तुम्ही कोण आहात?
विशेषांक प्रकार
अस्वलाला प्रश्न
समजा, तुमच्या समोर एक बाई आलेली आहे. तर तुम्ही पुढीलपैकी काय कराल?
१. गुदगुल्या कराल.
२. घट्ट मिठी माराल.
३. खाऊन टाकाल.
४. तिचा खेळ आणि छ्ळ कराल.
५. तिच्याकडून नाकांत वेसण घालून घ्याल.
टीपः वरच्या कुठल्यातरी प्रश्नांत तुम्ही मला आगाऊ म्हणालात. म्हणून हा रिटर्न प्रश्न!
@तिरशिंगराव - मूहतोड जवाब
@तिरशिंगराव - मूहतोड जवाब :ड
बाकी सगळ्यांना धन्यवाद, आशा आहे की तुम्हाला तुमच्याबद्दल चिकार माहिती मिळाली असेल!
ह्या प्रश्नावलीमागचा थोडा संदर्भ --
एखाद्या AI (Artificial intelligence) ने नेहेमीच माणसांच्या मदतीला तत्पर असावं, त्यांच्यासाठी अचूक आणि परिपूर्ण वगैरे उत्तरं द्यावीत असा आपला समज असतो. पण अशा एखाद्या फारच पुढारलेल्या AIला कधीतरी कंटाळा येऊ शकतो, किंवा त्याचा मूड खराब असू शकतो, किंवा त्याला टाईमपास करावासा वाटू शकतो.
अशा वेळी जर ह्या मूडी AIला तुम्ही काहीबाही प्रश्न विचारले, तर तो तुम्हाला सोडणार नाही- नक्कीच धोपटेल. त्याचीच ही एक छोटी झलक!
चक्रम अस्वल!
चक्रम अस्वलाच्या कौलातून स्वतःचे मूल्यमापन केल्यावर आपण स्वतःला वाटतो त्यापेक्षा फारच निरागस (किंवा काही लोक त्याला होपलेसही म्हणतात) आहोत याचा साक्षात्कार झाला. एखादीतरी हिंट मदत करणारी असू शकेल याबद्दलचा विश्वास अगदी शेवटपर्यंत कायम कसा राहिला याबद्दल स्वतःचेच आश्चर्य वाटले. असो, हे अस्वल थोर आहे.
बरं कौलात दिवाळीनिमित्त एक प्रश्न अॅड करा की,
प्रश्न: तुम्ही चिवडा कसा खाता?
१) आख्खा डबा समोर घेऊन त्यातले खोबेरे, दाणे, काजू निवडून खातो.
२) प्रत्येक घासाबरोबर खोबेरे, दाणे, काजू, बेदाणे येतील याची खात्री करत खातो.
३) चिवड्यात दही घालून त्याचा लगदास्वरूप काला करून तो स्थितप्रज्ञपणे गिळतो.
४) चिवडा ही काय खायची गोष्ट आहे?
प्रश्न अपूर्ण आहे. प्रश्नाचं
प्रश्न अपूर्ण आहे.
प्रश्नाचं उत्तर देण्याआधीचा हिंट - चिवडा फार कठीण, त्यापेक्षा कडक बुंदीचे लाडू खा.
प्रत्येक उत्तरासोबत देण्याचा सल्ला -
>> १) आख्खा डबा समोर घेऊन त्यातले खोबेरे, दाणे, काजू निवडून खातो.
आज काजू, खोबरे, दाणे खाताय. उद्या वाढलेल्या आकाराचं काय करणार आहात?
>> २) प्रत्येक घासाबरोबर खोबेरे, दाणे, काजू, बेदाणे येतील याची खात्री करत खातो.
चिवडा खाताना चिवड्याकडे बघता? मग पुस्तकं आणि दिवाळी अंक कोण वाचणार?
>>३) चिवड्यात दही घालून त्याचा लगदास्वरूप काला करून तो स्थितप्रज्ञपणे गिळतो.
वाटलंच मला. मारी बिस्किट आवडतं ना तुम्हाला?
>>४) चिवडा ही काय खायची गोष्ट आहे?
चिवड्याची बदनामी थांबवा.
उत्तरानंतरचा हिंट - चिवडे खायचे तर चिवडे खा, प्रश्नोत्तरं-प्रश्नोत्तरं काय खेळताय?
अस्वलरावांना दिवाळीच्या
अस्वलरावांना दिवाळीच्या
दिवट्याशुभेच्छा.