फ्रान्स आणि बुरखा बॅन, निधर्मीपणा, व्यक्तिस्वातंत्र्य वगैरे

फ्रान्स अधिकाधिक उजवा आणि लोकशाहीचा विरोधक देश बनत चालला आहे. आधी कोणी कोणते कपडे घालावेत यावर बंदी घालून झाल्यावर आता गेली अनेक वर्षे अल्पसंख्यांकांना पोलिसांनी उगाच त्रास देत असल्याचे समोर येत आहे.

http://www.caravanmagazine.in/lede/race-and-the-republic-minority-moveme...

बिहार युपीमध्ये बायकांनी जीन्स घालू नये याबाबत अनेक उजवे गट आग्रही असतात पण सुदैवाने प्रशासनाची त्यांना मान्यता नसते. फ्रान्समध्ये तर सरकारने थेट या वैयक्तिक बाबीत ढवळाढवळ करणारे कायदे करून या विचारांची पाठराखण केली आहे. बिहार युपीमध्ये अल्पसंख्यांकांविरूद्धाच्या केसेस कित्येक वर्षे काहीही न होता चार्जशीटही फाईल न होता पेन्डिग आहेत असे अनेक बातम्या सांगतात

बिहार/युपी आणि फ्रान्स यांच्यात फार फरक दिसत नाही!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

चिडता कशापाई ? अमेरीकेत राहणार्यांचा तुम्हाला येव्हडा राग का हो ? थंड घ्या की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

मात्र बुरखा घालायला बंदी हा कायदा जाचक वाटतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात वाटतो. तो अतिउजवा नाही, मुस्लिम स्त्रीयांचे शोषण होऊ नये ही त्यामागची भावना आहे असे वाचल्याचे आठवते. थोडक्यात, तो डाव्यांनीच (लिबरल्स) केलेला कायदा आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ह्या धाग्यावर बरीच अवांतर चर्चा सुरू आहे. ती आवरली तर वाचकांची बरीच सोय होईल. गप्पाटप्पा करण्यासाठी खरडवही, खरडफळा, व्यक्तिगत निरोप अशासारख्या सोयी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्वारी Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉरी शक्तिमान ते प्रतिसाद उडवले तरी चालतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

असो.

अवांतरे होतच असतात आणि होतच राहणार !!! (आपल्याला नको असलेले अवांतरच फक्त कसं काय कंट्रोल करणार?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणी सार्वजनिक ठिकाणी सू/शी केली तर चालेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाच्या बुडाखाली किती अंधार हाय,त्ये समद्या तालुक्याला माहित्ये.

नक्की भारतातच राहता की अजून कुठे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भारतातच कि,का काय झाले?
अच्छा कळलं तुम्हाला काय म्हणायचं ते.
भारतामध्ये बर्याच ठिकाणी सू/शी उघड्यावर होते,पण मी "सार्वजनिक"
ठिकाणी म्हणजे पब्लिक प्लेस असा माझ्या म्हणण्याचा रोख आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाच्या बुडाखाली किती अंधार हाय,त्ये समद्या तालुक्याला माहित्ये.

पण मी "सार्वजनिक"
ठिकाणी म्हणजे पब्लिक प्लेस असा माझ्या म्हणण्याचा रोख आहे.

बोले तो, उदाहरणार्थ, ताजमहालात वगैरे?

("तायोमाअ, तायोमाअ,बूऽफू.")

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही. कारण त्यामुळे इतरांच्या आरोग्याला हानी पोहोचते. इतरांना हानी पोचत असेल तर समाजाला व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करावा लागतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अच्छा ठीक आहे,
आता मला सांगा लोकांनी काय कपडे घालावेत हे सरकारने ठरवू नये असे तुम्ही म्हणता,मग माझा प्रश्न असा आहे,कि काळा ड्रेस आणि बुरखा या पेहरावामध्ये कुंचबना सहन करणार-या स्त्रियांची तुम्ही बाजू का मांडत नाही?
चारचौघात बुरखा घातलेली स्त्री आली कि किती वेगळं अन् विचित्र दिसतं ते.
नखशिखान्त सगळं शरीर झाकण्याचा अठ्ठाहास का? या अट्टाहासाला धार्मिक कट्टरतेची किनार आहे त्याबद्दल तुम्ही न बोलता सरकारलाच दुषणे देताय,
फ्रान्सला दहशतवादाचा विळखा बसतोय आणि आजकाल तो अधिकच मजबूत होतोय,चार्ली हेब्दोचं प्रकरण तुम्हाला माहितच आहे,आता समजा दहशतवादी जर बुरखा घालून आले तर? काय ढेकळं कळणार आहे,बुरख्याच्या आत बाई आहे कि दहशतवादी? तस्मात काहीप्रसंगी लिबरल भुमिका गुंडाळून ठेवणे हितकारक असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाच्या बुडाखाली किती अंधार हाय,त्ये समद्या तालुक्याला माहित्ये.

आता मला सांगा लोकांनी काय कपडे घालावेत हे सरकारने ठरवू नये असे तुम्ही म्हणता,

अर्थात. सरकारने ठरवू नयेच.

मग माझा प्रश्न असा आहे,कि काळा ड्रेस आणि बुरखा या पेहरावामध्ये कुंचबना सहन करणार-या स्त्रियांची तुम्ही बाजू का मांडत नाही?

मुळात त्यांची कुचंबणा होते आहे, हे त्यांच्या वतीने कोणा तिऱ्हाइताने परस्पर का ठरवावे?

त्यांची त्यात कुचंबणा जर खरोखरच होत असेल, तर त्यांना गेला बाजार प्रथम तक्रारीचा आवाज तर उठवू द्या की! उगाच तिऱ्हाइताने परस्पर रतिमग्नगर्दभधारणाचा नसता आगाऊपणा काय म्हणून करायचा?

चारचौघात बुरखा घातलेली स्त्री आली कि किती वेगळं अन् विचित्र दिसतं ते.

पाहाणाऱ्याच्या नजरेवर (नि सवयीवर) आहे. उद्या समजा जर मी डोक्याचा गरगरीत गोटा करून नि त्याच्या मध्यभागी शेंडी ठेवून खाली धोतर नि उपरणे अशा पेहरावात तुमच्या पुण्यातल्याच उच्चभ्रू मॉलांत हिंडू लागलो, तर तेही वेगळे अन् विचित्र दिसेल. पण म्हणून काय (१) गरगरीत गोटा, (२) शेंडी, (३) धोतर आणि (४) उपरणे यांवर बंदी आणावी काय?

ते एक असो. फारा वर्षांपूर्वी, वसतिगृहातून कधी पुण्यास सुट्टीचा घरी आलो, नि नारायणपेठेत (वसतिगृहाच्या सवयीने) शॉर्टसमध्ये हिंडू लागलो, तर माझ्या आईस ते वेगळे नि विचित्र वाटत असे, नि ती त्यास मनाई करू पाहत असे. ("तुमच्या तिथे काय वाट्टेल ते घालून हिंडा, तिथे काही तुम्हाला मी अडवायला येऊ शकत नाही. इथे नारायणपेठेत असले अर्ध्या चड्डया घालून हिंडलेले लोकांमध्ये विचित्र दिसते, सबब चालणार नाही!") पण म्हणून नारायणपेठेत शॉर्टस घालून हिंडण्यावर सरकारने बंदी घालायला हवी होती काय?

तेही सोडा. आजमितीससुद्धा कधी पुण्यास आलो, नि माझी बायको जर कधी शॉर्टस घालून कोथरुडात किंवा अगदी डेक्कन जिमखान्यावर जरी जायला निघाली, तरी सर्वप्रथम त्यावर आक्षेप घेतात ते तिचे स्वत:चे वडील. (आमचे येथे ती हे बिनदिक्कतपणे करू शकते.) आता, माझी बायको हिंदूच आहे, मुसलमान नव्हे. तर मुसलमान बायकांच्या कुचंबणेची चिंता करण्यापूर्वी, माझ्या बायकोसारख्या हिंदू बायकांची ही जी कुचंबणा होते, तिची चिंता कधी केली आहेत काय?

माझ्या बायकोचेही सोडा. She is perfectly capable of dealing with her father without any assistance from the likes of you, so your interference is neither needed nor appreciated, thank you very much. पण मुळात तिच्या वडिलांना आक्षेप घ्यावासा का वाटतो, याचा कधी विचार केला आहेत काय? यात त्यांच्या 'नज़रों का कसूर' तर आहेच आहे, याबद्दल वाद नाही. पण तेवढेच नव्हे. यात "आपल्या मुलीने असले 'तोकडे कपडे' घातल्यामुळे कोणाची आपल्या मुलीवर वाईट नजर पडेल काय, त्यामुळे कोणा नीचाकडून अतिप्रसंगास तर तिला सामोरे जावे लागणार नाही ना", या भीतीचाही एक सुप्त का होईना, परंतु सूक्ष्म कॉम्पोनेंट असतो. ही भीती खुद्द तिला किंवा मला वाटत नाही; त्यांना वाटते. आणि कदाचित साहजिक आहे - she or I don't live there (at least, not any longer), he does! And where we live, we don't have to live under or face such a fear (we could possibly have others, but certainly not this one). And while I strongly suspect that his fears could possibly be unfounded or at least grossly exaggerated, I cannot be the best judge of the ground situation while sitting here, half a hemisphere away. And who knows, there could be a modicum of basis to his fears.

तर सांगण्याचा मतलब, मुसलमान बायकांच्या कुचंबणेची चिंता करण्यापूर्वी, या असल्या समाजात हिंदू स्त्रियांची जी कुचंबणा होते, तिची चिंता केली आहेत काय कधी? (आपण हिंदूच आहात, अशा समजुतीखाली हे लिहीत आहे. नसल्यास माझे आर्ग्युमेंट क्यान्सल.) मग या मुसलमान बायकांच्या चिंतेच्या फुकटच्या लष्करच्या भाकऱ्या कशासाठी? मुसलमान बायका आपापले पाहून घेण्यास समर्थ असाव्यात. आणि नसल्यास it's their headache.

(किंबहुना, या असल्या conspicuous परचिंतांमागे सहसा काही ulterior motive असते, अशी एक दाट शंका आहे.)

आता समजा दहशतवादी जर बुरखा घालून आले तर?

दहशतवाद्यांना दहशतच जर माजवायची असेल, तर बुरखा घालण्याची वस्तुत: काहीच गरज नसावी. किंबहुना, ते जर बुशशर्ट नि प्याण्ट (किंवा टीशर्ट आणि जीन्स) घालून आले, तर त्यांच्या उद्दिष्टांबद्दल तुम्हाला शंकादेखील येणार नाही. मग काय बुशशर्ट नि प्यांटींवर (किंवा टीशर्ट नि जीन्सवर) बंदी आणणार काय?

(किंवा, कोणीसे म्हटल्याप्रमाणे, मागे एकदा जेव्हा कोणीशी बुटांच्या तळव्यांमधून विमानात स्फोटके नेली होती, तेव्हापासून विमानात जाण्यापूर्वी प्रवाशांचे बूट उतरवून त्या बुटांची तपासणी होते. मेहेरबानी त्या दहशतवाद्यांची की त्यांनी काही करून चड्डीतून स्फोटके नेली नाहीत.)

...

Je suis Charlie, mais avant cette, je suis la femme Mahomedienne.,६अ

काय ढेकळं कळणार आहे,बुरख्याच्या आत बाई आहे कि दहशतवादी?

म्हणजे? बायका दहशतवादी असू शकत नाहीत काय?
..........

'फर्ष्ट इन्फर्मेशन रिपोर्ट'?

याबद्दलचे विनोदी अनुभव पुन्हा कधीतरी. किंवा, अधिक तपशिलांत न शिरता, अमेरिकन एक्सप्रेसचे गोल्ड कार्ड वापरून (त्यावर एक नवा पैसादेखील खर्च न करता) मॉलातील मूत्रालयाची द्वारे खुली होऊ शकतात, हे ज्ञान अमेरिकेत तेवीस वर्षे राहून मला नव्हते, ते पुण्याच्या एका मॉलभेटीत झाले. (अमेरिकन एक्सप्रेसवाल्यांना सांगायला पाहिजे, की तुमच्या गोल्ड कार्ड मेंबरशिपच्या एक्सक्लूज़िव बेनेफिटांच्या यादीत हेदेखील घाला म्हणून - खुद्द त्यांनादेखील ठाऊक नसेल.) हे अमेरिकेत कधी पाहिले नव्हते. (And they - Indians, of all the people - dare call America a bloody capitalist country!) पण असो, हे अवांतर झाले.

शिवाय, कोण जाणे, आज वेगळे नि विचित्र वाटणारे हे सर्व उद्या कदाचित (पुन्हा) फ्याशनेबलदेखील होऊ शकेल - फ्याशनचे चक्र कधी नि कसे फिरेल, कोणी सांगावे?

हे खरे तर तितकेसे खरे नव्हते. आमच्या नारायणपेठेतले आरेसेसवाले हाफ चड्ड्यांतच तर हिंडत की! आणि त्यांच्या त्या नामी हाफ चड्ड्या (उपाख्य हाफ-बेलबॉटम)! त्यांतून कपडे घालण्यामागचे कोणतेही उद्दिष्ट साध्य होत नाही - बोले तो, थंडीपासून रक्षणही नाही, आणि लज्जारक्षण तर नाहीच नाही! त्या मानाने आमच्या शॉर्टस खूपच बऱ्या असत.

Those bloody Indians! किंवा, Those subsets of a wider bloody South Asian culture! असेही म्हणू शकतो हवे तर, परंतु कोथरुडाची नि डेक्कन जिमखान्याची लोकसंख्या ही (आमच्यासारख्या transient आता-उपऱ्यांचा अपवाद वगळता) प्रामुख्याने भारतीय (आणि त्यातही बहुसंख्येने हिंदू) असल्याकारणाने we may limit ourselves to that extent.

काय नंदन, जमलाय का फ्रेंचचा प्रयत्न? इकडूनतिकडून ऐकून माहीत असलेलेनसलेले फ्रेंच शब्द जुळवून, अडले तिथे गूगल ट्रान्स्लेटची(!) मदत गाळलेल्या जागा भरण्यासाठी करून ठोकून दिले आहे. अर्थ लागतोय ना?

६अ अतिअवांतर: पूर्वी एकदा प्यारिस हिंडायला गेलो होतो, तेव्हा जाण्यापूर्वी काहीबाही ऐकले होते, की तिथले लोक इंग्रजीवर भयंकर खार खाऊन असतात, नि फ्रेंच येत नसली, आणि इंग्रजीतून काही विचारले, तर इंग्रजी समजत असले, तरी उत्तरे देत नाहीत म्हणून, त्यामुळे 'आपले कसे निभावणार' म्हणून थोडासा चिंतित होतो. परंतु सुदैवाने अनुभव याच्या विपरीत आला. बोले तो, आम्ही असल्या छापाचे फ्रेंच ज्याच्यातिच्या तोंडावर फेकून अर्ध्या प्यारिसला फेफरे आणले होते. तेव्हापासून आमच्या फ्रेंचची धास्ती घेऊन, आम्ही तोंड उघडले, की लोक आपण होऊन इंग्रजीतून बोलत. तर तेही एक असो बापडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात त्यांची कुचंबणा होते आहे, हे त्यांच्या वतीने कोणा तिऱ्हाइताने परस्पर का ठरवावे?
त्यांची त्यात कुचंबणा जर खरोखरच होत असेल, तर त्यांना गेला बाजार प्रथम तक्रारीचा आवाज१ तर उठवू द्या की! उगाच तिऱ्हाइताने परस्पर रतिमग्नगर्दभधारणाचा नसता आगाऊपणा काय म्हणून करायचा?

कसा तक्रारीचा बरं आवाज उठेल?हिंदूंमध्ये नवरा मेल्यावर मुंडण करणार्या स्त्रियांनी तक्रारीचा आवाज उठवला होता का?
स्त्री ही प्रजात बंड करण्यासाठी धजावत नाही,आणि मुसलमानांच्यात तर नाहीच नाही,कारण पुरूषी मानसिकतेची दहशत इस्लाममध्ये जास्त आहे,काळ्या बुरख्याने तोंड झाकणे म्हणजे कोणी पुरूषाने तिच्याकडे पाहू नये,अशी स्पष्ट संकुचित,हिडिस भूमिका त्यात आहे,यावर तुम्ही कदाचित बोलणार नाही.
काळ्या कापडाने तोंड झाकणे म्हणजे अमानुषच आता तुम्हाला त्यातील अमानुषता न दिसता बाकिचे मुद्दे काढून लिबरल प्रतिसाद द्यायचा असेल तर त्यासाठी शुभेच्छा!!

आगाऊ स्वाक्षरी ::

जगाचे जर काही भले व्हायचे असेल, तर सर्वप्रथम धार्मिक कट्टरतेचा अन् थेरडेशाहीचा नि:पात झाला पाहिजे.
(जगाचे भले झालेच पाहिजे, असा आग्रह नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाच्या बुडाखाली किती अंधार हाय,त्ये समद्या तालुक्याला माहित्ये.

(फारतर 3%) हिंदू स्त्रियांच्या केशवपनाविरुद्ध हिंदूंनी स्वतःच्या धर्मात बदल घडवायला लढा दिला होता इतके नम्रपणे लक्षात आणू देऊ इच्छितो. ज्यांना बुरखा नको आहे त्यांनी बुरखा पद्धतीविरुद्ध लढा देणे योग्यच आहे पण तो स्वेच्छेने घातल्याने समाजाचे वा त्या व्यक्तीचे नक्की काय नुकसान होते? को त्यावर बंदी आणावी. हे मला अजूनही एकानेही सांगितलेले नाही.

न वि बाजूंनी इतक्या तपशिलात लिहिलेच आहे, पण माझ्यापुरता सारांश की बुरख्याच्या (कोणत्याही धार्मिक प्रतिकांच्या) "सक्ती"च्याहि मी विरोधातच आहे. म्हणूनच अशी धार्मिक प्रतीके न बाळण्याच्याही सक्तीचा विरोध करणे मी सुयोग्य समजतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लॉजिक गंडलेले आहे (जाणूनबुजूनोवा अजाणतावा)

काही लाॅजिक वगैरे गंडलेलं नाहीये,धाग्याच्या विषयाला अनुसरून प्रतिसाद दिला आहे,तुम्हीच अवांतर करत आहात सोवळे,शेंडी,टक्कल हे मुद्दे काढून.
मुळात विषय जर हिंदू चालीरितींवर असता तर त्या अनुषंगाने प्रतिसाद दिले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाच्या बुडाखाली किती अंधार हाय,त्ये समद्या तालुक्याला माहित्ये.

@नबा, उत्तम प्रतिसाद आहे. आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही दिवस जालावर नव्हतो त्यामुळे ह्या धाग्यावर ऐसीकरांनी आपापले प्रतिसाद देऊन सार्वजनिक संभाषिताची पातळी किती उंचावली ते आजच पाहिलं. ते असो. हा प्रतिसाद केवळ मिहिर यांच्या ह्या प्रश्नांना उत्तर देण्यापुरता -

>> ह्या चर्चेतून कळलेली एक गोष्ट ही, की पगडी घालण्यावर सरसकट बंदी नाही, तर केवळ सरकारी कार्यालयांत आहे. ह्याचा अर्थ मी सरकारी नोकर नसेन तर मी सगळीकडे पगडी घालून फिरलो तर चालते का? की रस्त्यावर फिरताना पगडी चालते, पण काही कामासाठी उदा. पोलीस स्टेशनात गेलो की पगडी काढून ठेवावी लागते, असे काही?
दुसरे म्हणजे धार्मिक चिन्हे आणि सांस्कृतिक चिन्हांत फरक कसा केला जातो? केला जातो का? की किंचित धार्मिक संदर्भ असणाऱ्या सांस्कृतिक चिन्हांवरही बंदी? <<

सामान्य नागरिकांसाठीची धार्मिक प्रतीकांवरची बंदी सरकारी कार्यालयांत नाही, तर सरकारी शाळांपुरती आहे (अधिक तपशील इथे). म्हणजे सरकारी अनुदानित शाळा किंवा खाजगी शाळांना ही बंदी लागू नाही. पगडीवरची बंदीही त्यामुळे सरकारी शाळांपुरतीच आहे. त्यातही साध्या कापडानं केस झाकून शीख मुलं सरकारी शाळेत जाऊ शकतात, अशी एक तडजोड आहे. शिवाय, सोळाव्या वर्षापर्यंत शिक्षण सक्तीचं असल्यामुळे एखाद्या मुलीला बुरख्यामुळे सरकारी शाळेत जाणं शक्य नसलं तर आधी तिचं शाळाबाह्य काउन्सेलिंग केलं जातं. तडजोडी शोधल्या जातात - उदा. वर्गात बुरखा घाल, पण प्रयोगशाळेत आणि जिममध्ये काढून ठेव, वगैरे. त्यातून मार्ग निघाला नाही तर तिच्यासाठी खाजगी शाळा शोधली जाते. गंमत म्हणजे अशा मुली मग साधारणतः कॅथॉलिक शाळांमध्ये जातात, कारण कोणत्याही गावात एखाददुसरी कॅथॉलिक शाळा असते आणि तिथे बुरखा चालतो.

सांस्कृतिक चिन्हांतला फरक : "conspicuous" religious items may not be worn in schools असं कायदा सांगतो. छोटे क्रॉस वगैरे चालतात.
सरकारी आस्थापनांमध्ये (हॉस्पिटल, तुरुंग, पोलीस ठाणं वगैरे) कर्मचारी बुरखा, पगडी वगैरे घालू शकत नाहीत. सामान्य नागरिकांवर तिथे असं बंधन नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> मात्र बुरखा घालायला बंदी हा कायदा जाचक वाटतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात वाटतो. तो अतिउजवा नाही, मुस्लिम स्त्रीयांचे शोषण होऊ नये ही त्यामागची भावना आहे असे वाचल्याचे आठवते. थोडक्यात, तो डाव्यांनीच (लिबरल्स) केलेला कायदा आहे असे वाटते. <<

किंचित इतिहास :
सध्याच्या घटनेतला शाळांना सेक्युलर ठरवणारा मूळ कायदा १९०५पासूनचा, म्हणजे ज्यू-विद्वेष प्रखर असतानापासूनचा आहे.
१९८९मध्ये काही मुलींना बुरख्यामुळे शाळेतून निलंबित करण्यात आलं होतं तेव्हापासून हा (म्हणजे इथे आपण घालतोय तसा) वाद चालू झाला.
२००४चा शाळांबद्दलचा कायदा शिराक राष्ट्राध्यक्ष असताना आला. ते सेंटर-राइट होते.
आणि सरसकट सार्वजनिक ठिकाणी पूर्ण चेहरा झाकणारा बुरखा बेकायदेशीर ठरवणारा कायदा २०१०मध्ये सार्कोझी राष्ट्राध्यक्ष असताना आला. तेसुद्धा सेंटर-राइट होते.

डाव्या-उजव्यापेक्षा फ्रान्समध्ये ह्या वादाबद्दल पडलेले तट थोडे वेगळे आहेत. ज्यांना तिथे 'रिपब्लिकन' म्हटलं जातं असे लोक 'राष्ट्रानं प्रयत्नपूर्वक नागरिकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी झटावं' ह्या मताचे आहेत. त्यांच्या मते असे कायदे गरजेचे आहेत. असे लोक डाव्या-उजव्या दोन्ही बाजूंना आहेत. त्यात नुसते फेमिनिस्ट नाहीत, तर काही मुस्लिम फेमिनिस्टही आहेत. नागरिकांचं मत आजमावण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा केला गेला तेव्हा तेव्हा बहुसंख्य फ्रेंचांचा कल ह्या बाजूलाच होता असंही दिसलं. म्हणजे ह्या कायद्यांना बहुसंख्यांचा विरोध नाही. ह्याउलट, जे व्यक्तिस्वातंत्र्यवादी आहेत त्यांच्या मते राष्ट्राला व्यक्तिगत गोष्टींत एवढी दखल घेण्याची गरज नाही. त्यांचा अशा कायद्यांना विरोध आहे. आणि अर्थातच परंपरावादी मुस्लिम लोकांचा त्याला विरोध आहे. तर, कट्टर ख्रिस्ती परंपरावादी आणि इस्लामविरोधी असणारे पुन्हा कायद्याच्या बाजूनं आहेत.

त्याउलट, फ्रेंच स्त्रियांच्या अंग उघडं टाकणाऱ्या कपड्यांशी जुळवून घेता न येणाऱ्या पारंपरिक स्त्रियांसाठी अंग झाकणारे फॅशनेबल कपडे विकणारी बूटिक्ससुद्धा तिथे आहेत. उदा. हे पाहा. गंमत म्हणजे हे चालवणारी स्त्री ज्यूवंशीय आहे Smile किंवा, burqini maillot de bain म्हणून सर्च करून पाहा काय काय सापडतं ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पार्श्वभुमीत अनेक कंगोरे आहेत असे दिसते आहे. (डावे-उजवे बाबतची चूक निदर्शनास आणल्याबद्दल आभार.) तरीही, इथे लिहल्याप्रमाणे, अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा येते आहे हे दिसतेच.

"The ban also applies to the burqa, a full-body covering, if it covers the face. Consequently, full body costumes and Zentais (skin-tight garments covering entire body) were banned."

"As of 11 April 2011, it is illegal to wear a face-covering veil or other mask in public places such as the street, shops, museums, public transportation, and parks."

सुरक्षेचे कारण वरील काही ठिकाणी सुयोग्य आहे, तर इतर काही ठिकाणी जाचक वाटते. अधिक माहिती करून घ्यायला हवी. (उदा. शॉप्स, किंवा म्युझियम मध्ये मॅक्स्कॉट्सनी मास्क्स घातलेली असतील तर चालेल का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

>> अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा येते आहे हे दिसतेच. <<

फ्रान्समध्ये सुमारे पन्नास लाख मुस्लिम राहात असावेत. असा बुरखा घालणाऱ्या सुमारे हजार स्त्रिया त्यात असाव्यात असा अंदाज आहे. ह्या संदर्भात एक रोचक विदाबिंदू : २०१४मध्ये युरोपियन मानवी हक्क न्यायालयानं फ्रेंच सरकारचा निर्णय योग्य ठरवला होता.

The European judges decided otherwise, declaring that the preservation of a certain idea of "living together" was the "legitimate aim" of the French authorities.

मी वर जो 'रिपब्लिकन' मूल्यांचा संदर्भ दिला त्या दिशेनं जाणारा हा निकाल होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बुरखाबंदीच्या निर्णयाला विरोध करताना, ह्या निर्णयाचं वर्णन - "inhumane and degrading, against the right of respect for family and private life, freedom of thought, conscience and religion, freedom of speech and discriminatory".

शब्द संपले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पन्नास लाखात फक्त एक हजार स्तिया कसं काय? बुरखा घालणार्‍या स्त्रिया- समजलं. विकीवर आकडा दोन हजार आहे. अर्थात, किती हा मुद्दा महत्त्वाचा नाही. पन्नास लोकांच्या अभिव्यक्तीवर गदा येत असेल तर मुद्दा राहतोच. अर्थात पन्नास लोकांच्या अभिव्यक्तीकरता संपूर्ण समाज धोक्यात जात असेल गोष्ट वेगळी.

ते असो. प्रश्न केवळ बुरख्याचा नाही. ह्यालाही बंदी आहे. (मी वर दिलेल्या दुव्यानुसार.)

एक समाज म्हणून एकत्र राहण्याकरता विविधतेला तिलांजली दिली गेलीच पाहीजे हा दावा फोल वाटतो.

थोडक्यात काय, सुरक्षेची काळजी घेऊनही अभिव्यक्ती खुली ठेवता येणे शक्य आहे. सर्व सरदारांना पगडीच घालण्यास बंदी करण्यापेक्षा म्युझियम्स वगैरे मध्ये एक्सरे किंवा तत्सम मेटल डिटेक्ट्रर्स वापरून पगडीत हत्यारं नाहीत याची तपासणी करता येऊ शकते. सरदारही पगडी ठेवूनही फ्रेंच समाजात रुजू शकतो, त्याला पगडी किंवा फ्रेंच चालीरीती असे दोन एक्सक्लुझिव्ह पर्यायच आहे असे मला वाटत नाही.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

>> एक समाज म्हणून एकत्र राहण्याकरता विविधतेला तिलांजली दिली गेलीच पाहीजे हा दावा फोल वाटतो.

थोडक्यात काय, सुरक्षेची काळजी घेऊनही अभिव्यक्ती खुली ठेवता येणे शक्य आहे. सर्व सरदारांना पगडीच घालण्यास बंदी करण्यापेक्षा म्युझियम्स वगैरे मध्ये एक्सरे किंवा तत्सम मेटल डिटेक्ट्रर्स वापरून पगडीत हत्यारं नाहीत याची तपासणी करता येऊ शकते. सरदारही पगडी ठेवूनही फ्रेंच समाजात रुजू शकतो, त्याला पगडी किंवा फ्रेंच चालीरीती असे दोन एक्सक्लुझिव्ह पर्यायच आहे असे मला वाटत नाही. <<

तपशीलदुरुस्ती : म्युझियम्समध्ये सरदारांना पगडी घालून जायला किंवा मुस्लिम महिलांना चेहरा न झाकणारे बुरखे घालायला बंदी नाही. शिवाय वरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जिथे बंदी आहे त्या सरकारी शाळांतही अनेक तडजोडी उपलब्ध आहेत. त्यामुळे पर्याय एक्स्क्लुझिव्ह आहेत असं मलाही वाटत नाही.

मात्र, निव्वळ अभिव्यक्तीची गळचेपी म्हणण्यापेक्षा एक व्यापक मुद्दा इथे लक्षात घेतला पाहिजे असं वाटतं - बहुसंख्य फ्रेंचांना बुरखा ही स्त्रीची अभिव्यक्ती संकुचित करणारी एक मध्ययुगीन अनिष्ट प्रथा वाटते. त्यामुळे आपल्याकडे 'माझ्या मर्जीनुसार हुंडा देण्याघेण्याचं स्वातंत्र्य माझ्याकडून कायदा हिरावून घेतो' असं म्हटलं तर काय होईल, तसं काहीसं फ्रेंचांचं ह्या बाबतीत होताना दिसतं. ते योग्य किंवा अयोग्य ठरवताना ते कशातून आलेलं आहे हे लक्षात घ्यायला हवं. उदा. 'बुरखा घालता यावा, ह्यासाठी आम्ही राज्यक्रांती केली नाही, की स्त्रीस्वातंत्र्याचे लढे दिले नाहीत' असं एकीकडे म्हणणारे फ्रेंच लोक 'शार्ली एब्दो'सारख्या बाबतीत व्यंगचित्रकाराला पराकोटीचं स्वातंत्र्य द्यायला हवं ही अपेक्षा ठेवतात. मुद्दा गुंतागुंतीचा आहे ह्याबद्दल सहमती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>> 'बुरखा घालता यावा, ह्यासाठी आम्ही राज्यक्रांती केली नाही, की स्त्रीस्वातंत्र्याचे लढे दिले नाहीत' असं एकीकडे म्हणणारे फ्रेंच लोक 'शार्ली एब्दो'सारख्या बाबतीत व्यंगचित्रकाराला पराकोटीचं स्वातंत्र्य द्यायला हवं ही अपेक्षा ठेवतात.

यात एकीकडे आणि दुसरीकडे असं काही नाहीये. दोन्ही बाबी एकाच दिशेने (इस्लामचा कट्टरपणा चालवून घेणार नाही) निर्देश करतात असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>> दोन्ही बाबी एकाच दिशेने (इस्लामचा कट्टरपणा चालवून घेणार नाही) निर्देश करतात असे वाटते. <<

'शार्ली एब्दो'मध्ये ख्रिस्ती धर्माची यथेच्छ खिल्ली उडवण्याची परंपरा इस्लामच्या खिल्लीच्या परंपरेहून बरीच जुनी आहे. त्यामुळे खिल्ली उडवण्याचं स्वातंत्र्य बहुजनांच्या धर्माबद्दलही घेतलं जातंय.

'लास्ट सपर'ला मूर्खांचं जेवण संबोधलं आहे -
Last Supper

पोप बदलला, पण माझी चड्डी कुणी बदलत नाही -
Toujours pas de slip

वगैरे.

त्यामुळे पराकोटीचा आणि अगदी खालच्या पातळीचा विनोद करण्याचा हक्क त्यांना शाबूत ठेवावासा वाटतो, मग तो इस्लामच्या विरोधात असो की ख्रिस्ती की हिंदू धर्माच्या हे महत्त्वाचं नाही. किंवा धर्माच्या विरोधात की इतर कशाच्या. उदा. राष्ट्राध्यक्षांना अर्थव्यवस्थाच नाही, तर काहीच 'वर' आणता येत नाही अशी तक्रार -

Croissance

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

थोडक्यात काय, सुरक्षेची काळजी घेऊनही अभिव्यक्ती खुली ठेवता येणे शक्य आहे. सर्व सरदारांना पगडीच घालण्यास बंदी करण्यापेक्षा म्युझियम्स वगैरे मध्ये एक्सरे किंवा तत्सम मेटल डिटेक्ट्रर्स वापरून पगडीत हत्यारं नाहीत याची तपासणी करता येऊ शकते. सरदारही पगडी ठेवूनही फ्रेंच समाजात रुजू शकतो, त्याला पगडी किंवा फ्रेंच चालीरीती असे दोन एक्सक्लुझिव्ह पर्यायच आहे असे मला वाटत नाही.

अत्यंत सहमत आहे. पुढिल दुवा पगडीबंदीची व त्यावर युएनच्या human rights संस्थेच्या पाथिंब्याची माहिती देते.
http://www.sikhiwiki.org/index.php/France_turban_issue

अर्थात हा दुवा सिख लोकांच्या बाजुने लिहिलेला आहे. पण त्यांचे म्हणणे समजून घेताना त्यांची बाजु बघायलाच हवी

UNHRC said: "Even if the obligation to remove the turban for the identity photograph might be described as a one-time requirement, it would potentially interfere with the author's (Ranjit Singh's) freedom of religion on a continuing basis."
The committee also said that France had failed to explain how the Sikh turban hindered identification since the wearer's face would be visible and he would be wearing it at all times. Therefore, it argued, the regulation constituted a violation of Article 18 of the International Covenant on Civil and Political Rights.

सारखा युरोपियन कोर्टाचा दुवा फ्रान्स समर्थकांकडून दिला जातो. पण त्या कोर्टाची मर्यादा इथे उघडी पडल्याचे लख्ख दिसते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यग्जाक्टली. पगडी घातली तरी चेहरा दिसतो, सबब आयडेंटिफिकेशनला प्रॉब्लेम येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> त्यांचे म्हणणे समजून घेताना त्यांची बाजु बघायलाच हवी <<

अर्थातच. आणि मी वर म्हटलं त्याप्रमाणेच हा 'रिपब्लिकन' मूल्यं आणि धर्मवादी मूल्यं ह्यांतला झगडा आहे. मात्र, हेसुद्धा रोचक आहे -

He has been ill for some time and without official ID he was barred from receiving medical treatment and national and local government help and services.

"I cannot get myself treated," he said. "I cannot get X-rays, I cannot get my blood test done, I cannot get admitted to hospital."

स्रोत

म्हणजे, माझ्या जगण्या-मरण्याचा प्रश्न आला तरीही मी पगडी उतरवणार नाही - फ्रेंचांच्या मते धर्माचा असा टोकाचा आग्रह गणराज्याच्या विरोधात जातो. थोडक्यात, तो राष्ट्रद्रोह ठरतो. Smile

>> सारखा युरोपियन कोर्टाचा दुवा फ्रान्स समर्थकांकडून दिला जातो. <<

मी ह्या बाबतीत फ्रान्सचा समर्थक नाही. मात्र, शतकानुशतकं विशिष्ट मूल्यांसाठी झगडल्यानंतर ज्या गोष्टी दूर सारण्यात फ्रेंच यशस्वी झाले आहेत त्या पुन्हा अंगावर येतील अशी भीती त्यांना वाटते आहे हे नाकारता येत नाही. त्यातच दहशतवादी हल्ल्यांमुळे ती भीती आणखी वाढते आहे आणि नागरिकांचं अश्या कायद्यांना समर्थनही त्यामुळे वाढतं आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा रेटा आहेच. हे सर्व लक्षात न घेता केवळ मानवी हक्कांचा भंग होतो आहे असं म्हटलं तर समाज नावाची गुंतागुंत समजून घेण्यात अडथळा येतो एवढंच माझं म्हणणं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझ्या जगण्या-मरण्याचा प्रश्न आला तरीही मी पगडी उतरवणार नाही - फ्रेंचांच्या मते धर्माचा असा टोकाचा आग्रह गणराज्याच्या विरोधात जातो. थोडक्यात, तो राष्ट्रद्रोह ठरतो

असे टोकाचे किती फ्रेन्च शिख वागतात?
काही मुठभर टोकाच्या लोकांपायी सगळ्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर, अगदी कपडे कोणते घालायचे ते ठरवायच्या स्वातंत्र्यावर गदा आणावी हे काही पटत नाही. अर्थात हे ही उजव्याच मानसिकतेचे निदर्शक. एकुणच फ्रेन्च बहुसंख्या उजवी आहे असे म्हणणे गैर होणार नाही अशी भिती या चर्चेनंतर मला वाटू लागली आहे. (शेवटाचा परिच्छेदही तिथेच निर्देश करतो)

बाकी मी फ्रेन्च नाही. त्या देशात रहातही नाही. त्यामुळेच ते वेड्यासारखे वागत असले तर ते त्यांना लगेच कळण्याची शक्यता कमी असली माझ्यासारख्या तिर्‍हाईताला ते लवकर लक्षात येणार.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आणि या गुंतागुंतीचा बागुलबुवा पुढे उभा करून त्याचे समर्थन करणार्‍यांची एरवीची मते पाहून त्यातला विरोधाभासही रोचक वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्वामींची गुंतागुंत समजून घेण्याचाही मी तेवढ्याच प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. म्हणूनच तर त्यांचं गुणगान चालू असताना त्यांचा काव्यशास्त्रविनोद समजून घ्या, दुर्लक्षित करू नका असे प्रतिसाद देतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुमचा काव्यशास्त्रविनोद छानपैकी दुटप्पी आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही स्वामींच्या विरोधात गरळ ओकली तर मी 'त्यांच्या विधायक कामाची दखल घ्या' म्हणून सांगेन. हा सुदिन झणकरी ऐसीवर येवो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आत्याबाईला मिश्या एकवेळ येतील, पण काका कै म्हणणार नैत. हो कि नै?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाने