मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९५

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

field_vote: 
0
No votes yet

सध्याच्या महाराष्ट्र बोर्डाची बालभारतीने छापलेली 10वीची मराठीची व इंग्रजीची पुस्तके पाहीली. मराठीच्या पुस्तकात चक्क दीड-दोन पानांचे धडे, क्वचीतच काही धडे ३-४ पानांचे. दोन कुठल्याही रँडम परिच्छेदांच्या मधला असंबद्ध भाग धडे म्हणून चिटकवल्यासारखं वाटलं, अश्याने आशयाची मोठी हानी होते, फारसं हाताशी न लागताच धडा संपतो. धडे म्हणून असणारा कंटेंटदेखिल बराचसा स्मरणरंजनात्मक(तोदेखिल आमच्या काळात असायचे तसले स्मरणरंजन नव्हे, पुर्वीचं स्मरणरंजनच वेगळं असायचं..) आणि वांग्मयीनदृष्ट्या फारसा ग्रेट नव्हे. कविता तर तद्दन फालतू म्हणता येतील अश्या, निदान १०वीत तरी ह्याच्याहून अधिक प्रगल्भ कविता हव्या होत्या. एक सुंदर भाग असा की व्युत्पत्ती कोश तसेच इतर संदर्भसाहित्य कसे वापरावयाचे याविषयीच्या सुचना. (अर्थात त्या देताना बाळबोधपणा आहेच, जो १०वीत छपरी वाटतो). तर, प्रश्न असा की असे छोटे धडे १०विच्या वर्गाला असणे योग्य आहे का?
त्यामानाने इंग्रजी धडे मात्र बरेचसे मोठे आणि कविता मोठमोठ्या कविंच्या आढळल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

बोर्डाच्या शाळा आणि पुस्तके हा विषय पुढच्या प्रश्न धाग्यासाठी राखावा, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे.
--
१४वे, यमकासाठी अफलातून श्रेणी देत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्स धन्स बाबा. प्रतिसाद योग्य ठिकाणी डकवा मात्र!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

अवाढव्य गजराज यांच्या अनुप्रासावरील प्रेमामुळे म वा धोंड यांचं मत आठवलं.

धोंड मास्तर म्हणतात की पूर्वानुप्रास (alliteration) मराठीत यायचं कारण म्हणजे शेक्सपियर आदि इंग्रजी नाटककारांचा प्रभाव. तरीही मराठीतला पूर्वानुप्रास कृत्रिम वाटतो. इंग्रजी भाषेत पहिल्या सिलेबलवर जोर असतो, त्यामुळे पूर्वानुप्रास शोभून दिसतो, रंजक वाटतो. मराठीत शेवटचं सिलेबल्ही ठसठशीतपणे उच्चारलं जातं. (उदा० इंग्रजी बोलीत Whatचा उच्चार "व्हॉऽऽ" असा ऐकू येतो. मराठीत आपण ठामपणे 'ट' उच्चारतो.) त्यामुळे मराठीत अंत्यानुप्रास शोभून दिसतो. (उदा० "घाशीराम सावळदास! कनौजी वाटता खास!")

संदर्भ: 'चंद्र चवथिचा'

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

त्यामुळे मराठीत अंत्यानुप्रास शोभून दिसतो. (उदा० "घाशीराम सावळदास! कनौजी वाटता खास!")

याला मराठीत सामान्यतः 'यमक' असे संबोधत नाहीत काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोरावाळिंबेंच्या व्याकरणात 'एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो' म्हटलेलं आहे. अक्षर पहिले यावं की शेवटी ह्याबद्दल काहीच म्हटलेलं नाही. शिवाय यमकाच्या व्याख्येत 'कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो' असं म्हटलेलं आहे. ह्या व्याख्या बऱ्याच vague वाटतात, कारण यमक हे ९५% (९९% च म्हणायचं होतं, पण आपला तितका व्यासंग नाही) शेवटीच होतं.
--
माझं माझ्या वाचनावरुन आकलन हे, की, यमकात बहुतेकवेळी काव्याच्या शेवटीच सारखेच अक्षर सारख्याच स्वराबरोबर लागते.
शुक्रतारा मंद वारा. शुक्रतारे मंद वारा म्हणजे यमक नाही, पण वरील व्याख्येप्रमाणे अनुप्रास आहे. अनुप्रासात स्वराचे बंधन नाही.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यमक 'गेयता' आणतं, खुलवतं. किंबहुना गेयतेसाठी यमक अत्यंत महत्त्वाचं आहे. (मेरा कुछ सामान-च्या वेळी गुलज़आर- बर्मनला: "उद्या टाईम्समधल्या लेखाला चाल लावायला सांगशील")
अनुप्रास गद्यातही खुलून दिसतो. त्याचा तसा गेयतेशी फार काही संबंध नाही.
--
निष्कर्ष एव्हढाच, 'सारखेच अक्षर/व्यंजन सारखे सारखे येणे' ह्या व्याख्येतल्या निकषाशिवाय दोन्ही गोष्टींत अलंकारिकदृष्ट्या काहीच साम्य नाही.
--
जाता जाता: दर्जेदार अनुप्रास करायला वाचन लागतं. (अ.गं.नी दर्जेदार शब्दाची नोंद घ्यावी.) यमक हे सामान्य जनतेचं आहे. इथे लोकसंगीतातलं एक अभिजात काव्य उद्धृत करु इच्छितो:
शांताबाई,शांताबाई, शांताबाई,शांताबाई ||धृ||

रूपाची खान, दिसती छान, लाखात छान,नजरेचा बाण,
तिरकमाण, मारीती चकरा तुझा ग नखरा, इकडुन तिकडं मारीती चकरा,
चकरा-नखरा, चकरा-नखरा,चकरा-नखरा ||१||

तेरा ये जलवा, माहीमचा हलवा, जिवाचा कालवा,
मनाला भूलवा,मामाला बाेलवा,
कालवा-हलवा, कालवा-हलवा, कालवा-हलवा ||२||

अटक मटक चवळी चटक,
लटक मटक वा-यानं उडती केस झटक,
लटक-मटक,लटक-मटक,लटक-मटक ||३||

खटापटा हीचा नटापटा, आहाे पटापटा कसा झटापटा,
जीव लटापटा आहाे लटापटा, हीचा नटापटा बघा पटापटा,
कसा-नटापटा, कसा लटापटा,कसा-नटापटा, कसा लटापटा ||४||

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे, चोहीकडे
हा अनुप्रास आहे, यमक नाही.
तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा
हे यमक आहे, अनुप्रास नाही.
यावरून सुश्री शांताबैंचं गाणं अनुप्रासच होतं..
चुक असल्यास सांगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अजून काही निरीक्षणातून आलेले मुद्दे:
१. यमकात ओळींची समान लांबी लागते.
२. 'सारखी' म्हणजे 'समान' अक्षरे चालतात. त-थ-द, ट-ठ-ड, न-म-ण इत्यादी. Equal नव्हे, equivalent.
--
तुम्ही सांगितलेल्या ओळींमध्ये अनुप्रास आणि यमक दोन्ही आहेत. दोन्ही कवितांच्या पुढच्या ओळींत यमकच जास्त आहे, अनुप्रास मध्येच डोकावून जातो. ह्याची नोंद घ्या; की, गेयता ही finally यमकातूनच आलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

" तुझी उंची किती, तु बोलते किती" मोरुची मावशी नाटकातलं किंवा कुठे अगोदरही असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी एकदा 'एकच प्याला'मधली एक क्लिप बघत होतो. चित्तरञ्जन कोल्ह्टकरांनी तळीराम केला होता. त्यात त्यांना कोणीतरी विचारतं 'मग प्रीतीविवाहाला तुम्ही प्रतिकूल असालच'. त्यावर त्यांच्या तोंडी एक वाक्य आहे - 'रंगभूमी आणि प्रेक्षक यांच्या मधे धगधगणाऱ्या दिव्यांची एक तळपती अग्निरेषा असते (किंवा असंच काहीतरी, पुढचं वाक्य महत्वाचं आहे). ती अग्निरेषा ओलांडून प्रीतीविवाह प्रत्यक्षात उतरले की त्यांचे पोरखेळ पाच पैशालाही पाहाण्याच्या लायकीचे नसतात'. हाच का तो शेक्स्पीअरियन अनुप्रास?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही.

मूळ:

तळीराम : रंगभूमीच्या आणखी प्रेक्षकांच्या मध्ये दिव्यांची एक धगधगीत अग्निरेषा असते. नाटयसृष्टीची ही मर्यादा ओलांडून प्रीतिविवाह सत्यसृष्टीत उतरला, म्हणजे त्याचे पोरखेळ निम्मे दरानंसुध्दा पाहण्याच्या लायकीचे नसतात. लोक म्हणतात, नाटक हे संसाराचं चित्र आहे. पण मी म्हणतो की, हल्ली संसार हे नाटकाचं चित्र बनत चाललं आहे!

अंक १, प्रवेश २

त्याच प्रवेशातलं हे पूर्वानुप्रासाचं उदाहरण:

पाठशाळेत पाऊल टाकून पदवीचा वेळ लागण्याबरोबर मुलाला मतं आणि मिशा फुटू लागतात. मताच्या मंडपीवर मूर्खपणाला मनमोकळेपणानं मिरास मिळते आणखी मिशांचा मोर्चा आकडयांच्या वळणावळणानं पोरीबाळींच्या प्रेमाकडे वळतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण3
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अजो आले आणि ऐसीचा बोर्ड हलायला लागला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

यमक आणि अनुप्रासवाले, जरा हे डायवरदादा बघा :

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

यमकवाले डायवरदादा

आपोआप चालीत वाचलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आपोआप चालीत वाचलं.

Automaton?

Energizer Bunny / Duracell Bunny?

(Cf. हात चोळीत गेला. (Or, rather, the reverse phenomenon thereof.))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Indeed, it’s a fallacy to think that people “need resources” in the first place. They need ways of growing food, moving around, lighting their homes, displaying information, and other sources of well-being. They satisfy these needs with ideas: with recipes, formulas, techniques, blueprints, and algorithms for manipulating the physical world to give them what they want. The human mind, with its recursive combinatorial power, can explore an infinite space of ideas, and is not limited by the quantity of any particular kind of stuff in the ground. When one idea no longer works, another can take its place.

_________________ page 127 of Steven Pinker’s book, Enlightenment Now.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऋषिकेश, मेघना भुस्कुटे, मनोबा, अनु राव, राधिका, अतिशहाणा, नगरीनिरंजन, रोचना, विसुनाना, अमुक, Nile, राजेश घासकडवी आणि इतरही अनेक महान आयडी ऐसीवर का येत नाहीत आता. माझी या सर्व लोकांना विनंती आहे परत ऍक्टिव व्हा अशी. भा. रा. भागवतांवर जसा विशेषांक निघालेला तसलं काहीतरी भन्नाट परत व्हायला हवं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्यापुरतं सांगतो. फारसं काही सुचत नाही म्हणुन लिखाण करत नाही, धागा काढत नाही. इथं समाजकारण आणि राजकारणावर ज्या गप्पा/चर्चा चालतात, त्यात मला फारशी गती नाही. आणि हल्ली रसही उरलेला नाही शिवाय हापिसातली कामं वगैरे दरोजच्या बाबींतही जरा जास्त व्यग्र आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुकानदाराचा चेहरा कसा आहे यावर ग्राहकांची संख्या अवलंबून असते. लोक तापट, उग्र, उदासीन, उपहासी, अहंगंडी दुकानदाराकडे जात नाहीत, जाणे टाळतात, माल किती का उत्कृष्ट असेना. माल आणि भाव यांचे शेकडो लिखित नियम असतात पण या चेहऱ्याचा एकही नियम नसतो. लोक तिथे मजबूरीने जात असतात.
आपण जी यादी दिली आहे ती काही क्विक संतापी लोकांची नाही. उदा. घासकडवींवर कितीही कठोर,कडवट नि उपहासात्मक टिका केली तरी त्यांचा उत्तराचा सुर बदलत नसे.
---------------------
आपले सदस्य आपले असेट्स आहेत नि त्यांना जपले पाहिजे अशी धारणा हवी. कितीही सदस्य गेले तरी कंक गेला पण कंक नाही गेला (अशी काहीतरी म्हण आहे) असं वातावरण तर संस्थळावर प्रेम करणाऱ्या, तिथे गर्दी वाढवू शकणाऱ्या सदस्यांची गुणसुत्रे कायमची नष्टच होत राहतील.
------------------------
संस्थळा श्रेणी देण्याचे/ न देण्याचे अधिकार अन्यायकारक आहेत. श्रेणी देणारांची एक लॉबी आहे. ती गुप्त आहे म्हणून एक व्यक्ति वा एक विचारधारा हाकलायची म्हटलं कि ते सहजसाध्य आहे.यानं एकुलतं लेखन करणाऱ्या बिन-लॉबीच्या लोकांना इथे राहण्यात स्वारस्य राहत. तरी काहीही म्हणजे काहीही लिहायचा स्वैराचार (उदा. गरीबांना मारून टाकणं (गब्बर हमका माफि देव)) ज्यांना हवा आहे ते इथे टिकले आहेत.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गब्बरबुवांचे टोटलच विचार स्फोटक असले तरी ते

(उदा. गरीबांना मारून टाकणं (गब्बर हमका माफि देव))

इतक्या लेव्हलचं लिहीतात तेव्हा त्यांना समज दिली जाते. त्यांनी असंच जाळून टाकलं पाहिजे का बुल्डोझर चालवला पाहिजे अशा अर्थाचं काहीतरी लिहीलं होतं तेव्हा घासकडवी किंवा जंतू (नम: नम:) पैकी कोणीतरी समज, आणि अगदी नम्र-मार्मिक शब्दांत दिल्याचं पक्कं लक्षात आहे. संस्थळाने अगदीच काही कमरेचं काढून डोक्याला गुंडाळलेलं नाही.
--
अजो, मार्मिक दिलाय. बाकी ते लॉबी वगैरे एकदम फिट्ट बरंका.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

आपले सदस्य आपले असेट्स आहेत नि त्यांना जपले पाहिजे अशी धारणा हवी. कितीही सदस्य गेले तरी कंक गेला पण कंक नाही गेला (अशी काहीतरी म्हण आहे) असं वातावरण तर संस्थळावर प्रेम करणाऱ्या, तिथे गर्दी वाढवू शकणाऱ्या सदस्यांची गुणसुत्रे कायमची नष्टच होत राहतील.

कामुनकी पण ह्याला अनुमोदन देऊस वाटल.
श्रेण्या देता येईनात, अशीच घ्या "मार्मिक"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

मराठी सिनेमात न्यू वेव्ह आल्ये का?
The Marathi Wave

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

एकाच नवऱ्याच्या दोन बायका, एकमेकींच्या सवती असतात. मग, एकाच बायकोचे दोन नवरे, एकमेकांचे कोण लागतात ? त्याला काही शब्द आहे का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

रकीब हा शब्द पूर्णपणे योग्य नाही. पण त्यातल्यात्यात जवळ जाऊ शकतो का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्याला एकच पांडवांचं उदाहरण ठाऊक आहे. पण त्यात ते भाऊसुद्धा होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एकाच नवऱ्याच्या दोन बायका, एकमेकींच्या सवती असतात. मग, एकाच बायकोचे दोन नवरे, एकमेकांचे कोण लागतात ? त्याला काही शब्द आहे का ?

ससांड किंवा सवळू किंवा सांडील (स+अंडील)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला काहीसा असाच प्रश्न पडलेला होता लहानपणी. उदा. द्रौपदीला अर्जुनापासून आणि भीमापासून मुले झाली. तर अर्जुनाचा मुलगा भीमाला काय म्हणेल? बापाचा भाऊ म्हणून काका म्हणावे तर तो आईचा नवरासुद्धा आहे. म्हणायचं तरी काय नक्की?????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"बाका" प्रसंग आहे.

काबा किंवा बाका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

द्रौपदी स्वतःची नणंद लागते का? पांडव द्रौपदीला 'अगं ए' म्हणायचे की 'वहिनी?' अभिमन्यू इ. द्रौपदीला आई म्हणणार की काकू?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'सवत्या' हा शब्द एकाच मुलींच्या पाठी लागलेल्या दोन मुलांना चिडवण्यासाठी वापरण्यात आल्याचं ऐकिवात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

अमुक व्यक्ती ऐसीवर आहे का, याचा अर्थ नक्की कसा लावायचा असा प्रश्न आहे. काही लोक ऐसीवरच्या लिंका दिल्या तर वाचतात, त्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करतात; कधी काही मदत करतात; हौसेनं इतरांना त्या लिंका पाठवतात; स्वतः काही लिहितात किंवा काही लिहीत नाहीत; ऐसीवर लिहितात किंवा लिहीत नाहीत; तर यांतले नक्की कोण ऐसीवरचे मानायचे?

'ऐसीवरचे' याची व्याख्या तुम्ही स्वतःपुरती काय करता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऐसीचे सदस्यत्व स्वत:हून घेणे आणि ऐसीवर लेख किंवा प्रतिसाद स्वत:हून टाकणे.

डिसक्लेमर: वरील व्याख्येनुसार ऐसीचे सदस्य नसलेल्या व्यक्तींचे लेख त्यांच्या नावे इथे प्रसिद्ध करण्यास माझी काही हरकत* नाही.

*मी कोण हरकत घेणारा वगैरे..... पण ते असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ऐसीचे सदस्यत्व स्वत:हून घेणे आणि ऐसीवर लेख किंवा प्रतिसाद स्वत:हून टाकणे.

आता इथे एक अवांतर सांगतो. ऐसीवर येऊ इच्छिणारे कि्वा पूर्वी येऊन गेलेले अनेक लोक व्यक्तिगत संपर्कात असतात. अशा कित्येक लोकांकडून आलेली एक समान प्रतिक्रिया म्हणजे 'इथले लोक' (तुमच्या भाषेत सदस्यत्व स्वत:हून घेणारे आणि लेख किंवा प्रतिसाद स्वत:हून टाकणारे लोक) स्वतःला सगळ्यातलं फार समजतं अशा आगाऊ अविर्भावात असतात, आणि इतके छिद्रान्वेषी असतात, की इथे फार रमता येत नाही. त्यामुळे आपलं लेखन इथे प्रकाशित करायला अनेकांची हरकत नसते, पण येऊन प्रतिसाद द्यायला ते बुजतात किंवा ते त्यांना नकोसं वाटतं. शिवाय, अनेक लोक वाचनमात्रही असतात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

थले लोक' (तुमच्या भाषेत सदस्यत्व स्वत:हून घेणारे आणि लेख किंवा प्रतिसाद स्वत:हून टाकणारे लोक) स्वतःला सगळ्यातलं फार समजतं अशा आगाऊ अविर्भावात असतात, आणि इतके छिद्रान्वेषी असतात, की इथे फार रमता येत नाही.

मिपावर कॅटेगरी आहे काथ्याकूट म्हणून. त्यापलिकडची पायरी, अक्षरश: कीस पाडणे ही ऐसीचर्चांवरची पहिली पायरी आहे. शिवाय कंपूबाजी वेगळीच. इथे कंपूबाजी काही वाईट किंवा अयोग्य आहे असं म्हणणं नाही. थोडं ते ओळखीच्या लोकांबरोबर होतंच. पण ही साईट नव्या लोकांसाठी अजिबात 'वेलकमिंग' नाही. ह्यातल्या दोन्ही गटांत मी येत जाऊन-येऊन असतो, म्हणून वरील टिप्पणी स्वत:लाही लागू होतेच.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

अक्षरश: कीस पाडणे ही ऐसीचर्चांवरची पहिली पायरी आहे. शिवाय कंपूबाजी वेगळीच. इथे कंपूबाजी काही वाईट किंवा अयोग्य आहे असं म्हणणं नाही. थोडं ते ओळखीच्या लोकांबरोबर होतंच. पण ही साईट नव्या लोकांसाठी अजिबात 'वेलकमिंग' नाही. ह्यातल्या दोन्ही गटांत मी येत जाऊन-येऊन असतो, म्हणून वरील टिप्पणी स्वत:लाही लागू होतेच.

तात्पर्य : जे आपल्या धाग्यांवर येऊन प्रतिसाद देत नाहीत, त्यांच्यासाठी नव्हे तर थत्तेव्याख्येनुसार ऐसी सदस्य असलेल्यांसाठी ही बाब चिंतनीय आहे. (संदर्भासाठी मूळ चर्चा / शेरे इथे आणि इथे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'ऐसीवरचे' या व्याख्येसाठी थत्यांशी सहमत आहे.

ऐसी हा मध्यबिंदू धरून ही व्यापक होत जाणारी वर्तुळं (concentric circles) आहेत असं समजा. मालक-संपादक-व्यवस्थापक-सक्रिय सभासद-वाचनमात्र सभासद-पाहुणे लेखक-वाचनमात्र अ-सभासद-जनरल पब्लिक.

त्यापैकी 'ऐसीवाले' ही क्याटेगरी सक्रिय सभासद या वर्तुळाला थांबवण्यात यावी.

'संस्थळ वेलकमिंग नाही' हे खरं आहे असं आपण मानू. पण कोणत्याही गप्पांंच्या अड्ड्यासाठी 'वेलकमिंग असणे' हा निकष कसा काय होऊ शकेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.


मुक्त गप्पांचा अड्डा वेलकमींग असायलाच हवा ना?
मला वाटते, इथे प्रतिसाद देण्यात भलतीच कंजुशी केली जाते. जो लिहिण्यासाठी इथे येऊ इच्छील त्याला प्रतिसादांची अपेक्षा असणारच. त्या बाबतीत हे संस्थळ अनवेलकमींग वाटते खरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

गप्पा म्हणजे नक्की काय?

दर शुक्रवारी आणि सोमवारी विकेण्डच्या गप्पा मारायचा मला कंटाळा येतो. 'मी विकेण्डला पार्टीछाप काहीही करत नाही आणि तुमच्याकडे कशाबद्दल पार्टी असणारे, या चौकशांसाठी माझ्याकडे बुद्धी आणि वेळ नाही', असं म्हणत नाही एवढंच. गेल्या आठवड्यात कामाच्या दृष्टीनं सांगण्याजोगं काही सापडलं का, किंवा येत्या आठवड्यात काम करण्यासाठी काही नवे बेत आहेत का, अशा गप्पा मारायला मी उत्सुक असते. पण बहुतेकशा लोकांना याबद्दल बोलायचं नसतं. क्वचित कोणी तरी येऊन म्हणतं, 'मी विकेण्डला तो-हा ब्लॉग वाचला. त्यातल्या मुद्द्यांबद्दल आपण चर्चा करायची का?' मग मी हौसेनं तो ब्लॉग उघडते.

प्रत्यक्ष आयुष्यात (पोटापाण्यासाठी) आणि फेसबुकवर बऱ्यापैकी लिहिते असणाऱ्या काही लोकांनी ऐसीवर निष्कारण (अनेकदा मुद्दा समजला नसूनही किंवा त्याबद्दल अभ्यास नसूनही) उगाच कीस पाडला जातो, म्हणून ऐसीवर लिहीत नाही असं स्पष्ट वा प्रच्छन्नपणे सांगितलं आहे. या लोकांची वयं, स्वभाव, अभ्यासाचे विषय बरेच निरनिराळे आहेत. या लोकांनी ऐसीसाठी मुद्दाम लेखन मागितल्यावर दिलेलंही आहे. थोडक्यात या लोकांना 'ऐसीवाले' म्हणत नसू तर निदान ऐसीचे हितचिंतक समजायला हरकत नाही. हे लोक दिवाळी अंकांत भेटतात.

या कीसपाडूपणाचं वर्णन असेच एक ऐसी-हितचिंतक असं काहीसं करतात - आकाशात सुंदरसा धूमकेतू दाखवायला जावं तर लोक नखांतली घाण बघत बसतात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुक्त गप्पांचा अड्डा वेलकमींग असायलाच हवा ना?

माझ्या नात्यात एक मध्यमवयीन मामा आहेत. ते स्वतःला भलतेच कूल / रॅड वगैरे समजतात. कोणाशीही ऐसपैस गप्पा मारू शकतात. समोरच्याची मतं पटली नाहीत तरी काही कॉमन ग्राउंड मिळेपर्यंत चिकाटीने त्याला उकरत राहतात. समारंभात वगैरे आपसूक भेटला तर गप्पा मारायला मस्त माणूस आहे.

पण त्याला कधीही आवर्जून भेटावं असं वाटत नाही.

डू यू सी माय पॉईंट?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

डेल कार्नेजी तालीम मंडळ?

मित्र म्हणून जिंकायला अंगावर चालून येतोय असं वाटणारे (श्रेय: मुकुंद टांकसाळे.)

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदम त्या टोकाला जायची गरज नाही. किंबहुना ते टोक जाम रेअरही आहे. वेलकमिंग असणे म्हणजे हे अभिप्रेत नक्कीच नाही. नवीन लोक आले की ''याना, इथे प्रतिसाद द्याना, इथे नाही तर तिथे तरी लिवा ना'' करायची गरज नाही. त्यांनी दिला की त्या प्रतिसादाचं स्वागत करावं, अति खवचटपणा करण्याऐवजी दुर्लक्ष करावं इतकंच अभिप्रेत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

आम्ही पण (या नव्हे पण) मराठी संस्थळावर केव्हा तरी नवीन होतोच.

एवढे बोलून मी खाली बसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

+१

जरा सरकून घ्या..

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ABCD

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्याला क्रोनिइझम म्हणावे, की लाच म्हणावे, की केनेशियन स्टिम्युलस म्हणावे की कल्याणकारी योजना ?
की ऑल ऑफ द अबव्ह ?
.
.
K

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मा० ना० न'बा यांस

जिथे असाल तिथून लौकर परत या. आपले व्यनि तपासा. कोणी रागावणार नाही.

- बेबीआत्या, बाबाकाका, ताईमावशी, दादामामा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मा० ना० न'बा यांस

यातल्या मा. ना. चा अर्थ, रुढ अर्थाने घ्यायचा की सर्व राजकारण्यांना उद्देशून लिहिले असताना, जे मनांत येते , तो घ्यायचा ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट2
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

prenuptial agreement (उच्चार न आल्याने मराठीत लिहिले नाही) असावी की नसावी?
माझ्या मते वैवाहीक जीवनाची सुरुवात इतकी हिशेबिपणे केली तर त्यातील निखळ आनंद कमी तर होत असावा.
(ज्योतिषात ७ वे घर विवाहाचे असते यतर ८ वे हे 'merging' चे असते मग ते शारीरीक एकरुपतेचे असो वा आर्थिक एकरुपतेचे.) हे असं तुझं-माझं, तुझं-माझं करुन कितपत आनंदी वैवाहिक आयुष्य जगता येत असेल?
एक उगाचच आपली शंका.
आमचा आता एक पाय मसणात (;)) तेव्हा आमचं मत जाउ द्या, पण तरुण पिढीला prenuptial agreement बद्दल काय वाटतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या मते वैवाहीक जीवनाची सुरुवात इतकी हिशेबिपणे केली तर त्यातील निखळ आनंद कमी तर होत असावा.

लग्नाआधीच पत्रिका, कुंडली ग्रहदशा वगैरे पाहून, गुण जुळवून पाहून त्यावर लग्नाचा निर्णय किंवा वैवाहिक सहजीवनाच्या भविष्याबद्दल जजमेंट.. हाही पक्का हिशेबीपणा नाही वाटत?

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय पण तो बराच सकारात्मक आहे. म्हणजे तो "एकत्र रहाण्याबद्दल" आहे. प्रिनप्शिअल अग्रीमेन्ट "तुटेल तुटेल आणि मग काय" असे गृहीत धरण्याबद्दल् आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यातील निखळ आनंद कमी तर होत असावा.

हा भागही या गुण जुळवून पाहणे, ग्रहदशा, राशी यांवरुन व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्याविषयी आगोदरच आडाखे बांधणं याने उत्स्फूर्त सहजीवनाचा निखळ आनंद कमी होत नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होतो. हे खरे आहे. जेव्हा मनातल्या मनात एखाद्या राशीची व्यक्ती अमुकच वागेल अशा पीत दृष्टीने पहीले जाते, तेव्हा आनंद १००% कमी होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लग्नाआधीच पत्रिका, कुंडली ग्रहदशा वगैरे पाहून, गुण जुळवून पाहून त्यावर लग्नाचा निर्णय किंवा वैवाहिक सहजीवनाच्या भविष्याबद्दल जजमेंट.. हाही पक्का हिशेबीपणा नाही वाटत?

.
अवांतर :
.
विवाहसंस्था, पवित्रबंधन वगैरे ज्या संकल्पना ज्या धर्मावर आधारलेल्या आहेत त्या धर्मात "जन्मा पेक्षा कर्म श्रेष्ठ" ही शिकवण दिलेली आहे.
व्यक्तीची पत्रिका पहाणे व त्यावरून व्यक्तीचे मूल्यमापन करणे हे व्यक्तीच्या गुणांपेक्षा व कर्मापेक्षा व्यक्तीचा जन्मदिवस व जन्मवेळ यांना अधिक महत्व देणारे कसेकाय नाही ?
.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विवाहसंस्था, पवित्रबंधन वगैरे ज्या संकल्पना ज्या धर्मावर आधारलेल्या आहेत त्या धर्मात "जन्मा पेक्षा कर्म श्रेष्ठ" ही शिकवण दिलेली आहे.

हे कधी झालं ? एकदम गरमागरम ताजी न्यूज दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे कधी झालं ? एकदम गरमागरम ताजी न्यूज दिसते.

अगदी. नक्की कुठल्या धर्माबद्दल बोलताहेत हा प्रश्न मनात आला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे कधी झालं ? एकदम गरमागरम ताजी न्यूज दिसते.

.
महाभारत हे जन्मापेक्षा कर्माला अधिक महत्व दिले जावे या संकल्पनेबद्दलच आहे की.
कर्मयोग हे काये ?
या भूमिला भारतवर्ष हे नाव त्यामुळेच मिळाले ना ?
.
लोक त्याप्रमाणे वागत नाही असा प्रतिवाद करू शकता. पण तो मुद्दा नाहीच.
मुद्दा हा आहे की - धर्मात ती शिकवण दिलेली आहे का ?
.
थत्तेचाचांना "फुर्रोगाम्यांचे-फुर्रोगामी" ही पदवी द्यायला हरकत नाही.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रीनप्शिअल (बरोबर आहे का?) ॲग्रीमेंट केले नाही तर/तरी एक इम्प्लाइड ॲग्रीमेंट माथी बसतेच. हे इम्प्लाइड ॲग्रीमेंट परंपरेने चालत आलेले असते. त्यात एक पे दस फ्री या स्कीमनुसार एकमेकांचे नातेवाईक कॉम्प्लिमेंटरी मिळतात. Smile

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

साडे माडे तीन - मधल्या "साडे" आणि "माडे" या शब्दांचा ओरिजिन काय आहे?

"साडे" म्हणजे "अर्धे" (साडे तीन टाईप) असं समजलं तरी "माडे" चा अर्थ लागत नाही.

जर साडे म्हणजे ५०% आणि माडे म्हणजे ७५% असेल तर मग शेवटी "३" कशाला?

मोल्सवर्थ डिक्शनरी -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

bump

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. 'साडे'चं मूळ स+अर्ध असणं हे सयुक्तिक वाटतं.
२. दीड आणि अडीच ह्यांची वारंवारिता अधिक असल्याने साडेएक आणि साडेदोन म्हणण्याऐवजी ते रुळले असावेत.
३. तस्मात, तीन आणि नंतरच्या संख्यांनाच साडेसाथी येत असावी.
४. 'माडे' हे ७५% असण्याऐवजी केवळ खेळताना साडेचा यमकानुप्रासी सोबती म्हणून आले असावे, असा एक अंदाज.

अवांतर:
फ्रेंचमध्येही १६ आणि ६९* नंतर अंकमोजणीचं स्वरुपच उलटं-पालटं* होतं. शंभरातील नव्व्याण्णव असण्याचा तिटकारा की काय, म्हणून हा आकडा चक्क चार वीस (अधिक) दहा (अधिक) नऊ (quatre-vingt-dix-neuf) असा लिहिला जातो.

*figures!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंटरेस्टिंग.

३. तस्मात, तीन आणि नंतरच्या संख्यांनाच साडेसाथी येत असावी.

माझा रोख लहान मुलं खेळ खेळताना सुरुवातीला जे "साडे माडे तीन" करतात त्याकडे होता. त्याचं कारण यापेक्षा काहीतरी वेगळं असावं असं वाटतंय .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तसं तर साडेतीन ला सुद्धा औट असा शब्द आहेच. दोन पिढ्यान मागे दिडकी, अडीचकी आणि औटकी चे पाढे शंभर पर्यंत घोकलेली माणसे असायची म्हणे.

शर्यतीच्या सुरुवातीला वार्निंग म्हणून तीन अंक मोजायचे काहीतरी logic असावे. "तीन" असे ओरडायच्या आधी कुठले तरी दोन शब्द हवेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कदाचित एक-दोन-साडे-माडे-तीन हा (शर्यतीच्या) सुरुवातीपूर्वीच कोणाला तरी 'औट' करण्याचा प्रकार असावा काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शर्यत/खेळ सुरू करण्यापूर्वी आउट करणं म्हणजे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन नंतर तीन येणारच अश्या खात्रीने पळायला सुरुवात करणारा faul म्हणून आउट...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिग बॉस कोण जिंकेल असं वाटतं. आस्ताद, मेघा की पुष्कर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://www.economist.com/prospero/2018/07/19/netflix-makes-a-statement-...

सॅक्रेड गेम्सबद्दल बरंच ऐकायला मिळतंय. मी हल्ली नेटफ्लिक्स पाहणं बंद केलंय. निव्वळ मुद्दाम काहीतरी अतिरेकी दाखवायच्या त्यांच्या पॅटर्नचा कंटाळा आलाय. प्रचंड हिंसा, विनाकारण सेक्स सीन्स, काहीतरी वीअर्ड कॅरॅक्टर्स यामुळं एखादी मालिका किंवा चित्रपट पाहिल्यानंतर दोनतीन दिवस अस्वस्थ वाटतं. (बाकी आजकाल नेटफ्लिक्सवर जनरली बी-रेटेड कंटेंट जास्त असतं).

ऐसीवर काही दिसलं नाही म्हणून विचारतोय. इथल्या मंडळींचं काय मत ब्वॉ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी बघायला सुरुवात केली, पण मध्येच फोन आल्यामुळे पहिला भागही पूर्ण बघून झाला नाही. त्यापुढे सलग वेळ नव्हता म्हणून बघितलेलं नाही. जेवढं बघितलं तेवढं बघून मुद्दाम वेळ काढून बघावं इतपत चांगलं वाटलं. सुरुवातीच्याच सीन्समध्ये हिंसा असली तरी ती बटबटीतपणे दाखवलेली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गायतोंडे आडनावाच्या इसमाचा बाप भिक्षुक आणि ते कुटुंब शाकाहारी असं आहे म्हणे त्यात. हे ऐकून माझ्या भावना दुखावल्या. पण मी शेंगा अद्याप खाल्लेल्या नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काय राव, असतील ते माळकरी. मग तर प्युअर व्हेजच असणार ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काय राव, असतील ते माळकरी. मग तर प्युअर व्हेजच असणार ना?

अनुराग कश्यपला महाराष्ट्राविषयी एवढी अक्कल असली, तर मी त्याला (कित्येक सिनेमे) माफ करेन. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चिंजं तुमच्यासारखेच लोक हा अनुशेष भरून काढायला मदत करू शकतील बघा. म्हणजे पिच्चर काढा असं म्हणत नैये मी पण या माठ उत्तर भारतीयांना महाराष्ट्र १०१ शिकवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माठ उत्तर भारतीयांना

पूर्वीच्या सिनेमात किती महाराष्ट्रियन नावे असत. आता बघवं तर हे ऊ प्र च जिकडे तिकडे. ओय सोणीये, मुंडा, कुडी वाले Sad
'अय्या' सिनेमात एक मराठी पात्र होते पण ती केचरापेटी पाहून पाहून डोकं उठलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'अय्या' हा मराठी माणसानं काढलेला संपूर्ण मराठी चित्रपट आहे. दाखवलेला द. भारतीय इसमही पुणेरी.

कचरापेटी हे चित्रपटातलं पात्र मानायला हरकत नाही. कचरा, त्याची दुर्गंधी, तो बघून येणारी शिसारी यांमुळे रानी मुखर्जीच्या पात्राला सुगंध हवाहवासा वाटतो. तिच्या लहानपणापासूनच्या आयुष्याच्या साचलेपणाचं, त्याबद्दल तिला येणाऱ्या शिसारीचं प्रतीक म्हणजे ती कचरापेटी. कचरापेटी दिसायला किळसवाणी म्हणून ती तमिळ मुलाच्या शारीरिक गुणधर्मांकडे आकर्षित होते; सुबोध भावेपासून ती पळून जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

होय अदिती हे तू पूर्वीही लिहिलेले आहेस. मला माहीत आहे की कुंडलकरांचा हा चित्रपट आहे.
पण मला तो कचरापेटीमुळे बघवला नाही एवढेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रख्यात चित्रकार गायतोंडे यांच्याबद्दल लिहिलंय का हे ?
गायतोंडे सारस्वत असतात ना ? मग त्यांना शाकाहारी करण्याचं पाप कुठे फेडणार तुम्ही ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रख्यात चित्रकार गायतोंडे यांच्याबद्दल लिहिलंय का हे ?
गायतोंडे सारस्वत असतात ना ? मग त्यांना शाकाहारी करण्याचं पाप कुठे फेडणार तुम्ही ?

हे चित्रकार गायतोंडे नव्हेत. ते पक्के मांसाहारी होते. नवाजुद्दिन सिद्दिकी 'सेक्रेड गेम्स'नावाच्या मालिकेत गायतोंडे नावाच्या एका माफिया गुंडा(?)च्या भूमिकेत आहे. त्याचं पात्र असं दाखवलं आहे. ते पाप अनुराग कश्यप नावाच्या इसमाचं असावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

( तुम्ही) सिनेमावाले पोएटिक का काय ते लायसन्स म्हणून काहीही करता. .
हेराफेरी नामक पिकचर मध्ये बाबुराव आपटे नावाचा परेश रावळ जे काही बोलताना दाखवलंय तसा कुठलाही आपटे दाखवा आणि हजार रुपये मिळवा .
( त्यापेक्षा सध्या स्वतःच्या खासदार आयूक्शात परेश रावळ बोलतो , तेसुद्धा जास्त तर्कसंगत असतं )
अवांतर : परवा संस्थापक अध्यक्षांकडून, तुम्ही गायतोंडे विषयावर संशोधन करत आहात असं कळालं . गृहीत धरलं की तुमचे संशोधन उच्चभ्रू चित्रकाराबद्दल असणार , पण तुम्ही तर गायतोंडे मिसळ खाताय असं आता लक्षात येतंय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण तुम्ही तर गायतोंडे मिसळ खाताय असं आता लक्षात येतंय

ही मिसळ नाही; हा हुच्चभ्रू नेटफ्लिक्सी कावा आहे. त्यामुळे इथे तुम्हाला बहुजनवादीपणाचा आरोप करता येणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गायतोंडे - खटला - कावा - बदला - फिल्मी - भंजाळलेपण - आधुनिकोत्तर - चित्रं - तुकडे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हेराफेरी नामक पिकचर मध्ये बाबुराव आपटे नावाचा परेश रावळ जे काही बोलताना दाखवलंय तसा कुठलाही आपटे दाखवा आणि हजार रुपये मिळवा .

कोणी तरी आपटे एवढा कूल निघेल या आशेवर मी अजूनही 'हेरा फेरी'च्या नावानं कढ काढते.

"मस्त से नहा धोके संडे को आना. पैसा लेके जाना. जरूर आना, नहीं तो मै आके पैसा देके जाऊंगा." आशावादासह, थोडी विनोदबुद्धी बाळगा.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हेराफेरी नामक पिकचर मध्ये बाबुराव आपटे नावाचा परेश रावळ जे काही बोलताना दाखवलंय तसा कुठलाही आपटे दाखवा आणि हजार रुपये मिळवा .

बाजीराव सिंघम हे मराठमोळं नाव आणि पात्र विसरलात का?

अभ्यंकर की कायतरी नावाचा लँड माफिया..

साधू आगाशे नावाचा पोलीस.

"दामोदर वीर सावरकर" नावाचा अंदमानात काळ्यापाण्याची सजा भोगणारा क्रांतिकारक.

हिंदी सिरीयलमध्ये धुरंधर "भटावडेकर" नावाचं पात्र.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे जोशी पाहा. सायकल चालवायची, किंवा जीभ चालवायची सोडून हे गँग चालवतात. तर आपटे असा "बाबुराव गणपतराव" का असू नये!
जोशी गँग

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दहीभाते नांवाचा, दरोडेखोर दाखवायला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

किंवा सिरीयल किलर! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

२ रुळांमधील अंतर जराही कमी कजास्त झाले तर आगगाडी घसरण्याचा धोका असतो. मग रुळ बसवताना, हे अंतर अगदी बरोब्बर , नेमके, अचूक कसे ठेवतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. काँक्रीट स्लीपरमध्ये रुळाचे अँकर आधीच टाकलेले असतात.
२. पर्मनंट वे इन्स्पेक्टरकडे गेज असतो (गो-नो गो वाला). त्याने नियमितपणे तपासणे अपेक्षित असते.

मला तर दर तीन चार मिनिटांनी पास होणाऱ्या लोकलच्या व्हायब्रेशननी खालची खडी जागची हलली (विशेषत: वळणावर) तर काय अशी कायम भीती वाटते. बट इट सीम्स रूळ + स्लीपर + खडी हे एकत्रितपणे एकमेकांना धरून ठेवतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

२ रुळांमधील अंतर जराही कमी कजास्त झाले तर आगगाडी घसरण्याचा धोका असतो.

हे तितकेही खरे नसावे. बोले तो, थोडासा टॉलरन्स असावा.

(१२ मिमी (=१६७६ मिमी - १६६४ मिमी) (म्हणजे एका सेंटिमीटराहून अधिक परंतु सव्वा सेंटिमीटराहून किंचित कमी) हा काही थोडाथोडका टॉलरन्स नव्हे. वरच्या दुव्यातील "आयबेरियन गेज" (आणि त्याच्या विविध आवृत्त्या) विरुद्ध इंडियन गेजचे उदाहरण पाहावे. पोर्तुगालातली जुनी सेकंडहँड इंजिने नि डबे जर आर्जेंटिनात बिनदिक्कत चालत असतील, तर इंडियातल्या रुळांमधले अंतर (काही मर्यादांमध्ये) जरासे कमीजास्त झाल्याने एवढेही आभाळ कोसळत नसावे. (चूभूद्याघ्या.))

..........

"इंडियन गेज". बोले तो, भारतात ज्याला "ब्रॉडगेज" म्हणतात, ते. हे प्रामुख्याने भारतीय उपखंडात वापरले जाते. आर्जेंटिनातही वापरले जाते. झालेच तर,
सान फ्रान्सिस्कोची उपनगरीय सेवा जी "बार्ट", तीही इंडियन गेजवर बेतलेली आहे म्हणतात.

जुने पोर्तुगीज गेज. स्पेन आणि पोर्तुगालमधील "आयबेरियन गेज" पद्धतीतील जी वेगवेगळ्या मापांची गेजे आहेत, ज्यांच्या गाड्या एकमेकांच्या रुळांवरून बिनधास्त धावतात, त्यांपैकी सर्वात कमी मापाचे गेज. (इंडियन गेज हे आयबेरियन गेज पद्धतीतील सर्वाधिक मापाच्या गेजहून अधिक मापाचे आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेहमी समाजवादी किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणावर चर्चा असतात म्हणून बरेच दिवसांत धागा उघडलाच नव्हता. पण बरेच वेगळे विषय येऊन गेले. आता ते उकरत नाही.
गाडी रुळावर आलीय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

work

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा कोणीतरी त्याच्या /तिच्या नकळत पाठीवर चिकटवले असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@शुचि, सध्या ज्योतिष सोडलं असं वाटलं.
एक प्रतिसाद इथे :http://aisiakshare.com/comment/reply/6669/169012 दिलेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय सध्या मागे पडलय. कंटाळा आला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे दोन तुकडे पाहता साशा कोहेन अमेरिकेवर पुरता सुटला आहे असं वाटतंय का?

उपप्रश्न : असं जर भारतात करायचं झालं तर कोणते विषय घ्याल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ते मॉस्क वाली क्लिप पण पाहा अजून पाहिली नसलीत तर. किंगमन ॲरिझोना मधे टाउन हॉल मीटिंग घेउन धमाल उडवली आहे त्याने.

आमच्या विनोदाच्या स्फुर्तिस्थानांत साशा चा "अली जी" आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एवढुश्या लेखाची टिप का टाकली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इकडे टिप देतील गिह्राइकं म्हणून वेट्रांना मालक कमी पगार देतात. अमच्यासारखे टिप_देण्यात_हात_आखडता_घेणारे घुसले तर वेटर दुसरी शक्कल लढवतात॥( लोणावळा अनुभव.)
पण मी आवाज केला की कामं होतात या विचारांचा नाही, यातून ट्रेण्ड शिकायचा हे ठरवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0