मत्स्यरंग
ठाण्यातल्या प्रदर्शनात टिपेलेली काही चित्रे.
मंद प्रकाशयोजना आणि माशांची सतत होणारी हालचाल अशा परिस्थितीत चित्रं टिपण्यासाठी आय एस ओ १००० स्पीड वापरला, शाटरस्पीड ५० तर अॅपरचर १४ वापरले, आवश्यकतेनुसार एक्स्पोजर काँपेन्सेशन दिले.
गढुळ पाणी, तरंगणारे कण, अस्बच्छ काचा, लोकांनी-विशेषतः मुलांनी हात लावल्याने काचांवर छाप/ डाग, सुकलेले ओघळ होते. त्यामुळे थोडा रसभंग होण्याची शक्यता आहे.
मानवी चेहरा असलेला हा मासा मोठा गमतीदार वाट्ला. हे महाशय कोपर्यात बराच वेळ लपले होते, समोर यायला बरीच वाट पाहायला लावली.

हेही वरच्या माशाचे भाईबंद, रंगात व आकारात थोडा फरक.
अचानक वळसा घेऊन दगडापलिकडुन समोर आलेला हा मासा समोरुन टिपला, जरा वेगळे रुप.
पांढर्या अंगावर केशरी भरतकाम असलेला गोल आकाराचा मासा मोठा मोहक होता
विचारमग्न?
पाण्यातली घोषणाबाजी?
आपल्या इवल्याश्या परानं वेगात पाणी कापणारा मासा अगदी समोरुन टिपला.
समोरुन टिपलेला आणखी एक मासा - उतरणार्या विमानागत दिसला
वराहमुखी मासा?
कोंबडा मासा??? हा कोंबड्यासारखा तुरा आहे की मेंदु डोक्याबाहेर डोकावतोय?
धन्यवाद
अभिप्रायासाठी आभारी आहे.
अमुक, मी - निळा रंग हा प्रखर झोतामुळे बिंबला आहे, मुळ रंग नाही शिवाय प्रकाशाचा तो एकमेव उगम असल्याने टाळणे शक्य नव्हते.
ऋता - कॅमेरा निकॉन डी ९०, लेन्स टॅमरॉन १७-५०/(२.८)
ऋषिकेश - समोरुन वेग टिपायचा तर पॅनिंग बाद. दुसरा पर्याय शटर स्पीड कमी ठेवणे, त्यामुळे प्रतिमा काहीशी फराटल्यागत येईल, अचूक नियंत्रित झाल्यास गतीचा आभास होइल. उदा. पर जर फराटा स्वरुपात दिसला तर तो हलत असल्याची जाणीव होईल मात्र पूर्ण शरीराची सुस्पष्टता गेल्यास मजा जाइल.
धन्यवाद.










वेगळेच आहेत सगळे मासे. एका
वेगळेच आहेत सगळे मासे.
एका बाजुने घेतलेले फोटो आवडले.