छत्री दुरूस्तीला टाकली पाहिजे (३/३)
या आधीच्या भागातः काय मजा असते नाही. एखादी ओळ, एखादी कविता, एखादा प्रसंग आपल्याला किती मागे घेऊन जातो. पहिल्या पावसाला यायला अजून कितीतरी वेळ आहे आणि मी मात्र काही ओळींमुळे पार कुठल्याकुठे पोचलो आहे. रोजच्या आयुष्यात माझ्यापासून वर गेलेल्या आठवणींच्या आकाशातून अश्या सरी कोसळतच राहतात, काही क्षण त्यात भिजावेसे वाटतेच पण ....
आठवणींच्या आकाशाच्या अन्
माझ्यामध्ये मी एक छत्री धरून बसतो
अलीकडे आजचा मी अन्
पलीकडे आधीचा
आठवणींच्या ताब्यातला
आज सरला अन्
आजचा मी कालचा होऊन छत्री पलीकडे गेलो
वाट पाहत उद्याच्या माझी.. कसा असेन उद्या मी?
उत्सुकतेच्या फटीतून डोकावलो अन्
आज माझ्यावर कालचे मी पडू लागले
फट विस्तारली.. छत्री फाटली..
आठवांच्या रुपात कोसळत राहिलो
पार पार मागे वाह(व)त गेलो...
छ्या! ही छत्री दुरुस्तीला टाकली पाहिजे!
प्रतिक्रिया
तुमची छत्री फाटली होती म्हणून
तुमची छत्री फाटली होती म्हणून मलाही इतकं काही छान दिसलं त्यातून .. नकाच दुरुस्त करू ती
***
अब्द शब्द
व्वा!
फारच छान! फाटलेल्या छत्रीसकट सगळे दृश्य डोळ्यांसमोर उभे राहिले.
लेख मनापासून आवडला. कसं काय सुचलं तुला? असं सुचूच कसं शकतं? असे प्रश्न विचारावेसे वाटले.
लिहीत रहा...
--
सस्नेह,
अदिति
जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात||
वा !
वा!!! पहिले दोन भाग वेगळे टाकलेस हे उत्तम केलेस. कारण या रचनेला स्वतंत्र अस्तित्त्व आहे. ते इथं ती वेगळी असल्यानं नीट भिडलं.
वा!
वरील तिन्ही प्रतिक्रियांशी सहमत!
वाह!
आहाहाहा! ऋष्या, लेका तू ग्रेट आहेस! पाऊस, पाणी, बर्फ वगैरे गोष्टींबद्दल मला आत्यंतिक जिव्हाळा आहे
पण कधी असं मांडू शकलो नाही. सुरेख मांडलंयस.
मस्त ! छत्री फाटली तरी तिचे
मस्त ! छत्री फाटली तरी तिचे अन आठवणींचे नाते कायम राहिले.
वा(ह)वा
वा(ह)वा.
छान लिहिले आहे.
कमाल!
सुरेख लेखमालेचा सुंदर शेवट!
छान
तीनही भाग वाचले. पहिले दोन भाग वाचत असताना माझे पावसातले कळसुबाई, लोहगड, माथेरानचे अनुभव आठवले आणि माझीही छत्री फाटली.
तिसरा भाग काव्यरुपाने पेश करण्याची कल्पना आवडली.
सुंदर लेखन!
लेखमाला आवडली.
तीनही भाग एकापाठोपाठ वाचले. मजा आली. पावसाची चाहूल लागली असता जाणवणारी हुरहूर, या भजनाच्या सुरुवातीच्या तुकड्यात पंडितजींनी नेमकी पकडली आहे.
माझ्या एका मैत्रिणीची नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रिया कितपत यशस्वी झाली आहे, याचा अंदाज काही दिवसांनी यायचा होता. ती हॉस्पिटलमधून घरी निघत असतानाच अचानक पाऊस पडायला लागला, म्हणून मी चिंतेत पडले. मात्र तिच्या नवर्याचा चेहरा आनंदाने फुलून निघाला. त्या आगंतूक पाहुण्याने त्याला सर्व काही ठिक होणार असे आश्वासन दिले होते! तो पाऊस आणि त्याचा चेहरा माझ्या कायम लक्षात राहील.
दिडदा
छत्रीखाली जाणं हे मला गाडी बोगद्यात शिरण्यासारखं वाटलं. पण फटींमधून आठवणींचे स्वर दिडदा दिडदा करत रहातात...
मस्त लेखमाला.
तिनही भाग एका दमात वाचून
तिनही भाग एका दमात वाचून काढलेत. खूप छान!
तूझी छत्री अशीच कायम फाटलेली असावी आणि तू ह्या आठवणींचा ओलावा असाच आमच्यापर्यंत सतत पुरवत रहावा असे वाटले.
-अनामिक
अतिशय सुन्दर
वा! छत्री तुमची फाटलीय आणि पावसात भिजवून टाकलंत आम्हाला! पाउस हा माझा जिव्हाळ्याचा विषय, कितीक आठवणी जाग्या झाल्या. सुंदर लेखन! धन्यवाद.
उन्हाळा संपताना पावसाची वाट
उन्हाळा संपताना पावसाची वाट बघताना आलेला पाऊस, चिखलात उड्या मारण्यासाठी लागणारा मुळातला द्वाडपणा जागा करणारा पाऊस, कुंद वातावरणातला डोंगराच्या टोकावरचा निवांत पाऊस, "बरं आहे इथे मुंबईसारखा बदाबदा पाऊस कोसळत नाही" असं म्हटल्यावर पाच मिनीटांत ओलंचिंब भिजवणारा पाऊस ... सगळ्याची आठवण झाली.
ऋ, लिहीत रहा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पाऊस नि पावसाशी संबंधित घासून
पाऊस नि पावसाशी संबंधित घासून गुळगुळीत झालेल्या असोसिएशन्समुळे हा लेख वाचला नव्हता. आज वाचला. काहीच्या काही 'लागली' आहे तुमची लेखणी. नि एखाद्या हायकूसारखा फॉर्म. फार फार फार आवडला.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
(अवांतर)
प्रतिसाद वाचून, का कोण जाणे, पण 'स्वाती ठकार'ची आठवण झाली.
फक्त तेवढा एक लसणीचा भपकारा हवा होता. नि एखादा हुंकार.
काहीही कळले नाही.
काहीही कळले नाही.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
फॉल्स फ्रेंड्स
टुकार बाईंपेक्षा हा प्रतिसाद जेन्युइन आहे बराच. पूर्वेतिहास न पाहता तुलू गेलो तर अर्थातच तसे वाटण्याची काहीएक शक्यता आहे हे मान्य
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
???
व्यनि कर रे बाबा
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मलाही कर. भिकार कविता
मलाही कर. भिकार कविता करणार्या कुणा एका बाईंसारखं काहीतरी मी बरळलेय (असं 'न'वी बाजूंना वाटतंय) याहून जास्त काही तपशील असले, तर मलाही जाणून घ्यायचे आहेत.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
कविता???
कविता??????
(स्वाती ठकार > १ ??????)
ष्टाइल
प्रतिसादाच्या निव्वळ ष्टाइलबद्दल (कोणी लिहिला, कशासाठी लिहिला वगैरेंकडे पूर्ण दुर्लक्ष करून) निरीक्षण नोंदवले. अधिक काही नाही.
अर्थातच, निव्वळ शैली पाहता
अर्थातच, निव्वळ शैली पाहता थोडेफार साम्य आहे हे मान्यच केले आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
काल संपूर्ण ३ भाग परत वाचले.
काल संपूर्ण ३ भाग परत वाचले. वेडी झाले.
कमेंटस् मुळे धागा वर आला
कमेंटस् मुळे धागा वर आला म्हणून वाचायला मिळालं. तिनही लेख वाचले. किती सुंदर लिहिलंय. निव्वळ वेड.
बाप रे काय मस्त कविता आहे.
बाप रे काय मस्त कविता आहे. परत तीन्ही भाग वाचले. अवर्णनिय वाचनानुभव!!!
इतकंच म्हणेल "तुम्ही पाऊस
इतकंच म्हणेल "तुम्ही पाऊस जगला आहात!"
पुलेप्र!
हे जीवन सुंदर आहे..