दि ग्रेट एडव्हेंचर

नथुराम गोडसे आणि औरंगजेब
एकाने एका हिंदूला मारले
दुसऱ्याने अनेक हिंदूंना मारले
नथुरामचे समर्थन करणारे
नेहमीच द्वेषाचे धनी असतात
औरंग्याच्या कबरीवर फुले, चादर चढवणारे
इतिहासाची आब राखणारे असतात म्हणे
थोडक्यात काय,
तुम्ही एकाला मारता की अनेकांना
यावरून इतिहासात खलपुरुष ठरतो
एकाला मारण्याचा इतिहास पारदर्शक असतो
अनेकांना मारल्याचा इतिहास संदिग्ध असतो
कबर, समाधी आणि अस्थी
ज्याची त्याची प्रेरणास्थाने
आजूबाजूला मांडली गेली
अलौकिक वैचारिक दुकाने
दुकाने चालण्यासाठी विक्रेता,
ग्राहक, उत्पादक सदैव सत्पर
सोबत येतातच गुंतवणूकदार,
विपणन शीघ्र सत्वर
प्रत्येकाने नेमलाय एक्स्लुसिव्ह डीलर
विथ एक्सीक्युटिव्ह एरिया मॅनेजर
धर्म, भाषा, प्रांत, संस्कृती हे
संविधानाने बांधणे हेच दि ग्रेट एडव्हेंचर

©भूषण वर्धेकर
१९ मे २०२२
पुणे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

द ग्रेट स्ट्रॉमॅन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे, यांना नथुरामाची पूजा बांधायचीय, नि त्याकरिता सबब म्हणून औरंगजेबाला पुढे करताहेत. कोठल्या पातळीवर पोहोचले आहेत, पाहा. (सबबीकरिता का होईना, यांना औरंगजेब लागावा ना?)

(बाकी काही म्हणा, हिंदुस्थानात हा औरंगजेब नसता, तर आरएसएस, भाजपसुद्धा नसती. बरे झाले असते.)

(पण मग त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी शोधून काढले असतेच म्हणा. आणि न सापडल्यास निर्माण केले असते, आहे काय नि नाही काय? बोंबला, छपरांवरून बोंबला, 'हिंदुत्व खतरे में हैऽऽऽऽऽऽ!')

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही एकाला मारता की अनेकांना
यावरून इतिहासात खलपुरुष ठरतो
एकाला मारण्याचा इतिहास पारदर्शक असतो
अनेकांना मारल्याचा इतिहास संदिग्ध असतो

म्हणूनच हिटलर आरएसएसवाल्यांमध्ये इतका लोकप्रिय आहे काय?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही लोकांना हिटलर गोड वाटतो
काहींना मुघल आधुनिक वाटतो
काहींना टिपु सुलतान स्वातंसेनानी वाटतो
कहींना औरंगजेब पुजनीय वाटतो
काहींना गोडसे शहीद देशभक्त वाटतो
काहींना काहीच्या काहीही वाटते

लोकशाहीत सगळं चालतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

अशी लोक राजकारणी लोकांसाठी खूप महत्व राखून असतात...

गांधी हत्या का?
धार्मिक कारण.
हिटलर प्रिय.
वंश वर आधारित हत्याकांड.
साम्य तर आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रस्ते, वीज, पाणी, पर्यावरणपूरक विकास, चांगली आरोग्य व्यवस्था, शिक्षणसंस्था वगैरे अंधश्रद्धा आहेत.
जैसी प्रजा तैसा राजा.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू