पुणे वॉरियर्स फँन्स क्लब
आपली पुणे वॉरियर टीम जिँकणार की नाही ? की फक्त हार खाणार ? हे जाणुन घेण्यासाठी , जल्लोष करण्यासाठी प्रसंगी टीमला नावे ठेवण्यासाठी हा धागा! तर करा मग सुरु ..!
"पुणे पानिपत" आवडल्या गेल्या
"पुणे पानिपत" आवडल्या गेल्या आहे. आणखीन काही...
"पुणे पंडित्स"
"पुणे पॉझिटिव्ह्ज" (पुणे तिथे काय उणे?)
"पुणे बामणहरीज" (घाशीराम फेम)
"पुणे मावळाज"
"पुणे माहेरियन्स" (पुणे हे सगळ्याच चांगल्या गोष्टीचं माहेरघर आहे म्हणून... अर्थात त्या सगळ्या सासरी कुठे जातात हे विचारू नये)
"पुणे बोळाइट्स" (गल्ल्या आणि बोळांशिवाय पुण्याची कल्पना तरी करता येते का?)
"पुणे पेठाइत्स"
अहो , मागील 3 वर्षाँपासुन
अहो , मागील 3 वर्षाँपासुन पुणे पहिले 2 सामने सलग जिँकते व नंतर सलग हार खाते. यावेळी मात्र ती सलग 2 वेळा हारली आहे , मग हा उलट शुभ संकेत आहे ! आणि आपल्या पुणे शहराचे ज्याने जगात नाव रोशन केले त्या पुणे वॉरियरला लोक का नाव ठेवतात ते समजत नाही! बाकी आज काही असो आयपीएल 15 चा विजेता मात्र पुणे असणार ! बाकी प्रतिसादा बद्दल धन्यवाद .!
मित्रांनो पुणे वॉरियर मध्ये
मित्रांनो पुणे वॉरियर मध्ये पुण्याचे श्रीकांत वाघ , अभिषेक नायर , अभिषेक झुनझूनवाला असे महाराष्ट्रीयन खेळाडू आहेत. पुढच्या वर्षी सर्व खेळाडुंचा लिलाव होणार आहे तेव्हा बरेच मराठी खेळाडू घेण्याचा सहाराश्रीँचा मानस आहे . अचानक टीम तयार झाल्यामुळे बरेच खेळाडू अगोदरच इतर संघात होते. त्यामुळे अशी टीम तयार झाली आहे . एनी वे उद्या तुमच्या सपोर्टची पुण्याला गरज आहे .
पूर्वीचं पुणं राहिलं नाही
पुण्याचा जाज्ज्ज्ज्ज्वल्य अभिमान राहिला नाही कोणाला.
झुनझुनवाला आणि नायर यांना पुणेकर म्हणण्याची वेळ आली.
अवांतर: परवाच एक जण सांगत होता. पूर्वी लोक लंचटाइम मध्ये कमिन्समधून डहाणूकर कॉलनीतल्या घरी जाऊन जेवून वामकुक्षी घेऊन पुन्हा कामावर येत. हल्ली बर्याच जणांच्या बाहेरगावी बदल्या केल्या गेल्यामुळे तसं करता येत नाही. हा घोर अन्याय आहे. आदिवासींना त्यांच्या जीवनशैलीतून उचकटून नागरी बनवू नये म्हणून मेधा पाटकर आदि लोक भांडतात. पुणेकरांनाही त्यांच्या जीवनशैलीतून उठवणार्यांबद्दल कोणीच काही बोलत नाही.
>>अवांतर: परवाच एक जण सांगत
>>अवांतर: परवाच एक जण सांगत होता. पूर्वी लोक लंचटाइम मध्ये कमिन्समधून डहाणूकर कॉलनीतल्या घरी जाऊन जेवून वामकुक्षी घेऊन पुन्हा कामावर येत.
जसं ठाणं उपनगरात मोडतं नं, तस्स्सच पुर्वी डहाणूकर कॉलनी उपपुणं होतं त्याला पुणं म्हणणं म्हणजे उदाहरणार्थ थोर आहे.
>>पुण्याचा जाज्ज्ज्ज्ज्वल्य अभिमान राहिला नाही कोणाला.
पुण्याची काळजी एकंदर 'ठाणेकरांना' आहे हे पाहून विशेष वाटलं, असो, पुण्याबद्दलचं आकर्षण बर्याच नगरी...उप्स..उपनगरी लोकांना आहे.
पुण्याचा जाज्ज्ज्ज्ज्वल्य
पुण्याचा जाज्ज्ज्ज्ज्वल्य अभिमान राहिला नाही कोणाला.
झुनझुनवाला आणि नायर यांना पुणेकर म्हणण्याची वेळ आली.
निषेध!
एकीकडे पेठेबाहेर पुणं नाही यावरून पुणेकरांना नावं ठेवायची आणि दुसरीकडे थोडा उदारमतवाद दाखवला तरी त्यावरूनही दोष द्यायचा! याला काय अर्थ आहे? एखाद्या दहशतवाद्याने माफी मागितली तर त्याचं पुनर्वसन करण्याजागी त्याला त्याच्या भूतकाळावरून बोलून परत अतिरेकाकडे ढकलायचं. हा पुणेद्वेष आहे फक्त!
एक म्हणजे मी पुण्याचा नसुन
एक म्हणजे मी पुण्याचा नसुन नगरचा आहे. दुसरे की मी पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. तसेच पुणे माझ्या आवडत्या शहरापैकी एक आहे . आणि त्यामुळे मी पुण्याला सपोर्ट करतो. यात नाक घासण्याचा प्रश्नच येत नाही ! उद्या तुमच्या कुटूंबाची तुम्ही स्तुती करत असाल , कुटूंबाचा तुम्हाला अभिमान असेल तर तुम्ही नाक घासता हे बोलणे तुम्हाला शोभेल काय?
मोल्सवर्थ काका म्हणे:
क्षुण्ण (p. 913) [ kṣuṇṇa ] p S Bruised or trodden; crushed or injured through bruising, pounding, trampling &c.
सिँग नावाचा कर्णधार व सहारा
सिँग नावाचा कर्णधार व सहारा मालक असणारा पुणे वॉरियर संघ आपल्या पुण्यासाठी खेळतो. वॉरियर जिँकले तर सहारा जिँकले वा युवराज जिँकला असे न म्हणता आपण पुणे जिँकले असे म्हणतो . आपला कर्णधार कोण मालक कोण याच्याशी संबंध नाही . संबंध पुण्याशी आहे. ते आपल्या पुण्यासाठी खेळतात म्हणून हा फँन्स क्लब स्थापन झाला आहे . इथे फॅन एकच असुन इतर टिका करण्यासाठी आहेत.(नगरकर)

अजुन एकही प्रतिसाद नाही ?
अजुन एकही प्रतिसाद नाही ? कमाल आहे बुवा !