आल, संदीप आणि गोर्बी.

पब्लिकच्या इच्छेचा आदर करून हा वेगळा धागा सुरू करीत आहे. संदर्भ http://aisiakshare.com/node/1820.

वासलेकर म्हणतातः
"मी 1991 मध्ये जानेवारीत मॉस्कोला मिखाईल गोर्बाचोव्ह हे सोव्हिएत युनियनचे राष्ट्रपती असताना त्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा अनेक देशांचे नेते त्यांच्याशी केवळ हस्तांदोलन करण्यासाठी धडपडत होते. त्यात अमेरिकेचे आल्बर्ट गोर हेही होते."

ह्यावरून मला ह्या वेळी काय डायलॉग झाला असेल ह्याची कल्पना करता येते.

संदीप आणि गोर्बी ह्यांची भेट आधीच कन्फर्म्ड असल्यामुळे हॉटेल मस्क्वामधील आपल्या नेहमीच्या गार्डन स्वीटमधून संदीप झपाझपा पावलं टाकत लॉबीमध्ये उतरतात. पोर्चमध्ये क्रेमलिनचा झेंडा फडकवणारी गाडी तयारच असते. कॉन्सिअर्जनं अदबीनं दार उघडल्यावर संदीप मागच्या सीटवर बसतात आणि डौलदार वळण घेऊन गाडी क्रेमलिनकडं निघते. तेथे पोहोचताच झपझपा पावलं टाकत आणि आसपासच्या फ्लंकीजचे नमस्कार अ‍ॅक्नॉलेज करत संदीप गोर्बीच्या ऑफिस स्वीटपर्यंत पोहोचतात. तेथे अनेक राष्ट्राध्यक्ष आपल्याला आत जाऊ दे ना असं काकुळतीनं दारावरच्या गार्डांना विनवीत उभे असतात. तिसर्‍या जगातले काहीजण गार्डांच्या हातात डॉलरबिलं सरकवण्याचाहि प्रयत्न करतांना दिसतात. त्यांच्याकडं दुर्लक्ष करीत संदीप आत शिरणार एवढ्यात त्यांना गर्दीत आल (गोर, आलं लक्षात?) दिसतो. घामाघूम झालेला बिचारा आल केवळ साधा उपराष्ट्राध्यक्ष असल्याने त्याला राष्ट्राध्यक्षांच्या रांगेतहि उभं राहून दिलेलं नसतं. आता डायलॉगः

संदीप - हाय आल, इकडे कुठं?
आल - अरे ही राष्ट्राध्यक्षांची परिषद गोर्बीनं बोलावलीय ना. खरा बिलच यायचा. पण त्याची आणि मोनिकाची आधीच गुप्त भेट ठरली होती. तिकडं कसं जाता येणार म्हणून बिचारा तळमळत होता. मग मीच त्याला म्हटले, अरे बाळा, दोस्त कशासाठी असतात? मी जातो तुझ्या जागी. म्हणून निघालो पण निघण्याच्या घाईत इन्विटेशन बरोबर ठेवायचं विसरलो. आता हे गार्ड लोक म्हणतायत की तुम्ही आत जायला सायबांची परमिशन नाही. परत गेल्यावर मी बिलला काय सांगू?
संदीप - अरे आल, तूच म्हणालास ना की दोस्त कशासाठी असतात? चल माझ्याबरोबर आत. माझी गोर्बीबरोबर सोवियट युनिअनमधील ताणतणाव कसे कमी करता येतील ह्याबद्दल आताच मीटिंग आहे. तूहि चल आत दोन मिनिटं.
आल - आलो अस्तो रे पण गोर्बीला आवडेल का? हे रूस्की प्रोटोकोल फार मानतात ठाऊक आहे ना?
संदीप - डोंच्यू वरी. गोर्बी माझा शब्द मानतो. परवाच त्याला एका अमेरिकनानं काही हजार डॉलर्सना गंडा घातला आणि मीच ते पैसे त्याला परत मिळवून दिले. माझ्या शब्दाच्या बाहेर नाही तो.
(दोघेही आत शिरतात. अर्थात ह्या वेळी केजीबीचे दारावर बसलेले कर्दनकाळ गार्ड अजिबात विरोध करत नाहीत. उलट दोघांसाठी अदबीनं दार उघडून धरतात. आत शिरताच -)
गोर्बी - दब्रो पज्झालवात, झ्द्राव्त्वुइ, संदीप, काक दिला? आणि हे काय, आल पण? हौडी आल? (गोर्बीला अमेरिकेचं फार प्रेम आहे आणि आपण अगदी अमेरिकन इंग्लिश बोलतो असं त्यानच संदीपला पूर्वी एकदा सांगितलं होतं त्याची संदीपला आठवण येते. तो मनातच हसतो.)
आल - गुड मॉर्निंग तवारिश प्रित्सिदात्येल! ग्रीटिंग्ज फ्रॉम बिल.

असा थोडा गुडीगुडी डायलॉग काही मिनिटं चालतो. गोर्बीचा वेळ महत्त्वाचा आहे हे संदीपला माहीत आहे. फॉर्मॅलिटी पुरी झाल्यावर तो आलला हलकेच मानेने खूण करतो. आलचंहि काम झालेलं असतंच. दोघांचाहि निरोप घेऊन तो आनंदानं बाहेर पडतो. जाताजाता संदीपच्या कानात हलकेच 'पुढच्या वेळी वॉशिंग्टनला आलास म्हणजे एक डिनर टिपर आणि माझ्याबरोबर करायचीय हे लक्षात ठेव' असं सांगायला विसरत नाही. तो बाहेर गेल्यावर संदीप आणि गोर्बी सोवियट युनिअनमधलं टेन्शन कसं कमी करायचं ह्या महत्त्वाच्या विषयाकडे वळतात.

field_vote: 
4.2
Your rating: None Average: 4.2 (5 votes)

प्रतिक्रिया

मज्जा आली. वासलेकरांच्या लिखाणाच्या दर्जाची वासलात लावल्यावर आता या प्रकारानेही!

तो बाहेर गेल्यावर संदीप आणि गोर्बी सोवियट युनिअनमधलं टेन्शन कसं कमी करायचं ह्या महत्त्वाच्या विषयाकडे वळतात.

"आता हे अणूयुद्ध टाळण्याचा एकच उपाय"
"कोणता?"
"तीच तर गंमत आहे."
"आता हे अणूयुद्ध टाळण्याचा एकमेव उपाय माहित असणारा आमच्या बेन्सन जॉन्सन कंपनीत चपरासी का आहे ...." --- असा मी असामी, पु. ल. देशपांडे

प्रतिसादांमधून सोविएट युनियनमधलं टेन्शन कमी करू या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

परत एकदा वाचलं आणि ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या दुव्यानुसार गोर्बीने सँडीला बोलावलं होतं खरं, पुढचं तर फारच रोचक आहे.

In 1991, Sundeep set up Peace Initiatives, the first conflict resolution NGO in South Asia. Mikhail Gorbachev, who was then President of the Soviet Union, invited him to Kremlin for a conclave of world leaders. His conversations there and at other places resulted in The New World Order, a book of essays. A copy of the book somehow landed in the hands of the head of what was then the most extreme movement in Kashmir in his cell in the jail. When he was released, he contacted Sundeep to help find a solution to the conflict in Kashmir. Sundeep visited the valley in the middle of the worst violence in its history, without any security and negotiated humanitarian solutions with extremists pointing guns at me in the dark hours of night. In the following years, he came out with several publications on the issue and facilitated track two discussions.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा मजकूर स्वतः वासलेकर-मजकुरांनी लिहिलेला दिसतो. कदाचित ते विकीपानही त्यांनीच टा/टंकलेले असावे.

(तसे म्हटल्यास मीही इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, अटलबिहारी बाजपेयी, प्रमोद महाजन प्रभृतिंना भेटलो आहे आणि त्यांच्याजवळ त्यांच्याबाबत माझी मते व्यक्त केली आहेत : - तुमचा विजय असो... वगैरे) Wink पण मी माझे विकीपान केलेले नाही - विनय, विनय म्हणतात तो हाच!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म्म! या अश्या विनयामुळेच विद्या त्यांच्याकडे जाते तर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दिसतो? काल तर मी त्यात एक प्रथमपुरूषी वाक्य वाचले. आणि मग त्या साईटविषयीची माहिती घेतली तेव्हा परवडेल त्या किंमतीत वक्ते देणे हा त्यांचा धंदा (असू द्या, माझी हरकत नाही. फक्त ते धंदेवाईक असल्याची नोंद आवश्यक म्हणून केली) असल्याचे दिसले.
बाय द वे, त्या क्रेम्लिनमधल्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेची एकही बातमी, लेख, माहिती इंटरनेटवर कशी काय नाही? १९९२ साली निदान प्रगत राष्ट्रांमध्येही इंटरनेट नसावं हे मान्य केलं तरी, तेव्हाचा डेटा नंतरच्या काळात नेटवर आलेला असेलच की. आणि त्यातून ही इतकी महत्त्वाची परिषद कशी काय हुकली हे कळेना राव...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशीच शंका मलाही आहे.
पण मग वासलेकर नामक सद्गृहस्थ संपूर्ण खोटे बोलत आहेत असे म्हणू धजत नाही.(जाहिर पेप्रत छापून आल्याने काहीतरी तथ्य असणारच. जाहिर/लिखित थाप मारणे सोपे नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझ्या आकलनानुसार

१. क्रेम्लिनमधे अमेरिका आणि रशिया मधे परिषदेआधी(माद्रिद शांतता परिषद) शांतता करार झाला, त्या कराराच्या वेळेस वासलेकर उपस्थित असावेत.
२. १९९१ माद्रिद शांतता परिषदेमधे वासलेकरांना बोलावले अथवा नाही ह्याबद्दल माहिती सापडत नाही.
३. पण १५ वर्षानंतर २००७ मधे झालेल्या परिषदेत वासलेकरांना बोलावल्या गेल्याचे ह्या दुव्यावरुन लक्षात येते.

पण धंदेवाईक लेखनामधल्या फटी फारच आहेत हे खरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ध.. मा.. ल..
__/\__

पुन्हा एकदा ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

झकास ! मझा आगया !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास.........

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गेले काही दिवस हा लेख वाचू वाचू म्हणत होतो, पण त्याआधी तो संदीपचा लेख वाचावा लागणार होता. तसा माझ्या पीएने मला सारांश सांगितला होता. पण बराक ओबामाला आमच्या जवळच्या पिझ्झा हटमध्ये जेवायला बोलावलं होतं, त्या गडबडीत माझे सहा एक तास गेले. मग ते ऑक्युपाय मोन्सांटोचं काम आलं. सगळे मागेच लागले की आम्हाला ही चळवळ यशस्वी कशी करावी याबद्दल सल्ला द्या. द्यावाच लागला. नाहीतर आधी ते मोन्सांटोची बिल्डिंग लाठ्या, दगडं, पहारी वगैरेंनी तोडून टाकायची असं म्हणत होते. 'मोन्सांटो सिर्फ झाकी है, कम्युनिस्ट क्रांती बाकी है' असल्या त्यांच्या काहीतरी घोषणा होत्या. मग त्यांना जरा समजावावं लागलं, की आजकाल क्रांती वगैरे करण्याऐवजी त्या कंपन्यांच्या आवारात जाऊन झोपायचं असतं. त्यासाठी मला स्वित्झर्लंडला जाऊन सगळ्यांशी चर्चा करायला लागली. मग लागलीच झिंबाब्वेमध्ये जावं लागलं. मुगाबेला झिंबाब्वेची क्रिकेटची टीम कशी सुधारावी याबद्दल सल्ला हवा होता. झिंबाब्वेमध्ये आता सर्व लोकांनी धन, स्वातंत्र्य वगैरे मिळवण्याची आशा इच्छा सोडलेली आहे. लोकांनी आपल्या सार्वभौमत्वावर आपल्या हातांनी पाणी ओतलेलं आहे. हे सांगताना मुगाबेचं हृदय जड झालं होतं, आणि आवाज कापरा झालेला मी स्वतः पाहिला. माझा सल्ला त्याला इतका भावला होता की 'तू फक्त हो म्हण, मला जे नोबेल पीस प्राइझ मिळणार आहे ते तुला निम्मं देईन' असं म्हणत होता.

तर सांगायचा मुद्दा काय की इतक्या महत्त्वाच्या, इतक्या लोकांना भेटायचं असल्यामुळे लेख वाचायला उशीर झाला. पण काही म्हण अरविंदा, तुला या लेखाबद्दल ज्ञानपीठ मिळालंच पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऎक्च्युअली बराक आणि राजेश जेवून बाहेर पडले तेव्हा मी तिथेच होतो तेव्हा माझ्याबरोबरच्या गृहस्थांनी "हा घासकडवी साहेबांबरोबरचा मनुष्य कोण आहे असे विचारले". Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

महाराष्ट्रात सध्या जो दुष्काळ चालू आहे यात काही मध्यस्थी करता येईल का तुमच्या ओळखीची गुर्जी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही