ह्या कन्नडीगांना आलाय माज

ह्या कन्नडीगांना आलाय माज

ह्या कन्नडीगांना आलाय माज
तो माज आता काढू मोडून
अर्रे 'देत नाही देत नाही' म्हणता कशाला
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||धृ||

लई तुरूंगवास करवला रे तुम्ही
काय सहन नाही केलं आम्ही
मराठीसाठी किती रक्त वाहवलं
ह्या कन्नडीगांना आम्हां डिवचलं
लई झालं आता
उठला मराठी माणूस पेटून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||१||

अरे गल्या-बोळांना नावं आमची
सार्‍या दुकानांना नावं आमची
सार्‍या शाळा रे आमच्या आमच्या
सारी आडनावं आमची आमची
बेळगाव महानगरपालीका आमची
एका ठरावानं होईल का तुमची?
आता चाला तोडू कर्नाटक विधान भवन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||२||

आहे जसं कन्नडी शासन मुजोर
त्याला सामील केंद्रशासन कमजोर
खेळी दोघांनी केली विधानभवनाची
साक्ष आहे जशी उंदराला मांजराची
बास झालं लई झालं
बंद करा तुमचं दडपशाहीचं संमेलन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||३||

या सीमेपाई एक पिढी गेली की रं आमची
ही सारी जमीन आमच्या बापजाद्याची
जमवून सारी फौज मराठी माणसाची
ईच्छा पुरी करू महाराष्ट्री जाण्याची
सांगून ठेवतो मुस्कटदाबी करू नका
उगा आमच्यावर वार करू नका
महाराष्ट्रात जाण्यासाठी
आमची तर फोडूच पण तुमचीबी डोकी फोडू
सांगून ठेवतो मिशीला पिळ देवून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||४||

-(अपुर्ण - योग आलाच तर पुर्ण करेन)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आपण सार्‍या 'ऑनलाईन मराठी कम्युनिटीजनी' मुजोर कर्नाटक, मरगळलेले मराठी नेते अन नाकर्ते केंद्रशासन यांचा ऑनलाईन निषेध करायला हवा.

-पाषाणभेद

field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (2 votes)

प्रतिक्रिया

"माराठा, जे बेलगामेर जोन्नो जेदी" एरोम भाबे पोड़ते हॉबे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'जेदी' माने? (क्खोमा कोरून, आमि आमार बाङ्ला अ‍ॅखोन अ‍ॅकटू भूले गियेछि. / आमार बाङ्ला अ‍ॅखोन अ‍ॅकटू बिश्म्रितो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेदी माने हट्टी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन भाषांमध्ये युद्ध होवू नये या मताची तेथील मंडळी आहेत. मराठी माणसांत सामोपचार रोमारोमात भिडलेला आहे. पण तो उस मुळापासून खाण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार पदोपदीने करत असल्याचे जाणवते. प्रत्येक छोट्या छोट्या कारणांवरून मराठी मंडळींची मुस्कटदाबी चालू आहे. आताच्या विधानसौध भवनावरून त्याचा कळस गाठलेला आहे.

तुम्हाला लोकशाही मान्य आहे ना?
१. मग बेळगाव नगरपालीकेने १९५६ मध्येच महाराष्ट्रात राहण्याचा केलेला ठराव का दडपला गेला?
२. महाजन आयोगाची बेजबादार विधानेच का ग्राह्य धरली जात आहेत?
३. १८५२ पासून बेळगाव नगरपालीकेचे दप्तर मराठीत आहे. असे असूनही २००५ साली कर्नाटकने बेळगाव महानगरपालीका बरखास्त का केली?
४. कानडी भाषेची सक्ती का?
५. सीमाप्रश्नाचे आंदोलन नेहमीच शांततेचे असतांना तेथील जनतेची टाळकी पोलीसांकडून का फोडली जातात?

या सारखे असंख्य प्रश्नांची उत्तरे कर्नाटकाकडून मिळतील काय? एक सासू सुनेला ज्याप्रमाणे टोमणे मारते (येथे विद्वान मंडळींडून 'सासू-सुन वाद' आदी फालतू चर्चा/ वाद अपेक्षीत नाहीत.) किंवा एखादा शिरजोर शेजारी ज्याप्रमाणे आधीच्या भांडणाचा राग मनात धरून वेळोवेळी पाणउतारा करतो त्याप्रमाणे कर्नाटक सरकार सीमावासीयांचा करत आलेले आहे.

एक महत्वाचा मुद्दा येथे मांडतो.
कर्नाटकाने ऐवीतेवी कानडीची सक्ती केली आहेच.त्यामुळे बळजबरी नव्या पिढीला कानडी शिकावे लागत आहे. हळूहळू कानडी जाणणार्‍यांची लोकसंख्या वाढत जाईल. तेथील नविन पिढीला कानडी इतिहास शिकावा लागेल.

लहाणपणी जे शिकतो ते लक्षात राहते. ती मते पक्की बनत जातात. माझेच उदाहरण घ्या. मला जयप्रकाश नारायण यांच्याबद्दल शालेय शिक्षणात एकही वाक्य नव्हते. त्यामुळे नक्की त्यांच्याबाबत काय झाले हे ओझरतेदेखील माहित नाही. पुढे मोठे झाल्यावर त्यांच्याबद्दल कामानिमीत्ताने म्हणा किंवा इतरकारणे वाचण्याची गोडी राहीली नाही. असो.

तर पुढेमागे जर कधी सीमाभागात 'कोणत्या भागात जायचे' याबद्दल मतदान झाले तर ते मतदान महाराष्ट्राच्या विरूद्ध जावू शकते.
असलेला प्रश्न रेंगाळत ठेवणे, भिजत घोंगडे ठेवणे, काळ हाच एक उपाय आहे हे मानणे हे वैशिष्ठ्य केवळ भारतीय न्यायसंस्थेत व लोकशाहीत आहे. असल्या प्रकारच्या मुद्यांमुळेच भारतात विविध प्रश्न रेंगाळत पडलेले आहेत.

सीमा भागातले लोक महाराष्ट्रात आले की त्यांचे काय भले होणार? - हा प्रश्न गैरलागू आहे. प्रश्न जेव्हा भाषा संस्कृती जगणे आदींवर येतो तेव्हा माणसाला आपली माती गोड लागते. भले तुम्ही बंगलोरला नोकरी करत असाल पण तेथे तुम्ही मराठी शब्द ऐकले की तुम्हाला प्रसन्न वाटत असेल हे नक्की. उगाच नाही येथील ऑनलाईन मराठी साईटवर मन मोकळे करायला परदेशातूनही लोक येतात ते.

आणखी एक लक्षात घ्या. सीमाभागातले लोक काही नोकरी करणारे उपरे, बिहार युपीमधून आलेले किंवा बांग्लादेशी नव्हेत. किंवा सीमाभाग हा पाकव्याप्त काश्मिरही नव्हे. शांततेने विचार करण्याची पात्रता त्यांचीही आहे. पण त्या शांततेला उसाचे मुळ समजा व तो उस कर्नाटकाने मुळापासून खावू नये.

बाकी बेळगावी विधानसभा सभागृहाचे बांधकाम करणार्‍या महाराष्ट्रातील (पुण्यातील) अस्सल मराठी उद्योजक श्री. बी.जी. शिर्के (शिर्के सिपोरेक्स फेम) यांच्या शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि.या केवळ मराठी कंपनीला काम देण्याचा कर्नाटकी कावा दिसतो. तो कावा शिर्केंना समजला नसेल तर ते वर प्रतिक्रियांच्या मतांसारखेच दुर्दैव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

प्रश्न जेव्हा भाषा संस्कृती जगणे आदींवर येतो तेव्हा माणसाला आपली माती गोड लागते. भले तुम्ही बंगलोरला नोकरी करत असाल पण तेथे तुम्ही मराठी शब्द ऐकले की तुम्हाला प्रसन्न वाटत असेल हे नक्की.

ते लोक एकदा कन्नडीगा झाले की त्यांना कन्नडा ऐकूनच प्रसन्न वाटणार. मराठी ऐकण्या-न ऐकण्याचा प्रश्नच येत नाही. शिकतायत कन्नडा तर शिकू देत की! उलट कन्नडा तर भारत सरकारने अभिजात भाषा म्हणूनही घोषित केलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दगडफोड्या,

तुझे या विषयातला जिव्हाळा मला परिचित नव्हता. अगदी मार्मिक प्रतिसाद.

भले तुम्ही बंगलोरला नोकरी करत असाल पण तेथे तुम्ही मराठी शब्द ऐकले की तुम्हाला प्रसन्न वाटत असेल हे नक्की. उगाच नाही येथील ऑनलाईन मराठी साईटवर मन मोकळे करायला परदेशातूनही लोक येतात ते.

१००% सहमत आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकीचे दुवे तर वाचालच पण हा महत्वाचा लेखही वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

लेख वाचला.

लेखाची सुरुवात साधारणतः अशी आहे:

Seemaprashna — Document Transcript

1. qh;Mghhu, f htuht, k[Ahhw`ldpdwhmh[ihh fahr chj; ?
2. qh;Mghhu, f htuht, pdwhmh[ihh k[Ahhw`ld f hr chj; ? kwhzfa[r yh;falhhj[ut[y fahMh nhgh qh;Mghhu, pdwhmh[, Ghhdhw}t, f htuht, qh[zt, Qhhyf [kj rhihh qhhmhh pzYy[irh xhn[s wht ghhtBs< jh chohutihh k[AhhQhhghhsgh;Yrh49uLhh=whk}d QhMQhMscky;y[ohGhAhchohj[ k[Ahhuhpkrhihh puzhtf cd]Qhu chj;. BkBkschj;. uKs]pKxhs[ihhku"Ku[puwrh"k f %dAhjhthLbPhyh pzYy[s CohUrhwhk}d nhUrhwr=s chpmh d;AhKshwhk}d qh;khuZhghhBs1d

उर्वरित (लांबलचक!) लेखही जवळपास असाच आहे.

अर्थात लेख डोक्यावरून गेला, हे सांगणे नलगे. मात्र, एक कुतूहल जागृत झाले, ते असे:

ही नेमकी कोणती भाषा? कन्नड असावी, असे तर वरकरणी वाटत नाही. बरे, मराठी म्हणावी, तर मला जे काही 'मराठी' म्हणून शिकवले गेले आहे - ते फारसे 'ग्रेट' आहे असा माझा दावा नाही, पण - त्यासदृशही वाटत नाही.

हा बेळगावी मराठीचा नमुना समजावा काय?

आणि बेळगावात हे असले भलतेच काहीतरी जर बोलत असतील 'मराठी'च्या नावाखाली, तर च्या** इथे बेळगाव महाराष्ट्रात हवे आहे कोणाला? नि कशासाठी?

उगाच टाळकी फोडण्याचे नि फोडून घेण्याचे नसते उद्योग, झाले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्हांस हा लेख देवनागरीच लिपीत दिसला. अर्थात तरूण भारत असे दिसल्याने पुढे लेख वाचला नाही.

बाकी पाभेंनी जे प्रश्न विचारले आहेत तसे प्रश्न सीमेवरच्या (प्रेस्टिजिअस) राज्यातले लोक बर्‍याचदा आणि महाराष्ट्रीय पाभे जसे बेळगावी नागरिकांच्या वतीने प्रश्न विचारत आहेत तसे त्या राज्यातल्यांच्या वतीने पाकिस्तान विचारत असते असे एकदम लक्षात आले.

असो. महाराष्ट्रात जसे बेळगावच्या नावाने ठराव होत असतात तसे पाकिस्तानातही होत असतात ही आणखीच रोचक गोष्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पाषाणभेद यांना संपूर्ण अनुमोदन. त्यांनी मांडलेले मुद्दे जबराट आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठीला आणि महाराष्ट्राला गोत्यात आणण्यासाठी मुद्दाम उकरुन काढलेला वाद.

मराठी ही कन्नडपासून झाली.
विठोबा महालक्ष्मी वगैरे कन्नडच आहेत.
गणपती पण खालनंच आला.
त्यात देशस्थ आडनावंसुद्धा देशपांडे कुलकर्णी वगैरे कानड्यांची लावतात.
म्हणजे ते कानडीच मुळ्चे.

म्हणुन मग असा वाद काढायचा.
आणि त्याला विरोध केला की सगळा महाराष्ट्र आधी कानडीच होता असं दाखवाय्चं.
ढेरे बिरे आहेतच मदतीला.

आणि मग महाराष्त्राला खिशात घालायचा.
कोंकणस्थ् बाहेरचे म्हणुन हाकलुन द्याय्चे.
अशा करारावर ह्या पाषाणहृदयी धागालेखकानं कर्नाटक सरकारशी सौदा केला आहे. (म्हण्जे कानडी विधानभवन नाही. मराठी सौदा)

आर्टीआय कार्यकर्ते घाला त्याच्यावर.
मग सग्ळी अंडीपिल्ली येतील बाहेर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

सरकारशी सौदा केला आहे. (म्हण्जे कानडी विधानभवन नाही. मराठी सौदा)

हाहाहाहा! मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सौदीच ते... सौ-दा सौदा करतील नि काय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>कर्नाटकाने ऐवीतेवी कानडीची सक्ती केली आहेच.त्यामुळे बळजबरी नव्या पिढीला कानडी शिकावे लागत आहे. हळूहळू कानडी जाणणार्‍यांची लोकसंख्या वाढत जाईल. तेथील नविन पिढीला कानडी इतिहास शिकावा लागेल. <<

हेच महाराष्ट्रातल्या कानडी लोकांना लागू होतं. सोलापूर-कुर्डुवाडीपासून कर्नाटक सीमेपर्यंत अनेक ठिकाणी कित्येक कानडी लोक राहतात. त्यातले अनेक उत्तम मराठी बोलतात हे मी अनुभवलं आहे. तसेच विदर्भात हिंदीभाषिक राहतात. मराठवाड्यातले मराठी लोक निजामाच्या सत्तेखाली होते तेव्हा उर्दू शिकत असत. एक रेषा कुठेतरी आखली जाते तेव्हा तिच्या दोन्ही बाजूंना असा प्रकार घडतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कविता छान आहे. सीमाप्रश्न भिजवत ठेवलाय नुसता, पण ते राजकारण्यांच्या सोईचं आहे त्यामुळे सामान्य लोकं काय करु शकतात?
बेळगाव पालिका बरखास्त करणे वगैरे आतातायी भाषाभिमानाचे प्रकरण सौथइंडीयन लोकांना शोभणारेच आहे.
बाकी भावना पोहोचल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>सीमाप्रश्न भिजवत ठेवलाय नुसता, पण ते राजकारण्यांच्या सोईचं आहे

सहमत आहे. बरेचसे प्रश्न राजकीय टूल म्हणून वापरले जात असतात.
गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात जे पक्ष बेळगावच्या नावाने आरोळ्या ठोकताहेत, त्यांच्या मित्रपक्षाचे सरकार कर्नाटकात आहे. त्यांनी त्या मित्रपक्षाला नुसते सांगायचा अवकाश की कर्नाटक सरकार बेळगाव महाराष्ट्रात सामील करायला लगेच मान्यता देईल.

अशीच सिच्युएशन पूर्वीही घडून गेलेली आहे. रामकृष्ण हेगडे कर्नाटकचे मुख्यमंत्री झाल्यावर बेळगाव प्रश्नावर नेहमी आवाज उठवणार्‍या जनता पार्टीच्या एस एम जोशी, मधू दंडवते मृणाल गोरे आदि नेत्यांना पत्रकारांनी "आता सीमाप्रश्न सुटणार का?" असा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यांनी काही ठोस उत्तर दिले नाही.

या आवाजी राजकारण्यांच्या सुदैवाने महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्ली या तिन्ही टिकाणी (महाराष्ट्राविषयी खास आकस नसलेल्या) पक्षाचे सरकार असण्याचा योग काही जुळून आलेला नाही. त्यामुळे हा प्रश्न मधूनमधून उकरून काढायची संधी उपलब्ध होतच असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सहमत आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो अन ज्या न्यायालाकडे सीमावासी डोळे लावून बघतात ते देखील राजकीय हवा कशी वाहते त्याप्रमाणे आपली पाठ फिरवत असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

पाने