ऐसीकरांच्या बैलाला होssssss

आज सोळा मार्च. आज होळी. म्हणजे 'होली है!' असं ओरडत रंगों की बौछार करत, 'होली के दिन दिल खिल जाते है' वगैरे गात, गवार कुवाऱ्यांना छेडछाड करण्याच्या हक्काची हिंदी होली नाही. होळी - ळी ळी ळी. मऱ्हाठमोळी होळी. आज कुठेतरी खड्डा खणून त्यात लाकडं, गोवऱ्या, नको असलेली फर्निचरं, किंवा नको असणाऱ्या लोकांची फर्निचरं जाळून उग्गीच्च्या उग्गीच आग पेटवण्याचा दिवस. आता आपल्यासारख्या आंतरजालावर जमून गप्पा ठोकणारांना असली आग पेटवणं काही जमणारातलं नाही. पण 'आम्हाला जमत नाय ब्वॉ' असं सरळसोट कारण देण्यापेक्षा आग न पेटवण्याची इतर कारणं मी पुढे करतो.

- त्याचं काय आहे, ती लाकडं जाळणं म्हणजे पर्यायाने झाडं जाळणं, म्हणजे पर्यावरणाचा नाश! ते करणं पाप की हो.

- त्यातच सध्या ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे. पुण्यात अजून भर मार्च महिन्यात थंडी असली म्हणून काय झालं? पुण्यापलिकडे काही जग आहे की नाही? जे काही आहे ते विशेष महत्त्वाचं नसलं म्हणून काय झालं, काहीतरी एवढंसं आहे ना. काय म्हणता, तिथेही थंडीच आहे... बरं बरं. म्हणून काही ग्लोबल वॉर्मिंग डिनाय होत नै कै. तर अशा ग्लोबल वॉर्मिंगला जागोजागी आगी लावून खतपाणी घालणं म्हणजे पुन्हा पर्यावरणाचा नाश! म्हणजे पापच की हो.

- महाराष्ट्र गारपीटीने ग्रासला आहे. कोट्यवधीचं पिकांचं नुकसान झालं आहे. आणि आपल्या लोकांना जाळपोळ सुचते?

- एक होळी पेटवण्याऐवजी तितक्याच ऊर्जेत १२ मेणबत्ती मोर्चे निघतात. जरा ऊर्जेची गणितं करा.

- गुजरातकडे पहा जरा, लाकडं जाळून होळी करण्याऐवजी ते सौर ऊर्जेने आगीशिवाय शक्ती निर्माण करतात, आणि विकासासाठी वापरतात. असल्या होळ्या करत बसतो म्हणूनच महाराष्ट्र मागे पडतो.

वगैरे वगैरे.

तर मुद्दा काय, की या सगळ्या तात्विक कारणांसाठी आपण ऐसी अक्षरेवर जाळपोळ काही करणार नाहीहोत. पण होळी पेटवली नाही म्हणून काय झालं, होळीच्या मागच्या भावना तर ज्वलंत ठेवता येतातच की. होळीचा उद्देश काय, तर मोठ्ठी आग पेटवून त्यात आपल्या मनातला सगळा कटूपणा बाहेर काढून टाकून जाळून टाकणे. त्यासाठी दोन्ही हात कर्ण्यासारखे तोंडाभोवती धरायचे, मान वर करायची, मोठ्ठा श्वास घ्यायचा आणि बेंबीच्या देठापासून 'अमुकतमुकच्या बैलाला होsssssss' म्हणून आरोळी ठोकायची.

आणि कोणी कोणाच्या नावाने बोंब ठोकायची याला काहीच निर्बंध नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ गरीब बिचारे अनिवासी भारतीय उर्फ हिरवा माजवाले भारतात वारंवार भरणाऱ्या कट्टेकऱ्यांबाबतची आपली मनात असलेली जलन बाहेर काढू शकतील. किंवा आपण निव्वळ भडकाऊ प्रतिसाद देतो म्हणून हे हरामखोर श्रेणीदाते भडकाऊ श्रेणी देऊन प्रतिसाद बंद करून टाकतात याचा काहींना राग असेल, तर त्यांनी तो खुशाल बाहेर काढावा. अगदीच काही नाही तर पाय दिनाला लावलेल्या आर्टवर्कमध्ये लाल रंगाऐवजी एखाद्या मॅक्सीपॅडच्या जाहिरातीप्रमाणे निळा रंग वापरल्यामुळे ते धड दिसतही नाही, तर त्या 'लोगो बदलणाराच्या बैलाला होsssssss' म्हणावं. नुसतं मोघम वर्णन करून नाही, तर शिवाय आयडीचं नाव घेऊनही म्हणा. त्यात आयडीच्या लेखनाची, शैलीची, व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्यं उल्लेखून बोंब मारायला हरकत नाही. जोपर्यंत सगळं मौजमजेत, खेळीमेळीने चाललं आहे तोपर्यंत कोणाच्याही बैलाला हो, नानाची टांग, आबाचा ढोल वगैरे बिनधास्त म्हणा. कोणी तुमच्या बैलाला हो केलं, तर तुम्ही आणखीन तिसऱ्याच्या नानाची टांग म्हणा. पास इट ऑन, शेअर द फन.

मी सुरूवात करून देतो. 'असले बंडल धागे काढून ऐसी अक्षरेची ब्यांडविड्थ फुकट घालवणाऱ्या घासकडवींच्या बैलाला होsssssss'

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

बैलांचा विषय निघाला तरच आपली शिंगं उजेडात बाहेर काढणाऱ्या, आणि एरवी अंधारात लपून बसणाऱ्या मठ्ठ काळ्या बैलाच्या बैलाला होsssss

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मठ्ठ काळे बैलोबा गाईंचा विषय निघाला तरीही शिंग बाहेर काढतात हे आम्ही नम्रपणे आपल्या निदर्शनास आणत आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अच्छा, म्हणजे ते उदारमतवादी आहेत तर. त्यांच्या या उदारमतवादाच्या बैलालाही होssss

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होळीनिमित्ताने काढलेल्या धाग्यावर यथेच्छ बोंबाबोंब केल्याने मने शुद्ध होऊन पुढील वर्षभर ऐसीकर लोक सभ्यतेने चर्चा करतील अशी भाबडी आशा करणार्‍या घासक डबींच्या मठ्ठ बैलाला बोऽ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

...(ऐसीकर) अतिशहाणा यांच्या (व्याख्येनेच) रिकाम्या बैलाला... (इ.इ.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होळी रे होळी पुरणाची पोळी
वाईट श्रेणी देणार्‍यांच्या मांडीवर बंदुकीची गोळी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होळीचे काही एवढे नाही. आमची प्रतिभा(!) धुळवडीला अधिक फुलते. त्यामुळे काहीतरी केमिकल लोचे करुन आपल्या फायद्यासाठी आपल्या फळबागेला आगाऊ बहर आणण्याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यासारखे वीकेंड चढतो न चढतो तोच (उतरायची तर बातच सोडा!) होळी पेटवून तिच्यावरच आपली सिग्रेट शिलगावून कोपर्‍यात तृप्त मिष्किल झुरके घेत उभे राहाणार्‍या घासकडवींच्या बैलाला हो....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

थंडी आहे म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग नाही असे गैरसमज पसरवणार्‍यांच्या बैलाला होsssss

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरु़ण जोशींच्या प्रत्येक प्रश्नाचा विपर्यास करणार्‍यांच्या बैलाला हो.............

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ही नशीबाची गोष्ट आहे कि हे लोक पुरोगामी क्लबातले आहेत. याच वृत्तीनिशी ते प्रतिगामी क्लबातले असते तर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तर काही झालं नसतं.

काय झालं असतं? याचा स्वतंत्र इच्यार करून वेगळा धागा काढा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> गवार कुवाऱ्यांना छेडछाड करण्याच्या हक्काची हिंदी होली नाही. होळी - ळी ळी ळी. मऱ्हाठमोळी होळी. <

उदारमतवादाची टिमकी वाजवत मनसेकडून पैसे घेऊन हिंदीभाषिकांची नालस्ती करणाऱ्या संस्थळाच्या... असो. हम कुत्तों के सामने नही नाचते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ऐसीकरांना सूचना - बोंब मारताना शास्त्रशुद्ध धार्मिक पद्धतीनेच बोंब मारावी. कारण बोंब म्हणजे हुताशनी निनादाचे स्थुलातून प्रकटीकरणाचे प्रतीक होय. योग्य पद्धतीने बोंब मारल्यास अनेक फायदे होतात. जसे की शक्तीच्या सर्पिलाकार वलयाचे प्रक्षेपण, आणि चैतन्याच्या वलयातून प्रवाहाचं प्रक्षेपण वगैरे वगैरे. अधिक माहितीसाठी हा अनमोल लेख वाचावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे चित्र पाखंडी लोकांनी प्रसृत केले आहे.

चित्रातील व्यक्ती सात्विक भारतीय पोषाखात नसून मायावी म्लेच्छ पोषाखात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खराच असा तिथे लेख आहे की! आणि आम्हाला वाटले हा घासूगुर्जींच्याच प्रतिभेचा अविष्कार आहे.
असला दिशाभूल करणारा विकृत लेख लिहिणार्‍यांच्या बैलाला हो SSSSS

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.. गवार कुवाऱ्यांना छेडछाड करण्याच्या ..
<<
च्याय्ला! पूर्वी चवळीच्या शेंगेची उपमा देत असत. आजकाल गवारीवर आलंय का?

बाकी आमच्या बैलाला नेहेमीप्रमणेच यंदाही कर्तव्य असल्याने आमच्या बैलाला भोऽऽऽऽऽ करत कुणी कितीही गायी आणाल्या- आय मीन बोंबा ठोकल्या तरी आमच्याकडून वेल्कमच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

डाक्तर होणे अर्धवट सोडणार्‍या आडकित्त्यांच्या बैलाला हो SSSSSS

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोंब ठोकतानाही आडकित्त्याला अहो-जाहो करणार्‍या शहराजाद च्या................... बोबोबोबोबोबो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मुद्द्याला बगल देऊन बोंब मारणार्‍या आड्याच्या आबाचा ढो SSSSS ल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मि.ब. आडकित्त्याच्या नावानं होस्स्स्स्स्स्स्स्स्स्स

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थैलर्य! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

केवढे हे औनाड्य Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काय चाल्लय हे तुमचे औथळ्य!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

खौल्याला औथळ्याचे लैबल्य लावू नका हो Wink

(बाट्टमाण्य)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(बाट्टमाण्य)?

नाही रे, बैटमॅन्य

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बैटमॅन्य मधला बै हा टिपिकल नियमांप्रमाणे बसत नै म्हणून बट्टमण्ण हा शब्द वापरला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्याच्या नावाने हो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात वारंवार भरवणाऱ्या कट्टेकऱ्यां च्या बैलाला हो ssssss

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चक्क आत्मपरिक्षण, चिंतन वगैरे करून भांडणातली सारी मजा, सारा त्वेष हिरावून घेणार्‍या गब्बरच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

अरुण जोशींच्या समर्थनार्थ अथवा विरोधार्थ बैलाला हो ssssss करणार्‍यांच्या नानाची टांग आणि आबाचा ढोल हो ssssss ऑबॉबॉबॉबॉ

- (शिमग्यातले सोंग असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'उक्तीचा आणि कृतीचा काही संबंध नाही' इतक्या सुंदर, आयुष्य सोपं करणार्‍या, विचाराचा निषेध/विरोध करणार्‍या बॅटमॅनच्या बैलाला हो........

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

शुद्ध आणि अभिजात मराठी संस्थळावर मध्येच कन्नड भाषेत कडकड करणार्‍या बॅटॅच्या बैलाला हो...sssssss

- ('कन्नड अक्षर बैल बराबर' असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुद्ध आणि अभिजात मराठी संस्थळावर मध्येच बंगालीचे ज्ञान पाजळणार्‍या बॅटॅच्या बैलाला हो...sssssss
शुद्ध आणि अभिजात मराठी संस्थळावर मध्येच संस्कृतची टामटाम करणार्‍या बॅटॅच्या बैलाला हो...sssssss
शुद्ध आणि अभिजात मराठी संस्थळावर मध्येच अरबी का कुठल्या मसण्या सह्या टाकणार्‍या बॅटॅच्या बैलाला हो...sssssss

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान छान पाककृतींचे नुसतेच फोटो टाकून जळवणाऱ्या आणि कधी न खिलवणाऱ्या रुचिच्या बैलाला होssssss
छान छान कॉकटेलांचे नुसतेच फोटो टाकून जळवणाऱ्या आणि कधी न पिलवणाऱ्या सोक्याच्या बैलाला होssssss

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मर्‍हाटी संस्थळावर येऊन वर खिलाडूगिरी करणार्‍या गब्बरच्या नानाची टिंगणी SSSSSS

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हान तेजायला.

मला वाटलं इथे "फकस्त" शिव्या द्यायला परवानगी आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे ''फकस्त'' शिव्या द्यायला परवानगी आहे.

शिव्या तर द्यायच्याच द्यायच्या. कोणी जादा शहाणे जिथे तिथे खिलाडूगिरी दाखवायला लागले तर तशी प्रथाच पडेल. तसे झाले तर संस्थळावर मजा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ची विकेट पडली ओ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...'फकस्त'मध्ये त्यांना श्लेष अभिप्रेत असावा.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे आमच्या डोक्यात येइपर्यंत प्रतिसाद टंकून बुच्च बसले होते.
बोंब मारायचे सोडून, फकस्त दुसर्‍यांच्या श्लेषाबद्दल कळफलक बडवणार्‍या रिक्कामबोट नव्या बाजूच्या बैलाला होओओबोबोबोबोबो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फडतूसांचा कैवारी नसलेला फडतूस ज्याना आवडतो त्यांच्या बैलाला भोऽ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

यही तो मै कह रहा हूं मालिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. मुंबै पुण्यातल्या कूपमंडूकांच्या बैलाला हो sssss काणकी बेडकाने कितीही छाती फुगवली तरी तो बैल होत नाही हो ssss
२. वेगळ्या विदर्भाच्या बैलाला हो ssss
३. मी सभासद नसलेल्या संस्थळांच्या बैलाला हो ssss आणि असलेल्या ऐसिच्या बैलाला डब्बल होssss हो sss
४ विनोदाचे स्पष्टीकरण देणार्या बैलाला हो ssss
५ . प्रेमभंगाचा चिखल तुडवणार्या कवड्यांच्या बैलाला हो sss

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बेडकाने कितीही छाती फुगवली तरी तो बैल होत नाही हो ssss

आणि बैल झालेलं कुणालाही आवडणार नाही Wink

इथे २:००:०० ते २:०१:०० पाहणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एरवी नक्को तिथे वाद घालत बसतील, आणि अॅडमिनना सभ्य संवादाची मर्यादा पाळली जाते की नाही हे तपासण्यासाठी भिंग लावायला लावतील. पण मारा बोंबा म्हटलं तर 'तुम्ही व्हा पुढं, आम्ही आहोतच इथे' असं म्हणतील. युसलेस साले.

तेव्हा बोंबा मारायच्या धाग्यावर बोंबा मारणं सोडून नुसतीच मजा बघत बसलेल्या किंवा या धाग्याकडे लक्ष न देता संसारात रमलेल्या किंवा असंच आपलं लोळत पडलेल्या इतर सर्व ऐसीकरांच्या बैलाला होsssss

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. मध्येच पिना मारणार्‍या अनुप ढेरेच्या बैलाला होऽऽऽऽऽ

२. कॉकटेलं अन मॉकटेलं का काय ती सगळी अपेयं टाकून टीटोटलरांना फुक्क्क्कट जळवणार्‍या सोका(वलेल्या)जीनानांच्या बैलाला होऽऽऽऽऽ

३. खौचट नि दूष्ट शेर्‍यांना दुजोरा देणार्‍या शहराझादांच्याही बैलाला होऽऽऽऽऽ

४. सगळीकडे विदा, विदा, विदा करणार्‍या घासूगुर्जींच्या बैलाला(विद्याला) होऽऽऽऽऽ

५. इतरांना नुस्त्या पिना मारून स्वतः लेखनकष्ट न घेणार्‍या मनोबाच्या बैलाला होऽऽऽऽऽ

६. निरागसपणे बिगर निरागस प्रश्नांची माळका टाकून ऐसीचा सर्व्हर तुंबवणार्‍या ठाममत अन परंपराप्रेमी अरुणजोशींच्या बैलाला होऽऽऽऽऽ

७. स्त्रीवादमार्तंडिनी अदितीच्या गाईला होऽऽऽऽऽ

८. शब्दांची जबाबदारी उचलावयास नकार देणार्‍या चिंतातुर जंतूंच्या बैलाला(जंतूला) होऽऽऽऽऽ

९. चवदार ब्रेडचे फटू टाकून लोकांना फुक्क्क्कट जळवणार्‍या रुचीतैंच्या बैलाला(ब्रेडाला) होऽऽऽऽऽ

१०. सर्वद्वेष्ट्या अन मृतमध्यमवर्गीय निळ्याच्या बैलाला होऽऽऽऽऽ

११. झालंच तर लोकांना घाबरवणार्‍या मेघनाच्याही बैलाला होऽऽऽऽऽ

१२. कोटिभास्कर नंदनच्या बैलाला होऽऽऽऽऽ

१३. खवपिनमारक अमुकच्या बैलाला होऽऽऽऽऽ

१४. आणि सर्व हुच्च(भ्रू) लोकांच्या बैलाला होऽऽऽऽऽ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आणि सर्व हुच्च(भ्रू) लोकांच्या बैलाला होऽऽऽऽऽ

हुच्च(भ्रू) च्या विरुद्ध काय ओ?

---

७. स्त्रीवादमार्तंडिनी अदितीच्या गाईला होऽऽऽऽऽ

शॉव्हिनिझम !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वांत आधी गब्बरच्या बैलाला होऽऽऽऽऽ

तदुपरि हुच्च(भ्रू) च्या विरुद्ध शहाणे(भ्रू).

बाकी शॉव्हिनिझम तुम्ही म्हणाला तरी ते चूक आहे. जिकडेतिकडे बैल नामक पुरुषी प्रतिमा वापरायचे कारण काय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कवितेचं रसग्रहण असो किंवा एक उलटा टाका दोन सुलटे टाके टाइप शाल विणण्याची कृती असो, कुठचाही विषय शेवटी सरकार टॅक्स लावून बिच्चाऱ्या श्रीमंतांना कसं छळते या विषयावर गाडी नेऊन मग शिकागो स्कूल, ऑस्ट्रियन स्कूल वगैरे लोकांना काय्येक (हायेक नव्हे) न कळणाऱ्या गोष्टींचं नेमड्रॉपिंग करणाऱ्या गब्बरच्या बैलाला होsssss

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोक सुतावरून स्वर्गाला जातात तसा गब्बर कुठूनही टॅक्सवर जातो. या टॅक्सिंग बिहेवियरच्या बैलाला होsssss

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

करमत नसेल Smile

[आठवा - कोकणातले सुतार आणि करवत]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टॅक्स चा विषय बळजबरीने वसूल करण्याचा असूनही पद्धतशीरपणे टा़ळणार्‍यांच्या बैलाला SSSSSSSSSSSSS

---

श्रीमंतांवर अनन्वित अत्याचार करणार्‍यांच्या बैलाला SSSSSSSSSSSSS

---

ज्यांची कत्तल करणेच फक्त योग्य आहे अशा फडतूस गरीबांना (एक पै ही टॅक्स न घेता) वेल्फेअर, सेवा सुविधा, कर्जमाफी/कर्जमुक्ती, लाडली लक्ष्मी योजना, रोहयो देणार्‍यांच्या बैलाला SSSSSSSSSSSSS

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यांची कत्तल करणेच फक्त योग्य आहे अशा फडतूस गरीबांना (एक पै ही टॅक्स न घेता) वेल्फेअर, सेवा सुविधा, कर्जमाफी/कर्जमुक्ती, लाडली लक्ष्मी योजना, रोहयो देणार्‍यांच्या बैलाला SSSSSSSSSSSSS>>

गरीबांच्या भलाईसाठी आणलेल्या ओबामाकेअर योजनेला विरोध करणार्‍या गब्बरच्या बैलाला होऽऽऽऽ.
वर्गविहीन समाजाच्या उभारणीत खोडा घालणार्‍या गब्बरच्या बैलाला होऽऽऽऽ.
डी-क्लास होण्यास विरोध करणार्‍या गब्बरच्या बैलाला होऽऽऽऽ.
युनिअनिजमचा विरोध करत अल्पसंख्य धनदांडग्याचा हायर-अँड-फायर हक्क मात्र स्वीकारार्ह मानणार्‍या गब्बरच्या बैलाला होऽऽऽऽ.
उद्योगधंद्यांवर सरकारी नियंत्रणे नकोत असा आग्रह धरताना उद्योगधंद्यांच्या अकौंटिबिलीटीबाबत मौन बाळगणार्‍या गब्बरच्या बैलाला होऽऽऽऽ.
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

खरे तर मी सोडून सर्वांच्याच बैलाला होऽऽऽऽऽ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हुच्चभ्रू नि आधुनिकोत्तर-शिरोमणी चिंतूशेटना का पास दिलाय?

गुरुदक्षिणेचा चेक आणि गंडा घेऊन तिष्ठत उभा असलेल्य आमच्याकडे ढुंकून न पाहणार्‍या चिंतूशेटच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

नीट पहा गुर्जी. मी त्यांनाही कव्हर केलंय.

नीट प्रतिक्रिया न करता बैलाचे स्मरण करणार्‍या ररागुर्जींच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गावभरचे सार्‍या विषयात लुडबूड करत आपल्या मूळ विषयाला वार्‍यावर सोडणार्‍या ब्याट्याच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

आय आय सर!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ररांना प्रणाम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होळीच्या दिवशी बोंब न मारता प्रणाम करणार्‍या गब्बरच्या बैलाला होऽऽऽऽऽ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

व्यक्तिगत वैरातून गब्बरला सात सात वेळा बैलाला हो करणाऱ्या (आणि फुक्काटचा त्याचा ट्यार्पी वाढवून देणाऱ्या) ररांच्या बैलाला होssss

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर ला लौ करणार्‍याला ररा नि गब्बर यांच्या काडी टाकण्याच्या हेतूने ररांना वैरी म्हणणार्‍या राजेशच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

१. महामूर्ख ऐसीकरांच्या (अ) बैलाला गो sssssss
२. उत्क्रांतीचा ३६० कोटी वर्षांचा व्हिडिओ (ब) रियलटाईममधे प्रत्यक्ष पाहिलेल्या लोकांच्या बैलाला गो sssss. ज्या लोकांनी त्यामागचा १०० कोटी वर्षांचा इतिहासही व्हिडिओत पाहिला त्यांच्या गाइचाही गोssss
३. बिग बँगच्या वेळेस (क) (निष्कारण) कानात बोळे घालून आणि डोळ्यावर प्रारण रोधक चष्मा घालून उभे असणारांच्या कालवडीला गोsssss
४. मास्लोच्या पिरॅमिडमधला हालचालीचा प्रत्येक सजीवाचा गुप्तमार्ग मुख्पाठ असणार्‍या समाजशास्त्र्यांच्या (ड) म्हशींला गोsssss
५. ज्यांच्या पूर्वजांना किंवा ज्यांना स्वतःला देवाने /देवीने/ देवने अधिकृत संस्थेकडून मिळालेले (इ) certificate of having created universe दाखवले आहे त्यांच्या फार्ममधल्या सगळ्या प्राण्यांला गोssss
६. शास्त्रज्ञांचे अतींद्रीय शोध ज्यांना कळतात, पटतात अशा वैज्ञानिक दृष्टिकोन असणार्‍या अतींद्रीय दांडुकेधार्‍यांच्या (फ)समस्त सजीव विश्वाला गोssss

फूटनोटा-
अ. आता हे लिहायचे गरज नाही, पण या विधानाचा अर्थ "सारे ऐसीकर महामूर्ख आहेत" असा होत नाही. विशिष्ट वाक्यरचनेचा विशिष्ट मर्यादेपलिकडे अर्थ होत नाही.
ब. म्हणजे व्हिडिओची लांबी ३६० कोटी वर्षे. उगाच गैरसमज नको.
क. ही वेळ महत्त्वाची आहे. बिग बँगेच्या फटाक्याला यांच्यापैकीच कोणी पेटवले असणार.
ड. इ हे सर्टी. त्या चमकणार्‍या ३ डी लोगोसहीत
इ. ही शुद्ध जळजळ आहे. काय कसे झाले असावे याची समान उत्सुकता असताना काही विशिष्ट लोकांनाच देवाने/देवीने/देवने/उत्क्रांतीने सगळे कळायची जास्त शक्ती बुद्धी का दिली असावी म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

यात १ बद्दल अजून एक टीप द्यायची राहिली. या विधानाचा अर्थ, in any case, अरुणला ऐसीवर किमान दोन लोक महामूर्ख आहेत असा होतो, असे सिद्ध करता येते इ इ वाटेल. पण असे नाही.

उदा. मी असे म्हणालो असतो - " ऐसीवरील श्रीमंत सदस्यांच्या बैलाचा गो sssss". याचा अर्थ असा होत नाही कि मला पक्के माहित आहे ऐसीवर कोणी विशिष्ट वा किमान दोन सदस्य श्रीमंत आहेत. पण कोणी असतील तर नक्कीच गो ssss.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बोंब मारतानाही टीपा-फुटनोटा देणार्‍या अजोच्या बैलाला होSSSSSSSSSS

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो अशा टिपा नाही दिल्या तर
१. स्वातंत्र्य आणि त्यासोबत येणार्‍या जबाबदार्‍या
२. आरोप आणि हेत्वारोप यांचेतील फरक
३. निरागसतेच्या आडोशाने मुद्दाम खोडसाळ बोलणे लपवता येत नाही
४. विदादान पद्धतींचे गुण आणि दोष
इ इ विषयांवर लेक्चर्स ऐकून घ्यावी लागतात.

चला त्या निमित्ताने, विषय सोडून व्यक्तिच्याच नावाने बोंबा मारणार्‍या बैलांचा गो ssss.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बोंबा व्यक्तीच्या नावाने नाही तर कोणाच्या नावाने मारायच्या?
एक वाक्य बोंबेला सहा वाक्ये भरताड लिहिणार्‍याच्या नावाने ओSSSSSबोबोबोबोबोओSSSSS

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकांना संस्थळांचं already व्यसन असताना ऐसी अक्षरे सुरु करून अजून एक व्यसन लावण्यार्‍या स्थापक/मालकांच्या बैलाला हो.......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पाळी वगैरेबाबत मोकळेपणाने बोलणाऱ्या, पण इथे बोंब मारायला पुरुष आयडींच्यात यायला लाजणाऱ्या सगळ्या स्त्री आयडींच्या बैलाला होsssss

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाळी, वैगेरे बद्दल बोलणे स्त्रीयांचे प्रागतिक लक्षण आहे (आणि सामान्य बाब नाही) अशी मागास भावना अध्याहृत असणारे विधान लिहिणार्‍या आणि "स्त्रीया (अशा क्षुद्र गोष्टीसाठी )लाजत आहेत" असा पुरुषप्रधानवादी संस्कृतीचा शब्द वापरणार्‍या घासकडवींच्या बैलाच्या शेपटाच्या शेवटच्या केसाच्या शेवटच्या रेणूचा होsss, गो ssss आणि सगळे दीर्घ ओकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

घासकडवींच्या बैलाच्या शेपटाच्या शेवटच्या केसाच्या शेवटच्या रेणूचा

या प्रयोजनाकरिता शेपटाचे दुसरे टोक अधिक रोचक ठरावे, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिनवैशिष्ट्यात होळीचा उल्लेख न करणार्‍या किंवा लोगोमधे होळीचे प्रतीक न दाखवणार्‍या संपादकांच्या बैलाला....

एक संपादक होळीवर धागा काढतो पण दिनवैशिष्ट्य किंवा लोगो न बदलणे(ह्या प्रत्येक कामासाठी वेगवेगळे संपादक आहेत असे समजून) ह्यातून संपादकांमधे असलेली दुही स्पष्ट होत आहे का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरोगामित्वाच्या टिमक्या सदासर्वकाळ वाजवूनसुद्धा बोंब ठोकण्याची परंपरा पाळणार्‍या संस्थापकांच्या बैलाला हो sssss

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

१.माझ्या खरडवहीत कधीच काहिही न लिहिणार्‍या सगळ्यान्च्या बैलांचा घोsssss... (केतकी सोडून..)
२.सगळ्याच संस्थळांवर शाणपणा मारणार्‍या सुपरहिरोंच्या बैलाचा घोsssss...
३.फार प्रश्ण विचारणार्‍या आणि फार प्रश्ण पडणार्‍या येड्यांच्या बैलाचा घोsssss...
४. दारुड्यान्च्या बैलाचा घोsssss...
५. तसा सगळ्यांच्याच बैलाचा घोsssss..., त्यांच्या आबाचा ढोsssssल, त्यांच्या नानाची टांsssssग...(मी सोडून आणि केतकी सोडून)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(१) बैलाला 'हो' की 'घो'? (दोन्हीं लोकप्रवाद ऐकण्यात आलेले आहेत.)
(२) 'बैलाला हो/घो'चा नक्की अर्थ काय?
(२अ) 'घो'चा कोंकणी अर्थ घेतल्यास, 'बैलाला नवरा' यातून नेमके कोणते संकेत अभिप्रेत आहेत?
(२ब) 'हो'चा आमच्या अमेरिकन (कृष्ण?)बोलीतील (स्ल्यांग?) अर्थ लक्षात घेतल्यास कदाचित हा वाक्प्रचार अर्थपूर्ण ठरू शकावा. त्या परिस्थितीत, हा वाक्प्रचार अमेरिका-भारत सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या फलिताचा भाग असण्याची शक्यता काय असावी?

असो.

- आमच्या बैलास अद्याप अनुल्लेखाने मारू पाहणार्‍या सर्वेजनांच्या बैलाला घोऽऽऽऽ!!!
- आमच्या (अनुल्लेखाने मारलेल्या) बैलाला बचकभर ए-१ ष्टेकसॉऽऽऽऽस!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मारे संस्कृत शिव्यांच्या कुठल्या अक्षरावरचे आघात बदलले की अपमानाची छटा बदलते एवढा उहापोह करणार्‍या, आणि प्रत्यक्ष शिमग्याला शेपूट घालून बसणार्‍या धनंजय ढुढ्ढाचार्याच्या आबाचा ढो SSSSS ल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, तुम्ही धनंजयना शिव्या देताना आघात चुकवले तर काय उपयोग? ते असं लिहायला हवं.

धनंजय ढुढ्ढाचार्याच्या आबाचा ढो SSSSS ल, नानाची टांग...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सनुवकाउ! या सगळ्या शिमग्याच्या नुवकाउला यस्ऽऽ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'काऊ' नाही. (उच्चारी) 'क्यॅव्'.

बाकी चालू द्या.

(अतिअवांतर शंका: 'सनुव' की 'सनव'? माझी शंका आहे 'सनव' म्हणून.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुकतेच वाचलेले येथे देतोय, एंजॉय माडी.
---------------------------------------------

संस्कृत शॊलॆ

* बसंती किम तव नामधेयं ?

* बसंती अस्य सारमॆयापरॊक्शं नृत्यं न करिष्यामि।

* : ठाकुर इदं हस्तं मह्यं ददासि ।
: न ।
: ठाकुर इदं हस्तं मह्यं ददासि । (louder)
: न ।
: ठाकुर इदं हस्तं मह्यं ददासि ।( loudest )
: न ।

एषा मम कथा
तत्कारनेन अहम त्वया बन्दुकम न ददाति शक्तुम

* गब्बर: श्वान: अहम् त्वम् न सॊडयामि

* भो ग्रामवासी सा बसंती सा मम खलु रोचते
किन्तु तस्या मौसी नाट्यम करिष्ये।

* हा हा. अहम् आंग्लकालॆन कारागृह अधिक्शक: भवति ।

* बंधॊ: एशाम् स्मशानशांतता किम् कारणॆन भवति

* रे गब्बरः एषाम हस्ता न भवति
एषाम फासाय फंदः सन्ति ।

* सरदारःवयं सर्वे तव लवणं भक्षयति स्म
अतः गोली खादयती त्वम

* वसंतॊत्स्वम् दिनम् ह्रदयम् उन्मिलित: भवन्ति।
रंगानाम् रंगम् एकरूप: भवन्ति ।।

* यदा आंग्लपुरुष: मृत्यु: भवति तदा तेन सुसाइड इति वदन्ति

* यत्व प्राणम असती तत्त्व अहम नृत्यते अहम नृत्यते अहम नृत्यते

* यः भयभीतः
सः मृतः भवति

* वसंतॊत्सवम् किम् मुहूर्तम्? किम्?

सरदार:, इति 17 मार्चे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आपलं, गल्ली चुकलं काय होSSSS ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वसंतॊत्सवम् किम् मुहूर्तम्? किम्?
सरदार:, इति 17 मार्चे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होहो, होळीनिमित्तच आहे, पण हा खास बोंब मारण्याचा धागा आहे ना, मुसुराव ठेवणीतला शब्द्संग्रह बाहेर काढतील अशी अपेक्षा आहे हो. स्माइली टाकायची राहिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजेदार
फासाय फंदः तर अजूनच मजेदार.
@ शहराजाद - रस्ता नाही चुकलेला. होळीनिमित्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बंधॊ: एशाम् स्मशानशांतता किम् कारणॆन भवति

संस्कृतात बोलणारे हे इमाममहोदय गझनीच्या महमूदाचे वंशज असावेत, की अल्लोपनिषद लिहिणारा जो कोणी असेल, त्याचे?

असो. संस्कृत अनेक ठिकाणी गंडल्याचे माझ्यासारख्या संस्कृत नीटसे न येणार्‍यालाही दिसते, पण आजच्या दिवसापुरते ते होळीत घालायला प्रत्यवाय नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होळीच्या रंगी शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आमच्या कॉलेजजीवनात मुलग्यांच्या प्रसाधनगृहात वाचलेल्या भित्तीलेखांमधे एक ओळ होती : "**** ऑल गर्ल्स". तेव्हाही मी विश्वबंधुत्वाशी सामंतर्य साधणार्‍या या अशा शब्दांना दाद दिली होती. म्हण्टलं वा. काय व्याप्ती आहे यांच्या इच्छेची. जवाब नहीं.

तद्वत् "सर्व ऐसी अक्षरेच्या वाचकांच्या आणि वाचनमात्र असलेल्या शुभचिंतकांच्या बैलाला हो. नानाची टांग. नि आबाचा खुळखुळा."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

बैलाला हो..... नानाची टांग. नि आबाचा खुळखुळा.
............आजीच्या चिपळ्या राहिल्या ! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

पाने