मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८१
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००पेक्षा अधिक झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----
कालच ऐकलेल्या जबरदस्त गोष्टी .
माझा एक मित्र आहे . अत्यंत सत्प्रवृत्त . आदरणीय श्री सर्वोच्च नेते व त्यांची मातृसंस्था यांचा प्रामाणिक भक्त.
तो भेटला आणि राजकीय विषय निघाला कि भरपूर तलवारबाजी होते आमच्या दोघात . काल ठरवलं कि आज मध्ये न बोलता याला फुल्ल बोलू द्यायचा . ऐकायचं . या ऐकण्यातून दोन भारी त्याच्या मते सत्य आणि माझ्या मते भयानक अफवा ऐकल्या , त्या अशा ;
१. एका पक्षाच्या पक्षाध्यक्षा या पूर्वायुष्यात "बार डान्सर "होत्या . ( अर्थातच , या व्यवसायाशी असोशिएटेड हींन चारित्र्य वगैरे हे तो ज्या टोन मधे बोलला त्यामध्ये गृहीत असावे ) मी एकदा बार टेंडर, वेटर आणि बार डान्सर यात गल्लत होत नाहीये ना ते विचारले . गल्लत नव्हती . मग पुन्हा खात्री करण्यासाठी बार डान्सर म्हणजे छम छम करता ... वगैरे गाण्यात सोनाली बेंद्रे जे नृत्य करताना दाखवल्या आहेत तोच व्यवसाय का असे स्पष्ट विचारल्यावर होकारार्थी उत्तर आले . ( माझ्या मनात त्यांचे कै . पती , भरत जाधव , संजय नार्वेकर यांच्या पध्धतीने नोटा उडवतानाचे रोचक दृश्य आले . वाईट वाटले . त्यात ते परकीय चलन असणार हे उमजून अजून वाईट वाटले )
हि अफवा अजून कोणी कोणी ऐकली आहे ? ( किंवा हे अतिशय खऱे आहे असेही किती लोकांना वाटत आहे ?)
२. त्या सध्या भारत बाहेर आहेत . त्या उपचार वगैरे हे यावेळी कारण नसून , सध्या भारताचे खूप चांगले चालले आहे ,ते डिस्टरब करण्याची सुपारी कोणा मोठ्या डॉन ला द्यायला गेल्या आहेत ( हि डॉन मंडळी फोन वरून पण पण सुपारी घेतात असे ऐकले होते . हि सुपारी नसून या बडी बेगम साहिब कुठल्यातरी अफजलखान डॉन ला सुपारी नव्हे तर विडा द्यायला गेल्या असाव्यात . शिवाय एवढे मोठे काम , फोन वरून होणार नसेल म्हणूनही गेल्या असतील , कुणास ठाऊक )
चेष्टा जाऊ द्या , पण या अफवा ( किंवा सत्य गोष्टी , आपापल्या चवी/ निष्ठेनुसार ) अजून कोणी ऐकल्या आहेत ?
पॉल एर्डोस नावाच्या एका ह
पॉल एर्डोस नावाच्या एका हंगेरियन गणितज्ञाबद्दल वाचत होतो. विक्षिप्तशिरोमणी माणूस होता. त्याच्या विकीपानावरून:
Erdős signed his name "Paul Erdos P.G.O.M." When he became 60, he added "L.D.", at 65 "A.D.", at 70 "L.D." and at 75 "C.D."
P.G.O.M. represented "Poor Great Old Man"
The first L.D. represented "Living Dead"
A.D. represented "Archaeological Discovery"
The second L.D. represented "Legally Dead"
C.D. represented "Counts Dead"
लोल!
... शांतता ...
ऐसीवर सध्या फार शांतता आहे असे वाटते . प्रतिभावंत , विचारवंत ,अभ्यासू , मनस्वी , विविध विषयांचे माहितगार असे अनेक ऐसीकर गप्प आहेत . काहीजण आंतरजालावर इतर ठिकाणी उत्तम पोस्ट टाकत आहेत पण इकडे मात्र फक्त खरडफळ्यावर आहेत . या उदासीनतेचे कारण काय आहे या बद्दल कुतुहूल आहे . बऱ्याच मंडळींचा कार्यमग्न/ग्रस्त आहे असे म्हणणे आहे . पण सर्वच मंडळी एकदम कार्यग्रस्त होण्याचे कारण काय हेही काळात नाही .
काही उदाहरणे :
आदूबाळासारखे उत्तम ललित लिहिणारे आणि काही विशिष्ट विषयात उत्तम माहिती मांडणारे गप्प आहेत . ( मान्य आहे जलपर्णी डेली कॉलम सारखी लिहिता येत नाही , तरीपण ...)
ऋषिकेश फेसबुकवर उत्तम माहितीपूर्ण आणि विचारप्रवर्तक लिखाण करत आहे . पण त्यांचे असे म्हणणे आहे कि के परत इथे टाईप करणे त्रासदायक आहे ( कॉपी , पेस्ट होऊ शकत नाही का ?)
मनस्वी लिहिणारा मनोबा गप्प आहे . तो म्हणेल कि लै काम आहे हो ... पण अधून मधून सुद्धा वेळ नाही ?
अत्यंत वाचकप्रिय ललित लिखाण करणारे ( आणि का माहित नाही पण इतर काही लिहिले कि भरपूर विरोध झेलणारे ) अरुण जोशी मधूनच उगवतात .. पण सामान्यतः अनुपस्थित आहेत .
कोल्हटकर आजोबांचे लिखाण सर्वाना आवडत असावे पण तेही सध्या शांत आहेत .
अनुप ढेरे आणि अभ्या गायकवाडांबाबतीत मिपा वर छान रंग भरताहेत , पण इथे मात्र मौनात आहेत .
जंतू सध्या फार बिझी आहेत म्हणतात , पण बऱ्याच महिन्यात काही लिहिलेले नाही त्यांनी .
बॅटमॅन ला लिहायला लोकसत्ताचे मोठे आभाळ मिळाले आहे . अतिशय छान .... पण इथे पण लिहा कि राव .
