मुखवटे (भाग १)
खरडफळ्यावरची गौरी/महालक्ष्मी चर्चा वाचून काही महिन्यांपूर्वी काढलेले हे फोटो आठवले.
लहानपणी गौरी, गौरी जेवणं, त्यांच्या निमित्ताने झालेली हळदीकुंकू (विधवांना हळदीकुंकू लावायचं नसतं हे ज्ञान) हे सगळं आठवलं. त्या वयात जे नीट समजलं नव्हतं, हे सगळे देव असे एयरब्रश केलेले का असतात, या देवांच्या चेहेऱ्यावर एवढा बालिश निरागसपणा का असतो, हेही प्रश्न आठवले. त्या निमित्ताने हे दोन धागे.
या गौरींच्या साजशृंगारासाठी काही गोष्टी त्यांच्या पुढ्यात ठेवलेल्या असायच्या.
स्पर्धा का इतर?
आणि परत शिवप्रिया होण्याकरता
आणि परत शिवप्रिया होण्याकरता तिला कोमलच व्हावे लागले असे वाटतच होते तोच हेही आठवले की नाही रणामध्ये ती जेव्हा संहारक शक्ती झाली तेव्हा तिला शांतवण्याकरता शंकरच तिच्या पायाखाली आले. तेव्हा शंकरानी तिला सर्व रुपात मान्य केले आहे.
.
माझे पूर्वीचं स्टेटमेन्ट आठवलं खरं तर भडभडे यांची शिवप्रिया कादंबरीमधील प्रिफेस (मराठी शब्द विसरले :() केलेले हे स्टेटमेन्ट आहे - की पार्वती ही आद्यफेमिनिस्ट आहे :) आणि शिव-पार्वतीचे नाते नेहमी इक्वल फुटींगवरचेच दाखविले आहे.
,
कादंबरी ८ वीत वाचलेली असल्याने संदर्भ पुसट झालेत पण त्यांनी सोडलेली छाप पक्की आहे.
___________
हां तांत्रिकांच्या दहा महाविद्येतील एक देवी आहे -धूमावती. ही जराजर्जर (म्हातारी) असते असे मी वाचले होते. पण मला हे रुप आवडतं कारण कुठेतरी या सर्व शक्ती/उर्जां मध्ये वृद्धावस्था वैधव्य यालाही स्थान दिलेले आहे.
तांत्रिक देवतांमध्ये बालीश
तांत्रिक देवतांमध्ये बालीश निरागसपणा नसतो.
या देवता गौरी-गणपतीत कोणी घरी आणत नाहीत. घरी आणले जाणारे गणपती, मुखवट्यांच्या गौरींपैकी मातीचे मुखवटे असतात ते सगळे यच्चयावत एयरब्रश केलेले, गुलाबी गालांचे, भुऱ्या/भुरकट डोळ्यांचे आणि चेहेऱ्यावर निरागस-बालिश भाव घेऊनच आलेले असतात. गणपती ही विद्येची देवता, मग चेहेऱ्यावर, डोळ्यांत विद्येचं तेज, बुद्धीमत्ता, मॅच्युरिटी दिसण्याजागी सरसकट बालिश ५-६ वर्षांच्या मुलांसारखे भाव का असतात? ते बघूनच "हे काही आपल्यासारखे, आपल्या लोकांसारखे दिसत नाहीत" असं लहानपणापासूनच, नास्तिक बनायच्या अनेक वर्षं आधीपासून वाटायचं.
आजकाल गणपती च्या मुर्ती आणि
आजकाल गणपती च्या मुर्ती आणि गौरीचे मुखवटे खूपच कलात्मक आणि आकर्षक असतात.
तांत्रीक देवतांची कुणीच घरी स्थापना करीत नाहीत.
किंबहूना या फारशा कुणाला ज्ञात नसतात. त्यांचे कुठलेही उत्सव/ सण सार्वजनिक रित्या उघडपणे साजरे केले गेलेले ऐकीवात नाहीत.
उलट पक्षी या देवतांचे उपासक देखील गर्द छायेतच राहणे पसंत करत असावेत असे वाटते.
बाकी मी ही शंका काढली होती की
बाकी मी ही शंका काढली होती की गौरी बसक्या नाकाची, जाड , बुटकी का नसते
बसक्या नाकाची वगेरे माहीत नाही, पण जाड्/बुटक्या गौरी/महालक्ष्मी असतात. माझ्या मामाकडे पुर्वी मडक्यावरच्या महालक्ष्म्या बसवत. जमीनीवर घट्ट चिखलमातीचे चुंबळ करून त्यावर सगळ्यात मोठ्या आकारचे धान्य भरलेले मडके, त्याच्यावर फराळ भरलेले दुसरे मध्यम आकाराचे मडके, आणि सर्वात वर लहान आकारचे धान्य भरलेले मडके अशी आरास असे. ह्या वरच्या मडक्याला दोरीने हात बांधलेले आणि, धान्यामधे मु़खवटाबसवलेला असे. ह्या महालक्ष्म्यांना साडी नेसवणे मोठे जिकरीचे काम. तसेच २-३ दिवस अगदी कुठलाही धक्का लागु नये ह्याची काळजी घ्यावी लागत असे. तसेही त्यावेळी कडक सोवळे पाळले जायचे त्यामुळे, आम्ही लहान मुले दूरच रहात असू. असो, तर बसक्या/जाड महालक्ष्म्या असतात एवढेच सांगायचे होते.
या देवांच्या चेहेऱ्यावर एवढा
तांत्रिक देवतांमध्ये बालीश निरागसपणा नसतो. त्यांची नजरही झुकलेली, लाजरी नसते. वानगीदाखल,



ही बगलामुखी-
.
कालीघाटवाली, कलकत्ता काली
.
ही रणचंडी काली
.
हां पण तांत्रिक सोडून अन्य देवता शांत रुपात दाखवलेल्या असतात, अभय देणार्या, हसतमुख किंवा सौम्य असतात. पण मठ्ठ नसतात. मला असं का वाटतय की तुला निरगस नसून मठ्ठ म्हणायचय? :( तसं नसेलही. पण मला वाटलं.
.
गौरी जर पार्वती असेल तर ती सौम्य आणि शिवप्रिया रुपात असते. त्यामुळे कोमल दाखवत असावी. तसेच ती गौरवर्णाचीच असते असेही वाचले आहे. उत्तर प्रदेश्/काश्मीर वगैरे मधील प्रभाव असेल.