अभिव्यक्ती किंवा अभिव्यक्त होणे, या प्रक्रीये संदर्भाने काही प्रश्न

मराठी विकिपीडियावर अभिव्यक्त होण्याच्या (अभिव्यक्ती प्रकट होण्याच्या) प्रक्रीयेबद्दल बराच मागे एक लेख लिहिला आहे. लेख लिहीताना काही प्रश्न अनुत्तरीत शिल्लक राहीले त्या बद्दल काही माहिती पूर्ण चर्चा होऊ शकल्यास स्वागत असेल.

अभिव्यक्ती प्रकट होण्याची प्रक्रिया (Process of expression,or expressing oneself, in living organisms and specially human beings and how various sciences and philosophies explain,describe,perceive or relate to this process) असा या चर्चेचा विषय आहे. (व्यक्तिमत्त्व किंवा व्यक्तित्व याच्याशी गल्लत करू नका.) मराठी विकिपीडियावरील सध्याचा लेख अभिव्यक्ती येथे आहे. पूर्ण लेख येथे कॉपी पेस्ट करण्या पेक्षा आपण तो मराठी विकिपीडियावर वाचल्यास बरे पडेल असे वाटते. लेखात अभिव्यक्त होण्याची सध्याची व्याख्या "अभिव्यक्ती म्हणजे विचार, संवेदना आणि भावना व्यक्त करता येणे. व्यक्त करण्याची प्रेरणा ही प्रत्येक सजीवाला जन्मतः मिळालेली नैसर्गिक/दैवी देणगी आहे." अशी दिली आहे.

खालील विषयांची चर्चा करून/माहिती हवी आहे.
.....
.....

* तुमच्या मते अभिव्यक्त होण्याची/ अभिव्यक्तीची प्रक्रीया नेमकी कशी होते ?

.....
.....

**अभिव्यक्तीची सूप्त अवस्था, मानस शास्त्रीय विश्लेषण, भारतीय तत्त्वज्ञानाच्या दृष्टीकोनातून अभिव्यक्त होण्याची प्रक्रीया धार्मिक संकल्पना : ज्युडायिक धर्मांमधील संकल्पना, हिंदू, जैन, इत्यादी धर्मातील संकल्पना,
.....
.....

* कलात्मकतेची प्रेरणा, सर्जनाची प्रेरणा, साहित्यिक प्रेरणा कशी मिळते ? , अभिव्यक्तीची इतर माध्यमे कोणती ? वेगवेगळ्या माध्यमातून अभिव्यक्त होण्याची प्रक्रीया कशी होते ?
** प्रेरणा म्हणज काय ? प्रेरणा कुठुन येतात ? प्रेरणा कशी येते/होते ? प्रेरणांचे उगमस्थान कोणते ? अन्त:प्रेरणा म्हणजे काय ? भावना, विचार, विवेक आणि प्रेरणेचे परस्पर नाते कोणते ?
** चेतना, भावना आणि प्रेरणा, व्यक्त-अभिव्य्क्त होणे, यातील परस्पर सहसंबध ?
** प्रेरणा, अभिव्यक्ती आणि बौद्धीकसंपदेची निर्मिती यांतील सहसंबंध कोणते ? नक्कल आणि स्वयंप्रेरणेतील फरक कोणते
** अनुभव म्हणजे काय ? अनुभूती आणि अनुभव यातील फरक कोणते ?

.....
.....

* अभिव्यक्त होण्याची साधने: हाव-भाव,संवाद संवादाची माध्यमे आणि इतर साधने कोणती आणि अभिव्यक्त होण्याची प्रक्रीया आणि साधने

.....
.....

* अभिव्यक्त होण्यासाठी लागणारी कौशल्ये आणि तंत्रे आणि अभिव्यक्त होणे/अभिव्यक्ती

.....
.....

* अव्यक्त राहिलेले आणि संधी नाकारलेले गेलेले किंवा बंधनात असलेले गट , अव्यक्त राहण्या मागच्या भूमिका कारणे इत्यादी

.....
.....

* अभिव्यक्त होण्यात मर्यादा कोणत्या येतात ?

.....
.....

* (अभिव्यक्त होण्याच्या/अभिव्यक्तीच्या संदर्भात) स्वातंत्र्य जन्मसिद्ध असते की संस्कृती सिद्ध ?
**"स्वांतंत्र्य हा जन्मसिद्ध अधिकार आहे" ह्या लोकमान्यांच्या वाक्यातील तत्त्वाबद्दल नरहर कुरुंदकर स्वांतत्र्य हे संस्कृती सिद्ध म्हणजे ते वापरून किंवा त्याच्या कक्षा वाढवण्याकरिता झगडून प्राप्त करावे लागते का ? अशा शब्दात शंका व्यक्त करतात तुमचे मत काय ?

.....
.....

* लेखाचे मुळ नाव "अभिव्यक्त होणे" असे होते, गूगल शोध घेतल्यास "अभिव्यक्त होणे" हा वाकप्रचार प्रत्यक्षात बर्‍या पैकी वापरात दिसतो, पण शुद्धलेखन जाणकारांनी आक्षेप घेतल्यामुळे ते नाव बदलून अभिव्यक्ती असे केले गेले. ती चर्चा येथे आहे. तुमचे मत काय आहे.

.....
.....

* पुढील परिच्छेदांचा अनुवाद करून हवा आहे

**how to appropriately present oneself to others:manifestations embody specific functions and meanings: to allow for individual expression, to allow a community-based culture to express itself through direct and popular (in the sense of “from the people”) appropriation, to create the space for this culture to transform and develop itself, and to incarnate real-life social ideals that can be shared through

.....
.....

**Freedom of expression and access to information was one of the most debated rights during the negotiations leading up to the World Summit on the Information Society held at Geneva in December 2003, and at Tunis in November 2005. This right was praised by some as the very core of the information society, and accused by others of being a merely formal stan- dard with little practical reality in a world where the majority of the pop- ulation does not have access to information technology and in which the “communication sphere” is dominated by Western/American culture and content, media concentration, and the English language.

***संदर्भा सहित माहिती उपलब्ध झाल्यास स्वागतच असेल, सोबत तुमच्या व्यक्तीगत मतांचेही स्वागत आहे. या विषयावर चर्चेस वाव असल्यामुळे धागा चर्चा सदरात टाकला आहे. पण मुळ उद्देश शेवटी विकिपीडियाच्या लेखास हातभार लावणे असल्यामुळे नित्याप्रमाणे आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.

field_vote: 
0
No votes yet

मनमोकळ्या अभिव्यक्ती साठी संकेतस्थळावर पोषक वातावरण, सुयोग्य क्राऊड हवा. संकेतस्थळ-संपादक्/व्यवस्थापक खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात असे माझे मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत, पण "पोषक वातावरण, सुयोग्य क्राऊड" यात आपणास काय काय अभिप्रेत आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

कमीत कमी "सायबर बुलींग" सारख्या विकृतीस आळा. आठवेल तशी भर घालेन.
_____________
२ प्रकारच्या अभिव्यक्ती आतापर्यंत लक्षात आल्या आहेत - भावनिक अन वस्तुनिष्ठ. याचा अर्थ दोन्ही परस्परांपासून संपूर्ण भिन्न आहेत का? (म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह) तर होय असे वाटते. परत या माझ्या वाटाण्याला कितपत अर्थ आहे? या प्रकारच्या क्लिष्ट विषयाकरता रिसर्च मटीरीअलच उपयोगी पडावे.
_________
लेखाची मांडाणी व्यामिश्र अन मुद्देसूद व बर्‍याच अस्पेक्टसना स्पर्श करणारी वाटली. याबद्दल माहीतगार यांचे कौतुक.
_________
http://www.nwlink.com/~donclark/hrd/styles/vakt.html
VAK - व्हिज्युअल्/ऑडिटरी/किनेस्थेटिक
या संकल्पनेचा उपयोग व्हावा असा हंच!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<अभिव्यक्ती किंवा अभिव्यक्त होणे, या प्रक्रीये संदर्भाने काही प्रश्न> ह्या धाग्याच्या शीर्षकातील 'अभिव्यक्त होणे' हा शब्दप्रयोग अतिशिष्ट आणि कृत्रिम वाटतो. सांगणे, बोलणे, लिहिणे ह्या साध्यासुध्या शब्दांचाच अर्थ अधिक कृत्रिम प्रकाराने 'अभिव्यक्त होणे' हा शब्दप्रयोग दर्शवितो आणि हे एक अलीकवैदग्ध्य वाटते.

'अभिव्यक्त होणे' ह्याचे शब्दशः इंग्रजी भाषान्तर to become expressed असा होईल. इंग्रजीत he said च्या जागी तुम्ही he became expressed असा शब्दप्रयोग तुम्ही कराल काय? अर्थातच नाही कारण तो वापर निरर्थक पांडित्य दर्शवितो. ह्याला इंग्रजीमध्ये एका संदर्भामध्ये Hellenomania - A display of erudition by excessive use of Greek terms असे म्हणतात.

असे शब्द टाळावेत असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय "अभिव्यक्त होणे" या वाकप्रचाराच्या व्याकरणदृष्ट्या सुयोग्यतेबद्दल मराठी विकिपीडियावर चर्चा झाली तेव्हा मी मागेच तात्काळ माघार घेतली पण त्याच वेळी गूगलवर शोध घेतला तेव्हा असा उपयोग करणारा मीच एकटा नाही हे लक्षात आले म्हणून अधिक चर्चेसाठी विषय येथे घेतला. गूगलवर मागच्या वेळी (याला बरेच महिने उलटले ) शोध घेतला तेव्हा खालील पद्धतीचे उपयोग इतरांनी केलेले आढळले.

==मला अभिव्यक्त होण्यास अजून जागा आहे ?==
:विकिमित्रांनो मी लेख शीर्षका बद्दल सपशेल माघार घेतली हे खरे.खास करून अभिव्य्क्त होणे हि मराठीत वापरलेच जात नाही हे आदरणीय जे म्हणाले पण मला लेखातील वाक्ये अभिव्यक्त ऐवजी अभिव्यक्ती शब्दाने कशी बदलता येतील ह्या प्रश्नाचा नवीनच गुंता डोळ्या समोर उभा आहे तो अजून सुटलेला नाही.

:दुसरे असे कि जेंचे हे मत कि "अभिव्यक्त होणे असा वाकप्रचार मराठी भाषेत नाहीच,कुठे असा उपयोग झाला तर तो सोशल नेटवर्कींग वाल्यांच फ्याड आहे " हे माझ्या मर्यादीत गूगल शोध यंत्राच्याच सहाय्याने शोधण्या पर्यंत सध्या तरी माझी साधने सिमित आहेत.
[[सदस्य:Mahitgar|माहितगार]] १८:५३, १९ मार्च २०११ (UTC)
:होतो हे क्रियापद होणेशी संबधीत समजून मी गूगल वर शोध घेतल्या वर "अभिव्यक्त होतो" या शब्द समुहाचा शोध घेतला.
.....
.....
.....

*"'''एकच राग वेगवेगळ्या घराण्यांतून कसा अभिव्यक्त होतो; घराणेबद्ध शैलीतूनही रागाचं मूळ रूपच समोर येतं का,''' हे पडताळून पाहण्याचा एक अभिनव प्रयोग आम्ही १३ फेब्रुवारीच्या दोन सत्रांत करून पाहणार आहोत. नंदिनी बेडेकर, कलापिनी कोमकली आणि कौशिकी चक्रवर्ती या आजच्या आघाडीच्या गायिका आपापल्या शैलीतून सकाळचा प्रहर साजरा करतील. '''[http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=134... संदर्भ:‘सहेला रे’च्या निमित्ताने - संध्या गोखले ,रविवार ६ फेब्रुवारी २०११ लोकसत्ता]{{मृत दुवा}}''' तसेच [http://www.esakal.com/esakal/20110206/5079884776034237361.htm अमोल पालेकर ईसकाळ]
.....
.....
.....

*कुसुमाग्रजांना साहित्याच्या सामर्थ्याबरोबरच ज्या भाषेत '''आपण अभिव्यक्त होतो''', त्या भाषेच्या सामर्थ्याचे यथायोग्य भान होते.''' [http://www.esakal.com/esakal/20110227/5024105498731615494.htm संदर्भ:विनम्र भाषाप्रभू!- नरेंद्र चपळगावकर Sunday, February 27, 2011 ईसकाळ.कॉम]'''
.....
.....
.....

*चित्रपट हे एक माध्यम आहे.जशा इतर माध्यमातून कलाकार अभिव्यक्त होतो तसाच चित्रपटातूनही. [http://www.maayboli.com/node/2206?page=54 हे वाक्य मात्र मायबोली सोशल नेटवर्क फ्याडावर आढळल]
.....
.....
.....

*तरी आपण निरर्थक असे वाचाळपणे सतत बोलत राहतो. '''अथक अभिव्यक्त होत राहतो'''. पण चुकीचे तेवढे मनातच ठेवतो.परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे चार प्रकार सांगितले आहेत ज्ञानेश्वरीत. परा म्हणजे नाभीतली अव्यक्त वाणी आणि वैखरी म्हणजे प्रत्यक्ष मुखातून प्रगटणारी शब्दरूप वाणी. परा, म्हणजे खरे तर नेणीवेत विचार येतो तेव्हाच आपण स्वत:शी बोलतो. प्रत्यक्ष बोलतो तेव्हा '''दुसऱ्याशी अभिव्यक्त होतो''' आणि कृती म्हणजे आपले बोलणे समष्टीशी. विचार, वाणी आणि कृती या क्रमाने बहिर्मुख होत जाणाऱ्या आपल्या या अभिव्यक्ती.'''[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6589218.cms संदर्भ:प्रेम -संजय भास्कर जोशी(कादंबरीकार आणि समीक्षक) 20 Sep 2010, 0320 hrs IST महाराष्ट्र टाईम्स]'''
.....
.....
.....

*विवेक हा बुद्धींत '''अभिव्यक्त होतो.''' बुद्धि हे अनात्म तत्त्व आहे [http://www.maharshivinod.org/node/843. संदर्भ:पुस्तकाचे नाव: अनुभवामृतदीपिका लेखक: श्री. प्र.स.सुबंध]
.....
.....
.....

*....आणि असे झाले तर '''कवी नेमकेपणाने अभिव्यक्त होतो'''. कवीचे विचारही वाचकांना थेटपणे कळतात. ...[http://gazalakar.blogspot.com/2011/01/blog-post_9103.html संदर्भ:सामाजीक आशयाची सर्वांगगिण अभिव्यक्ती -श्रीराम गिरी]
.....
.....
.....

*....आपल्या मातृभाषेत '''आपण अभिव्यक्त होतो''', हे कळविता यावे यासाठी व सांस्कृतिक अभिसरण व्हावे, यासाठी अध्यक्ष एका ठिकाणचा व आयोजक अन्य ठिकाणचे याची आवश्यकता असते. [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-4570019,prtpage-... संदर्भ:अवघा रंग एक झाला...- डॉ. सिसिलिया कार्व्हालो महाराष्ट्र टाईम्स]
.....
.....
.....

*... जेव्हा चित्रकार म्हणून '''अभिव्यक्त होतो''', तेव्हा त्या कलेलाही एक तिसरा डोळा असतो. ...
.....
.....
.....

*... ज्याला हायपॉथेसिस (कूििहींशीळी) म्हणतात, तसा काहीसा अर्थ तर्काने अभिव्यक्त होतो. ...
.....
.....
.....

*जेव्हा भयानक रस अभिव्यक्त होतो तेव्हा कपाळावर ‘घर्मबिंदू’ जमतात, तर करुण रसाची अभिव्यक्ती होताना ‘अश्रुधारा’ कधी झरझरू लागतात ते समजतच नाही. [http://www.loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=7719... संदर्भ:डॉ. कनक रेळे , रविवार, १३ जून २०१० संस्थापक-संचालक (नालंदा नृत्य संशोधन केंद्र) लोकसत्ता]{{मृत दुवा}}
.....
.....
.....

*...कधीकधी तो वेगळ्या तर्‍हेने अभिव्यक्त होतो....[http://www.navprabha.com/index.php?option=com_content&view=article&id=54... संदर्भ:मानवी भावबंध आणि विसंगती- यशवंत कर्णिक नवप्रभा]
.....
.....
.....

*....श्री.निलेश गद्रे यांच्या गोष्टीमुळे तर नव्या युगातील जगभर आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणार्‍या विजिगिषू मराठी '''माणसांच्या मनातले चिरंतन द्वंद्व उत्तमरीत्या अभिव्यक्त झाले.''' श्रोत्यांना भरून आले. [http://marathi-e-sabha.blogspot.com/2010/06/blog-post.html संदर्भ:शब्दबंध- नरेंद्र गोळे मराठी ब्लॉगकारांची ई-सभा]
.....
.....
.....

*...खेड्याशी, तिथल्या काळ्या मातीशी, लोककलेशी, संस्कृतीशी माझे नाते जुळले आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांचे सुख-दु:ख मी जवळून पाहिले. माझ्या लिखाणातूनही '''हे जीवन अभिव्यक्त झाले आहे'''.[http://marathi.webdunia.com/miscellaneous/facetoface/interviews/0902/18/... संदर्भ: माझे काव्य काळ्या मातीशी निगडीत-:ना.धो.महानोर]
.....
.....
.....

*....ज्यांचे मन संवेदनशील असते. तो हळवेपणा लेखनात उतरत असतोच. माणसंही एकाकी आणि एकटी जगू शकत नाही. छोटय़ा, छोटय़ा प्रसंगाच्या अनुभवानंतर मनातून दाटून आलेले '''भावविश्व''' नितळ आणि स्वच्छपणे या पुस्तकात '''अभिव्यक्त झाले आहे''', असे समीक्षक डॉ. सतीश बडवे यांनी सांगितले.
.....
.....
.....

*...यशवंतरावांचे चौफेर वाचन आणि चिकित्सक चिंतन ज्या अलवारपणे त्यांच्या लेखनातून अभिव्यक्त झाले तसेच ते त्यांच्या भाषणांमधूनही मुखरित झाले. ... [http://dainikaikya.com/DainikAikya/20100311/4692008091573133346.htm संदर्भ:कृतिशील प्रतिभेचे प्रकाशपर्व - वसंत केशव पाटील]
.....
.....
.....

*.....शब्दांची गरज वाटली तेथे कवितेतून अभिव्यक्त झाले...... [http://72.78.249.126/esakal/20110109/4833114294270660979.htm संदर्भ:...आणि माणसे पुन्हा माणसांशी बोलू लागतील- कविता महाजन]
.....
.....
.....

*....याउलट हे भौतिक जग, केवळ चेतनशक्तीच्या आधाराने अभिव्यक्त झाले आहे. ... [http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20100807/519791161766093258... भगवद्‌गीता जशी आहे तशी -सच्चिदानंद]{{मृत दुवा}}
.....
.....
.....

*... जे माध्यम हाताळले त्यात खोलवर शिरून त्याबद्दलची जाण पुरेशी परिपक्व करून मग (दिलीप) चित्रे त्यातून अभिव्यक्त झाले. ... [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=312... एका युगाचा अंत-प्रफुल्ल शिलेदार, रविवार, १३ डिसेंबर २००९ लोकसत्ता]{{मृत दुवा}}
.....
.....
.....

*...श्री संत एकनाथ हे श्रेष्ठ लोकशिक्षक होते. समाजशिक्षक होते. तत्कालीन समाजस्थितीचे त्यांनी सूक्ष्म अध्ययन केले. समाजाविषयीच्या कळवळ्यापोटीच समाज मनाचे उत्कट दर्शन घेतले. तितक्याच उत्कटपणे त्यांच्या लेखनात अभिव्यक्त झाले. या अभिव्यक्तीचे लोकभाषेच्या माध्यमातील एक अस्सल मर्‍हाटमोळे मनोरम रूप म्हणजे नाथांची भारुडे. [http://www.loksatta.com/daily/20041025/extra.htm संदर्भ:शब्द माझा चेहरा,शब्द माझा आरसा - यशवंतराव चव्हाण ग्रामजागर साहित्य संमेलनातील डॉ. रामचंद्र देखणे यांच्या अध्यक्षीय भाषणाचा गोषवारा -लोकसत्ता]
.....
.....
.....

*.....कारण गझलेच्या तंत्रासाठी जे 'टाळूनी' करावे लागले, ते न करताही कदाचित एखादी सुंदर कविता जन्माला येऊ शकली असती. म्हणजे '''विचारही ताकदीने अभिव्यक्त झाले असते''', आणि व्याकरणदोषांमुळे होणारा रसभंगही टळला असता.[http://www.sureshbhat.in/node/1888 -@मधुघट]
.....
.....
.....

*...हे सर्व लिखाण कोणत्याही डिप्रेशन, निराशा अथवा थकव्यातून नसून छिन्न-विच्छिन्न झालेल्या माझ्या संवेदनेला एकवटून त्याची मांडणी करताना '''अभिव्यक्त झाले आहे''', असे महाजन म्हणाल्या.[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3013355.cms कादंबऱ्यांनी केले आबाद आणि बरबादही...-कविता महाजन यांचे उद्गार म्.टा.]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

*... ज्याला हायपॉथेसिस (कूििहींशीळी) म्हणतात, तसा काहीसा अर्थ तर्काने अभिव्यक्त होतो. ...

- 'कूििहींशीळी' म्हणजे नेमके काय?

- या शब्दाचा उच्चार नेमका कसा करायचा?

- यातले पहिले अक्षर जे काही आहे, त्यास 'देवनागरीतील (लिपीचिन्ह नसणार्‍या कोठल्याशा उच्चारणासाठी बनवलेले) नवे उच्चारचिन्ह' मानावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कूििहींशीळी' म्हणजे नेमके काय?

Smile मायत नाय दोन वर्षापुर्वी गूगलवरून कॉपी केला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

मायत नाय दोन वर्षापुर्वी गूगलवरून कॉपी केला होता.

आणि आता पेस्ट झाला काय? काँप्युटर बदला भो! फारच स्लो झालेला दिसतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile व्हय व्हय, नव्या जमान्याच्या मानानं आमचा काँप्युटर स्लो हाय अन म्हणूनशान आपल्या शुभेच्छांचा आम्ही आदरपुर्वक स्विकार करून कळवू इच्छितो, की त्या वाक्यांचे रेकॉर्डींग आम्ही सुमारे दोन वर्षा पुर्वी विकिचर्चा पानावर केले होते ते येथे काल नकलवले. मग काँप्यूटर स्लो कसा असा प्रश्न तरीही पडत नाय कारण आमचा कॉंम्प्युटर ऐसी अक्षरेच्या या धाग्यावर उशीरा पोहोचला हे खरेच आहे, भो ! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

वेडीवाकडी विनोदबुद्धी रे देवा! हसून हसून मुरकुंडी वळली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

समाजव्यवस्थेत केविलवाणे जगावे लागणारा नववास्तवातील माणूस अभिव्यक्त झाला होता - १९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह By आनंद यादव

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

अरविंद कोल्हटकरांशी (फक्त) आंशिक सहमती आहे.

(अलीकवैदग्ध्य शब्द माझ्याकरिता नवीन आहे, गंमत म्हणून आवडला.)

कित्येक प्रसंगी लेखकाने विचार करणे बरे "अभिव्यक्त होणे" ऐवजी "सांगणे/बोलणे/लिहिणे" हे पर्याय चालतील काय? पर्याय वापरून निरर्थक बोजडपणा टळतो आहे का?

परंतु जर या पर्यायांमध्ये हवी ती अर्थच्छटा येत नसेल, तर जरूर "अभिव्यक्त होणे" वापरावे. "अभिव्यक्तिस्वातंत्र्य" हा संदर्भ आगेमागे असेल, तर पुष्कळदा "अभिव्यक्ती" हा शब्द संदर्भात अधिक चपखल बसणारा असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टेक्निकल सहमती आम्ही पण दिलीय, आत्ता सकाळी आणखी खोद (शोध काम) केले, गूगलराव ऐसी अक्षरेवर किमान २२ उपयोगांचा दाखला देत आहेत; तर मराठी विश्वकोशात नव्वदएक उपयोगांचा दाखला दिसतो आहे. मायबोली डॉटकॉमवर चक्क ४१३ उपयोगांचा दाखला दिसतो आहे. (शोध यंत्रात काही प्रमाणात काही रिझल्ट रिपीट होत असले तरी हे मोठ्या प्रमाणावर वापराचा संकेत नाही म्हणता येणार का

जर मोठ्या प्रमाणावर वापर होत असेल तर तो शब्द वाक्प्रचार भाषेने स्विकारला असे नेमके केव्हा म्हणावे असा प्रश्न मला नेहमी पडत राहतो .
...
...

*तैसा सूक्ष्म नाद शिवसंयोगें । प्राणसंगमें लगवेगें । षटचक्रादिप्रयोगें । वैखरीयोगें अभिव्यक्त ॥६६॥ मरा हे ऐकतां गोठी । ते वाचा सर्वांशें वाटे खोटी । तेंचि अक्षरें केल्या उफराटीं । रामनामें गोमटी निववी वाचा ॥६७॥

-एकनाथी भागवत अध्याय १२ वा (की १८ वा ?)

...
...

*इंद्रियांचे मी इंद्रिय पाहे । त्यांची क्रिया जे जे आहे । ते माझेनि होये अभिव्यक्त ॥६६॥ - एकनाथी भागवत अध्याय १६ वा

...
...

*तेथ सकाम आणि निष्काम भक्त । यांचे अधिकार अभिव्यक्त । स्वयें सांगेल भगवंता । कथा अद्भु।त ते आहे ॥९५॥ -- एकनाथी भागवत अध्याय १९ वा

...
...

महाराष्ट्र शासनाच्या २०१०च्या सांस्कृतिक धोरणात भाषेच्या महत्वाची महती गातानाही अभिव्यक्त हे रूप आलेले आहे.

* भाषा आणि साहित्य
::ज्ञानाचे संचयन आणि संक्रमण स्थलकालांच्या मर्यादा ओलांडू शकते, ते प्रामुख्याने भाषेमुळेच होय. संगीतनृत्यांपासून ते चित्रशिल्पांपर्यंत नानाविध कलांना अधिक आस्वाद्य बनविण्याचे कार्यही भाषा नक्कीच करते. ती एकीकडे व्याकरणाच्या आणि लेखनपद्धतीच्या नियमांचा मानही राखते आणि दुसरीकडे काळाच्या ओघात त्या नियमांच्या संहितेला वेगळे वळण देऊन आशयाला सतत ताजेपणाही देत राहते. ती ललित साहित्यापासून ते गंभीर विवेचनापर्यंत विविध मार्गांनी अंतर्बाह्य सृष्टीला अभिव्यक्त करते. भाषेचे हे अंगभूत सामर्थ्य ओळखून मराठी भाषेला अधिक विकसित करणे आवश्यक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

अलीकवैदग्ध्य शब्द मलाही लय आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्या शब्दाचा अर्थ आम्हा मूढांना कोणी समजावून सांगेल काय? गूगलवर शोधल्यावर हाच धागा आला फक्त! 'न गळणारा विदग्धपणा का'?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अलीक = खोटे.

वैदग्ध्य = विदग्धपणा, इथे अर्थ अभिजात, हायक्लास, इ.इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं