मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ५१

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================

जीर्ण झालेल्या नोटा बदलायच्या असतील तर काय प्रोसिजर आहे? पुण्यात कुठे बदलून मिळतात?

field_vote: 
0
No votes yet

नोटांची प्रोसिजर अशी काही खास नसते, सुमारे दोन तृतियांश पेक्षा मोठ्या साईजचा तुकडा असावा अशी अपेक्षा असते बहुतेक. स्टेट ब्यांकेत वेगळा काउंटर असतो.
पण ओळखपाळख असल्याशिवाय नोटा बदलायला त्रास देतात. कुणी नातेवाईक्/ओळखीच्या ब्यांकेत नोकरीस असेल तर त्याला द्या.
फारा वर्षांपूर्वी अलका टॉकीजच्या चौकातल्या पेट्रोल पंपावरून वर गेलं की एक जुनाट दुकान होतं तिथे 'येथे फाटक्या नोटा बदलून मिळतील' अशी पाटी पाहिल्याचं आठवतं.
पेशंट लोक दवाखान्यात हमखास फाटक्या, जुनाट नोटा खपवायचा प्रयत्न करतात.
हे जालावरचे : https://www.rbi.org.in/currency/Exc%20of%20Soiled-Mutilated%20Notes.html
*

आता माझा प्रश्न.

अजो दिसले नाहीत सध्या इकडे? तसा मीही बर्‍याच दिवसांनी आलोय म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सुट्टीवर असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

निवांत वेळेत गेलात तर आयसीआयसीवाले देतात असा अनुभव आहे, पण नोट जास्त खराब असल्यास त्याचे ठराविक पैसे कापतात बहुदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रश्न नव्हे, विचार.

महाराष्ट्र टाईम्स वगैरे वर्तमानपत्रं दहावी बारावीच्या परीक्षेत प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम गुण मिळवणार्‍या पोरापोरींना वाचकांकडून मदत मिळावी म्हणून आवाहन करतात. चेक थेट विद्यार्थ्यांच्याच नावाने काढायचे असल्याने बर्‍यापैकी पारदर्शकता आहे.

या प्रत्येक होतकरु कँडिडेटच्या घरची आणि परिस्थितीची माहिती वेगवेगळी दिलेली दिसते. साधारणपणे हातगाडीवाले, भाजीपालाविक्रेते, मोलकरणी किंवा तत्सम व्यवसायातले पालक दिसतात. नाहीतर मग विकलांगता, आजार अशी काही खडतर परिस्थिती. त्यातून उभं राहात राहात यांनी अभ्यास केला आणि मार्क्स मिळवले याचं कौतुक आहे. पण अगदी झाडून सर्वांना फक्त इंजिनियर किंवा डॉक्टर यापैकी एकच व्हायचं आहे. हे दोन व्यवसाय म्हणजेच गरीबीतून बाहेर येण्याचे राजमार्ग, असं खरंच आहे का? की इतर कोर्सेसना पैसे फारसे लागणार नाहीत अश्या अंदाजाने डॉक्टर आणि इंजिनियरेच्छुकच निवडले जात असावेत या मदतीसाठी? हे व्यवसाय वाईट आहेत असं नव्हे पण एकाचवेळी पन्नासेक होतकरुंपैकी प्रत्येकाला याखेरीज एकही ऑप्शन ध्येय म्हणून दिसू नये याचं वाईट वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे म्हणणे खरे आहे गवि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरंय. पण, सुस्थित कुटुंबांतील विद्यार्थ्यांचा विदादेखील याहून वेगळे चित्र उभे करणार नाही असा अंदाज. Sad

मुळात दहावीत ९०%च्या वर मिळूनही "सायन्स/कॉमर्स"ला स्वेच्छेने (ठराविक कॉलेजच हवं म्हणून नाईलाज असे नव्हे) न जाण्याची "धीटाई" दाखवणारे किती निपजतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पण अगदी झाडून सर्वांना फक्त इंजिनियर किंवा डॉक्टर यापैकी एकच व्हायचं आहे. हे दोन व्यवसाय म्हणजेच गरीबीतून बाहेर येण्याचे राजमार्ग, असं खरंच आहे का?

आपल्या शिक्षणप्रवाहात चांगले मार्क पाडणारा प्रतिभावान असण्याची शक्यता कमी आहे, तो मेहनत करणारा आणि तांत्रिक विषयात गती असणाराच असणार, तो इतरत्र जायचा विचार का करेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यक्तिगत विचारानुसार त्यांना मदत देण्यातून आणखी एक डॉक्टर किंवा इंजिनियरच निर्माण होण्याचं ठरलेलं असेल तर ती मदत देण्यातली इच्छा क्षीण झाल्यासारखी वाटतेय. त्यांनी काय करावं हा अर्थातच त्यांचा निर्णय.. पण इतर पर्यायच त्यांच्या मनात येण्याइतपतही चमकदार नसावेत असं नको असं वाटतं. दहावीच्या लेव्हलला ते इंजिनियर व्हायचं किंवा डॉक्टर व्हायचं इतकंच नव्हे तर त्यातलं स्पेशलायझेशनही सांगताहेत (नेमका कशाचा सर्जन, नेमका कोणत्या प्रकारचा इंजिनियर इ इ) तर मग सीए, सीएस, यूपीएससी, प्रीमियम एमबीए, प्रोफेसर, शास्त्रज्ञ, नेव्ही, मर्चंट नेव्ही, संशोधक, फॉरेन लँग्वेजमधे उच्चशिक्षण अशापैकी काहीच ऑप्शन मनात असू नये एकाच्याही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधारण ट्रेन्ड बघुनच बरेचजण ठरवत असावेत, इतर उच्चशिक्षणाबद्दलचे अज्ञान आणि त्याचे जवळचे आर्थिक फायदे ह्याबद्दलही फारशी माहिती ना मागत मिळत असेल ह्याबद्दल साशंक आहे, त्यातही हुशार असणारे पुढे डॉक्टरेट करण्याचा प्रतत्न करतातच पण मुळातच सर्वायव्हल हाच एक उद्देश बर्‍याच अंशी असतो असे माझ्या माहितीत पहाण्यात आले आहे.

व्यक्तिगत विचारानुसार त्यांना मदत देण्यातून आणखी एक डॉक्टर किंवा इंजिनियरच निर्माण होण्याचं ठरलेलं असेल तर ती मदत देण्यातली इच्छा क्षीण झाल्यासारखी वाटतेय.

मदत समतेसाठी आहे का इतर काही कारणांसाठी वैयक्तिक मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरे तर मर्चंट नेव्ही मधे कॅडेट म्हणुन जाणे हे ही शक्य आहे ( १२ वी नंतर ). आणि सैन्यदलाचा पर्याय पण आहेच.
माझ्या ओळखीतला एक माणुस बराच पूर्वी १२ वी नंतर एस्सार शिपिंग मधे कॅडेट म्हणुन लागला. पगार जवळजवळ नव्हताच, पण खाउन पिउन शिप वर काम होते. तो वयाच्या ३० व्या वर्षी कॅप्टन ची परीक्षा पास झाला. गेले कीत्येक वर्ष ऑईल आणि केमिकल चे टँकर वर कॅप्टन म्हणुन काम करतोय.

दोन्ही ला पैसे लागत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुधा हा सिलेक्शन बायस असावा. मर्चंट नेव्ही, सिक्युरिटी, आर्ट्स इत्यादिंकडे जायचे तर कदाचित प्रचंड आर्थिक खर्च नसेल. मग मदत कसली मागायची व्यासपीठाद्वारे? म्हणून अशा इच्छा असलेल्यांना या लिस्टमधे स्थानच नसेल. केवळ खर्चिक कोर्सेस करु इच्छिणारेच लोक त्यात येत असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मर्चंट नेव्हीचा 'शैक्षणिक' खर्च प्रचण्ड आहे. अन 'नोकरी' मिळवायला लय हाय उपस करावी लागते. माझे दोन जवळचे लोक यात आहेत. पहिला चीफ इंजिनियर, कॅप्टन इतकाच पगार मिळवतो, जो महिना ६ लाख रफली पडतो, यांना संपूर्ण टॅक्स माफी असते. दुसरा मुलगा नुकताच जॉईन झाला, याला जॉईन करून घेण्यासाठी पहिल्या चीफ इंजिनियरनेही फार वशिले लावले तेव्हा जमले.

नेव्हीत क्लास४ म्हणून लागायचे तरीही भरपूर कष्ट आहेत.

*

शिकुरिटीवाले भिकार्‍यापेक्षा ही बरे कमवत नाहीत. सिक्युरिटी एजन्सीतून जी माणसे मिळतात त्यांना जास्तीत जास्त २-३०० रुपये रोज मिळतो. रोजंदारीवरच कंत्राटी असतात. रात्रभर हास्पिटलाबाहेर खुर्चीत पेंगणारा खाकीवर्दीवाला 'शिकुरिटी' मॅक्स ४-५ हजार रुपये महिन्यावर काम करतो. आय मीन तितके पैसे मी एजन्सीवाल्याला देतो. याला किती मिळतात कुणास ठाऊक.

*

आर्ट्स :

हे करून शक्यतो सिव्हिल सर्विसमधे घुसण्याच मुलांचा कल असतो. अगदी आयेयेस नव्हे, तर एम्पीएस्सी तरी. प्रोबेशनमधेच दोन्ही हातानी अन पायांनीही खायला सुरुवात करतात.

यातही जमत नाही ती मुलं, पहाट-सायंकाळच्यावेळी जर स्टेट हायवेवरून गाडी चालवत गेलात, तर कोणत्याही खेड्याजवळ रस्त्याच्या बाजूने पळत जाणारी तरूण मुले दिसतात. हे असतात 'भरती'वाले. पोलीस, एसार्पी, अन तत्सम अनेक प्रकारच्या भरत्या भारतात सुरू असतात. त्यातल्या कुठल्याही खाकी वर्दीत घुसून शक्य तितक्या लवकर खाणे, हाच प्रकार असतो.

***

"अभ्यास" करून पुढे जायचं, तर इंजिनियर होऊन आयटीत/कंपनीत, अन डॉक्टर होऊन सेल्फ एंप्लॉयमेंट, या दोनच ठिकाणी थोडं सीधं जगता येतं, असं तरुणाईचं एकंदर इंप्रेशन आहे.

-- असे माझे मत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मर्चंट नेव्हीचा 'शैक्षणिक' खर्च प्रचण्ड आहे.

मर्चंट नेव्हीत जाण्याचे बरेच मार्ग आहेत. मी कॅडेट म्हणुन जाण्याच्या मार्गा बद्दल बोलत होते. ज्यात तुम्हाला फुकट राबवून घेतात, पण शिकवतात पण. नंतर थर्ड ऑफिसर म्हणुन काम मिळते आणि पगार चालू होते. त्याच्या पुढे परिक्षा देत ( स्वताच्या खर्चाने ) कॅप्टन पर्यंत पोचु शकता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॅडेट = "भरती"च. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

स्टेटबँकेच्या (शहरातील) मुख्य शाखेत मिळतात. ही मुख्य शाखा साधारणपणे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसिलदार कार्यालयाच्या आसपास असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सूर्यनमस्कार हा व्यायामप्रकार म्हणून परिचित आहे. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात घातल्यास व्यायामाबरोबरच ड जीवनसत्वाचा लाभ होतो. पण त्यासाठी उघड्या अंगाने नमस्कार घातल्यास ड जीवनसत्वाचा लाभ जास्त असतो.
जर बंद खोलीत/ बंद कपड्यानिशी घातल्यास त्याला म्हणून सूर्यनमस्कार का म्हणावे?? फक्त "ओम मित्राय नमः" वगैरे नावे घेतली म्हणून.. ड जीवनसत्वाव्यतिरीक्त सूर्याचं आणखी काही काँट्रिब्युशन असावं का? अन्यथा या व्यायामप्रकाराला साष्टांग नमस्कार हे नाव जास्त योग्य वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मर्यादित माहितीनुसार सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे ड जीवनसत्व नगण्यच मिळतं. खरोखर ड जीवनसत्व उन्हापासून निर्माण व्हायचं तर टळटळीत उन्हात वावरलं पाहिजे असं ऐकलंय. अन्यथा सप्लीमेंटला पर्याय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोवळं असो वा दुपारचं उन त्वचेवर पडलं तरच ड जीवनसत्व मिळतं.. एवढ नक्की.. कपड्यांवर पडून काही उपयोग नाही..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो हो.. हिरॉईनावस्था ही प्राथमिक अट आहेच. शिवाय ऊनही कडक हवं इतकाच मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हं म्हणजे, सि-थ्रू कापड चालतं तर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार कडक उन्हाने सनबर्न होण्याची शक्यता वाढते. अतीनील किरणे ड जीवनसत्व बनवतात, तशीच ती त्वचेचे कॅन्सरही निर्माण करू शकतात. सकाळचे "कोवळे" उन त्यामानाने बरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

नमस्कार असल्याने "कोणाला" तर सूर्याला म्हणून तसे म्हणत असावेत, नावंही सूर्याचीच आहेत, सूर्याची कॉन्ट्री नाही असे वाटत असल्यास स्व-नमस्कार कसे वाटते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुर्यनमस्कार हा उत्तम मसल रिलॅक्सटंट व विविध नसा (नर्व्ह्ज), जॉइंट्स, मणका यांच्यावर योग्य तो संस्कार करणारा व्यायाम प्रकार आहे असे वाटते.

भारतीय समाजात हे नमस्कार उघड्यावर घातले तर पुरूषांना ड जीवनसत्त्व हा अतिरिक्त लाभ आहे असे म्हणता येईल. मात्र तो काही सूर्यनमस्काराचा उद्देश नव्हे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सूर्यनमस्कारांनी फार उत्तम वाटते. नावे न घेताही.
अन सूर्याची फक्त नावे घेतली तरी अत्युत्तम निव्वळ अप्रतिम वाटते, नमस्कार न करताही.
.
मानसिक सुरक्षितता असेल पण सूर्य हा दारिद्र्यविनाशक अन महारोगनिवारक मानला जातो. नवग्राधिपती अन तेजस्वी तर तो आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सूर्यनमस्कारांनी फार उत्तम वाटते. नावे न घेताही

सहमत

अन सूर्याची फक्त नावे घेतली तरी अत्युत्तम निव्वळ अप्रतिम वाटते, नमस्कार न करताही

आळसाला उत्तेजन देणारा विचार Wink

नवग्राधिपती अन तेजस्वी तर तो आहेच

सहमत

मानसिक सुरक्षितता असेल पण सूर्य हा दारिद्र्यविनाशक अन महारोगनिवारक मानला जातो

असहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>ी पन्नासेक होतकरुंपैकी प्रत्येकाला याखेरीज एकही ऑप्शन ध्येय म्हणून दिसू नये याचं वाईट वाटतं.>>!!!खरंय
अनु राव: माझानातेवाईक आहे एस्सारमधे
.सेम केस.

लांबच्या विहिरीवरून दोन घागरी पाणी काढून आणणे=१०० सूर्य नमस्काराचे पुण्य मिळते(=मिळत होते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑफीसमध्ये, बसमध्ये - या विस्कॉनिअन्स चा अ‍ॅक्सेन्ट समजत नसल्याने फार झोन आऊट व्हायला होते ब्वॉ. एकदम आपल्या कोशात रहायची सवय लागते. अल्झाइमर लवकर व्हायचा अशाने. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इन्टर्व्युत एक बकवास अन खोटं बोलण्यास उद्युक्त करणारा प्रश्न असतो - तुमचे विकनेसेस कोणते? तुम्ही काय उत्तर देता?
- मी तर स्वतःला पढवुनच ठेवले आहे - जरा विचार केल्याचं नाटक कर अन मग उत्तर दे - "मी एकदा एखादी गोष्ट हाती घेतली की तड लावतेच किंवा त्यात फार खोलात शिरते. हा गुण म्हणा की दुर्गुण. अप टू यु" Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मर्चंट नेव्हीचा 'शैक्षणिक' खर्च प्रचण्ड आहे. अन 'नोकरी' मिळवायला लय हाय उपस करावी लागते. >>>----मंदी आहे.
नटस् क्रॅक करून भुगा केला आहे!!!!

अॅक्संटवर उपाय:-आपणच दासबेध मोठ्याने वाचून रेकॅार्डींग करून ठेवा आणि प्रवासात टोपण लावून ( हेडफोनस )ऐकत राहायचे.शुद्ध मराठी!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महोदय,
एक सूचना करू शकतो काय?
तुमचे पुण्य २ झाल्याचे दिसते आहे म्हणजे तुमचा येथील वावर बर्‍यापैकी आहे. तरीही आपण कोणत्याही प्रतिसादास उत्तर देताना धाग्याच्या शेवटी टंकता असे दिसते. कदाचित 'थ्रेडेड' व्ह्यु न वापरल्यानेही असे होत असावे.
ज्या प्रतिसादास उपप्रतिसाद द्यावयाचा आहे, तेथे खाली "प्रतिसाद" असे लिहिलेले दिसते. (श्रेणी देतो तिथे, खाली.) त्यावर टिचकी मारल्यास आपले प्रतिसादात्मक लिखाण योग्य जागी दिसेल व त्यावर टिप्पणी / चर्चा सोपी जाईल.

रच्याकने: दासबोधाबद्दलचे वाक्य आपली स्वाक्षरी आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पटलंय आणि करता येतंय /करेन.नेव्ही ते नमस्कार दोन प्रतिसाद न लिहिता शेवटी एकच टाकला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटलंय आणि करता येतंय /करेन.नेव्ही ते नमस्कार दोन प्रतिसाद न लिहिता शेवटी एकच टाकला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Display: Threaded आहे का?
नसल्यास करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आडकित्ता यांच्या 09.03च्य सूचनेप्रमाणे >>पटलंय आणि करता येतंय /करेन.नेव्ही ते नमस्कार दोन प्रतिसाद न लिहिता शेवटी एकच टाकला.>>हे लगेच त्याखालील 'प्रतिसाद'द्यावर टिचकी मारून लिहिलं परंतू ती पोस्ट दोन पायरी नंतर दिसतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तर बरोबर दिसतंय.... दोन पायरी नंतर म्हणजे काय?

आडकित्ता यांना तुम्ही प्रतिसाद दिला असेल पण त्यापूर्वी त्यांना अ यांनी प्रतिसाद दिला आणि अ यांना ब यांनी प्रतिसाद दिला तर तुमचा आडकित्ता यांना दिलेला प्रतिसाद ब यांच्या अ ला दिलेल्या प्रतिसादानंतर पण अ यांच्या प्रतिसादाच्या लायनीत अलाइन्ड दिसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>>गुरुवार, 25/06/2015 - 13:37 |मला तर बरोबर दिसतंय.... दोन(Score: 1) नितिन थत्ते पुण्य: 2 मला तर बरोबर दिसतंय.... दोन पायरी नंतर म्हणजे काय? आडकित्ता यांना तुम्ही प्रतिसाद दिला असेल पण >>>ठीक आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Display: Threaded आहे का?
नसल्यास करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Display -threaded होता अगोदर.परंतू मला प्रत्येक प्रतिसादाची एकच ओळ दिसायची आणि प्रत्येकावर वेगळी टिचकी मारल्यावरच तो उघडायचा. एकदा 'flat'हा पर्याय केला तेव्हा सर्वच दिसायला लागले आणि त्यामुळे 'flat',करून ठेवले आहे.ठीक आहे.काही तरी संगणकावर पाहणाय्रांस वेगळे दिसत असावे. संदर्भ टाकून प्रतिसाद लिहित जाईन म्हणजे पुढेमागे झाल्यास अडचण येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हां Display Threshold निगेटिव्ह ठेवा Wink नक्की सर्व प्रतिसाद दिसतील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या नेट न्यूट्रॅलिटीचे काय झाले पुढे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नेट न्युट्र---
मी याचेबद्दल वाचन केले आणि असे कळले की काही सर्विस प्रवाइडर अमुकएक वेबसाइट पुढे आणणार बाकी टोलवणार.त्यांचे साटेलोटे होण्यास तुम्ही हातभार लावता याकरता डेटा स्वस्त देणार.एकप्रकारचे जाहिरात तंत्र म्हणता येईल.उदाहरणार्थ:अमुक कंपनी चे सिम कार्ड असेल तर फ्लिपकार्टवरूनच खरेदी करावी लागेल वगैरे.म्हणजे ग्राहकाचे स्वातंत्र्य कमी करण्याच्यक बदल्यात स्वस्त इंटरनेट.इकडच्या लोकांनी नकार दिल्याने झुकरबाग -पाटील थोडे नाराज झालेत म्हणे.

रिलायंसच्या कार्डास फेसबुक शुक्रवारी फ्री असते,नेटपॅकवर पंधरादिवस वाटसाप,फेबु,ट्विटर फ्री.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह अच्छा, धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कष्टम मेड पगडी कुठे मिळू शकेल काय? आय मीन पुणेरी पगडी, मराठेशाही पागोटे, इ. प्रचलित प्रकार नव्हेत तर अंमळ वेगळे स्पेसिफिकेशन असलेली पगडी बनवून देणारे पगडबंद कुणाला माहिती आहेत काय? स्पेसिफिकेशन म्ह. फोटो इतकेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काय रे लग्नाची तयारी हा? Wink ( कृहघे. मला माहीत नाही तुझं लग्न झालं आहे की नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही. आयडल क्युरिऑसिटी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुण्यात काही बायका ( टेलर) नऊवारी साडी शिवून देतात त्यांच्यापैकीच कोणी डोक्याचं माप घेवून पगडी पण बनवून देतात असं ऐकलं आहे . आईला विचारून अजून खात्रीने माहिती देवू शकेन .

तुम्ही मिरजमध्ये असता न ?
माझ्या मिरजेच्या आजोबांकडे(आईचे बाबा ) एक लाल पगडी होती / आहे . मला तिचा आकार वगैरे माहिती नाही नक्की. पण एखाद्या दिवसासाठी हवी असेल तर ते पण देवू शकतील .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

I had two contacts. I am unable to find them. but i found this one on web:

http://khandaredresswala.in/contactus.php

hope it will do.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

अंमळ वेगळे ? राजस्थानी ? फक्त फोटो अथवा प्रत्यक्ष पाहायच्या आहेत ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेल- राजस्थानी नव्हे. मराठाकालीन ब्राह्मणी पगडी. पुणेरी पगडी हे त्याचे लहान रूप आहे. बेसिकली सिमिलर, पण साईझ मोठा. सध्या रेडिमेड मिळते ती पुणेरी पगडीच, तशी नकोय.

तशी पगडी असेल तर पहायचीही आहे अन बनवून मिळाली तर बेष्टच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अशी काय?


  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

येस. अशीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

येस. अशीच. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

औंध ( सातारा )येथे सापडेल असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद! यावच्छक्य पाहतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहज आठवलं म्हणून:
या पुस्तकात बय्राच राजस्थानी पगड्या दिल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बरेचदा मला हा मोह होतो.
उदा. "खूप लोक आहेत" हे श्याम मनोहरांचं पुस्तक केवळ त्याच्या नावावरून विकत घेतलं. पुढे ते वाचल्यावर.. जाऊ देत.
किंवा मग पेंडशांचं "ऑक्टोपस". खानोलकरांचं "अजगर" ही पुस्तकं त्यांचं नाव /मुखपृष्ठ पाहून घेतली होती.
मिलिंद बोकीलांचं "गवत्या"सुद्धा मुखपृष्ठ/नाव काँबिनेशनमुळे वाचायला घेतलं.

तुम्ही कोणी केवळ पुस्तकांच्या नावाकडे किंवा रूपड्याकडे आकर्षित होऊन पुस्तकं विकत/वाचायला घेतली आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे बीच-बुक्स (टाइमपास समुद्रकिनारी वाळूत सन बाथ घेत वाचायची) उन्हाळ्याची पुस्तके येतात. त्यांची कव्हर्स अप्रतिम असतात. जांभळट-गुलाबी-फुले असलेली-मोत्याची सर वगैरे चित्रे असलेली. घेत नाही Smile
कारण मी कॉलेजमध्ये मिल्स अँड बुन्स वाचले नाही. अन इथे तीशीनंतर एखादं नोरा रॉबर्ट्सचं पुस्तक वाचलं. पण हे कळलं की प्रिल्युड्/चेसिंग गेम" संपला की आपल्याला रस रहात नाही. जोवर नायक-नायिका भांडत आणि "विरोधात" असतात तेव्हाच खणाखणी अन सेक्श्युअल टेन्शन वाचायला मजा येते. ज्याक्षणी one of them surrenders मजाच जाते Wink


.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदा एक मेज्जर के एल पी डी झाला होता. अनिल अवचट लिखित 'पुण्याची अपूर्वाई' हे पुस्तक खरेदी केलं तीर्थरूपांना पाहिजे होतं म्हणून, पाने चाळली तेव्हा कळायचं बंद झालं आणि रिटर्न करून टाकलो तेच्यायला. ROFL पुढे तीर्थरूपांनाही आमचे म्हण्णे पटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनिल अवचट हा एक अवलिया आहे असे ऐकून आहे. बाकी त्यांचे लिखाण हे "त्यांना जसे दिसले तसे त्यांनी मांडले" अशा पद्धतीने घ्या असा सल्ला मला माझ्या मित्रांकडून (ज्यांनी अवचटांचे साहित्य वाचलेले आहे) मिळालेला आहे. मीमराठी वर एका ज्येष्ठ युजर ने त्यांच्या लिखाणाचा "समाचार" घेतला होता. धाग्यावर लई धुमश्चक्री झाली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नै कळ्ळे. नक्की काय प्रॉब्लेम झाला होता?
मला अवचटांचं पुण्याची अपुर्वाई आवडल्याचं आठवतंय (बहुदा ते माझ्या संग्रही सुद्धा आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रॉब्लेम अ‍ॅज़ सच कै नै.

पुण्याची अपूर्वाई म्हणजे साहित्यिक काहीतरी, अंमळ पुलंस्टाईल काहीसे वर्णन असेलसे वाटले होते. पण विषय कंप्लीटलि वेगळाच आहे त्याचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हो हो...मी हे कांड नेहमी करतो. असे कलपदचे अनेक किस्से आहेत.

ऑक्टोपस पेंडशांनी टाकलेली एक जिलबी आहे. त्यांच्या आत्मचरित्रात असा उल्लेख आहे की ते फोर्टातल्या एका हॉटेलात बसलेले असताना त्यांना पलिकडच्या टेबलावरून दोन तरुणींचा संवाद ऐकू आला. एक मुलगी आपल्या promiscuity बद्दल खुलेपणाने बोलत असते. त्यावरून पेंडशांना पहिला प्रसंग सुचला आणि मग पुढे कादंबरी. पण पहिला प्रसंग वगळता बाकी गॅस आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ऑक्टोपस पकाऊ आहे. मी प्रयत्न करून ती कशीबशी वाचली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'ऑक्टोपस' ने भयंकर झपाटून गेलेलो. आता पुन्हा वाचतो तेंव्हा जरा पकतोच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

'ऑक्टोपस' मी एकदाच वाचली अनेक वर्षांपूर्वी; तेव्हातरी आवडलीच होती (लायब्ररीतून हार्डबाइंड केलेली होती, मुखपृष्ठ (असले तर) पाहिलेले आठवत नाही). टी व्हीवर मलिकाही झाली होती यावर- प्रतिक्षा लोणकर, मोहन आगाशे होते. मालिकाही आवडली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मते ऑक्टोपस मराठीमधली एक काळाच्या पुढची कादंबरी होती. शहरी मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आलेले लोक जेव्हा बक्कळ पैसा कमवू लागतात आणि प्रत्येक गोष्टीकडे धंदेवाईक नजरेनं पाहू लागतात, तेव्हा त्यांच्या मूल्यव्यवस्थेचं काय होऊ शकतं ह्याचं मला ते एक प्रभावी चित्रण वाटतं. आर्थिक उदारीकरणानंतर घडलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर तर ते खूपच वेधक वाटतं. शिवाय, लैंगिकतेला भिडण्याचा मराठीतला तो एक सणसणीत प्रयोग आहे. स्त्री-पुरुषांमधल्या लैंगिक राजकारणाचं असं चित्रण तेव्हाच्या मराठी साहित्यात तर दुर्मीळ होतंच, पण अजूनही ते तसंच आहे. मला श्री.ना. पेंडसे ब्रिलियंट वाटण्यामागे 'तुंबाडचे खोत'पेक्षा 'लव्हाळी' आणि 'ऑक्टोपस'चा वाटा अधिक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काहीही हं चिंजं, असं म्हणण्याचा मोह आवरलाय. Tongue

'ऑक्टोपस'मधे जे आहे त्याला लैंगिक राजकारण म्हणायचं म्हणजे 'दिल दोस्ती दुनियादारी'मधल्या आचरटपणाला मराठी 'तरुणाई'ची (चार्वी यांचे आभार मानूनः हे शब्दा, मी तुझ्या वाट्याला गेल्याबद्दल नियती मला माफ करो) अभिव्यक्ती म्हणण्यासारखं आहे. पुढे कथावस्तू उघड होऊ शकते, नको असेल त्यांनी वाचू नका.

समलिंगी संबंधांत रस असलेल्या एका पुरुषानं त्याच्या पत्नीला पद्धतशीरपणे उलट बदनाम करत राहणं, म्हणजे लैंगिक राजकारण? की मिनीला तिच्यापेक्षा बराच मोठा आणि धसमुसळा रांगडा शृंगार आवडत असतो, आणि तरीही ती तिच्या लाभासाठी शरीर रीतसर वापरते, हे लैंगिक राजकारण? मला ते काहीसे बळंच सनसनाटी केलेले तपशील वाटले. (त्या प्रकारच्या राजकारणाचे तपशील तर 'कलंदर'मध्येही आहेत. पण ते 'कलंदर'मध्ये कितीतरी अधिक नैसर्गिकपणे येतात. त्या मानाने 'ऑक्टोपस' रीतसर सनसनाटी आणि पाडलेली वाटते - मला.) त्या वेळी धक्कादायक वाटले असतील असे तपशील बरेच आहेत त्यात. पण तसले प्रयोग होते, म्हणून ती कादंबरी थोर होते का? मला नाही वाटत. उलट त्या कादंबरीतलं संवादांचं भरताड मला अतिशय पकाऊ वाटलं होतं. शेवटावर 'बरं मग? पुढे काय? इतकं काय?' अशी प्रतिक्रिया झाली.

असो. तुमच्या प्रतिक्रियेमुळे चकित होऊन मी ती पुन्हा वाचून पाहीन. पण तूर्तास तरी असहमतीच. 'लव्हाळी'बद्दल मात्र बिनशर्त सहमती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ज्यांना कथानकातला रहस्यभेद वाचायचा नाही आहे त्यांनी प्रतिसाद वाचू नये.

खरं तर एक साधी बाई स्वतःला हुशार समजणार्‍या पुरुषाला चांगली ओळखून असते आणि त्यावर कुरघोडी करते हे रोचक आहे. त्याउलट, एरवीच्या आयुष्यात कर्तृत्ववान भासणारा पुरुष (पौरुषाच्या अवास्तव कल्पनांमुळे किंवा अहंगंडामुळे) स्वतःच्या लैंगिक प्रवृत्ती नक्की काय आहेत ते ओळखून त्यांना भिडू शकत नाही. त्यामुळे स्वत:चं सुख कशात आहे हेसुद्धा तो जाणू शकत नाही. त्यामुळे तो कमकुवत ठरतो. सारखा फायद्यातोट्याचा विचार करणारा पुरुष तसं करत करतच कसा तोंडघशी पडतो हे रोचक आहे. आणि तरीही, त्यात कुठेही त्याच्या लैंगिक वर्तनावर नैतिक ताशेरे नाहीत. म्हणून ते काळाच्या पुढेही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पुन्हा वाचून बघीन. पण मला हे पटत नाही.
बरेचदा स्त्रिया लैंगिक राजकारणाचा वापर अगदी सहजगत्या, कोणत्याही गाजावानाशिवाय आणि सूक्ष्म पातळ्यांवर करत असतात असं निरीक्षण. त्याच्या तुलनेत तुम्ही पेंडशांचं ज्या रेखाटनासाठी कौतुक करताय, ते अगदीच सामान्य, बटबटीत आणि बळंच वाटतं. नैतिक ताशेरे नाहीत, याबद्दलही असहमती. निवेदकानं लालजीबद्दल (नावात चूभूदेघे) वाटलेली घृणा नोंदल्याची मला स्पष्ट आठवण आहे. (आता पुन्हा वाचून पाहायलाच पाहिजे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>> बरेचदा स्त्रिया लैंगिक राजकारणाचा वापर अगदी सहजगत्या, कोणत्याही गाजावानाशिवाय आणि सूक्ष्म पातळ्यांवर करत असतात असं निरीक्षण. त्याच्या तुलनेत तुम्ही पेंडशांचं ज्या रेखाटनासाठी कौतुक करताय, ते अगदीच सामान्य, बटबटीत आणि बळंच वाटतं. <<

वास्तवात तसं होत असतं ह्याच्याशी सहमत. साहित्यात मात्र स्त्रीला कपटी खलनायिका वगैरे न करता, तिची ग्रेस सांभाळत, अत्यंत शांतपणे असं दाखवण्याची परंपरा मराठीत फारशी आढळत नाही. हे वास्तव साहित्यात आणण्यासाठी मला पेंडसे महत्त्वाचे वाटतात.

>> नैतिक ताशेरे नाहीत, याबद्दलही असहमती. निवेदकानं लालजीबद्दल (नावात चूभूदेघे) वाटलेली घृणा नोंदल्याची मला स्पष्ट आठवण आहे. (आता पुन्हा वाचून पाहायलाच पाहिजे.) <<

कादंबरी संपल्यानंतर दिसणारा प्रोटॅगॉनिस्ट केविलवाणा भासतो, पण घृणास्पद भासत नाही. त्याचे पाय मातीचे आहेत, पण तो कोणत्याही अर्थानं खलनायक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे वास्तव साहित्यात आणण्यासाठी मला पेंडसे महत्त्वाचे वाटतात.

आहेतच पेंडसे त्यासाठी महत्त्वाचे. (मलाही पेंडसे या आणि इतर कारणांसाठी अतिशय आवडतात. इतके, की त्यांची न आवडलेली पुस्तकं सांगणं जास्त सोपं जाईल.) त्याबद्दल अजिबात दुमत नाही. पण त्यांना हे तितक्या परिणामकारकपणे 'ऑक्टोपस'मध्ये जमलंय असं वाटत नाही. त्याहून 'रथचक्र', 'कलंदर', 'हत्या', 'एक होती आजी', 'तुंबाडचे खोत'मधला काही भाग अधिक उजवा आहे, असं वाटतं. हेतू कितीही चांगला असला, तरी आधीच्या पुस्तकांच्या तुलनेत 'ऑक्टोपस' पसरट, बटबटीत, परिणामात उणावलेली वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माझ्यामते ऑक्टोपस मधलं जग हे पेंडशांच्या अनुभवापासून बरंच दूरवरचं आहे, त्यामुळे त्यांच्या इतर पुस्तकांत जशी परिणामकारक वर्णनं करतात ते इथे आलेलं नाहीये.
शिवाय कादंबरी संवाद आणि पत्रांमधे लिहिली गेलीये, तेव्हा त्यामु़ळे कदाचित तीही मर्यादा आली असेल.
एकूण कादंबरी विशेष भावली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लव्हाळी म्हणजे डायरीच्या फॉर्ममधली कादंबरी ना? सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मोठ्या कंपन्या आणि प्रस्थापित लेखक कधी कधी शिळे बटाटेवडे डबलफ्राइ करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समलैंगिकपणा "बरा" करणार्‍या डॉक्टराचा पत्ता पायजेलाय.
समलैंगिक असण्याची वृत्ती 'बरी' करता येते का ?
"समाजात कोणीही समलैंगिक असायला नको " असा ठराव पास केलाय असं घटकाभर समजू.
पण जे समलैंगिक आहेत; त्यांचं समलैंगिकत्व वैद्यकीय मदतीनं वगैरे बदलता येतं का ?
म्हणजे "ती विकृती आहे आणि बरी करता येते" असं म्हण्णारे जे आहेत;
त्यांनी आजवर नक्की कितीजण असे "बरे केलेत" किंवा "बरे झालेले" पाहिलेत ?
.
.
त्यांना कुणा डॉक्टरनं वगैरे सांगितलेलं आहे का "मी ह्यांना बरं करतो" वगैरे ?
.
.
अशा डॉक्टरचा पत्ता ठाउक असूनही न सांगितल्यास तुम्हाला "एका पेशण्टला बरे न केल्याचे" पाप लागेल. तुमच्या पुढच्या सात पिढ्या पैदाइशी टकल्या असतील.
.
.
अशा डॉक्टारचा पत्ता किम्वा नावही ठौक नसताना "बरी करता येते" असे लिहिले असल्यास तुम्हाला धडाधडित खोटं बोल्ल्याचे पाप लागेल. अहो पाप कसलं ?
खोटं बोलणं हा तर कायद्यानंच गुन्हाय. तुम्हाला कोर्टात खेचता येइल.
.
.
पुरवणी -- बाबा रामदेव ह्याम्चे नाव डॉक्टर म्हणून गणले जाणार नाही. (मी बाबा रामदेवांच्या योगासनं करण्याच्या कौशल्याचा फ्यान आहे; पण ते स्वतंत्र प्रकरण आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेतल्या समलिंगी विवाहाला मिळालेल्या मान्यतेचा भारतातल्या सरोगसीच्या धंद्यावर परिणाम होईल का? झाल्यास किती? दत्तक घेणारे बहुसंख्य असावेत ही आशा. समलिंगी स्त्रियांना सरोगसीची गरज नसल्याने दत्तक घेण्याचे प्रमाण त्यांच्यात अत्यल्प असेल असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ऐसी' चे अ‍ॅप कधी येणार आहे ? अ‍ॅपमुळे भ्रमणध्वनीवर वाचायला सुलभ वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भ्रमणध्वनीच्या ब्राउजर मध्ये 'रीडींग मोड/सिंगल कॅालम व्हु्यु ' करून बघा .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगलं अ‍ॅप तयार करणं अवघड गोष्ट आहे. केवळ एक रॅपर अॅप तयार करुन आत पुन्हा वेबसाईटचा एचटीएमएल कोड एम्बेड करणे म्हणजे अॅप नाही.

मात्र मोबाईलवरील वापरकर्त्यांना चांगला अनुभव येण्यासाठी काही कॉस्मेटिक बदल करता येतील असे वाटते. एखादा वापरकर्ता मोबाईलवरुन संस्थळ पाहतो आहे असे लक्षात आले तर उजवीकडचे रकाने दाखवणे टाळता येईल. त्यामुळं आडवी पेजसाईज बऱ्यापैकी कमी होईल.

मोबाईल फ्रेंडली साईटमध्ये साधारण फक्त मुख्य कंटेंट दाखवायचा

उदाः ट्रॅकर पान

प्रकार शीर्षक लेखक प्रतिसाद शेवटचा प्रतिसादsort icon
ललित समलिंगी विवाहास मान्यतेचा निर्णय - शुभेच्छुकांचे आभार धनंजय 98
1नवीन
30/06/2015 - 09:22
चर्चाविषय आणीबाणीची पार्श्वभूमी, कारणे व परिणाम राही 96 30/06/2015 - 09:21
मौजमजा 'पल भर के लिये कोई मुझे प्यार कर ले...' मेघना भुस्कुटे 9 30/06/2015 - 09:21
चर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकरः २०१५ धागा - ५ ऋता 112 30/06/2015 - 08:50
माहिती रॅट रेसचा विळखा प्रभाकर नानावटी 66 30/06/2015 - 07:41
मौजमजा ताटातूट /शब-ए-हिज्र(विरहरात्र) .शुचि. 18 30/06/2015 - 07:22
ललित भुलभुलैय्या .शुचि. 18
2नवीन
30/06/2015 - 06:45
कलादालन छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १२: पानी तो पानी हैं.. अमुक 35
4नवीन
30/06/2015 - 05:40
कलादालन लाईटहौशी (भाग ३) नवीन मुळापासून 1
1नवीन
30/06/2015 - 03:53
चर्चाविषय ही बातमी समजली का? - ७९ .शुचि. 16 30/06/2015 - 03:03
विशेष संपादकीय ऐसीअक्षरे 18 30/06/2015 - 02:27
चर्चाविषय मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ५१ प्रकाश घाटपांडे 89
7नवीन
30/06/2015 - 02:16
विशेष पुत्र व्हावा ऐसा पढाकू संवेद 5 30/06/2015 - 00:07
चर्चाविषय सध्या काय ऐकताय / अलीकडे काय ऐकलंत? - ६ बॅटमॅन 15 29/06/2015 - 12:44
मौजमजा अग अग म्हशी अविनाशकुलकर्णी 6 29/06/2015 - 10:12
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ‍ॅप बनवायचेच तर काहीसे असे असावे असे मनात आले:

- ठराविक १० (किंवा मर्यादित संख्येने) धागे त्यात अ‍ॅडवता येतील. हे प्रत्येक वापरकर्त्याला सध्या "ज्वलंत" वाटणारे धागे असतील.
- तेवढ्याच धाग्यांवर नवीन प्रतिक्रिया आल्यास ऑटोमॅटिक अपडेट अलर्ट येईल (ठराविक मिनिटांनी रिफ्रेश). तेवढ्याच धाग्यांवर अ‍ॅपद्वारे प्रतिक्रिया झटकन देता येईल (चॅटसारखी)
- खेरीज १० (किंवा मर्यादित संख्येने) सदस्यमित्र अ‍ॅपमधे अ‍ॅडवता येतील. तितक्यांशी थेट व्यनिसंपर्क अ‍ॅपद्वारे ठेवता येईल (चॅटसारखा)
- खरडफळा अ‍ॅपमधेही असेल. त्याद्वारे सर्वांशीच संपर्क ठेवता येईल.
-इमेजेस / मीडिया ऑटो डाउनलोड अथवा टाळणे हा ऑप्शन अ‍ॅप वापरकर्त्याला असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच ऐडीया आहे. पण तांत्रिक दृष्त्या शक्याशक्यतेचे माहिती नाही.
कोई है ऐसीका लाल/लाली जो ये करके दिखा सके!? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ठराविक १० (किंवा मर्यादित संख्येने) धागे त्यात अ‍ॅडवता येतील. हे प्रत्येक वापरकर्त्याला सध्या "ज्वलंत" वाटणारे धागे असतील.
- तेवढ्याच धाग्यांवर नवीन प्रतिक्रिया आल्यास ऑटोमॅटिक अपडेट अलर्ट येईल (ठराविक मिनिटांनी रिफ्रेश).

पहिली दीड रिक्वायरमेंट आहे त्याच आर्किटेक्चरमध्येही खूपच सोपी आहे. एचटीएमएल पार्सिंगचे बरेच एपीआय आहेत ते वापरुन धागे आणि त्यावरील प्रतिसादाचे काऊंट दाखवता येईल. ठराविक धाग्यांचा रेफरन्स साठवून ठेवून तेच धागे मॉनिटर करणेही शक्य आहे. बरेच न्यूज रीडिंग करणारे अॅप्स हाच प्रकार करतात.

पुढची रिक्वायरमेंट आहे त्या परिस्थितीत अवघड आहे. ऐसीच्या डेटाबेसची माहिती एक्चेंज करणारा एपीआय लिहायला लागेल. अॅपमध्ये लॉगाऊट होऊ नये यासाठी मोबाईल डिवाईस आयडी आणि लॉगिन आयडी यांचं मॅपिंग करुन ठेवायला लागेल. इ.इ..

तेवढ्याच धाग्यांवर अ‍ॅपद्वारे प्रतिक्रिया झटकन देता येईल (चॅटसारखी)
- खरडफळा अ‍ॅपमधेही असेल. त्याद्वारे सर्वांशीच संपर्क ठेवता येईल.

व्हॉट्सअॅप/स्काईप सारखे अॅप असताना चॅटसारख्या गोष्टीमुळे नक्की काय व्हॅल्यू अॅडिशन होईल.

- खेरीज १० (किंवा मर्यादित संख्येने) सदस्यमित्र अ‍ॅपमधे अ‍ॅडवता येतील. तितक्यांशी थेट व्यनिसंपर्क अ‍ॅपद्वारे ठेवता येईल (चॅटसारखा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! संस्थळावरचे बरेचसे सभासद एकमेकांना व्यक्तीशः ओळखत असतील पण माझ्यासारख्या काहीजणांकडे इथल्या सभासदांचे मोबाईल क्रमांक / ईमेल आयडी नसतील व तरीही गप्पा मारायच्या असतील तर 'चॅट' चा वापर होऊ शकतो. मात्र एकमेकांकडे मोबाईल क्रमांक / ईमेल आयडी नाहीत म्हणजे त्या सभासदांची जवळीकही नाही त्यामुळे चॅट काय कप्पाळ करणार असाही उपविचार आहेच म्हणा.

ऋषिकेश : अ‍ॅप नाही पण मोबी वेबसाईट बनवता येईल का हा पण विचार करता येईल. अर्थात फुकट मिळतेय तर किती मागायचे याचाही विचार करावा हे मान्य आहेच म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार. अजिबात न संकोचता कल्पना मांडा. जमल्यास करू, नैतर नै.

अ‍ॅप नाही पण मोबी वेबसाईट बनवता येईल का हा पण विचार करता येईल.

यावर मागेच विचार झाला होता.
हे सद्य ड्रुपल व्हर्जनवर करणे त्रासाचे आहे असे कळते. अपग्रेड केल्यावर हे जमेल. फक्त अपग्रेड कधी ते विचारू नका Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>मात्र एकमेकांकडे मोबाईल क्रमांक / ईमेल आयडी नाहीत म्हणजे त्या सभासदांची जवळीकही नाही त्यामुळे चॅट काय कप्पाळ करणार असाही उपविचार आहेच म्हणा.<<
एखाद्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर त्याला ती नको असलेली जवळीक वाटू शकते अशी शंका माझ्या मनात असते. अनेकांच्या मनात ती असू शकते.टंकबोलीतून समोरच्या व्यक्तीला संवादात रस नाही ( कारण काही का असेना) असे लक्षात आले तर सुज्ञ व्यक्ती संवाद थांबवतात. कधी कधी अतिपरिचायद्वज्ञा अशी स्थिती निर्माण होउ शकते याचे भान/ भय ठेवूनही काही लोक 'सुयोग्य' अंतर ठेवतात. जालीय वावरातून निर्माण झालेले संबंध व प्रत्यक्श भेटीतून निर्माण झालेले संबंध यात फरक असू शकतो. प्रत्येक माध्यमाच्या काही मर्यादा व बलस्थाने असतात. शिवाय मानवी मन ही एक गुंतागुंतीची गोष्ट आहेच. ऐसी अक्षरे हे एक कुटुंब आहे व आपण सर्व त्या विशाल कुटुंबाचे सदस्य आहोत ही भावना समजा कित्येकांच्या मनात असली तरी व्यावहारिक दृष्ट्या एकमेकांच्या अडचणीच्या वेळी परस्परांची उपयुक्तता किती? हा प्रश्न उदभवतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

व्हॉट्सअॅप/स्काईप सारखे अॅप असताना चॅटसारख्या गोष्टीमुळे नक्की काय व्हॅल्यू अॅडिशन होईल.

त्या विशिष्ट धागाविषयावर चर्चा करण्यासाठी सर्व ऐसीकरांचा ग्रुप अशा अ‍ॅप्सवर प्रत्येक वेळी एकेका विषयाचा वेगवेगळा बनणे ग्रुपच्या संख्यामर्यादेमुळे आणि अ‍ॅडमिन इश्यूजमुळे अवघड असावे. शिवाय अशा अ‍ॅप्समधे उपप्रतिसाद देता येत नाहीत.

कोणाकोणाला नेमका रस असेल ते आधीच माहीत नसल्याने विनाकारण एकेका धाग्यासाठी सर्व ऐसीकरांचा प्रचंड मोठा ग्रुप बनवून चॅट चालू करावी लागेल. त्यापे़क्षा वरील रचना बरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"प्रत्येक माध्यमाच्या काही मर्यादा व बलस्थाने असतात. "--बरोबर.
वर्गात अक्षरे गिरवायला इन मिन दहाजण असतात आणि खिडकीतून कसं लिहिताहेत हे चार जण पाहात असतात ,अॅप आल्यावर अचानक जत्रा भरणार की काय?
कोणाचा फोन नंबर मागणे नकोसं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी माझे थ्रेशोल्ड सेटिंग्ज बदलून फक्त +१:२५ या स्कोरचे प्रतिसाद उघडे दिसतील

हे २५ काय आहे? (+१ श्रेणी असणारे २५ प्रतिसाद). पण प्रत्येकच धाग्यावर असे प्रतिसाद २५ असतील काय? स्वाक्षरीत दुरुस्ती करावी ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भडकाउ श्रेणी दिली आहे. ऋषिकेशरावांना हा प्रतिसाद दिसतो का नाही याची चाचपणी करण्यासाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

))))मी माझे थ्रेशोल्ड सेटिंग्ज बदलून फक्त १:२५ या स्कोरचे प्रतिसाद उघडे दिसतील))))
१)ताकाला जाऊन भांडे लपवणे?
२)ताकाला लहान भांडे कशाला न्यायचे?
--
प्रतिक्रिया योग्य जागी हलवावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंडळी असे इअर प्लग्ज आहेत का कि जे कानात घातल्यावर किमान ५० ते ६० टक्के आवाज कमी होईल. मी मांडके हिअरिंग सर्विसेसला फोन केला होता. त्यांच्याकडे असे काही उपलब्ध नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

स्विमिंगच्या सामानाच्या दुकानातले घ्या. सॉफ्ट फ्लेक्झिबल असतात. आवाज तुम्ही म्हणता तितका कमी होईलच नक्की. पण ते कितीवेळ कानात घालावेत हे डॉक्टरच सांगू शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी अ‍ॅमेझॉन वरुन ट्रॅव्हल इअर प्लग्ज मागवले पण त्याने काही फारसा फरक पडला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

स्विमिंगचे वॉटरप्रूफ असल्याने बर्‍यापैकी साउंडप्रूफही असतात. चिमटीत दाबून ते लहान होतात आणि कानात ठेवले की थोडे फुलतात. लाहीप्रमाणे कन्सिस्टन्सी असते. तसेच आहेत का हे ट्रॅव्हल ईअरप्लग्ज?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मोबाइल अ‍ॅक्सेसरीज विकणार्‍या फेरीवाल्याकडे रबरबेलो असलेले इअरफोन मिळतात सुमारे १०० रुपयांना. त्यातला एक आणा. त्याच्या वायर्स कापून टाका आणि ते कानात घाला. (त्या बेलोमधला इअरफोन काढू नका).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्लग मिळाले का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हेलिकॉप्टर चालवणारे वापरतात ते पुर्ण कानच झाकतात त्यामुळे कानशिलांच्या हाडांतून जो आवाज आत जातो तेही बंद होतो.बोटीचे एंजीनरूममध्ये जाणारेही वापरतात.काही हेडफोन्सही या प्रकारचे असतात.फॅक्ट्रीत सेफ्टी गॅागल आणि तुम्हारा हवे असणारे इअरप्लग देतात ते स्पंजचे बोटवे स्वस्त असतात ते मिळतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेत राहत, काम करत, टाईमपास करत असलेला आणि अमेरिकेचा नागरिक नसलेला, से भारतीय, (कोणतातरी निळा पिवळा व्हिसा इ असणारा) नागरीक अमेरिकन सरकारवर जाहीर नी प्रखर टिका करू शकतो का? जालावर? पेपरात? भाषणांत? प्रदर्शने? आंदोलने?

कोणत्या पॉइंटनंतर हे वर्तन थेट देशविरोधीच मानले जाईल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

https://en.wikipedia.org/wiki/Vikram_Buddhi

हे वाचा. अर्थात ही केस एक्स्ट्रीम आहे, बुशला ठार मारले पायजे इ.इ. म्हटल्यावर ते लोक गप्प बसतील असे अपेक्षिणे चूक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

http://aisiakshare.com/node/4181 ह्या धाग्याच्या प्रस्तावातच मी एका डॉक्टारबद्दल विचारणा केली होती.
तिकडे जाणे झाले परिचयातील व्यक्तीसमवेत. जवळून एक उदाहरण पहायला मिळाले.
एरव्ही मधुमेह म्हणजे जन्मभर गोळ्या घ्याव्याच लागणार असा समज होतो.
.
.
रुग्णास मधुमेहाचे प्रथम निदान झाले ते दीडेक वर्षापूर्वी. तेव्हापासून गोळ्या सुरु आहेत मधुमेहाच्या.
मागील दोनेक आठवडे ह्या डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे योग्य ते पथ्यपाणी पाळले.
सध्याच गोळ्या दिवसातून दोनदा घेण्याऐवजी एकदाच घ्यायला साम्गण्यात आले आहे.
(गोळ्यांची फ्रिक्वेन्सी निम्म्यावर आलेली आहे.)
जर असेच प्रयत्न सुरु राहिले तर कदाचित गोळ्या घेणे पूर्णतः बंद होउही शकेलसे वाटते... एखाद-दोन महिन्यात.
.
.
हे डॉ त्रिपाठी फारच काही वेगळं सांगतात असं वाटलं नाही.(काही भाग जरुर नवीन आहे; पण उरलेला बराचसा पब्लिक डोमेनमध्ये असतो; सामान्य ज्ञान म्हणून माहिती असतो; तसाच आहे.) पण ते त्याचं महत्व परिणामकारकरित्या पटवून देतात; माणूस पथ्यपाणी वगैरेबाबत जागरुक होतो; हे त्याचं यश.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"हम इन्तजार करेंगे तेरा कयामत तक" प्रकारचं इंग्रजी गाणं सापडलं - अनेक गायक-गायिकांचं ऐकली पण हे व्हर्शन सर्वात आवडलं.

https://www.youtube.com/watch?v=MSoIBdD3WrI

He stopped loving her today

He said I'll love you 'til I die
She told him you'll forget in time
As the years went slowly by
She still preyed upon his mind.

He kept her picture on his wall
Went half crazy now and then
He still loved her through it all
Hoping she'd come back again.

He kept some letters by his bed
Dated 1962
He had underlined in red
Every single I love you.

I went to see him just today
Oh, but I didn't see no tears
All dressed up to go away
First time I'd seen him smile in years.

He stopped loving her today
They placed a wreath upon his door
And soon they'll carry him away
He stopped loving her today.

Ya' know she came to see him one last time
Oh, we all wondered if she would
And it kept running through my mind
This time he's over her for good.

He stopped loving her today
They placed a wreath upon his door
And soon they'll carry him away
He stopped loving her today...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars