Skip to main content

॥ एका लिब्राण्डुचे चिंतन ॥


॥ एका लिब्राण्डुचे चिंतन ॥

-राजीव उपाध्ये

टीप- मी एक "लिब्राण्डू" आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. ए०आय० पृथ्वीतलावर अवतरल्यापासून मी प्रत्येक मॉडेलची "आण्डु पाण्डु लागले भाण्डु, कोण खरा लिब्राण्डु?" या ओळी देऊन काव्यपूर्ती करण्यास सांगतो. सध्याच्या ए०आय० चा याबाबतीतला अनुभव उत्साहवर्धक आहे.

"लिब्राण्डू" असूनही मराठी शारदेची सेवा करणे ए०आय० मुळे मला  शक्य झाले. अर्थातच त्यामुळे ए०आय०चा ऋणी आहे. त्यामुळे सर्व ए०आय० निदकांना ही रचना समर्पित करत आहे.


आण्डु पाण्डु लागले भाण्डु,
कोण खरा लिब्राण्डु?
दोघे म्हणती मीच शहाणा,
म्हणे गर्दी, "नका रे भाण्डु"!

भिंतीवरती फिरती पाली,
खाली धावती ’झुरळे’ सारी;
’वरती’ घोषणा, दगड ’खाली’,
कोण करवी धुमश्चक्री भारी?

पुस्तक फाटे, फळा फुटला,
उठला गोंधळ वर्गामध्ये;
प्रश्न विचारुनी उत्तर शोधा,
दगड कशाला हातामध्ये?

एक म्हणे “ही क्रांती आमची!”,
दुसरा म्हणे “आम्हीच भारी!”
तिसरा येता दगड उचलतो,
चौथा करतो घोषणा सारी!

जनता मग पाहत बसली,
उडे धुरळा मग शब्दांचा;
पाली पळती, झुरळे लपली,
कुणा कळेना खेळ शब्दांचा!

शेवटी सारे शांत झाले,
बसे धुरळा रस्त्यामध्ये;
खरे उत्तर मतपेटीमध्ये,
पुस्तक हरले दगडांमध्ये!
 

तर्कतीर्थ Sat, 15/08/2026 - 08:21

माझ्यावरील टीकेचे मूल्यमापन


विक्षिप्त अदिती आणि राजेश - ०/१० (फकत हुल्लडबाजी)

सई केसकर  - २/१० (पेपरमध्ये काहीतरी पांढर्‍यावर काळे केले आहे!)

गवि - ४/१०  (पेपरमध्ये काहीतरी पांढर्‍यावर काळे केले आहे! तसेच मुद्दा भरकटवण्याचा कल्पक प्रयत्न)

अस्वल - ५/१० (खरे तर मी ४.५ गुण देणार होतो. पण हळुहळु प्रतिसादात गांभिर्य दिसू लागले)

नवी बाजू - ५.५/१० (प्रत्येक प्रश्नाला नम्रपणे उत्तर देण्याचा प्रयत्न आवडला. आमचे एक प्रा० उत्तरपत्रिकेच्या मागे केलेले "रफ वर्क तपासून" त्याला पण मार्क देत असत, त्या प्रमाणे नवी बाजू यांच्या तळटीपा तपासून, लिखाणातली ’स्वच्छता’ विचारात घेऊन गुण दिले आहेत)


मी रचनात्मक टीका असेल तर ती गांभिर्याने घेतो. रचनात्मक टीकेत सर्व बाजू समजून घ्यायचा केलेला प्रयत्न स्पष्ट दिसतो. हे आजकाल डीझाईन स्कूलमध्ये अगदी प्राथमिक पातळीवर शिकवतात. आणि त्याचे पालन पण होताना दिसते. पण आय० आय० टी० मध्ये पण फारसे दिसले नाही. एखादाच अपवाद...

मी माझ्या डीबेट-सिम्युलेटरच्या उपयोगाचा स्पेक्ट्रम मांडायचा प्रयत्न केला. चर्चेत किंवा प्रतिसादात त्याच्या आणखी युज-केसेस शोधण्यासाठी काही कल्पना मिळाल्या असत्या तर चर्चा दर्जेदार झाली असती. पण असो...
 

Rajesh188 Sat, 15/08/2026 - 09:54

हे मूल्यांकन तुम्हि स्वतः केले आहे की ai कडून घेऊन इथे. पोस्ट केले आहे? प्रामाणिक पणे सांगा.

तुम्ही केले असेल तर ai कडून करून घ्या आणि ते इथे पोस्ट करा

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 15/08/2026 - 21:37

In reply to by Rajesh188

राजेश, मनापासून सांगते, तुम्ही तुमचं टीकास्त्र सोडताना कमीतकमी शब्द वापरलेत तर वाचायला जाम मजा येते!