बेस्ट ऑफ ऐसी

हा धागा विषय मी मुद्दाम वेगळा काढत आहे.
आत्ता रोचना यांनी काढलेला २०११ चा अनुवादित पुस्तकांविषयीचा धागा चाळला.
असे अनेक वाचनीय धागे अचानक वर येतात. त्यातील बऱ्याच धाग्यांची माहिती देखील नसते. मी तुलनेने नवीन आहे पण मला सहजी बेस्ट ऑफ ऐसी काय आहे हे शोधता येत नाही.(दिवाळी अंक, विशेषांक आणि काही ठराविक धागे ( सध्या काय ~) सोडल्यास वरील धाग्यासारखे अनेक धागे जे आता विस्मरणात गेले आहेत त्यांच्या विषयी मी प्रामुख्याने बोलत आहे.) पूर्वी अतिशय उत्तम प्रतिसाद देणारे आणि चर्चा करणारे सध्या इथे येतात की नाही हेच कळत नाही. आले तरी त्यांच्याकडून पूर्वीइतके अ‍ॅक्टीव प्रतिसाद येत नाहीत.

सहज द्यावे म्हणून एक उदाहरण :
गविंचा गव्हाणी घुबडाचा धागा(हा ऐसी एक्लुजिव आहे का ते ठाऊक नाही.)
काही उत्तम चर्चा : मेघना यांच्या काकस्पर्श सारख्या.

एखादा नवीन प्राणी इकडे भटकत आला, तर तो सुरुवातीला नवीन लेखनावर येतो. सध्या ऐसीवरचे खूपसे धागे वाचवत नाहीत इतपत खराब असतात. प्रामुख्याने हेच धागे अन्यत्र सुद्धा सिंडीकेट केलेले असतात.

असा एकादा विभाग असल्यास हॅंडी पडेल.

इथे इतरांनी असे धागे यथास्मृति यथाशक्ति सुचवावेत. मी ही प्रयत्न करेन.

field_vote: 
0
No votes yet

चांगली सूचना आहे. फक्त हे प्रतिसाद लेव्हललाही करता यावं. अत्यंत टुकार धाग्यांवर उत्तम प्रतिक्रियाही पाहिल्या आहेत.

*********
आलं का आलं आलं?

अतिशय सहमत. अनेक प्रतिसाद लाजवाब आहेत. पण प्रतिसाद शोधणे हे धागे शोधण्यापेक्षा जिकीरीचे असावे. पण त्याची लिंक मिळत असेल तर संपादक काही तरी सोय करतील बहुतेक.

उदा. - आदूबाळची ही प्रतिक्रीया. एखाद्या वाचावासा न वाटलेल्या धाग्यावरपण जाउन मी प्रतिक्रीयांवर नजर टाकून येतो - आणि कधी कधी त्याचं सार्थक होतं Wink

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

सदस्याचे खाते इथे जाऊन मिळालेल्या श्रेण्यांनुसार सॉर्ट करून जसे प्रतिसाद बघता येतात, तशा प्रकारे सगळ्याच सदस्यांसाठी एकत्र बघण्यासाठी काय करावे लागेल? म्हणजे ऐसीवरचे सगळ्यात जास्त श्रेण्या मिळालेले प्रतिसाद उतरत्या क्रमाने, असे काही?

ह्यासाठी एक उपाय सध्या आहे. उजव्या हाताला निवडक (Archive) असा दुवा आहे. ह्यात दर महिन्यातले वाचकांनी चांगले म्हणून निवडलेले धागे दिसतात. ह्यात वापराच्या सोयीसाठी अजून काही गोष्टी करता येतील. मुख्य म्हणजे सगळ्या धाग्यांची एकत्र यादी. त्यात धाग्याचा प्रकार, लेखक, मिळालेले तारे ह्यानुसार वाचकांना फिल्टर लावता येतील असं केल्यास फायदा होईल का?

प्रतिसादांसाठीही असं काही करता येईल. त्यात लेखकांनुसार, धाग्याच्या प्रकारानुसार आणि श्रेणीनुसार फिल्टर लावता येतील.

ह्या गोष्टी करणं सोपं आहे. उपरोल्लेखित काम ह्याच आठवड्यात पूर्ण होईल. ह्यात आणखी काही भर घालायची असल्यास जरूर लिहा. ‌मगदूरानुसार ह्या सोयी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची सोय करता येईल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'तारांकीत' विसरलीस? नील लोमस, त्या 'निवडक (Archives)'च्या वरतीच 'तारांकीत' दुवा आहे, त्यावर पण जाउन बघ. एखाद्या लेखाला 'तारे' द्यायची सोय आहे ईथे. असे तारे दिलेलं, तारांकीत, लेखन तिथे संकलित केलेलं आहे.

अदिती, सध्या तारांकीत फक्त 'पंचतारांकीत' झालेलं आहे! कमी तारे मिळालेलं लेखन पण दाखवता येईल?

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

मला आवडलेले धागे मी वाचनखुणांत टाकत असतो. कैकदा मूळ धाग्याचा कंटेंट बकवास वाटला तरी प्रतिसादांमुळे धागा आवर्जून वाचण्यासारखा ठरतो. ते सुद्धा धागे माझ्या वाचनखुणेत आहेत. बादवे, माझे दोन आय डी आहेत. मन आणि मन१.
दोन्ही आय डीं च्या वाचनखुणा पाहिल्यात तर कदाचित तुम्हाला आवडेल असं काही सापडू शकेल.

इतके कष्ट कशाला करायचे? मी लिहिलेलं सगळंच उत्कृष्ट आहे... तेव्हा माझं लेखन पाहा, आणि मला फुलं वाहा.

अध्यात्मिक बाबांची मार्केटिंग टेक्निक्स या धाग्यावर हा प्रतिसाद कृपया हलवावा . धन्यवाद .

सध्या ऐसीवरचे खूपसे धागे वाचवत नाहीत इतपत खराब असतात.

तुम्हाला उत्तमोत्तम धागे कोणीतरी रेडीमेड द्यावेत ही इच्छा ठीक आहे पण त्याकरता इतर धाग्यांना खुजं करण्याची गरज नाही. वाचनाची कोणी जबरदस्ती केलेली नाही. लेखक पाहून आतापावेतो ध्यानात यायला हवे होते.
__
http://aisiakshare.com/tracker?page=7 (हे आहे पान ८)
आता तुम्हाला जर १९ वे पान हवे असेल तर वरील यु आर एल मध्ये ७ च्या जागी १८ घाला हाकानाका!
____
१ वर्षं झालं ना तुम्हाला तरी अजुनही नवे म्हणवता तुम्ही?
___
बाय द वे तुमची "संपण्याआधी" कविता आवडली होती. तिला भरघोस प्रतिसादही मिळाला होता. मी देखील दिलेला होता. प्लीज असे काहीतरी येऊ द्यात.

माझ्यापुढे दोन गोष्टी आहेत :
१) ब्याग्राउंड : माझ्या ऑफिसमधल्या सहकार्‍याने सहज म्हणून ऐसी वर फेरफटका मारला. त्याला सुरुवातीचे पेज भरगच्च वाटले. इथे तिथे क्लिक करता करता त्याने ट्रॅकर उघडला.
त्याला समोर दिसला तो अंधविश्वास हा महाबंडल धागा.
मला पटकन त्याचा इंट्रेस्ट राहावा असा एखादा चांगला धागा सुचेना. किंबहुना ऐसीचे वैविध्य आणि वेगळेपणा दाखवणारे असे अनेक धागे जे गावभर सिंडीकेट केले गेलेले नाहीत असे दाखवता येईनात. म्हणून मी त्याला पॉर्न विशेषांक वाचायला सांगितला.
२) ब्याग्राउंड : रोचना यांचा धागा वाचताना काही प्रतिसाद पाहून मन मोहवून गेलं. सध्या काहीतरी मिसिंग आहे हे जाणवलं. प्रामुख्याने नगरीनिरंजन, जंतू, धनुष नंदन, मोडक किंवा अशोक पाटील ह्या लोकांचे प्रतिसाद डिट्टेल आणि वाचनीय होते. बाबाच्या धाग्यावर आदुबाळ यांचे प्रतिसाद रसाळ आहेत. कधी कधी खूप माहितीपूर्ण प्रतिसाद वाचायला मिळतात. म्हणून बेस्ट ऑफ प्रतिसाद आणि बेस्ट ऑफ धाग्यांची गरज जाणवली.

सध्यापुरता आदिती यांनी सांगितलेला उपाय वापरत आहे.

ओके.

सध्या काहीतरी मिसिंग आहे हे जाणवलं.

ह्म्म्म हे मत अर्थातच सापेक्ष आहे.
पण तरीही स्पष्टीकरण दिल्याबद्दल धन्यवाद. द्यायची गरज नव्हती हेवेसांन.
___
मी तर कोणतही पान उघडून वाचते. इतकी मजा येते. जुने जुने धागे वाचायला, प्रतिक्रिया वगैरे वाचायला फार आवडतात. पण सर्वात मजा स्वतः आपलयाला आवडणारे धागे शोधून काढून वाचण्यात निराळाच आनंद असतो Smile
__
पण अर्थात तुमचा हा धागा इतरांना उपयोगी आहेच. जमल्यास मी माझ्या वाचनखूणा देइन.-
जेवणं : एक आद्य शत्रू
पुरुष: एक वाट चुकलेला मित्र
दोन प्रेमकविता
जिप्सींचे गाणे

सर्वात मजा स्वतः आपलयाला आवडणारे धागे शोधून काढून वाचण्यात निराळाच आनंद असतो

मला व्यक्तिशः अशी शोधाशोध करायचा कंटाळा येतो. 'हे चांगलं आहे, ते वाच', (किंवा पाहा) असं कोणी सांगितलं तर फार सोय होते. ह्याच हिशोबात सध्या आदूबाळ पुस्तकांची यादी खरडफळ्यावर मागवत आहे. सगळं चांगलं लेखन विकत घेणं सोडाच, वाचणंही शक्य नाहीच, पण अशी रेडीमेड यादी मिळाली तर निदान काय चांगलं काय वाईट हे हुडकण्यात वेळ वाया जात नाही.

---

हा विषय निघालेला आहे तर सर्व श्रेणीदात्यांना पुन्हा एकदा विनंती. आवडलेल्या लेखनाला आवर्जून मतं - तारका देत जा. त्यातून आपसूकच चांगले धागे उचलून निराळे काढायची सोय होते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उजव्या बाजूला तारांकित असा दुवा आहे. त्यात धाग्याच्या प्रकाराचा फिल्टर वापरण्याची सोय आहे आणि ती व्यवस्थित चालत्ये. त्याशिवाय धाग्यांना मिळालेल्या तारकांनुसार फिल्टर लावण्याची सोय आहे; पण मूळ मॉड्यूलमध्येच ती मोडलेली असावी. (नेहेमीप्रमाणे) ते सुधारणं माझ्या पगाराच्या वरचं काम आहे. (लवकरच ड्रुपाल ७ ला स्थित्यंतर करता येईल आणि त्यात ह्या गोष्टी बऱ्या चालतील, अशी आशा मी धरलेली आहे.)

प्रतिसादांच्या रेटींगनुसार शोधण्याचं काम करायला सुरुवात केलेली आहे. झालं की इथे कळवेनच.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>लवकरच ड्रुपाल ७ ला स्थित्यंतर करता येईल आणि त्यात ह्या गोष्टी बऱ्या चालतील, अशी आशा मी धरलेली आहे.

ड्रुपल अपग्रेड झालं की जुन्या चालणार्‍या सुविधा चालेनाशा होतात असा अनुभव आहे. उदा. ड्रुपलच्या प्राचीन व्हर्जनमध्ये नवीन खरड आलेली दिसत असे. [खरडवही (१) अशी]. मागेच केव्हातरी नव्या ड्रूपलमध्ये ही सोय चालेनाशी झाली. ऐसीवर नाही सर्व संस्थळांवर.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

वर मी थोडा टाइमपास प्रतिसाद दिला. पण 'बेस्ट ऑफ ऐसी' हा खरोखरच हाती घेण्यासारखा उपक्रम आहे. म्हणजे ऐसीवर नवीन येणाऱ्या वाचकाला चर्चांमध्ये भाग न घेता शांतपणे बसून इथे कायकाय चांगलं येतं ते वाचून पाहायचं असेल तर काहीतरी संकलन असावं ही कल्पना खरोखरच उत्तम आहे. खरं म्हणजे ती अमलात आणता यावी यासाठीच पहिला फिल्टर म्हणून 'निवडक (आर्काइव्ह)' ची योजना केली आहे. त्यात दर महिन्यात वाचकांनी तारका देऊन 'हे आवडलं' म्हटलेल्या लेखांचा साठा आहे.

त्यात थोडा हिशोब असा - दर महिन्याला सुमारे शंभर धागे येतात. त्यातले तीस-चाळीस धागे तारांकनामुळे निवडकमध्ये निवडले जातात. आणि ती यादी ही खरोखरच त्या महिन्यात दिसणाऱ्या सर्वसाधारण बोर्डाच्या यादीपेक्षा अधिक वाचनीय असते. कुणाला कुतुहल असेल तर आत्ता दिसणारं 'नवीन लेखन' आणि या महिन्याचं 'निवडक (आर्काइव्ह)' मध्ये दिसणारी यादी यांची तुलना करून पाहा.

पण 'बेस्ट ऑफ ऐसी'ची यादी तयार करण्यासाठी याहीपेक्षा अधिक एकदोन चाळण्या लावाव्या लागतील. आणि त्यासाठी साधारण त्या महिन्यातले दहाएक सर्वोत्कृष्ट निवडावे लागतील. दर महिन्यात बरोब्बर दहाच असतील असं नाही, आणि विशेषांकांत दहापेक्षा कितीतरी जास्त असू शकतील. पण सर्वसाधारणे सर्वोत्तम १० टक्के लिखाण निवडलं तर त्यात येणारं एका विशिष्ट दर्जाच्या वरचं लिखाण असेल याची खात्री वाटते. म्हणजे आत्तापर्यंत जवळपास ५०० ते ६०० लेख 'बेस्ट ऑफ ऐसी'मध्ये येतील.

आता हे कसं करायचं? कारण एखाद्या महिन्याच्या सर्वोत्तम चाळिसांमधून त्यातले सुमारे दहा निवडायचे, तेही गेल्या पाचेक वर्षांसाठी हे काहीसं किचकट काम आहे. पण माझ्या मते करण्यालायक आहे. ते सहजपणे करण्यासाठी पायाभूत सुविधा सहज उपलब्ध आहे. जर एखाद्या महिन्यासाठी दहा-पंधरा लोकांनी आपल्याला आवडलेल्या लेखांना तारका दिल्या तर सर्वात वरचे दहाएक लेख निवडणं खूप सोपं जाईल. दुर्दैवाने ही सुविधा फार लोक वापरत नाहीत. प्रत्येक धाग्याला फारतर दोनचार लोक तारका देतात. यापुढे येणाऱ्या लेखांना आवर्जून तारका देऊन एकंदरीत स्टॅटिस्टिक्स सुधारावं ही विनंती.

'बेस्ट ऑफ ऐसी'ची यादी तयार करणं हा मोठा प्रकल्प आहे. त्यासाठी ऐसीवर येणाऱ्या लेखनाबद्दल आस्था असणाऱ्या आणि लेखनाच्या दर्जाबाबत काही जाण बाळगून असणाऱ्या व्हॉलेंटियरांची गरज आहे. तुम्हाला जर यात भाग घेण्याची इच्छा असेल तर माझ्याशी व्यनितून संपर्क करावा ही विनंती.

एक मिनी गोल - तुमच्या वाचखुणांमधल्या लेखाना चांदण्या द्या. आणि आता ईथे, "Yes I voted, did you?" स्टिकर असतो त्या सारखा "होय, मी दिल्या चांदण्या माझ्या वाचनखुणाना. तुम्ही?" स्टिकर कल्पावा !!

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....