Skip to main content

ही बातमी समजली का? - ७१

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
========================================================================================================
http://ibnlive.in.com/news/church-attacks-only-mishaps-not-incidents-of…

There are 240 churches in the city. CCTV cameras were installed in 161 churches. SHOs of all police stations in Delhi have been asked to regularly patrol around churches while PCR vans, ERVs and motorcycle patrols have been deployed outside these establishments.

Recently, Delhi Police has appointed an officer of the rank of Additional DCP as the "nodal officer" for attending to issues related to churches and educational institutions of the community.

जर चर्चवरचे अ‍ॅटॅक धार्मिक नसले तर उगाच सरकारी खर्चाने चर्चेसना सतत संरक्षण देऊ नये.
======================================================================================
http://zeenews.india.com/news/india/modi-govt-slams-us-report-on-minori…
लै टिका केलीय भारतावर. एकतर अमेरिकेने आपली स्वतःची अगोदर नीट धुतली पाहिजे इतरांना बोलण्यापूर्वी. बाय द वे, २५ कोटी मुस्लिम १०० कोटी हिंदू , प्रोवायडेड पोलिस इज नॉट अराउंड, कापू शकतात; एलोरा अजंता कि नंगी पुंगी टूटी फूटी मूर्तियाआँ, इ इ चे मायनॉरिटीकडूंचे उल्लेख देखिल रिपोर्टात असले पाहिजेत.

गब्बर सिंग Fri, 01/05/2015 - 22:21

Modi govt lacks clear vision on economy, its claims hyperbole : Arun Shourie

Without naming finance minister Arun Jaitley directly, he said the government lacked a stable approach in dealing with investors and that "lawyerly arguments" would not convince them.

हा डायलॉग मात्र एकदम रोचक आहे.

----------

The former minister said the "trimurti" of Narendra Modi, Arun Jaitley and Amit Shah were running the government and the party, and that other leaders were afraid of making corrective suggestions.

घ्या. पूर्वी मोदी एकटेच हडेलहप्पी पणा करतात असा आरोप होता. आता त्रिमूर्ती मिळून सगळे निर्णय घेतात (व बाकीच्यांना फारसे स्थान नाही) असा आरोप आहे.

----------

पण शौरीसाहेब, इकॉनॉमी बद्दल क्लिअर व्हिजन असणे हे का आवश्यक आहे ते सांगा ना ?? सरकारकडे क्लिअर व्हिजन असावी, ती सरकारने राबवावी व त्याचा परिपाक म्हणून शॉल्लेट विकास व वृद्धी व्हावी असे घडलेय का कधी ??

ऋषिकेश Mon, 04/05/2015 - 11:31

In reply to by गब्बर सिंग

हेच ते शौरी ना ज्यांनी राक्षसी बहुमत असणार्‍या राजीव गांधी सरकारच्या आर्थिक धोरणांवर इतके फटकारले होते की ते सरकारातही दुमतांची दुही पेरली गेली?
अजूनही ते प्रचंड काँग्रेस विरोधक आहेत. तरीही भाजपेयी मंडळी त्यांच्यावर चवताळलेली आहेत असे वृत्तपत्रे म्हणतात! अरेरे!

--
मी मुलाखत ऐकली वाचलेली नाही, मात्र त्यावर आलेले अनेक अग्रलेख वाचले आहेत.
लोकसत्ताचा अग्रलेख म्हणतो:

भाजपचा अवघा डोलारा आज केवळ मोदी यांच्या खांबावर उभा असून या लाखोंच्या पोशिंद्याला कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यापासून जपणे यातच आपली सुरक्षा आहे हे समजण्याची शहाणीव भाजप नेत्यांमध्ये असणार यातही काही शंका नाही.

अशाच प्रकारची टिका एखाददीड वर्षांपूर्वी काँग्रेसवर होत होती. गांधी घराण्याविरुद्ध कोणी बोलले की अख्खी काँग्रेस त्यावर तुटून पडते.
--
स्वगत: निवडणुकीच्याही आधी व्यक्त केलेले आक्षेप (बघा आक्षेप १.१) अजूनही तितकेच सत्य आहे दुसरं काही नाही :(

---
हा अग्रलेख असेही म्हणतो:
ज्यांना शहामृगाप्रमाणे वाळूतच तोंड खुपसून राहायचे आहे त्यांचा प्रश्न नाही, परंतु इतरांनी मात्र शौरी यांची टीका आली आहे ती या पाश्र्वभूमीवर हे नीट समजून घेतले पाहिजे.

हे मला पटते.

गब्बर करतात तशी

इकॉनॉमी बद्दल क्लिअर व्हिजन असणे हे का आवश्यक आहे ते सांगा ना ??

वगैरे प्रश्न शौरींच्या मुद्द्यांचे खंडन होऊ शकत नाही. मात्र त्यात शौरी यांच्यावर चिखलफेक नाही व प्रश्नही आर्थिक आहेत म्हणूनच असे प्रश्न स्वागतार्ह आहेत.

महाराष्ट्र टाईम्सच्या अग्रलेखात दिलेली शौरींच्या मुलाखतीतील काही टिकात्मक वक्ये वाहू:

शौरी यांनी अनावश्यक आक्रमकतेमुळे विरोधक आणि मित्रपक्ष अधिकाधिक दूर जात आहेत.

पंतप्रधानांनी केवळ मोठे प्रकल्प आणण्याच्या मुख्यमंत्र्याच्या मानसिकतेतून बाहेर यावे आणि दूर पल्ल्याच्या आर्थिक धोरणांकडे लक्ष द्यावे,

आर्थिक गुंतवणुकीसाठी पुरेसे प्रोत्साहक वातावरण अजून आलेले नाही

इत्यादी त्यांची ही व अशी विधाने सरकारला कडू वाटली तरी आत्मपरिक्षण करण्यास पुरेशी आहेत का? हे लवकरच समजेल - समजते आहेच.
सरकारने त्यांच्याकडे 'मित्राने केलेली कानउघडणी' या ऐवजी " अंर्थमंत्र्यांचे पद न दिल्याने केलेली टिका" असे बघतात हे ही लवकरच समजेल.

मात्र इथेही सरकारकडून फारशी आशा नाही. लोकसत्ता म्हणते तसे

...हे दोन्ही पर्याय भाजपने टाळले आणि तिसराच सोयीस्कर रस्ता निवडला. तो होता अ‍ॅड होमिनम या तर्कशास्त्रीय दोषाचा. काय म्हटले जात आहे याकडून लोकांचे लक्ष विचलित करायचे असेल, तर ते कोण म्हणतो आहे याकडे वळवायचे असा तो दोष असून, कोणीही आपल्याविरोधात बोलले की ती व्यक्ती हे सर्व प्रसिद्धीसाठी करीत आहे असे म्हणायचे, ती व्यक्ती पक्षातीलच असेल तर तिला पद वा प्रतिष्ठा मिळाली नाही म्हणून ती आदळआपट करीत आहे असे सांगून तिला गद्दार ठरवायचे, ही त्याची एक पद्धत आहे. शौरींच्या टीकेलाही याच पद्धतीने उत्तर दिले जात आहे.

===

मला त्यांच्या मुलाखतीतले सर्वात आवडले ते वक्तव्य म्हणजे:

'तुम्ही सतत ट्विट करता आणि साक्षी महाराज किंवा गिरीराज सिंह बोलतात तेव्हा मात्र चूप बसता, यात अंतर्विरोध नाही का?

--

एकुणच ही मुलाखतीचे वार्ताकन वाचून शौरी यांच्याबद्दल असलेला आदर वाढला.

गब्बर सिंग Mon, 04/05/2015 - 12:53

In reply to by ऋषिकेश

पंतप्रधानांनी केवळ मोठे प्रकल्प आणण्याच्या मुख्यमंत्र्याच्या मानसिकतेतून बाहेर यावे आणि दूर पल्ल्याच्या आर्थिक धोरणांकडे लक्ष द्यावे,

इन्फ्रास्ट्रक्चर बद्दलची धोरणे सोडल्यास अशी दूर पल्ल्याची धोरणे कोणती ? तो प्रश्न अवघड असल्यास ह्या प्रश्नाचे उत्तर द्या - कोणत्या खात्यासंबधित धोरणे दीर्घ पल्ल्याची असू शकतात ??

---

आर्थिक गुंतवणुकीसाठी पुरेसे प्रोत्साहक वातावरण अजून आलेले नाही

इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स ?

अरविंदराव काय करताहेत आजकाल ?? अरविंद पनगारिया आणि अरविंद सुब्रमण्यम ??

ऋषिकेश Mon, 04/05/2015 - 13:06

In reply to by गब्बर सिंग

इन्फ्रास्ट्रक्चर बद्दलची धोरणे सोडल्यास अशी दूर पल्ल्याची धोरणे कोणती ? तो प्रश्न अवघड असल्यास ह्या प्रश्नाचे उत्तर द्या - कोणत्या खात्यासंबधित धोरणे दीर्घ पल्ल्याची असू शकतात ??

माझ्या मते सरकारच्या समोर प्रत्येक क्षेत्रातच नजीकची/ताबडतोपीची निकड आणि दूरगामी धोरणे असतात - असली पाहिजेत.
त्यातही आरोग्यविषयक (आरोग्य मंत्रालय), शिक्षणविषय (HRD), मनुष्यबळ विकास(HRD), मानवी स्वातंत्र्य - व्यक्ती + अभिव्यक्ती - (गृह), बाह्यसुरक्षा (संरक्षण), खाजगीकरण (वित्त), टॅक्सविषयक धोरणे (वित्त), गुंतवणूक विषयक धोरणे (वित्त+व्यापार) वगैरे अत्यंत महत्त्वाच्या बाबतीत तर सरकारची धोरणे ही दूरगामी परिणाम करणारी असतात.

--

कोणत्याही जमिनधारकाची परगावनगी नसूनही जमिन कशी मिळवता येईल आणि पॉवरलुम्ससाठी हॅण्डलुम्स इंडस्ट्री कशा बंद पाडता येतील यासारख्या गोष्टीपेक्षा अधिक चांगले 'धोरणात्मक' व बहुसंख्यांसाठी 'कल्याणकारी' निर्णय घेण्यास प्राधान्य हवे असे माझे मत.

पिवळा डांबिस Fri, 01/05/2015 - 23:08

एकतर अमेरिकेने आपली स्वतःची अगोदर नीट धुतली पाहिजे इतरांना बोलण्यापूर्वी.

अहो पण त्यांना धुवायची कन्सेप्टच माहिती नाही ना! पेपरने पुसतात!!!
त्यांना धुवायला शिकवण्यासाठी आधी काही एच१ तज्ञ भारतातून नेले पाहिजेत!!!
:)

अजो१२३ Sat, 02/05/2015 - 19:57

http://hawking-hologram.diply.com/science-rules/stephen-hawking-hologra…
पॅकप. १००० वर्षे उरलीत.
पॅरलल युनिवर्सचे उदाहरण देखिल रोचक आहे.
=================================================================================
कि परंपरागत तत्त्वज्ञान्यांत जसे कितीतरी चुत्तड लोक भरले आहेत तसे पुरोगाम्यांत देखिल भरलेले आहेत?

नगरीनिरंजन Sat, 02/05/2015 - 21:30

In reply to by अजो१२३

यावर चर्चा करवण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता.
घासकडवींनी "मॅन मूव्ह्ज इन मिस्टिरियस वेज हिज प्रॉब्लेम्स टू रिझॉल्व्ह" असे तेव्हा सांगितले होते. तुमचे मत काय? स्टीवन हॉकिंग चुत्तड आहे हे?

नंतरही काय प्रॉब्लेम्स आहेत व या मिस्टिरियस वेजचा वगैरे धांडोळा घ्यायचा व चर्चा करवण्याचा प्रयत्न केला होता पण
ॲपरंटली सगळं ठीक होणार आहे याबद्दल बहुतेकांना खात्री असेल किंवा मरेनात का शंभर-दोनशे वर्षांनी, आपल्याला काय त्याचे असा विचार असेल.

अजो१२३ Sat, 02/05/2015 - 23:39

In reply to by नगरीनिरंजन

हॉकिंग साहेबांच एकूण कर्तृत्व नक्कीच महान आहे. पण काही (या) विधानांच्या संदर्भात चुत्तड ही संज्ञा चपखल बसावी.
=======================================================

नगरीनिरंजन Sun, 03/05/2015 - 12:18

In reply to by अजो१२३

कोणत्या अर्थाने?
म्हणजे हजार वर्षात माणूस नष्ट होईल हे पटत नाही म्हणून की अंतराळात जाणे शक्य होणार नाही म्हणून?

अजो१२३ Sun, 03/05/2015 - 14:51

In reply to by नगरीनिरंजन

१. गेल्या ३६० कोटी (काहींचे मते ४६०) वर्षांत जीवसृष्टी चालू आहे तर अगदी याच १००० वर्षांत ती नष्ट होइल असं का वाटावं?
२. येत्या १००० वर्षांत कोट्यावधी लोकांना दुसर्‍या ग्रहावर नेणे, असा ग्रह असणे, सापडणे, कंपॅटिबल असणे, त्यावर स्रोत असणे, जाण्यासाठी स्रोत असणे, जाणे संभव असणे, इ इ जरा जास्त वाटतं.
पण तरीही असं म्हणणारास शुद्ध मूर्ख म्हणता येत नाही. खासकरून हॉकिंगसारखा महान माणूस म्हणून सगळा बेनेफिट ऑफ डाउट दिल्यामुळं.

पण पण ... हा बाबा जेव्हा 'दुसरे घर पहा' म्हणून रिकमेंड करतो तेव्हा मात्र तो विशुद्ध मूर्खपणा आहे. ... ... ...
...
...
...
तो यासाठी कि माणूस नावाच्या साडेसातीमुळे किंवा निसर्ग नावाच्या साडेसातीमुळे जो विनाश इथे १००० वर्षांत संभव आहे तो दुसर्‍या ग्रहावर किंवा अवकाशातल्या मानवकृत तरंगत्या कॉलनीत का संभव नाही?
================================================================================================
आणि डेविल लाइज इन डिटेल्स.
मनुष्यजातीचे भवितव्य काय आहे याबाबत जो आशावाद असावा त्याबद्दल माझं प्रचंड चांगलं मत आहे. म्हणजे लाखो घासकडवी कमी पडतील इतका उदंड आशावाद मला मानवतेच्या भविष्याबद्दल आहे. हे देखिल हाँकिंगचं मत एक येडझवेपणा वाटण्यामागचं कारण आहे.
१००० वर्षांत पृथ्वी नष्ट होणे, मानव इतरत्र जाणे आणि तिथे तो न नष्ट होणे याची शक्यता जितकी आहे त्याच्या अनंतपट शक्यता खालिलप्रमाणे असावी -
१. मानवाला संभाव्य उल्कापात, अवकाशातून येणारी विनाशक प्रारणे यांच्यापासून वाचण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध होईल. अगदी भूगर्भशास्त्र देखिल खूप विकसित होईल.
२. तरीही विनाश झालाच तरीही समस्त मानवजातीचा होणार नाही.
३. सध्याला मानवतेचे सुकाणु शास्त्रज्ञ आणि सरकारे यांच्या हातात आहेत. मतदानाशिवाय लोक फारसं यांच्या कारभारात नाक घालत नाहीत. जेव्हा यांच्या कृती विनाशाकडे घेऊन चालल्या आहेत असे दिसेल तेव्हा जगभर जनांदोलने होतील.
४. मानवतेला बसणारे शॉक ग्रॅज्यूअल असतील. उदा. तेल हळूहळू ६०-७० वर्षांनी संपेल. त्यामुळे ती समस्या हाताळायला तीन -चार पिढ्या असतील.
५. अगदी आजच्या हिशेबाने माणूस ३५० कोटी वर्षे आणि सूक्ष्मजीब ४५० कोटी वर्षे जगतील असे पृथ्वीचे डिफॉल्ट सेटींग आहे. अशात १००० वर्षांचे इतके तीव्र भाकित करणे म्हणजे पॅरानोइया झाला.
६. आज मानवाचं जीवन नवप्राप्त बुद्धीमत्ता, आणि मालकी, कायदा, अर्थ, कितीतरी सामाजिक आणि तत्सम निरर्थक संकेत यांचेमुळे असायला पाहिजे त्यापेक्षा जास्त दु:खी आणि इनेफिशियंट आहे. भविष्यात जेव्हा सुज्ञांकडे समाजाचे नेतृत्व असेल तेव्हा मानवता अशा करोडो अनावश्यक संकल्पनांची कात टाकेल.
============================================================================================
मी नीट आस्तिक आहे कि नाही याबद्दल मला नीटशी कल्पना नाही, पण जेव्हा हा विषय निघतो तेव्हा मला गीतेतला सोळावा अध्याय अवश्य आठवतो. त्यात राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांचे वर्णन करताना कृष्णाने बरीच 'जेन्यूईन वाईट' विशेषणे वापरली आहेत. जसे लुटेरा, चोरी करणारा, रागीट, देव न मानणारा, इ इ. पण राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांच्या गुणांच्या वर्णनात 'नॉट एक्झॅटली राक्षसी' किंवा 'कमॉन, व्हाय राक्षसी' असे म्हणावे असे वाटावे अशी दोन विशेषणे वापरली आहेत:
१. जे लोक हे विश्व निराधार आहे असे मानतात
२. जे लोक हे विश्व अस्सेच शून्यातून निर्माण झाले आहे असे मानतात.

नगरीनिरंजन Sun, 03/05/2015 - 18:01

In reply to by अजो१२३

जीवसृष्टी आहे ३६० कोटी वर्षे जुनी पण माणूस दोन लाख वर्षेच जुना आहे आणि त्यातली एक लाख नव्वद हजार वर्षे जंगली अवस्थेत होता.
त्या काळाच्या मानाने तीनशे वर्षात माणसात किती बदल झाला आहे ते पाहिले तर हजार वर्षे फार मोठा काळ वाटत नाही.
नैसर्गिक कारणांपेक्षा कृत्रिम गोष्टी आपण ज्याला आज "माणूस" म्हणतो तो प्राणी नष्ट करायला कारणीभूत होणार नाहीत असे का वाटते?
तेल कधीच संपणार नाही पण "डिमिनिशिंग रिटर्न्स"मुळे मारामार्‍या होणारच नाहीत हे कशावरुन? सूज्ञ लोक आहेत कुठे जगाचा ताबा घ्यायला? न्युक्लिअर विंटर ही तुम्हाला कविकल्पना वाटते का? ग्रे गू प्रॉब्लेम होणारच नाही याची इतकी शाश्वती कशी? मशिन्समुळे माणसे सुपरफ्लुअस होणार नाहीत याची इतकी खात्री कशावरुन? विंडोजच्या पीसीमुळे रोजगार वाढले तेच परत होईल हे कशावरुन? मालकीहक्क वगैरे निरर्थक गोष्टी ज्यांच्याकडे तो आहे आणि ज्यांना त्याचा फायदा आहे ते "विदाऊट फाईट" सोडतील तो?
माणसाची एक्झिस्टेन्शिअल रिस्क सध्या २५% आहे असे कुठेतरी वाचले होते. शोधावे लागेल.

बाकी गीता लिहिणारा आस्तिक होता म्हणून त्याने गीता लिहीली, त्यामुळे त्यात तसे असणे स्वाभाविकच आहे. गीतेचा संदर्भ याठिकाणी कुचकामी आहे.

अजो१२३ Mon, 04/05/2015 - 17:39

In reply to by नगरीनिरंजन

गीतेचा संदर्भ याठिकाणी कुचकामी आहे.

बाकी विधानांवरही बोलता येईल. इथे गीता एक प्रातिनिधिक शब्द आहे. आय बेसिकली मीन नॉन-सायंटिफिक अल्टरनेट विजडम.
-----------------------------------
पण नास्तिक लोकांना का म्हणे तो सेल्फ रेप्लिकेटिंग डी एन ए चा थ्रेड शाश्वत रहावा असे वाटते? नष्टू देत की. सजीव हे जर केवळ स्पेशली काँफिगर्ड भौतिक पदार्थ वा रसायने असतील तर, व्हाट बिग डिल इफ दे डिझ्झॉल्व्ह बॅक इनटू मॉर्टेलिटी?

भविष्यातल्या कोणत्यातरी एका पिढीला काही काळ (स्वल्पकालीन तीव्र झटक्यात प्रूथ्वी नष्ट झाली तर अजूनच बरे, एका पिढीला काही दिवस किंवा आठवडे त्रास होण्यापेक्षा) शारीरिक मानसिक त्रास होईल. त्याचा मानसिक त्रास आपण सगळ्यांनी का म्हणून करून घ्यायचा. पुढच्या पिढीची काळजी नावाचा मूर्खपणा आपल्या जीन्समधे अपघातानेच (योगायोगानेच) आला आहे. त्याला मूर्खासारखं बळी का पडायचं? कोण्या एका पिढीत सगळी बांडगूळं खपतील. खपू देत.

त्यांचं सातत्य का म्हणे सिग्निफिकंट आहे?

बॅटमॅन Mon, 04/05/2015 - 17:59

In reply to by अजो१२३

आस्तिकांच्या लेखी आस्तिकांचे आणि नास्तिकांच्या लेखी नास्तिकांचे शंभर गुन्हे माफ असतात. तेच आस्तिकांच्या लेखी नास्तिकांचे आणि नास्तिकांच्या लेखी आस्तिकांचे अस्तित्वही धडपणी मंजूर नसते. त्यामुळे वरील प्रतिसादाला काही अर्थ नाही.

राजेश घासकडवी Sun, 03/05/2015 - 21:35

In reply to by अजो१२३

लेख वाचला. एकंदरीत प्रस्थापित, बुद्धिमान, क्रांतिकारी विचार वगैरे मांडणारे वैज्ञानिक लोक आपल्या फावल्या वेळात काय बोलतात - म्हणजे काहीतरी भाषणांमध्ये लोकांसमोर काय विचार मांडतात - याकडे एक कल्पनाविलास म्हणूनच पाहावं यावर अधिक दृढ विश्वास बसला. हजार वर्षांचा आकडा या थोर वैज्ञानिकाने कुठच्या टोपीतून काढला, त्याला काय कारणपरंपरा दिली वगैरेबद्दल एक अवाक्षरही नाही. त्यामुळे बालादपि सुभाषितं ग्राह्यम् चा व्यत्यास करून थोरादपि निरर्थकं त्याज्यम् असं म्हणावंसं वाटतं.

थोर वैज्ञानिकांचं लेखन वाचावं ते मूळ पेपरांमधून. तिथे फॅक्टच्या क्षीरातून फिक्शनचं नीर काढून टाकण्यासाठी पीअर रिव्ह्यूची उत्तम प्रक्रिया असते. जिथे ती नसते तिथे सत्याच्या कंटेंटबद्दल कुठलीही गॅरंटी नाही.

सरसकट हिणवणं मात्र खटकलं. माणसाबद्दल बोलण्याऐवजी विधानांबद्दल बोलण्याची मर्यादा ठेवली तर असे प्रमाद होणार नाहीत.

अजो१२३ Sun, 03/05/2015 - 23:31

In reply to by राजेश घासकडवी

थोर वैज्ञानिकांचं लेखन वाचावं ते मूळ पेपरांमधून.

सामान्य लोकांनी विज्ञानात रस घ्यावा कि नाही?

अजो१२३ Mon, 04/05/2015 - 13:25

In reply to by राजेश घासकडवी

सरसकट हिणवणं मात्र खटकलं.

अध्यात्मिक क्षेत्रातले लोक असंच अगम्य बोलत असतात त्यावेळी नास्तिक त्यांना फार अपमानकारक पद्धतीने हिणवतात. मी मात्र समबुद्धीचा आहे, हिणवताना शास्तज्ञ कि अध्यात्मी असा भेद करत नाही.

अनु राव Tue, 05/05/2015 - 13:38

In reply to by राजेश घासकडवी

मानव जातीचे अस्तित्व अजुन १००-२०० वर्षानी असायलाच पाहीजे हा अट्टाहास मला न कळणारा आहे.
समजा मानव जात काय किंवा पृथ्वी काय, अजुन १००-२०० वर्षानी नष्ट झाली तर सध्या जीवंत असणार्‍या कोणाला काय फरक पडतो किंवा का फरक पडावा?

बॅटमॅन Tue, 05/05/2015 - 14:25

In reply to by अनु राव

तो अट्टाहास कितपत निरर्थक आहे हा वेगळा भाग झाला.

त्या अट्टाहासाचा, सद्य चर्चेशी काय संबंध आहे ते कळत नाही.

अनु राव Tue, 05/05/2015 - 19:59

In reply to by बॅटमॅन

बॅट्या - माझी प्रतिक्रिया ह्या बद्दल होती

पॅकप. १००० वर्षे उरलीत.

१००० वर्षानंतर पॅकप करा नाहीतर पॅकडाऊन करा. काय फरक पडतो? आणि मी 'निरर्थक' म्हणले नाही. मला कळत नाही असे म्हणले.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 05/05/2015 - 03:03

In reply to by अजो१२३

मूळात हॉकिंग काय म्हणाला हे न वाचता किंवा त्याचा मूळ स्रोत न पाहता कोणीतरी केलेल्या, चतकोर काहीतरी निवेदनावरून थेट हॉकिंगला (किंवा कोणालाही) नावं ठेवण्यात काहीही अर्थ नाही. त्यातून त्याला त्याची व्यक्तिगत मतं असण्याबद्दल कसला आक्षेप घ्यायचा!

वरच्या प्रतिसादातली भाषा बघून मनापासून प्रश्न पडला, हॉकिंगचा समांतर विश्वांचा (सिद्धांत समजून घेण्याची अपेक्षा तर अजिबातच नाही; निदान) विनोद तरी समजून घेतला का?

=================================================================================

...

पिवळा डांबिस Sun, 03/05/2015 - 10:51

In reply to by गब्बर सिंग

कॉन्ग्रेस हा स्वतःला लै अडाणी प्रोजेक्ट करणार्‍या अतिशहाण्यांचा पक्ष आहे...
आणि भाजपा हा स्वतःला लै शहाणे प्रोजेक्ट करणार्‍या अतिअडाण्यांचा पक्ष आहे!!!!!
:)

नगरीनिरंजन Sun, 03/05/2015 - 13:35

मोठ्या शिकारी करणार्‍या शिकार्‍याला हत्तीने मारले.

We know 'Gibbo' shot it once, from about 10 yards away, with a 458 [rifle]. He would never have fired unless he had no alternative. He was a hunter, yes, but he was also a magnificent wildlife photographer and conservationist.

Mr Gibson was accompanying his client in an area known as Chiwore North in the southern part of the Zambezi Valley, which Mr Smith said is overpopulated with elephants.

Mr Smith said poachers from neighbouring Mozambique and Zambia were "very busy" at present, and professional hunters were the first line of defence for wildlife along the borders.

ऋषिकेश Mon, 04/05/2015 - 11:48

गोयलांचे पीयुष लोकसभेने तर ऐकले.

मोदी सरकार अशाप्रकारची खासदारकीची उघड सौदेबाजी करणार्‍या मंत्र्यावर कारवाई करण्याची आशा नाहीच पण दुसरे सरकार असते तर कदाचित अशी अपेक्षा जरूर केली असती. :(

चिंतातुर जंतू Mon, 04/05/2015 - 11:52

राष्ट्रीय संग्रहालयाचे संचालक वेणू वासुदेवन यांची तडकाफडकी बदली
त्यांच्या कार्यकाळादरम्यान राष्ट्रीय संग्रहालयानं कात टाकली होती. ज्यांनी आधीचं आणि आताचं संग्रहालय पाहिलं आहे त्यांना हे दिसलंच असेल. इतरांसाठी त्यांच्या कार्यकाळाचा हा आढावा.

मुंबईतल्या भाऊ दाजी लाड संग्रहालयाचा कायापालट करणारं व्यवस्थापनही सध्या अशाच पद्धतीनं पायउतार केलं जातं आहे. त्याविषयी -
Why the Shiv Sena and its cousin want to undermine the good work at Mumbai's BDL museum

गब्बर सिंग Tue, 05/05/2015 - 07:52

Why Energy Storage is About to Get Big – and Cheap

Lithium-ion batteries have been seeing rapidly declining prices for more than 20 years, dropping in price for laptop and consumer electronic uses by 90% between 1990 and 2005, and continuing to drop since then.

A widely reported study at Nature Climate Change finds that, since 2005, electric vehicle battery costs have plunged faster than almost anyone projected, and are now below most forecasts for the year 2020.

-----------------

What questions did people have in 1690?

Q: Is it proper for women to be learned?
A: All grant that they may have some learning, but the question is of what sort, and to what degree? Some indeed think they have learned enough if they can distinguish between their husband's breeches and another man's... Others think they may pardonably enough read, but by no means be trifled with writing. Others again, that they ought neither to write nor read. A degree yet higher are those who would have them read plays, novels, and romances—with perhaps a little history, but by all means terminating their studies there, and not letting them meddle with philosophy... because it takes them off from their domestic affairs and because it generally fills them of themselves ... 'tis a weakness common to our own sex as well as theirs... We see no reason why women should not be learned now. For if we have seen one lady gone mad with learning... there are a hundred men could be named, whom the same cause has rendered fit for bedlam.

Q: Dancing, is it lawful?
A: Dancing seems in some sort natural: It's difficult not to leap for joy and the whole body seems almost necessarily to follow the motion of the spirits and blood ... this natural way of expelling mirth, which is also a healthful exercise to the body.

Q: What is anger?
A: Anger is a passion of the irascible appetite caused by apprehension of a present evil, which may be repelled, but with some difficulty.

ऋषिकेश Tue, 05/05/2015 - 09:02

In reply to by गब्बर सिंग

Dancing, is it lawful?
A: Dancing seems in some sort natural: It's difficult not to leap for joy and the whole body seems almost necessarily to follow the motion of the spirits and blood ... this natural way of expelling mirth, which is also a healthful exercise to the body

हे फारच रोचक आहे.
तीनेकशे वर्षात फक्त डान्सिंग या शब्दांची जागा वेगवेगळ्या क्रीयांनी घेतली आहे. मात्र त्याचे उत्तर तसेच राहिले आहे :)
सध्या 'भिन्न लैंगिकता' हा शब्द डान्सिंगच्या जागी आहे ;)

ऋषिकेश Tue, 05/05/2015 - 10:49

बांगलादेश - भारत यांच्यामधे जमिन हस्तांतरणाचा एक करार सिंग सरकारने केला होता. त्यानुसार दोन्ही देशांतील काही भूभाग परस्परांना देऊन सध्याची छिद्रीत सीमा एकसंध करायचे दोन्ही देशांनी मान्य केले होते. हा एक महत्त्वाचा करार होता. त्यामुळे आपली सीमा सुरक्षा तर सुलभ होणार होतीच, शिवाय स्थलांतरीतांचा प्रश्न वगैरे सोबत चारी बाजूनी परक्या देशांनी वेढलेल्या गावांतील लोकांना एकसंधपणा व त्यायोगे मिळणार्‍या सुविधा मिळणे सोपे होणार होते.

===

मात्र आता सरकारने त्यात काही बदल करायचे ठरवले आहे. आसाममधील काही जमिन बांगलादेशला न देण्याचे सरकारने ठरवले आहे. व त्याप्रकारचे बदल त्यांनी घटनादुरूस्ती करणार्‍या विधेयकात मांडले जाणार असल्याची बातमी आहे. यासाठी संसदेची परवानगी घेतली जाईल इथवर ठिक आहे.
पण यात दोन चिंताजनक गोष्टी पुढे येताहेतः
१. आसाममधील विधानसभा निवडणुका जवळ येताहेत म्हणून हा भुभाग देण्याचे भाजपा सरकार टाळते आहे ( व त्याला काँग्रेसचाही पाठिंबा आहे) असा आरोप काही जणांकडून होतोय. मात्र हा आरोप तुलनेने सौम्य वाटतोय.
२. आता असे समोर येतेय की या बदलाची कल्पना बांगलादेश सरकारला दिलेलीच नाही. तसे झाले तर आपल्या संसदेत नवी सीमा मंजूर होईल मात्र त्याला बांगलादेशची मान्यता नसेल. हे म्हणजे 'संवादातीत तृटीमुळे' व एकतर्फी घोषणांमुळे जसा 'अक्साई चीन्' प्रश्न निर्माण झाला त्याची पुनरावृत्ती घडेल काय?

यासंबंधित आजचा द हिंदू मधील अग्रलेख वाचनीय आहे

ऋषिकेश Wed, 06/05/2015 - 11:04

In reply to by ऋषिकेश

सुदैवाने सरकारने आसाम भाजपा युनिट आणि काँङ्रेसचे मुख्यमंत्री दोघांचेही न ऐकत आसामसह जमिन हस्तांतरण विधेयकाला मंत्रीमंडळाने मंजूरी दिली आहे.
सरकारची ही भुमिका/हा बदल स्वागतार्ह आहे.

हे हस्तांतरण आधुनिक भारतातील सिक्कीमनंतर एक महत्त्वाचा नी शांततामय सीमाबदल असेल!

ऋषिकेश Tue, 05/05/2015 - 11:13

आपल्याकडे दोन-तीन दशकांपूर्वी झालेली आणि इंदीरा गांधी विरूद्ध न्यायालये असे स्वरुप आल्याने गाजलेली एक मोठी चर्चा "सर्वोच्च कोण? सरकार घटना किती बदलु शकते?" या प्रश्नाने आता पाकिस्तानात डोके काढले आहे. (आपल्याकडे याचे उत्तर मिळालेले आहे. ते इथे वाचता येईल)

सरकार पाकिस्तानचा ऑफिशियल धर्म "इस्लाम' न ठेवता पाकिस्तानला "सेक्युलर" राष्ट्र बनवू शकते का? सरकार घटनेच्या कोणत्याही भागात बदल करू शकते का यावर पाकिस्तानच्या कोर्टात चालु असलेल्या लढाईवर तेथील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

डॉन मधील हा आजचा मथळा

गब्बर सिंग Tue, 05/05/2015 - 11:53

In reply to by ऋषिकेश

"सेक्युलर" राष्ट्र बनवू शकते का?

आपल्या सेक्युलर च्या इंटरप्रिटेशन ची जरी काही प्रमाणावर वाट लागलेली असली तरी ती एका अर्थाने सुयोग्य पद्धतीनेच लागलेली असल्याने मला काही प्रचंड प्रॉब्लेम नैय्ये. I want ONLY the Govt to be secular. Which means Govt., when making any decision, or deciding/implementing any policy - Govt. must NOT use religion as criteria at all. Religion of the person MUST be completely ignored by Govt as part of governmental criteria for anything. - असे माझे म्हणणे आहे. तसेच Govt. must not force or incentivize/disincentivize/nudge any individual CITIZEN to be secular or NOT be secular. If an individual wants to be secular or unsecular - he/she should be free to be so as long as it is in non-violent/non-threatening way.

(ढोबळ मानाने माझे हे म्हणणे आहे.)

ऋषिकेश Tue, 05/05/2015 - 11:53

In reply to by गब्बर सिंग

उत्तरार्ध नीटसा समजला नाही बहुधा.

If an individual wants to be secular or unsecular - he/she should be free to be so as long as it is in non-violent way

सध्या सामान्य व्यक्तीच्या अशा कोणत्या अनव्हायोलन्ट अन्सेक्युलर कृत्यावर आक्षेप घेतला जातो / त्यास सजा होते.

गब्बर सिंग Tue, 05/05/2015 - 11:57

In reply to by ऋषिकेश

सध्या सामान्य व्यक्तीच्या अशा कोणत्या अनव्हायोलन्ट अन्सेक्युलर कृत्यावर आक्षेप घेतला जातो / त्यास सजा होते.

एखादा एम्प्लॉयर कर्मचार्‍यास नोकरीवर ठेवताना जाहीरपणे धर्माधारित डिस्क्रिमिनेशन करत असेल तर बेकायदेशीर नाही (टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज) पण आक्षेप नक्की घेतला जाईल.

उदा. माझे एक दुकान आहे व मी दुकानात कर्मचारी हवा अशी जाहिरात दिली व त्यात "अमुक" एक धर्माच्या लोकांनी अर्ज करू नये असे जाहिरातीत लिहिले तर नक्कीच गहजब होईलसे वाटते.

ऋषिकेश Tue, 05/05/2015 - 12:05

In reply to by गब्बर सिंग

हे ज्यांना पटत नाही त्यांनी आक्षेपही घेऊ नये असे म्हणणे आहे की लोकांवर हे "फोर्स" करू नये असे?
बहुदा माझा प्रश्न चुकला. माझा प्रश्न रीफ्रेज करतो.

सध्या लोकांना नॉनव्हायोलन्ट नी अन्सेक्युलर वागायचंय पण सेक्युलॅरिझम सामान्य लोकांवर 'फोर्स' होतंय असं उदाहरण सांगाल काय?

गब्बर सिंग Tue, 05/05/2015 - 14:49

In reply to by ऋषिकेश

.
.
.
उदाहरण देतो. पहा पटतंय का !!!!!

सर्व प्रकारची धर्म फोकस्ड मदत पॅकेजेस. उदा. मे २०१३ मधे ममोसिं सरकारने सुमारे २००० कोटीचे एक पॅकेज मुस्लिमांसाठी जाहीर केले. त्यांना राष्ट्रीय मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा निधी वापरण्यात येईल असा दावा होता. या निधीचा सोर्स जनता (कर + सरकारने घेतलेले कर्ज). सर्व जनतेचे योगदान या निधीत आहे असे गृहीतक. आता जनता म्हंटले की मुस्लिम आले व मुस्लिमेतर आले. मुस्लिमेतरांनी मुस्लिमांना राष्ट्रीय मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा निधी दिला. ठीकाय. त्यांनी स्वेच्छेने दिला की त्यांचे मत जाणून न घेताच त्यांच्या वतीने दिला गेला ? If I do not want to allocate any funding for a person solely/partly based on that person's religion then why is money being allocated on my behalf without my express consent ?? राष्ट्रीय मुख्य प्रवाहात अनेक जण नाहीयेत. अनेक जण बाहेर फेकले गेलेले आहेत. त्यांना यात अंतर्भूत का केले गेले नाही ??

( आता हा असा पैसा कोणावरही खर्च केला जाऊ नये असा गब्बर चा मुद्दा असतोच. पण तो बाजूला ठेवा. मुद्दा पब्लिक गुड व्ह. क्लब गुड चा आहे. तसेच Diffused costs and concentrated benefits.)

----

धार्मिक बाबींसाठी (सण) स्पेशल रेल्वे गाड्या सोडणे हे सुद्धा एक उदाहरण असू शकेल.

----

माझा प्रमुख मुद्दा हा आहे की - हे सगळे स्वच्छ लिहून जाहीर करा की - Allegiance or No allegiance to any/particular Religion will not be part of criteria by Govt.

ऋषिकेश Tue, 05/05/2015 - 14:52

In reply to by गब्बर सिंग

ही उदाहरणे सरकारने/प्रशासनाने सेक्युलर वागण्याची म्हणता येतील.

सामान्य व्यक्तीला नॉन व्हायोलन्ट राहून 'सेक्युलर' वागण्याची सक्ती कुठे केली जाते / इन्सेक्युलर रहाण्यापासून कुठे अडवले जाते?
धार्मिक सणांना सुट्ट्या दिल्या जातात, मात्र त्या त्या धर्मियांच्या प्रार्थनेला हजर रहाण्याची सक्ती नसते.

उद्या मी म्हटले माझ्या घरी फक्त हिंदूंनीच यावं तर फारतर माझ्यावर काही जण टिका करतील पण माझ्यावर तशी सक्ती करता येणार नाही.

-- सामान्य माणसाने अस्पृश्यता न पाळणे सक्तीचे आहे, तसे सामान्य माणसाने सेक्युलर असणे आपल्याकडे सक्तीचे नाही.

==

माझ्या मते भारतातीत सद्य स्थिती तुमच्या मते सर्वात सुयोग्य असेल.

---

या उलट फ्रान्ससारख्या देशांमध्ये सामान्य माणसांवर सेक्युलर असण्याची सक्ती आहे असे म्हणता येईल का?

गब्बर सिंग Tue, 05/05/2015 - 23:28

In reply to by ऋषिकेश

या उलट फ्रान्ससारख्या देशांमध्ये सामान्य माणसांवर सेक्युलर असण्याची सक्ती आहे असे म्हणता येईल का?

निदान सकृतदर्शनी तरी तसे दिसते. Check this out.. आता एका बातमीवरून निर्णय घेणे तितकेसे योग्य नाही.

-----

सामान्य माणसाने सेक्युलर असणे आपल्याकडे सक्तीचे नाही.

हो. व हे सुयोग्य आहे असे मला म्हणायचे आहे. सामान्य माणसाने सेक्युलर असायला हवे किंवा नसायला हवे अशी कायदेशीर रिक्वायरमेंट नसायला हवी (as long as the behavior is non-violent and non-threatening.)

चिंतातुर जंतू Wed, 06/05/2015 - 17:54

In reply to by ऋषिकेश

>> ही उदाहरणे सरकारने/प्रशासनाने सेक्युलर वागण्याची म्हणता येतील.

>> या उलट फ्रान्ससारख्या देशांमध्ये सामान्य माणसांवर सेक्युलर असण्याची सक्ती आहे असे म्हणता येईल का?

मुळात 'सेक्युलर' ह्या शब्दाचे अर्थच वेगवेगळे घेतले जातात. भारतात त्याचा अर्थ 'सगळ्यांना धर्माच्या नावाखाली जवळपास काहीही करायला स्वातंत्र्य' असा घेतला जातो, तर फ्रान्समध्ये त्याचा अर्थ 'खाजगीत व्यक्तिगतरीत्या धर्मस्वातंत्र्य, पण सार्वजनिक ठिकाणी व्यक्तींच्या धार्मिक वर्तनावर बंधन' असा घेतला जातो. ह्या धोरणफरकामुळे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतात. उदा. आपल्याकडच्या डॉल्बीच्या भिंती, मिरवणुकीत लोकांवर गुलाल उधळणं आणि रस्त्यावर कचरा करणं, नमाजासाठी रस्ते अडवणं, त्यामुळे रहदारीला होणारे अडथळे वगैरे प्रश्न वेगळ्या प्रकारे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालतात असं म्हणता येईल, आणि त्यांच्याकडचे बुरखाबंदी वगैरेमधून येणारे प्रश्न वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्याचा संकोच करतात असं म्हणता येईल.

अजो१२३ Wed, 06/05/2015 - 20:54

In reply to by चिंतातुर जंतू

आणि त्यांच्याकडचे बुरखाबंदी वगैरेमधून येणारे प्रश्न वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्याचा संकोच करतात असं म्हणता येईल.

त्यांच्याकडे हॅलोविनच्या काही-काही वेषांना बंदी आहे का? बुरखा न घालू देण्याचं कारण तिथे देखिल लावता येईल.

अजो१२३ Wed, 06/05/2015 - 23:57

In reply to by चिंतातुर जंतू

उदा. आपल्याकडच्या डॉल्बीच्या भिंती, मिरवणुकीत लोकांवर गुलाल उधळणं आणि रस्त्यावर कचरा करणं, नमाजासाठी रस्ते अडवणं, त्यामुळे रहदारीला होणारे अडथळे वगैरे प्रश्न वेगळ्या प्रकारे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालतात असं म्हणता येईल, आणि त्यांच्याकडचे बुरखाबंदी वगैरेमधून येणारे प्रश्न वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्याचा संकोच करतात असं म्हणता येईल.

फ्रान्समधलं व्यक्तिस्वातंत्र्य भारताच्या तोडीचं आहे हे ओढून ताणून सिद्ध करायचं असेल तर असं म्हणता येईल. "स्वातंत्र्यावर घाला" शब्दाचा वापर तर अत्योत्कृष्ट आहे!!! भारतात कितीतरी धार्मिक, अधार्मिक आणि सरकारी कृत्ये अडथळे निर्माण करून स्वातंत्र्यावर घाला घालत असतील?

आणि लोकांनी 'आपले उत्सव साजरे करणं' आणि 'घाला घालणं हाच हेतू नसणं' हे भारतात होतं. सरकार तर दुष्ट लोकांने वेगळे वळण देऊ नये फक्त सुरक्षा देत असतं.

त्यामानाने फ्रान्समधे "सरकारचीच" घाला घालायची इच्छा आहे. हा शुद्ध इस्लामोफोबिया आहे, त्याचं समर्थन करता येत नाही.
http://www.newsweek.com/2015/01/30/frances-problem-secularism-300718.ht… हा लेख फ्रेंचाचा सेक्यूलरीझम काय आहे ते मस्त सांगतो. त्यांंचे मते चर्च नि सरकार वेगळे म्हणजे सेक्यूलरीझम. आणि बाकी धर्मांचं काय करायचं? तर त्यांना असिमिलेट करायचं, ब्रिटनसारखं किंवा भारतासारखं इंटेग्रट नाही.

limbutimbu Wed, 06/05/2015 - 17:45

In reply to by ऋषिकेश

>>>> सध्या लोकांना नॉनव्हायोलन्ट नी अन्सेक्युलर वागायचंय पण सेक्युलॅरिझम सामान्य लोकांवर 'फोर्स' होतंय असं उदाहरण सांगाल काय?
माझ्या अल्पमतिनुसार एक सामान्य उदाहरण सांगू का?
आमच्या लहानपणापासून म्हणजे साधारणतः ३०/३५ वर्षांपूर्वीपासून बघतोय की हिंदी सिनेमातुन कथेनुरूप असेल वा नसेल, पण सर्रास "सर्वधर्मसमभाव" अशा काही विचित्र प्रचारी पद्धतीने घुसडवला जायचा की ते बघणे ही नंतर नंतर पब्लिकलाच असह्य होऊ लागले. जिथवर सेक्युलॅरिझम सिनेमापुरता मर्यादित होता तिथवर ठिक होते, पहाणे न पहाणे बरेचसे प्रेक्षकाच्या हाती असू शकायचे, पण सध्या बघितलेत, तर हौसिंग सोसायटींमधे अमुक धर्माच्या लोकांना जागा मिळालिच पाहिजे या मागणीपाठोपाठ आता त्याबद्दल रिझर्वेशन येणेही शक्य होईल असे वाटत होते. फ्लॅट निवडताना शेजार निवडण्याचे स्वातंत्र्य नाकारले जाते की काय अशी परिस्थिती. मी कदाचित चूकही असेन, किंवा सकारण "स्पष्ट शब्दात" मांडता येत नसेल.

अनुप ढेरे Tue, 05/05/2015 - 11:59

In reply to by ऋषिकेश

कोणत्या अनव्हायोलन्ट अन्सेक्युलर कृत्यावर आक्षेप घेतला जातो

विशिष्ट धर्मियांना घर भाड्याने मिळणार नाही अशा टाइपच्या घटना? सजा होत नाही पण बातमी नक्की होते आणि बरेच लोक आक्षेप घेतात.

गब्बर सिंग Wed, 06/05/2015 - 06:52

तुम्हाला कसे वाटते?

मागे संसदेवर हल्ला झाला होता तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी तैनात केलेल्या जवानास हे रिपोर्टर - "आप को क्या लगा था?", "आप को डर नही लगा ?" - असले प्रश्न विचारत होते.

गब्बर सिंग Wed, 06/05/2015 - 09:34

मोदी सरकारला घरचा आहेर ????

On Tuesday, the Swadeshi Jagaran Manch (SJM), the economic wing of the RSS, held a protest at Jantar Mantar against the proposed Land Acquisition Bill, the government’s moves on genetically modified (GM) crops, foreign e-commerce sites and proposed changes in intellectual property laws.

While RSS’s trade union wing, the Bharatiya Mazdoor Sangh (BMS), has said it would join a convention of other trade unions to decide on a possible strike on May 26, the Vishwa Hindu Parishad (VHP) has warned the government of “consequences” if it does not take steps to construct a Ram temple in Ayodhya.

ऋषिकेश Wed, 06/05/2015 - 13:51

In reply to by अनुप ढेरे

असे प्रकार केंद्रसरकारही करतेय अशी बातमी मागेच दिली होती. डोक्याला ताण नको. त्यावर हल्लागुला करून झालेला आहे.
आत केजरीवालही त्याच मार्गाने चाललेयत हे ही तितकेच निषेधार्ह आहे!
एककल्ली एकानुवर्त प्रशासन पद्धतीची ही लक्षणं आहेत. मग नेतेपदी कोणताही चेहरा असो. लक्षणं आणि रोग तेच!

दुर्दैवी! :(

ऋषिकेश Wed, 06/05/2015 - 14:08

In reply to by अनुप ढेरे

केजरीवालांचा (किंवा केंद्राचाही) असा मिडीयावरील 'क्लोज टॅब' केवळ फिडब्याकसाठी आहे अशा मताला भोळसट म्हणावे का शहामृगी?

अनुप ढेरे Wed, 06/05/2015 - 14:22

In reply to by ऋषिकेश

यात रेग्युलेशनबाबत काही दिसलं नाही. पण लोकांमध्ये आपली प्रतिमा काय होतिये किंवा काय बनवली जातिये (आणि ती कशाच्या आधारे बनवली जात आहे) याचा अभ्यास करण्यात गैर वाटलं नाही काही.

ऋषिकेश Wed, 06/05/2015 - 14:34

In reply to by अनुप ढेरे

तुम्ही मला काय कृती केलीये ते सांगताय नी माझा आक्षेप त्या कृतीमागच्या उद्देशाबद्दल आहे! मला ही टेहाळणी निव्वळ कुतुहल/अभ्यास/फिडब्याक म्हणून केली जातेय असे अजिब्बात वाटत/पटत नाही.

'बिग ब्रदर इज वॉचिंग यु' हे पुरेसे डिस्टर्बिंग नाही का?

अनुप ढेरे Wed, 06/05/2015 - 14:50

In reply to by ऋषिकेश

'बिग ब्रदर इज वॉचिंग यु' हे पुरेसे डिस्टर्बिंग नाही का?

नाही.
आणि केवळ फीडबॅक हा हेतू का असू शकत नाही? तो निव्वळ कुतुहल या पोटी केला जातोय हे मी म्हणत नाहीच्चे. स्वतःच्या पॉलिसींबद्दल निर्णय घेण्यासाठीदेखील याचा उपयोग होऊ शकतो. आपले निर्णय चुकलेत का त्याचं प्याकेजिंग चुकलय असल्या गोष्टी कळू शकतील यातून. (हे असच होइल असं मी म्हणत नाहीये. याचा गैरवापर होऊ शकतो. पण केवळ थोडीशी शक्यता आहे या भीतीपोटी मी या डेटा ग्यादरिंगला विरोध करणार नाही.)

ऋषिकेश Wed, 06/05/2015 - 15:09

In reply to by अनुप ढेरे

मुद्दा समजला. मला गैरवापर होण्याची शक्यता बरीच अधिक वाटत असल्याने माझा विरोध आहे.

--

दॅट अपार्टः केजरीवाल यांनी मोदींसारखे वागल्याने अनेकांची मोठी पंचाईत झालीये.
-- मोदी समर्थक व केजरीवाल विरोधकांना केजरीवालही बरोबर आहे म्हणावे लागतेय. कारण केजरीवाल चूक म्हटले तर तशीच कृती करणारे मोदी बरोबर कसे असा प्रश्न येईल
-- मोदी विरोधक मात्र केजरीवाल समर्थक असणार्‍यांना मोदी बरोबर होते असे म्हणावे लागतेय. कारण मोदी चूक म्हटले तर तशीच कृती करणारे केजरीवाल बरोबर कसे असा प्रश्न येईल. :)

अजो१२३ Wed, 06/05/2015 - 15:13

In reply to by ऋषिकेश

भाऊ,
माध्यमे माझा चूकीचा न्याय करत आहेत असे म्हणणे आणि भर चौकात माध्यमांचा न्याय करा म्हणणे ... यात फरक कराल का नाही?
का प्रत्येक नेता फार तर फार मोदी इतका खाली जाऊ शकतो, त्यापेक्षा नाही असा डॉग्मा भरलाय विचारांत?

नितिन थत्ते Wed, 06/05/2015 - 15:24

In reply to by ऋषिकेश

असं कै नै.

सरकारने जन्तेवर लक्ष ठेवण्याला माझा पाठिंबा आहे. (मोदींचे सरकार असो की आणखी कोणाचे).

गब्बर सिंग Wed, 06/05/2015 - 14:04

In reply to by ऋषिकेश

ऋ शी सहमत

(मला थोडी चढलिये पण ....)प्रत्येकाला दुसर्‍याच्या वर्तणूकीवर मर्यादा घालायची आहे.

माझ्या अभिव्यक्तीवर मर्यादा घालण्याच्या तुमच्या वृत्तीवर व अधिकारांवर मर्यादा कोण घालणार ?????

अजो१२३ Wed, 06/05/2015 - 14:32

In reply to by अनुप ढेरे

केजरीवाल भारताचा भावी हिटलर आहे अशी मला भिती आहे.
========================================================================
(अशा भित्या मधे मधे व्यक्त करून ठेवाव्यात काही काही मुद्द्यांवर. नंतर काही बरंवाईट झालं तर स्वतःस दृष्टे म्हणून प्रोजेक्ट करता येते. नै झालं तर ती केवळ भिती होती असं म्हणता येतं.*)
* अशा प्रकारे नको नको त्या भित्या व्यक्त करत सुटणं यास एक रणनिती म्हणून भितीसूत्र असा शब्द रूढ** करू यात का?
**भारतीय भितीसूत्रशास्त्राची माता म्हणून मेघनेचे नंतर भविष्यात नावही होईल कदाचित. =)) =)) =))

मेघना भुस्कुटे Wed, 06/05/2015 - 14:40

In reply to by अजो१२३

मला सूडो**** म्हणून प्रोजेक्ट करण्यात येत असताना त्यात ’भारतीय’ आणि ’माता’ हे दोन खास संस्कृतिपूर्ण शब्द आल्यामुळे पूर्ण प्रतिसाद बाद धरावा लागतो आहे. एरवी माझी लाडकी ’खवचट’ श्रेणी दिली असती. ;-)

अजो१२३ Wed, 06/05/2015 - 15:01

In reply to by मेघना भुस्कुटे

भारतीय असंतोषाचे जनक च्या धर्तीवर मी फ्रेज शोधत होतो.

जागतिक भितीसूत्रशास्त्राची जननी - हे चालेल? कि जननी मंजे टू मच कंडिसेडिंग होतं? निर्मात्री?

राजेश घासकडवी Sat, 09/05/2015 - 03:02

In reply to by मेघना भुस्कुटे

'ऐसीवरची दहशतवादाची सणराज्ञी साली' हे नामाभिधान कसं काय वाटतंय?
चला, आता मेघनाने हातातलं काहीतरी फेकून मारण्याआधी पळ काढतो.

limbutimbu Wed, 06/05/2015 - 17:37

In reply to by अजो१२३

बाकी विषय माहित नाही, पण भितीसूत्रशास्त्र या शब्दावरुन जाणवले की दृष्य मिडियामार्फत/लिखित माध्यमांद्वारे सातत्यपूर्णरित्या "भितीचे (व त्याद्वारे असंतोषाचे) रोपण" केले जाते त्यानुसार भितीरोपणशास्त्र असाही नवा शब्द काढावा काय?
आपल्याला काय वाटते?

चिंतातुर जंतू Wed, 06/05/2015 - 14:39

परवेझ शर्मा नावाच्या एका भारतीय वंशाच्या अमेरिकास्थित व्यक्तीनं हज यात्रेचं चित्रीकरण केलं आहे. परवेझ समलिंगी आहे. ह्या आधी त्यानं 'अ जिहाद फॉर लव्ह' माहितीपटात श्रद्धाळू समलैंगिक मुसलमानांच्या प्रश्नांचा शोध घेतला होता. आता 'माझ्यासारख्याला आज चांगला मुसलमान होणं शक्य आहे का?' ह्या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी त्यानं 'अ सिनर इन मक्का' हा माहितीपट बनवला आहे. हज यात्रेतल्या अनेक ठिकाणी छायाचित्रण निषिद्ध आहे, आणि सौदी अरेबियामध्ये समलिंगी व्यक्तींना देहदंडाची शिक्षा होते. हा धोका पत्करून परवेझनं तिथं छुपं चित्रण केलं. त्याच्या एका मुलाखतीतून -

“If anything,” he says, “my faith seems to disappear in this very place.” What he confronts is “the frontline of Islam” – never-before-filmed streets dominated by peace-loving pilgrims, and a government-supported bastardisation of the religion that bears little resemblance to the faiths of most Muslims. It’s a Saudi Arabia never seen before on film, one that its secretive monarchy doesn’t want the world to discover.

limbutimbu Wed, 06/05/2015 - 17:34

कदाचित शिळी बातमी असेल... पण...
असे कळते की सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
या बातमी बद्दल आपल्याला काय वाटते?

बॅटमॅन Wed, 06/05/2015 - 17:38

In reply to by limbutimbu

शिक्षा लाख ठोठावली असेल हो, पण इतक्यात संपतंय कुठं? आता हे प्रकरण हायकोर्टात आणि कदाचित सुप्रीमकोर्टातही जाणार अन तिकडेही वर्षानुवर्षे चिघळणार.

धर्मराजमुटके Wed, 06/05/2015 - 17:41

In reply to by limbutimbu

ते एक बरे झाले . नायतरी नेपाळ भुकंपाच्या बातम्या संपतच आल्या होत्या. आता मिडियावाल्यांना ८-१० दुकानात काय विकायला ठेवायचे याची चिंता नाही.

ऋषिकेश Thu, 07/05/2015 - 10:38

In reply to by अनुप ढेरे

उत्तम!
परराष्ट्र मंत्रालय व श्रीमती स्वराज अतिशय उत्तम काम करत आहेत हे संसदेतील त्यांच्या उत्तरातही जाणवत असते

गब्बर सिंग Thu, 07/05/2015 - 10:45

In reply to by अनुप ढेरे

How India’s Narendra Modi Became a Social Media #Superstar

(Gated)

Two senior members of the team said they rely on a massive database of “online volunteers”—a retweeting and commenting army—to make Mr. Modi’s messages go viral. Another important job: studying online sentiment. Indu Shekhar, 35 years old, spends his days tracking how netizens are reacting to Mr. Modi’s initiatives and speeches. “We’re very data driven,” said Arvind Gupta, who heads the BJP’s digital operations and works closely with Mr. Modi. “We use data to decide if our message needs to change, if a sound bite needs to be given to shape the ecosystem.”

चिंतातुर जंतू Thu, 07/05/2015 - 18:56

In reply to by गब्बर सिंग

आणि हेही विसरू नका -

Mr. Gupta’s team is currently working “very hard,” he said, to change the narrative about Mr. Modi’s land-acquisition policy. Mr. Modi is seeking to make it easier for the government to acquire land for industry and infrastructure projects. His political opponents have criticized the policy as “anti-farmer.”

“The data showed that our messaging on the land issue wasn’t right, so we starting working to correct it,” Mr. Gupta said.

तात्पर्य - 'बिग डेटा' आणि 'अ‍ॅनॅलिटिक्स'साठी तरी अच्छे दिन आलेले आहेत.

गब्बर सिंग Thu, 07/05/2015 - 22:08

In reply to by चिंतातुर जंतू

मला रोचक वाटलेले वाक्य हे -

“The data showed that our messaging on the land issue wasn’t right, so we starting working to correct it,” Mr. Gupta said.

.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
.
.
आणखी .....

.
.
.

india final
screenshot windows

[url=http://postimage.org/][img]http://s10.postimg.org/iq4d66h2x/india_final…]
[url=http://postimage.org/app.php]screenshot windows[/url]

चिंतातुर जंतू Fri, 08/05/2015 - 11:10

In reply to by गब्बर सिंग

>> मला रोचक वाटलेले वाक्य हे

आपल्या पंतप्रधानांना हृदयाच्या गाभ्यापासून गरिबीविषयी काय वाटतं ते तुम्हाला रोचक वाटलं की नाही?

On what influences him: [Chokes and tears up.] This touches my deepest core. I was born in a very poor family. I used to sell tea in a railway coach as a child. My mother used to wash utensils and do lowly household work in the houses of others to earn a livelihood. I have seen poverty very closely. I have lived in poverty. As a child, my entire childhood was steeped in poverty. For me, poverty, in a way, was the first inspiration of my life … I decided that I would not live for myself but would live for others.

गरिबीतून उभे राहिलेले ह्यांच्यासारखे निःस्वार्थी लोक आज नेतेपदी आहेत म्हणूनच आज भारताची प्रगती होते आहे.
स्रोत : 'टाइम'मधली मुलाखत

अजो१२३ Thu, 07/05/2015 - 13:44

http://zeenews.india.com/news/delhi/dcw-writes-to-home-ministry-lg-poli…
आपस्य कथा रम्या.
ती -"भाऊराया, आपले लफडे नव्हते म्हणून जगाला सांग."
शांतता
ती - "केजरीवाल साहेब, कृपया भाऊरायांना बोलते करा."
पुन्हा शांतता
ती - "दिल्ली स्त्री आयोगा, माझी बदनामी होतेय. भाऊरायांना स्पष्टीकरण द्यायला सांगा."
आयोग - "भाऊराया, कृपया स्पष्टीकरण द्या"
शांतता.
भाऊराया -"मी आयोगा पुढे जाणार नाही. ती मला भाऊराया म्हणते यातच सर्व आलं."
आयोग -"भाऊराया, सादर व्हा."
शांतता
आयोग -"भाऊराया, सादर व्हा."
तिचा नवरा -"भाऊराया आणि वहीनी जाहीर स्पष्टीकरण देत नाहीत तोपर्यंत मी तिला स्वीकारणार नाही."
आयोगाच्या ऑफिसात...
भाऊरायांचे खंदे सेवक - " ब्गेब्द्;फुध्॑एर्'फ्र्ह्'॑एर्फ्क्२एप्र्क्फ्वोपेरस्द्ज्ख्फ्वेर्ह्व्ज्फोइ;एज्र्फ'२"
आहेत तिथून...
भाउराया - "मी सादर होणार नाही. सोशल मिडियात बदनामी करणारे बीजेपीचे लोक आहेत. आयोग सुद्धा त्यांचाच वाटतोय."
ऑफिसात...
भाऊरायांचे खंदे सेवक - " क्व्ह्फ्ल्॑गेफ्॑एह्न्फ्व्क्ज्द्फ्व्ब्क्व्ज्फ्व्ब्क्व्ज्फ्ह्व्न्३२इ४५त्पोइत्५[४ओग्व्द्ज्क्ज्॑वेब्फ्॑न्ग्व्फ्क्॑व्क्रे"
ती आणि नवरा - "ह्॑फ्क्ज्॑व्ह्फ्॑व्ह"
आयोग - "सेवकांनो, आत्ता मात्र मी पोलिसांना सांगेन"
======================================================================================
कोणत्या संस्थेचे काय अधिकार असावेत , नसावेत ते फेमिनिझम ते राजकारण ते अभिव्यक्तिस्वातंत्र्य इ इ विषय चर्चायला क्लासी केस आहे.

नितिन थत्ते Thu, 07/05/2015 - 14:15

In reply to by अजो१२३

केस खरंच गंमतीदार आहे.

समजा त्या महिलेचे आणि कुमार विश्वास यांचे संबंध असतील.....
तर त्यांनी समोर येऊन ते नाकारणे म्हणजे खोटे बोलणे. मग कदाचित आप-शत्रू कुठूनतरी फ़ोटोपुरावे आणून दाखवणार...

संबंध स्वीकारणे म्हणजे त्या महिलेच्या संसाराची वाट.

अजो१२३ Thu, 07/05/2015 - 14:04

http://www.dnaindia.com/india/report-us-hits-out-at-modi-government-for…
अमेरिकन लोक नेहमी अन्य देशातल्या या राजकारण्याला बदनाम कर, हा रिपोर्ट काढून या क्षेत्रात या देशाचे हे सरकार कसे अन्यायी, ते सरकार कसे दुष्ट आहे इ इ प्रकार करत असतात. मंजे सगळं जग त्यांच्या पुण्यभूवरून बेंचमार्क करायचं.

भारताला न केवळ तिथल्या एन जी ओ वर बंदी पण चक्क चक्क त्यांना "सुरक्षा" "शांती" इ इ साठी वॉचलिस्ट मधे टाकले. चांगलीच मिरची लागलेली दिसतेय. मुद्द्याचं एक अक्षर न बोलता गांधी, टिळक, नेहरू, आंबेडकर, ....

अनुप ढेरे Thu, 07/05/2015 - 23:35

In reply to by ऋषिकेश

यात काय वावगं आहे? जर मंत्री बॉटलनेक बनले असतील तर करेक्टीव्ह पावलं अजून कोणी उचलायची? नाहीतर नाकाखाली हजारों कोटींचे भ्रष्टाचार होतात पण पंप्रंना पत्ता नाही किंवा प्रत्येक निर्णयाला नवा एंपॉवर्ड ग्रूप किंवा मोहल्ला सभा यातली केस व्हायची.

अजो१२३ Thu, 07/05/2015 - 23:38

In reply to by अनुप ढेरे

त्यांना सत्ता एकवटायची क्रॉनिक भिती आहे. अगदी कोणत्याही कायद्याचं उल्लंघन झालं नाही तरी त्यांना भिती वाटते. २०१९ ला हे सरकार आपटेल. तेव्हा ती जाईल.

ऋषिकेश Fri, 08/05/2015 - 11:13

In reply to by अनुप ढेरे

यात काय वावगं आहे? जर मंत्री बॉटलनेक बनले असतील तर करेक्टीव्ह पावलं अजून कोणी उचलायची?

करेक्टीव्ह पावलं मोदींनीच उचलायची हे मान्यच.
पण 'करेक्टिव्ह पावलं' म्हणून काय केलं जातंय हे बघायचं नाही का?

मंत्री बॉटलनेक 'वाटताहेत' तर त्यांच्याशी संवाद साधा, त्यांची कारणे जाणून घ्या, ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, त्यांना 'समज' द्या, तरीही काही होत नसेल तर त्या विभागातील मंत्री (व्यक्ती) बदला. पण मंत्रीपदाचे (व्यक्तीचे नव्हे) अधिकार काढून घेऊन स्वतःला रिपोर्ट करणार्‍या प्रशासनिक व्यवस्थेकडे द्यायचे यात मला चांगलंच वावगं वाटतं!

पण छे.. आपल्याच मंत्र्यांशी संवाद वगैरे काय साधायचा! त्यांना द्यायचा तो फक्त "आदेश"! नै का?

अनुप ढेरे Fri, 08/05/2015 - 11:18

In reply to by ऋषिकेश

पण छे.. आपल्याच मंत्र्यांशी संवाद वगैरे काय साधायचा! त्यांना द्यायचा तो फक्त "आदेश"! नै का?

मोदींनी संवाद साधल्याची मिनिट्स जालावर टाकावी अशी अपेक्षा आहे काय?

ऋषिकेश Fri, 08/05/2015 - 11:23

In reply to by अनुप ढेरे

ओह म्हणजे "संवाद" साधला असावा असे वाटतेय! तसे असल्यास तरीही मंत्री ऐकत नाहीत? हा काय "संवाद" झाला?
(तरी बरं भाजपाचेच खासदार संवाद नाही म्हणून ओरडत आहेत)

मग पंतप्रधानांचे न ऐकणार्‍या मंत्र्यांना बदलले का जात नाही?
जर निष्क्रीय व्यक्ती आहे तर ती बदला पदाचे अधिकार का काढावेत?

अनुप ढेरे Fri, 08/05/2015 - 11:38

In reply to by ऋषिकेश

पदाचे अधिकार का काढावेत?

कुठल्या मंत्र्याला कुठले अधिकार असतात हे लिखित नियम असतात का ह्युरिस्टिक्स?

अजो१२३ Thu, 07/05/2015 - 23:36

In reply to by ऋषिकेश

अधिकाधिक कारभार पंतप्रधान कार्यालयाच्या हातात जाण्याचं हे लक्षण नाही का?

मग? इमर्जन्सी चालू होणार आहे का देशात?

गब्बर सिंग Fri, 08/05/2015 - 01:33

In reply to by ऋषिकेश

१) मोदी एकाधिकारशाहीवादी आहेत. हडेलहप्पी करतात.
२) मोदी, जेटली, शहा हे त्रिमूर्ती च मिळून सगळे निर्णंय घेतात. त्रिमूर्तींची हडेलहप्पी.
३) मोदी आपल्या कार्यायलयाच्या अधिकारक्षेत्राच्या कक्षा रुंदावू पहात आहेत. सगळी सत्ता पंतप्रधान कार्यालयाच्या हातात एकवटण्याची भिती आहे.

ह्यात क्रमाक्रमाने एका व्यक्तीपासून तीन व्यक्ती व नंतर अनेक व्यक्ती (पंतप्रधान कार्यालयात अनेक व्यक्ती काम करतात) अशी प्रगती आहे का ?

प्रगति नसेल तर व्ही के सिंग यांनी (येमेन मधे) केलेले काम व सुषमा स्वराज यांनी (परराष्ट्र खात्यात) केलेले काम हे सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे झाले की केंद्रीकरणातून ?? की सुषमाजींचे काम व सिंग यांचे काम फारसे ग्रेट नाही व mediocre आहे ?? की यांच्या कामाचा विकेंद्रीकरणाशी काहीही संबंध नाही ?

(संभाव्य प्रतिवाद - उदा. व्ही के सिंग यांनी केलेले काम हे फक्त त्यांनी केलेले नसून आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांचा सहभाग व सहकार्य त्यांना मिळालेले आहे हे मान्य आहेच.)

ऋषिकेश Fri, 08/05/2015 - 11:22

In reply to by गब्बर सिंग

तीनही विधान एकाच वेळी खरी आहेत. प्रवास क्रमांक ३ पर्यंत पोचायला सुरूवात आहे (मंत्र्यांचे अधिकार कमी करणे), त्याच दिशेने प्रवास चालु राहिला तर १ पर्यंतही पोचण्याची शक्यता आहे.

आमच्यासारख्या व्यक्ती गैर होताना दिसल्यास वाळूत मान खुपसून न बसता (अतिशय वैयक्तित स्तराची टिका झेलूनही) 'रिंगिंग द बेल' हे तत्त्व मानतात. ते केल्याने सरकारच्या प्रवासाची दिशा व वेग बदलला तर कदाचित तसे होणारही नाही - व त्याचे श्रेय या बेल रिंगर्सना मिळाले नाही अगदी सरकारनेच घेतले तरीही आनंद आहे!

=========

बुधवारच्या बांगलादेश सीमेवरच्या विधेयकावरील चर्चेच्या वेळी श्रीमती स्वराज यांनी श्री मनमोहन सिंग सभागृहात असताना मतदान होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला कारण ते काम त्यांनी सुरू होते व सद्य सरकार फक्त ते पूर्णत्त्वास नेत आहे. (काँग्रेसतर्फे खरंतर त्यांनी भाषण करायला हवे होते अशी माझी इच्छा होती. पण ती शेवटी काँग्रेस आहे. योग्य व्यत्कीला श्रेय जाण्याची भिती त्यांना वाटते). विरोधकांशी (खरंतर कोणाशीही) संवाद साधल्याने मिळणारे फायदे मिळवणे सरकारातील बाकी मंत्री केव्हा शिकणार कोण जाणे!

काँग्रेस व भाजपामधील अंतर झपाट्याने कमी होत आहे व भाजपा काँग्रेसप्रमाणेच नवी एकानुवर्त व्यवस्था बनत आहे, हेच तर दु:ख आहे!

अजो१२३ Fri, 08/05/2015 - 12:03

In reply to by ऋषिकेश

काँग्रेस व भाजपामधील अंतर झपाट्याने कमी होत आहे व भाजपा काँग्रेसप्रमाणेच नवी एकानुवर्त व्यवस्था बनत आहे, हेच तर दु:ख आहे!

मागे एकदा एकानुवर्तता मोजताना गुजरातमधे मोदीकडे किती खाती आहेत पहा पहा असे तुम्ही म्हणाला होतात.

तेव्हा मी तुम्हाला गुजरातपेक्षा चौपट मोठ्या उत्तर प्रदेशात अखिलेशकडे मोदींपेक्षा दोन अडीचपट खाती जास्त आहेत हे पहा ना म्हणालेलो. दोन मुख्यमंत्र्यांची तुलना करताना मोदीचे भय तुम्हाला जास्त वाटते. दुसरा (ते निकष योग्य असले तर) कमी भयानक वाटतो.

आता मोदी केंद्र सरकार मधे रिपोर्टींग कशी आहे यात बदलत करताहेत. कायद्याच्या फ्रेमवर्क मधे.
===========================================================================================================
नीट सांगा, तुम्हाला मोदी या माणसाचीच भिती आहे का एक प्रशासकीय पद्धत एका विशिष्ट प्रकारे बदलण्याची भिती आहे?
माणसाची भिती असेल तर आता वेळ गेलेली आहे. त्याला अमर्याद अधिकार आहेत (इमर्जन्सी,इ)
प्रशासन चूक आहे, कमी एफिंशिएंट आहे म्हणायचेय तर ते म्हणा आणि कसे ते सांगा.
आणि प्रशासन म्हणजे भाजपा नव्हे.
प्रशासन बाय डिफॉल्ट एकानुवर्तच असते. नैतर जगात कुठेच चलू शकत नाही.

बॅटमॅन Fri, 08/05/2015 - 12:40

In reply to by ऋषिकेश

काँग्रेस व भाजपामधील अंतर झपाट्याने कमी होत आहे व भाजपा काँग्रेसप्रमाणेच नवी एकानुवर्त व्यवस्था बनत आहे, हेच तर दु:ख आहे!

एकूण प्रतिसादांवरून भाजपा कशी आहे यापेक्षाही भाजपाला सत्ता मिळाली हेच दुखणे वाटतेय.

चिंतातुर जंतू Fri, 08/05/2015 - 11:39

In reply to by ऋषिकेश

>>हा मंत्र्यांना दणका वगैरे असेलही पण अधिकाधिक कारभार पंतप्रधान कार्यालयाच्या हातात जाण्याचं हे लक्षण नाही का?

माझ्या परिसरातल्या एका पुणेरी गृहस्थाचे उद्गार - 'शेवटी देश ब्राह्मणच चालवतात हे मोदींना कळलं आहे ह्याचं हे द्योतक आहे. बाकीच्यांना बसू देत बोंबलत.'

अजो१२३ Fri, 08/05/2015 - 11:53

In reply to by चिंतातुर जंतू

माझ्या परिसरातल्या एका दिल्लीकर गृहस्थाचे उद्गार - 'एक गरीबीतून आलेला ओबीसी देखिल मातलेल्या कायस्थ आणि ब्राह्मण सेक्रेटरींच्या ढुंगणावर हासडून लाथा घालून त्यांना कामाला लावतोय. स्वतःला बुद्धिमान म्हणून प्रोजेक्ट करणं, देशाची प्रगतीची लायकी असूनही न करू शकणं, प्रचंड माज करणं आणि स्वतःची तुंबडी भरणं आणि पुन्हा तरीही स्वतःला सभ्य आणि हुशार म्हणून प्रोजेक्ट करणं असं ही भटुरडी मंडळी काँग्रेसच्या आंधळ्या कारभाराच्या काळात करत. आता बोंबलू देत.'

चिंतातुर जंतू Fri, 08/05/2015 - 12:46

In reply to by अजो१२३

>> प्रचंड माज करणं आणि स्वतःची तुंबडी भरणं आणि पुन्हा तरीही स्वतःला सभ्य आणि हुशार म्हणून प्रोजेक्ट करणं असं ही भटुरडी मंडळी काँग्रेसच्या आंधळ्या कारभाराच्या काळात करत.

हा हा हा. फक्त काँग्रेसच्याच काळात? त्यांना म्हणावं जरा महाराष्ट्रात येऊन पाहा इथे ब्रिगेडी लोक काय म्हणून राहिलेत ते. ;-)

चिंतातुर जंतू Fri, 08/05/2015 - 13:38

In reply to by नितिन थत्ते

>> ब्रिगेडी लोक काँग्रेसचे नसतात का?

काँग्रेस तर कालपरवाची. त्यांना मोगलाईपासून काय चाललं होतं हे माहीत असतं.

अजो१२३ Fri, 08/05/2015 - 14:12

In reply to by चिंतातुर जंतू

त्यांना म्हणेन पुन्हा भेटल्यावर. पण व्यक्तिगत पातळीवर माझं महाराष्ट्रात ब्राह्मणांना ब्रिगेडी रट्टा सुद्धा बर्‍यापैकी आवश्यक आहे असं मत आहे.

चिंतातुर जंतू Fri, 08/05/2015 - 14:20

In reply to by अजो१२३

>> महाराष्ट्रात ब्राह्मणांना ब्रिगेडी रट्टा सुद्धा बर्‍यापैकी आवश्यक आहे

तुमच्या मते ह्या ब्रिगेडी रट्ट्यामुळे ब्राह्मणांवर नक्की काय परिणाम होतो किंवा होणं गरजेचं आहे?

बॅटमॅन Fri, 08/05/2015 - 14:20

In reply to by अजो१२३

बरोबर आहे. भांडारकरसारखी भटी संस्था खरे तर बाँबच टाकून जाळायला पाहिजे होती; पण चूक झाली, नै?

अजो१२३ Fri, 08/05/2015 - 17:46

In reply to by ऋषिकेश

देशाच्या विकासाची गाडी वेगाने धावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वाकांक्षी योजना आणल्या. पण या योजना मंत्र्यांच्या चालढकलीने थंड पडल्या. त्यामुळे सर्व योजनांच्या काटेकोरपणे अंमलबजावणीचे शिवधनुष्य मोदींनी सरकारी बाबुंच्या मदतीने हाती घेतलं आहे. परिणामी काही मंत्र्यांना तर औपचारीक जबाबदारीही उरलेली नाही.

महत्त्वाकांक्षी योजनांना वेग देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मंत्रालयातील सचिवांचे अधिकार वाढवले आहेत. तसंच सचिवांचे आठ गट स्थापन केले आहेत. हे गट थेट कॅबिनेट सचिवांना रिपोर्ट करतील. आणि कॅबिनेट सचिव थेट पीएमओला रिपोर्ट देतील. याशिवाय उच्च अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेच्या मर्यादा काढून त्यांची कामं विस्तारण्यात आली आहेत. संरक्षण आणि गृह सचिवांना अर्थ व्यवहार सचिवांशी संबंधित गटात ठेवण्यात आलं आहे. सांस्कृतिक आणि शिक्षण सचिवांना उद्योगांशी संबंधित कार्यसचिवांच्या गटात ठेवलं आहे.

कार्मिक विभागाने १६ एप्रिलला दिलेल्या आदेशानुसार सचिव पातळीवरील हे बदल करण्यात आले आहेत. प्रत्येक वर्कींग ग्रुपमध्ये ९ ते ११ सदस्य आहेत. उद्योग, कौशल्य विकास, पायाभूत सुविधा ( रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूक), शहर विकास, कृषी आणि कृषी प्रक्रिया, वित्तीय सेवा, आरोग्य आणि सामाजिक समस्या असे एकूण आठ गट तयार केले गेलेत. यात सहभागी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणत्याही दोन योजना निवडाव्यात ज्यांना पुढच्या तीन महिन्यात वेग देता येईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय सध्या सुरू असलेल्या दोन अशा योजना निवडाव्यात ज्यांमध्ये दूरगामी चांगले बदल दिसून येतील.

सर्व सचिवांना आपल्या पहिल्या नियुक्तीच्या ठिकाणाचा दौरा करून त्या जिल्ह्यांचा अहवाल सादर करण्यास पीएमने सांगितलं होतं. सध्या झालेले बदल हे त्यातूनच आले आहेत. नेमलेल्या गटांनी योजनांची निवड केल्यानंतर संबंधित मंत्रालय त्यांना ती जबाबदारी सोपवतील. आणि हे गट नियोजित वेळेत योजना पूर्ण करतील, असे आदेश देण्यात आलेत.

'विविध योजना आणि प्रकल्प एप्रिल अखेरपर्यंत निवडले जातील असं सांगण्यात येत होतं. पण याला आणखी वेळ लागेल. कारण नेमलेल्या गटांच्या अजून बैठकाच झालेल्या नाहीत. पंतप्रधान मोदींनी स्वतः नवे मूलभूत बदल घडवले आहेत. आपल्या नोकरीच्या अखेरच्या टप्प्यात असलेले या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनुभवाच्या जोरावर नव्या कल्पना वास्तवात आणण्याची संधी किंवा आव्हान यातून दिले गेले आहे', असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

\

एवढ्या चर्चेनंतर मूळ बातमी पुन्हा एकदा वाचणे गरजेचे आहे. इथे कोणालातरी (वृत्तपत्र, अधिकारी, सरकार, मोदी, मंत्री, इ इ ना) "ती" भिती आहे याची हलकिशी तरी हिंट आहे का? मग उगाच कशातही काहीही का पाहायचं? भयगंड झाला आहे का? जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत हुकुमशाहीची किंवा "ते होण्याची" भिती तुम्हाला आहे का याचं बायनरी उत्तर मिळेल का?

आणि कधी एखाद्या मिनिस्ट्रीत फेरफटका मारा आणि अंतर्गत किंवा दुसर्‍या मिनिस्ट्रिसोबत/एजंसीजसोबत कसे काम चालते ते पहा. पॅथेटिक प्रकार आहे. हे सुधरायचा कोणी प्रयत्न करतंय त्याची वाहवा करायचं तिकडंच राहिलं, किमान गप्प बसा.

बॅटमॅन Fri, 08/05/2015 - 17:51

In reply to by अजो१२३

आणि कधी एखाद्या मिनिस्ट्रीत फेरफटका मारा आणि अंतर्गत किंवा दुसर्‍या मिनिस्ट्रिसोबत/एजंसीजसोबत कसे काम चालते ते पहा. पॅथेटिक प्रकार आहे.

अशा गोष्टींत व्यर्थ वेळ वाया घालवण्याने पुरोगाम्यांना काळिमा लागतो.

हे सुधरायचा कोणी प्रयत्न करतंय त्याची वाहवा करायचं तिकडंच राहिलं, किमान गप्प बसा.

असं काय करता अजो, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे महत्कार्य करतात हे. यांच्या निरर्थक आत्मरंजनाला तोड नाही.

नितिन थत्ते Fri, 08/05/2015 - 18:05

In reply to by बॅटमॅन

श्री अब्दुल रहमान अंतुले यांनीही असं काहीतरी करायचा प्रयत्न केला होता म्हणे. पण त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात गोवण्यात आलं आणि त्यांची गच्छंती झाली.

पण विविध खात्यात समन्वय साधणे हे पंतप्रधानांचं काम असायला हवं आणि ते मोदी करत असतील तर चांगलं आहे.

बॅटमॅन Fri, 08/05/2015 - 18:15

In reply to by नितिन थत्ते

अंतुल्यांबद्दलची माहिती रोचक आहे! हे माहिती नव्हतं. रायगड अन सिंधुदुर्ग जिल्हे वेगळे करून त्यांना किल्ल्यांची नावे देणारे ते अंतुले हे बाकी माहिती होतं.

नितिन थत्ते Fri, 08/05/2015 - 20:06

In reply to by बॅटमॅन

रायगड वेगळा केला नाही. जुन्या कुलाबा जिल्ह्याला रायगड असे नाव दिले. रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून सिंधुदुर्ग आणि औरंगाबादमधून जालना जिल्हा वेगळा केला.

गब्बर सिंग Fri, 08/05/2015 - 10:53

Nebraska Woman Sues Gays On Behalf Of God And Jesus

A Nebraska woman on Tuesday filed a lawsuit against "Homosexuals," asking a judge to decide whether "homosexuality is a sin". Sylvia Ann Driskell claimed she is the "ambassador for plaintiffs God, and his son, Jesus Christ" and declared that "homosexuality is a sin" and that gay people violate "religious and moral law."

Driskell hand-wrote a seven-page petition referencing the dictionary and the Bible. "That homosexuality is a sin and that they the homosexuals know it is a sin to live a life of homosexuality. Why else would they have been hiding in the closet," she wrote.

आता बोला ???????

------

Federal judge dismisses Nebraskan's suit against all homosexuals

A federal judge will not allow a Nebraska woman to be a legal spokeswoman for God and his son, Jesus Christ.
Judge John Gerrard dismissed a lawsuit Wednesday filed against all homosexuals.

Sylvia Driskell, 66, of Auburn, Nebraska, had asked the court last week to decide whether homosexuality is a sin.
In a strongly worded opinion, the judge said it is not up to the court to decide whether homosexuality is sinful.

अजो१२३ Fri, 08/05/2015 - 11:09

In reply to by गब्बर सिंग

भारत ही खरोखरीच अमेरिकेपेक्षा परमश्रेष्ठ लोकशाही आहे. ही केस अमेरिकेत डिसमिस झाली.
गब्बरजींच्या दुव्यातून -

In a strongly worded opinion, the judge said it is not up to the court to decide whether homosexuality is sinful.

Gerrard said Driskell lacked subject matter jurisdiction and cannot sue a class of unidentified defendants. Driskell did not set forth a factual or legal basis for a federal claim.

"The United States Federal Courts were created to resolve actual cases and controversies arising under the Constitution and the laws of the United States," Judge Gerrard said. "A federal court is not a forum for debate or discourse on theological matters."

Gerrard declined to allow Driskell an opportunity to amend her complaint.

केस वास्तवात आणून लढा असा सल्ला अमेरिकन कोर्टानं दिला आहे.

भारतात मात्र न्यायपालिकेने रवि शंकर प्रसाद यांना श्रीरामचंद्रप्रभूंचे मित्र म्हणून केस लढू दिली. त्यात केस इप्सो फॅक्टो राम (कुकुला बाळ राम) केसची पार्टी होता. ती १/३ जमिन त्यालाच मिळाली आहे. हिंदू महासभा त्याची प्रतिनिधी आहे हा भाग वेगळा.

अम्रिकन कोर्टाला जीजसची कंसेप्ट मान्य दिसत नाही, भारतीय कोर्टाला राम चालतो.