घासकडवी आणि मुक्तसुनीत हे तर हल्ली अनुपस्थितीकरिताच प्रसिद्ध असावेत .
बरेच विरोधी प्रतिसाद कमावणाऱ्या अनुताई हि गप्प ??? ये क्या हो रहा है
अजून किती किती जणांची नावे लिहू ? ...
एक लक्षात ठेवा फक्त खरडफळ्यावर शुचि मामी , अच्चू काका आणि अदिती किती लढवणार किल्ला ?
ऐसीवर कसदार, नवीन , विविध विषयांवर वाचण्या करीत उत्सुक A .N . Bapat
ऐसीची तांत्रिक अडचण हे
ऐसीची तांत्रिक अडचण हे कारण असावे. यात ऐसी व्यवस्थापनाला दोष द्यायचा हेतू नाही. छ, ष्ह, दीर्घ उकार ईकार, क्ष हे लोकांना फारच त्रासाचे वाटत असावेत. मला दीर्घ उकार इकारासाठी क्यापिटल यू आणि आय ची सवय होती म्हणून वाचलो. ज्यांना डबल इ आणि डबल यू ची सवय (झाली) होती ते मेले.
अग्ग्ग्ग्गदी!!
माझ्या तीनचार कविता टाकायच्या होत्या केव्हापासून. हे च, छ, ई, ऊ आदी अक्षरांचे झोल आहेत म्हणून सध्या विश्रांती. मोबाईलवर ऐसी क्रोम मध्ये फार दिव्य दिसतंय. डेस्कटॉपवर असतो तेव्हा भांडायचं नसेल तर टंकायला फार कंटाळा येतो. बाकी स्वाक्षरी आहेच बदललेली.
पर्याय
तांत्रिक अडचण हे न लिहिण्याचं कारण असेल तर त्यावर अनेक उपाय आहेत असं मला वाटतं. तुमच्या सोयीचा उपाय निवडू शकता.
- संगणकावरून टंकताना बहुतांश लोक विंडोज वापरतात असं मी गृहित धरतो. गूगल इनपुट मेथड तुम्ही विंडोजवर डाउनलोड करून वापरू शकता (download link). किंबहुना आजकाल फेसबुकवर देवनागरीतून लिहिणारे बहुतांश लोक गूगल इनपुट मेथड वापरतात असं मला सांगण्यात आलं आहे. (ही सांगोवांगी आहे कारण मी विंडोज वापरत नाही.)
-
मोबाईलवरून किंवा टॅबलेटवरून टंकण्यासाठीही आता अॅपल आणि अॅन्ड्रॉइड दोन्हींवरून देवनागरी टंकनाच्या विविध पद्धती उपलब्ध आहेत. मी स्वत: अॅपलचा मराठी कीबोर्ड अनेक वर्षांपासून वापरतो. अॅन्ड्रॉइडवर तर मराठी हस्ताक्षर ओळखणारा कळफलकही मिळतो. तिथे उपलब्ध असणारे पर्याय -
- मराठी जीबोर्ड - ह्यात वर्णमालेतले स्वर आणि व्यंजनं देवनागरीत दिसतात.
- गूगल इंडिक कीबोर्ड (मराठी आणि इंग्रजी) - ह्यातला एक पर्याय मराठी जीबोर्डसारखा आहे आणि दुसरा ट्रान्सलिटरेशनसारखा चालतो. म्हणजे कळफलकावर रोमन अक्षरं दिसतात. तुम्ही मराठी शब्दांचं तुमच्या मते इंग्रजीत जे स्पेलिंग होईल ते टंकता. गूगल तुम्हाला (बहुतांश वेळा) योग्य मराठी पर्याय देतो. शिवाय, मराठी/इंग्रजी टंकणं खूप सोपं होतं. हा सध्या सर्वात लोकप्रिय पर्याय आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे.
- Google Handwriting Input (Marathi) - हा चक्क तुमचं हस्ताक्षर ओळखून तुम्हाला मराठी टंकू देतो!
मंडळ दिलगीर आहे. "लय
मंडळ दिलगीर आहे. "लय बिज्जी आहे" किंवा "xx खाजवायला वेळ नाही" असं सहसा होत नाही, पण हा मार्च-एप्रिल महिना त्याला अपवाद ठरला/तो आहे.
ऐसीवरच्याच एका सदस्येच्या विनंतीवरून एक दीर्घ लेख लिहायचा आहे, त्याच खटपटीत सध्या आहे. त्यानंतर दोन कथा डोक्यात पिकून तय्यार आहेत. एकदोन ललितेतर पालथे धंदेही करायचे आहेत.
वुडहाऊस गोल्फकथांत म्हणतो तसं "a youth misspent in the pursuit of commerce" ही स्थिती सरली की परत लिहिता होईन.
च्यायला , अवघड आहे . कारण हे
च्यायला , अवघड आहे . कारण हे दिवसा ऐसी वर बॅटमॅन असतात . रात्री , घरी , आणि लोकसत्तात काय नाव घेतात हे शोधायला पाहिजे...
असं करा , कुठली तरी एक बंगाली पहिलं नाव घ्या . सतार bitaar वाजवणाऱ्याचा असलं तर बरं . त्याच्या पुढे कर्नाटकातलं प्रत्येक गाव घेऊन त्यापुढे "कर " लावून आडनावे तयार करा उदा : बेळगावकर , हुबळीकर , देवेनहळ्ळीकर , इंगळहळ्ळीकर आणि या विविध परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स मध्ये पूर्ण नाव सापडेल . ( टीप : आडनावाकरिता जनार्धन रेड्डी के हसीन कारनामे नावाचा विडिओ मिळतो का बघा )
मुटके साहेब , हा तुमच्यावर सूड नसून , खोटी नावे घेऊन ऐसीवर आणि खरी नावे घेऊन उर्वरित जगात वावरणाऱ्यांच्या वरचा सूड आहे . ( तुम्हाला खऱ्या नावाचा व्यनी करतो )
पुढचा गृहपाठ : चिंतातुर जंतू चे खरे नाव शोधणे .
बॅटमॅन : हळू घ्या ...
हिंदीत दोन माहीत आहेत
>>बाबरी प्रकरणावर एखादी कादंबरी आहे का?<<
- कितने पाकिस्तान - कमलेश्वर (अधिक माहिती)
- आखरी कलाम - दूधनाथ सिंह (अधिक माहिती)
RDBMS theory बद्धल मदत हवी आहे
RDBMS theory बद्धल मदत हवी आहे. विशेषतः नॉर्मलायझेशन फॉर्म्स आणि डेटा डिपेंडंसीज समजून घ्यायचे आहेत. विकी, StackOverFlow आणि इतर साइटींवर वाचून झालेय पण पुरते समजले नाही. विशेषतः 3NF, BCNF फारसे काही कळले नाही.
कुणी इथे लेख लिहिला तर बरे होईल. मला फोनवर समजावून सांगितले तर फारच उपकार होतील. तज्ज्ञ मिपा करांनी मला व्यनी करावा ही विनंती.
पाणलोट विकास
पाणी फाउंडेशन नावाची संस्था पाणलोट विकासाविषयीची माहिती देणाऱ्या विविध फिल्म्स तयार करते. त्यांचे दुवे खाली दिले आहेत. ह्या फिल्म्स बघून तुमच्या प्रतिक्रिया इथे कळवू शकता.
आपले पाणलोट मित्र – चतुरराव आणि चतुराताई
https://youtu.be/bjp-8fQ7wF0
घरच्या घरी हायड्रोमार्कर कसा बनवतात
https://youtu.be/CwIBmXXDGSo
हायड्रोमार्करच्या सहाय्याने जमिनीचा उतार मोजणे
https://youtu.be/KG-OKLTrYUQ
हायड्रोमार्करच्या सहाय्याने कंटूर रेषा आखणे
https://youtu.be/-f06540jllE
सी.सी.टी. कसे बनवतात
https://youtu.be/ir7HwZK_7Qg
डीप सी.सी.टी. कसे बनवतात
https://youtu.be/3u3iuxbNpCI
एल. बी. एस. कसा बनवतात
https://youtu.be/IEyAzDFO_5g
शोष खड्डा कसा बनवतात
https://youtu.be/bz53sZ810kA
माती परीक्षण
https://youtu.be/eNkXwUIdbzA
आगपेटीमुक्त शिवार
https://youtu.be/DhI9xTN6jk4
पाणलोट रचनांच्या पुनरुज्जीवनाने होणारे चमत्कार
https://youtu.be/0Ujdw-EJ8b4
जागरूक गावकरी, बंधाऱ्याचं काम झालं, ‘लय भारी’
https://youtu.be/wq2N0o9YlQw
वॉटर बजेट
https://youtu.be/-VqNI1TV6n8
अजिंक्यतारा
https://youtu.be/SSwzbjedino
दुष्काळाशी दोन हात
https://youtu.be/GIQsqqbeaVE
वेळू – मारली बाजी
https://youtu.be/kg9E0JiabZM
एका मराठी संस्थळाने मालकाचे काल्पनिक उदाहरण एका
प्रतिसादात मुद्दा पटवून देण्यासाठी दील्याने
कुठलीही सूचना कल्पना न देतां बाजु न मांडु देतां माझ्या आय डी ला डायरेक्ट बॅन करण्यात आलेले आहे.
याची अर्थातच कुठलीही खंत नाही
पण जनतेला माहिती हवी म्हणून रेकाॅ्र्ड वर नोंद करुन ठेवतोय
आय डी सांभाळ हे जीवनाचे ध्येय असल्यास मालकांच्या नादी लागू नवे.
टीम बर्नर्स ली चे ऋण
टीम बर्नर्स ली ला आज ट्युरिंग पुरस्कार मिळाला . या www डेव्हलप करून पेटंट न करणाऱ्या थोर माणसाचे आभार .
समजा त्याने हे पेटंट केले असते तर ....
इथे टीम बर्नर्स ली चे ऋणी कोणी आहेत का ?
( माझ्या व्यावसायिक क्षेत्रात हि असे एक थोर शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी एक तंत्रज्ञान विकसित करून "ज्याला हवे त्याने फुकट वापरावे , व जगातील प्रदूषण दूर करावे " अशी घोषणा केली . मी त्यांचा ऋणी आहे , जागतिक पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवर ... कारण हेच तंत्रज्ञान वापरून मी माझे पोट भरतो . )
Wiredमधून
Berners-Lee is working to make this a reality through an open source project called Solid. He hopes to create an open technology standard that different applications can use to share data, regardless of what that data is or what type of application needs to read it. Such a standard would enable applications—your hospital’s record-keeping software or a social network—to read and write data from the servers you choose and control, rather than the servers that belong to an individual company.
धन्यवाद जंतू . हे जे तुम्ही
धन्यवाद जंतू . हे जे तुम्ही काही लिहिले आहे त्या लिंकेत.. ते जर होऊ शकले तर त्याचा ( दूरगामी ? ) परिणाम काय होऊ शकेल यावर काही लिहाल का ? ( आमच्या सारख्या टेक्नो मंद सर्व सामान्य फडतूस लोकांना काही कळत नाही यातील म्हणून हि विनंती )
आणि "इथे टीम बर्नर्स ली चे ऋणी कोणी आहेत का ?"या प्रश्नाचे वैयक्तिक उत्तर देऊ इच्छिता का ?
इथे नाही ... पण ओव्हर ऑल मंडळी गेटाचे ( कधी कधी ) आणि जॉबाचे ( भरपूर वेळा ) आणि झुकेरबर्गाचे जय जय कार करताना दिसतात . नक्की कळत नाही कि समजा www सध्याच्या फॉर्म मध्ये नसतंच किंवा ... ?? तर पुढच्या या .. लोकांना त्यांनी जे काही केलं ते करता आलं ते एवढ्या सहजतेने करता आलं असतं का ? त्या मानाने सर ली फार दुर्लक्षित राहिले आहेत का ? आपण वैचारिक आणि तांत्रिक प्रकाश टाकू शकाल या वर ?
थोडक्यात
>>ते जर होऊ शकले तर त्याचा ( दूरगामी ? ) परिणाम काय होऊ शकेल यावर काही लिहाल का ?<<
सध्याच्या परिस्थितीत हे होऊ शकेल असं दूरान्वयानंदेखील वाटत नाही. कारण लोक वॉल्ड गार्डन्स पसंत करताहेत आणि आपला डेटा कोण वापरतंय ह्याची त्यांना विशेष पर्वा दिसत नाही.
>>"इथे टीम बर्नर्स ली चे ऋणी कोणी आहेत का ?"या प्रश्नाचे वैयक्तिक उत्तर देऊ इच्छिता का ?<<
मी इंटरनेट सर्वप्रथम वापरलं ते बहुधा १९९३साली. त्याचे आणि विशेषत: त्याच्या खुलेपणाचे आणि खुल्या प्रमाणीकरणाचे अनेक फायदे उपभोगले असल्यामुळे मी ओपन सोर्स आणि ओपन स्टॅन्डर्ड्सचा पूर्णवेळ चाहता आहे.
आणखी एक : मी वर दिलेल्या मुलाखतीत विकीपीडियाचा उल्लेख आहेच, शिवाय, ऐसी किंवा तत्सम मराठी संस्थळं ओपन सोर्स आणि ओपन स्टॅन्डर्ड्सशिवाय अस्तित्वातच येऊ शकली नसती. त्यामुळे इथे कुणी त्यांचा ऋणी नसेल, तर त्यानं चपला घालाव्यात आणि... ;-)
>>त्या मानाने सर ली फार दुर्लक्षित राहिले आहेत का ?<<
अर्थात हो, कारण त्यांनी पायाभूत काम केलं आणि (ज्यांच्या नावाचं पारितोषिक त्यांना मिळालं त्या अॅलन ट्यूरिंगप्रमाणेच) पायाभूत कामं सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीनं ग्लॅमरस नसतात.
जन्मतारीख vs कन्सेप्शनची तारीख?
जन्मतारीख बोले तो प्रत्यक्ष प्रॉडक्शनला सुरुवात झाली ती असावी काय? अन्यथा कन्सेप्शनची तारीख (बोले तो मारुति मोटर्स या एंटिटीची कन्सेप्ट निर्माण होण्याची तारीख) बहुधा खूपच आधीची असावी.
(बहुधा आणीबाणीपूर्व? संजय गांधींचे उद्योग! मारुति मोटर्स काढण्याच्या नावाखाली बऱ्याच जणांकडून पैसे गोळा करून बऱ्याच जणांना चुना लावला होता, नि प्रत्यक्षात काढली नाहीन नि काही नाही, त्यावरून आणीबाण्योत्तर काळात बराच धुरळा उडाला होता, असे अंधुकसे आठवते - लहान होतो तेव्हा! मग पुढे बहुधा बाईंच्या दुसऱ्या लीज ऑफ लाइफमध्ये मारुति मोटर्सची संकल्पना पुन्हा रीसरेक्ट करून प्रत्यक्षात आणली गेली होती वाटते. चूभूद्याघ्या.)
चल तिरकसपणा आणि जेलसी
चल तिरकसपणा आणि जेलसी टाळायचा प्रयत्न करुन नीट मांडते - तू+गब्बर्+बॅट्या+मनोबा अशी गॅंग कतही नॉय चॉलबे.
मला पण घ्या मग भले फॅब-फोर नको
फॅन्टॅब्युलस्-फाइव्ह करा ;) =))
____
मी धनु-३ ग्रहं पडले बाई, मला लपवाछपवी जमत नॉय :) जो है वोह सामने एकदम ट्रान्स्परन्ट्. मग आमचे राग-लोभ्-द्वेष्-हेवा-प्रेमही तस्सच्. तेव्हा मला घ्या नाही तर नाकी नऊ .... =)) हाहाहा
पटलं तर पाहा नाही तर चपला...
>>मारुति चे नाव कोण टाळणार दुसरे.<<
अनु राव मोड ऑन - एकाची बायको दुसऱ्याने पळवली म्हणून स्वत: ब्रह्मचारी असूनही आपल्या शेपटाला आग लावून घेऊन जाऊन लंका जाळण्याइतके स्वामिभक्त / ***** (पटला नसेल तर आपल्याला हवा तो शब्द भरून घ्या) नाहीत ब्वॉ कुणी इथे. अनु राव मोड ऑफ
एनर्जी एफिशिअंट ?
नुकताच वैकुंठ स्मशानभूमीत जायचा प्रसंग आला. प्रेत आंत ढकलण्याच्या आधी, क्षणभर आंतल्या भट्टीचे दर्शन झाले. त्या प्रचंड ज्वाळा आणि एकच प्रेत, याचे प्रमाण फारच व्यस्त वाटले. एवढ्या आगीत तर तीन्-चार प्रेते, एकाच वेळेस जळली असती. अशा प्रकारे, ही विद्युतदाहिनी चालवली तर, प्रति प्रेत किती खर्च येत असावा, मनपाला? काही अंदाज ? हा खर्च कोणाकडून वसूल करतात ? ह्याबाबत कोणी टेक्निकल माहिती देऊ शकेल का ?
अश्या टाइपचे ऑइल फायर्ड
अश्या टाइपचे ऑइल फायर्ड इन्सिनिरेटर खुप पुर्वी डीझाइन केले आहेत्.
डोळ्यात भरावा असा काही खर्च येत नाही. काळजी नसावी.
एका प्रेताला २-२.५ किलो ऑइल पुरते. अजुन थोडे ऑइल भट्टी गरम करण्यात आणि ठेवण्यात वाया जाते. आता ह्यावरुन अंदाज बांधा खर्चाचा.
वैकुंठातली दाहिनी विजेची आहे
वैकुंठातली दाहिनी विजेची आहे. ठाणे मनपामध्ये डिझेल (एल डी ओ) वापरणारी दाहिनी आहे.
विजेच्या दाहिनीचे डिझाईन कन्व्हेक्टिव न ठेवता मायक्रोवेव्ह टाइपचे ठेवल्यास खर्च कमी होईल.
------------------------------------------
विद्युत दाहिनीपेक्षा डिझेल दाहिनी अधिक बरी असावी कारण विद्युतदाहिनीत लाकडे जळत नसल्याने मांस जळण्याचा वास येतो तो वास डिझेल दाहिनीत जळणाऱ्या डिझेलच्या वासात झाकला जात असेल अशी शक्यता आहे.
त्याचे एक कारण असे असेल की,
त्याचे एक कारण असे असेल की, बाजुलाच् म्हणे चीता लाऊन पण जाळायची सोय आहे.
दुसरे कारण मानसिक असु शकते. मेंदु ला वास इमॅजिन करता येतात प्रत्यक्षात नसले तरी.
मुळात ती भट्टी बंद असते, फक्त आत टाकण्या साठी ती उघडली जाते. एग्झॉस्ट फॅन नी हवा चिमणीतुन वर दुर फेकली जाते.
फक्त वैकुंठ च नाही पण
फक्त वैकुंठ च नाही पण त्याच्या बाजूला असणाऱ्या सोसायट्यांमधील लोकांना या वासाची सवय होऊन गेलीय . वैकुंठ मध्ये विद्युत दाहिनी बरोबरच एक दुसरे इंधन वापरणारी दाहिनी पण आहे . ( गॅस का डिझेल ते आठवत नाही ) पण त्यात दहनाला जास्त वेळ लागतो विद्युत दाहिनी पेक्षा.
साधी केमिस्ट्री आहे ही. बरेच
साधी केमिस्ट्री आहे ही. बरेच पदार्थ ९०० तापमानास पेट घेतातच. पेट घेतल्यावर अतिजलद ओक्सिजन पुरवला तर CO2, H2O,NITROGEN ची ओक्साइड्स होतील त्याला वास येणार नाही. सायनच्या विद्यतदाहिनीत इलेक्ट्रिक हीटर आणि ओक्सिजन सिलिंडर ठेवलेत. चालवणारा इले० एंजिनिअर ठेवलाय.
. याला पर्याय म्हणून तेल/डिझल आणि फक्त हवेचा ब्लोअर ठेवला तर काय काळजी घ्यावी लागेल याचा विचार करा. अर्धवट जळलेले प्रणिज पदार्थ आणि डिझलचा काळा धूर ,वासही येईल
एक साने गुरुजी असतो, एक
एक साने गुरुजी असतो, एक मुक्तपीठावाला लेखक असतो, एक अस्तिक असतो, एक दवंणे असतो, एक असाच कोणी व्हल्नरेबल असतो, एक या सर्वांना टवाळीसाठी वापरणारा असतो, आणि एक या टवाळाला आरसा दाखवणारा असतो. जालावर मी आरसे घेऊन टवाळांच्या मागे लागलेला असतो.
जंतु , कुठून हे रत्न शोधलंत ?
जंतु , कुठून हे रत्न शोधलंत ? वा , छान !!! अजून असंबद्ध ऐकायचं आहे का ? तर इंदुरीकर महाराजांची प्रवचने एका .( cd मिळतात अत्यंत लोकप्रिय आहेत . धमाल असतात . गाडीने लांबचा प्रवास असला की मी चालकाकडे फर्माईश करतो ( शक्यतो चालकांकडे या cd असतात . ) वेळ कसा जातो कळत नाही .
कुणाला कशाचं
अलीकडे (हा शब्द आजकाल या शब्दामुळे औटडेटेड झालाय 'आजकाल') लग्नव्यवस्था वगैरे भानगडींवर चर्चा करताना हमखास हे किंवा अशासारखे वाक्य फेकले जाते:
"आजकालच्या सुना सासूसासऱ्यांना डस्टबिन समजतात / घरात किती डस्टबिन आहेत हे विचारतात" वगैरे.
कैक परिचितांकडून हे ऐकले आहे. यामागील बाकीची सर्व ब्याकग्रौंड क्षणभर चुलीत घालून त्या डस्टबिन नामक शब्दप्रयोगाचे मूळ काय असावे याबद्दल कुठे विदा मिळेल काय? म्हणजे हा शब्दप्रयोग अन हे वाक्य जणू त्यातली स्थिती आपण सरसकट रोज आसपास पाहत असल्याच्या थाटात नक्की कधीपासून फेकल्या जाणे सुरू झाले? कारण परिचितांची लग्ने जुळणे अन नव्या जमान्याला शिव्या तर खूप अगोदरपासून पाहतोय पण हा शब्दप्रयोग कै अगोदर कधी ऐकण्यात आला नाही.
माझे वैयक्तिक मत असे की कधीतरी कुठल्यातरी मुक्तपीठवाल्या लेखात हे डिस्कशन प्रथम आलं (बहुधा २०१० च्या आसपास?) आणि समस्त नवाजमानापीडित म्हाताऱ्यांनी ते एकदम उचलून धरलं. हे खरे आहे की त्याचे मूळ वेगळेच आहे?
हात टेकले
सत्य या विषयावरती जसे हात टेकावे लागतात, तसे किंबहुना त्याहुनही जास्त evil या संकल्पनेपुढे अधिकच शरणागती पत्करावी लागते. सत्य, चांगुलपण आदि धवलकीर्ती संकल्पना निदान हृदयाशी कवटाळता येतात (embrace चे भाषांतर्) पण evil चे काय्?
.
कोणि म्हणतात जगात दुष्ट नसेल तर सुष्ट कसे कळेल्?
.
कोणी वाद घालतात सुष्ट्- दुष्ट हे विश्वाचे संतुलन ठेवणारे २ आवश्यक पैलू आहेत्
.
काहीजण म्हणतात की निसर्ग निर्दयी आहे आणि त्या निर्दयीपणाचे प्रतिबिंब 'दुष्ट' या संकल्पनेत दिसुन येते - याचा अर्थ मी असा घेते की हिटलरने केलेल ज्युंवरील अनन्वित अत्याचार, ९-११ चा निर्बुद्ध संहार हे आजारी मनाचे द्योतक आहे आणि निसर्ग आहे. जसे शरीर आजारी पडते तसे मनही आजारी पडू शकते.
.
ज्या क्षणी सुष्ट संकल्पना आपण उरी धरतो त्या क्षणी वाईटाची आठवण येऊन शॉर्ट सर्किट होते असा अनुभव आहे. That's sooooooooooo annoying.
.
जंग यांच्या मते जो व्यक्तिमत्व जितकं स्वीकारण्याने बनते तितका विरुद्ध गुणधर्म नाकारला जाऊन "शॅडो" व्यक्तीमत्व बनते.
.
कबीर जे म्हणतात - "दुइ पाटन के बीच में साबित बचा ना कोय" हे बहुतेक या द्वंद्वाबद्दलच असावे.
.
बरे काही दुष्ट ही युनिव्हएर्सल म्हणावीत तर तसेही होताना दिसत नाही. जर हिंसा हे युनिव्हर्सल दुष्ट मान्य केले तर जगातून युद्ध नाहीसे होइल्. पण क्वचित निसर्गामधे होणारी माईंडलेस (निर्बुद्ध्) हिंसा कशी जस्टीफाय करता येईल उदाहरणार्थ जिथे अन्य प्राणी फक्त क्षुधाशमनार्थ प्राणी मारुन खातात तिथे वाघ हा निव्वळ खेळ म्हणून प्राणी मारतो- हे अर्थात ऐकुन आहे. मांजर उंदरास खेळवते असे ऐकलेल आहे, कबुतर अर्धवट मारुन खेळवते हे पाहीलेले आहे. पण अर्थात जे पाहीले त्यात मांजरीने ते अर्धवट मारलेले कबुतर अगदी आडोशाला तिच्या पिलांना ट्रेनिंग म्हणुन देऊ केलेले पाहीलेले आहे तेव्हा अगदीच निर्बुद्ध संहार नव्हता.
.
I don't exactly remember & hence cannot confirm पण युद्धे नसतिल तर जगाची लोकसंख्या बेसुमार वाढुन युद्धात मेले नाहीत तितके लोक उपासमारीने मरतील असा एक प्रवाद ऐकुन आहे. (somewhere I have gathered that impression. )
____
यातील प्रत्येक मुद्दा उत्तम रितीने मांडता येऊ शकतो हे मान्य आहे.
सुख दुखतं हे बहुतेक यालाच
सुख दुखतं हे बहुतेक यालाच म्हणतात्-
आजकाल हाटीलात जाऊन तूपाळ, स्निग्ध, मठ्ठ चेहऱ्यानी पदार्थ ओरपायचा कंटाळा आला आहे. ना काही अन्नदान (जसे पोळी भाजी भिकाऱ्याला देणे. एवढेच बाकी ऐपत नाही), ना काही अन्य दान, ना देऊळ, ना दुसऱ्याला मदत केल्याचे समाधान्. जो तो साला सुखात, ऐश्वर्यात, माजलेला ..... तेजायला या तूपाळ, स्निग्ध चेहऱ्याच्या गर्दीचा कंटाळा येतो कधीकधी.
इंडियन एक्स्प्रेस वाचून असं
इंडियन एक्स्प्रेस वाचून असं वाटतं, भारतात एकच ग्रेटम ग्रेट कॉलेज हाये, 'जे एन यू'. आठवड्यातून निदान ४ तरी लेख पाडलेले असतात 'जे एन यू' कसं भारी आहे, तिथले विद्यार्थी कशे आंदोलनं करत असतात, तिथले शिक्षक विद्यार्थी कशे क्रिटिकल थिंकिंग करणारे आहेत आणि शेवटी सरकार कसं या कॉलेजला हळू हळू मारून टाकतंय. नाही, सरकारी निर्णयांवर टिका टिपण्णी असावी की पण जे एन यू महात्म्य काय लावलंय. पुणे विद्यापिठ किंवा शिवाजी विद्यापिठ हे काय् विद्यार्थ्यांसाठी युटोपिया नाहीयेत, एक से बढकर एक घाणेरडे निर्णय लादून विद्यार्थ्यांवर सतत अन्याय इथेही होत असतो. अक्षरश: भ्रष्टाचाराची आगरे झालीयेत, एजंटला पैसे देऊन प्रत्येक विषय काढता येतो. रेट कार्ड्स आहेत यांची. पण ह्या विद्यापीठांच्या समस्या कधी संपादकिय पानातल्या लेखात आलेलं वाचलं नाही.
it is worthy to recall that
अॅक्च्युअली जेएनयु बद्दल इंडियन एक्सप्रेस पेक्षा जास्त पुरोगाम्यांना जास्त पडलेलं असतं. Harsh Mander यांनी लिहिलेला हा लेख हे उत्तम उदाहरण आहे. डिप्राईव्ह्ड बॅकग्राऊंड्स असलेल्या विद्यार्थ्यांना म्हणे संधी दिली. म्हंजे नेमकं काय ? तर ज्यांची बॅकग्राऊंड्स डिप्राईव्ह्ड नव्हती त्यांच्याकडून पैसा ओरबाडून या फडतूस (डिप्राईव्ह्ड) बॅकग्राऊंड्स असलेल्यांच्या डोंबलावर ओतला आणि वर स्वत्:च्चीच पाठ थोपटून घेतली .... की बघा ओ बघा आम्ही किती उच्च काम करीत आहोत्.
खालील प्यारा तर हाईट आहे -
But in his last Facebook post before his suicide, JNU’s Dalit student, Muthukrishnan, wrote, “When Equality is denied everything is denied”. Recent years have seen the massive expansion, and the equally massive privatisation of higher education in India. It is estimated that between half and two-thirds of all students in India today could be of the first generation to ever enter higher education. JNU is among the few public institutions that have actively welcomed such students, undertaking an inestimable public duty.
समानता हा तर पुरोगाम्यांचा सर्वात् आवडता प्वाईंट्. पण आत्महत्या करणाऱ्या त्या चक्रम मुलाने स्वत्:ला हा प्रश्न विचारला का की त्याच्या आईवडीलांनी तरी किमान त्यांच्या मासिक आवकेतील समान रक्कम त्याच्यावर खर्च केली का ? जेएनयु सारख्या पब्लिक इन्स्टिट्युशन मधे जाण्यापूर्वी विद्यार्थी हा एका महत्वाच्या इन्स्टिट्युशन मधे जातो. ती म्हंजे कुटुंब्. सरकार असा कायदा का करीत नाहि की प्रत्येक पालकांनी मासिक आवकेतील रक्कम कुटुंबातील सर्व व्यक्तीमधे समान विभागणी करून् खर्च करावी ?? व पालक जर हे करीत नसतील तर घरात तरी त्याला समानता मिळते असे म्हणता येईल का ? व जर घरात समानता मिळत नसेल तर त्याला "सर्व काही" डिनाय केले जातेय किंवा कसे ?
खाजगीकरण हा तर पुरोगाम्यांच्या सर्वात नावडत्या मुद्यांमधे टॉप ला असलेला मुद्दा. खाजगी शिक्षण म्हंजे म्हणे प्लुरलिझम चा मृत्यु, इंडिपेंडंट थिंकिंग ला धोका. आणि इंडिपेंडंट थिंकिंग म्हंजे काय ?? तर भेदभावाला विरोध. म्हंजे एखाद्या कंपनीने नोकरभरतीत केलेला असतो तो भेदभाव्. व कामगाराने "मी मारवाड्याच्या कंपनी पेक्षा बहुराष्ट्रीय कंपनीतच काम करणार असं म्हणून Siemens सारख्या कंपन्यांत अर्ज करणे म्हंजे "पर्सनल चॉईस्". ही असली भेदभावी वृत्ती म्हंजे पुरोगाम्यांच्या दृष्टीने "इंडिपेंडंट थिंकिंग".
माझं म्हणणंय, डिप्राईव्ह्ड
माझं म्हणणंय,
डिप्राईव्ह्ड बॅकग्राऊंड्स असलेल्या विद्यार्थ्यांना म्हणे संधी दिली.
हे फक्त जे एन यू नेच केलं का? माझ्याच कॉलेजमध्ये, अक्षरश: दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असणाऱ्या, कुटुंबातील प्रथम साक्षर असणाऱ्या, दलित, आदीवासी, माझ्यासारख्या सो कॉल्ड उच्चवर्णिय पण खासगी कॉलेजात शिकणे परवडू न शकणाऱ्या कित्येक मुलांना अक्षरशः फुकट उत्तम शिक्षण मिळाले. अश्या कॉलेजातल्या समस्यांना का बरे कव्हरेज मिळत नाही इंग्रजी वर्तमानपत्रांतून?
हे फक्त जे एन यू नेच केलं का?
हे फक्त जे एन यू नेच केलं का? माझ्याच कॉलेजमध्ये, अक्षरश: दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असणाऱ्या, कुटुंबातील प्रथम साक्षर असणाऱ्या, दलित, आदीवासी, माझ्यासारख्या सो कॉल्ड उच्चवर्णिय पण खासगी कॉलेजात शिकणे परवडू न शकणाऱ्या कित्येक मुलांना अक्षरशः फुकट उत्तम शिक्षण मिळाले. अश्या कॉलेजातल्या समस्यांना का बरे कव्हरेज मिळत नाही इंग्रजी वर्तमानपत्रांतून?
तुमच्या मुद्द्याच्या गाभ्याशी, त्यामागील भावनेशी एकदम सहमत आहे.
अनेक् जण आपापल्या परीने उपेक्षितांसाठी काहीतरी करीतच असतात्. ( पण Harsh Mander सारखी मंडळी ही सारखा आरडाओरडा करण्यातच धन्यता मांडतात्. इंडियन एक्सप्रेस फक्त "फडतूसांना हवे असलेले कंटेंट्" उपलब्ध करून देत आहे. तुमच्यावर अन्याय होत आहे हे कोणालाही सहज पटवून देता येते.). उपेक्षित मंडळींना याची काडिचीही किंमत नाही. जरा कुठे मनाविरुद्ध झाले की समानता आणि भेदभाव चा नारा द्यायचा आणि आरडाओरडा सुरु करायचा. समानता हा ५००० टक्के बकवास आहे हे साम्यवादाच्या व समाजवादाच्या (सोव्हियत युनियन, भारत, व्हेनेझुएला) अपयशाने अनेकदा दाखवून दिलेले असले तरीही. तिथे इंडिपेंडंट थिंकिंग नसते यांचे. कारण तिथे प्रायव्हेटायझेशन ऑफ बेनिफिट्स आणि सोशलायझेशन ऑफ कॉस्ट्स करता येते.
अबापट, आठवड्यातून चार म्हणजे
अबापट, आठवड्यातून चार म्हणजे खुप जास्त कव्हरेज मिळतं हे सांगण्यासाठी म्हटलं. मला जे एन यूचा तिरस्कार वगैरे काही नाही, पण बाकीच्या विद्यापीठात सगळं आलबेल आहे का? की भ्रष्टाचार, जुनाट सिलॅबस, प्राध्यापकांच्या जागा न भरल्या जाणे, पीएचड्यांची दुकाने या समस्या नाहीयेत?
तिरस्कार नसेल तर...
>>मला जे एन यूचा तिरस्कार वगैरे काही नाही, पण बाकीच्या विद्यापीठात सगळं आलबेल आहे का? की भ्रष्टाचार, जुनाट सिलॅबस, प्राध्यापकांच्या जागा न भरल्या जाणे, पीएचड्यांची दुकाने या समस्या नाहीयेत?<<
जर तिरस्कार नसला, तर एकदा असाही विचार करून पाहा : जेएनयूचा तिरस्कार असल्यागत वागणं जर सरकारनं सोडून दिलं तर वृत्तपत्रांच्या हाती आयतं कोलीत मिळणार नाही.
भक्तसदृश असलेले इथले एक
भक्तसदृश असलेले इथले एक सदस्य पुढचे लक्ष्य अमुक कॉलेज/विद्यापीठ असं उघडपणे इथेच लिहून जातात. तेव्हा सरकार मुद्दाम आकसाने वागत आहे असा निष्कर्ष निघतो. त्याबाबत वृत्तपत्रांनी आवाज उठवणे योग्य आहे. (वृत्तपत्रे ऐसी अक्षरे वाचून लिहितात असा दावा नाही. पण सरकार मागे लागले आहे हे ओपन सिक्रेट आहे).
मुद्दा
त्याला इतका कव्हरेज देण्यात वृत्तपत्रांचा व्हेस्टेड इंट्रेस्ट आहे.
मला वाटलं होतं की मुद्दा स्वयंस्पष्ट आहे. पण तो नसेल तर -
- मानव्यविद्या ही एक जगन्मान्य ज्ञानशाखा आहे.
- जेएनयू भारतातील मानव्यविद्या शाखेतील एक अग्रगण्य (किंबहुना 'द' अग्रगण्य) संस्था आहे.
- त्यामुळे तिथे जर काही वेगळं घडू लागलं तर ती राष्ट्रीय पातळीवरची बातमी होऊ शकते.
- सध्या तिथे वेगळं काही घडतं आहे.
अर्थात, तरीही बातमी देताना आपापल्या पूर्वग्रहांनुसार बातमी दिली जाते हे उघड आहे. उदा. विद्यार्थी दहशतवादी / देशद्रोही / नक्षलवादी आहेत, किंवा विद्यार्थी सरकारी गळचेपीविरोधात विद्रोह करणारे (शोकान्त?) महानायक आहेत, ह्या दोन टोकाच्या भूमिका आहेत. त्यांविषयी चर्चा होऊ शकते. मात्र, सद्य परिस्थितीकडे माध्यमांनी दुर्लक्षच करावं आणि ते केलं नाही तर ते काही तरी अनैतिक किंवा गैर होतं आहे (असा काही मुद्दा असेल तर) हा मुद्दा मला कळू शकला नाही. विषयाशी पूर्णत: अनभिज्ञ असलेल्या सामान्य माणसाला तरीही असं वाटू शकतंच. मात्र, मानव्यविद्येच्या अभ्यासकांना असं वाटणं मला तरी विशेष तर्कसंगत वाटलं नाही.
दुर्लक्ष करूच नये हो, पण अती
दुर्लक्ष करूच नये हो, पण अती कव्हरेज मिळाल्याने उच्चशिक्षणातील अनागोंदी, भ्रष्टाचार, इतर प्रश्न हे ऐरणीवर येत नाहीत, असे वाटत नाही का?
अवांतर: महाराष्ट्रातील तथाकथीत शिक्षणसम्राटांनी जो खेळखंडोबा केलाय उच्चशिक्षणाचा, त्याच्यावर बोलायला मराठी माध्यमे तयार नसतात. राष्ट्रीय माध्यमे एकच मुद्दा लावून धरतात. एक रविशकुमार सोडला तर इंजिनीअरींग कॉलेजांच्या दुरवस्थेबाबत कुठे लिहून आलेलं मला तरी आठवत नाही.
एक रविशकुमार सोडला तर
एक रविशकुमार सोडला तर इंजिनीअरींग कॉलेजांच्या दुरवस्थेबाबत कुठे लिहून आलेलं मला तरी आठवत नाही.
इंजिनियरिंग कॉलेजांची दुरवस्था आहे यात आश्चर्यजनक काहीच नाही. तेव्हा ती बातमी नाहीच्.
उठसूट खाजगी शिक्षण संस्थांना "तुम्ही ज्ञानदानाच्या पुण्यकर्मात यंव करा अन त्यंव करा" असली लेक्चरे झाडायची, शिक्षणसम्राटांच्या नावानं शंख करायचा, खाजगी शिक्षणसंस्थांवर वारेमाप बंधनं घालायची, त्यांचे नफ्याचे मार्ग बंद करायचे आणि मग कॉलेजांची दुरवस्था झाली म्हणून बोंबलायचं !!!!
हे रेंटकंट्रोल च्या च धर्तीने जाते.
डिस्क्लेमर् - मी स्वत्: डि.वाय.पाटिल यांच्या संस्थेतून बाहेर पडलो. म्हंजे मी काही फार ग्रेट्ट विद्यार्थी आहे असे नाही. खरंतर आदर्श विद्यार्थी कसा नसावा याचे मी उत्तम उदाहरण आहे. आमच्या वेळी दुरवस्थाच होती. पण नफा या एका गोष्टीचा विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की दुरवस्था का आहे ते. अर्थात हे प्रत्येकाला कळत असतं. फक्त वळत नाही. प्रत्येकाला स्वत्:चा नफा मॅक्झिमाईझ करून दुसऱ्याचा कमी करायचा असतो. पण आपले हेतू शुद्ध आहेत म्हंटलं (उदा. ज्ञानदान) की आरडाओरडा करायला मोकळीक मिळते.
अर्थात कॉलेजांची दुरवस्था ही Lack of facilities बद्दल असते. व ऐकीव माहीतीनुसार शिक्षणाच्या क्वालिटीचा व Facilities च्या abundance चा खूप कमी संबंध असतो.
उठसूट खाजगी शिक्षण संस्थांना
उठसूट खाजगी शिक्षण संस्थांना "तुम्ही ज्ञानदानाच्या पुण्यकर्मात यंव करा अन त्यंव करा" असली लेक्चरे झाडायची, शिक्षणसम्राटांच्या नावानं शंख करायचा, खाजगी शिक्षणसंस्थांवर वारेमाप बंधनं घालायची, त्यांचे नफ्याचे मार्ग बंद करायचे आणि मग कॉलेजांची दुरवस्था झाली म्हणून बोंबलायचं !!!!
हे रेंटकंट्रोल च्या च धर्तीने जाते.
>> +1
त्यांच्याच कॉलेजमधे शिकून त्यांनाच 'तुंबड्या भरल्या' वगैरे नावं ठेवायची... आरक्षणाच्या नावाने उठसुठ बोंब मारत फिरायचं जसं काय हेच 'देणारे' आहेत... रिसिविंग एंडला असूनही ही असली प्रवृत्ती मिरवायला पाहिजेच 'जातीचे'...

#१ ऐकली आहे. यावर एक वत्स
#१ ऐकली आहे. यावर एक वत्स मेसेजही फिरत होता.
#२ लोलपूर्ण आहे.