एक कविता आठवतांना...My Sorrow

दुसर्‍या एका धाग्यावर यशवंतच्या कविता वाचल्यावर माझ्या काही जुन्या कविता उगाच चाळल्या...गंमत म्हणजे, पहिलीच जी कविता चाळली ती (मला तरी) आजही फार हास्यास्पद नाही वाटली. १९९७ ला लिहलेली. ती मनस्थिती आजही व्यवस्थित आठवतेय. विशीतच होतो आणि ज्या वयात 'लाथ मारेल तिथे पाणी काढेल' असा आत्मविश्वास असतो तेंव्हाच आलेल्या असंख्य अडचणींमुळे आणि अपयशामुळे खूच खचलो होतो आणि नाउम्मेदही झालो होतो. मित्रही पांगले होते...खूपच एकटा, एकटा झालो होतो. आणि कुठेतरी आत खोलवर डिचवलोही गेलो होतो, आणि त्यातूनच एक जिद्द थोडीशी उगवत होती. कुठेतरी स्वतःलाच समजावण्यासाठी, स्वतःचीच philosophy किंवा counseling चालू असायचे, तेंव्हाच कधीतरी झालेल्या ही माझी कविता - My Sorrow. ही आणि ह्याच्या थोडी आधी लिहलेली 'Why Me?' ह्या माझ्या कविता आजही मला (माझ्यासाठी) खूप relevant वाटतात.

मला वाटतं, दु:ख किंवा वेदना नेहमीच वाईट नसते. काही 'पॉसिटीव्ह थिंकींग' च्या steroids चा ओव्हरडोस झालेले लोकं उगाचच 'अरे आनंदी रहायचे रे, ग्लास इज ऑलवेज हाफ फुल' चा डोस आपल्यालाही न मागता देत असतात. कधीकधी ते फारच वैतागवाणे होते. मला वाटतं, अशी आतून हलवून टाकणारी दु:ख/वेदना आपल्याला खूप काही शिकवून जाते. स्वतःविषयीच एक वेगळीच, खोल insight देऊ शकते. जगाविषयी किंवा इतरांविषयी एक सहानभुतीचा, समजुतदारपणाचा दृष्टीकोन देऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नकळत किती गोष्ट गृहीत धरतो हे जाणवते. ह्यातूनच मग कधीतरी, ' मीच का', Why Me? ह्या प्रश्नाला काहीच अर्थ नाही हे उमगायला लागते...तसं वागायला जमतंच अस नाही, पण निदान विचारात तरी थोडी मॅच्युरीटी येते. दु:खाविषयी बोलणे किंवा त्याचा खूप विचार करणे हे नेहमीच नैराश्यवादी, 'दु:ख उगाळणे' असं नसतं. डोळसपणे आणि संमजसपणे 'भोगलेल्या' दु:खाने जे शिकता येते ते इतर कशानेही शिकता येत नाही. आणि अशा दु:खातून किंवा वेदनेतून जन्मलेल्या आशेची/जिद्दीची जातकुळी आणि राखेतून भरारी मारणार्‍या फिनिक्स पक्षाची जातकुळी एकच असते. असं दु:ख हे नैराश्यजनक अजिबात नसतं, ते देतं 'जीवनाविषयी उदास सामंजस्य'. किंबहुना मला 'उदास' हा शब्दही नकोसा वाटतो ( जीएंची माफी मागून), मस्त जमलेल्या कॉफीसारखी एक 'मधूर कडवट' चव असते त्या सामंजस्याला!

Our sweetest songs are those that tell of saddest thought. खरंच!!!

My Sorrow

Though time has alleviated my pain,
There is a scar that will always remain.
Now, I can also hide my emotions like anyone,
And my tears don’t embarrass me anymore!
I wear this grin to disguise;
But deep inside there is a malaise!
Maybe things could have been better,
Maybe things could have been worse,
Or perhaps, they couldn’t have been any different.

My pain, my anguish, my sorrow;
Certainly is the treasure of my life.
My sorrow has made me melancholic,
It has made me mellow,
It has made me understanding, compassionate,
It has made me so wonderful.
It has given me the most beautiful gift of my life,
My poems, the reflections of my soul.
And now I can see myself much better,
Not as a body, but as a soul!

And now, my sorrow has matured a lot;
It doesn’t need a shoulder to cry,
It doesn’t ask me ‘WHY’?
It has attained a higher understanding,
‘There is much deeper meaning to all this suffering!’
And things could only get better!

So here I am, undefeated, undestroyed,
Much stronger than ever before;
And still victorious after all those retreats.
It’s due to my pain, my sorrow;
I am still hopeful about the morrow!

- Manish

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अप्रतिम!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान कविता आहे
काँलेजात असताना केलेल्या कविताची आठवण झाली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.