पण हलायुधाचे म्हणणे नेमके काय आहे ते पाहतो अन मग फायनल मोहोर उमटवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

येस, तेच आहे. मनाच्या श्लोकांची चाल.

बादवे भुजंगप्रयातात यती कितव्या अक्षरावर असतो काय की. ५व्या की ६व्या? की अजून कुठल्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला कालपासून जाणवते आहे की "वृत्त" ही माझ्यासाठी बराच नॉस्टॅल्जिया जागव्णारी आहेत.
वृत्ताच्या निमित्ताने शाळा, तिथले वर्ग, शिक्षक, मित्र आणि मग त्या योगे एकातून दुसरे असे करत, खेळ, सुट्ट्या, नाटके, कविता, गणपतीतील खेळ, मनाचे श्लोक नि रामरक्षा स्पर्धा नि बरंच काय डोक्यात गर्दी करू लागलंय! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आर्या म्हटलं की गाळीव इतिहासातलं अवजड आर्येकडून पाकनिष्पत्ती वगैरे आठवायला लागतं. यमकांच्या जुड्या, भो पळा नि काय काय. पण तूर्तास ते विसरून आर्या वृत्ताविषयी टीप:
संस्कृतमध्येही आर्या आहे, आणि मराठीतही. दोन्ही भाषांत हे मात्रावृत्त आहे. अक्षरांची संख्या, लघुगुरूंचा क्रम ठरलेला नसतो, पण मात्रांची बेरीज ठरावीक असते. संस्कृत परिभाषेत या प्रकारच्या वृत्तांना 'जाति' असंही म्हणतात. संस्कृत आर्येत चार चरणापैकी पहिला व तिसरा चरण बारा बारा मात्रांचा, दुसरा अठरा तर चौथा पंधरा मात्रांचा असायला पाहिजे. संस्कृत आर्येचं उदाहरणः
कृष्णः शिशु: सुतो मे बल्लवकुलटाभिराहृतो न गृहे।
क्षणमपि वसत्यसाविति जगाद गोष्ठ्यां यशोदार्या॥

मराठीत आर्येच्या मात्रांचे काय नियम आहेत, ते मला नक्की माहीत नाही. पण मराठीत आर्यात आर्या मोरोपंतांची म्हणतात, म्हणून मोरोपंतांच्या चारपाच आर्या (वेगवेगळ्या काव्यांतल्या) घेऊन त्यातली अक्षरं आणि मात्रा मोजून पाहिल्या. प्रत्येक चरणात १९ अक्षरं आणि ३० मात्रा असं पक्कं गणित त्यांनी जमवलेलं दिसलं. अर्थात त्यांच्या काव्यांची संख्या पाहता चारपाच आर्या हे फारच छोटं सँपल आहे म्हणा.
प्राकृत कवितेचे पहिले पुस्तक नावाचं एक १८६० साली ज्ञानप्रकाश मुद्रणालयात छापलेलं एक पुस्तक आहे. कुठल्याशा इंग्रजी पाठ्यपुस्तकाचं महादेव गोविंद शास्त्रींनी केलेलं हे पद्य भाषांतर आहे. त्यात श्लोक, आर्या वगैरे वृत्त वापरलेली आहेत. 'रेशमी किडा' पासून 'बहीण भावंडांची प्रीति'पर्यंत, 'इंग्लंड देशांतील घरें'पासून 'निरुपद्रविक चोर'पर्यंत समस्त विषयांवर बालकांस ज्ञानामृत पाजणार्‍या या पुस्तकातील मुंगी या विषयावरच्या आर्या पहा:
अपुल्या नेत्रे बघता किति या मुंग्या लहान दिसतात
फिरता पायांखाली चिरडुनिया त्या धुळीस मिळतात

स्वाध्यायः या आर्येतील मात्रा मोजा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संस्कृत आर्या: प्रथमचरण ३० मात्रा, द्वितीयचरण २७ मात्रा.

मराठी/मोरोपंती आर्या (जिचे संस्कृत नाव गीति आहे): दोन्ही चरणांत ३० मात्रा.

संस्कृत आणि मराठी आर्या या दोहोंतही यति प्रत्येक चरणात १२व्या मात्रेवर असतो.

स्वाध्यायः

अपुल्या नेत्रे बघता किति या मुंग्या लहान दिसतात
४ ४ ४ २ २ ४ ४ ६, बेरीज = ३०.
फिरता पायांखाली चिरडुनिया त्या धुळीस मिळतात
४ ८ ६ २ ४ ६, बेरीज = ३०.

हे सोडून आर्यागीति असेही एक वृत्त आहे. त्यात दोन्ही चरणांत प्रत्येकी ३२ मात्रा असतात. १२+२० असा फॉरम्याट, अर्थात १२व्या मात्रेवर यति.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"दिसतात" "मिळतात" ला ६ का? मला वाटले ५ असतील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाय कॉमन कन्व्हेन्शन, पदान्तीचे लघु अक्षर हे गुरू मानले जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

किति

मग हे फक्त २ च का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पदान्ती म्हणजे ओळीच्या शेवटीचे. शब्दाच्या शेवटीचे नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बघ मला शिक्षणाची सुरुवात कुठपासुन करायची आहे ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ‍ॅटलीस्ट ग्राउंड झीरोपासून सुरुवात करायची नाही हेही काही कमी नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

समहाऊ - मला मराठी माध्यमात असुन सुद्धा वृत्त हा विषय का नव्हता अभ्यासक्रमात? का होता आणि माझ्या काहीही लक्षात नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी माध्यमात असलेल्यांना वृत्त हा विषय अभ्यासक्रमात नसणे अशक्य आहे. आठवत नसेल इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

१० वीच्या मराठीच्या पुस्तकात होती वृत्ते .

भुजंगप्रयात,वसंततिलका ,मालिनी

त्यात चरण ,यती अश्या terms होत्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही सर्व चर्चा संस्कृत छंदःशास्त्राबद्दल आहे. अन्य भाषांमध्येही छंदःशास्त्र तितकेच विशाल आहे, उदा. ग्रीक, अरेबिक, तमिऴ, वगैरे. तमिऴ छंदःशास्त्राबद्दलचे एक उत्तम पुस्तक पीडीएफ रूपात मजकडे आहे, इच्छुकांनी व्यनि करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

व्यनि करून काय उपयोग? तमिळ वाचता येणार नाही. थोडक्यात ओळख करून द्या की तमिळ/इतर भाषांतील छंदःशास्त्राची

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तक इंग्रजीत आहे. बाकी ओळख म्हणाल तर मलाही अतिअतिअतिबेसिक पलीकडे काहीच येत नाही. संस्कृत व ग्रीकची तुलना पहावयाची असेल तर अश्विनी देव यांचा पेपर पहावासे सुचवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्या भाषांमध्येही लोक "मुक्तछंद चांगला कसा" यावर चर्चा करतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हाहा, गुड क्वेश्चन. बहुतेक सगळीकडेच आजकाल मुक्तछंदाची चलती आहे असे दिसते. मुक्तछंद इज़ दि बेस्ट असे किमान इंग्लिश व भारतीय भाषांसाठी तरी नक्कीच म्हणता यावे. बाकीचे ठाऊक नाही, पाहिले पाहिजे. पण यापेक्षा हे पर्सेप्शन फार वेगळे नसावेसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मराठी वृत्त. सात 'त' गण + एक गुरु अशी बावीस अक्षरे, यति ४, ६, ६, ६.
वाचाळ मी नीट पाचारितो धीट याचा नयो वीट साचा हरी
तबडक् तबडक् तबडक् तबडक् तबडक् तबडक् तबडक्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओ हॅलो, ही मंदारमाला नव्हे का?

अधिक शोध घेता हे लक्षण सापडले:

मंदारमाला कवी बोलती हीस, कोणी हिला अश्वघाटी असे ।
साता तकारी जिथे हा घडे पाद, तेथे गुरू एक अंती वसे ॥

अर्थात दोन्ही एकच.

नववीच्या मराठीच्या पुस्तकात दिलेला लक्षणश्लोक मस्त होता. त्याची लास्टचीच ओळ लक्षात राहिलीयः

"बोला हवे ते, मला काय त्याचे, पुरे जाणतो मीच माझे बल!"

ही ओळ वाचून एकदम दिलाची घंटी वाजून एकदम गारगार झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओह होय. सॉरी.
शोभे सभोवार मंदारमाला मुदे वाहते मंद मंदाकिनी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रैट्ट!

आणि मंदारमालेच्याच अगोदर एक लघु जोडले की त्याची होते सुमंदारमाला. सात यगण आणि ल, ग. ही दोन्ही वृत्ते मराठीतच वापरली जातात का? संस्कृतातले याचे उदाहरण दिसत तरी नाही / माहीत नाही.

अवांतरः आपटे डिक्शनरीतील दंडक वृत्ताबद्दल काय म्हणणे आहे? Smile त्या वृत्तात जमल्यास कधी कविता पाडावासा बेत आहे, पण चाल बसवण्यापासून सुरुवात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मंदारमाला/ सुमंदारमाला संस्कृतमध्ये पाहण्यात नाही.

दंडकात फारसे दंडक नाहीत. पाडा पाडा कविता. मुद्दे देऊ का कविता लिहायला Wink
पहिली सहा अक्षरे लघु असल्याने पहिल्या भागाला मालिनीची चाल फ्युजन करून लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आठवणीतून देतोय. लहानशी चुभूदेघे

हे विश्व सारे विहारास माझ्या, पुरेसे न होईल शंका नको
हा मर्त्य हा देहकारानिवासी, जगी हीन हा काही कोणी बको
मी मर्त्य मी मृत्यूला जाणणारा, जगी धूळ मी दिव्यता उज्ज्वल
बोला हवे ते, मला काय त्याचे, पुरे जाणतो मीच माझे बल

मला हे इतकेच आठवतेय.. मुळ कविताही मी तेव्हा शोधली होती आता विसरलो.. केशवसूत का टिळक (का मर्ढेकर!) बहुदा

<मनोबा मोड ऑन >
बाकी ही मंदारमाला हे मलाही ओळखू आले पण बॅट्याने भाव खाल्ला Tongue
<मनोबा मोड ऑफ >

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे विश्व सारे विहारास माझ्या, पुरेसे न होईल शंका नको
हा मर्त्य हा देहकारानिवासी, जगी हीन हा काही कोणी बको
मी मर्त्य मी मृत्यूला जाणणारा, जगी धूळ मी दिव्यता उज्ज्वल
बोला हवे ते, मला काय त्याचे, पुरे जाणतो मीच माझे बल

अहाहाहाहाहा एकच नंबर ऋ. क्या बात है! हेच ते हेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ना. वा. टिळक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गझल सळसळूदे भुजंगाप्रमाणे
तिच्या नेत्रज्योती कुरंगाप्रमाणे

गझल मैफिलीला अता रंग चढला
तुझी साथ मजला मृदंगाप्रमाणे

अता दोर उरला कुणाच्यान हाती
भरारे गझल ही पतंगाप्रमाणे

मुला-माणसांनी फुला-पाखरांनी
गझल गुणगुणावी अभंगाप्रमाणे

जली राजहंसा तुझा डौल भारी
गझल त्यात माझी तरंगाप्रमाणे

वृत्त – भुजंगप्रयात, मात्रा २०
लगावली – ल गा गा /ल गा गा/ ल गा गा /ल गा गा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे लगागा लगागा काय असते?

आणि ते ह्या गजले मधे कसे मॅच होतय ते दाखवते का सखि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लघु आणि गुरु असावेत हे ल गा गा म्हणजे .

गझल मध्ये match होतंय कि नाही हे पाहावं लागेल .जाणकारांच्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ल = लघु, गा/ग = गुरु असे दर्शवण्याची पद्धत.

हे मुळात लघुगुरुक्रमाचे वृत्त आहे. त्यामुळे अर्थातच मात्रांचा हिशेबही आपसूकच सांभाळला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्या - त्या दिलेल्या गजलेत लगागा / लगागा हे कुठे बसतय?

पहिलाच शब्द "गजल" आहे, म्ह्णजे ललल होयला पाहिजे ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गझल्सळ्सळूदे असे वाचा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे कधी कसे वाचायचे हे कसे समजणार?

तुम्ही लोक बिगारीतल्या मुलांना शिकवतात तसे पहिल्यापासुन का नाही शिकवत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ अनु

खालची लिंक http://cart.ebalbharati.in/BalBooks/pdfs/801010001.pdf
हि बालभारतीच्या नववीच्या पुस्तकातली आहे .यात आहे बघ बेसिक माहिती .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिंकेबद्दल धन्यवाद. जुन्या सिलॅबसातले काय काय आहे ते पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्स सखि.

पुस्तकात जो मनाचा श्लोक दिला आहे तो बसतोय बर्‍यापैकी लगागा लगागा च्या नियमात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे कवन परंपरागत भुजंगप्रयातात बसत नाही. ल म्हणजे लघु (र्‍हस्व) उच्चारी अक्षर आणि ग/गा म्हणजे गुरु (दीर्घ) उच्चारी अक्षर. लगागा म्हणजे लघु-गुरु-गुरु असा तीन अक्षरांचा 'य' नावाचा गण. चार वेळा 'य गण' अशी बारा अक्षरे आली की भुजंगप्रयात होते. पण या कवनात बारा अक्षरे नाहीत. त्यामुळे परंपरागतरीत्या पाहिले तर हे कसोटीस उतरत नाही.

पण मराठी उच्चार करताना 'अ'कारयुक्त अक्षरांचे उच्चार अनेकदा आपण पाय मोडल्यासारखे अर्धवट करतो. उदा. गझल या शब्दात तिन्ही शब्द अकारयुक्त असले तरी 'ल'चा आपण ल् असा करतो. त्या 'ल'चा किंवा सळसळू शब्दातल्या प्रत्येक 'अ'काराचा पूर्ण उच्चार केला तर वृत्तात बसणार नाही. पण 'ळ'चा उच्चार ळ् असा केला, तर त्याचा पुढच्या अक्षराशी संधी होईल. नियमानुसार जोडाक्षराच्या आधीचे अक्षर गुरु होईल. (कारण संस्कृतमध्ये त्याच्यावर जोर येतो. मराठीत काही काही वेळा येत नाही. पण तो वेगळा मुद्दा आहे.) अशा प्रकारे जर मराठी खरे उच्चार मानले (तसे अजून व्याकरणकार अजून मानत नाहीत), तरच हे भुजंगप्रयातात बसेल.
उदा. 'अता दोर उरला कुणाच्यान हाती' ही ओळ 'अता दोर उर्ला कुणाच्या न हाती'अशी मराठी उच्चारांनुसार वाचली तरच ती भुजंगप्रयातात बसवता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी उच्चारपद्धतीप्रमाणे पाहिले तर बसते. चार्वी यांनी दिल्याप्रमाणेच बहुतेक मराठी जन्ता उच्चार करते, उदा. गझल्सळ्सळूदे भुजंगाप्रमाणे यात बघा.

गझल्स ळ्सळूदे भुजंगा प्रमाणे
ल-गा-गा | ल-गा-गा |ल-गा-गा | ल-गा-गा

आता कुठल्याही लघु अक्षरानंतर जोडाक्षर आले की ते लघुपासून गुरू होते असे कन्व्हेन्शन आहे. (उच्चारीही होतेच.) "संयोग र्‍हस्वास गुरुत्व देतो" वगैरे. त्यामुळे ते गझलेतले "झ" हे गुरू झाले. बाय सेम लॉजिक "ल्स" हेही गुरू झाले कारण नंतरचे "ळ्स" हे जोडाक्षर आले. इत्यादी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माहीती नाही, पण मी जेंव्हा ती कविता म्हणली मनात तर "गजल" शब्द स्वतंत्र म्हणला आणी सळसळुदे मधले प्रत्येक अक्षर पण स्वतंत्र म्हणले.

रादर, हे जे जोडाक्षरात लिहीले आहे त्याचा उच्चारच मला करता येत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गझल्सळ् सळूदे भुजंगाप्रमाणे

आता बघा येतंय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाने