Skip to main content

पुणे वॉरियर्स फँन्स क्लब

आपली पुणे वॉरियर टीम जिँकणार की नाही ? की फक्त हार खाणार ? हे जाणुन घेण्यासाठी , जल्लोष करण्यासाठी प्रसंगी टीमला नावे ठेवण्यासाठी हा धागा! तर करा मग सुरु ..!

राजन बापट Mon, 08/04/2013 - 22:43

In reply to by अतिशहाणा

पु ल देशपांडे यांच्या भाषेत "तेव्हढ्यात मी सरोज खरेला आपलीशी केली" या धर्तीवर हे असावे असा एक अंदाज आहे.

नगरीनिरंजन Tue, 09/04/2013 - 12:43

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या धाग्यावरची अनुप्रासयुक्त नावे वाचून या टीमला "पुणे वॉरियर्स" ऐवजी "पुणे पानिपत" हे नाव सर्वथा योग्य झाले असते असे वाटले. :)

राजेश घासकडवी Tue, 09/04/2013 - 21:27

In reply to by नगरीनिरंजन

"पुणे पानिपत" आवडल्या गेल्या आहे. आणखीन काही...

"पुणे पंडित्स"
"पुणे पॉझिटिव्ह्ज" (पुणे तिथे काय उणे?)
"पुणे बामणहरीज" (घाशीराम फेम)
"पुणे मावळाज"
"पुणे माहेरियन्स" (पुणे हे सगळ्याच चांगल्या गोष्टीचं माहेरघर आहे म्हणून... अर्थात त्या सगळ्या सासरी कुठे जातात हे विचारू नये)
"पुणे बोळाइट्स" (गल्ल्या आणि बोळांशिवाय पुण्याची कल्पना तरी करता येते का?)
"पुणे पेठाइत्स"

धनंजय वैद्य Tue, 09/04/2013 - 18:28

अहो , मागील 3 वर्षाँपासुन पुणे पहिले 2 सामने सलग जिँकते व नंतर सलग हार खाते. यावेळी मात्र ती सलग 2 वेळा हारली आहे , मग हा उलट शुभ संकेत आहे ! आणि आपल्या पुणे शहराचे ज्याने जगात नाव रोशन केले त्या पुणे वॉरियरला लोक का नाव ठेवतात ते समजत नाही! बाकी आज काही असो आयपीएल 15 चा विजेता मात्र पुणे असणार ! बाकी प्रतिसादा बद्दल धन्यवाद .!

अतिशहाणा Wed, 10/04/2013 - 00:05

In reply to by धनंजय वैद्य

मला तरी सचिन तेण्डुलकरमुळे मुम्बई इण्डियन्स ही टीम 'आपली' वाटते बॉ. पुण्याच्या टीममध्ये पुणे किंवा महाराष्ट्राचे म्हणावे असे विशेष कोणी नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/04/2013 - 01:04

In reply to by धनंजय वैद्य

आपल्या पुणे शहराचे ज्याने जगात नाव रोशन केले त्या पुणे वॉरियरला ...

याचा नक्की अर्थ कोणी सांगणार का?

धनंजय वैद्य Wed, 10/04/2013 - 21:14

मित्रांनो पुणे वॉरियर मध्ये पुण्याचे श्रीकांत वाघ , अभिषेक नायर , अभिषेक झुनझूनवाला असे महाराष्ट्रीयन खेळाडू आहेत. पुढच्या वर्षी सर्व खेळाडुंचा लिलाव होणार आहे तेव्हा बरेच मराठी खेळाडू घेण्याचा सहाराश्रीँचा मानस आहे . अचानक टीम तयार झाल्यामुळे बरेच खेळाडू अगोदरच इतर संघात होते. त्यामुळे अशी टीम तयार झाली आहे . एनी वे उद्या तुमच्या सपोर्टची पुण्याला गरज आहे .

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/04/2013 - 21:25

In reply to by धनंजय वैद्य

उद्या तुमच्या सपोर्टची पुण्याला गरज आहे .

हा काय प्रकार आहे? पुणेरी लोक असे नाक घासतात, ते ही मुंबई, नाशिक, धुळे, कोल्हापूर, टेक्सस, युरोपच्या मराठी लोकांसमोर? काय लाज राहिली पुण्याची आणि महाराष्ट्राचीही!

मी Wed, 10/04/2013 - 21:35

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धनंजय वैद्य पुण्याचे असण्याबद्दल पुरेसा पुरावा उपलब्ध नाही, सबब वरील विधान लोडेड आहे असं वाटतं, बाकी भावनेशी सहमत.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/04/2013 - 21:55

In reply to by मी

अरेरे! काय ही वेळ आली पुण्याची टीमवर. पुण्याबाहेरची वाटावी अशी व्यक्ती पुण्याच्या टीमसाठी 'सपोर्ट'चा जोगवा मागत्ये! काय लाज राहिली पेशव्यांच्या पुण्याची?

लोडामि लोडावः लोडामः

मी Wed, 10/04/2013 - 21:59

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आता पुणं पेशव्यांचं राहिलं नाही(इतिहास कच्चा), इतरांचे धुणे धुणार्‍यांना/खराब करणार्‍यांना पुणेकरांनी जेवढा सल्ला द्यावा तेवढं कमीच आहे.

नितिन थत्ते Thu, 11/04/2013 - 10:46

In reply to by मी

पुण्याचा जाज्ज्ज्ज्ज्वल्य अभिमान राहिला नाही कोणाला.

झुनझुनवाला आणि नायर यांना पुणेकर म्हणण्याची वेळ आली.

अवांतर: परवाच एक जण सांगत होता. पूर्वी लोक लंचटाइम मध्ये कमिन्समधून डहाणूकर कॉलनीतल्या घरी जाऊन जेवून वामकुक्षी घेऊन पुन्हा कामावर येत. हल्ली बर्‍याच जणांच्या बाहेरगावी बदल्या केल्या गेल्यामुळे तसं करता येत नाही. हा घोर अन्याय आहे. आदिवासींना त्यांच्या जीवनशैलीतून उचकटून नागरी बनवू नये म्हणून मेधा पाटकर आदि लोक भांडतात. पुणेकरांनाही त्यांच्या जीवनशैलीतून उठवणार्‍यांबद्दल कोणीच काही बोलत नाही.

मी Thu, 11/04/2013 - 11:47

In reply to by नितिन थत्ते

>>अवांतर: परवाच एक जण सांगत होता. पूर्वी लोक लंचटाइम मध्ये कमिन्समधून डहाणूकर कॉलनीतल्या घरी जाऊन जेवून वामकुक्षी घेऊन पुन्हा कामावर येत.

जसं ठाणं उपनगरात मोडतं नं, तस्स्सच पुर्वी डहाणूकर कॉलनी उपपुणं होतं त्याला पुणं म्हणणं म्हणजे उदाहरणार्थ थोर आहे.

>>पुण्याचा जाज्ज्ज्ज्ज्वल्य अभिमान राहिला नाही कोणाला.

पुण्याची काळजी एकंदर 'ठाणेकरांना' आहे हे पाहून विशेष वाटलं, असो, पुण्याबद्दलचं आकर्षण बर्‍याच नगरी...उप्स..उपनगरी लोकांना आहे.

नगरीनिरंजन Thu, 11/04/2013 - 12:56

In reply to by मी

पुण्याबद्दलचं आकर्षण बर्‍याच नगरी...उप्स..उपनगरी लोकांना आहे

पुण्याबद्दलचं आकर्षण सगळ्या नवयुवक नगरी लोकांना असते. आम्हालाही होते. पुण्याशिवाय दुसरे मोठे शहर पाहेपर्यंत ते टिकले.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 12/04/2013 - 00:49

In reply to by नितिन थत्ते

पुण्याचा जाज्ज्ज्ज्ज्वल्य अभिमान राहिला नाही कोणाला.
झुनझुनवाला आणि नायर यांना पुणेकर म्हणण्याची वेळ आली.

निषेध!
एकीकडे पेठेबाहेर पुणं नाही यावरून पुणेकरांना नावं ठेवायची आणि दुसरीकडे थोडा उदारमतवाद दाखवला तरी त्यावरूनही दोष द्यायचा! याला काय अर्थ आहे? एखाद्या दहशतवाद्याने माफी मागितली तर त्याचं पुनर्वसन करण्याजागी त्याला त्याच्या भूतकाळावरून बोलून परत अतिरेकाकडे ढकलायचं. हा पुणेद्वेष आहे फक्त!

धनंजय वैद्य Thu, 11/04/2013 - 11:38

एक म्हणजे मी पुण्याचा नसुन नगरचा आहे. दुसरे की मी पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. तसेच पुणे माझ्या आवडत्या शहरापैकी एक आहे . आणि त्यामुळे मी पुण्याला सपोर्ट करतो. यात नाक घासण्याचा प्रश्नच येत नाही ! उद्या तुमच्या कुटूंबाची तुम्ही स्तुती करत असाल , कुटूंबाचा तुम्हाला अभिमान असेल तर तुम्ही नाक घासता हे बोलणे तुम्हाला शोभेल काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 12/04/2013 - 00:13

In reply to by धनंजय वैद्य

... हे बोलणे तुम्हाला शोभेल काय?

माझी चूक झाली. सर्वसामर्थ्यवान पुण्याच्या समर्थकांबद्दल मी असं बोलण्याची चूक करायला नको होती. ही माझ्या आयुष्यातली एक मोठी राजकीय चूक आहे. त्याबद्दल मी नाक घासते माफी मागते.

धनंजय वैद्य Thu, 11/04/2013 - 23:23

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पुणे वॉरियर्सने विजयी गुढी उभारली आहे ! तमाम पुणे प्रेमिँना शुभेच्छा ! माझा अंदाज खरा ठरला . परवाच्या सामन्यासाठी शुभेच्छा !

धनंजय वैद्य Sun, 14/04/2013 - 07:52

शेवटच्या 16 ओवरपर्यँत सामना हातात होता, 117/3 अशी अवस्था होती मुंबईची पण त्या आत्मघातकी डिँडाला ओवर देऊन पुण्याने आपल्या पायावर धोँडा मारून घेतला!

अतिशहाणा Tue, 16/04/2013 - 02:20

चेन्नैला हरवलं म्हणजे पुणे स्पर्धेत आहेत असे दिसते

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 17/04/2013 - 23:33

In reply to by धनंजय वैद्य

वॉरियर असं आडनाव भारतातल्या दक्षिण किनार्‍यालगतच्या लोकांमधे असतं ना?

मुर्ख वॉरियर हारले !

भाषा सांभाळा वैद्य.

राजन बापट Wed, 17/04/2013 - 23:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>वॉरियर असं आडनाव भारतातल्या दक्षिण किनार्‍यालगतच्या लोकांमधे असतं ना?

वारियर. केरळ. चूभूदेघे.

धनंजय वैद्य Thu, 18/04/2013 - 07:31

इथेच कमी पडतात मराठी माणसे ! तुम्हाला त्या केरळी लोकांचा अपमान केला असे वाटते पण आपल्या एक मराठी बांधवाला सहानुभूती देण्याऐवजी मलाच तोँडावर पाडले ! काय म्हणावे याला?

बॅटमॅन Tue, 23/04/2013 - 23:02

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आयपीएल म्हंजे उत्तम नजाकतदार क्रिकेटची शवपेटिकाच असल्याने तसे म्हणालो. ट्यानिन अन क्याफीनमुळे नव्हे. :) बाकी क्षुण्ण या शब्दाचा नेमका अर्थ काय म्हणे?

धनंजय वैद्य Thu, 25/04/2013 - 08:39

आय थिँक पुण्याने बँगलोर विरुद्धच्या सामन्यातुन काही तरी बोध नक्कीच घेतला असेल पाहुया रविवारी काय काशी करतायत ! ( अवांतर - सहाराने शहर बदलून देण्याची विनंती बीसीसीआयला केली आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद अजिबात नाही हे कारण )

सुज्ञ माणुस Thu, 25/04/2013 - 10:12

सिंग नावाचा माणूस कर्णधार आणि सुब्रतो राय नावच माणूस मालक असून पुणे म्हणविणार्या (???) टीमचा फ्यान क्लब असू शकतो यावरच माझा विश्वास नाहीये :) :-B :b ':ब

धनंजय वैद्य Thu, 25/04/2013 - 18:10

सिँग नावाचा कर्णधार व सहारा मालक असणारा पुणे वॉरियर संघ आपल्या पुण्यासाठी खेळतो. वॉरियर जिँकले तर सहारा जिँकले वा युवराज जिँकला असे न म्हणता आपण पुणे जिँकले असे म्हणतो . आपला कर्णधार कोण मालक कोण याच्याशी संबंध नाही . संबंध पुण्याशी आहे. ते आपल्या पुण्यासाठी खेळतात म्हणून हा फँन्स क्लब स्थापन झाला आहे . इथे फॅन एकच असुन इतर टिका करण्यासाठी आहेत.(नगरकर)

बॅटमॅन Thu, 25/04/2013 - 18:34

In reply to by नितिन थत्ते

ते आपल्या पुण्ण्यासाठी खेळतात. अर्थात पैशामुळे पुण्य मिळते हा भाग काही उल्लेखनीय नाहीच म्हणा ;)

सुज्ञ माणुस Mon, 29/04/2013 - 12:24

In reply to by धनंजय वैद्य

वॉरियर जिँकले तर >>>

मला याबद्दल मोठी शंका आहे. हि कन्डिशन कधीही satisfy होईल असे वाटत नाही.
उलट कोलकत्ता जिंकले तर शाहरुख जिंकला असे म्हणतो आम्ही :)

बॅटमॅन Mon, 29/04/2013 - 22:56

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या प्रतिसादाला माहितीपूर्ण श्रेणी देण्यामागचे कारण श्रेणीडोनराने स्पष्ट करावे. अन्यथा मोकलाया दाही दिश्या दाहीवेळेस ल्याहावे लागेल तीन पॅराडाइम मधून. एक शुद्ध पद्धत, दुसरी मोकलाया वाली, अन तिस्री चुचुवलि.

अतिशहाणा Mon, 29/04/2013 - 22:01

सारणीतील शेवटच्या स्थानासाठी पुणे आणि दिल्लीमध्ये चुरस आहे. आता तरी मराठी माणूस दिल्ली सर करणार की नाही? पुण्याचे चीअरलीडर धनंजय यांचे काय मत आहे?

नितिन थत्ते Tue, 30/04/2013 - 08:39

In reply to by अमुक

जोशीला पण आवडता असेल. (देव आनंदचा*)

*माझ्या लहानपणी याचा उच्चार देवानंद (संध्यानंद सारखा) करत असत.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/05/2013 - 05:50

In reply to by अमुक

अहिराणी बोली फारशी (इथे कोटी नाही) समजत नाही त्यामुळे जोशिले किती समजेल याबद्दल शंका होती. म्हणून पाहिला नाही. पण आवडायला काय लागत नाही, तेव्हा होय. तो ही आवडतो.

बॅटमॅन Fri, 10/05/2013 - 12:42

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जोशिले, त्याले, मले, तुले, इ. प्रत्यय अहिराणीत असतात की वर्‍हाडी बोलीत? अहिराणीचा अण्भव णाही, वर्‍हाडीचा आहे त्यात असे प्रत्यय पाहिलेत.

अतिशहाणा Thu, 09/05/2013 - 23:48

पुणे वारियर्स फक्त ब्याटीने बॉलला वारा घालताना दिसत आहेत. सलग सात-आठ पराभवांमुळे त्यांनी गुणतालिकेत (खालून) पहिले स्थान कमावले आहे.

बॅटमॅन Fri, 10/05/2013 - 12:32

In reply to by अतिशहाणा

पुणे वारियर्स फक्त ब्याटीने बॉलला वारा घालताना दिसत आहेत.

जबरी उपमा!!!!! पार सुपरमार्केट उठवल्या गेले आहे =)) =))

ऋषिकेश Wed, 22/05/2013 - 09:27

In reply to by नितिन थत्ते

इथे ऐसीवर कुण्णी कुण्णी बिच्चार्‍या संघाला सपोर्ट न केल्याची ही फळं आहेत. ;)
आता या पुण्याला संघच नै? का फक्त मालक बदलणार ते पहायचं

बॅटमॅन Wed, 22/05/2013 - 15:33

In reply to by ऋषिकेश

पुण्याचा संघ पुढच्या आयपीएलमध्ये नसल्यावर पुणे तिथे काय उणे या आजपर्यंत र्‍हेटॉरिकल असणार्‍या सवालाचा एक तरी व्यवस्थित जबाब मिळेल ;)

बॅटमॅन Wed, 22/05/2013 - 16:29

In reply to by सुनील

आल्रेडी एम्पीएल पाहिलीये. महाराष्ट्र प्रीमियर लीग. देवगिरी एम्परर्स, रायगड रॉयल्स, पन्हाळा पॅन्थर्स, सिंधुदुर्ग सेलर्स इ. नावे पाहून मस्त मजा वाटली. तसेच या आयपीएलमध्येही व्हायला हर्कत नसावी. ऑल द खत्रूड्स कॅन प्ले देअर पार्ट ;)

लॉरी टांगटूंगकर Thu, 30/05/2013 - 15:36

In reply to by बॅटमॅन

आमच्या इकडे एन.ए.एल. मध्ये एनपीएल होती.
संघांची नावे, स्ट्रक्चर्स सुपर ११, सी.एफ.डी सुपर किंग्स, नॅनो वॉरियर्स कोडीहल्ली वगैरे असावीत.

किंबहुना सर्वसुखी Wed, 22/05/2013 - 15:45

पृथ्वीची उलथापालथ नाय न झालंनीत?
मुंग्यांनी मेरू पर्वत तर नाय नं गिळलानीत्..?
वडवानलान् समुद्रास आग नाय नं लावलंनीत्..?

मग रांडेचे हे पुणे वॉरियर्सचं कमनशिबी कसे....? ;)

धनंजय वैद्य Thu, 30/05/2013 - 15:20

काय रे देवा तु ज्या आशेवर आम्ही इतरांशी हुज्जत घालत होतो ती आशाच तु मिटवून टाकली ! पुणे वॉरियर आता आयपीएल मधुन बाहेर .....! काही मंडळीँचे शिव्याशाप लागले वाटत . मित्रांनो , काय हैदराबादप्रमाणे आपले पुणे पुन्हा नवा लुक घेऊन आयपीएलमध्ये परत येईल ...?

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 02/06/2013 - 04:25

In reply to by धनंजय वैद्य

पुणे आहे तिथेच राहिल बहुतेक. पुणं आहे तिथून उचलून लखनौशेजारी ठेवण्याचं तंत्रज्ञान सध्या कोणाकडे आहे?

बॅटमॅन Sun, 02/06/2013 - 12:06

In reply to by धनंजय वैद्य

छे:! पूर्वीचं पुणं राहिलं नाही.

(निव्वळ पुण्यात राहत असल्यामुळे पुणेकरनामक बिरुदाचा झालेला धनी) बॅटमॅन.