काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २१: ६ नोव्हेंबर २०२१

दिनेशभाई त्यांच्या गावी गेले असल्यामुळे टॅक्सी पहिल्या शिफ्टच्या राजकुमारकडेच होती.

म्हणून ह्या वेळेस गाडी शनिवारी रात्रीच घरी आणून ठेवायचा प्लॅन होता.

म्हणजे उद्या जरा आरामात उठता आलं असतं.

राजकुमारकडून रात्री ९:३० च्या सुमारास गाडी उचलली. तडक घरी जायचाच प्लॅन होता पण भाडीच लागत गेली Smile

तीसुद्धा नाना चौक, नवजीवन सोसायटी, सँडहर्स्ट रोड, ऑपेरा हाऊस अशी

बाय द वे गिरगावच्या आंबेवाडी जवळच्या एका घराची ही कुमारसंभवातील पार्वतीच्या बिसतंतूही न पास होणाऱ्या यौवन-कुंभांच्या मदनघळीइतकी चिंचोळी एंट्री.

gully

फारच सुंदर आणि सरिअल आहेय ही.

ह्या घरात गोद्रेजचं कपाट किंवा सोफा कसा नेला असेल असा प्रश्न मला पडला पण हू केअर्स!

कदाचित नीलकमलच्या सुटसुटीत खुर्च्या वापरत असतील ते लोक्स.

मग ग्रॅण्ट-रोडच्या दिल्ली-दरबारचं भाडं आलं.

बाय द वे ग्रॅण्ट-रोडच्या(च) दिल्ली-दरबारची बिर्याणी खास.

कुलाबा माहीम वगैरेला ही त्यांच्या ब्रॅंचेस आहेत आणि त्याही वाईट नाहीयेत पण...

परिणीती तरी कुठे वाईट आहे पण प्रियांका चोप्रा (जोनास ) उच्चा प्रकार आहे तसंच दिल्ली दरबार ग्रॅण्ट रोडचंच.

दिल्ली दरबारच्या जरा पुढे एक माणूस उचलला त्याला परेल व्हिलेजला जायचं होतं.

खासच होता तो एकदम फ्रेंडली.

आपण त्याला प्रवीण म्हणूयात.

बसल्या बसल्या थेट गप्पा हाणायला लागला मस्तपैकी.

तो वैश्यवाणी आहे म्हणजे लक्ष्या बेर्डेच्या ज्ञातीतला हे त्यानं पहिले छूट सांगून टाकलं.

परेल लालबाग भागात ह्यांच्या समाजाची बरीच तंबाखूची - होलसेल किराणाची दुकानं होती / आहेत हेही सांगितलं.

मग माझं काय लग्नं - मुलं वगैरे स्टेटस विचारून घेतलं.

आमचा मुलांशिवाय DINK रहायचा प्लान सांगितला तेव्हा तो थोडा अचंबला पण त्याला जास्त करून स्वतःविषयीच शेअर करायचं होतं.

अगदी गरज लागलीच तर सगळी सेवींग्ज गदागदा हलवून (त्याचेच शब्द) तो पंधरा लाख उभे करू शकेल हेही त्यानं अभिमानानं सांगितलं.

मग डायरेक्ट त्यानं स्वतःच्या सेक्स लाइफला हात घातला.

आजकाल पहिल्यासारखा ड्राइव्ह येत नाही हे ही सांगून टाकलं.

आणि चाळीशीपुढे गेल्याने असं असेल का हेही विचारून टाकलं.

आता मी काही डॉक्टर वत्स किंवा सेक्स एज्युकेशन मधला कुमार-थेरपिस्ट ओटीस किंवा त्याची सायकॉलॉजिस्ट आई डॉ. मिलबर्न नसल्याने मी त्याला माझ्या परीने जेनेरिकच सल्ला दिला.

(बाय द वे सेक्स एज्युकेशन पहिले दोन सीझन्स मस्त. तिसरा चालू केलाय पण सगळे नेहमीचेच ट्रोप्स असल्यासारखे वाटतायत नव्या सीझनमध्ये. ॲक्टींग अर्थातच छान खास करून रुबी मस्त!)

तर त्याला सांगितलं की कधी कधी हा फेज असू शकतो, जास्त लोड न घ्यावा वगैरे. (लोड वरती ही पन इन्टेन्डेड हेहेहे Lol

त्याला परेल व्हिलेजच्या अरुंद रस्त्यावर सोडला.

हा तोच रस्ता जिकडे मी एकदा अनंत सामंतांसारख्या दिसणाऱ्या एका हँडसम माणसाला सोडलं होतं.

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १४: (३ जानेवारी २०२१)

उतरतानाही प्रवीणने बिचाऱ्याने आईस्क्रीम खाणार का विचारलं.

भारी प्रेमळ होता.

परेल व्हिलेज जवळच एका मुलाला उचलला.

त्यानंही मन बरंच मोकळं केलं. ऑफीस-बॉय होता तो.

"मालक पगार बरा देतो पण राब राब राबवतो", तो सांगत होता.

"मग घरी जायला उशीर होतो नी चायनीज बांधून घ्यावं लागतं". रोज चायनीज खाऊन त्याच्या छातीत थोडं दुखूही लागलं होतं.

मला पंकज भोसलेच्या कथेतील रोज चायनीज खाणारा (खावं लागणारा) तुकाराम आठवल्यासारखा झाला.

एकंदरीत काय तर:

बारमधला काउंटर पुसत दारू भरणारा बारमन, चर्चमधला जाळीच्या अलीकडचा पाद्री आणि आम्ही टॅक्सीवाले ह्यांचा जॉब एकच आहे:

ऐकणं !!!

आजची कमाई:

(फार तर दोन तासांत ) ३७० रुपये (अजिबातच वाईट नाहीये)

क्रमश:
आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ४ (२९ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ५ (१९ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ६ (२६ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ७ (२ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ८ (९ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ९ (२३ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १० (१ मार्च २०२०)
टॅक्सी दिवस ११: ८ मार्च २०२० (विमेन्स डे)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १२ (१नोव्हेम्बर २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १३ (१५ नोव्हेम्बर २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १४: (३ जानेवारी २०२१)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १५: (१४ फेब्रुवारी २०२१)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १६: २१ फेब्रुवारी २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १७: २९ ऑगस्ट २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १८: १२ सप्टेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १९: १९ सप्टेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २०: २४ ऑक्टोबर २०२१

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान चालू आहे. २०२२ ला नवस संपणार बहुतेक Smile

खरं तर हा म्हणजे २०वाच दिवस ना? दुसरा दिवस अर्धा होता ना? अजून हा अर्धा

बाकी कोणाला आवडो ना आवडो, मला हा फॉर्म आवडला , कवितेसारखा रिलॅक्स मोड मधे चालू आहे.

जमल्यास संपल्यावर नीट संपादन करून, एक चांगले ईबुक प्रकाशीत करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार टिपीके Smile
यस्स आता थोडेच दिवस राहीलेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निल शेठ, भारी चाललंय काम तुमचे.
चालू राहू देत(म्हणजे तुम्हाला एन्जॉय होत असेल तर)
वाचायला मजा येतीय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार अ. बा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाय द वे गिरगावच्या आंबेवाडी जवळच्या एका घराची ही कुमारसंभवातील पार्वतीच्या बिसतंतूही न पास होणाऱ्या यौवन-कुंभांच्या मदनघळीइतकी चिंचोळी एंट्री.

भयानक सुंदर वाटली. त्या वरच्या दारात एक श्यामल षोडशा दार उघडून खाली पहात असावी असा भास झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0