Skip to main content

मातृभूमीला 'माँ' म्हणण्याची गरज का?

6 minutes


उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्
वर्ष तत् भारतं नाम भारती यत्र संतिःत

समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेतल्या भू भागाला भारत असे म्हणतात. या भारतभूमीची संतति इथे निवास करते.

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते.
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.

हे लक्ष्मणा, सुवर्ण लंकेचा राजा बनण्यापेक्षा अयोध्येत भरताच्या अधीन सेवक राहणे अधिक रास्त कारण माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा हि महान आहे.

पुरातन काळापासूनच आपण आपल्या भरत भूमीला आई म्हणतो. युरोपियन लोक हि देशाला पितृभूमी म्हणतात. एकदा का देशाला आपण माता /पिता मानले कि देशात बंधुत्वाचे वातावरण आपसूक निर्मित होते. जिथे सोख्य असेल तिथे शांती, आणि समृद्धी हि आलीच

प्रकृतीने हिमालयापासून समृद्रापर्यंत एक विशिष्ट भूभागाची रचना केली आहे. या भू-भागात अनेक भाषा-भाषी, पंथ आणि जातींचे लोक राहतात. एकाच राजाचे राज्य नेहमीच या भूभागावर राहील, हे संभव नाही. सत्तेसाठी युद्ध हे अटळ आहेच. आपल्या देशात सत्ता बदलली तरी लोकांवर जास्त अत्याचार होत नव्हते. कारण लोकांमध्ये बंधुत्व भाव आहे.

आपले ऋषी-मुनि दूरदर्शी होते. धर्म आणि जातीच्या नावाने संपूर्ण भरत भूमीत राहणार्या लोकांना सांस्कृतिक दृष्ट्या एक सूत्रात बांधणे शक्य नाही हे त्यांना माहित होते. प्रत्येकाला त्याचीच भाषा, जाती आणि पंथ श्रेष्ठ वाटतो. पण देशाच्या मातीप्रती लोकांच्या मनात आत्मीयता उत्पन्न करणे शक्य होते. आपल्या ऋषींनी हेच केले. सकाळी म्हणण्याचे श्लोक म्हणजे प्रात:स्मरणची रचना केली. लोकांच्या मनात देशाची माती आणि तिथे जन्मलेल्या महापुरुषांप्रती आदर भाव जागृत करणे हाच दूरदर्शी ऋषींचा उदेष्य हेतू होता. उदा:

गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती.
नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु.
महेन्द्रो मलय: सह्ये देवतात्मा हिमालय:.
ध्येयो रैवतको विन्ध्यो गिरिश्चारावलिस्तथा.
अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका.
पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका.

रोज सकाळी प्रात:स्मरण केल्याचा परिणाम, लोकांच्या मनावर नकळत होतोच. घरात नळाच्या पाण्याने किंवा गावात विहिरीच्या पाण्याने, स्नान करत असताना आपण देशातील सर्व नद्यांच्या पाण्याने आंघोळ करण्याचा आनंद घेतो. यमुनेच्या पाण्यात स्नान करताना माझ्या मनात कावेरी नदीत स्नान करण्याची इच्छा उत्पन्न होते. सर्व पर्वतांचे आणि नगरांचे दर्शन घेण्यासाठी यात्रेची इच्छा होणारच.

भरतभूमी वर जन्म घेणार्या आपल्या पूर्वजांप्रती आपल्या मनात आदर आणि श्रद्धा निर्माण करण्याचे काम हि आपल्या ऋषींनी केले. भारतभूमीत जन्म घेणारी महान विभूती मग ती स्त्री असो वा पुरुष, त्यांची स्मृती नेहमी आपल्याला राहावी म्हणून त्यांना हि प्रात:स्मरणात स्थान दिले. आयुष्यभर संघर्ष करून आपले उद्दिष्ट साध्य करणार्या आपल्या ५ महान स्त्रियांचे आपण रोज प्रात: स्मरण करतो:

अहल्या द्रोपदी सीता तारा मंदोदरी तथा.
पंचकन्या स्मरेनित्यं महापातक नाशनम्.

तसेच पुण्यश्लोको नलो राजा... ‘अश्वत्थामा बलिर्व्यासो... सारांश अश्यारीतीने पुरातन ऋषींनी आपल्या मनात या देशाच्या माती आणि पूर्वजांच्या प्रती आपल्या मनात आदर आणि भक्तीभाव उत्पन्न केला. आज आपण आपल्या पूर्वजांची पूजा करतोच मन देशाच्या मातीला ‘भारत माँ’ संबोधून तिची हि पूजा करतो.

जेंव्हा देशाचे राजकीय दृष्ट्या शेकडों तुकडे झालेले होते, त्याच वेळी आदी शंकराचार्यांनी देशाच्या चारी भागात चार मठांची स्थापना केली. चार धाम यात्रेची सुरवात बहुधा आदी शंकराचार्यांमुळेच सुरु झाली असेल. शाक्त पंथीयांनी देशात विभिन्न भागात (पाकिस्तान सहित) ५२ शक्तीपीठांची स्थापना केली. शैवांनी देशात विभिन्न प्रांतात १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना केली. जवळपास सर्व हिंदू तीर्थ क्षेत्री जैनांनी सुद्धा आपली मंदिरे उभारली. गुरु गोविंद जर काही काळ आणिक जिवंत राहिले असते तर निश्चित कन्याकुमारीला हि एक गुरुद्वारा बांधला असता. असो. आज हि विभिन्न स्थानांवर भरणार्या कुंभ मेळ्यात देशातील सर्व ठिकाणाहून यात्रेकरू येतात, सर्व पंथीय साधू सन्यासी, यात्री एकत्र बसून चर्चा करतात. अश्यारितीने देशातील सर्वपंथांनी, या मातीप्रती लोकांचे प्रेम, श्रद्धा आणि आदरण निर्माण करण्यात महत्वाचे योगदान दिले आहेत.

देशाला मातृभूमी किंवा आई मानण्याने, देशात राहणार्या लोकांमध्ये बंधुभाव निर्माण होतोच या शिवाय एक राजनीतिक सत्ता स्थापन करण्यात हि यश येते. आपल्या देश्यात शेकडों चक्रवर्ती झाले. एकदा दिल्ली काबीज केली कि संपूर्ण देशाची सत्ता सहज प्राप्त होत होते हे आपण इतिहासात पाहिलेच आहे. आत्ताचेच उदाहरण घ्या. देशाला स्वतंत्रता मिळण्याच्या वेळी देशात ६०० पेक्षा जास्त राजे-महाराजे होते. त्यातील अधिकांश राजा-महाराजांनी स्व:खुशीने आपल्या राज्यांचे भारतात विलीनीकरण केले. तेथील जनतेने हि विरोध केला नाही. कारण विभिन्न राज्यात राहणारी लोक या देशाला ‘भारत माँ’ म्हणून ओळखत होते. भारतमाते प्रती त्यांच्या मनात श्रद्धाभाव होता.

इस्लाम मध्ये देशाला मातृभूमी मानण्याची अवधारणा नाही. पण धर्मावर आधारित बंधुभावाची अवधारणा आहे. त्यांच्या मनात आपल्या गैर इस्लामिक पूर्वजांप्रती सम्मानाची भावननेला हि स्थान नाही. तेथील जनतेला एकत्र ठेवण्याचा कुठलाच दुआ उरलेला नाही. एकाच देशात राहणारे लोक, एकच धर्म मानणारे, पंथ, कबीला, जातीच्या नावावर एका दुसर्याच्या विरुद्ध लढत आहे. कोण स्वकीय आणि कोण परीकीय हे कळण्याची बुद्धी हि त्यांच्यात उरलेली नाही. जे लोक त्यांच्या कबील्याचे किंवा पंथाचे नाही, त्यांची हत्या करण्यात त्यांना काहीच वाईट वाटत नाही आहे. मग लहान मुले असो किंवा स्त्रिया सर्वांचाच वध होतो. लाखोंच्या संख्येने लोकांना आपली जन्मभूमी सोडून शरणार्थी बनावे लागले आहे. ह्या देशांचा संपूर्ण विनाश झालेला आहे. एकच धर्म मानणारे बंधुभावाने राहू शकतात, हि अवधारणा फोल ठरली आहे. गेल्या शतकात दोन विश्व युद्ध इसाई धर्म मानणार्या युरोपियन देशांत झाले. नेपाल हिंदू धर्मावलंबी असला तरी भारताशी त्याचे संबंध चांगले नाही. इस्लामी देशांची परिस्थिती तर आपण पाहताच आहोत..

ज्या देशांत त्यांची पूर्वजांना सम्मान दिल्या जातो, तेथील परिस्थिती वेगळी आहे. इराणी लोक आज हि अग्निपूजक जाल, रुस्तम, सोहराब यांचे तराणे गातात, तिथे शांती आहे. ५००० पेक्षा जास्त द्वीपसमूह आणि भारताप्रमाणे भिन्न-भिन्न जनजातीय असलेल्या इंडोनेशियात लोक एकत्र राहतात. रामायण आणि महाभारतातल्या कथांनी आणि चीनी परंपररेनी तिथल्या लोकांना एकत्र जोडलेले आहे. मिस्त्रच्या लोकांना आपल्या पिरामिड आणि त्यांना बनविणार्या पूर्वजांवर गर्व आहे. नील नदी प्रती त्यांच्या मनात आदर भाव आहे. परंतु आजकाल इस्लामी कट्टरता त्यांच्या मनात त्यांच्या पूर्वजांप्रती अनादर निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचेच परिणाम आज मिस्त्रचे लोक भोगत आहेत.

१९४७ मध्ये भारताच्या ज्या भागात इस्लाम मानणारे लोकांची संख्या जास्त होती, तो भूभाग देशापासून वेगळा झाला त्याचे कारण हेच. पण हे इथेच थांबणार नाही, देशाच्या मातीप्रती आदर नसल्यामुळे पाकिस्तानचे भविष्यात आणखीन हि तुकडे होण्याची संभावना नाकारता येत नाही. आज तिथे अराजकतेचे वातावरण आहे. बलूच, पठाण, पंजाबी, शिया, सुन्नी सर्वच दुसर्याला आपले शत्रू समजतात. जर इस्लामी जगात शांतता प्रस्थापित करायची असेल तर मातृभूमीला आईचे स्थान देण्याची अवधारणा इस्लाम मध्ये समाविष्ट करावी लागेल. अर्थात हे कार्य इस्लामी विद्वानांच करावे लागेल. एकदा देशाला आई म्हंटले कि त्या भूमीत जन्म घेणार्या सर्व पंथीय आणि जातीय लोकांविषयी बंधुत्व भाव आपसूक निर्माण होतो. लोक एका दुसर्याला जाणण्याचा प्रयत्न करतात. देशात शांती प्रतिस्थापित होते.

आज आपल्या देशाला ‘भारत माता’ म्हणण्याचा विरोध काही अतिशहाणे पुरोगामी करीत आहे. एक तर त्यांना इतिहासाचे ज्ञान नाही. होणार तरी कसे? अंग्रेजानी देशावर राज्य करण्यासाठी ‘फूट डालो राज करो’ च्या नीतीचे अवलंबन केले होते. त्या साठी त्यांनी आपल्या पुरातन इतिहासालाच खोटे ठरविले. हेतू आपल्या पूर्वजांप्रती आपली श्रद्धा नष्ट करणे. एकदा लोकांच्या मनात ते वेगवेगळे आहेत, हि भावना रुजविली कि त्यांच्यात दुही माजविण्यात यश येतेच. त्याच साठी देवासुर संग्राम म्हणजे आर्य आणि द्रविडांचे युद्ध. असा इतिहास शिकवणे सुरु केले. आज देशाला स्वत्रंत होऊन हि ७० वर्षे झाली तरी हि आपल्याला पूर्वजांचा खरा इतिहास शिकविला जात नाही. अंग्रेजानी त्यांच्या स्वार्थासाठी तैयार केलेला खोटा इतिहास शिकून तैयार झालेले अतिशहाणे आपल्या भूमीला ‘माता’ कसे मानणार. भारत मातेच्या बर्बादीचे नारे लावणारे त्यांचे हिरो झालेले आहे. या विद्वानांना एवढे हि कळत नाही, एकदा भारत माते विषयी आपली श्रद्धा नष्ट झाली तर या मातीचे शंभर तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. मग लिबिया आणि इराक सारखी आपली गत व्हायला कितीस वेळ लागेल.

हे टाळायचे असेल, तर उद्यापासूनच आपल्या किमान आपल्या देश्याबाबत अर्थात नद्या, पर्वत, तीर्थ, पुरातन ऋषी, राजे महाराजे, बादशाह, स्वतंत्रता सेनानी, राजकीय नेता (चांगले वाईट दोन्ही) बाबत जुजबी माहिती तरी द्या. एवढे केले तरी पुरेसे.

Node read time
6 minutes

ललित लेखनाचा प्रकार

-प्रणव- Thu, 14/04/2016 - 15:06

चांगला लेख. बाकी मते नन्तर सांगतो, खालच्या वाक्याला आधार काय ते कळाले तर बरे होईल

त्याच साठी देवासुर संग्राम म्हणजे आर्य आणि द्रविडांचे युद्ध. असा इतिहास शिकवणे सुरु केले

आज शिकवल्या जाणारा इतिहासामधला (पहिली ते दहावी, किंवा अजून कुठला) नेमका कोणता भाग असे सांगतो, आणि अजून काय काय चुकीचे शिकवले जाते ते सांगावे.

आज देशाला स्वत्रंत होऊन हि ७० वर्षे झाली तरी हि आपल्याला पूर्वजांचा खरा इतिहास शिकविला जात नाही

नेमक्या कितव्या सालचा इतिहास अभिप्रेत आहे? हिंदू, इस्लाम, शीख सगळ्या धर्मातल्या महान लोकांबद्दल शाळेच्या पुस्तकात वाचलेले आठवते. अजून काय बाकी आहे?

अनु राव Thu, 14/04/2016 - 15:12

अहल्या द्रोपदी सीता तारा मंदोदरी

काय ती महान भारतीय संस्कृती.

पहिलीला नवर्‍याने मारझोड करुन दगड बनवले
दुसरीला ५-५ पुरुषांबरोबर संबंध ठेवायला लावले
तिसरीला घरातुन हाकलुन दिले आणि त्या आधी भाजुन मारायचा प्रयन्त केला
चौथीच्या नवर्‍याला मारुन तिला दिराशी लग्न करायला लावले
पाचवीच्या नवर्‍यानी दुसर्‍याची बायको पळवुन आणली आणि तिला आवाज पण करु दिला नाही.

रेड बुल Thu, 14/04/2016 - 16:56

In reply to by अनु राव

स्त्रियांनी पुरुषांना संख्याबळाने मागे टाकले म्हणू आनंदी होणे अपेक्षीत होते...( आत्ताचे पुरुष सोडुन द्या पण सांस्कृतीक पुरुष हा विचार केला तर) फक्त प्रभु श्रीरामच या स्त्रियांच्या समोर उभे राहु शकतात. आणी असे असताना या स्त्री कर्तुत्वाचा उदो उदो करायचा सोडुन तुम्ही त्यांना...

रेड बुल Thu, 14/04/2016 - 17:11

In reply to by ऋषिकेश

म्हणून आपले धन्यवाद.

बाकी अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने कोणी कोनता चित्रपटा कसा काढावा बघावा , कोणत्या संदर्भात रेफरावा याचा अबाधीत हक्क मला मान्य आहे या व्यतीरीक्त जास्त कंस्ट्रक्टीव प्रतिक्रीया आपल्या प्रतिसादाला द्यायला तो तोकडा आहे असे नमुद करतो.

गब्बर सिंग Thu, 14/04/2016 - 22:12

In reply to by अनु राव

तिसरीला घरातुन हाकलुन दिले आणि त्या आधी भाजुन मारायचा प्रयन्त केला

थोडी करेक्शन.

ती गर्भवती असताना तिला अरण्यात सोडून देण्यात आले. व ते काम सुद्धा तिच्या दिराकडे सोपवले गेले. पति ला एवढी सुद्धा हिंमत/डिसेन्सी नव्हती की ज्या स्त्री ने त्याच्यासाठी एवढा त्याग केला तिला सुरक्षित ठिकाणी सोडून यावे. हा तोच पति की ज्याच्यासाठी ती कोणतीही मँडेट नसूनही १४ वर्षे स्वयंस्फूर्तपणे वनवासात गेली. अरण्यात सोडले इथे मुद्दा संपत नाही. अरण्यात सोडले तेव्हा ती गर्भवती होती. म्हंजे जर एखाद्या श्वापदाने तिच्यावर हल्ला केला असता तर ती स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी पळू शकली असती. पण तिचे ते पळणे हे तिच्या गर्भातील मुलासाठी प्राणघातक सुद्धा ठरू शकले असते. आणि याचा दोष तिच्याच माथी मारला गेला असता. व त्या श्वापदाच्या हल्ल्यातून ती वाचली जरी असती तरी पळण्यामुळे पोटातील कॉम्प्लिकेशन्स मुळे तिचा मृत्यू होऊ शकला असता. आणि श्वापदाच्या हल्ल्यास बळी पडली असती तरीही पोटातील अपत्यास ते प्राणघातक ठरले असते. बाय द वे तिला जेव्हा अरण्यात सोडून देण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हा तिला तिचे म्हणणे मांडायची संधी दिली गेली होती का हा प्रश्न आहेच. व मुळात ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केला त्या जनतेस हा प्रश्न उपस्थित करण्यास लागणारी लोकस स्टँडी होती का हा प्रश्न उरतोच.

रेड बुल Fri, 15/04/2016 - 12:02

In reply to by गब्बर सिंग

पुरुषांची चुक मधे आणावी लागते हीच प्रवृत्ती लिंगभेदाची जनक आहे. यातुन स्त्रियांना कोठलाही न्याय, हक्क, आजादी (उर्फ स्वातंत्र्य), चित्ताचे समाधान कधीही मिळु शकणार नाही.

आता हेच बघाना चोळीचा मोह कोणा॑ला आवरला नाही ? स्त्रि ला. बरे नवरा जो एकनीष्ठ आहे शक्तीवान आहे तो मेला असे समजण्याची चुक कोणी केली ? स्त्री ने. ते ही कमी की काय म्हणून दिराला तुझी माझ्यावर वाइट नजर आहे म्हणून तु माझ्या पतिच्या मदतीला जात नाहीस म्हणायचा मंदपणा कोणी दाखवला ? स्त्री नेच. तरीही पुरुशाने तिच्यासाठी आपला जिव धोक्यात घातला हजारो जिव प्राणाला मुकले तेंव्हा आता समाजाप्रती आपले जिवाचे काही कर्तव्य उरते या विचाराला किंमत न देउन स्वार्थीपणाचा उदोउदो करत पुरुषच कसे चुक हे आजही कोण आहे ? स्त्रिया अथवा बेगडी स्त्रिमुक्तीवादीच...

अनु राव Fri, 15/04/2016 - 12:06

In reply to by बॅटमॅन

रामानी लक्षमणाला गुलामा सारखे वागवले ( कुटी बांध, लाकुड आण, झाडलोट कर वगैरे ) आणि स्वता बायको बरोबर सो कॉल्ड कुटीत झोपुन, लक्ष्मणाला मात्र उघड्यावर झोपायला लावले.

त्याचा राग मनात ठेवुन, लक्ष्मणानी रावणाशी संधान बांधुन गेम केली. लक्ष्मणरेषेचे नाटक चांगले वठवले.

मेघना भुस्कुटे Fri, 15/04/2016 - 12:11

In reply to by रेड बुल

हवे कुणाला असले बोअरिंग काव्य आपल्यावर रचले जायला! टोटल सपाट आहे रामायण, आणि रामाची लालेलाल करणारे. काय गरज नाही.

मेघना भुस्कुटे Fri, 15/04/2016 - 13:39

In reply to by बॅटमॅन

आत्मवाचक आदरार्थी बहुवचन हो बॅटेश्वर! तुमच्यासोबत कशाला लिहितेय मी! तुम्ही ते ट्रोजनांच्या सीतेचं बघितलंत तरी लै उपकार होतील.

मेघना भुस्कुटे Fri, 15/04/2016 - 13:49

In reply to by बॅटमॅन

हं. आटपा. तुम्ही पुढे प्रगल्भ वगैरे झाल्यावर तुमची भाषा आपसूक बदलेल आणि त्या पुस्तकात ’ती’ मज्ज्या राहणार नाही, असा सावधगिरीचा इशारा देऊन निमूट खाली बसत आहे.

बॅटमॅन Fri, 15/04/2016 - 13:51

In reply to by मेघना भुस्कुटे

बरोबर, त्यामुळे लौकरच हाती घेऊ. पण सध्या इतर कामे खूप जास्तच अर्जंट आहेत. त्यामुळे ट्रोजनांचा नंबर लागेना.

रेड बुल Fri, 15/04/2016 - 12:21

In reply to by मेघना भुस्कुटे

आम्ही स्वतःची लालेलाल करण्याच्या गरजेबाबत बोलत आहोत. पुढे तुमची इछ्चा.

जे लोक रामायणावर टीका करतात त्यांना रामाबाबत आत्मीयता नाही सितेबाबत तर अजिबात नाही तरीही ते तसे पुन्हा पुन्हा करतात कारण स्वतःची लालेला करायची गरज. त्यांच्या वैयक्तीक बोअरिंग टोटल सपाट आयुश्यावर कुत्रे देखील कान हलवणार नाही मग माणसे चर्चा करणे तर दुरच म्हणून उठ सुट रामायण, महाभारत गाठयचा काय तो उद्योग सोपा असतो.

मेघना भुस्कुटे Fri, 15/04/2016 - 13:13

In reply to by रेड बुल

नवीबाजूमोडॉन... कुत्रे आयुष्यावर कान हलवून जाते म्हणजे नक्की काय घडते आणि तसे होण्याची गरज कुणालाही का पडावी? ...नवीबाजूमोडॉफ

आडकित्ता Sun, 17/04/2016 - 08:15

In reply to by -प्रणव-

Auto-rubrification.

असाच Auto-Parrotism अर्थात स्वतःचा पोपट करणे असाही एक शब्दप्रयोग आहे.

हे दोन्ही शब्द मी स्वतः बनविलेले असून, सर्व हक्क स्वाधीन आहेत.

-प्रणव- Sun, 17/04/2016 - 09:12

In reply to by आडकित्ता

मला काही कळलं नाही!

भाषांतर करायला एवढी अवघड टर्म असेल तर ही मराठी भाषेची जगाला देणगी समजायला हवी.

अनु राव Fri, 15/04/2016 - 11:45

In reply to by गब्बर सिंग

अवांतर प्रश्न आहे पण गब्बर ला उत्तर माहीती असेल.

१४ वर्षे राम-सीते नी फँमिली प्लॅनिंग कसे केले असेल?

हा प्रश्न मनोबा ला का पडला नाही हा पण गहन प्रश्न आहे

गब्बर सिंग Fri, 15/04/2016 - 13:46

In reply to by अनु राव

माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः
सर्वस्वम मे रामचंद्रो दयालु: नान्यम जाने नैव जाने न जाने

अवांतर मोड ऑन

मी रामावर टीका केलेली आहे. पण याचा अर्थ अयोध्येतील "त्या" जागेवर म्लेंच्छांचा अधिकार मान्य केलेला नाही. त्या संपूर्ण जागेची मालकी प्रसंगी बलाचा वापर करून सुद्धा वापस मिळवणे गरजेचे आहे. साधे प्रॉपर्टी राईट्स चे तत्व या सगळ्याचा आधार आहे.

नान्यम जाने नैव जाने न जाने - म्हंजे मला इतर काहीही जाणून घ्यायची गरज वाटत नाही.

अवांतर मोड ऑफ्फ

बॅटमॅन Fri, 15/04/2016 - 13:47

In reply to by गब्बर सिंग

मी रामावर टीका केलेली आहे. पण याचा अर्थ अयोध्येतील "त्या" जागेवर म्लेंच्छांचा अधिकार मान्य केलेला नाही. त्या संपूर्ण जागेची मालकी प्रसंगी बलाचा वापर करून सुद्धा वापस मिळवणे गरजेचे आहे. साधे प्रॉपर्टी राईट्स चे तत्व या सगळ्याचा आधार आहे.

सहमत!!!!

नितिन थत्ते Thu, 14/04/2016 - 22:32

In reply to by अनु राव

>>त्या आधी भाजुन मारायचा प्रयन्त केला

राम दशरथ देव यांना ४९८ (अ) कलम लागू होऊ शकले असते.

For the purpose of this section, “cruelty” means—
(a) any wilful conduct which is of such a nature as is likely to drive the woman to commit suicide or to cause grave injury or danger to life, limb or health (whether mental or physical) of the woman; or

गब्बर सिंग Thu, 14/04/2016 - 22:43

In reply to by नितिन थत्ते

श्रीराम दशरथ देव रघु.

किंवा श्रीराम दशरथ इक्ष्वाकू

( संदर्भ : राम ज्या कुलात जन्मला त्याचे नाव रघु कुल किंवा इक्ष्वाकू कुल. )

तिरशिंगराव Fri, 15/04/2016 - 14:52

In reply to by अनु राव

पाचवीच्या नवर्‍यानी दुसर्‍याची बायको पळवुन आणली आणि तिला आवाज पण करु दिला नाही.

अहो, ती खूषच झाली असेल. ती ग्राम्य म्हण आहेना, " झवतं गाढव दूर गेलं" तर बरंच नाही का ?

-प्रणव- Thu, 14/04/2016 - 15:15

बादवे, शाळेत प्रतिज्ञा म्हणतात तेवढे पुरेसे नाही का

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत

यातच सगळे आले! भारत माता का पिता प्रश्नच नाही :)

का प्रतिज्ञेतले पहिले वाक्य भारत माझी माता आहे असे करावे म्हणता?

-प्रणव- Thu, 14/04/2016 - 15:25

एकदा का देशाला आपण माता /पिता मानले कि देशात बंधुत्वाचे वातावरण आपसूक निर्मित होते.

एवढे सोपे असले असते तर तसा कायदाच केला असता, असे वाटते.

काहीही माना तुम्ही, शेवटी कृती महत्वाची! स्त्रीला देवी मानतातच ना, मग त्यांच्यावर अत्याचार कसे होतात?

विवेक पटाईत Thu, 14/04/2016 - 17:11

In reply to by -प्रणव-

मला वाटत लेखाचा विषय सोडून प्रतीसात देणे हि प्रवृत्ती जास्त आहे. हा लेख केवळ भारताचा संदर्भात लिहिलेला नाही. सर्व देशांच्या संदर्भांत आहे.

-प्रणव- Thu, 14/04/2016 - 18:53

In reply to by विवेक पटाईत

माझं म्हणणं एवढंच आहे की बंधुभावाच्या भावनेसाठी "भारतमाता" या प्रतीकाची गरज नाही. जे की आपल्या शाळेतल्या प्रतिज्ञेतून ठळक दिसते.

**भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.**

सो सिम्पल!

राजेश घासकडवी Thu, 14/04/2016 - 16:41

अमेरिकेत काही देशाला मॉं किंवा बाप म्हणत नाहीत. ते म्हणतात लॅंड ऑफ द फ्री अॅंड द होम ऑफ द ब्रेव्ह. आणि असं असूनही गेली अडीचशे वर्षं अमेरिकेतली जनता एकमेकांशी लढाया न करता टिकून आहे चांगली. चांगली सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे, सभ्य आहे, श्रीमंत आहे... काय बिघडलं तिचं मॉं न म्हटल्यामुळे?

विवेक पटाईत Thu, 14/04/2016 - 17:09

In reply to by राजेश घासकडवी

अमेरिका अजून नवीन देश आहे. अजूनही बाहेरून येणारे लोक मोठ्या प्रज्मानावर तिथे वसत आहेत. त्यांची निष्ठा त्यांच्या देशांसोबत आहेतच. जसे तिसर्या पिढीत हि माझी निष्ठा अजूनही महाराष्ट्र किंवा मराठी बाबत आहे. पुढे आणखीन १०० एक वर्षांनतर तिथे हि गरज भासेल. वैदिक काळात मातृभूमीची अवधारणा नव्हती. मध्ययुगात या अवधारणेची गरज भासली. असो.

अनुप ढेरे Thu, 14/04/2016 - 17:11

In reply to by राजेश घासकडवी

आणि असं असूनही गेली अडीचशे वर्षं अमेरिकेतली जनता एकमेकांशी लढाया न करता टिकून आहे चांगली.

? सिव्हिल वॉर वगैरे वगैरे किधर?

राजेश घासकडवी Thu, 14/04/2016 - 18:09

In reply to by अनुप ढेरे

म्हणूनच अडीचशे वर्षं म्हटलं ना भाऊ. (१८६५ + २५० = २०१५)

मुद्दा असा आहे की आत्ताच्या घडीला तिथे कोणीही मॉं-बाप म्हणत नाहीत, तरी देश ठीकठाक आहे. इतर अनेक देशांची उदाहरणं देता येतील.

थोडक्यात 'मॉं म्हटल्याने फायदा होतो' असं लेखकाचं म्हणणं आहे. मी 'मॉं न म्हटल्याने देशाचं शाट्टा काही बिघडत नाही' असा काउंटरपॉइंट मांडतो आहे. अशा देशांची इतकी उदाहरणं आहेत, की खरं तर लेखकाने आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ 'मॉं म्हटल्याने फायदा झालेले देश' अशी एक यादी द्यायला हवी.

अनु राव Thu, 14/04/2016 - 18:11

In reply to by राजेश घासकडवी

गुर्जी - तुम्ही भारतीय वंशाचे आहात ना, मग तुम्ही तरी भारतीय महान स्ंकृतीला अनुसरुन अमेरीका मॉ म्हणायला लागा. कदाचित ट्रेंड वाढेल.

गब्बर सिंग Thu, 14/04/2016 - 22:17

In reply to by रेड बुल

इन दॅट केस फर्स्ट मॉम वुड बी स्टील इंड्या.

लेकिन यशोदा मा का यश देवकी मां के यश से अधिक है. __________ अर्जुन सिंग वल्द भीमसिंग वल्द दशरथसिंग.

अनु राव Thu, 14/04/2016 - 18:13

In reply to by राजेश घासकडवी

पडलास बॅट्या आणि ढेरेशास्त्री तोंडावर. गुर्जींना आडवे लावायच्या आधी वजाबाकी तरी करुन बघायचीत.

अनुप ढेरे Thu, 14/04/2016 - 18:13

In reply to by राजेश घासकडवी

म्हणूनच अडीचशे वर्षं म्हटलं ना भाऊ. (१८६५ + २५० = २०१५)

गणित चूक आहे.

न्याशन्यालिझम रुजवायला मॉ म्हटलच पाहिजे या मताचा मी देखील नाही.

अनु राव Thu, 14/04/2016 - 18:16

In reply to by अनुप ढेरे

गुर्जींनी त्यांचा पॉइंट प्रुव्ह करायला नेहमीप्रमाणे आकड्यांची हातचलाखी केलेली दिसतीय. पण ढेरेशास्त्री फसले नाहीत, मी फसले.

अनुप ढेरे Thu, 14/04/2016 - 18:19

In reply to by अनुप ढेरे

आईच का बाबा का नाही? सावरकर पितृभू का काहीतरी म्हणायचे ते का नाही? या तांत्रिक प्रश्नांची वासलात कशी लावणार? याशिवाय पर्सॉनिफिकेशन केल तरच एकीची भावना येते असं थोडीचं असतं ?

रेड बुल Thu, 14/04/2016 - 19:03

In reply to by अनु राव

कॉज इन गॉड मेनी बीलीवस. आणी दोन सवतीमधे भांडणे होउ शकतात या न्यायाने इतर देशांशी युध्द करायलाही आपण लेकरेही मोकळे, कारण भावांभावांमधे भांडणात कर्मयोगही पाळता येइल ना. ;)

अनुप ढेरे Thu, 14/04/2016 - 20:20

In reply to by अनु राव

मुख्य म्हणजे आई म्हणले की बाबा कोण हा प्रश्न उभा रहातो,

व्हर्जिन मेरी कहानी सुना नै क्या तुमने अनुजी? वैसेइच भारत माता अकेली हो सकती है.

रेड बुल Fri, 15/04/2016 - 15:25

In reply to by अनुप ढेरे

आईच का बाबा का नाही?

कोणतीही गोष्ट आपल्या बापाची आहे, माझा बाप अमुक तमुक आहे अशी विधाने आली की लोकांना उगाचच त्यातुन गुर्मी, माज, गर्वीष्ठपणाचा वास येतो. म्हणून स्त्रिलींगी उच्चार करावे लागतात इतकेच. पण याची स्वार्थी बेगडी स्त्रिमुक्तीवाद्याना कदर नाही अन पुरुषांना त्यांच्या बौध्दीक गुलामगीरीची जाणीव...

राजेश घासकडवी Thu, 14/04/2016 - 18:20

In reply to by अनुप ढेरे

स्वारी स्वारी, दीडशे वर्षं म्हणायचं होतं मला. माझं गणित तसं लहानपणापासून कच्चंच आहे.

मिहिर Thu, 14/04/2016 - 18:54

In reply to by राजेश घासकडवी

जगातली युद्धे कमी होत आहेत हे म्हणताना जसे सत्तर वर्षे हा आकडा लक्षात ठेवायचा (महायुद्धे बरोबर गाळली जायला हवीत!), तसे अमेरिकेबद्दल बोलताना दीडशे वर्षे वापरायचे. आले लक्षात आता. ;)

ऋषिकेश Thu, 14/04/2016 - 16:42

कोणी आपल्या मातृभुमीला काय म्हणावे याच्यात मला फारसा इंटरेस्ट नाही.
--
मात्र भाषिक दृष्टिकोनातून मातृभुमीची फोड भुमी आई अशीये की आपल्या आईची (जन्म/कर्म)भूमी अशी आहे? (माझ्या मते दुसर अर्थ आहे, पण हल्ली या चर्चा सुरू झाल्यावर माझा समज चुकीना नै ना ही खात्री करून घेतोय)

बाळ सप्रे Thu, 14/04/2016 - 17:11

लेखातील एक एक वाक्य सोनेरी अक्षरात लिहून ठेवण्यासारखं आहे !! (सोनेरी पेन नाहीये म्हणून.. नायतर एव्हाना लिहूनच टाकलं असतं..)

बॅटमॅन Thu, 14/04/2016 - 18:22

In reply to by राही

झरणी!!!!!!!!

हा शब्द वाचून जमाना झाला. हा शब्द वापरणारी पिढी बहुधा स्वातंत्र्यानंतर निजधामास गेली असावी.

राही Thu, 14/04/2016 - 18:01

आम्हांला जेव्हा हिंदीच्या तासाला माँ हा शब्द प्रथम वाचावा लागला तेव्हा आम्ही तो मॉ (भॉ प्रमाणे) ओठांचा ऑकार करून अनुस्वारयुक्त म्हणण्याची कसरत करत असूं.

मिहिर Thu, 14/04/2016 - 18:56

In reply to by राही

ऊँचा म्हणताना अजून जास्त कसरत करावी लागे!

राही Thu, 14/04/2016 - 19:14

In reply to by मिहिर

अगदी अगदी.
सरकारी पुस्तके सोडून इतर हिंदी पुस्तके, विशेषतः जुन्या प्रती वाचताना जागोजागी अडखळायला होते. झाँसी की रानीच्या ऐवजी भाँसी की रानी वगैरे. त्यांचा 'अ'सुद्धा वेगळा असतो. आता म्हणा देवनागरीचे प्रमाणीकरण झालेय.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 14/04/2016 - 19:39

In reply to by राही

झारखंडमधल्या रेल्वे स्टेशनांवर जुने अ आणि जुने झ बघितले होते, २०११ सालात.

राही Fri, 15/04/2016 - 22:26

In reply to by नितिन थत्ते

आणि भुक गया आसमाँ, भील के किनारे, भुमरू वगैरे. प्राचीन काळातल्या सिनेमांच्या गाण्यांची चोपडी घरात होती. नडियादवाला किंवा असाच कोणी वाला ती काढायचा. चार पानी आणि सर्व गाणी. तर त्यात एक भनक भनक पायल बाजे होतं आणि त्या नावाची कित्येक दिवस गंमत वाटत होती.

'न'वी बाजू Fri, 15/04/2016 - 18:11

In reply to by मिहिर

किंवा 'हूँ'.

'न'वी बाजू Fri, 15/04/2016 - 18:15

In reply to by राही

आम्हांला जेव्हा हिंदीच्या तासाला माँ हा शब्द प्रथम वाचावा लागला तेव्हा आम्ही तो मॉ (भॉ प्रमाणे) ओठांचा ऑकार करून अनुस्वारयुक्त म्हणण्याची कसरत करत असूं.

अमेरिकन 'मॉम'शी हा उच्चार बराच मिळताजुळता आहे, ही बाब रोचक आहे. यावरून एखाद्या पुरातन भारत-अमरीका सांस्कृतिक देवाणघेवाणीकडे निर्देश होत असावा काय?

बॅटमॅन Fri, 15/04/2016 - 18:24

In reply to by 'न'वी बाजू

आता अमेरिका म्हणजे कोकणातील आंब्यांचे प्राचीन मार्केट (आम्रविका) होते हा एक अतिमहत्त्वाचा मुद्दा वगळल्यास एक पृच्छा म्हणजे मॉम ऐवजी आम्रविकन लोक्स 'माऽम्' असा उच्चार करत नाहीत काय? त्यात 'ऑ' नसतो असे आमचे पिच्चर-सीर्यली आदि पाहून मिळवलेले तोकडे ज्ञान सांगते.

राही Fri, 15/04/2016 - 22:35

In reply to by बॅटमॅन

मूळ माँ चा उच्चारही मॉ नाही. तो अमेरिकी माs(म्) सारखा आहे. अमेरिकेत तरी ऑ आपल्यासारखा व्याकरणशुद्ध कुठे उच्चारतात? ओठ न हलवता घशातल्या घशात किंवा टाळ्यातल्या टाळ्यात ऑ उच्चारण्याची त्यांची सवय. आपल्यासारखे तरखडकरी शुद्ध इंग्लिश ते थोडेच बोलतात?
म्हणजे 'न'वी बाजू अमेरिकेची बाजू बरोबर मांडताहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 14/04/2016 - 18:57

देशाला माता म्हणण्याबद्दल फेसबुकवर चर्चा सुरू असते. त्यात एक मुद्दा मजेशीर वाटला होता; आईवरून शिव्या देता येतात (प्रत्यक्ष तसे वागणारे किती असतील याबद्दल शंका आहे). पण 'आख्खे कंट्री का वाट लावायला' बरेच लोक तत्पर असतात असं ऐकून आहे.

पोटच्या पोरांचा मृत्यु आईवडलांना बघावा लागतो तेव्हा लोक अशा अर्थाचं म्हणतात, आपल्या आई-वडलांच्या पार्थिवाला खांदा द्यायला लागेल हे आपण कुठेतरी गृहित धरलेलं असतं... तसं देशाला खांदा कसा द्यायचा, हे समजत नाही. म्हणून मला भारतमाता वगैरे काही म्हणवत नाही.

-प्रणव- Thu, 14/04/2016 - 19:06

अवांतर: साउथ इंडियन लोकांमधे "भारतमाता माता की जय" या घोषणेच्या बरोबरीची एखादी घोषणा आहे का?

का भारतमाता फक्त नॉर्थ इंडियन आहे?

ऋषिकेश Thu, 14/04/2016 - 19:29

In reply to by -प्रणव-

नुसती नॉर्थैंडीयन नै हो, तीचं चित्र बरंच बोलकं आहे. आता समजा ही भारतमाता आहे (यातही सिंह वगैरेऐवजी दुसराच सिंबॉल) असं म्हटलं असतं आणि आता हीचा जयजयकार करा म्हटलं तसतं तर असे लेख आले असते काय?

दिग्विजय भोसले Fri, 15/04/2016 - 15:39

In reply to by ऋषिकेश

आता समजा ही भारतमाता आहे (यातही सिंह वगैरेऐवजी दुसराच सिंबॉल) असं म्हटलं असतं आणि आता हीचा जयजयकार करा म्हटलं तसतं तर असे लेख आले असते काय?

ऋषीकेश,
तुम्ही दिलेली इमेज पाहून मज्जा आली,समजा तिला भारतमाता म्हणा म्हटलं असतं तर कोणी छाती फुगवून म्हटलं असतं?? असा सवाल आहेच. दुर्दैवाने फार कमी लोक बोलतील.
इथे या मुद्याला राष्ट्रवादाची किनार कमी अन् धर्मवादाची किनार जास्त आहे.

राही Thu, 14/04/2016 - 19:31

In reply to by -प्रणव-

जयललितांचे संबोधन 'पुरात्चि तलैवि' आहे. अर्थात क्रांतिकारी नेता.
आपण अलीकडे 'हृदयसम्राट' वगैरे म्हणतो.
या निमित्ताने सगळ्या भारतीय भाषांचा धांडोळा घेतला पाहिजे.
गुजरातीत 'मादर-वतन' हा फारसी-गुजरी शब्द ऐकल्याचे आठवतेय. 'तैयार थई जजो' या देशभक्तिपर गाण्यात. म्हणजे आपल्या 'जिंकू किंवा मरू' सारखे गाणे.

विषारी वडापाव Thu, 14/04/2016 - 20:04

मी भारत देशाला माझा मोठा भाऊ मानतो . एक तर रक्ताचं नात पण राहत आणि एकदा 'मां ' म्हंटल की जे emotional blackmailing सुरु होत त्याची तीव्रता पण कमी होते . कस ?

ब्रह्मास्त्र Fri, 15/04/2016 - 14:21

सनातनी लेखकाचा पुन्हा एक सनातनी लेख.
भारताला माता म्हणत सरळसरळ देवीच करून टाकलेलं आहे,डोक्यावर किरीट काय?हातात त्रिशूल काय?चार हात काय?
आजपासून खालील गोष्टी करू नयेत:
1) अंतराळी चालावे,कारण जमिनीवर पाय ठेवल्याने आईच्या अंगावरून चालल्यासारखे होईल.
2) आईच्या अंगावर फटाके फोडू नयेत.
3) शौच,मूत्रविसर्जन,थुंकणे, इ. अश्लाघ्य गोष्टी आईच्या अंगावर करू नयेत.
4) मोठमोठ्या बिल्डिंग्स बांधून आईच्या अंगावर ओझे वाढवू नये.
5) खोदकाम वगैरे करू नये कारण आईवर प्रहार केल्यासारखे होईल.
6) आईच्या अंगावरून भरधाव गाड्या चालवू नयेत.
अजून बर्याच सांगता येतील.
=))

स्वधर्म Fri, 15/04/2016 - 14:57

पटाईत यांचा विचार पुनुरूज्जीवनवादी अाहे, असे वाटू लागले अाहे. मनुस्मृतिवरचे प्रतिसाद वाचून जरा तरी परिवर्तनवादी होईल, ही अंधुक अाशा होती...

रेड बुल Fri, 15/04/2016 - 15:02

यहाँ-वहां सारा जहाँ देख लिया है
कहीं भी तेरे जैसा कोई नहीं है
अस्सी नहीं, सौ दिन दुनिया घूमा है
नहीं कहीं तेरे जैसा कोई नहीं
मैं गया जहाँ भी
बस तेरी याद थी
जो मेरे साथ थी
मुझको तड़पाती, रुलाती
सबसे प्यारी तेरी सूरत
प्यार है बस तेरा, प्यार ही
माँ तुझे सलाम
वन्दे मातरम...!

दिग्विजय भोसले Fri, 15/04/2016 - 15:33

बरं!! असा झोल आहे तर सगळा!
म्हणजे भारताचं जेंडर फिमेल आहे म्हणायचं??
भारत ऐवजी "भारती" असं नामकरण होणं गरजेचं आहे.म्हणजे भारती हे नाम स्त्रिलिंगी आहे त्यामुळे जुळून जाईल.