कोरा कागद निळी शाई!
ललित है तो पूर्वप्रकाशित हैच! ;)
***
कोरा कागद निळी शाई!
हुंकारभुता बोल काही
अळीमिळी सोडून देई
इतके सारे बोललो तरी
घरभर उरून राही –
कोरा कागद निळी शाई!
कागदाच्या चल होड्या करू
तो बघ झाला पाऊस सुरू
दिवस गेला लिखा-पढी
सोड की रे अढी-बिढी –
चल आता मडके भरू!
कसली अढी कसले काय,
फक्त थोडा रुसलो हाय!
सगळा धडा पाठ आहे
मान माझी ताठ आहे –
पण गाण्याचा शेवट नाय?
ताठ मान हवी खरी
पण आता पुरे तिरीमिरी
म्हणतो राती परतीन घरी
मानगुटीवर बसलेय गाणे -
गाण्याशिवाय भागणार नाय!
तेच तर!
हुंकारभुता गाऊ काही
अळीमिळी सोडून देई
नको कागद नको शाई
कोरा कागद निळी शाई?
नक्को कागद नक्को शाई!
ललित लेखनाचा प्रकार
प्रतिक्रिया बघून मजा वाटली.
प्रतिक्रिया बघून मजा वाटली. गुर्जी म्हणताहेत तसं काही तेव्हा तरी डोक्यात नव्हतं. एका मित्राशी झालेल्या भांडणा-अबोल्यानंतर गंमत म्हणून, थोडा मस्का लावावा म्हणून खरडलेली कविता. पण कविता लिहून प्रकाशित केली की ती स्वतंत्र नशिबाची होते हे किती टुकार कवींच्या बाबतीतही खरं असतं हे बघून एकदम अंतर्मुख का काय ते व्हायला झालं. सर्वांचे आभार.
तू बॅकग्राऊंड दिल्यावर कविता
तू बॅकग्राऊंड दिल्यावर कविता कळली अन जास्त आवडली.
_____
ती घोषणा होती वाटतं-
कोरा कागद निळी शाई,
आम्ही कुणाला भीत नाही.
अजुन एक आठवते-
१-२-३-४
हुजूरपागेच्या मुली हुषार
५-६-७-८
हुजुरपागेची कॉलर ताठ
९-१-११-१२
हुजुरपागेचा आहे दरारा
१३-१४-१५-१६
हुजुरपागा आमची शाळा
:D :D :D
ललित है तो पूर्वप्रकाशित
हुंकारभुताने अजूनपर्यंत अळीमिळी धरली आहे तर! की कागदशाईविना नुसतीच गाणी म्हणणं चालू आहे.
कविता आवडली. ती येते आणिक जाते मधलं प्रतिभेचं कोवळं-सुस्वरूप-अल्लड बालिकेचं रूपडं डोळ्यासमोरून निघून जाऊन तिथे रुसून बसलेला राक्षस-भूत-छाप गडी.येतो.