शिव्या आणि लैगिंक शिक्षण
जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तथाकथित अश्लील शिवी ऐकलीत तेव्हा तुम्हाला त्याचा अर्थ माहित होते का? नसणारच पण जेव्हा तुम्ही त्याचा शोध शब्दकोषात शोधलं तेव्हा काय वाटलं?
माझा अनुभव मी आयुष्यात पहिल्यांदा माझ्या मित्राला शिवी दिली (पहिले त्यांनी दिली मी तोच शब्द परतफेड केला). माझ्या तोंडात पहिल्यांदा शिवी ऐकल्याने त्यालाच लाज वाटली माफी मागावी लागली मला. पण मला त्या शिविचा अर्थ माहित नव्हता शिवी भेंचो होती. आता भ पासून सुरु होत असल्याने शब्द काही समजत नव्हता नंतर एका भैयाच्या तोंडातून व्यवस्तीत ऊच्चर एकला आणि आत्मग्लानी ने ग्रस्त झालो. कारण मित्राची बहीणीला मी ओळखत होतो. आणि सवयीप्रमाणे मनचक्षु समोर चित्र उभे झाले होते जे काही केल्या जात नव्हते. त्यानंतर तोंडावर शिव्या दिल्या नाहीत.(मन कोणाला वाचता येत?)
मुलगा जेव्हा स्त्रीच्या लैगिंक अवयवांची पहिल्यांदा शिवी हासडतो तेव्हा तिचा अर्थ काय आणि तो पदार्थ काशासोबत खातात हे हि माहित नसत. आणि जेव्हा त्याला ते समजत तेव्हा तो लैगिक शिक्षण आत्मसात करायला सुरवात करतो.
पुरुषांनी(सभ्य) स्रीयांसमोर(शालीन-कुलिन इ.) शिव्या देऊ नये असा आपल्या समाजात मानक आहे. पण तिचं जर इंग्रजी भाषांतर बोललो तर सभ्य पणाला काहीच गंज लागत नाही उदा fuck आणि झव. असं का?
काही मजेशीर. जेव्हा एक मुलगी मुलाला 'साला' म्हणजे 'हे भल्या माणसा मी तुझ्या बहिणीसोबत शय्यासुख घेते' बोलते तेव्हा हसू अनावर होत व डोळ्यासमोर खट्याळ अमेरिका सदृश्य दोन मुली खट्याळ पणा करतानाचे चित्र उभे राहत, पण भारत खूप मागे आहे अमेरिकेहून!!
ता.क. या लेखाचा कोणताही उद्देश नसून लेखक कोणताही तज्ञ नाही व लेख पुरुष देतात त्या शिव्यांचा संदर्भात आहे. स्त्रिया काय शिव्या देतात यावर प्रतिक्रिया देऊ शकता.
बदकाला पोहायला आणि आणि बापाला...... शिकवू नये.
म०म०व०पणावर औषध निघालेलं नाही.
जेव्हा एक मुलगी मुलाला 'साला' म्हणजे 'हे भल्या माणसा मी तुझ्या बहिणीसोबत शय्यासुख घेते' बोलते तेव्हा हसू अनावर होत
ज्या संस्कृतीत अर्जुन गर्भगळीत होऊ शकतो, तिथे स्त्रिया समलैंगिक असण्याबद्दल किंवा स्त्रियांच्या गोट्या कपाळात जाण्याबद्दल फार आक्षेप घेऊ नयेत.
मुलींनी शिव्या देण्याबद्दल काही पुरुषांना भलतंच नवल वाटतं; याची मला फार गंमत वाटते. पुरुष एखाद्याला भेंचोत किंवा भिकारचोट म्हणतात तेव्हा शब्दशः अर्थ काढतात का काय! आमचा एक मामा होता; त्याची बोलण्याची पद्धतच "काय भेंच्योत मजा आली सांगू तुला!" आता यात भेंच्योत नक्की कोण, मामा, मजा का आणखी कोणी/काही? पण असे प्रश्न विचारायचे नाहीत! पुरुषानं दिलेल्या शिव्या ठीक, पण बायकांनी त्याच शिव्या दिल्या की अस्थानी.
म०म०व०पणावर औषध निघालेलं नाही.
मान्यवर सदस्या अदिती यांस
मान्यवर सदस्या अदिती यांस नम्र संपादकीय विनंती.
ऐसीच्या व्यासपीठावर कृपया सांसदीय भाषा वापरावी. भिकारचोट, भेनचोद वगैरे सभ्य शिव्यांना काहीच हरकत नाही. पण म.म.व. म्हणणं हा कंबरेखालचा वार झाला.
तुमचे सदस्यत्व रद्द करावे की तुमच्यावर दोन आठवड्यांची बंदी घालून ती सतरा दिवस राबवावी यावर सध्या विचार चालू आहे.
-व्यवस्थापक.
किती हो म०म०व० तुम्ही!
शिव्या द्याव्या, भावना व्यक्त कराव्यात आणि मोकळं व्हावं, तर ते नाही! तुम्ही भिक्कारडे म०म०व०पणे कुचमत राहा! कसल्या भेंच्योत नम्र संपादकीय विनंत्या करताय! सरळ 'आमच्यातला भिकारचोट मध्यमवर्गीय मेलेला नाही' हे मान्य केल्यावर बोळा लवकर निघेल.
अरेच्च्या! एकदा सभ्यपणे
अरेच्च्या! एकदा सभ्यपणे वार्निंग देऊनही ऐकेनात? आता याहून काहीतरी गंभीर शिक्षा केली जाईल. तुमच्या खरडवहीतलं लीलाचं चित्र काढून टाकून त्याजागी खास शुचीमामींच्या कलेक्शनातली गोग्गोड चित्रं लावली जातील.
आणि आमचा मध्यमवर्गीय किती लहानपणी, आणि किती निर्घृणपणे मेला किंवा आम्ही आमचे बोळे कुठेकुठे फिरवलेले आहेत याची चर्चा करण्याची ही जागा नव्हे.
आणि हो, तुम्हाला सुर्वातीलाच माननीय, आदरणीय म्हटलं, त्या ममवइतक्याच जहाल शिव्या आहेत हे तुमच्या लक्षातही येऊ नये, अं? हर हर, कुठे जाऊन पडली अदिती आमची!
avaantar shankaa
why does meaning of "saalaa" taken as " i sleep with your sister".
When one calls "saalaa " to another person , it may also mean that former's wife is like a sister to latter's.
Why is it considered that one implies physical relationship with another person's sister?
The implied meaning may be other way round.
Is it considered vulgar to imply siblingship between two people?
असं तुम्हाल खरंच वाटते अच
असं तुम्हाल खरंच वाटते अचरट बाबा. मी रस्त्यावर अनेक लोकांकडुन शिव्या ऐकल्या आहेत जे अगतिक, हतबल वगैरे नव्हते. उलट त्यांच्या गळ्यात अर्धा किलोच्या सोन्याच्या माळा, बुडाखाली इनोव्हा किंवा फॉर्च्युनर, तब्येत एखाद्या वळु सारखी. जे त्यांच्या शिव्या खात होते तेच हतबल वाटले.
--------------
तुम्ही पांढरपेशे, पापभिरु, मध्यमवर्गीय जस्टीफिकेशन देताय का उगाचच..
>>धाग्यावर, शिव्यांच्या
>>धाग्यावर, शिव्यांच्या भेंड्या खेळाव्या का ?>>
आपण ऐसीकर.मला माहित असलेल्या शिव्या,मी वापरलेल्या वगैरे सांगण्याचं प्रयोजन नसणार॥ लॅाजिक,व्युत्पत्ती,ऐतिहासिक दाखले,उपहासात्मक सौम्य सुभाषितं,आर्य/द्रविड कोण आद्य,अभिनव मराठी ललिताने शिव्यांचे वळण कधी ओलांडले अशी चर्चा अपेक्षित असावी. विश्वकोशांत सर्व शिव्या आहेतच.
करेक्ट मी इफ आय अॅम राँग, पण...
तुकोबांच्या/तुकोबाकालीन मराठीत 'रांड' हा शब्द, संदर्भानुसार, 'स्त्री', 'विधवा' किंवा 'वेश्या', यांपैकी कोणत्याही अर्थाने, इंटरचेंजिएबली, वापरला जात नसे काय?
कदाचित There was not much of a distinction between those terms in the society of yore? तज्ज्ञांनी खुलासा करावा.
(तोच न्याय थोडासा ताणून विसाव्या शतकातील मराठीस लावायचा झाल्यास, वर नितिन थत्त्यांनी उद्धृत केलेल्या उदाहरणातील नितिन थत्त्यांच्या आजीने नितिन थत्त्यांच्या वडिलांस 'रांडेचा' म्हणणे हे अगदीच तर्कविसंगत नसावे. होतीच मुळी नितिन थत्त्यांची आजी रांड - 'स्त्री' या अर्थाने - आणि मग तिने स्वत:च्या मुलास 'रांडेचा' म्हणून संबोधलेे - बोले तो, तो येशू कसा, स्वत:स 'सन ऑफ म्यान' म्हणवून घ्यायचा, त्या धर्तीवर, 'सन ऑफ अ वूमन' या अर्थाने - तर तिचे नेमके काय चुकले? त्या व्याख्येने होतेच मुळी ते रांडेचे! फॉर द्याट म्याटर, थत्तेचाचाही आहेत, नि आपण सर्वच आहो. त्यात काय मोठे?)
यातली रांड ही रांड/वेश्या आहे
यातली रांड ही रांड/वेश्या आहे. तिला मुलगा झालेला नको आहे कारण तो भांड ( भडवा, गिह्राइक आणणारा आणि निरुपयोगी) होणार.
विधवेस रंडकी म्हणतात.
राणीस प्रजा घरी ,मागे तिरस्काराने रांड ,{ राजास राण्डेचा} म्हणते. यांच्याकडे चाकरी करून धन मिळते पण त्यांच्या आज्ञा पाळणे नकोसे असते. म्हणून शिवी.हतबलपणा.
धंध्या व्यवसायातली म्हण :- ज्याचे तोंड पाहू नये त्याची xx पाहावी लागते.
पुडिंगाचे पुरावे (मोरेश्वरभटाकडून)...
रांड (p. 407) rāṇḍa f (रंडा S) A widow. Always with contemptuous implication. Pr. रांडेच्या लग्नास छत्तीस विघ्नें. 2 A female slave; a courtesan; any woman of easy virtue: also a woman in general, when used in contempt or anger, or with reference to weakness, unprotectedness, desolation &c. 3 fig. (Good-for-nothingness, like the state of a woman when her husband is dead). Spoiled or greatly damaged state. Ex. यंदा शेतें चांगलीं आलीं होतीं पण आंत पाणी शिरून अवघीं रांड झालीं. 4 A term of reproach for a pusillanimous and abject wretch. रांडेचा Sprung from illicit intercourse. 2 The word is much used as a vulgar expletive or as an interjection of astonishment. रांडेचा or रांडचा मार- लेला Henpecked. रांडेवांचून पाणी पीत नाहीं He cannot drink even a drop of water without some harsh word to his wife. Said of an abusive husband. रांडेहून रांड Said of an imbecile or an exceedingly effeminate man.
रांडअमल (p. 407) rāṇḍamala m Petticoat-government. 2 Any imbecile or inglorious rule.
रांडक (p. 407) rāṇḍaka a C or P (रांड) Widowed. Ex. सडा मफ- लीस व रांडक बायको व भिकारी बैरागी हे निमदस्ती. (Extract from a record.)
रांडका (p. 407) rāṇḍakā m (रांड) A widower.
रांडकाम (p. 407) rāṇḍakāma n Woman's work; housewifery or the domestic business of females. 2 Widow's work; char-work abroad or grass-cutting and stickgathering in the jungle.
रांडकारभार (p. 407) rāṇḍakārabhāra m Female administration of a department or a business: also female proceedings or doings. Hence, revilingly, any poor, silly, or imbecile doings.
रांडकी (p. 407) rāṇḍakī f (रांड) A widow. Used always with implication of contempt or pity.
रांडखांड (p. 407) rāṇḍakhāṇḍa f (रांड by redup.) A word of abuse for a female, implying Widow, whore, wench &c.
रांडगळा (p. 407) rāṇḍagaḷā m (Woman's voice.) A treble or shrill voice: also an effeminate or unmanly voice.
रांडगा (p. 407) rāṇḍagā a R (रांड) Addicted to wenching.
11
रांडगांठ (p. 407) rāṇḍagāṇṭha f A knot of a particular form,--grannam's knot: disting. from पुरुषगांठ Reef-knot.
रांडगाणें (p. 407) rāṇḍagāṇēṃ n रांडगाऱ्हाणें n Terms for whining or unmanly complaining or begging; a widow's dole. v गा, सांग.
रांडचाल (p. 407) rāṇḍacāla f (Widow-manner.) A term for cowardliness, or imbecility, or effeminacy in general.
रांडछंद (p. 407) rāṇḍachanda m Propensity to wenching.
रांडछंदी (p. 407) rāṇḍachandī a Addicted to wenching.
रांडपाटा (p. 407) rāṇḍapāṭā m (रांड & पट Clothes.) Widowhood. v भाग, ये, मिळ, प्राप्त हो, कपाळीं ये.
रांडपोर (p. 407) rāṇḍapōra n (रांड & पोर) A comprehensive term for the inhabitants of a place, including the women and children. Ex. आज कथेस झाडून रांड- पोर आलें होतें 2 A light term for one's wife and children as composing a family. 3 A widow's child, an orphan on the father's side. 4 A bastard or whoreson.
रांडपोर कीं राजपोर (p. 407) rāṇḍapōra kī ṃrājapōra Widow's son or king's son; i. e. whether the one or the other are uncontrolled and undisciplined--both are lawless and reckless.
रांडबाज (p. 407) rāṇḍabāja m ( H) A wencher or a whoremonger.
रांडबाजी (p. 407) rāṇḍabājī f ( H) Wenching or whoring.
रांडभांड (p. 407) rāṇḍabhāṇḍa f (रांड by redup.) A widow revilingly, any wench or hussy.
रांडमस्ती (p. 407) rāṇḍamastī f The plumpness and vigor asserted (by the Hindús) to come to a widow upon the death of her husband. Hence any freshness briskness, or sauciness arising to a person upon the removal of his controller or restrainer.
रांडमाणूस (p. 407) rāṇḍamāṇūsa n (रांड & माणूस) A woman-person, a female. Used with reference to the weakness and inferiority of the female sex. 2 A term of contempt for an imbecile, pluck-lacking, womanhearted man.
रांडमामी (p. 407) rāṇḍamāmī f A term of pity or tenderness for a widow.
..........
आणखी किती पाहिजेत?
..........
'भांड'चा 'भडवा' असा अर्थ मोरेश्वरभटाकडे तरी सापडला नाही. (चूभूद्याघ्या.)
यात तरी तो अर्थ नाही. पण
यात तरी तो अर्थ नाही. पण भांडमधून भडवा हा अर्थ सुचीत होतोय.
महाजन एकमेकास,बोलीभाषेत रांड ही शिवी वापरतात. (कुणीतरी रांडेचा अपमान थांबवा लिहिलच. सर्वात प्रामाणिक रांडच असते अशी एक अध्यात्मिक गोष्टंही आहे.) मग रांडच शिव्या देईल तेव्हा कोणते शब्द वापरेल? - नीच,भाड्या,भडव्या. = अप्रामाणिक.
(सवांतर)
यावरून हॉस्टेलच्या दिवसांत ऐकलेला एक जुना अँग्लो-पंजाबी विनोद आठवला.
एक रांड दुसऱ्या रांडेस बाजारात (रांडबाजारात नव्हे; रेग्युलर बाजारात; भाजी म्हणा किंवा 'बाजार' म्हणा, किंवा रोजवापराच्या इतर कोणत्याही सामानाची खरेदी करावयास दोघीही गेल्या असता) भेटली असता त्यांच्यातील संभाषणास सुरुवात कशी होईल?
(उत्तर: "हो रऽ, की हालचाल है?")
रांड आणि इतर काही शब्द.
झाशीच्या राणीनं १८५७च्या उठावापूर्वी, स्वतःचा उल्लेख रांडमुंड असा केल्याचं वाचनात आलं होतं. त्यात संदर्भानुसार शब्दाचा अर्थ विधवा असा होता.
तरीही, समजा एखाद्या बाईनं किंवा समाजानं असं ठरवलं की सगळ्याच स्त्रियांना रांड म्हणावं आणि हा शब्द अगदी सोवळ्यातल्या नसला तरीही अपमानव्यंजक नसेल. तर काय फरक पडतो! किंबहुना थत्तेंच्या आजीनं (माझ्याही ओळखीच्या आज्या होत्या अशा) स्वतःचा उल्लेख रांड असा करायचा ठरवला, तर त्यावरून आक्षेप घेणारे आपण कोण!
खरं तर शब्दाच्या मूळ अर्थाकडे जायचं तर ज्ञान हा शब्द किती मर्यादित होईल. पण तो शब्द सोवळ्यातला झालेला आहे. मग च्यायला, अपशब्दांनीच काय सालं घोडं मारलंय!
हतबल-
हतबल-
scold या शब्दाचा अर्थ देताना शब्दकोश म्हणतो -blame with angry words;find fault noisily ( e g a weak mother with a wilful child; a bad tempered woman with her daily help)
तसंच शिव्यांचं आहे. चिडलेली असहाय आई हट्टी पोराला वठणीवर आणू शकत नाही; नोकराणीने क्रोकरीतला कप फोडला पण पगार कापू शकत नाही अथवा कामावरून काढू शकत नाही.
शिव्या देणाय्राकडे खरोखरच काही अद्दल घडवण्याची ताकत असेल तर तो/ती तसे करेलच पण तसं नसतं तेव्हा बाराखडीतली काही अक्षरं ~~~~.
अगदी शिव्याही येत नसतील तर कोपय्रावरच्या पानवाल्याला म०म०व० श्रोता बनवतात, बोटांना चटका बसेपर्यंत जळकी सिग्रेट सोडत नाहीत.
शिवी हे मराठी सारस्वताचे
शिवी हे मराठी सारस्वताचे आद्य लेणे आहे. अगदी आठेकशे वर्षांपूर्वीच्या शिलालेखातही (लोकेशन ठाणे)
"अथ तु जो कोणुहु वि ए शासन लोपि तेहा श्री वैद्यनाथ देवाची भाल सकुटुंबी आपडे | तेहाची माय गाढवे झविजे | " वगैरे मजकूर येतो. तेव्हा झकारी शिवी किमान आठेकशे वर्षे जुनी असून ती पवित्र परंपराच आपण जपतो आहोत ह्या जाणिवेने ऊर कसा अगदी भरून येतो.
इंग्रजांच्या काळात शिवी म्हणजे छी थू वगैरे संकल्पनांचा संसर्ग झाला. भटांना याची लागण सर्वांत जास्त झाली आणि एकूणच समाजमानसातल्या कल्चरल एलिट्समध्ये शिवीविरहित जिणे हे आदर्श मानले गेले. पण आपला इतिहास उज्ज्वल आहे. सगळेच जुन्या काळी दाबून श्या देत असत. शिव्या अवश्य द्याव्यात. फक्त देता देता तोंडाची गांड करू नये म्हणजे झाले.
(अंमळ शिवीप्रेमी) बॅटमॅन.
ऑं
>>भटांना याची लागण सर्वांत जास्त झाली.
इंग्रजांच्या जास्त जवळ राहणाऱ्या भटांना (पुण्या मुंबईच्या) झाली असावी.
माझ्या वडिलांना घरी यायला उशीर झाला असता, "हा रां*चा अजून कसा आला नाही?" असं माझ्या चिपळूणला राहणाऱ्या आजीने माझ्या आईला विचारलं होतं.
अर्थात यात ती स्वत:लाच रां* म्हणत होती हे तिच्या गावीही नव्हते.
प्राणी-पक्षी शिव्या देतात हा
प्राणी-पक्षी शिव्या देतात हा अनुभव आहे :)
एखाद्या निवांत बसलेल्या पक्ष्याकडे मुद्दाम टक लावुन पहात रहा. तो अस्वस्थ होतो, उगाचच पिसे रागारागाने साफ वगैरे करु लागतो. तरी टक लावुन पहाणे सोडू नका. थोड्याच वेळात वैतागलेला, कर्कश्य आवाज काढुन उडुन जातो.
शप्पत!!!
कुत्रा
माणसे ह देतात हा अनुभव आहे Smile
एखाद्या निवांत वडा पाव खाणाऱ्या माणसाकडे टक लावून पाहत रहा. अस्वस्थ होतो, उगाचच हात रागारागाने हलवु वगैरे करु लागतो. तरी टक लावुन पहाणे सोडू नका. थोड्याच वेळात वैतागलेला, कर्कश्य आवाज काढुन चालत
शप्पत!!!आवाज काढुन चालत जातो.
शप्पत!!!
जरूर शिकवावं.
म०म०व० लोकांची सर्वसाधारण लैंगिकता, खरं तर जालावर प्रदर्शित होणारं अज्ञान पाहता 'मास्टर्स आणि जॉन्सन'चं मराठी भाषांतर करण्याची तीव्र गरज जाणवते. मराठी आंजावरच, "आमच्या वेळेला लैंगिक शिक्षणाचं फॅड नव्हतं, तरीही आमचं सगळं व्यवस्थित झालंच ना" अशी मुक्ताफळं दिसतात. माझ्या वडलांच्या वयाच्या लोकांशी समलैंगिकतेबद्दल गप्पा मारताना, "'त्या' स्त्रिया नेमकं काय करत असतील?" असे प्रश्न ऐकले आहेत. (त्या पुरुषांच्या बायकांबद्दल मला करुणा दाटून आली. They indeed have missed a lot of fun!)
सारांश असा - वडलांना शिकवता येईल अशा बऱ्याच गोष्टी असतात. पोरं काढली म्हणजे झालं, ही हेटरो-पुरुषप्रधान-लैंगिक अंधश्रद्धा सोडली तर बऱ्याच लोकांना, अगदी पुरुषांनाही, फार जास्त आनंद मिळेल. जुन्या म्हणी अज्ञाननिदर्शकही असू शकतात.
म०म०व०
त्यात सिमोनचं नाव, तुम्ही लिहिलंय तसंच म०म०व० पद्धतीनं लिहिलेलं आहे. बाकी तो अनुवाद चांगला का वाईट या बद्दल बोलण्याएवढं फ्रेंच (आणि एकंदरच भाषाविषय) मला येत नाही(त). 'द सेकंड सेक्स'च्या कोणत्याही इंग्लिश अनुवादाबद्दल या विषयातल्या तज्ज्ञ खुश नाहीत; अशी गॉसिपी माहिती मला आहे.
(अवांतर - 'आफ्टर द सेकंड सेक्स' नावानं सिमोनच्या सहा मुलाखती प्रकाशित झाल्या. जर्मन स्त्रीवाद्यांनी पैसे जमा करण्यासाठी हा उपक्रम चालवला होता. त्या मुलाखती फ्रेंचमध्ये घेतल्या गेल्या; सुरुवातीला जर्मनमध्ये प्रकाशित झाल्या. त्यातून इंग्लिशमध्ये अनुवादित झाल्या. हौसेखातर मी त्यांचे मराठी अनुवाद केले आहेत; ते कुठेही प्रकाशित केलेले नाहीत.)
सर्वात प्रथम खफवर पडलेला
सर्वात प्रथम खफवर पडलेला प्रतिसाद इकडे आणतो
//शरद
गुरुवार, 13/04/2017 - 22:23
बाकी शिव्या ( शेलक्या ) सहज वापरण्यात सुरत आणि दापोली अव्वल आहेत.
वाराणसी की हिंदी : चिडले की आप ने सुरुवकत करतात. नेहमीचं बोलताना शिवीने सुरुवात करतात असे डॅाक्यु मध्ये पाहिले.//
शिव्या देणाय्राची मानसिक शारिरीक कुवत अगोदर लिहिलीच आहे. आणखी
१) शब्दा वाक्यांवर जोर देण्यासाठीही असतात. त्याची तिव्रता कमी अधिक असते.
२) उगाच एक सवय म्हणून
३) स्वत:च्या मोडक्या नशिबालाही दिल्या जातात. उदा० लॅाटरीचं तिकिट वाया गेल्यावर,बस ट्रेन चुकल्यावर.
ममव हा एक वेगळा गट आहे आणि आम्ही त्यातले नाही असं कुणी मराठी म्हणू शकत नाही. मराठी (=घाटी लोक इतरांच्या लेखी मागे बोलले जाते) रा मोठ्या सेटचाच ममव असा एक वेगळा सबसेट करण्याचा प्रयत्न असतो. मराठी घरातले संस्कार म्हणजे भांडायचं त्रागा करायचा,अमक्याने बघा पैसे चारून काम करून घेतलं हो म्हणून वेळ घालवायचा. तर हा पगडा सर्वांवरच आहे. इतरांकडे संस्कार वेगळे असतात. काम बिनबोभाट झालं नाही तर काय करायचं त्याची वाच्यता न करता करून मोकळे होतात. शिव्या बाथरूममध्ये शावरखाली बसून देतात.
शिवी
जसा 'शांभवी'चा मूळ अर्थ 'शंभूची आवडती, अर्थात पार्वती' असा होता, परंतु पुढे श्लेषार्थाने म्हणा किंवा कुत्सितार्थाने म्हणा, '(शंभूची लाडकी, अर्थात) दारू (पाठभेद: भांग)' असा अर्थ तीस प्राप्त झाला, तद्वत, 'शिवी'चा मूळ अर्थ कदाचित काही वेगळा असावा काय, नि आजचा अर्थ तीस नंतर (कदाचित श्लेषार्थाने अथवा कुत्सितार्थाने) प्राप्त झाला असावा काय?
(शिव शिवराळ असावा काय?)
शिव्या देत देत खायचे?
शिवराक पदार्थ हे खाल्ले जात असताना शिव्यांना जन्म देत असतील का? म्हणजे 'हॅट शिंचे काय हे जेवण' आणि मग जेवणाच्या मगदुराच्या प्रमाणात पुढे शिव्या असे काही?
ता.क. - 'शिवराळ'ची उत्पत्ती 'शिवराक'मध्ये आहे हे (खरे आहे असे) समजून गलबलून आले. आतापर्यंत समजत होतो की रवाळ, पाण्याळ, ओढाळ, तुपाळ, खट्याळ, मधाळ तसे आपले शिवराळ.
शिवी आणि ओवी
अनेक लोक, अनेक शब्द , अपशब्द बोलत असतात.
बोलणारा जर बाब्या / बाबी असेल तर, वाट्टेल ते बोलले तरी "बोलायला फार हूषार बर्का " असं कौतुक होईल.
आणि बोलणारा जर कार्टा/ कार्टी असेल तर, " काय मेलं ते बोलणं? जिभेला काही हाडच नाही " असं ऐकायला मिळेल . वर जी लखोली वाहीली जाईल, त्याला मंत्रपुष्पांजली समजावी लागेल ते वेगळच.
(संदर्भ: मराठी म्हण --- " आपला तो बाब्या, लोकाचं ते कार्टे" .)
त्यामूळे काय बोलले .? त्याहूनही कोण बोलले याला फार महत्व आहे.
थोर लोक बोलतात त्यावेळी शब्दं नाही, त्यामागची भावना महत्वाची, असे बजावले जाते.
तस्मात श्री पु ल देशपांडे नी म्हणल्याप्रमाणे -- " काही लोक दूध पित असले तरी ताडी पितायत असे वाटते, तर काहींच्या हातातला ताडीचा पेला देखिल अमृताचा भासतो."
य = यडपट
य = यडपट
मु = मूर्ख
ना = नालायक
बा = बावळट
ई = इरसाल (याबद्दल थोडी शंका आहे, व्हेरिफाय केले पाहिजे.)
आ = आचरट
गा = गाढव
शे = शेंबडा
असे ते कॉम्बिनेशन होते. तू साला यमुनाबाई आगाशे म्हटले की छप्पन्न शिव्यांची पॉवर त्यात असे. भलेही त्या शिव्या प्युअर व्हेज क्यूं ना हो.
हम्म्म्म्म्...
यमुनाबाई ठाऊक होत्या, पण यमुनाबाईंचे आडनाव आगाशे आहे याची कल्पना नव्हती, म्हणून म्हटले की त्याच का दुसऱ्या कोणी, याची खात्री करून घ्यावी.
(शिवाय आमच्या व्हर्जनीत ई हा ओढूनताणून इत्यादीतला होता. असो.)
(बादवे इरसाल ही आमच्या लेखी शिवी नसून गुणवर्णन आहे. तर तेही असो.)
@आबा: अलीकडे पुण्यास कधी येणे झालेच, तरी ४११०३०मध्ये कडमडण्याची वेळ अंमळ कमीच येते. आणि कडमडलोच, तरी हजारातला चुकून एखादा जुना ल्याण्डमार्क तोही क्वचितच ओळखू आल्याने गोंधळायला होते. सबब, ४११०३०चा व्हिसा हा निव्वळ नॉष्टाल्जिया म्हणून बाळगून आहे. रद्द झाला तरी फारसा वांदा नाही. फक्त लक्ष्मीरोडपुरता ट्रान्झिट व्हिसा दिला जष्ट इन केस म्हणून, तरी पुरेसे आहे. असो.
अंशत: कालानुक्रम?
आज जो पुणे ३० म्हणून ओळखला जाणारा भाग आहे, तो कोणे एके काळी पुणे २चाच भाग होता. नंतर कधीतरी (म्हणजे नक्की कधी ते ठाऊक नाही. माझ्या कळत्या वयापासून तो पुणे ३०च अाहे. पिढीजात पुणेकर कदाचित अधिक माहिती पुरवू शकतील.) तो वेगळा काढण्यात आला तेव्हा मधले सगळे आकडे अगोदरच घेतले गेले असावेत.
आता पुणे ३ हे पुणे २ आणि पुणे ४ यांच्या मध्ये का नाही याबद्दल कल्पना नाही.

हायला, भारिच.
हायला, भारिच.
बदकाच्या पप्पाना काहीच शिकवन्यात अर्थ नाही.