डळमळलेल्या जगातून - अमेरिकेचे भवितव्य टांगणीवर

अमेरिकेसह जगभरात या निकालाबद्दल आश्चर्य आणि अविश्वास व्यक्त होत आहे.
ट्रम्प यांचं बेधडक, तारतम्यविहीन आणि गर्विष्ठ व्यक्तिमत्त्व पाहता ते काय
गोंधळ घालू शकतील, याविषयी जगभरात काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं
आहे.

जवळजवळ चार वर्षांपुर्वी, ट्रंप यांच्या निवडणूकीनंतर, लिहलेल्या एका छोट्याश्या लेखाचा शेवट वरील दोन ओळींनी मी केला होता. येत्या मंगळवारी येऊन ठेपलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर चार वर्षांत ट्रंप यांनी जागतिकस्तरावर काय काय गोंधळ घालून ठेवला आहे याचा थोड्क्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न. सविस्तर आढावा घेण्यास अनेक पुस्तके पुरणार नाहीत अशी भिती वाटते.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील जागतिक घडामोडींत आंतरराष्ट्रीय संघटनांचा सिंहाचा वाटा होता असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या देशांनी मिळून यातील काही संघटनांची प्रथम निर्मिती केली. दुसर्‍या महायुद्धाच्यावेळी तत्कालिन अमेरिकेचे अध्यक्ष फ्रॅंकलिन रूझवेल्ट यांनी इंग्लडचे पंतप्रधान चर्चिल यांना विश्वासात घेऊन युनायटेड नेशन्स (UN) ची संकल्पना प्रथम कागदावर उतरवली. त्यानंतर अस्तित्वात आलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय संघटनंच्या कार्याने आजच्या ग्लोबल ऑर्डरची वीण शिवलेली आहे.

नोबेल पुरस्काराने गौरवलेल्या युएनच्या (UN) 'पीसकिपींग फोर्सने' जगातील अनेक तंटे सोडवण्यात महत्त्वाचे कार्य केले आहे. यामध्ये आफ्रिकेतील अनेक यादवी युद्धं, दक्षिण अमेरिकेतील युद्धं आणि बंड, युरोपमधील युगोस्लाव्ह युद्ध आणि बोस्नियन युद्ध, मध्य पुर्वेतील तंटे, आशिया खंडातील भारत-पाकिस्तान, इंडोनेशिया-तिमोर, रशिया-अफगाणिस्तान या आणि अशा अनेक ठिकाणी या फोर्सने शांतता राखण्यास मदत केलेली आहे. पिसकीपींग फोर्सच्या वार्षिक खर्चातील सुमारे 28% योगदान अमेरिका करते (2019 साल).अमेरिका हा सर्वाधिक योगदान करणारा देश आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ही युएनचीच एक संस्था आहे. जागतिक आरोग्य उत्तम राखण्याच्या उद्देशाने स्थापलेल्या या संस्थेच्या यशाच्या निवडक नोंदी म्हणून देवीचे (smallpox) निर्मुलन, पोलियेचे जवळजवळ उच्चाटन, मलेरीया, टीबी, इबोला आणि एड्स यांसारख्या रोगांवर अटकाव यांसारखी उदाहरणं देता येतील. WHO च्या वार्षिक खर्चातील सुमारे 16% योगदान अमेरिकेने 2018 साली केले. बील गेट्स यांनी त्याशिवाय 10% योगदान दिले. अमेरिका हा सर्वाधिक योगदान करणारा देश आहे.

ग्लोबलायझेशनमुळे आंतराष्ट्रीय व्यापाराचे नवल आता उरलेले नाही. जागतिक व्यापाराच्या नियमनावर देखरेख करणारी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनाईझेशन (WTO) ही सुद्धा युएनचीच एक संस्था आहे. देशांमधील परस्पर व्यापार सुकर करण्यास आणि व्यापारातील तंटे सोडवण्यात ही संस्था मदत करते. WTO च्या वार्षिक खर्चातील सुमारे 12% योगदान अमेरिका करते. अमेरिका हा सर्वाधिक योगदान करणारा देश आहे.

यांचबरोबर NATO, IMF, World Bank, UNESCO यांसारख्या संघटनांच्या कार्यात अमेरिकेचा वाटा मोठा राहीलेला आहे. आणि म्हणूनच, आजच्या 'वर्ल्ड ऑर्डरमधील' अमेरिकेचे स्थान वादातीत आहे.

ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्षपद स्विकारताच या वर्ल्ड ऑर्डरला सुरूंग लावण्यास सुरवात केली आहे. ट्रंप यांनी युएनच्या बजेटमध्ये मोठ्याप्रमाणावर कपात केली आहे. या कपातीचा मोठी झळ युएनच्या 'पीसकिपींग फोर्स'ला लागणार आहे. ट्रंप यांनी जागतिक साथीच्या (pandemic) काळात WHO तून अमेरिकेची माघार घोषीत केली आहे. शिवाय, ट्रंप यांनी WTO बद्दल केलेल्या विधानांकडे पाहता अमेरिका WTO मधूनही माघार घेण्याची शक्यता आहे.

Trans Pacific Partnership (TPP)

राष्ट्राध्यक्षपद स्विकारताच ट्रंप यांनी प्रशांत महासागरातील 12 देशांनी एकत्र येऊन केलेल्या TPP मधून माघार घेतली. उरलेल्या 11 देशांनी अमेरिकाला वगळून नविन स्वतंत्र करार केला. आंतरराष्ट्रीय व्यापारात चीनविरुद्ध एक मोठी आघाडी उघडण्याची संधी ट्रंप यांनी घालवली. यांच्या बेभरवशी अमेरिकेच्या कारभाराची ही सुरवात होती. चीन बरोबर दोन वर्ष करयुद्ध खेळल्यानंतर अमेरिकेला TPP मध्ये आता सामिल होण्याची इच्छा आहे असेही ट्रंप यांनी बोलून दाखवले.

पॅरीस क्लायमेट अग्रीमेंट   

ग्लोबल वॉर्मिंगविरोधात लढा देण्यासाठी जगातील 196 देशांनी केलेल्या पॅरिस क्लायमेट अग्रीमेंट मधून 2017 साली ट्रंप यांनी माघार घेतली. या निर्णयामुळे ट्रंप यांनी अमेरिकेला इराण, येमेन, टर्की यांसारख्या देशांच्या पंक्तीत नेऊन बसवले. ट्रंप यांच्या या निर्णयाचा विरोध जगभर झालाच पण अमेरिकेतील अनेक राज्यांनी या करारानुसार प्रदुषणात अटकाव आणण्याचे धोरण आम्ही कायम ठेऊ असे जाहीर केले.    

ईराण अणुशस्त्र करार (Iran Nuclear Deal) 

2015 साली  अमेरिका, रशिया, चीन, इंग्लड फ्रान्स, जर्मनी आणि युरोपीयन युनियनने इराणबरोबर अणुशस्त्र निर्मिवर निर्बंध लावण्यास केलेल्या करारातून ट्रंप यांनी 2018 साली माघार घेतली. अमेरिकेशिवाय करार चालू राहील अशी घोषणा इतर देशांनी केली. अमेरिकेच्या या आक्रस्ताळेपणामुळे अमेरिकेच्या प्रतिष्ठेस इजा झाली आहे असे वक्तव्य युरोपीयन युनियन कमिशनचे अध्यक्ष यांनी केले. जागतिक महासत्ता म्हणून अमेरीकेची जागा आता युरोपने घेण्याची वेळ आली आहे असेही त्यांनी म्हटले.

 रशिया अणुशस्त्रनिर्बंध करार 

रशियाबरोबरच्या शीतयुद्धात झालेल्या शस्त्रनिर्मिती युद्धास (arms race) अटकाव घालण्यात अनेक आंतरराष्टीय करारांची मदत झाली. Open Skies Treaty, ज्यात करार केलेल्या देशांना विमानातून सर्वेक्षण करण्याची परवानगी होती, त्यातून ट्रंप यांनी माघार घेतली. शीतयुद्धानंतरच्या शांततेत महत्वपुर्ण ठरलेल्या शस्त्र-करारांपैकी फक्त एकच करार अमेरिका आणि रशिया यांमध्ये उरला आहे ज्याची मुदत येत्या फेब्रुवरीत संपते आहे. ट्रंप जर पुन्हा निवडून आले तर ह्या कराराची मुदत वाढण्याची शक्यता नाही. यामुळे शीतयुद्धानंतरच्या शांततेस तडा बसतो की काय अशी काळजी जगातील नेत्यांना लागली आहे.

North Atlantic Treaty Organization (NATO) 

दुसर्‍या महायुद्धानंतर निर्माण केलेल्या या संघटनेत आता उत्तर अमेरिका आणि युरोपमधील 30 देश समाविष्ट आहेत. या संघटनेतील करारानुसार या मधील कोणत्या एका देशावर हल्ला झाला तर त्याच्या संरक्षणाची जबाबदारी इतर संघटनेवरील देशांवर आहे. NATO मधील अनेक देशांत अमेरिकेचे सैन्य आहे. ट्रंप यांनी वेळोवेळी NATO वर टिकेची झोड उडवलेली आहे. NATO आता काल बाह्य झालेली आहे असे विधान (विशेषत: रशियाच्या पुर्व युरोपमधील ढवळाढवळीच्या पार्श्वभुमीवर) करून ट्रंप यांनी NATO देशांच्या नेत्यांमध्ये ट्रंप यांचा उद्देशाविषयी चिंता निर्माण केली आहे. ट्रंप NATO मधून माघार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. ट्रंप यांनी या कराराशी आपण एकनिष्ठ आहोत असे जाहीर करावे या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा निवडून आल्यास ट्रंप NATO मधून माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

जागतिकीकरणात आंतरराष्ट्रीय सहकार्यात आघाडीवर असणार्‍या अमेरिकेच्या अध्यक्ष ट्रंप यांनी युनायटेड नेशन्सच्या अधिवेशनतात भविष्य जागतिक सहकार्याचे नाही असे बोलून दाखवले. (हे भाषण प्रॉम्प्टवरून वाचून दाखवताना ट्रंप याच्या चेहर्‍यावरील माशीही हलणार नाही असे ढिम्म भाव होते!)

याच बरोबर ट्रंप यानी अनेक देशांबरोबर व्यापारी युद्ध सुरू केले आहे. युरोपिय युनियनवर उगारलेल्या व्यापारी युद्धाच्या पार्श्वभुमीवर युरोपियन युनियन कॉंन्सिलचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी "असले मित्र असताना शत्रूंची काय गरज" असे बोलून दाखवले.

पारंपरिक मित्र देशांची निंदा-नालस्ती करताना ट्रंप यांनी हुकमशहांचे मात्र कौतुक चालू ठेवले आहे. ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सनारो, नॉर्थ कोरीयाचे किम, फिलीपीन्सचे ड्युटर्टे, रशियाचे पुतीन यांची सतत स्तुती करतानाच त्यांनी केलेल्या दडपशाहीबद्दलही ट्रंप यांनी वेळोवेळी समर्थन दर्शविलेले आहे.

एकंदरीतच जगात हुकुमशहांचे प्रस्थ वाढत आहे. लोकशाहीच्या या घसरणीत अमेरिका नेहमीप्रमाणे अटकाव घालण्याचे प्रत्यत्न तर करत नाहीच आहे. उलट खुद्द अमेरिकेत ट्रंप यांनी लोकशाहीचे पाय भुसभुशीत करून ठेवले आहेत. अमेरिकेच्या मित्र देशांचा अमेरिकेवर भरवसा राहिलेला नाही. जागतिक संघटनां कमकुवत झालेल्या आहेत. ज्या ओव्हल ऑफिसमधून एकेकाळी जागतिक राजकारणाची सुत्रे हलविली जात होती, ते आता बेभरवशाचे झालेले आहे. आपल्या लोकशाही, स्वातंत्र्य इत्यांदी तत्वांची फुशारकी मारणार्‍या अमेरिकेतच ही तत्वं धोक्यात आलेली आहेत. अमेरिकेच्या माघारीमुळे रशिया आणि चीन यांचे प्रस्थ झपाट्याने वाढत आहे.  पुतीन यांनी तर 'उदारमतवाद कालबाह्य झाला आहे' असा दावाही केला आहे.

ट्रंप जर पुन्हा निवडून आले तर ही अमेरिकेची आणि पर्यायाने पाश्चिमात्य जगाने निर्माण केलेल्या ग्लोबल ऑर्डरची घसरण झपाट्याने होईल यात शंका नाही. पहिल्या चार वर्षांतली ट्रंप यांची निर्बंध वागणूक पाहता पुढील चार वर्षांत ते काय करू शकतात याची कल्पना करणेही अवघड आहे. ट्रंप जरी हरले तरी अमेरिकेच्या ढासळलेल्या प्रतिमेची पुर्नबांधणी करण्यास किती वेळ लागेल हे सांगणे अवघड आहे. अमेरिकेच्या मित्रदेशांना आता अमेरिकेच्या भरवशावर राहता येणार नाही. पुन्हा दुसरा ट्रंप भविष्यात अमेरिका निवडून आणणारच नाही याची शाश्वती देता येणार नाही. संपुर्ण जगाच्या पुढील वाटचालीवर परिणाम करण्याची शक्यता असलेल्या या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीवर जगाचे लक्ष लागून राहिले आहे यात शंका नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

२००५: जॉर्ज डब्ल्यू बुशने 'Pandemic Response Plan'ची घोषणा केली.

२०१४: इबोलाचा बव्हंशी यशस्वी मुकाबला केल्यावर ओबामाने, दूरगामी धोरण म्हणून 'Pandemic Preparedness team' तयार केली आणि ६९ पानांचं 'प्लेबुक' तयार केलं:
The 69-page document, finished in 2016, provided a step by step list of priorities – which were then ignored by the administration.
दुवा: https://www.politico.com/news/2020/03/25/trump-coronavirus-national-secu...

ओबामाने त्यावेळी National Institute of Health दिलेलं भाषण मुळातूनच ऐकण्याजोगं आहे. (डॉ. फाऊची त्यावेळी उपस्थित होते) - पण तितका वेळ नसेल तर खालील व्हिडिओ जिथून सुरु होतो - त्यापुढचं एक मिनिटभर ऐका.

There may and likely will come a time in which we have both an airborne disease that is deadly. And in order for us to deal with that effectively, we have to put in place an infrastructure -- not just here at home, but globally -- that allows us to see it quickly, isolate it quickly, respond to it quickly. And it also requires us to continue the same path of basic research that is being done here at NIH that Nancy is a great example of. So that if and when a new strain of flu, like the Spanish flu, crops up five years from now or a decade from now, we’ve made the investment and we’re further along to be able to catch it. It is a smart investment for us to make. It’s not just insurance; it is knowing that down the road we’re going to continue to have problems like this -- particularly in a globalized world where you move from one side of the world to the other in a day. (दुवा)

२०१८/२०१९: ट्रम्पतात्यांनी Pandemic Preparedness team खालसा केलीच; पण त्याशिवाय गेली दहा वर्षं अव्याहत चालू असणारा pandemic early warning program ही बंद केला.

A decision to wind down the program was made, however, in September, just three months before the first reports of people becoming infected with Covid-19 in Wuhan, China. The end of the program saw the departure of dozens of scientists and analysts working to identify potential pandemics in countries around the world, including China. (दुवा)

२०२०: खरं तर, हे पुन्हा लिहायची गरज भासू नये - पण ट्रम्पतात्या रोजच इतके गुण उधळत असतात की, त्यांचे तीन-चार महिन्यांपूर्वीचे पराक्रम विस्मरणात जाणं, साहजिक आहे:

- कोव्हिड-१९ ची साथ ही आधी hoax होती; मग तो सर्वसामान्य फ्ल्यु असून तो एप्रिलमध्ये थंडी ओसरली की त्याचं निराकरण होणार होतं; मग एप्रिल संपत आला आणि कोव्हिड आटोक्यात येईना तेव्हा "स्टेबल जीनियस" तात्या अल्ट्राव्हायलोट लाईट किंवा ब्लीचचा उपाय सुचवू लागले (“Supposing we hit the body with a tremendous — whether it’s ultraviolet or just very powerful light,” Mr. Trump said. “And I think you said that hasn’t been checked, but we’re going to test it?” he added, turning to Mr. Bryan, who had returned to his seat. “And then I said, supposing you brought the light inside the body, either through the skin or some other way.”).

- वैट्ट, वैट्ट, दूश्ट कोव्हिड्ने तरीही जुमानलं नाही. अनेक राज्यांनी प्रतिबंधात्मक उपाय योजले - विशेषत: ओहायोच्या रिपब्लिकन गव्हर्नरने उचललेली पावलं निश्चितच स्पृहणीय होती. तसेच उपाय थोड्याफार फरकाने मिनेसोटा, मिशिगन इत्यादी राज्यांत राबवले गेले. ह्या राज्यांत, डेमोक्रॅटिक गव्हर्नर असल्याने आणि त्या राज्यांवर तात्यांचा डोळा असल्याने तात्यांनी कोव्हिडला वगैरे फाट्यावर मारून "LIBERATE MICHIGAN!" ची हाक दिली.

(कल्पना करा: देशाचा विद्यमान अध्यक्षच आपल्या समर्थकांना एक राज्य स्वतंत्र करण्याची हाळी देतो आहे!!! लिंकनला तरी हे जमलं असतं का? उगाच नाही तात्या आपली सतत लिंकनशी तुलना करत!)

मग शेकडो शूरवीर आपल्या बंदुका घेऊन, मास्क लावण्याच्या जुलमी नियमाचा निषेध करण्यासाठी, मिशिगनच्या स्टेटहाऊसात घुसले:

- बाकी डॉ. ॲन्थनी फाऊचींसारख्या गेली पन्नास वर्षं रेगनपासून ओबामापर्यंत दोन्ही पक्षांच्या सरकारांसाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला फेडरल एजंट्सच्या संरक्षणाशिवाय घराबाहेर पडणं मुश्किल झालं. तात्या त्यांना फायर करायच्या मार्गावर आहेत, असं म्हणतात.

भरीस भर, म्हणून स्टीव्ह बॅनननेही काल डॉ. फाऊचींच्या शिरच्छेदाचा मानस बोलून दाखवला. रिपब्लिकन पक्षात ख्रिश्चन तालिबान्यांचं प्रस्थ वाढल्याचं ऐकून होतो - त्याला इतकी ढळढळीत पुष्टी मिळेल, असं वाटलं नव्हतं!

- बिचारा बायडेन गुमान नियम पाळून माफक प्रचार करत असताना, तात्यांनी मात्र आपल्या समर्थकांच्या प्रकृतीची तमा न बाळगता मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग शिवाय अनेक सभा घेतल्या (A new Stanford study concludes that Trump rallies resulted in more than 30,000 confirmed cases of COVID-19, and likely caused more than 700 deaths among attendees and their close contacts.. “The communities in which Trump rallies took place paid a high price in terms of disease and death,” the research concludes, conducted by economists from the university’s Institute for Economic Policy Research. जिज्ञासूंसाठी इथे तो ष्टडी उपलब्ध आहे: https://sebotero.github.io/papers/COVIDrallies_10_30_2000.pdf)

पण चालायचंच, अहो लाखो (आतापर्यंत सुमारे अडीच लाख) मेले तरी चालतील; पण त्या लाखोंच्या बळावर मार-आ-लागोचं कर्ज फेडणारा, डॉयश बँकेचा पोशिंदा तगला पाहिजे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'जो आवडतो सर्वांना' हे तर सिद्ध झालं पण 'तोची आवडे देवाला' असे होऊन आयर्न थ्रोनवर कमळी बसू नये हीच त्या लिबर्टीदेवीच्या चरणी प्रार्थना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही कमेंट्स दिसत नाहीयेत. रिफ्रेश केल्यावर दिसत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

निकालानंतर च्या झळकणाऱ्या बातम्या आणि निकालाआधीच्या बातम्या बघायच्या. Smile
त्याहून कहर म्हणजे
ट्रम्पतात्या आणि ज्योआप्पा यांचे डब केलेले मराठीतील व्हिडीओज अफलातून आहेत.
आपल्याकडे मीम्स तयार करणाऱ्या लोकांच्या क्रिएटिव्हिटीला तोड नाही.
Smile Wink
ऐसीअक्षरेवर असे मीम्स, व्हिडीओज शेअर केले तर चालतील काय?
कसे करावेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

गो फॉर इट.

यूट्यूब किंवा फेसबुकवर फोटो, व्हिडिओ एंबेड करण्याची लिंक मिळेल. ती इथे डकवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

निकालाआधी

निकालानंतर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने