काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २२: ७ नोव्हेंबर २०२१

काल रात्री टॅक्सी घरीच असल्यामुळे आज मलबारहील ऐवजी आमच्या गव्हर्नमेन्ट कॉलनीतूनच सुरुवात केली.

हे सगळे कॉलनीतल्या टॅक्सी स्टॅन्डवरचे नेहमीचे टॅक्सीवाले.

टॅक्सी मिळवण्यासाठी जेव्हा मी आणि बिको जंग जंग पछाडत होतो तेव्हा आम्ही ह्या सगळ्यांचं मेजर डोकं खाल्लेलं त्यामुळे सगळे मला नीटच ओळखतात.

आज मला साक्षात टॅक्सीसकट आणि युनिफॉर्ममध्ये बघून सगळ्यांना आनंदच झालेला

इस्मायल, रफीकभाई, नौशाद, नजीम, सैदू, पट्टू, ओमान असे सगळे.

मिलेनियल्सच्या थोडा आधीचा जन्म असल्याने सेल्फी मला कधीच काढता येत नाहीत.

सो कातरलेल्या सेल्फीचे अपश्रेय पूर्ण माझेच.

Selfie

team

पुढे मग एका यंगीश आई-बाबा आणि मुलाला सहकार नगर (वडाळ्याला) सोडलं.
ही सुद्धा एक छान सुबक ( अजूनतरी ) विक्राळ टॉवर्स नसलेली तीनचार मजली बिल्डींग्सची बऱ्यापैकी मोठी कॉलनी.
मुंबईत एकेकाळी अशा बऱ्याच सुबक कॉलनीज होत्या.

आमची वांद्र्याची गव्हर्नमेंट कॉलनी, सांताक्रुझची पोस्ट अँड टेलिग्राफ कॉलनी, अंधेरीचं विजयनगर, बोरिवलीची नॅन्सी कॉलनी वगैरे वगैरे.

rasta

तिथेच हलका व्हायला एका इंडस्ट्रीयल इस्टेटच्या टॉयलेटमध्ये गेलो.
अंधाऱ्या बोळकांड्यावाल्या इंडस्ट्रीयल इस्टेट्स मुंबईत किंवा कोणत्याही मोठ्या शहरात थोड्याफार फरकाने अशाच दिसत असाव्यात बहुधा.

इथे अर्थातच छोट्या इंडस्ट्रीज आणि बरेचदा लहान किंवा मध्यम फिल्म कंपन्यांची प्रॉडक्शन हाउसेस, चित्रकार किंवा शिल्पकारांचे स्टुडिओज, स्टार्टअप कंपन्या असंही बरंच काय काय असतं.

दिवाळीनंतरचा रविवार असल्याने आज मात्र ही गांजा मारलेल्या स्टोनरसारखी सुम्म होती.
alley

आजचा दिवसही तसाच.
प्रांजळपणे सांगायचं तर खास काही नाही.

आजची कमाई:
३७४ रुपये

क्रमश:
आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ४ (२९ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ५ (१९ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ६ (२६ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ७ (२ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ८ (९ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ९ (२३ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १० (१ मार्च २०२०)
टॅक्सी दिवस ११: ८ मार्च २०२० (विमेन्स डे)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १२ (१नोव्हेम्बर २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १३ (१५ नोव्हेम्बर २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १४: (३ जानेवारी २०२१)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १५: (१४ फेब्रुवारी २०२१)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १६: २१ फेब्रुवारी २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १७: २९ ऑगस्ट २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १८: १२ सप्टेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १९: १९ सप्टेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २०: २४ ऑक्टोबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २१: ६ नोव्हेंबर २०२१

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

द्या टाळी. आपल्यालाही सेल्फी बिल्फी काढायला जमत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचे लेख वाचत असतो.
एक सांगा, हे जे दररोजची कमाई लिहीतात ती पेट्रोल, इंधन, वरखर्च खर्च वजा करून असते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

नमस्कार!
तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळेल:खर्च

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अच्छा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही