ऋणनिर्देश
ऋणनिर्देश
- ऐसी अक्षरे संपादक मंडळ
ऐतिहासिक प्रथेनुसार ह्या वर्षीही 'ऐसी अक्षरे'चा दिवाळी अंक प्रकाशित करताना आम्हांला आनंद होत आहे. दर वर्षी अंक काढण्यासाठी अनेकांचा हातभार लागतो; अनेक लोकांनी हातभार लावल्याशिवाय अंक (चांगला) निघू शकत नाही; आणि एवढी वर्षं अंक काढण्यासाठी अनेकांनी मिळून काम करणं आवश्यक आहेच. ह्या सर्वांचे औपचारिक आभार.
क्लोद, जेमिनाय, चॅट जीपीटी आणि सर्व नोबेलपुरस्कारप्राप्त जॉन हॉपफील्ड आणि जेफ्री हिंटन, तसंच सिलिकॉन व्हॅलीतल्या आणि बाहेरच्या सर्व तंत्रज्ञान कंपन्यांचेही मनापासून आभार.
दिवाळी अंक जेवढा संपादन, संकलनात मदत करणाऱ्यांचा असतो, तेवढाच लेखन-वाचन-विचार करणाऱ्यांचाही असतो. वाचून प्रतिसाद देणाऱ्यांचाही असतो – ठरावीक आयडींचं नाव घेऊन त्यांना बदनाम करत नाही. (याची बूज राखून भरघोस प्रतिसादही द्या.)
अंक वाचा; आपल्या आप्तेष्टांना पाठवा; लाईक करा आणि सबस्क्राईबही कराच्च. एक्सवर जाहिरात करा, किंवा मास्टोडॉनवर, इनस्टाग्रामवर करा, टिकटॉकवर जाहिरात करा; वयस्कर असाल तर फेसबुकवर जाहिरात करा; नोकरदार आणि व्यावसायिक असाल तर लिंक्डिनवर जाहिरात करा. व्हॉट्सॅपवर लोकांना लिंका पाठवून पाठवून हैराण करा! पण जाहिरात जरूर करा.
दिवाळीच्या शुभेच्छा.
राजेंद्र बापट
आदूबाळ
नंदन होडावडेकर
रोचना
शैलेन
धनंजय
म्रिन
उज्ज्वला
राजेश घासकडवी
अमुक
चिंतातुर जंतू
संदीप देशपांडे
अवधूत बापट
सई केसकर
३_१४ विक्षिप्त अदिती
आणि नेहमीप्रमाणे सर्व कायनात.
प्रतिक्रिया
किधर हाय अंक?
किधर हाय अंक? हांय?
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
अंक
अंक असा थेंबाथेंबाने का येत रहातो? एकदम ग्लासभर येऊ द्या! फेस भराभर उसळु द्या!
बघताय काय, सामील व्हा!
तुम्ही येणार का थेंबा-थेंबानं करावी लागणारी कामं करायला? मग खूप भरभर पेला भरेल!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पुढील वर्षी
पुढील वर्षी, " मेरे लायक कुछ काम असेंगा तो जरुर आयेंगा. "
मुखपृष्ठ आवडले.
(दिवाळी)अंकाचे मुखपृष्ठ देखणे झाले आहे. बाकी अंक वाचून प्रतिसाद देईनच. (तूर्तास) आगाऊ धन्यवाद!
सुरुवात आणि शेवट
साधारणपणे फार कुणाला काही न सांगता अचानक अंकाचं प्रकाशन सुरू होतं. पण आता माझं मतपरिवर्तन झालं आहे. भावेप्र रविवारी सकाळी अंकातले शेवटचे धागे प्रकाशित होतील.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
इत्यलम्
यापुढच्या वाटचालीसाठी संस्थळाला शुभेच्छा देऊन जुन्या स्नेहीमंडळींची रजा घेतो.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)