नव्या पिढीतील संस्कारक्षम गीते.... भाग १

नवीन चित्रपटांमधील गाण्यांवर ज्येष्ठ नागरिकांकडून कायम एकांगी टीका होत असते. अश्लीलता, कर्कश्यपणा, तंग आणि छोटे कपडे, ना सूर, ना ताल, असे अनेक आरोप या गाण्यांवर करून जुनी पिढी स्वतःच्याच काळातील गाणी कशी भारी याचा गोबेल्स पद्धतीने प्रचार करत फिरत असते. मुळात ते फक्त पॅकेजिंग वर भुलून कंटेंटकडे दुर्लक्ष करत असतात हि खरी समस्या आहे. आमची पिढी जास्त संस्कारी आणि नम्र असल्याने आम्ही जेष्ठ नागरिकांशी कधीही प्रतिवाद करत नाही. पण हे असे किती दिवस चालणार? त्यांना त्यांच्या या गैरसमजुतीतून बाहेर काढणे हि गरज आहे. आमची नाही त्यांची ! आमच्या या मालिकेमध्ये आम्ही जुन्या पिढीतील लोकांना नवीन पिढीतील संस्कारी गाण्यांचा परिचय करून देणार आहोत.

गाण्याची ओळख करून देताना संदर्भासहित स्पष्टीकरण देणे आणि रसग्रहण करणे या दोन पद्धती वापरल्या आहेत. आम्हाला या अतिशय कंटाळवाण्या वाटल्या तरी ज्येष्ठ नागरिकांना त्याच आवडतात या एकमेव कारणाने त्या वापरल्या आहेत.

गाणे:- गलत बात है।
चित्रपट:- मैं तेरा हिरो
गीतकार:- कौसर मुनीर
गाण्यातून होणारे संस्कार:- स्त्री पुरुष समानाता, स्त्रीमुक्ती, प्रामाणिकपणा, संयम.

चित्रपटांचा, त्यातील गाण्यांचा समाजमनावर, विचारशक्तीवर पगडा असतो (असे म्हणतात). कोणीतरी एका थोर व्यक्तीने सांगितले आहे की ' तुम्ही मला देशातील तरुणांच्या ओठांवरील गाणी सांगा, मी तुम्हाला त्या देशाचे भविष्य सांगतो'. "गलत बात है।" हे गाणे निश्चितच असे आहे जे सांगू शकेल कि या देशातील तरुणांचे विचार किती पुरोगामी आहेत. या देशाचे भवितव्य उज्वल आहे. या गाण्यातून तरुण पिढीवर होणारे संस्कार खरेच उदबोधक आहेत.

ओ मेरी जान तेरा यूँ मुस्कुराना तो गलत बात है ।
अपने आशिक को संकट में लाना तो गलत बात है ।।

गाण्याच्या सुरुवातीलाच नायक स्वतः नायिकेला सांगतोय तुझ हे असं हसणं बरं नाही ( इथे असं म्हणजे 'तसं'...आता तसं म्हणजे कसं? हे पण कळत नसेल तर तुम्ही पुढे न वाचता पोगो/आस्था पहा.). असं हसू नकोस आणि आपल्या प्रियकराला संकटात आणू नकोस.
पिढ्यांपिढ्या शर्मीली लडकी आणि आक्रमक पुरुष असली चित्रं रंगवत आणि कुरवाळत बसणाऱ्या जुन्या गाण्यांमधून कायम डोकावणाऱ्या प्रतिगामी विचारसरणीला हि सणसणीत अशी चपराक आहे. पहिल्याच वाक्याला स्टीरिओटाईप मोडला आहे. स्त्रियांना भावना असू शकतात आणि त्यांना त्या व्यक्त पण करता येतात, यायला हव्यात. हा या गाण्यातून होणारा पहिला संस्कार ! पण मुलगी एक पाऊल पुढे आली म्हणून आपण लगेच या असल्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याऐवजी सुसंस्कृत मुलगा मुलीला सांगतोय कि हे चुकीचे आहे. दुसरा संस्कार !!!!!

