Skip to main content

तुम्ही कोण आहात?

विशेषांक प्रकार

फारएण्ड Wed, 11/11/2015 - 06:34

धमाल आहे हे. मजा आली :)

नंदन Wed, 11/11/2015 - 06:46

शि.सा.न.वि.वि.

चिमणराव Wed, 11/11/2015 - 07:21

फारच आवडली प्रश्नावली आणि बुमरँग.
उदा• एकाचे घरी आलेल्या सेल्समनशी (तो नको म्हणत असतानाही) ४० मिनिटं बोलायचा लिमका रेकॉर्ड तुमच्याच नावावर आहे, माहितीये मला.

फारच मजेदार.
अस्वल गुदगुल्या करून हसवून मारते याचा अनुभव घेतला.

Nile Wed, 11/11/2015 - 07:50

धमाल! ब्येष्ट! चारपाचवेळा उत्तरं उलटीपालटीकरून माझं बहूआयामी व्यक्तिमत्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला, अजून बरीच काँबिनेशन्स बाकी आहेत!

अतिशहाणा Wed, 11/11/2015 - 08:40

च्यायला ही व्यक्तिमत्व चाचणी आधी का मिळाली नाही!

मनोज२८ Wed, 11/11/2015 - 11:41

प्रश्न आठवा पर्याय तिसरा - खिक !!!

तिरशिंगराव Wed, 11/11/2015 - 13:43

समजा, तुमच्या समोर एक बाई आलेली आहे. तर तुम्ही पुढीलपैकी काय कराल?

१. गुदगुल्या कराल.
२. घट्ट मिठी माराल.
३. खाऊन टाकाल.
४. तिचा खेळ आणि छ्ळ कराल.
५. तिच्याकडून नाकांत वेसण घालून घ्याल.

टीपः वरच्या कुठल्यातरी प्रश्नांत तुम्ही मला आगाऊ म्हणालात. म्हणून हा रिटर्न प्रश्न!

राजेश घासकडवी Wed, 11/11/2015 - 19:06

आयुष्यात पहिल्यांदाच असा माजोरडा इंटरॅक्टिव्ह सर्व्हे बघितला! अस्वलाला एक कंबरेतून वाकून कुर्निसात.

अमुक Wed, 11/11/2015 - 20:24

>>तिथे अल्लाऊद्दीनच्या अंगठीतला राक्षस प्रकट झाला तर तुम्ही त्याच्याकडे काय मागाल?
.....अस्वलासाठी अस्वाहिली भाषेतले 'अरेबिअन नाईट्स' हे पुस्तक मागू. :P

अस्वल Thu, 12/11/2015 - 00:08

@तिरशिंगराव - मूहतोड जवाब :ड
बाकी सगळ्यांना धन्यवाद, आशा आहे की तुम्हाला तुमच्याबद्दल चिकार माहिती मिळाली असेल!

ह्या प्रश्नावलीमागचा थोडा संदर्भ --
एखाद्या AI (Artificial intelligence) ने नेहेमीच माणसांच्या मदतीला तत्पर असावं, त्यांच्यासाठी अचूक आणि परिपूर्ण वगैरे उत्तरं द्यावीत असा आपला समज असतो. पण अशा एखाद्या फारच पुढारलेल्या AIला कधीतरी कंटाळा येऊ शकतो, किंवा त्याचा मूड खराब असू शकतो, किंवा त्याला टाईमपास करावासा वाटू शकतो.
अशा वेळी जर ह्या मूडी AIला तुम्ही काहीबाही प्रश्न विचारले, तर तो तुम्हाला सोडणार नाही- नक्कीच धोपटेल. त्याचीच ही एक छोटी झलक!

फारएण्ड Thu, 12/11/2015 - 03:44

In reply to by अस्वल

ते सगळे ठीक आहे, पण आर्टिफिशियल इण्टेलिजन्स (आधी ए आय ची लिहीले होते. पण वाचताना शिवी वाटते) ची पहिलीच व्हर्जन पुणेरी उत्तरे देण्याइतकी प्रगल्भ निघावी? :)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 13/11/2015 - 03:21

In reply to by फारएण्ड

पुणेरी लोक आयटी सोडून काही नवीन करायला लागले तर त्यांना प्रोत्साहन द्यायचं सोडून ही काय खेकडेगिरी करताय?

राजेश घासकडवी Fri, 13/11/2015 - 04:38

In reply to by फारएण्ड

अहो, ट्यूरिंग टेस्टचा तो निकषच आहे. त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जर एखादा कॉंप्युटर पुणेकरासारखा बोलताना दिसला तर तो हमखास इंटेलिजेंट म्हणायला हरकत नाही.

अतिशहाणा Thu, 12/11/2015 - 00:44

प्रश्न १० चा दुसरा पर्याय आणि १३ चा तिसरा पर्याय यांची उत्तरं दिसली नाहीत.

मिहिर Thu, 12/11/2015 - 03:53

अस्वल चक्रम आहे.

बिपिन कार्यकर्ते Thu, 12/11/2015 - 12:56

=)))))))

अंतराआनंद Thu, 12/11/2015 - 14:51

कसली भन्नाट प्रश्नावली आहे. हसतेय केव्हापासून. बाकी माझ्या चित्राबद्दलचं अनुमान बरोबरे. मी एलिमेंटरी देण्यासाठी हात वर केला तेव्हा बाईंनी ज्या हताश नजरेनं माझ्याकडे पाहिलं होतं ते आठवलं.
आणि "होणार सून.. " बघण्यात माझं आयुष्य जाणार या भविष्याबद्द्ल णिशेध.

चिमणराव Thu, 12/11/2015 - 16:01

अगोदर लिहून दिलेले एकच उत्तर आले.मला वाटले यातही साताठ साठवलेली असतील आणि कोणतेतरी अचानक फेकले जाईल.
असो.मला खरंतर या अशा कौल/इनपुटचा एचटिएमएल( 4/5?) कोड हवाय.कोणते टॅग,एलमेंट वापरले इतकं सांगितलं तरी पुरे.

अस्वल Thu, 12/11/2015 - 23:38

In reply to by चिमणराव

@अचरट - तुम्ही किती "स्कोर" करता त्यावर रिझल्ट अवलंबून आहे.. निरनिराळी उत्तरं दिलीत पण जर एकूण दर वेळी ६०%च मार्क मिळवलेत तर तुमची डिग्री कशी बदलणार? :)
कोड ह्या पानावरच आहे.. ब्राऊसरमधे उघडून F12/view source केलंत तर दिसेलच.

रुची Fri, 13/11/2015 - 22:28

चक्रम अस्वलाच्या कौलातून स्वतःचे मूल्यमापन केल्यावर आपण स्वतःला वाटतो त्यापेक्षा फारच निरागस (किंवा काही लोक त्याला होपलेसही म्हणतात) आहोत याचा साक्षात्कार झाला. एखादीतरी हिंट मदत करणारी असू शकेल याबद्दलचा विश्वास अगदी शेवटपर्यंत कायम कसा राहिला याबद्दल स्वतःचेच आश्चर्य वाटले. असो, हे अस्वल थोर आहे.

बरं कौलात दिवाळीनिमित्त एक प्रश्न अ‍ॅड करा की,

प्रश्न: तुम्ही चिवडा कसा खाता?
१) आख्खा डबा समोर घेऊन त्यातले खोबेरे, दाणे, काजू निवडून खातो.
२) प्रत्येक घासाबरोबर खोबेरे, दाणे, काजू, बेदाणे येतील याची खात्री करत खातो.
३) चिवड्यात दही घालून त्याचा लगदास्वरूप काला करून तो स्थितप्रज्ञपणे गिळतो.
४) चिवडा ही काय खायची गोष्ट आहे?

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 14/11/2015 - 01:01

In reply to by आदूबाळ

प्रश्न अपूर्ण आहे.

प्रश्नाचं उत्तर देण्याआधीचा हिंट - चिवडा फार कठीण, त्यापेक्षा कडक बुंदीचे लाडू खा.

प्रत्येक उत्तरासोबत देण्याचा सल्ला -
>> १) आख्खा डबा समोर घेऊन त्यातले खोबेरे, दाणे, काजू निवडून खातो.
आज काजू, खोबरे, दाणे खाताय. उद्या वाढलेल्या आकाराचं काय करणार आहात?

>> २) प्रत्येक घासाबरोबर खोबेरे, दाणे, काजू, बेदाणे येतील याची खात्री करत खातो.
चिवडा खाताना चिवड्याकडे बघता? मग पुस्तकं आणि दिवाळी अंक कोण वाचणार?

>>३) चिवड्यात दही घालून त्याचा लगदास्वरूप काला करून तो स्थितप्रज्ञपणे गिळतो.
वाटलंच मला. मारी बिस्किट आवडतं ना तुम्हाला?

>>४) चिवडा ही काय खायची गोष्ट आहे?
चिवड्याची बदनामी थांबवा.

उत्तरानंतरचा हिंट - चिवडे खायचे तर चिवडे खा, प्रश्नोत्तरं-प्रश्नोत्तरं काय खेळताय?

नंदन Sat, 14/11/2015 - 04:52

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आज काजू, खोबरे, दाणे खाताय. उद्या वाढलेल्या आकाराचं काय करणार आहात?

+१

किंवा: 'चिवडा' हे नाम आहे. आज्ञार्थी क्रियापद नव्हे. मो.रा.वाळंबे वाचा दिवाळी अंकाऐवजी!

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 15/11/2015 - 03:11

In reply to by मिहिर

अशा प्रकारे मूर्तभंजन करणाऱ्या मेघनाच्या डोक्यावर बुत्तोडा हाणा.

चिमणराव Sat, 14/11/2015 - 06:22

तुला रे /गं काय हवं?
मला चिवडा!
अधोरेखीत शब्दाचे व्याकरण चालवा.
(सूचक :मोरावळा खाऊन उत्तर दिले तरी चालेल.)

ऋषिकेश Sun, 15/11/2015 - 11:09

ठ्ठो! जरा वेळ काढून रेंगाळायचं ठरवलेलं
चीज झालं :)

दिवाळीचा सर्वात भारी आपटीबार!