मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ५३

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================
एका मित्राने औषधाची छोटी कंपनी सुरु केली आहे. त्यासाठी चांगले नाव सुचवता येईल का? शक्यतो शास्त्रीय परंपरा सांगणारे (मराठी-इंग्लिश-संस्कृत इ) आणि कॅची असावे

field_vote: 
0
No votes yet

दवादवाई?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

रामबाण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

१. संजीवनी
२. राहत
३. आयुष
४. स्वास्थ्य

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रणबीर सिंह आणि गुरबक्ष सिंह यांनी आपल्या नावांचे आंग्लीकरण करून रॅनबॅक्सी हे नाव दिले तर डॉक्टर बर्मन यांनी पदवी आणि नावाचे लघुरूप वापरून डाबर कंपनीस जन्माला घातले! रेड्डी मात्र आपल्या मूळ नावाशी प्रामाणिक राहिले.

वरीलपैकी कुठल्याही कंपनीचे नाव औषध व्यवसायाशी 'अनुरूप' नाही. तरीही त्यांना काय फरक पडला!

खरे तर, औषधाच्या बाबतीत कंपनीचे नाव फारसे कुणाला ठाऊकदेखिल नसते. औषधाचे नाव मात्र चटकदार हवे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला, रॅनबॅक्सीमागचा हा इतिहास ठाऊक नव्हता! अतिरोचक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला वाटते हर्षद मेहताने शेअर मार्केट घराच्या अंगणात आणून सोडण्यापूर्वी मराठी वर्तमानपत्रांत रणबक्षी असाच उल्लेख असायचा. हर्षद मेहता प्रकरणात सुचेता दलालमुळे टीओआयचा अर्थविभाग आणि इकॉनॉमिक टाइम्स वाचायची चटक मराठी उच्चमध्यमवर्गाला लागली आणि मग रॅनबॅक्सी हे नाव अवतरले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी कालपरवापर्यंत रॅनबॅक्सीने त्यांचा बिझनेस विकण्यासंदर्भातल्या बातम्यांमध्येही रणबक्षी हेच नाव अनेक मराठी वर्तमानपत्रांत वाचले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉक्टर बर्मन यांनी पदवी आणि नावाचे लघुरूप वापरून डाबर कंपनीस जन्माला घातले!

लघुरूप केलं नसतं तर कंपनीचं नाव डॉबरमन झालं असतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"कंपनी" सुरू करायची असेल तर एकदा नाव ठरल्यावर सीएसच्या कानावर घालावे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजला नाव पसंत पडायला लागतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

म्हणजे? नाव आवडलं नाय म्हणून रजिष्ट्रार नाव बदलायला लावू शकतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाही तसं नाही.

Companies (Name Availability) Rules, 2011 नुसार काही कावं घेता येत नाहीत. उदा० कंपन्यांचे डू-आयडी (रणपक्षी लिमिटेड किंवा चाबर लिमिटेड), भारत सरकारशी कंपनी संलग्न आहे असं भासवणारी नावं, ऑफेन्सिव्ह नावं वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अच्छा, ओक्के. हे माहिती होतं, मला वाटलं दुसरं काय आहे का.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भारत सरकारशी कंपनी संलग्न आहे असं भासवणारी नावं

खरे असावे.

पण एक अपवाद आठवला - देशातील एक अग्रगण्य मालवाहतूक कंपनी - ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशन ऑफ ईंडिया - ही खासगी कंपनी आहे. परंतु हे नाव मात्र थेट सरकारी कंपनी असल्यागत वाटते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अँड्र्यू युल आणि बामर लॉरी या कंपन्या सरकारी असूनही नावामुळे वाटत नाहीत

गोंधळ उडवणारी आणखी नावे.

आयसीआयसीआय- इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
आयडीबीआय - इंडस्ट्रियल डेवलपमेंट बँक ऑफ इंडिया
आयएफसीआय - इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. (अर्थात ही सरकारी पब्लिक सेक्टर कंपनी म्हणूनच स्थापन झाली होती पण काही वर्षापूर्वी खाजगी आणि एकदोन वर्षापूर्वी परत एकदा सरकारी झाली)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहकारी गृहसंस्थांचे सभासदही एखादे नाव ठरवून ठेवतात -अमुक co op hsg soc वगैरे.
त्याचा गमतिदार पण केविलवाणा प्रकार याचे उदाहरण--
आदूबाळ यांनी सांगितल्याप्रमाणे इथेही सरकारी नेमलेला रेजिस्ट्रार ( उपनिबंधक )सांगतो की हे नाव आपल्या मुंब ई /ठाणे जिल्ह्यात घेतलेले आहे ते घेता येणार नाही. (जसे संस्थळावर /इमेलवर मेसिज येतो not available ) .आमच्या मित्राच्या सोसायटीवाले एक नाव "--" घेऊन गेले.
"हे नाही ,दुसरे सांगा."
"श्री ----" ?
"हे पण नाही ,दुसरे सांगा."
"श्री देवी -----?"
"हे पण नाही ,दुसरे सांगा."
"श्री देवी श्री ----- को ओप हौ सोसायटी?"
"हो चालेल."

त्या देवीच्या नावावर एवढे आडून बसले होते की पुढे
"श्री देवी श्री ----- को ओप हौ सोसायटी"हे नाव मिळवलेच या आनंदात परतले.
कायमची डोकेदुखी झाली आहे .चेकवरती एवढे लांबलचक नाव दोन जोडाक्षरांसहीत लिहावे लागते.ट्रेजरर रबर स्टँप मारतो परंतू एखादा श्री राहिला की घोळ होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण सोसायट्यांना, बंगल्यांना नावे (उदा. श्रमसाफल्य वगैरे) द्यायलाच पाहिजेत का? नुसता पत्ता लिहिला तर पुरेसे नाही का? म्हणजे ३६ नारायण पेठ किंवा ५१२ सदाशिव पेठ वगैरे.

याच्यावरून १ जोक आठवला.
माझा एक मित्र आहे. मध्यंतरी तो पुण्याला गेला होता. तिथून आल्यावर मला भेटला. म्हणाला, " पुण्यात भलतीच गंमत झाली.
"मी सावधपणे त्याच्या कडे पाहिलं. म्हटलं, "काय झालं?"

तर म्हणाला, "अरे रस्त्याने चाललो होतो, तर एक बंगला दिसला. बंगल्याचं नाव काय होतं माहितेय का?"

"काय? "

" टणक ऊस "

" काय? "

" खरच. हा बघ फोटो त्या बंगल्याचा."

मित्राने मोबाईल वरचा फोटो दाखवला. बंगल्यावरची अक्षरे स्पष्ट दिसत होती - टणक ऊस. मी चक्रावलो.

"अरे तीच खरी गंमतय". मित्र पुढे सांगू लागला.

"अरे जाम क्युर्योसिटी वाटली, सरळ आत गेलो आणि बंगल्याची बेल दाबली. एका म्हातारबुवांनी दरवाजा उघडला. कपाळावर आठ्या म्हातार्याच्या."

"अहो हे तुमच्या बंगल्याचं नाव - टणक ऊस. कधी ऐकला नव्हता. "

" मग? "

" अरे पिसाटला नं म्हातारा. मुस्काट फोडीन म्हणाला. तेवढ्यासाठी बेल मारता? बेशरम.
"अहो पण ते टणक ऊस ते कायय ? "

" हे बघा इथे पुण्यामधली अक्षरं पडतात जुनी झाली की.

हे 'पाटणकर हाऊस' आहे. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL
अगायो मेलो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ROFL
धन्य ते पुणं, धन्य ते पाटणकर आणि धन्य तो टणक ऊस!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या देवीच्या नावावर एवढे आडून बसले होते की पुढे
"श्री देवी श्री ----- को ओप हौ सोसायटी"हे नाव मिळवलेच या आनंदात परतले.
कायमची डोकेदुखी झाली आहे .

अशीच एक कथा डोंबिवलीतल्या विष्णुनगरमधल्या एका सोसायटीची आहे.
सोसायटीने मिटींगमध्ये सोसायटीचं नांव गणेशकृपा असं रजिस्टर करायचं असा ठराव केला.
रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन ते रजिस्टर करायचं काम एका कल्याण तहसीलदार ऑफिसमध्ये कामाला असलेल्या मेंबरनी (बहुदा त्यांना भरपूर वेळ आणि अशी कामे करायची हौस असल्याने) शिरावर घेतलं.
रजिस्ट्रारकडे पुढील संवाद,
"गणेशकृपा?"
"पूर्वीच गेलंय."
"श्रीगणेशकृपा?"
"तेही गेलंय"
"जयगणेशकृपा?"
"तेसुद्धा गेलंय"
आता आली का पंचाईत? मग मेंबरकाकांनी खूप विचार केला आणि मग शक्कल लढवली.
"डोंबिवली गणेशकृपा?"
"हां ते नांव घेता येईल. पण अहो काका, असं अडनिडं नांव घेण्यापेक्षा दुसर्‍या लक्ष्मी, केशव, शिव अशा देवतेची कृपा म्हणून का नांव ठेवत नाही?", रजिस्ट्रारलाच काळजी!!
"नाही, नाही. उगीच भलतासलता देव नको! सोसायटीच्या मिटिंगमध्ये गणेशच ठरलाय! तेंव्हा गणेशकृपा म्हणजे गणेशकृपा!!!"
शेवटी 'डोंबिवली गणेशकृपा' हेच नांव रजिस्टर झालं!!
सोसायटीच्या पुढल्या मिटिंगमध्ये काय घडलं असेल याची कल्पना तुम्ही करू शकता!!!
हे सगळं मला कसं माहिती? कारण तेंव्हा मी त्या काकांबरोबर होतो....
हे सोसायटीचं काम झाल्यानंतर ते मला माझं डोमिसिल सर्टिफिकेट मिळवून द्यायला मदत करणार होते!!!!
Smile
Smile
Smile
कथा इथेच संपत नाही.
ते "Dombivli Ganeshkrupa Co-op Hsg. Soc.' लिहायला लांबलचक असल्याने त्याचं,
'D'bvli Ganeshkrupa CHS' झालं. पत्रांवर हाच पत्ता लिहिला जायचा....
आता ही विष्णुनगरातली सोसायटी. विष्णुनगर हा सखल भाग!
जरा जोराचा पाऊस झाला कि पाणी साठायचं!!!
मग पोरांनी त्या 'डि'बिव्ली गणेशकृपा' सोसायटीचं 'डुबवली गणेशकृपा' सोसायटी केलं.
अजूनही तेच नांव वापरात आहे.
अगदी पोस्टमन, गॅसवाले, फिरते भाजीवाले सगळ्यांना ठाऊक आहे!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्या स्त्रीने केलेली चूक ही समस्त स्त्रीयांना बदनाम करणारी असल्यासारखे बोलले जाते पण एखाद्या पुरूषाने तीच चूक केली तर ती मात्र, "तो एक माणूसच आहे, चुकू शकतो" अशा प्रकारे बोलली जाते. ह्याचा परिणाम असा होत असावा की चूक केल्या नंतर सावरायला स्त्रीला जास्त वेळ लागतो.
हा फुकटचा स्ट्रेस स्त्रीयांना वहावा लागतो; तो सगळ्यांनीच तिला देणं आणि स्त्रीयांनी स्वतःवर घेणं बंद केलं पाहिजे.
हेच, उलटवून एखाद्या अचिव्हमेंट बद्द्लही म्हणता यावं. चूका आणि अचिव्हमेंट या दोन्ही व्यक्तिच्या गणून स्मस्त स्त्रीयांच्या म्हणून गणणं म्हणजे उगाचचा ताण त्या व्यक्तिला देणं असं वाटतं.

ही बाब/हा मुद्दा साहित्यात जुनी/जुना असेल आणि त्याला काही नावही असेल. माझे वाचन ह्याबाबत फारसे नाही. मनात आलेला एक विचार म्हणून लिहावा वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>एखाद्या स्त्रीने केलेली चूक ही समस्त स्त्रीयांना बदनाम करणारी असल्यासारखे बोलले जाते पण एखाद्या पुरूषाने तीच चूक केली तर ती मात्र, "तो एक माणूसच आहे, चुकू शकतो" अशा प्रकारे बोलली जाते.

एनी एक्झाम्पल्स ऑफ धिस?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला तर उलटेच बघायला मिळते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी स्पेलिंग मिस्टेक, ड्रायव्हिंग मधली क्षुल्लक चूक किंवा आणी काही. चिक्कार उदाहरणे आहेत. चूक कोणती यापे़क्षा ती करण्यावरून ती करणार्‍याला बाकीचे काय प्रतिक्रीया देतात याकडे रोख आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्या स्त्रीने केलेली चूक ही समस्त स्त्रीयांना बदनाम करणारी असल्यासारखे बोलले जाते पण एखाद्या पुरूषाने तीच चूक केली तर ती मात्र, "तो एक माणूसच आहे, चुकू शकतो" अशा प्रकारे बोलली जाते.

गृहितकाशीच असहमत (मराठीत डिसअ‍ॅग्री विथ द प्रेमिस)
त्यामुळे पुढे प्रतिक्रिया नाही....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गृहितकाशीच असहमत (मराठीत डिसअ‍ॅग्री विथ द प्रेमिस)

गृहीतक नसून हे निरीक्षण आहे (वर्क प्लेस मध्ये केलेलं पण इतरही ठिकाणी पहिलय.).
ह्याला एक पॅरॅलल उदाहरण द्यायचंच झालं तर: भारतात आलेला एखादा परदेशी पाहुणा/ काही पाहुणे. समजा ते पोलंडहून आले आहेत. तर लोक ते अख्ख्या पोलंडचे प्रतिनिधित्त्व करतायत असे मानून त्यांनी केलेल्या (अगदी साध्यासाध्या चांगल्यावाईट) कृती सरळ 'पोलिश लोक असेच असावेत' छाप समज करून घेण्यासाठी पुरेशा धरतात. समस्त पोलंडची लाज राखण्याचा ताण त्यांनी 'पावलोपावली' घ्यावा का ? किंवा लोकांनी त्यांना तो द्यावा का ? असंच काहीसं म्हणायचं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता तुम्ही जे पोलिश लोकांचं उदाहरण देताय त्याला सार्वत्रिकीकरण (मराठीत जनरलायझेशन) म्हणतात. जगातल्या कुठल्याही समाजातले अज्ञानी लोक ते करतात. म्हणूनच अमेरिकेत काळे, भारतात मुसलमान आणि युरोपात साउथ एशियन बदनाम केले जातात....
तुमचं आधीचं विधान यापेक्षा वेगळं होतं.एका स्त्रीच्या चुकीचा दोष सर्व स्त्रीजातीला लावला जातो पण एका पुरुषाच्या चुकीचा दोष मात्र सर्व पुरुषजातीला लावला जात नाही असा अर्थ त्यातून मला जाणवला. आणि याच्याशी मी असहमत आहे. उदा. एक फुलनदेवी दरोडेखोर निघाली म्हणून सर्व भारतीय स्त्रिया गुन्हेगार प्रवृत्तीच्या असतात अशासारखं लॉजिक कुणी मांडलेलं माझ्यातरी पहाण्यात आलेलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून स्पष्ट करते...जमेल असं नाही पण तरी. "द्यायचच" झालं तर म्हणून पोलिश लोकांचं उदाहरण दिलं होतं. त्यातही त्यांनी 'पावलोपावली' ताण वागवू नये याकडे रोख होता.
मी 'चुका' म्हणजे गुन्हे अपराध वगैरें बाबत म्हणतच नाहिये. तसा समज व्हायला जागा ('चूक' ह्या ढोबळ शब्दामुळे) होती आधीच्या विधानात हे मान्य.

रोज नकळत कधी कधी घडणार्‍या 'ह्यूमन एरर' टाईप चुका म्हणत्ये. स्पेलिंग मिस्टेक, एखाद्या मीटिंगला/लेक्चरला कधीतरी किंचित उशीर होणं, वगैरे. अशा छोट्या गोष्टी स्त्रीयांच्या कडून घडल्या तर लगेच समस्त स्त्रीजातीचा उद्धार करून पाणउतारा करताना लोक (पुरूष आणि स्त्रीया विनाभेद) दिसतात असं माझं निरीक्षण आहे. ह्याच चुकांच्या बाबत पुरूषांना मिळणारा पाणउतारा हा समस्त पुरूषजातीचा उद्धार करणारा नसतो (माझ्या तरी पहाण्यात नाही).

पावलोपावली एका स्त्रीवर सगळ्या स्त्रीजातीला प्रूव करण्याची जबाबदारी देत रहाणे...आणि तिनी घेत रहाणे याकडे लक्ष वेधायचं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत. हे इतक्या सहजासहजी होतं, की आपण असं करतो आहोत याचं भानही कर्त्याला नसतं. पण त्याचबरोबर हेही आहे, की हे पुरुषांच्या बाबतीत स्त्रियांकडूनही होतं. (गौरी देशपांडेचे लाडके उद्गार: "बाप्यांचं हे असंच!") हे एकूणच माणसांकडून होतं. एकूण जगात पुरुषांपेक्षा बायका जास्त नाडल्या जात असल्यामुळे (या गृहीतकावर अनेक जण धावून येतील. पण त्यावर मी वाद घालू इच्छीत नाही.) बायकांबद्दलच्या सार्वत्रिकीकरणाचं प्रमाण जास्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हे इतक्या सहजासहजी होतं, की आपण असं करतो आहोत याचं भानही कर्त्याला नसतं.

म्हणूनच जाणीव पूर्वक बदल, जमेल तसा हळूहळू करात जावा लागतो.

पण त्याचबरोबर हेही आहे, की हे पुरुषांच्या बाबतीत स्त्रियांकडूनही होतं. (गौरी देशपांडेचे लाडके उद्गार: "बाप्यांचं हे असंच!") हे एकूणच माणसांकडून होतं.

हो..होतंच. पुरूषांच्या बाबतीत सर्व आलबेल आहे असं म्हणत नाहिये...एकूण व्यक्ति स्टिरिओअटाईप करणे ह्याचा त्रास सगळ्यांनाच होतो. पण प्रत्येक बाबतीत कारण आणि परिणाम वेगवेगळे असतात.

चुकांच्या (ह्यूमन एरर किंवा कोणीही करेल अशी साधीसुधी चूक म्हणू) बाबतीत स्त्रीयांवर अकारण समस्त स्त्रीजातीचे प्रतिनिधित्त्व लादले जाताना पाहिले आहे (फक्त पुरूष किंवा फक्त स्त्रीया ते लादतात असा समज करून घेऊ नये)
आणि त्यामुळे नकारात्मक परिणाम होतो असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक किस्सा. एकदा उमेरिकेत एका मित्राबरोबर चालत जात होतो कुठतरी. मी नवखा होतो. तो माझ्याहून बराच जास्तं राहिला होता तिथे. चालणार्‍यांना लाल दिवा होता. तो सिग्नल एका गोर्‍या लललेने तोडला. हा लगेच म्हणाला गोर्‍याने तोडला सिग्नला आता आपण तोडायला हरकत नाही अस म्हणून मला पल्याड घेउन गेला. गोर्‍याने तोडला म्हणून आपण तोडायला हरकत नाही हे विचित्र वाटलं. समोरचा (या केसमध्ये गाडीवाला) आपले इनडिस्क्रेशन्स हे लगेच आपल्या स्किन कलर बरोबर जोडेल ही भावना असते का असं त्याला विचारता तो हो म्हणाला. एक दोघांनी त्यांनाही असं वाटत याला दुजोरा दिला.
वरील केस त्यातलीच वाटते. प्रत्येक इंडिस्क्रेशन ही स्त्री असण्याशी समोरचा जोडतोय अस गृहीत का धरलं जातं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

रोज नकळत कधी कधी घडणार्‍या 'ह्यूमन एरर' टाईप चुका म्हणत्ये. स्पेलिंग मिस्टेक, एखाद्या मीटिंगला/लेक्चरला कधीतरी किंचित उशीर होणं, वगैरे. अशा छोट्या गोष्टी स्त्रीयांच्या कडून घडल्या तर लगेच समस्त स्त्रीजातीचा उद्धार करून पाणउतारा करताना लोक (पुरूष आणि स्त्रीया विनाभेद) दिसतात असं माझं निरीक्षण आहे.

ह्या क्षुल्लक चुका प्रत्येकाच्या हातून कधी ना कधी घडतात. अशा वेळेस आपल्या चुकीबद्दल संबंधितांची माफी मागून पुढे जावं हे माझ्या दृष्टीने उत्तम. बाकी लोक काय विचार करतात याकडे फारसं लक्ष देऊ नये. जर कुणी उच्चार केलाच तर, "कायरे/गं बाबा/बाई, तुझ्या किंवा कुणाच्या हातून अशी चूक घडलेली तू कधी पाहिलीच नव्हतीस का?" असं विचारावं. आणि मुख्य म्हणजे अशा लोकांना त्यानंतर टाळावं, ते तुमचे हितचिंतक नाहीत!

पावलोपावली एका स्त्रीवर सगळ्या स्त्रीजातीला प्रूव करण्याची जबाबदारी देत रहाणे...आणि तिनी घेत रहाणे

नाय हो, तसं काही नसतं. तशी अपेक्षा कुणी केली तरी बहुसंख्य सूज्ञ स्त्रिया ते मनावर घेत नाहीत.
एक तरला दलाल असते म्हणून आपण तिच्यासारखं निष्णात कुक व्हायचं असं किती स्त्रिया मनावर घेऊन ते प्रत्यक्षात आणून दाखवतात? फार थोड्या!!
आता तरी माझं म्हणणं तुमच्या लक्षात आलं असेल अशी आशा आहे. उगाच कारण नसतांना स्वतःला कडकलक्ष्मीसारखं का फोडून घेता?
अर्थात हा उपधागा स्त्रीमुक्ती वगैरे दिशेला नेण्याचा हेतू असेल तर माझा पास, कारण त्या आतंरजालीय चर्चेत मला रस नाही.
का ते अदितीशी एकदा फेस टू फेस दणकून चर्चा करून तिला सांगितलं आहे! तेंव्हाच माझा कोटा संपला!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उगाच कारण नसतांना स्वतःला कडकलक्ष्मीसारखं का फोडून घेता?

कसली लोहारकी आहे ही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक तरला दलाल असते म्हणून आपण तिच्यासारखं निष्णात कुक व्हायचं असं किती स्त्रिया मनावर घेऊन ते प्रत्यक्षात आणून दाखवतात? फार थोड्या!!

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या क्षुल्लक चुका प्रत्येकाच्या हातून कधी ना कधी घडतात. अशा वेळेस आपल्या चुकीबद्दल संबंधितांची माफी मागून पुढे जावं हे माझ्या दृष्टीने उत्तम. बाकी लोक काय विचार करतात याकडे फारसं लक्ष देऊ नये. जर कुणी उच्चार केलाच तर, "कायरे/गं बाबा/बाई, तुझ्या किंवा कुणाच्या हातून अशी चूक घडलेली तू कधी पाहिलीच नव्हतीस का?" असं विचारावं. आणि मुख्य म्हणजे अशा लोकांना त्यानंतर टाळावं, ते तुमचे हितचिंतक नाहीत!

तुम्ही किंवा मी काय करतो हा मुद्दा नाहिये. त्यामुळे वरचा सल्ला आणि 'का फोडून घेता' वगैरेला माझा पास.

स्त्री आणि पुरूषांमध्ये, एखादी चूक केल्यानंतर पुढे किती काळ त्या गोष्टीची गिल्ट वागवतात यात फरक दिसला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही किंवा मी काय करतो हा मुद्दा नाहिये.

असं जर असेल तर मग या चर्चेलाच काही अर्थ नाहिये. उगीच काहीतरी धूळ उडवायची म्हणून काढलेला उपधागा इतकंच याचं प्रयोजन.
आणि जर एखादी स्त्री वा पुरुष क्षुल्लक गोष्टींवरून दीर्घ काळ्पर्यंत गिल्ट वागवत असतील तर प्रॉब्लेम त्या गिल्ट वागवणार्‍या व्यक्तीत आहे, अन्यत्र नाही.
असो. मला जे काही सांगायचं ते मी सागितलं. ते तुमच्या मनास येईल असं वाटत नाही.
तेंव्हा माझ्याकडुन लेखनसीमा.
तुम्हाला तुमच्या कार्यात हार्दिक शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि जर एखादी स्त्री वा पुरुष क्षुल्लक गोष्टींवरून दीर्घ काळ्पर्यंत गिल्ट वागवत असतील तर प्रॉब्लेम त्या गिल्ट वागवणार्‍या व्यक्तीत आहे, अन्यत्र नाही.

एका पर्टिक्यूलर व्यक्तिच्या प्रॉबलेमबद्द्ल मी म्हणत नाहिये.

शुभेच्छांसाठी धन्यवाद...सेम शुभेच्छा टू यू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्री हीच स्त्रीची शत्रू असते हा क्लिशे हे एक उदाहरण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्त्री ही स्त्री ची शत्रू - माझं उदाहरण म्हणतेयस का?
मी का म्हणाले कारण चाइल्ड अ‍ॅब्युझ्/डोमेस्टिक व्हायोलन्स/रेप हे फक्त पुरुष करतात असा काहीसा समज अगदी ९९% रुढ असतो.
स्त्रिया हे प्रकार करतच नाही का?
___
अर्थात काऊंटर रुढ गैरसमजाचं उदा आहे - की सासुरवास फक्त सासू अन नणंदाच करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला कळलं नाही तू काय म्हणत्येस ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुझा मूळचा मुद्दा मान्य आहेच.

एका स्त्रीमुळे दुसऱ्या स्त्रीला छोटा-मोठा त्रास झाला की लगेच स्त्री ही स्त्रीची शत्रू असते. हे असे निरर्थक क्लिशे परंपरेचा भाग बनतात. पण अगदी युद्धं, खून, दंगली, जाळपोळी, दहशतवाद, सत्तास्पर्धा यांच्यात पुरुषांनी पुरुषांना/माणसांना जिवे मारलं तर पुरुष पुरुषांचे किंवा पुरुष मानवतेचे शत्रू ठरवले जात नाहीत. (तसं होऊ नयेच.) बाईने बायकांसाठी ठरवलेल्या साच्याबाहेरचं काहीही केलं की लगेच त्याचं उदात्तीकरण किंवा राक्षसीकरण (demonnisation) होतं याचं हे एक सोपं उदाहरण.

प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्या तेव्हा लगेच स्त्रियांचं स्थान उंचावणं वगैरेंबद्दल चर्चा सुरू झाली. (पण अमर्त्य सेनांना नोबेल मिळाल्यावर स्त्री-पुरुष समानता मानण्याबद्दल काही नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओके. आलं लक्षात. हे चांगलं उदाहरण दिलस. बाकीच्यांना मी काय म्हणायचा प्रयत्न करत्ये ते कळलं नव्हतं त्यांना कदाचित कळू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका स्त्रीमुळे दुसऱ्या स्त्रीला छोटा-मोठा त्रास झाला की लगेच स्त्री ही स्त्रीची शत्रू असते. हे असे निरर्थक क्लिशे परंपरेचा भाग बनतात. पण अगदी युद्धं, खून, दंगली, जाळपोळी, दहशतवाद, सत्तास्पर्धा यांच्यात पुरुषांनी पुरुषांना/माणसांना जिवे मारलं तर पुरुष पुरुषांचे किंवा पुरुष मानवतेचे शत्रू ठरवले जात नाहीत. (तसं होऊ नयेच.) बाईने बायकांसाठी ठरवलेल्या साच्याबाहेरचं काहीही केलं की लगेच त्याचं उदात्तीकरण किंवा राक्षसीकरण (demonnisation) होतं याचं हे एक सोपं उदाहरण.

शॉल्लेट

आपण एकत्र शराब प्यायला कधी बसायचं ?? लवकरात लवकर प्लॅन बनवा. चखणा व शराब माझ्यातर्फे.

माझ्या बायकोचा बॉस एकदा असंच काहीतरी म्हणाला होता. तेव्हा बायकोने व तिच्या मैत्रीणीने (दोघीही त्याच्याच हाताखाली कामास होत्या) त्यास सौम्य शब्दात सुनावले होते - की - "स्त्री ही स्त्री ची शत्रू असते हे पुरुषांनी पसरवलेले मिथक आहे".

(राक्षसीकरण वरून आठवले : त्या लज्जा पिक्चर मधे पण अजय राक्षसगण च्या तोंडी सुद्धा असाच "स्त्री हीच स्त्री ची शत्रू असते" असा बाष्कळ डायलॉग घालून राजकुमार संतोषींनी आम्हास संतुष्ट केलेले होते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"स्त्री ही स्त्री ची शत्रू असते हे पुरुषांनी पसरवलेले मिथक आहे".

मिथकं पसरवण्यात किंवा खोडून काढण्यातही स्त्री-पुरुष समानता असते असं माझं मत आणि निरीक्षण आहे. मिथकाला बळी पडण्यातला सारासार विचारांचा अभाव लिंगाधारीत नसतो.
बघा, आमचा बोरोवित्झही हेच सुचवतो. Scientists: Earth Endangered by New Strain of Fact-Resistant Humans

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

महत्वाचा मुद्दा तो नैय्ये. महत्वाचा मुद्दा - पार्टी कधी करायची हा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादं उदाहरण आणि दुरुस्ती :
स्त्रियांचा वस्त्रालंकार हट्ट ,सितेचे सुवर्णमृगाचे वस्त्र मागणे वगैरे--------आतापर्यंत सुरूच होता. आता त्या करत नाहीत. धाडकन दुकानातून क्रे कार्डावर खरेदी करून टाकतात.कधी वेळ मिळाला तर नवय्रास inform करतात.वीस पंचवीस हजारांचा मोबाइलही असाच येऊन पडतो .हट्टवगैरे /खरेदी इत्यादी उगाचच बदनाम एकीमुळे सर्व होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फाशीः भ्रामक रचित आणि वास्तव

सुप्रीम कोर्टात फाशीच्या शिक्षेविषयी एकवाक्यता नाही. तिच्या घटनात्मक वैधतेवर शिक्कामोर्तब केल्यानंतरही, फाशीयोग्य 'अत्यंत अपवादात्मक' अशा गुन्ह्यांचे वर्गीकरण न्यायाधीशाच्या व्यक्तिगत दृष्टिकोनानुसार बदलताना दिसते. परिणामी एखादी व्यक्ती जगणार की मरणार, हे न्यायमूर्तींच्या कोणत्या पीठासमोर त्याची सुनावणी होणार यावर ठरते... याकूब मेमनच्या फाशीनिमित्ताने या विषयात गुंतलेल्या मुद्द्यांची चर्चा.

एकाच गुन्ह्यासाठी एकाच पातळीवरच्या न्यायालयातील दोन भिन्न न्यायाधीशांनी एक्झॅक्टली एकच शिक्षा द्यायला हवी की भिन्न शिक्षा दिली तर ते स्वीकारणीय असावे ??

----------

भारतीयत्वाचा गाभा असलेली बहुधर्मीय, बहुसांस्कृतिक सलोख्याची वीण अधिकाधिक उसवण्याचे अधम राजकारण निमित्ताला टपलेले असते.

जर एका गुन्ह्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन भिन्न न्यायाधीशांनी एक्झॅक्टली एकच शिक्षा द्यायला हवी असे असेल तर बहुधर्मीय, बहुसांस्कृतिक ते चे काय करायचे ??? (दोन भिन्न सांस्कृतिक व धार्मिक वातावरणातून आलेल्या न्यायाधीशांनी एक्झॅक्टली एकच शिक्षेची तरतूद करणे हे अवघड वाटते. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>एकाच गुन्ह्यासाठी एकाच पातळीवरच्या न्यायालयातील दोन भिन्न न्यायाधीशांनी एक्झॅक्टली एकच शिक्षा द्यायला हवी की भिन्न शिक्षा दिली तर ते स्वीकारणीय असावे ??

मला वाटते "एकच गुन्हा" असं खरोखर काही अस्तित्वात नसतं. म्हणजे मायनर गुन्ह्यात असू शकेल पण दहशतवादी हल्ला वगैरे केसेस या युनिक असतील. तसेच न्यायालय शिक्षेचा क्वांटम गुन्हा कितपत शाबित झालाय यावर ठरवत असावे. डेफिनेटली, मोस्टली, बियॉण्ड डाउट, बियॉण्ड रीझनेबल डाउट या ग्रेड्सप्रमाणे शिक्षा ठरत असावी. (असे वाटते).
--------------------------------
पण कुठल्याही प्रकारे व्यक्तीला डिस्क्रिशन असणे हे अन्यायाची शक्यता वाढवत असते.
--------------------------------
>>दोन भिन्न सांस्कृतिक व धार्मिक वातावरणातून आलेल्या न्यायाधीशांनी एक्झॅक्टली एकच शिक्षेची तरतूद करणे हे अवघड वाटते.

तुम्ही कुठल्यातरी माणसाच्या आयुष्याचा निवाडा करत असाल तर तुम्हाला तुमचे वातावरण मागे ठेवायला हवे. ऑब्जेक्टिव्ह राहता आले नाही तर निदान Err to the benefit of accused असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पेशवे, अथवा कोणतेही मराठा राजे अथवा कोणतेही हिंदू राजे हे कपाळावर काही गंध वगैरे लावायचे का?
गुगलवर फोटोज शोधायचा प्रयत्न करुन बघितला पण तेवढे फोटोज उपलब्ध नाहियेत बहुतेक.
म्हणजे शिवाजी महाराजांचे चित्र बघितले तर त्यामध्ये बर्‍याच चित्रकारांनी आडव्या पध्द्तीचे गंध लावलेलं दाखवलयं,

-मयुरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेशव्यांची जी चित्रे पाहिली आहेत त्यातही आडवे गंधच होते असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

काहीच गंधवार्ता नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेशव्यांच्या चित्रांत गंध दिसतात आडवे-एक्सेप्ट आय गेस थोरले बाजीराव.

शिवाजीमहाराजांच्या कुठल्याच चित्रांत कपाळावर गंध वगैरे दिसत नाही.

संभाजीराजांचे एक चित्र मिळालेय त्यात बहुधा गंध आहे.

(हे सर्व अर्थातच समकालीन चित्रे सापडली त्यांवरून केलेले निरीक्षण.)

बाकी जण्रल हिंदू राजे गंध लावायचे असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे संभाजीचं १६८५मधलं चित्र. सोबतच्या माहितीवरून ते ब्रिटिश लायब्ररीत असावं.

Shambhuraje 1685 Golkonda

गंध : आहे; उभंं.
स्रोत : https://commons.wikimedia.org/wiki/File:Shambhuraje1.jpg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझ्या माहितीनुसार ब्रिटिश लायब्ररीतले ओरिजिनल चित्र कलरलेस ड्रॉइंग होते. तिथून त्याची प्रत मागवल्यावर त्यात रंग नंतर भरण्यात आले.

स्रोतः हे चित्र मिळवणार्‍यांच्या ओळखीचे काही लोक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिवाजी व त्यांच्या घराण्यातील इतर मंडळी चांद्रवंशीय असल्याने चंद्रकोरही लावत असत असे वाचल्याचे आठवते. (http://www.mr.upakram.org/node/639)

शिवाजीचे दोन वेगवेगळे गंध

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उभ्या आणि आडव्या गंध लावण्याच्या पद्धतीत फरक काय? तामिळी अय्यर आणि अय्यंगारातदेखिल हा उभा-आडवा भेद आहे, असे ऐकून आहे (कोण उभा नि कोण आडवा, ते आता नीटसे आठवत नाही).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वरवरची कल्पना आहे.
आडवं गंध शंकरभक्त्/शैव लावतात; आणि उभं बालाजीवाले-विष्णू ग्यांग लावतात असं ऐकलय.
अधिक कल्पना नाही. (राख-भस्म आडवं फासलं जातं स्मशान, भूतगण आणि भूतगणांचा अधिपती शंकर ह्यास. त्याचा संदर्भ असावा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उभे (उर्ध्वपुंड्र) - अय्यंगार
आडवे (त्रिपुंड्र - तीन पट्टे) - अय्यर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वैष्णव = उभे,

शैव/स्मार्त = आडवे.

तमिऴ ऐयंगार हे विष्णुभक्त तर अय्यर हे स्मार्त. स्मार्त म्हणजे शैव नव्हे (हे अगदी अलीकडे समजले).

अय्यंगारांमध्येही वडकलै आणि तेंकलै असे दोन प्रकार असतात आणि त्या प्रत्येक प्रकाराचे गंध थोऽडेसे वेगळे असतात.

वडकलै गंध.

ghf

तेंकलै गंध.

fgh

हे सोडून पार वरपर्यंत एकच एक उभी रेष विथौट यू देखील असते. ती लावणारे काहीजण पाहिले आहेत फोटोंमध्ये. एक उदा. प्रसिद्ध कन्नड साहित्यिक मास्ती वेंकटेश अय्यंगार यांचा फोटो बघा.

masti

आडवे गंध लावणार्‍यांतही काही प्रकार आहेत. सर्वांत कॉमन पद्धत म्हणजे भस्माचे तीन आडवे पट्टे ओढणे - त्रिपुंड्र.

त्यात काहीजण एक उभट लाल रेषही ओढतात - शंकराच्या तिसर्‍या डोळ्याचे प्रतीक म्हणून.

345

पेशवे गाणपत्य होते. त्यांची जी काही चित्रे उपलब्ध आहेत त्यात लाल रंगाचे क्लोज्ड त्रिपुंड्र आणि मध्ये एक डॉट आहे, उदा. सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे हे चित्र बघा.

fgh

यांची इंडिव्हिज्युअल चित्रे समकालीन आहेत, आणि त्यांमधील नाम हा वरील चित्रातल्याप्रमाणेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बादवे दाक्षिणात्यांत लावले जाते ते गंध नसून भस्म असते असेही ऐकले आहे. शिवाय त्रिपुंड्र वगैरे आजपर्यंत केवळ भस्माचेच ऐकले आहेत, गंधाचे नव्हेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व भस्मच नसावे.

सिमिलॅरिटीमुळे पेशवाई गंधाला त्रिपुंड्र म्हटले खरे, पण मग त्याला वेगळे काही नाव आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काय माहित नाही बॉ. बाकी ललाटीचा त्रिपुंड्र तर्जनी, अनामिका आणि मध्यमा या तीन बोटांनी काढायचा असतो आणि भुवयांपलीकडे एक्स्टेंड होऊ नये एवढेच ठाऊक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाणपत्य म्हणजे नेमकं काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

गणपती हे ज्यांचं कुलदैवत आहे असे? की गणपतीचे उपासक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शैव वैष्णव तसे गाणपत्य ते गणपतीचे उपासक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान आहेत सर्वच प्रतिसाद. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इज द्याट इट?

गणपती ही "निम्न देवता" (संज्ञा चुभू) आहे, आणि तुलनेने नवी आहे वगैरे वाचलं होतं. माझा एक कॉलेजातला मित्र गाणपत्य होता/आहे. त्यांच्याकडे काही तंत्रमार्गातली वाटावी अशी कर्मकाडं असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हो आहेच ना. गणपतीची उपासना जुनी असली तरी किमान पश्चिम महाराष्ट्रात गणपतीची देवळे सर्रास उभारण्याची फ्याषण पेशवाईतच सुरू झाली असे वाटते. सांगली, तासगाव, गणेशवाडी, इ. ठिकाणची गणेश मंदिरे पेशवाई काळातच बांधली गेली. अष्टविनायकही फार जुने नसावेत असा अंदाज आहे. लेण्याद्रीतला गणपती तर उघड उघड बौद्ध गुहेत नेऊन स्थापिला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>लेण्याद्रीतला गणपती तर उघड उघड बौद्ध गुहेत नेऊन स्थापिला आहे.

aka तेजोमहालय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तेजोमहालय? नाही नाही गौतमालय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उभे आणि आडवे गंध लावणाऱ्यांत इतकी भांडणे असतात की ते फरशा पुसताना पण गंधाला दिशेला अनुसरून पुसतात म्हणे!
साभार: 'न'वी बाजूंचा कोणता तरी प्रतिसाद. कुठे आहेत 'न'वी बाजू??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देव आनंद साहेब आज जिवंत असते व तुमच्या समोर आले असते तर तुम्ही उत्कट पणे काय केले असतेत ? आयुष्य सेलेब्रेट करण्याची वृत्ती बाळगणारे देव साहेब !!!

मी हे गाणं ऐकवले असते -
.
.
.

.
.
किंवा हे -
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बस्स एक कडक सलाम केला असता ..... इतक्या मिष्किलपणे रोमँटीकपणाचे धडे देण्यासाठी. हृदयात कळ आणण्यासाठी. अनुनय अन प्रणयातील माधुर्य समजावून सांगण्यासाठी.
___
या गाण्यात देवानंदचे जे नशीले (नशा चढलेले) डोळे, तसा अभिनय कोणाचाच पाहीला नाही.

"वोह क्या चीज थी मिलाके नजर पिला दी"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

http://www.vox.com/2015/2/13/8032231/crime-drop
इथे अमेरिकेत गुन्हे कमी का झालेत यावर खूप छान साधक बाधक विचार आहेत. जालावर चर्चा करताना परस्परभिन्न मते असणार्‍या लोकांनी आपली मते "सिद्ध करायचा यत्न न करता" नुसती कशी नोंदवून सोडावीत याचे आदर्श उदाहरण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

घासुगुर्जींच्या काळा बद्दल च्या लेखानी, मनातल्या जुन्या प्रश्नाने पुन्हा उचल खाल्ली आणि ऐसी वर विचारुन बघु असे वाटले. ह्या प्रश्नाचा लेखाच्या विषयाशी काहीही संबंध नाहीये.

मला हा प्रश्न नीट फ्रेम पण करता येइल असे वाटत नाही.

मेंदु मधे काल गणने साठी काय योजना, सिस्टीम, भाग वगैरे आहे? ह्यात मला काल म्हणजे सेकंद, मिनिटे, पळे , घटीका असे अपेक्षीत नसुन, मेंदु काय पद्धतीने दोन क्षणामधला काळ जाणुन घेतो आणि तो पुन्हा रीपीट पण करु शकतो. हे घडाळ्यासारखे नाहीये, कारण कुठलेही घड्याळ एक ठरवलेल्या इंटरव्हल च्या पटीतच मोजमाप करु शकते.

पण मेंदु सतत गरजे प्रमाणे हे एकक बदलत असतो आणि पुन्हा अचुक पण असतो.
जर सोळा मात्रेचा त्रिताल असेल, तर उदाहरणार्थ जर १६ मात्रा १६ सेकंदात पूर्ण होत असेल तर वाजवणार्‍याचा मेंदु स्वताला १ मात्रा म्हणजे १ सेकंद असा सेट करत असेल ( कसा ते माहीती नाही ), पण पुढे लय वाढुन १६ मात्रा जर १३ सेकंदात पूर्ण व्हायला लागल्या तर मेंदु लगेच एकक १३/१६ ला सेट करतो. अजुन पुढे जर १६ मात्रा ७.५४८३७३ सेकंदात पूर्ण व्हायला लागल्या तर मेंदु स्वताला तसे सेट करतो. फक्त एककाच्या पटीत नाही तर त्याच्या १/८, १/१६ अश्या पटी पण समजुन घेतो.

ह्या प्रश्ना बरोबर मेंदुला आवाजाची अचुक फ्रीक्वेंसी पण कशी समजते हा ही एक प्रश्न आहे. त्याबद्दल पण काही माहीती असल्यास सांगावी. कारण त्या बाबतीत सुद्धा फिक्स असे काहीच नाही. पण दोन सप्तकातल्या "सा" च्या फ्रीक्वेंसी बरोबर दुप्पट्च मेंदु कशा मिळवतो?

---------
कोणी काही उत्तर देई ना म्हणुन प्रश्न वर काढतीय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यालाच प्रतिक्षिप्त क्रिया असे म्हणतात, असा एक अंदाज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुकीच्या जागी प्रतिसाद आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0