मैत्री आणि प्रेम
प्रेमात पडल्यावर नक्की काय होतं?
१ मला हल्ली माझ्या एका मित्राची सारखी सारखी आठवण येते
२ त्याला मेसेज करावा, त्याच्याशी बोलावं असं उगीचच वाटतं राहत
३ त्याला चुकून उशीर झाला रेप्लाई करायला तर मला काळजी वाटते
४ तो परफेक्ट नाहीये हे माहितीये पण तरीही हवाहवासा वाटतो. म्हणजे तो मला आणि मी त्याला समजून घेऊ शकतो विथ अवर फॉल्ट्स असं वाटतं
५ तो म्हणतो की त्याला असं काही वाटतं नाही माझ्याबद्दल.
६ ह्या नात्याचं भविष्य नाही हे दोघांनाही कळतंय पण वळत नाही असं झालंय.
७ मला तो माझ्या आयुष्यात असण्यान मी जास्त कन्फ्यूज़्ड आहे वाटतं. पण त्याला दूर करायची इच्छाही होतं नाही. आणि मग मी त्याला विसरूही शकत नाही. असं सगळं एकदम कॉंप्लिकेटेड वाटू लागलं आहे.
८ मी त्याला माझ्या मनातलं सांगितलं आहे. ते सांगून मी चुक केली का? मी असं करून त्याला धर्मसंकटात टाकते आहे का?
९ माझा आयुष्य भरभरून जगण्यावर विश्वास आहे. एकचं तर आयुष्य मिळत. ते असं मला कन्फ्यूज़्ड राहून नाही घालवायचं. मला यातून बाहेर पडायचे आहे.
१० तो म्हणतो की तू माझी मैत्रीण म्हणून का नाही राहू शकत.
तर असा सगळा प्रॉब्लेम झाला आहे. मी खरोखर प्रेमात पडलीये की सगळे म्हणतात तसं हे फक्त आकर्षण आहे. आम्ही दोघांनी काय करायला हवे? मी त्याच्याशी बोलणं सोडून दिल तर मला त्याच्याविषयी जे वाटतं ते कमी होईल का? लीव इन, लग्न वगैरे उपाय सुचवू नका कारण अजून दोघांनाही कळत नाहीये की हे नक्की काय आहे. या सगळ्यातून बाहेर पडून आम्ही चांगले मित्र म्हणून राहू शकतो का? की इथे निरोप घेणे योग्य?
आता कसं बरं सांगायचं!
प्रेम ही फार गुंतागुंतीची गोष्ट आहे. तुम्ही साधं काही तरी करून बघा. फरदीन-उर्मिलासारखं म्हणायचं, पण वाक्याचा पहिला भाग काढून टाकायचा - 'दो .... जंगल में खो गये' असं काहीसं. छोटी आणि साधी सुरुवात करा. प्रेम व्हायचं तर होईल नाही तर नाही होईल; त्याला फार भाव नका देऊ. आयुष्याचा बडजात्यापट नका बनवू!
तुम्ही घाई का केलीत....
दुसरी कोण त्याला भेटली असेल...तुम्ही तुमच्या मनातील सांगायची घाई केली असेल...त्यामुळे तुमच्याबद्दल असणारे आकर्षण कमी झाले असेल..तुम्ही जे वर लिहिले आहे.ते सर्व मी भोगलय.. भोगतोय..आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो की त्या व्यक्तीला आपली किंमत कळत नाही..हा विषय एवढा खोल आहे की त्याचा तळ तुम्हाला कधीच सापडणार नाही..जेवढा जास्त विचार कराल तेवढे अडकून पडाल...या विषयावर कोणाकडेही सल्ला मागत बसू नका.उगाचच डोक्याची मंडई करुन घ्याल.मला पण असच वाटायचं की तिच्याशिवाय मी जगू शकणार नाही..पण मी आता या सगळ्यातून बाहेर पडतोय हळूहळू..सुरूवातीला त्रास झाला..पण आता कामात मन गुंतवतोय..मला काय वाटते एखादी व्यक्ती आपल्याला आवडते तर त्या व्यक्तीला आपल्या मनातील सांगून पहावे एकदा..तिचा जर नकारात्मक प्रतिसाद असेल..तर तो विषय तेथेच सोडून द्यावा..मान्य आहे की प्रेम ठरवून होत नाही तसेच ते मारुनमुटूकून ही होत नाही..मला असे वाटते की..आपण ज्या व्यक्तीला आवडतो..जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते..त्याच व्यक्तीवर आपण प्रेम करावे..पण आपण आपल्या आवडीसाठी उगाचच वेळ दवडतो........
बापरे केकता कपूर सारखं एको
बापरे केकता कपूर सारखं एको वगैरे ईमेजिन करून शायरी वाचली. शिकायत आपल्याच नशिबाची आहे. त्याची नाही.
जब कुछ अंजाम नहीं होना है हासिल तो क्यूं ऐसे मकामपे लाके खड़ा किया है जिंदगीने? क्यूं होती है ऐसी मुलाकात? क्यूं अनजानेही मिल जाते है रास्ते? क्यूं लगता है जैसे किसीको बरसोंसे जानते हो? क्यूं? आखिर क्यूं?
( नाना पाटेकर सोन करेल ह्या ड्वायलागचं. )
हर्षद यांच्या मताबरोबर
हर्षद यांच्या मताबरोबर पूर्णपणे सहमत. आगे बढो. पण मन ऐकत नाही. एखादी गोष्ट हवी म्हंजे हविच.
मी मागे एका नाटकात एक वाक्य ऐकलं होतं. 'जे आपल्या नशीबात नसतं त्याला आपणच आपल्या हाताने दूर लोटायचं'.
मला तरी या वाक्याने बरीच मदत केली काही गोष्टींतून बाहेर पडायला.
तुम्हाला मुलं हवी आहेत का?
जंज,
तुम्हाला मुलं व्हायला आवडतील का? उत्तर हो असेल तर आणि तरंच त्या मित्रासोबत लग्न करायचा विचार करा. अन्यथा इथूनच निरोप घेतलेला बरा. मी जर तुमच्या जागी असतो तर असा विचार केला असता :
---------------- परकायाप्रवेश सुरू -------------------------------
१. मला मुलं हवीयेत का? नको असल्यास प्रेमात न पडता निरोप घ्यायचा.
२. वरचं उत्तर जर हो असेल तर तो मित्र माझ्या मुलांचा बाप म्हणून कसा आहे? बरा वाटतो का? उत्तर नकारार्थी असल्यास निरोप घ्यायचा (प्रेमात पडून वा न पडता).
३. वरच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तर विवाहोत्तर प्रेम जमेल. आत्तापासून काळजी नको. मात्र मुलं झाल्यावर माझ्या अनेक इच्छांना आकांक्षांना मुरड घालावी लागेल. परंतु नवऱ्याच्या इच्छांना वगैरे मुरड न घातलेली असू शकते. हा त्याग करायची माझी तयारी आहे का? उत्तर नकारार्थी असल्यास प्रेमात पडून निरोप घ्यायचा.
---------------- परकायाप्रवेश समाप्त ----------------------------
एकंदरीत, तुमचा जो गोंधळ उडतो आहे तो ठाम उद्दिष्ट नसल्यामुळे. अशा परिस्थितीत लक्ष्य उत्पन्न करायचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
आ.न.,
-गा.पै.
थोडी कॉम्प्लिकेशन्स होवू
थोडी कॉम्प्लिकेशन्स होवू शकतील - असे करताना खालील सिनॅरिओ ध्यानात घ्या. (तुमच्या अपेक्षेनुसार रिझल्ट न देणारे)
१. तुमचे कॉमन मित्रावर प्रेम बसू शकेल
२. कॉमन मित्राचे तुमच्यावर
३. १ व २ एकत्र
४. कॉमन मित्राचे ओरिजिनल मित्रावर
५. ओरिजिनल मित्राचे कॉमन मित्रावर
६. ४ व ५ एकत्र
७. १ ते ६ एकत्र.
तेवढी रीस्क घ्यायची तयारी असेल तर हा चांगला उपाय आहे. (तुमच्या उपायातील साईड-एफेक्टस सांगितल्याबद्दल, सैराटसर, माफ करा)
एका प्रेमातून बाहेर पडायचा
एका प्रेमातून बाहेर पडायचा राजमार्ग = दुसर्या प्रेमात पडणे ;) नवीन प्रेमात पडा. सिरीअसली.