छू कर दिल को छू हो जाना आदत है तेरी बुरी ।
हाये छुप के दिखना दिख के छुपना आफत है देखो बड़ी ।।
धीरे धीरे चढ़े जो है इश्क वही।
जल्दी जल्दी में लेना है रिस्क नहीं।।

पहिल्या अंतऱ्यात प्रियकर उतावीळ झालेल्या प्रेयसीला संयमाचा पाठ देत आहे. त्याला भेटायला, त्याला पहायला अत्युत्सुक असलेल्या प्रेयसीला तो सांगतोय "प्रिये, प्रेमाची खरी गंमत नाते हळूहळू उलगडण्यात आहे. आततायीपणा करून आपल्याला रिस्क नाही घ्यायची." आता इथे रिस्क या सदरामध्ये प्रेम आणि आकर्षण हि सीमारेषा न समजणे ते टीनेज प्रेग्नन्सी पर्यंत सर्वकाही येऊ शकते. सगळे विस्तृतपणे विस्कटून लिहू शकत नाही. समजून घ्यावे. महत्वाचे काय तर संयम, तिसरा संस्कार !!!!!

छोटे कपडे पहन के यूँ नचना
तो गलत बात है
ओ छोटे कपडे पहन के यूँ नचना
तो गलत बात है
ओ खोटे नैनों से हमको यूँ तकना
तो गलत बात है

दुसऱ्या अंतऱ्यात प्रियकर प्रेयसीला म्हणतोय कि छोटे कपडे घालून असे नाचणे चुकीचे आहे. इथे त्याचा आक्षेप हा छोटे कपडे घालण्यावर नसून छोटे कपडे घालून 'तसं' नाचण्यावर आहे हे प्लिज नोट(च). आणि परत एकदा तसं म्हणजे कसं हे कळत नसेल तर पोगो/आस्था......
त्याच्या या आक्षेपावर प्रेयसीचे बाणेदार उत्तर समाजाच्या पुरुषी विचारसरणीला आव्हान देणारे आहे. अश्लीलता हि बघणाऱ्याच्या नजरेत असते (असे म्हणतात). तू (पुरुषांनी) अशा भुकेल्या(वासनयुक्त) नजरेने बघणे हे चुकीचे आहे. मुलींना हवे ते कपडे घालण्याचे स्वातंत्र्य, हवे तसे नाचण्याचे स्वातंत्र्य आहे. पुरुषांचे मन (परस्त्री बाबत!) निर्मळ असावे, स्त्रियांनी अस्सेच वागावे तस्सेच वागावे हे प्रवचन चालू करू नये. स्त्रीमुक्ती, चौथा संस्कार!!!!!

थोड़ी थोड़ी सी तेरे संग मैं भी फिसलने लगी
ओ थोड़ी थोड़ी तुझसे लिपट कर
मैं भी सम्भलने लगी
थोड़ा खुद को ओ कुडियो संभालो ज़रा
यूँ खुले आम हमको पटाना है बुरा
तुम करो तो सही हम करे तो
क्यूँ गलत बात है

या गीतातील तिसरा अंतरा म्हणजे संस्कारांचा कळस आहे.
प्रेयसी म्हणतीये तुझ्यासोबत मी सुध्दा बहकते आहे. माझं पाऊल घसरतंय. किती तो प्रामाणिकपणा ! उगाच मुलाने एक एक पाऊल पुढे जायचे प्रयत्न करणे आणि मुलीने मला हे सगळं आवडतच नाही असे दाखवत त्याला अडवत रहाणे असला दांभिकपणा नावाला सुध्दा नाही. उगाच का डीनायल मोड मध्ये जगायचं? वाटतंय आकर्षण तर वाटतंय ना. नो बिग डिल. प्रामाणिकपणा ! पाचवा संस्कार !!!!!

स्त्रीने हा बोल्डपणा प्रामाणिकपणे दाखवला पण आपला नायक तर विचारी आहेच. त्याने आधीच त्याचा फंडा क्लिअर केला आहे की जल्दी जल्दी मे लेना है रिस्क नहीं। प्रेयसी जरी त्याला बिलगली आहे आणि तिला पण हे (रिस्क प्रकरण) कळले आहे. त्याला बिलगून पण ती हळूहळू सावरते आहे. तुम्ही विसरु नये म्हणून तिसरा संस्कार इथे परत एकदा अधोरेखित केला आहे. संयम !!!!

प्रियकर प्रेयसीला ते कळावं आणि तिच्यासोबत सर्वच मुलींना कळावं या उदात्त उद्देशाने सांगतोय कि स्वतःला जरा सावरा. असं सरळसरळ आम्हाला पटवणे चुकीचे आहे ( कशासाठी पटवणे हा संदर्भ समजून घ्या नाही कळलं तर पोगो/आस्था......)

यावर प्रेयसीने दिलेले उत्तर परत एकदा समाजाच्या पुरुषी विचारसरणीला आव्हान देणारे आहे. तू (पुरुषांनी)केले तर बरोबर आणि आम्ही (स्त्रियांनी) केले तर का चुकीचे ? तिने का कायम त्याच्या मुडवर डिपेंड रहावे? त्याने अप्रोच करत बसायची वाट पहात रहावे? तिला म्हणून काही भावना आहेत की नाही? तिने कधी अप्रोच केले तर लगेच चुकीचे ??? या विषयावर इतरत्र अनेकदा खूप काही लिहिले गेले आहे त्यामुळे आम्ही जास्त लिहीत नाही. समजून घ्यावे. आणि हे पण जर समजत नसेल तर मात्र खरेच..... जाऊन पोगो(च) पाहत बसावे.

तर अशा प्रकारे गीतकाराने पुरुषी, प्रतिगामी विचारसरणीला मोडून काढत स्त्रियांची बाजू मांडत स्त्री आणि पुरुष या दोघांनाही संयम आणि संस्कार यांचे महत्व पटवून देण्याचा यशस्वी समतोल साधला आहे.

तळटिपा:-

१. हे लेखन कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी केलेले नाही, जर या लेखनामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तरी आम्ही अजिबात दिलगीर नाही.
२. यातील थोड्याफार ऍडल्ट कंटेंट बद्दल आम्हाला कल्पना आहे. तुम्हाला ते अश्लील वाटत असल्यास तुम्ही स्वतःच्या अश्लीलतेच्या व्याख्या तपासून पाहाव्या. हे लिखाण सात्विक ऍडल्ट मध्ये मोडते.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

जुनी पिढी स्वतःच्याच काळातील गाणी कशी भारी याचा गोबेल्स पद्धतीने प्रचार करत फिरत असते.

प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे. पण वरील वाक्य वाचून करमणुक झाली.
बाकी चालू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

देर से आना , जल्दी जाना , ऐ साहब ये ठीक नही
रोज बनाना एक बहाना, चाहनेवालोंको तडपाना
ऐ साहब ये ठिक नही!

चित्रपट - खलनायक
भूमिका- गाण्यात- जॅकी श्रॉफ, माधुरी
टारगेट ऑडियन्स- पोलिस, सरकारी नोकर, रेशनवाला, डॉक्टर एकंदर कोणीही सरकारी/ प्रायवेट नोकर/ सेवादाता

संस्कार - टाईम मॅनेजमेंट, ऑनेस्टी, डेडीकेशन इत्यादी, इत्यादी!

तर यात काय सांगितलंय मुलांनो? की काम कसे करावे!
'देर से आना, जल्दी जाना,ऐ साहब ये ठिक नही'

अगदी मर्मावर बोट ठेवलंय. हापिसातील इतर क्लर्क मंडळी वेळेवर येतात पण हाफिसर लोक उशीरा येतात. क्लिनिकातील झाडूवाली, रिसेप्शनिस्ट, नर्सेस वेळेवर येतात पण डॉक्टर येत नाहीत.
'साहेब' लोकांनीवेळेवर यावं, वेळेवर जावं म्हणजे एकंदर सिस्टीमच योग्य चालते असा संस्कार यातून होतो.

आता पुढचा मुद्दा काय , तर 'रोज बनाना एक बहाना'

म्हणजे काय तर क्लायंटच काम न करण्यासाठी रोज एक कारण सांगणं
हापिसर लोकांनी हा कागद घेऊन या, तो कागद घेऊन या , हे प्रमाणपत्र आणा , ते प्रमाणपत्र आणा असं सांगणं ठिक नाही.
डॉक्टर लोकांनी आज ईसीजी काढा, उद्या एक्स रे काढा , परवा ब्लड टेस्ट करा मग औषध देते असं म्हणू नये. रोजरोज हेलपाटे घालायला लावण्यापेक्षा एकदाच काय ते सांगावे.

तिसरा मुद्दा काय- चाहनेवालोंको तडपाना - ठिक नही

आता या महान संस्कारी गीताची मेख बघा. ' चाहनेवालोंको' म्हटलंय. पण 'क्या चाहनेवालोंको' ते मुद्दाम स्पष्ट केलेले नाही.
यामुळेच या संस्कारगीताला सर्वसमावेशकतेचा एक वेगळा आयाम मिळतो.

म्हणजे कुणी न्यायाधीशाला- न्याय चाहनेवाला
डॉक्टरला - दवा चाहनेवाला
हापिसरला- सर्टीफिकेट चाहनेवाला
पोलिसाला- हरवलेली / चोरलेली वस्तू चाहनेवाला

हेच एक गाणं वापरू शकतो.
'चाहनेवालोंको तडपाना, ऐ साहब ये ठिक नही'

तर असे हे सर्वसमावेशक, अगदी नवे नाही पण आमच्या पिढीचे संस्कार गीत.

याच चित्रपटात 'चोली के पिछे क्या है' हे महान संस्कारगीत आहे.
पण त्याविषयी पुन्हा कधीतरी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(इथून)

गोली मार भेजे में - एक अध्यात्मिक आकलन

गोली मार भेजे में...
इथे "भेजा" हे अज्ञानाचं, विषयांचं प्रतीक आहे, आणि "गोली" हे सद्गुरूचं प्रतीक आहे.

.. के भेजा शोर करता है
म्हणजे अज्ञानाच्या गलबल्यामुळे परमतत्त्वाचा आवाज मानवाला ऐकू येत नाही. विषयवासनेच्या पुटांमधून झळझळीत असं परमतत्त्व झाकोळलं गेलं आहे.

.. भेजे की सुनेगा तो मरेगा कल्लू... मामा
म्हणजे विषयलोलुपतेच्या मागे लागून कल्लू (म्हणजे माणूस) तात्पुरता मरेल, पण...

.. तू करेगा दूसरा भरेगा कल्लू... मामा
त्याला मोक्ष मिळणार नाही. दूसरा (म्हणजे दुसरं शरीर) गतजन्मातली पापं धूत बसेल. चक्र चालू राहील.

___________

[आगामी आकर्षणः आधुनिकोत्तर आयुष्याच्या पोकळपणाची आधुनिकोत्तरपूर्व चाहूल - पट्टी रॅप (चित्रपटः हम से है मुकाबला)]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

वा वा ह. भ. प.आदूशास्री ,अजून रसग्रहणे येऊ देत !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिरशिंगराव

अहो विनोदी लेखन आहे ते.

आदूबाळ आणि साती यांनी बरोबर ताल पकडला आहे.
चोली के पिछे आणि पट्टी रॅप च्या प्रतीक्षेत Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमचाच ताल चुकला. अजून येऊ द्या, आदुबाळ, सातीताई.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

आधुनिकोत्तर आयुष्याच्या पोकळपणाची आधुनिकोत्तरपूर्व चाहूल - पट्टी रॅप (चित्रपटः हम से है मुकाबला)

आधुनिकोत्तर आयुष्याची व्याख्या माझ्या एका परममित्राने "जिंदगी *ट हो गयी है मामू..." या सहा शब्दांत उडवून टाकली होती. प्रस्तुत *टत्व जिंदगीला गेल्या दहा-पंधरा वर्षांत आलं आहे असं जाणकारांचं मत आहे. पण त्याची चाहूल आधीच लागलेलं नव्वदीच्या दशकातलं हे गाणं.

मुळात इथे फॉर्म निवडलाय तोच "रॅप" या संगीत(?)प्रकाराचा. म्हणजे अर्थाबिर्थाची चिंता न करता उडत्या चालीत साधारण बसेल असं शब्दवमन करून टाकायचं. उडत्या चालीचा फायदा असा, की त्या उलटीत अर्थ शोधण्यापूर्वीच शब्दांचं आणखी थारोळं साचलेलं असतं. अर्थात पाश्चात्य रॅपच्या तुलनेत हे पट्टी रॅप म्हणजे हॉटेलमधल्या कुर्कुरीत वोक नूडल्स ते नेनेकाकूंनी रुचिरा वाचून घमेल्यात बनवलेल्या बुळबुळीत (पण पौष्टिक) चायनीजसदृश नूडल्स इतका फरक आहे.

मूळ काव्यरचना इथे सापडेल. प्रत्येक ओळीचं रसग्रहण न करता काही आधुनिकोत्तर हायलाईट्स पुढीलप्रमाणे:

- आयुष्याचं एकसुरीत्व (आज क्या है कल क्या है दिन तो है वहीं, सुबह क्या है शाम क्या है फर्क नहीं कोई)
- शारीरव्यवहारावरचा फोकस (चलता है चलता है वो भी सुबह तक, सुबह तक, {एक आवाज})
- माईंडलेस कन्झ्युमरिझम (ब्रँड्सची नावं, पाँच दस भीख ले के पैसे नहीं पूरे पडते)
- एकंदरच अर्थहीनता (जूटा पट्टी, तुला भट्टी, वगैरे.)

अर्थहीनतेचा कळस वाटणारं कडवं

देसी दारू सूखी मच्छी तुकडा बीडी खेकडा
झोपडी
कचरापेटी बाजू में चायठेला
रिक्षा
पत्थर की धारवाला मांजा
गिल्ली डंडा गोली गुच्ची फुद्दू गाना गा ले आजा
हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की
कल्लू चाचा मुन्नी मौसी "घोडी बेजानकी"
धरमिंदर जितिंदर अमिताभ वमिताभ
दिन विन रात वात आल शोज डान्स बार
.... पट्टी रॅप ... टर क धूम टॅक .... पट्टी रॅप .... ऊ

(चेष्टेचा सूर सोडून द्या, पण गाणं एक नंबर आहे.)
_______
हा आवाज नेमका काय आहे याबाबत मित्रमंडळींमध्ये टोकाचे मतभेद आहेत. मूळ गाणं ऐकून आपलीही मतं द्यावीत.
वरीलप्रमाणेच मूळ प्रतीत काय आहे याबद्दल अभ्यासकांत मतभेद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

विस्मृतीत गेलेल्या गाण्याची इतक्या विस्तृतपणे आठवण करून दिल्याबद्दल हार्दिक धन्यवाद. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे त्या लिंकमध्ये लैच बोर्‍या वाजवलाय लिरिक्सचा.
हे अ‍ॅक्चुअल पाठ असलेले.
"देसी दारू सूखी मच्छी तुकडा बीडी खेकडा
झोपडी
कचरापेटी बाजू में चायठेला
रिक्षा
पतंग, धारवाला मांजा
गिल्ली डंडा गोली गुच्ची फुद्दू गाना गा ले आजा
हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की
कल्लू चाचा मुन्नी मौसी गोरी गजानन
धरमिंदर जितिंदर अमिताभ वमिताभ
दिन विन रात वात आल शोज हाउसफुल्ल
.... पट्टी रॅप "
मज्जा म्हणाजे तेलुगु प्रेमीकुडूच्या गाण्यात (पेट्टा रॅप)
सुपरलक्ष्मी, नागमणी, एन्टीआरु, चिरंजीवी, बालय्या, ही सिरीज तर
आणि तमिळ कादलन मध्ये
एचार, सिवाजी, रजनी, कमल अशी त्या त्या स्टेटनुसार सुपरस्टाराची मांदीयाळी आहे.
.
आणि
एक आना दो आना
गुल्लक को तोडके
चार आना आठाना
कर्जावर्जा जोडके
हांडा, भांडा गिरवी मे डालके
पाच दस बीस भीक लेंगे पैसे नही पूरे पडते.
तुम हो ग्यानी...
तुम हो ग्यानी
मिर्झापूर के तुमम हो ग्यानी
ह्यातल्या शेवटच्या तीन ओळीत गुरुदिक्षा देतानाची प्रभुदेवाची कोरिओग्राफी लाजवाब. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्या बात! आम्हां तीनचार मॅडसर मित्रांना वगळता हे गाणं कोणाच्या खिजगणतीत असेल असं वाटलं नाही.

...गोरी गजानन Biggrin

--------
याच मित्रांपैकी एकाला ऐकू आलेलं "मेरा लॉन्ग गवाच्चा" आणि त्याचा त्याने लावलेला अर्थ हा एक कहर प्रकार नंतर लिहेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अरे ह्या गाण्यावर शाळेच्या ग्याद्रिंगात नाचलेलोत आम्ही. आजही पूर्ण पाठ आहे. ऑल फ्रीस्टाइल नाचायला हे गाणे भारी आहे. त्यात एकाची साडी नेसुन मुरकायची हौस ही पूर्ण झाली तो भाग वेगळा.
आम्हा मॅडसर मित्रांची अशीच असोसिएशन आहे. आम्ही दिल्वाले, हमाप्के, हम्दिल्देचुके, दिल्चाह्ताहै, जोधाकबर असे कित्येक ब्लॉकबस्टर म्हणा की सुपरहिट म्हणा पिक्चर ठरवून पाहिलेलेच नाहीत. त्याएवजी पार बाजार उठलेले, पडलेले पिक्चर हौसेने पाहतो आणि पाठही असतात. भिकारचोट लक्षणे. दुसरे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा वा महाराजप्रतिमादाते अभ्या बापू ,आपल्याबद्दल आदर दिवसेंदिवस वाढत चालला आहे ,, ( विशेषतः न बघितलेल्या पिक्चर्स मुळे )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळात इथे फॉर्म निवडलाय तोच "रॅप" या संगीत(?)प्रकाराचा. म्हणजे अर्थाबिर्थाची चिंता न करता उडत्या चालीत साधारण बसेल असं शब्दवमन करून टाकायचं. उडत्या चालीचा फायदा असा, की त्या उलटीत अर्थ शोधण्यापूर्वीच शब्दांचं आणखी थारोळं साचलेलं असतं. अर्थात पाश्चात्य रॅपच्या तुलनेत हे पट्टी रॅप म्हणजे हॉटेलमधल्या कुर्कुरीत वोक नूडल्स ते नेनेकाकूंनी रुचिरा वाचून घमेल्यात बनवलेल्या बुळबुळीत (पण पौष्टिक) चायनीजसदृश नूडल्स इतका फरक आहे.

नेमकं लिहिलंय!!

नील लोमसच्या धाग्यात हे उदाहरण बरोब्बर बसेल Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....