Skip to main content

अक्षरप्रेमी

नमस्कार.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 'अक्षरप्रेमी' नावाच्या नव्या मराठी उन्माद ब्लॉगची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

परसूंकीच बात है...

"क्यों मियां, कब देते टीवी? भोत दिनां हो गये ना..."
"परसूं आजाव साब, तबतलक पक्का रेडी करके रैता."
"ऐसा घुमाव नक्को मियां, ये तुम्हारे परसूं का एक कौनसातोबी तारीख बताव"
"पक्का परसूं, साब. परेशान नै हुनाजी"
-किंवा -
"ये परसूंकीच बात है, हिंया सामनेईच ठैरा था जॉर्ज बुश!"
"कुछ तो बी बोलते क्या? उन्हें आके भोत सालां हो गये ना"
"हौला है क्या रे? परसूं बोलेतो अपना हैदराबाद का परसूं रे. नया आया क्यारे हैदराबादमें?"

जुन्या हैदराबादेत 'परसूं' या शब्दाला फार्फार महत्त्व आहे.
परसों म्हणजे परवा. कालच्या काल किंवा उद्याच्या उद्या.

हे ssss इथं

आपण खुपदा एखाद्याशी बोलताना विचारतो कि अमुक अमुक रस्ता, बिल्डींग इ. कुठे आहे? उत्तर " हे इथंच तर आहे".
..हे इथच म्हणजे नक्की कुठं? काही दिशा वगैरे काही नाही....बऱ्याचदा एखादा पत्ता सांगतानासुद्धा लोक "हे इथच " असली भाषा वापरतात, आता याला काही अर्थ आहे का?
एकदा माझा एक काका दुसऱ्या शहरातून मुंबईत आला होता आणि स्टेशनावरून घरी यायला बसमध्ये चढला....तिसऱ्या थांब्यावरच घर होते पण त्याला काही थांब्याचे नाव आठवेना..
कंडक्टरने "कुठं ?" विचारल्यावर ह्याने "हे ssss इथं " सांगितलं आणि त्याने बरोबर तिकीट दिलं...

अजून एक किस्सा आठवला...पुण्यातला..

आयडी आणि व्यक्ती

Taxonomy upgrade extras

एका नाटकातलं दृश्य: एक सुंदर स्त्री आपला मेकप उतरवते आहे. चेहऱ्यावरचे रंग काढल्यावर आपल्याला दिसतं की तिच्या चेहऱ्यावर भाजल्याचे चट्टे आहेत. दाट केसांचा विग उतरवल्यावर तिचे केस अगदी तोकडे आणि रयाहीन दिसतात. पाच मिनिटांपूर्वी मी जिच्यावर भाळलो होतो ती आता कुरुप दिसायला लागली आहे.

बोन्साय

Taxonomy upgrade extras

'चौकट राजा' हा चित्रपट पाहिल्यापासूनच 'बोन्साय' या प्रकाराबद्दल मनात काही प्रमाणात अढी होती. पण हे नक्की कसं करतात याबद्दल अनेक प्रश्नही होतेच. एक दिवस राजधानीच्या शहरात भेटायचं आहे तर आर्बोरिटमला जाऊन बोन्साय गार्डन पाहू, असं २ विरूद्ध शून्य अश्या प्रचंड मताधिक्याने ठरलं. नेहेमीप्रमाणे जरूरीपुरतं इंप्रेशन मारण्याएवढी माहिती आपल्याला असावी या विचाराने मी विकीपिडीयावरचं बोन्सायचं पानही वाचलं.

काही नोंदी अशातशाच... - ८

या नोंदी लिहायच्या की नाही, असा प्रश्न माझा मलाच पडला. या विषयावर याआधी दोन-तीनदा लेखन झालं आहेच. त्यातली मूळची तथ्यं नवी नाहीत. मग का लिहायचं? प्रश्नाचं स्वाभाविक उत्तर 'नको' असंच होतं. पण एक चाळा म्हणून या दोन दिवसांच्या अनुभवांकडे पाहिलं. थोडं तटस्थपणे. तेव्हा असं लक्षात आलं की, काही गोष्टी आपल्याच संचितात नव्यानं जमा झालेल्या आहेत. त्यांची कुठं तरी नोंद झाली पाहिजे. मग हेही लक्षात आलं की, काही वाचकांना तरी खचितच काही गोष्टी नव्यानं कळतील. लिहायचं, हे ठरलं.
हे मनोगत नाही, किंवा स्पष्टीकरणही नाही. हीही एक नोंदच आहे!
---

संकेतस्थळास शुभेच्छा

संकेतस्थळ सुरू झाल्याचे संस्थापकांपैकी एकाने निरोपाद्वारे कळवले. हा निरोप अनेकांना एकाचवेळी पाठवण्यात आला होता. त्यातील अनेकांनी 'रिप्लाय ऑल' वापरून प्रतिनिरोप पाठवले. त्यातील काही संकेतस्थळाला शुभेच्छा, पहिले पान चांगले आहे, रंगसंगती आवडली अशा प्रकारचे आहेत. तशा सर्व निरोपांसाठी (म्हणजे सारखे फोनवर नोटिफिकेशन वाजू नये म्हणून) हा धागा काढला आहे. आपल्या शुभेच्छा नव्या संकेतस्थळावर प्रतिक्रिया नोंदवून द्या. इमेलखोक्यांचा वापर टाळा.

नवीन संकेतस्थळास हार्दीक शुभेच्छा!

पेड्डामानिषी

रोज ऑफीसमधून आल्यानंतर झोपेपर्यंत माझ्या तेलुगु मैत्रिणी(रूममेट) बरोबर खूप मनमोकळ्या गप्पा होतात. शुक्रवार आणि शनिवारी तर गप्पांचा फड फारच रंगतो. कारण दुसर्‍या दिवशी सुट्टी असते. या गप्पांना कोणताही साचा, बंधन, सीमा नसतात. अगदी मनमोकळ्या गप्पा होतात. अशाच एका रात्री - मुलगी वयात येऊन तिचा मासिक धर्म सुरु होणे या विषयावर आमच्या गप्पा रंगल्या. मग एकमेकींचे अनुभव, संलग्न रुढी सारे काही चर्चीले गेले.