मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १००

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

field_vote: 
0
No votes yet

काय मंग, काय ठरलं? गायकवाड की काकडे? शिरोळे की बापट? हांय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अजून काही नाही ठरले ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक लहान मुलांचं गाणं आहे त्यात प्रत्येक गोष्ट शंभर असते उदा. "नदीला पायऱ्या शंभर" आणि असं बरंच काही. खूप सुंदर चाल आहे गाण्याची. कुणाला माहित आहे का हे गाणं ? बऱ्यापैकी जुनं असावं, बहुतेक पारंपरिक असावं. युट्युब वर शोधायचं तरी काय शोधायचं कळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वर्गात आकाशगंगा, हे.. गंगेला सोनेरी घाट
घाटाला पायऱ्या शंभर, झाला आनंद, आली बहार|

हे का??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

युट्युबवर "स्वर्गात आकाशगंगा" शोधल्यावर सापडलं. खूप धन्यवाद पुम्बा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्या कलमाडी कुठेत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुरुंगात की बाहेर ते माहीत नाही. पण थकलेत. आजारपणं असावीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कलमाडी आहेत अजून??????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ती 'तसली' आजारपणं का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

माहीत नाही. तसली म्हणजे काय हेही कळले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गणेश फेस्टिवल करायचे. इतरांनी ती कल्पना उचलली ( पेलवायला हवी ना?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

युपी, बिहार वगैरे ठिकाणी सरकार तरुणांना नोकऱ्या देण्यात असमर्थ झाले हा मुद्दा मांडतात विरोधक. तर त्यांचे/ कुणाचे सरकार आल्यावर कशा काय नोकऱ्या निर्माण होणार आहेत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुद्दा बरोबरच आहे आचरटबाबा ,पण
१. हा प्रश्न २०१४ ला दोन कोटी रोजगार निर्माण करण्याची घोषणा करणाऱ्यांच्या वेळी आला होता का मनात ?
२. आणि हे आत्ता सांगणारे देऊ शकणार नाहीत म्हणून ज्याने दिल्या नाहीतच त्यांनाच पुन्हा चालू ठेवा हे सांगणे कितपत संयुक्तिक ?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सॅटेलाइट पाडण्याचे नक्की श्रेय कुणाला यावर वाद चालू झाला. सव्वीसेक चानेल्सवर पंप्र "उपलब्धियां समजावून सांगत होते दुपारी. पृथ्विराज चव्हाण म्हणाले मी सहा वर्षे या कमिटीत होतो. सर्व तंत्रज्ञान त्यावेळी होते पण उपग्रह आता पाडला. मंगळयान,चांद्रयान आम्हीच केले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राज ठाकरे काय म्हणाले ते बघा हो मुनिवर !!! ( ते श्रेय घेत नाहीयेत )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

३०० किमीवर उपग्रह पाठवणाऱ्या हुशार लोकांचं अभिनंदन कोणाचा काका करणारे?

सॅटलाईट

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यांनी नोकऱ्या देण्याचा मेळावा एक दोनदा आयोजित केला होता. आता मराठी तरुणांना नक्की कोणत्या नोकऱ्या हव्यात ते सांगायला नको.
परभणी,औरंगाबादच्या तरुणांनी मुंबई आणि उपनगरांत बांधकाम क्षेत्रांत जम बसवलाय. प्लम्बिंग, टाइलिंग वगैरे. आठशे ते हजार रु रोजाने कामं आहेत. कोणताही कोर्स नाही फक्त कुणाच्या हाताखाली सहा महिने राहून शिकतात. सुतारकामात युपी बिहार पुढे आहे.
पण ८०टक्केंना ओफिस जॅाब हवाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घरी एक सेवक असतो. सगळी कामे संथगतीने करतो. पण पैसे फार ढापतो. सारखं लक्ष ठेवावं लागतं. दांड्याही भरपूर मारतो. त्याला कंटाळून तुम्ही सेवक बदलता. नवीन सेवक बोलण्यांत चटपटीत, प्रामाणिक वाटतो. कधी दांड्या मारत नाही. नंतर त्याचेही 'गुण' लक्षांत येऊ लागतात. बढाया मारणे, खोटे बोलणे असह्य होऊ लागते. आगाऊपणा रोजच सलायला लागतो. अजून तुमच्या पाकीटाला हात लावलेला नसतो. पण तरीही तुम्ही वैतागून जाता. जुना सेवक परत यायला टपलेलाच असतो. अशा वेळी तुम्ही काय करता ?
उत्तरं वाचायला आवडतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

कामवाली बाई सेवक म्हणून असावी.सिन्सेर असेल अशी अपेक्षा.
किंवा घरची सगळी कामं आपणच करायची. डायरेक्ट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जुना सेवक परत आणा, कारण ज्या पद्धतीने तुम्ही समस्येची शब्दरचना केली आहे त्यानुसार तुमचं जुन्याला बोलवण्याचं ऑलरेडी मनात ठरलं आहे हे कळतंय.

Wink

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवीन सेवकाने तुमच्या पाकिटाला हात लावलेला नसतो हे वाक्य ' त्याने तुमच्या पाकिटाला लावलेला हात तुम्हाला कळलेला नसतो 'असे हवे का ?

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

बढाईखोर, अहंमन्य, अहंकारी - पण आपल्यला काही तोशिस तर देत नाही.
याउलट
जुना सेवक - पाकीट चोरतो, पैसे ढापतो, दांड्या मारतो = आपल्याला तोशिस आहे.
.
नवीन सेवक राहू द्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण जुन्या आणि नव्या नोकरांपासून मालकाला वाटणारे त्रास अधोरेखित करू. नीट वाचा:

घरी एक सेवक असतो. सगळी कामे संथगतीने करतो. पण पैसे फार ढापतो. सारखं लक्ष ठेवावं लागतं. दांड्याही भरपूर मारतो. त्याला कंटाळून तुम्ही सेवक बदलता. नवीन सेवक बोलण्यांत चटपटीत, प्रामाणिक वाटतो. कधी दांड्या मारत नाही. नंतर त्याचेही 'गुण' लक्षांत येऊ लागतात. बढाया मारणे, खोटे बोलणे असह्य होऊ लागते. आगाऊपणा रोजच सलायला लागतो. अजून तुमच्या पाकीटाला हात लावलेला नसतो. पण तरीही तुम्ही वैतागून जाता. जुना सेवक परत यायला टपलेलाच असतो. अशा वेळी तुम्ही काय करता ?

जुन्या नोकराच्या सवयीला फक्त कंटाळले होते.

नव्या नोकरामुळे मात्र असह्य होणे, रोज सलणे आणि वैतागून जाणे असे तीन प्रकार अल्पकाळात होऊ लागले आहेत.

जुना संथ का होईना पण काम करत असे.

नव्या नोकराच्या काम करण्याचा तुलनेपुरताही उल्लेखही नसल्याने तो शून्य काम करतोय हे मालकाला खात्रीने पटलेलं दिसतं, प्लस असह्य, सल, वैताग

जुना विन्स हियर.. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नव्या नोकरामुळे मात्र असह्य होणे, रोज सलणे आणि वैतागून जाणे असे तीन प्रकार अल्पकाळात होऊ लागले आहेत.

हाहाहा.
गवि बेट लावायची जुना जिंकला तर तुम्ही लेख लिहायचा आणि नवा जिंकला तर मी महीनाभर लेख नाही टाकायचा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जुना सेवक परत यायला टपलेलाच असतो. अशा वेळी तुम्ही काय करता ?

नॉट फेअर. जुना सेवक त्याच्या बिनकामाच्या पोट्ट्यांना कामाला लावू पाहतो आहे ही बाब तुम्ही जनतेपासून लपवू पाहताय. मी तक्रार करेन तुमची मॅनेजमेंटकडे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अशा वेळी तुम्ही काय करता ?

काय केले मग? नवा की जुना?
.
तिमांनी इतर सर्वांना कामास लावले Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२०१४ - मै चायवाला, २०१९ - मै चौकिदार, २०२४ - मै ????
लगेच डोक्यात येण्यासारखा तीन अक्षरी शब्द सांगू नका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२०१४- विकास
२०१९ - सुरक्षा
२०२४ - हिंदूत्व आणि संस्कृती?

हळू हळू संघाची मूळ उद्दिष्टं ह्या अजेंड्यातून दिसायला लागतील.
असो. लोकं मला फिअर माँगरिंग वगैरे म्हणतील.
पण भाजपा हा मुखवटा आहे आणि संघ हा चेहेरा आहे ह्यात काय नवीन? किती दिवस मुखवटा लावून जगणार?
अर्थात हे सगळं सत्ता राहिली तरच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुद्दा रोचक आहे खरा.

जाताना आणि पुन्हा (युरोपची) फाळणी नाही करून ठेवलीनीत, म्हणजे मिळवली.

यावरून आणखी एक शंका: इंग्रजांनी मुळात हिंदुस्थान जे सोडले, ते पुष्कळ सारे हिंदुस्थानी तेव्हा ब्रिटनमध्ये स्थलांतरित होऊ लागले होते, म्हणून की काय? (आमची मूळची थियरी होती, की इंग्रजांनी हिंदुस्थान सोडले, ते इंग्रजांस त्यांच्या भाषेवरील अत्याचार सहन होईनात, म्हणून; परंतु या पर्यायी शक्यतेचा आता अधिक तपास केला पाहिजे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नबाऽऽऽऽऽ तो तुमचा ब्लॉग आहे?????? आता नक्की वाचणार.
__________
२ बेडूक कथा काय झकास आहे. ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पौंड वजनदार नाही का? तो हलायला वेळ लागणारच.
Bucks नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुरुजी हा मुक्त सुनीतांचा लेख का काढण्यांत आला ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

होना, किती संयतपणे आणि चांगलं लिहिलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्कॅाचचा उल्लेख त्यांना/ नातेवाइकांस कळला असेल. तो नको असेल.
---
त्यांचा शिकवणे हा उदरनिर्वाह नसणार म्हणजे हे अनपेक्षित असावं.
---
इतर शिष्यांना न मिळाल्याने तक्रार केली असेल. जवळच्यांना चा आणि दूरच्यांस स्कॅाच?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जाने दो च्रट्जी. आपल्याला इतका छान लेख वाचायला तर मिळाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उच्च शिक्षितांमधे शिष्टाचाराचा भाग म्हणून “गुड मॉर्निंग”, “गुड इव्हनिंग”, अनौपचारिक “हाय”, प्रसंगानुसार “एक्स्यूज”, “एक्स्क्यूज मी” वगैरे संभाषण सुरु करणारे शब्द वापरणं अंगवळणी पडून गेलेलं आहे. मराठीत बोलताना “सुप्रभात” या आकाशवाणी छाप उद्गाराचा वापर फक्त काही नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या बरोबर बोलताना, विशेषतः व्हाट्सॅपवर होतो. “हौ आर यू” साठी सरळ “कसा / कशी आहेस” ; / “कसे आहात” हेच ऐकू येतं. “काय कसं काय” आता इतिहासजमाच झालं की काय असं वाटतं. “धन्यवाद” बोलताना फारच औपचारिक वाटतं, तेच लिहायला काही वाटत नाही.
शैक्षणिक संस्थांतील कारकून, शिपाई यांच्या बोलण्यातले संभाषण संकेत वेगळे आहेत. फर्ग्युसनमधले शिपाई एकमेकांसमोर आले तर नुसतं “चला” असं म्हणून पुढे होत. मराठी अभ्यास परिषदेच्या २००९ सालच्या वार्षिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शाम मनोहर यांनी एस्. पी. कॉलेजमधील शिपाई कसे कृतज्ञता वा आभार व्यक्त करताना देहबोली वापरतात, शब्द नाही याचा उल्लेख केल्याचे आठवते. आता “थँक यू” सगळेच आणि कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीची दखल घेताना म्हणताना आढळतात. कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या तोंडी विषयप्रवेशासाठी “ऐका ना” असं म्हणण्याची पद्धत आहे. मी ते पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला मी समोरच्याचं ऐकून घेत नाही की काय असं वाटून सटपटले होते.
फुटकळ, पण क्षुल्लक नसलेल्या या संभाषण-वंगणांबाबत इतरांची काय मतं / निरीक्षणं आहेत ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक4
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..हॅलो
..काय मी आदूबाळ यांच्याशी बोलत आहे?
..हो, बोला.
..मी अमुकतमुक इन्श्युरन्स कंपनीतून बोलते आहे, आशा करते की तुम्हाला थोडा वेळ आहे.

There are times when even a Punekar can't muster enough sass...

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

काय मी आदूबाळ यांच्याशी बोलत आहे?

चिं.वि. जोशी हे अनेकदा आपल्या कथांतून, एखादे संभाषण इंग्रजीतून चाललेले आहे, हे सूचित करण्यासाठी, इंग्रजी वाक्याचे शब्दशः मराठी भाषांतर त्याच्या इंग्रजी व्याकरणानुरूप शब्दक्रमासहित लिहीत असत, ते आठवले. वाचायला फार चमत्कारिक वाटत असे ते! (अर्थात, ही चमत्कृती विनोदनिर्मितीकरिता तथा जाणूनबुजून असल्याकारणाने ते ठीकच म्हणा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठीची धाटणी सोडून इंग्रजीच्या वळणाने होणारी वाक्यरचना बोकाळली आहेच. अनेकदा त्यावर हिंदीचीही छाप दिसते. असल्या अधेड भाषेत आलेले मजकूर संदेश म्हणून बरे असतील तर मी सरळ त्याचं शुद्धलेखन, वाक्यरचना सुधारून त्याच गटाला परत पाठवते आणि सांगते फॉरवर्ड करणार असाल तर ती सुधारित आवृत्ती वापरा.
दहा पंधरा वर्षांपूर्वी मी आणखी एक उद्योग करायचे. कॉल सेंटरला फोन केला की आवर्जून मराठी हा पर्याय निवडायचा. फोनचं किंवा क्रेडिट कार्डाचं बिल (उदा. सात – शंभर – पंचवीस) असं ऐकलं की “ग्राहक सेवा कर्मचाऱ्याशी वार्तालाप करण्याचा” पर्याय निवडायचा. मग मराठी भाषक कोणी उपलब्ध होईपर्यंत म्हणजे सहजच दहा पंधरा मिनिटं प्रतीक्षा करायची, त्यांना शंभराच्या पटीतल्या संख्येसाठी भंभर नव्हे, शे म्हणतात, ती दुरुस्ती करा म्हणून सांगायचं, त्यावर प्रतिक्रिया म्हणून अधेड मराठी ऐकायचं. मूळ इंग्रजी, हिंदी वाक्यांचा वास यायचाच. त्यात so that साठी मात्र हटकून “जेणेकरून” वापरलेलं असायचं. मी मग त्या व्यक्तीलाच तुम्ही स्वतः मराठी भाषक असूनही असं कसं कृत्रिम बोलता हो, रेकॉर्ड होतंय ना हे संभाषण ऐकवा जरा वरिष्ठांना वगैरे खूप त्रागा करायचे. पुढे sms / email ने बिलं मिळायला लागली आणि ती चिडचिड व्हायची थांबली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या तोंडी विषयप्रवेशासाठी “ऐका ना” असं म्हणण्याची पद्धत आहे. मी ते पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला मी समोरच्याचं ऐकून घेत नाही की काय असं वाटून सटपटले होते.

हाहाहा Smile ऐकून मजा वाटली. माझीही हीच रिॲक्शन झाली असती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'द स्टोरी ऑफ फ्रेंच' हे पुस्तक उज्ज्वला, तुला फार आवडलं नसल्याचं तू मागे कुठे तरी लिहिलं होतंस. त्याच पुस्तकात गंमत वाचली होती.

'बोनजूर' हा शब्द फ्रेंचमध्ये 'गुड मॉर्निंग'चं भाषांतर म्हणून तयार झालेला नाही. तो फ्रेंच संस्कृतीसह विकसित झाला. मराठीतली वाक्यं आता सरळसरळ भाषांतरं म्हणून तयार होत आहेत. एरवी रोज भेटल्यावर चुकार हाय-हॅलो-गुडमॉर्निंग करण्यात वेळ न घालवणारे लोक हल्ली व्हॉट्सॅपवरून न चुकता गुड मॉर्निंग करतात. 'कसं चाललंय' यावर 'बरं आहे की' असं उत्तर पूर्वी अस्थानी ठरत नसे. हल्ली 'कशी आहेस' याला 'बरी आहे' असं उत्तर दिलं की कोणी तरी धोक्याची घंटा सुरू करतात. 'बरी आहेस म्हणजे आनंदात नाहीयेस का' वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मराठीत बोलताना “सुप्रभात” या आकाशवाणी छाप उद्गाराचा वापर फक्त काही नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या बरोबर बोलताना, विशेषतः व्हाट्सॅपवर होतो.

मुळात, दोन मराठी माणसे भेटल्यावर त्यांनी एकमेकांना (एकमेकांशी मराठीतून बोलताना) 'तुझी सकाळ/दुपार/संध्याकाळ चांगली जावो', असे म्हणण्याची गरज काय आहे? (कावळ्याच्या आशीर्वादाने...)

१. केवळ इंग्रजीभाषक तसे म्हणतात, म्हणून? (नाही म्हणजे, त्यांच्या भाषेत ते ठीकच आहे, नि इंग्रजीतून बोलताना दोन मराठीभाषकांनीसुद्धा तसे म्हणण्याबद्दल काहीच आक्षेप नाही. पण मराठीतसुद्धा ते कशासाठी ओढून आणायचे?) हे म्हणजे, महात्मा गांधी जेव्हा हेल्थफ्रीकमोडमध्ये असत - आणि त्यांची आरोग्यविषयक मते अचाट होती, हे जगजाहीर आहे - तेव्हा ते येणाऱ्याजाणाऱ्यास पहिला प्रश्न "How were your bowel movements this morning?" असा करत, असे वाचलेले आहे. त्यावरून प्रेरणा घेऊन आम्ही जर सर्वांना "काय मग? आज सकाळी शी कशी झाली?" असे वंदन करू लागलो, तर येथे ते किती जणांना रुचेल? (गांधीजींच्या हेतूच्या शुद्धतेबद्दल आम्हांस यत्किंचितही शंका नाही, हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते. परंतु तरीही.)
२. बरे, मराठीत बोलतानासुद्धा तेच वंदन (इंग्रजांच्या चांगल्या वाटलेल्या प्रथेचे अनुकरण म्हणून) करायचेच आहे, तर मग मुळाबरहुकूम इंग्रजीतूनच का करू नये? (आणि मग उर्वरित संभाषण खुशाल मराठीतून चालू ठेवावे!) त्याचे ओढूनताणून मराठीकरण (किंवा, खरे तर, मराठीकरणाच्या नावाखाली संस्कृतीकरण) का करावे? (दोन मराठीभाषक मुसलमानांनी एकमेकांना भेटल्यावर 'अस्सलाम-आलैकुम्'-'व-आलैकुम्-अस्सलाम'ऐवज 'तुझ्या घरात शांती नांदो'-'आणि शांती नांदो तुझ्याही घरात' असे अभिवादन-प्रत्यभिवादन करावे काय? काय म्हणून? सकाळीसकाळी सावरकर चावले काय त्यांना?)
३. तसेही, 'नमस्कार', 'रामराम' आदि मराठी अभिवादने मरण पावली काय? की (मराठीतून) असले हे खुळचट 'सुप्रभात' म्हणावे लागावे?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी लहानपणी जेथे राहात होतो तेथे "चला" आणि "जेवण झालं का" हे खूप ऐकले आहे. बाकी बहुतांश लोक नुसते भुवया वर खाली करून सलामी देत. फार फार तर "काय म्हणता" वगैरे विचारत.
पण एकूणच आपल्याकडे आभार हे देहबोलीतून दाखवायची पद्धत असावी. लोक सहसा चेहऱ्यावर आभार दाखवतात किंवा हात वगैरे दाखवून. मलाही धन्यवाद, कृपा करून वगैरे खूप कृत्रिम वाटते.
तसेच अमेरिकन किंवा एकूणच परदेशी लोक आपण तुमची भाषा बोलायचा प्रयत्न करत आहोत हे दाखवायला "नमस्ते" (ना-मस-ते वगैरे) म्हणतात ते ही. शाळेत शिक्शकांना एकसाथ नमस्ते केल्यानंतर पुढे कोणीही कोणालाही नमस्ते करताना पाहिले नाही.

नवरोम्यांटिक मराठी कथांमधे "तो माझी किती काळजी घेतो/करतो" हे एक बॉयलरप्लेट वाक्य टाकलेले असते. ते ही बहुधा he cares for her वरून तसेच घेतले असावे. नाहीतर इतक्या तरूण लोकांना सतत कोणीतरी काळज्या करायची काय गरज असते माहीत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न बा, पोटतिडिकेने आलेली प्रतिक्रिया मनापासून आवडली. नमस्कार, रामराम हे आहेतच, पण होतं असं की व्हाटसॅप ग्रुपवर (तिथेही मी पुष्कळ उशीराच प्रवेशले) पायंडा पडून गेलेला होता. विशेषतः देशोदेशी विखुरलेल्या मित्रमंडळींच्या वास्तवाची दखल म्हणून सकाळ, संध्याकाळचा उल्लेख (मग दुबईकराचा सिंगापूरकरासाठी गुड डे). सगळे सर्वदा सगळ्यांना अभिष्टचिंतन करत बसत नाहीत, पण नेहमीचे यशस्वी व्यग्र असलेले दिसले की दुसरं कोणीतरी पुढे होतं. शाम मनोहरांनी भाषा कोणते समाजगट कशी वापरतात याचीच निरीक्षणं नोंदवली होती. त्या अनुषंगानेच मी लिहिलं होतं.
“जेवण झालं का” हे विचारणं हाही संभाषण सुरु करण्याचा भाग असतो हे मला माझ्या माजी सासरी समजलं होतं.
मी सध्या जिथे राहते तो रस्ता अजून तरी वाहता नाही (अजून काही वर्षांनी तो दोन पुलांना जुळणार आहे) त्यामुळे रस्त्यावर दुभाजकापलीकडे क्रिकेट चालतं आणि ती खेळणारी मुलं जेव्हा आमच्या सोसायटीत चेंडू येतो तेव्हा “बॉल बॉल बॉल” एवढंच म्हणून चेंडू हक्काने मागून घेतात. अशा वेळी हेही एक वास्तव याची जाणीव होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हल्ली फेसबुकवर लोक गळेपडूपणा करत, " j1 झाल का" विचारतात. त्यावर, "हो झालं. भांडी घासायला गडी शोधत्ये," असं उत्तर देता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

V४ चांगला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१३ मेरा ७ नही हो सकता असं स्पष्ट सांग त्या लोचटांना Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“जेवण झालं का” हे विचारणं हाही संभाषण सुरु करण्याचा भाग असतो

समहौ, हे सदाशिवपेठी "चहा घेऊनच आला असाल"सारखे वाटते, नाही का?

("जेवण झालेच असेल...")

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुशल आहात ना ऐसीकर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय कल्जी नसावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल रिक्षानं जात असता सहप्रवाशांशी जोरजोरात मोदींविषयी चर्चा चालू होती (किंबहुना सामूहिक गालीप्रदानच). मध्येच रिक्षावाल्यानं रिक्षा बाजूला घेतली. बाहेर जाऊन काही तरी खुटखुट केली आणि मग म्हणाला, 'दुसरी रिक्षा पकडा.' मी म्हटलं, मोदींवर टीका केली म्हणून आम्हाला बाहेर काढतोयस की काय! तर म्हणाला, त्या *** माणसामुळेच ही वेळ आली आहे : मला रिक्षा चालवायची आहे, भाडंही भेटलेलं आहे, पण पेट्रोलच संपलंय रिक्षातलं. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कळलं नाही तो मोदींच्या विरोधात होता का? शिवी दिली म्हणजे विरोधातच असेल की.
पण मग गालीप्रदानावर त्याचा आक्षेप का होता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोदुलीमुळेच पेट्रोल संपलं, असं रिक्षावाला म्हणत होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

होय तसच वाटलं मला पण ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी।
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी।।

तुळशीच्या तुऱ्यांना मंजीऱ्या म्हणतत तसे काही नाव अन्य फुलांच्या तुऱ्यांना आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आंब्याचा मोहोर असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आंब्याच्या मोहोरालाही मंजिरी/मंजिऱ्याच म्हणतात.

इन फॅक्ट आंब्याच्या मोहोराला संस्कृतात 'चूतमंजिरी' (की मंजरी?) असा आजकालच्या भाषेत अश्लील वाटणारा शब्द आहे. आंब्यालाही 'चूतवृक्ष' म्हणतात बहुतेक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमृतानुभवातही ज्ञानेश्वरांनीही वापरला आहे (आता आमोद सुनासि...) :

चूतांकुर जाले कोकीळ । आंगचि जाले मलयनिळ ।
रस जाले सकळ । रसनावंत ।।

तैसे भोग्य आणि भोक्ता । दिसे आणि देखता ।
हे सारले अद्वैता । अफुटामाजी ।।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिंचेच्या ओल्या कवळ्या पानाना तुऱ्याना चिगूर म्हणतात.
मोहोराला तौर असेहि म्हणतात.
हरभऱ्याच्या ओल्या झुडुपाला डहाळा म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह! हे माहीतच नव्हते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Blossom/bloom मोहोर/गुच्छ.

फक्त फुलं महत्त्वाची त्यांचे गुच्छ. फळांसाठीची फुले फलधारणेसाठी किटकांसाठी sale लावतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फलधारणेसाठी किटकांसाठी sale लावतात.

ख़ुद फूल ने भी होंठ किये अपने नीम-वा (अर्धवट उघडे)
चोरी तमाम रंग की तितली के सर न जाये

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'गेम ऑफ थ्रोन्स'चं अखेरचं पर्व आजपासून सुरू होणार आहे. पाहायला उत्सुक असणारं इथे कुणी आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बघायचं सोडून दिलं होतं पण हिवाळ्यात घरबसल्या वेळ घालवण्यासाठी सगळे भाग उरकून टाकले. आता नक्की काय होतंय याची उत्सुकता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थातच!! आज सकाळी 6.30 ला आम्ही सगळे मित्रमंडळी आवरून चहा मारून स्क्रीनसमोर.
एकेक एपिसोड पाहण्यात काही मजा नाहीये. तीन चार दिवस सुट्टी टाकून बियरची पिंपे रिचवत एकत्र बघायचं असंच हवं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

अत्यंत ओव्हररेटेड प्रकार. ५ एपिसोड पाहून कंटाळलो. सूट्स पाहणं चालू आहे. ठीके मजेसाठी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

दह्याची कवडी, सायीचा लपका, भाताची मूद, तूपाची धार, मूठभर दाणे, पेरुची फोड, सुकटाचा वाटा, आंब्याचा काप किंवा आंब्याची कापटी, कोथिंबिरची जुडी, बचकभर पोहे, मीठाची चिमूट, चिंचेचा आकडा - तसे आणखी शब्द सुचवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भाकऱ्यांची चवड, भाताची रास/डोंगर, पुरणपोळ्यांचा पाचुंदा, बचकभर दाणे, ऊसाचे करवे, केळ्यांचा घड, कलिंगडाची फाक

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह!! मस्तच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त मस्त. ऊसाचे करवे आणि एक शब्द आहे. मी पार विसरले आहे. आठवला तर लिहीते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

करवे आणि गंडेरी वा गंडेऱ्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

हां गंडेरी वा गंडेऱ्या हाच शब्द शोधत होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.‌‌‌..कावळ्यांचा खून असतो ना म्हणे? आणि, आणखी कोणाचा तरी दयाळूपणा?

त्या तुलनेत मराठी समूहवाचकांत तितकेसे वैचित्र्य नाही, तस्मात् तितकीशी मजा नाही.

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माशांची शाळा, सिंहाचा गर्व.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्व की अभिमान?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरोबर अभिमान.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घुबडांची संसद, मोरांचा दिखावा आणि खेकड्यांची(!) संघटना अन्य:
https://www.mnn.com/earth-matters/animals/blogs/99-strange-collective-an...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवीन गाव, नवा आइडी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सा.मो.पचार Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बंद पडलेल्या विमान कंपनीची विमानं ठेवतात कुठे? पार्किंग भाडं वाढत जाणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हाला पार्किंगची काळजी, मला शेअर्सच्या पडत्या भावाची

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

आमचे सर कोकलून सांगायचे, विमान कंपन्यांचे शेअर्स कधीही घ्यायचे नाहीत! ते शतश: पटतंय आता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

काही टिप्स द्या असतील तर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

WOW नावाची अतोनात स्वस्त विमान कंपनी बंद पडली. म्हणजे अशी बंद पडली की काही दिवसांपूर्वी त्यांनी अचानक जाहीर केले की आम्ही आउट ऑफ बिझनेस जात आहोत. सगळी विमाने रद्द केली. लोकांचे पैसे बुडले, लोक इकडे तिकडे गेलेले, त्यांना अन्य कोणत्या तरी विमानकंपनीची विमाने बुक करावी लागली.
परवा एअरपोर्टवरुन जाताना मी पाहीले Wow कंपनीचे विमान सर्व विमानांहून दूर कुठेतरी उभे करुन ठेवले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतातील कंपन्यांचे स्टॉक्स, अमेरीकेत बसून विकत घेता येतात का?
असल्यास कोणत्या साईटवरती ट्रेडिंग होते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतात तुमचे डिमॅट + ट्रेडिंग अकाउंट असायला हवे. त्या ट्रेडिंग अकाऊंटवरून ट्रॅड करू शकता. त्याच्या कायद्यांविषयी मात्र माहिती नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

धन्यवाद थत्ते. काल ऑन माय ओन, अमेरीकन कंपनीचा पहीला स्टॉक विकत घेतला व विकला. युहु!!! पण वाटेला जावसं वाटत नाही.
कारण फार ऑब्सेशन होइल असे वाटते. तसेच फार लक्ष ठेवावे लागते. दर ५ मिनिटाला किंमत बदलते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हाला इमर्जिंग मार्केट इक्विटी एक्स्पोजर बर्‍यापैकी सॉफिस्टीकेटेड पद्धतीने घेता येईल. मी युएस मार्केट ट्रॅक करत नाही पण बर्‍याच म्युच्युअल फंडांचे इमर्जिंग मार्केटचे इटीएफ आणि फंड असतीलच. तुम्ही चौकशी करा/शोधा. तो बेस्ट अप्रोच राहील. त्यामुळे तुम्हाला करंसी रिस्क हेज करायचं टेन्शन नाही राहणार. ती सगळी जबाबदारी फंड मॅनेजरची....

पण बायदवे, तुमची युएस इकॉनॉमी चांगली चालली आहे की. बर्‍याच तज्ञांना युएस जीडीपी आकड्यांनी तोंडघशी पाडलं. अटकळ अशी होती की इतकी वर्ष रेकॉर्ड ब्रेक घोडदौडीला आता खीळ बसेल आणि इकॉनॉमि रिसेशन मध्ये जाईल. पण टॅक्स बेनेफीटचा काही अंशी फायदा झालेला दिसतोय. फेड रेट पण आता स्टेबल आहेत. आता अटकळ अशी आहे की अजून काही तिमाही वा एखाद-दोन वर्ष घोडदौड कायम राहील. प्रो. अस्वथ दामोदरांनी वर्षाच्या सुरुवातीला (http://pages.stern.nyu.edu/~adamodar/) इक्विटी रिस्क प्रिमियमयम वरून अशी अटकळ केली होती की यूएस स्टॉक मार्केट अजूनही बुल मार्केटला सपोर्ट करत आहे. नंबर्स तसं सजेस्ट करत असूनही मला वाटलं, प्रो. या वेळी चुकले असतील, कारण ते मत इतर तज्ञांशी मिळतं जुळतं नव्हतं. शिवाय डिसेंबर मध्ये यूएस मार्केट मध्ये जी घसरण झाली त्यावरून वाटलं की बुलरनच्या घोडदौडीची वाफ संपली. पण जानेवारी पासून बैल सुसाट पळाला आहे. ४ महिन्यांनी प्रोफेसरांची अटकळ बरोबर होती असे म्हणावे लागत आहे.

"ऑन माय ओन" साठी ऑल दी बेस्ट आणि शुभेच्छा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा! माहीतीपूर्ण प्रतिसाद आहे हा. फंड मॅनेजर (कंपनी) थ्रुच काही स्टॉक्स घेतले व लगेच घाबरुन विकले. पण फार एक्सायटिंग वाटले.
इमर्जिंग कंपनींचे इटीएफ व म्युच्युअल फंड असतील हे माहीत नव्हते तसेच या सर्वांची जवबाबदारी फंड मॅनेजरची असते हे माहीत नव्हते.
खरं तर काहीच माहीती नाहीये. पण हे फिल्ड ग्लॅमरस वाटते व त्याकडे ओढा आहे. माहीतीबद्दल खूपच आभार.
_________________
त्या कंपनीचे १० स्टॉक्स काहीतरी ५०.११ ला घेतलेले होते ज्याची किंमत आत्ता ५२.८३ झालेली आहे. लहान स्टेप्स ने सुरुवात करेन. कॉन्फिडन्स येउ देत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा एक वर्गमित्र करतो फंड मॅनेजिंग/सल्ला वगैरे करतो व्यवसाय तिकडे. काहींना हे ज्ञान उपजतच असतं.
(( बाकी शनी, बुध सपोर्टिंग नसतील तर या फंदात पडूच नये.))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी शब्दशः लाखांचे बारा हजार केले आहेत आज पर्यंत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

बाप रे!!! मी या फंदातच पडणार नाही. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मीन वगैरे फार ढोबळ झाले. ज्योतिषातील दुसऱ्या घरावरुन 'धन' पहातात. गुरु ग्रहावरुन 'विन्डफॉल लक' म्हणजे लॉटरी आदि अकस्मात नशीबाने मिळणारे धन पहातात. 'शनि' म्हणजे मंद , वेळखाउ काम. शनी म्हणजे, २ मिनटस मॅगी नाही शनि म्हणजे दम बिर्याणी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरे आहे पैका मिळवण्यासाठी शॉर्टकट नाहीच.
________
गोंदवलेकर महाराज पैशाला , पैका म्हणत. 'क' हा प्रत्यय हीनता दाखविण्यासाठी वापरतात. माणसाला इतर सर्व गोष्टींचे (विषयांचे) अजीर्ण होते पण पैशाचे होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठी भाषेत कितीतरी वैविध्य आहे. ऐसीवर फक्त पुणे-मुंबईचे मराठी जास्त दिसून येते. जास्त काय १००%.
इतर विदर्भ, गोवा आदि भागात वापरली जाणारी मराठी इथे त्या त्या सदस्यांनी वापरावी जेणेकरुन भाषा अधिकाधिक समृद्ध होइल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुंबई, खरे तर पुण्याची मराठी बोली ही "प्रमाणभाषा" (in slang - शुद्ध भाषा) म्हणून मान्यता पावली आहे. म्हणून तेच मराठी इथे दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शंभराव्या धाग्यातला शंभरावा प्रतिसाद-

अनु राव किधर हय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अनु राव किधर हय?

फिर एक बार मोदी सरकार आलं आणि त्यांनी चिदूस्वामींना सुपुत्रासह तुरुंगात धाडलं की अनु राव पुनरावतार घेतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||