डळमळलेल्या जगातून - अमेरिकेचे भवितव्य टांगणीवर

अमेरिकेसह जगभरात या निकालाबद्दल आश्चर्य आणि अविश्वास व्यक्त होत आहे.
ट्रम्प यांचं बेधडक, तारतम्यविहीन आणि गर्विष्ठ व्यक्तिमत्त्व पाहता ते काय
गोंधळ घालू शकतील, याविषयी जगभरात काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं
आहे.

जवळजवळ चार वर्षांपुर्वी, ट्रंप यांच्या निवडणूकीनंतर, लिहलेल्या एका छोट्याश्या लेखाचा शेवट वरील दोन ओळींनी मी केला होता. येत्या मंगळवारी येऊन ठेपलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर चार वर्षांत ट्रंप यांनी जागतिकस्तरावर काय काय गोंधळ घालून ठेवला आहे याचा थोड्क्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न. सविस्तर आढावा घेण्यास अनेक पुस्तके पुरणार नाहीत अशी भिती वाटते.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील जागतिक घडामोडींत आंतरराष्ट्रीय संघटनांचा सिंहाचा वाटा होता असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या देशांनी मिळून यातील काही संघटनांची प्रथम निर्मिती केली. दुसर्‍या महायुद्धाच्यावेळी तत्कालिन अमेरिकेचे अध्यक्ष फ्रॅंकलिन रूझवेल्ट यांनी इंग्लडचे पंतप्रधान चर्चिल यांना विश्वासात घेऊन युनायटेड नेशन्स (UN) ची संकल्पना प्रथम कागदावर उतरवली. त्यानंतर अस्तित्वात आलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय संघटनंच्या कार्याने आजच्या ग्लोबल ऑर्डरची वीण शिवलेली आहे.

नोबेल पुरस्काराने गौरवलेल्या युएनच्या (UN) 'पीसकिपींग फोर्सने' जगातील अनेक तंटे सोडवण्यात महत्त्वाचे कार्य केले आहे. यामध्ये आफ्रिकेतील अनेक यादवी युद्धं, दक्षिण अमेरिकेतील युद्धं आणि बंड, युरोपमधील युगोस्लाव्ह युद्ध आणि बोस्नियन युद्ध, मध्य पुर्वेतील तंटे, आशिया खंडातील भारत-पाकिस्तान, इंडोनेशिया-तिमोर, रशिया-अफगाणिस्तान या आणि अशा अनेक ठिकाणी या फोर्सने शांतता राखण्यास मदत केलेली आहे. पिसकीपींग फोर्सच्या वार्षिक खर्चातील सुमारे 28% योगदान अमेरिका करते (2019 साल).अमेरिका हा सर्वाधिक योगदान करणारा देश आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ही युएनचीच एक संस्था आहे. जागतिक आरोग्य उत्तम राखण्याच्या उद्देशाने स्थापलेल्या या संस्थेच्या यशाच्या निवडक नोंदी म्हणून देवीचे (smallpox) निर्मुलन, पोलियेचे जवळजवळ उच्चाटन, मलेरीया, टीबी, इबोला आणि एड्स यांसारख्या रोगांवर अटकाव यांसारखी उदाहरणं देता येतील. WHO च्या वार्षिक खर्चातील सुमारे 16% योगदान अमेरिकेने 2018 साली केले. बील गेट्स यांनी त्याशिवाय 10% योगदान दिले. अमेरिका हा सर्वाधिक योगदान करणारा देश आहे.

ग्लोबलायझेशनमुळे आंतराष्ट्रीय व्यापाराचे नवल आता उरलेले नाही. जागतिक व्यापाराच्या नियमनावर देखरेख करणारी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनाईझेशन (WTO) ही सुद्धा युएनचीच एक संस्था आहे. देशांमधील परस्पर व्यापार सुकर करण्यास आणि व्यापारातील तंटे सोडवण्यात ही संस्था मदत करते. WTO च्या वार्षिक खर्चातील सुमारे 12% योगदान अमेरिका करते. अमेरिका हा सर्वाधिक योगदान करणारा देश आहे.

यांचबरोबर NATO, IMF, World Bank, UNESCO यांसारख्या संघटनांच्या कार्यात अमेरिकेचा वाटा मोठा राहीलेला आहे. आणि म्हणूनच, आजच्या 'वर्ल्ड ऑर्डरमधील' अमेरिकेचे स्थान वादातीत आहे.

ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्षपद स्विकारताच या वर्ल्ड ऑर्डरला सुरूंग लावण्यास सुरवात केली आहे. ट्रंप यांनी युएनच्या बजेटमध्ये मोठ्याप्रमाणावर कपात केली आहे. या कपातीचा मोठी झळ युएनच्या 'पीसकिपींग फोर्स'ला लागणार आहे. ट्रंप यांनी जागतिक साथीच्या (pandemic) काळात WHO तून अमेरिकेची माघार घोषीत केली आहे. शिवाय, ट्रंप यांनी WTO बद्दल केलेल्या विधानांकडे पाहता अमेरिका WTO मधूनही माघार घेण्याची शक्यता आहे.

Trans Pacific Partnership (TPP)

राष्ट्राध्यक्षपद स्विकारताच ट्रंप यांनी प्रशांत महासागरातील 12 देशांनी एकत्र येऊन केलेल्या TPP मधून माघार घेतली. उरलेल्या 11 देशांनी अमेरिकाला वगळून नविन स्वतंत्र करार केला. आंतरराष्ट्रीय व्यापारात चीनविरुद्ध एक मोठी आघाडी उघडण्याची संधी ट्रंप यांनी घालवली. यांच्या बेभरवशी अमेरिकेच्या कारभाराची ही सुरवात होती. चीन बरोबर दोन वर्ष करयुद्ध खेळल्यानंतर अमेरिकेला TPP मध्ये आता सामिल होण्याची इच्छा आहे असेही ट्रंप यांनी बोलून दाखवले.

पॅरीस क्लायमेट अग्रीमेंट   

ग्लोबल वॉर्मिंगविरोधात लढा देण्यासाठी जगातील 196 देशांनी केलेल्या पॅरिस क्लायमेट अग्रीमेंट मधून 2017 साली ट्रंप यांनी माघार घेतली. या निर्णयामुळे ट्रंप यांनी अमेरिकेला इराण, येमेन, टर्की यांसारख्या देशांच्या पंक्तीत नेऊन बसवले. ट्रंप यांच्या या निर्णयाचा विरोध जगभर झालाच पण अमेरिकेतील अनेक राज्यांनी या करारानुसार प्रदुषणात अटकाव आणण्याचे धोरण आम्ही कायम ठेऊ असे जाहीर केले.    

ईराण अणुशस्त्र करार (Iran Nuclear Deal) 

2015 साली  अमेरिका, रशिया, चीन, इंग्लड फ्रान्स, जर्मनी आणि युरोपीयन युनियनने इराणबरोबर अणुशस्त्र निर्मिवर निर्बंध लावण्यास केलेल्या करारातून ट्रंप यांनी 2018 साली माघार घेतली. अमेरिकेशिवाय करार चालू राहील अशी घोषणा इतर देशांनी केली. अमेरिकेच्या या आक्रस्ताळेपणामुळे अमेरिकेच्या प्रतिष्ठेस इजा झाली आहे असे वक्तव्य युरोपीयन युनियन कमिशनचे अध्यक्ष यांनी केले. जागतिक महासत्ता म्हणून अमेरीकेची जागा आता युरोपने घेण्याची वेळ आली आहे असेही त्यांनी म्हटले.

 रशिया अणुशस्त्रनिर्बंध करार 

रशियाबरोबरच्या शीतयुद्धात झालेल्या शस्त्रनिर्मिती युद्धास (arms race) अटकाव घालण्यात अनेक आंतरराष्टीय करारांची मदत झाली. Open Skies Treaty, ज्यात करार केलेल्या देशांना विमानातून सर्वेक्षण करण्याची परवानगी होती, त्यातून ट्रंप यांनी माघार घेतली. शीतयुद्धानंतरच्या शांततेत महत्वपुर्ण ठरलेल्या शस्त्र-करारांपैकी फक्त एकच करार अमेरिका आणि रशिया यांमध्ये उरला आहे ज्याची मुदत येत्या फेब्रुवरीत संपते आहे. ट्रंप जर पुन्हा निवडून आले तर ह्या कराराची मुदत वाढण्याची शक्यता नाही. यामुळे शीतयुद्धानंतरच्या शांततेस तडा बसतो की काय अशी काळजी जगातील नेत्यांना लागली आहे.

North Atlantic Treaty Organization (NATO) 

दुसर्‍या महायुद्धानंतर निर्माण केलेल्या या संघटनेत आता उत्तर अमेरिका आणि युरोपमधील 30 देश समाविष्ट आहेत. या संघटनेतील करारानुसार या मधील कोणत्या एका देशावर हल्ला झाला तर त्याच्या संरक्षणाची जबाबदारी इतर संघटनेवरील देशांवर आहे. NATO मधील अनेक देशांत अमेरिकेचे सैन्य आहे. ट्रंप यांनी वेळोवेळी NATO वर टिकेची झोड उडवलेली आहे. NATO आता काल बाह्य झालेली आहे असे विधान (विशेषत: रशियाच्या पुर्व युरोपमधील ढवळाढवळीच्या पार्श्वभुमीवर) करून ट्रंप यांनी NATO देशांच्या नेत्यांमध्ये ट्रंप यांचा उद्देशाविषयी चिंता निर्माण केली आहे. ट्रंप NATO मधून माघार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. ट्रंप यांनी या कराराशी आपण एकनिष्ठ आहोत असे जाहीर करावे या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा निवडून आल्यास ट्रंप NATO मधून माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

जागतिकीकरणात आंतरराष्ट्रीय सहकार्यात आघाडीवर असणार्‍या अमेरिकेच्या अध्यक्ष ट्रंप यांनी युनायटेड नेशन्सच्या अधिवेशनतात भविष्य जागतिक सहकार्याचे नाही असे बोलून दाखवले. (हे भाषण प्रॉम्प्टवरून वाचून दाखवताना ट्रंप याच्या चेहर्‍यावरील माशीही हलणार नाही असे ढिम्म भाव होते!)

याच बरोबर ट्रंप यानी अनेक देशांबरोबर व्यापारी युद्ध सुरू केले आहे. युरोपिय युनियनवर उगारलेल्या व्यापारी युद्धाच्या पार्श्वभुमीवर युरोपियन युनियन कॉंन्सिलचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी "असले मित्र असताना शत्रूंची काय गरज" असे बोलून दाखवले.

पारंपरिक मित्र देशांची निंदा-नालस्ती करताना ट्रंप यांनी हुकमशहांचे मात्र कौतुक चालू ठेवले आहे. ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सनारो, नॉर्थ कोरीयाचे किम, फिलीपीन्सचे ड्युटर्टे, रशियाचे पुतीन यांची सतत स्तुती करतानाच त्यांनी केलेल्या दडपशाहीबद्दलही ट्रंप यांनी वेळोवेळी समर्थन दर्शविलेले आहे.

एकंदरीतच जगात हुकुमशहांचे प्रस्थ वाढत आहे. लोकशाहीच्या या घसरणीत अमेरिका नेहमीप्रमाणे अटकाव घालण्याचे प्रत्यत्न तर करत नाहीच आहे. उलट खुद्द अमेरिकेत ट्रंप यांनी लोकशाहीचे पाय भुसभुशीत करून ठेवले आहेत. अमेरिकेच्या मित्र देशांचा अमेरिकेवर भरवसा राहिलेला नाही. जागतिक संघटनां कमकुवत झालेल्या आहेत. ज्या ओव्हल ऑफिसमधून एकेकाळी जागतिक राजकारणाची सुत्रे हलविली जात होती, ते आता बेभरवशाचे झालेले आहे. आपल्या लोकशाही, स्वातंत्र्य इत्यांदी तत्वांची फुशारकी मारणार्‍या अमेरिकेतच ही तत्वं धोक्यात आलेली आहेत. अमेरिकेच्या माघारीमुळे रशिया आणि चीन यांचे प्रस्थ झपाट्याने वाढत आहे.  पुतीन यांनी तर 'उदारमतवाद कालबाह्य झाला आहे' असा दावाही केला आहे.

ट्रंप जर पुन्हा निवडून आले तर ही अमेरिकेची आणि पर्यायाने पाश्चिमात्य जगाने निर्माण केलेल्या ग्लोबल ऑर्डरची घसरण झपाट्याने होईल यात शंका नाही. पहिल्या चार वर्षांतली ट्रंप यांची निर्बंध वागणूक पाहता पुढील चार वर्षांत ते काय करू शकतात याची कल्पना करणेही अवघड आहे. ट्रंप जरी हरले तरी अमेरिकेच्या ढासळलेल्या प्रतिमेची पुर्नबांधणी करण्यास किती वेळ लागेल हे सांगणे अवघड आहे. अमेरिकेच्या मित्रदेशांना आता अमेरिकेच्या भरवशावर राहता येणार नाही. पुन्हा दुसरा ट्रंप भविष्यात अमेरिका निवडून आणणारच नाही याची शाश्वती देता येणार नाही. संपुर्ण जगाच्या पुढील वाटचालीवर परिणाम करण्याची शक्यता असलेल्या या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीवर जगाचे लक्ष लागून राहिले आहे यात शंका नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

...या सगळ्याबद्दल मी ट्रम्पला तितकासा जबाबदार धरणार नाही.

(नाही, म्हणजे, ट्रम्पने जागतिक पातळीवर काय किंवा राष्ट्रीय पातळीवर काय, ही जी काय सगळी घाण करून ठेवल्याचे हे जे सगळे दाखले वर या लेखात तुम्ही दिले आहेत, त्यांच्या विरोधात मला काहीही म्हणायचे नाही. त्या सर्व दाखल्यांच्या ग्राह्यतेबद्दल मला व्यक्तिशः यत्किंचितही शंका नाही. परंतु तरीही.)

Trump is not the disease. He is merely a symptom. The real rot lies elsewhere.

ट्रम्प फक्त उघड बोलतो, इतकेच.

----------

(जाऊ द्या. आणखी बोलून स्वतःचे तोंड विटाळण्याची इच्छा नाही. आणि, त्याने परिस्थितीवर काहीही फरक पडणार नाही; फक्त, माझे फ्रस्ट्रेशन वाढेल, इतकेच होईल. सद्यपरिस्थितीत, मत देणे - फॉर व्हॉटेव्हर दॅट मे हॅव बीन वर्थ - एवढेच माझ्या हातात होते, आणि ते मी इमानेइतबारे केले. याहून अधिक माझ्या हातात काहीही नाही. ट्रम्प पुन्हा निवडून आला - आणि/किंवा सेनेटमधील बहुमत रिपब्लिकनांच्या हातात राहिले - तर मात्र वाट आहे, याबद्दल अर्थात सहमत आहे. असो.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्रंप ज्या पक्षाच्यावतीने राष्ट्राध्यक्ष झाले आहेत त्या पक्षाचे आधीही अध्यक्ष झालेले आहेत. Tillerson, Mattis, Kelly, Bolton, Pompeo, Barr वगैरे लोकांचे असणे/नसणे. आणि राष्ट्राध्यक्षाच्या लहरीप्रमाणे वागणे वगैरे यावर पुष्कळ उघड झालेले आहे. त्यामुळे नासलेला भाग पुष्कळ असला म्हणून ट्रंप यांना क्लीनचीट देता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

तिकडच्या घटनांबद्दल फारसे माहीत नाही पण एकूण नेटवरच्या लेखनांंतून असं वाटतं की 'इतर देशातली ढवळाढवळ आणि मदत थांबवून स्वत:च्या देशातल्या नागरिकांकडे लक्ष देणे ' या धोरणाला लोक सहमत आहेत आणि त्याचा परिणाम मतपेट्यांत दिसेल असा प्रवाह आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'इतर देशातली ढवळाढवळ आणि मदत थांबवून स्वत:च्या देशातल्या नागरिकांकडे लक्ष देणे '

ही ही ही ही ही हा हा हा हा हा हा! हो हो हो हो हो हो हा हा हा हा!!!

भलतेच बुवा विनोदी तुम्ही!

I desperately needed a laugh. Thank you very much!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आतापर्यंत अमेरिकेतला करोना-कोव्हिडच्या बळींचा आकडा - २,३१,०००+, दोन लाख ३१ हजारांपेक्षा जास्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अमेरिकेच्या नागरिकांचा मतांचा अंदाज यावा असे आणि इतके नेटवरचे लेख तुम्ही वाचत असाल तर कौतुक आहे.

प्यू रिसर्च वर याविषय अनेक सर्वेक्षणं झालेली आहेत. त्यातील एका सर्वेक्षणाचा फोटो खाली पहा. निष्कर्ष काय तो तुम्हीच काढा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

एकूण नेटवरच्या लेखनांंतून असं वाटतं की

च्रट्जी आय नो व्हेरे यु आर कमिंग फ्रॉम - , माबोवरती दोन्ही पक्ष 'ऑलमोस्ट' इक्वली डिव्हायडेड आहेत. हां 'शेंडेनक्षत्र' व 'राज' ही जास्त आर्टीक्युलेट मला तरी वाटतात व दोघे रिपब्लिकन आहेत. पण त्यांच्या अभ्यासू प्रतिसादांमुळे, तसेच मांडणीमुळे, ते प्रभावी वाटतात. त्यामुळे रिपब्लिकन्सचा वरचष्मा आहे असे वाटते. पण दोन्ही समसमान आहेत.
.
तुम्ही अजुन कोणत्या संस्थळाचे म्हणत असाल तर मला माहीत नाही मात्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Al-Jazeera, France 24, hindustan times यांची न्यूज आर्टिकलस. ( माबोचा धागा जोरात आहे पण कुठल्याही चर्चा धाग्यांपेक्षा जेव्हा लेख येतात तेव्हा लेखक स्वतंत्र मतं व्यक्त करून मोकळा होतो. अभ्यासू पत्रकार आपली मतं खोटी ठरली तरी मान्य करतात. )
बाकी इतरांच्या अपडेट्सध्ये
१)मेक्सिको सीमेला कुंपण,
२) पाकची मदत बंद, घ्यायची तर विमानं आणि शिक्षण विकत घ्या,
३) करोना काळातला भत्ता
यावर मतदार फिरतील असं ऐकलं आहे.

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे पडसाद दुसऱ्या देशांत उमटल्याशिवाय राहात नाहीत हे सर्वांनाच माहिती आहे आणि थोडेफार वाचन केले जातेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>> पण त्यांच्या अभ्यासू प्रतिसादांमुळे, तसेच मांडणीमुळे, ते प्रभावी वाटतात.
--- असो, असो! Smile

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि विदा पाहून मत देणारे वेगळे लोक असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? तुम्ही वर विधान केलंत की तुमचे जे काय वाचलं आहे त्यावरून मत असे झाले की "अमेरिकेतल्या लोकांचे मत ढवळाढवळी विरोधात आहे". मी तुम्हाला अमेरिकन लोकांनी स्वत: दिलेल्या मतांची आकडेवारी दिली जात तुम्ही केलेलं विधान चुकीचं होतं असं दिसतं. आता त्यात विदा पाहून देणारे लोक कोठून आले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ट्रंपने काय माती खाल्लीए किंवा निवडणुकांमध्ये काय तथाकथित घोटाळे केलेत हा भाग जरी एक वेळ बाजूला ठेवला, तरीही जे अमेरिकन लोक आज त्याच्या बाजूने उभे आहेत किंवा त्याला मत द्यायला तयार आहेत (आणि २०१६ मध्येही होते), त्यांची असे करण्यामागची कारणे काय आहेत? हे कोणी अभ्यासले आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कारणं साधारण अशी (उतरत्या क्रमाने)

२०१६:

१. पक्षनिष्ठा - एकूण मतदारांपैकी साधारण ८० ते ८५ टक्के मतदार आपल्या पक्षाच्या उमेदवारालाच मत देतात - मग तो किंवा ती त्यांच्या दृष्टीने कितीही सदोष डेमोक्रॅट वा रिपब्लिकन असो.

२. बदल - ८ वर्षं डेमोक्रॅटिक अध्यक्ष + अ-राजकीय क्षेत्रातील व्यक्तीला संधी देऊन पाहू, अशी मानसिकता.

३. अन्य - यात हिलरी क्लिंटनच्या विरोधात म्हणून झालेलं मतदान, आंतरराष्ट्रीय राजकारणात अलगीकरणाच्या धोरणाला महत्त्व देणारे (isolationist), कट्टर धार्मिक, निरनिराळ्या रंगांतले द्वेष्टे अशी अनेक कारणं सांगता येतील.

२०२०:

१. पक्षनिष्ठा - (मशारनिल्हे)

२. प्रस्थापितता (incumbency) - बव्हंशी, एकदा निवडून आलेल्या अध्यक्षाला पुन्हा अमेरिकन जनता निवडून देत आलेली आहे. थोरले बुश, कार्टर असे अपवाद अर्थातच आहेत - पण या पदाबरोबर ओघाने येणारी दृश्यमानता, प्रसिद्धी आणि प्रतिस्पर्धी पक्ष उमेदवारनिवडीच्या अंतर्गत लाथाळ्यांत गुंतलेला असताना मिळणारी सवड आणि कुमक - ह्या बाबींची मदत होतेच.

३. अन्य - यातही अनेक उपगट आहेत. सर्वोच्च न्यायालयात केलेली तीन न्यायाधीशांची नेमणूक हे खरंतर मिच मकॉनल आणि सिनेटचं कर्तृत्व (!); पण त्या कारणासाठी पुन्हा ट्रम्पला निवडून द्यायला उत्सुक असणारे लोक आहेतच - बव्हंशी पहिल्या प्रकारातले पक्षनिष्ठ. शिवाय ज्यांच्यावर सुमारे ४५ बिलियन डॉलर्सची खैरात केली असे मिडवेस्टातले शेतकरी हा लाभार्थी वर्ग आहेच.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण4
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय काळा माणूस देशाच्या सर्वोच्चपदी बसण्याविरोधात जमा झालेले गोरे वंशवादी; बॉटांच्या आर्मीनं हिलरी आणि डेमोक्रांटांविरोधात पसरवलेल्या अफवा - त्यामुळे अनेक डेमोक्रॅटांनी मतदान केलं नाही; तंत्राचा ट्रंपच्या कँपेननी करून घेतलेला वापर (फेसबुक-ट्वीटर मोठ्या जाहिरातदारांना घरची सेवा देतात); सीएनन ह्या वृत्तवाहिनीनं फुकटात ट्रंपला दिलेला एयर-टाईम ह्यांची भर बाकीच्या कारणांमध्ये पडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"If you can convince the lowest white man he's better than the best colored man, he won't notice you're picking his pocket. Hell, give him somebody to look down on, and he'll empty his pockets for you." - Lyndon B. Johnson.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोकणात आणि क्यानडातही.
Canada white Canada. "Send them back". Komagata Maru Japanise ship story.
असो चालायचेच. ही श्टुरी आताच वाचली खुशवंतसिंगाच्या पुस्तकात. ( Notes on great Indian Circus, collection of articles from Hindustan Times, Delhi.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

भटोबा, तुम्ही अमेरिकन अमेरिकन लोकांच्या बाबतीत विचारले आहेत ना ?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

सर्वप्रथम, 'अमेरिकन' अमेरिकन म्हणजे नक्की कोण अभिप्रेत आहेत तुम्हाला? पांढरे?

इतर अमेरिकन काय कमी अमेरिकन आहेत काय? की त्यांच्या मताला विदाबिंदूइतकेही महत्त्व असू नये?

('विदाबिंदू' प्रत्येकालाच असतात. आणि, बिगरपांढरे विदाबिंदूज़ मॅटर!)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय, गोरे.
असं म्हणतात की त्यांची संख्या ही भारतातून अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेल्या लोकांपेक्षा जास्त आहे.
त्यामुळे त्यांचे विदा बिंदू आकड्यात जास्त असण्याची शक्यता वाटली म्हणून विचारले हो ?
(मला हे जाणून घ्यायचे होते की भटोबा याना हौडी मोदी अटेंड करणाऱ्यांची मते जाणून घ्यायची की जुन्या (म्हणजे फार जुन्या नाय, गेल्या दोनक्षे वर्षे वाल्या....)
जावं दे च्या मारी.... न बा शेठ, तुमच्या सारख्या माणसाला एवढं विस्कटून सांगावं लागतंय म्हणजे प्रश्नातच गफलत असणार काही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकन लोक म्हणजे मला अमेरिकन नागरिक (किंवा ज्या कोणाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे असे सर्व लोक). यात हाव्डी मोदी कुठून आलं कळलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भटोबा, तुमच्यासारख्या झंटलमन लोकांला पण......
अहो हौडी मोडी टेक्सासात झाला होता, तिथे भारतीय वंशांचे अमेरिकी नागरिक असावेत असा संशय घेण्यास भरपूर जागा असावी ना ?
आणि ते अमेरिकेतील गौरवर्णीय लोकांच्या तुलनेत खूप असा प्रभाव कमी असावा ना ?
असो.
हे फक्त हौडी मोडी संदर्भातील स्पष्टीकरण आहे एवढेच समजावे.
बाकी तुमचा प्रश्न ....
असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला अमेरिकन राजकारणातलं असंही फारसं समजत नाही. इथे त्यात रस आणि अधिक माहिती असलेले, अमेरिकेत मतदानाचा अधिकार असलेले बरेच लोक आहेत, म्हणून मी प्रश्न विचारला. ट्रंपच्या नावाने इतका शिमगा होऊनही तो निवडून कसा आला हे मला समजून घ्यायचं होतं. हा विषय हाव्डी मोदीवर कसा गेला ते मला कळलं नाही. अमेरिकेत भारतीय वंशाचे नागरिक भले २०-२५ लाख असतील, पण अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या मानाने त्यांची टक्केवारी आणि पर्यायाने निवडणुकीच्या निकालावरचा प्रभाव कमीच असणार आहे हे मलाही कळतं. शिवाय हाव्डी मोदी कार्यक्रमाला काय फक्त भारतीय-अमेरिकन नागरिकांनाच प्रवेश होता असं काही होतं का? एच१बीवालं किंवा ग्रीनकार्डधारक पब्लिकही गेलं असेलच की ट्रका भरून. ते थोडीच मतदान करु शकणारेत? त्यामुळे हावडी मोदीचा अध्यक्षीय निवडणुकीवर प्रभाव तसाही नगण्यच असणार होता. त्यातल्या त्यात मोदी आणि ट्रंपनी आपापला ट्यार्पी वाढवून घेतला एवढंच फक्त त्याचं फलित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लाईट मध्ये लिहिलंय भटोबा.हौडी मोडी मुळे तुम्ही अपसेट व्हाल ही कल्पना नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> हौडी मोडी मुळे तुम्ही अपसेट व्हाल ही कल्पना नव्हती.

अप्शेट नाय झालो अण्णा. माझ्या सरळ प्रश्नाला 'हौडी'चं शेपूट कसं लागलं असा प्रश्न पडला म्हणून खुलासा केला.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीसी लिहितो बोलतो आणि मग हौडीवला/कमळवाला/पुणेकर समजतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडला.

रोमन सैन्य (म्हणे) शत्रुप्रदेशावर हल्ला करताना सुपीक जमिनीत मीठ पेरुन ती दीर्घकाळ पडीक राहील, अशा प्रयत्नांत असे - त्याच धर्तीचे तात्यांचे उपद्व्याप आहेत. अर्थात, तितका नियोजनबद्ध धोरणीपणा नाही हे एका अर्थी उत्तमच.

बाकी केवळ ओबामाला श्रेय मिळू नये म्हणून टीपीपीतून बाहेर पडणं [त्या करारातल्या, बारा सहभागी देशांच्या अर्थव्यवस्थांचा, जागतिक सकल उत्पन्नातला (GDP) एकत्रित वाटा सुमारे ४०% आहे] - म्हणजे 'आपलं नाक कापून दुसऱ्या अपशकुन' यातलाच प्रकार होता. दोन वर्षांनी, पुन्हा त्यात शिरण्याचा प्रयत्न करणं, हे अधिकच केविलवाणं होतं.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी केवळ ओबामाला श्रेय मिळू नये म्हणून टीपीपीतून बाहेर पडणं ... म्हणजे 'आपलं नाक कापून दुसऱ्या अपशकुन' यातलाच प्रकार होता.

'व्हाइट हाउसमधल्या ब्लॅक माणसा'मुळे सगळ्याच रिपब्लिकनांची टाळकी सटकली होती. आणि, त्या तिरीमिरीत, केवळ ओबामाला छळायचे/ओबामावर सूड घ्यायचा, हे एकच तत्त्व गाठीशी घालून रिपब्लिकनांनी जे जे म्हणून थैमान घातले, त्यातलेच एक मामुली उदाहरण समजावे काय हे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांची असे करण्यामागची कारणे काय आहेत? हे कोणी अभ्यासले आहे का?

(१) तात्या खमके वाटतात. चीनवर निर्बंध आणल्याने, ते देशातील रोजगार वाढवतील, देशाबाहेर गेलेली उत्पादनक्षमता परत आणतील असा विश्वास (भाबडा का असेना) वाटतो
(२) तात्या सरळ सरळ म्हणतात, पर्यावरणाची काळजी अन्य देश घेत नाहीत ज्यामुळे ते देश (चीन व भारत) कमी किंमतीत , भरपूर उत्पादन करु शकता. मग डेव्हलप्ड कंट्रीज/फ्री वर्ल्ड कंट्रीज नी का म्हणुन झक मारत पर्यावरणाच्या ऱ्हासाची काळजी करत, स्वत:ची इकॉनॉमी खड्ड्यात घालायची?
(३) बायडेन+कमला एकंदरच डेमोक्रॅटस लोकांना सोशिअलिस्ट वाटतात. कालच बातमी आली होती की व्हेनेझुएला च्या बाईने या त्यांच्या 'समाजवादी' कलाबद्दल काळजी व्यक्त केली/की प्रश्न विचारला त्यावर बायडेन यांनी तो समज खोटा असल्याचे सांगीतले. वेल गुड!! बट अ बिट लेट.
(४) बरं बंदुक बंदीवरचा तात्यांचा स्टँड योग्य का वाटतो तर - बंदुका काढुन घेणं या सेट अपमध्ये योग्य नाही कारण बॅड गाईज विल हॅव्ह देम , फक्त चांगल्या लोकांच्या हातून जातील. यु के मध्ये टिनएजर्स च्या गुंड गँग्जचा अनेकांना त्रास झाल्याचे ऐकीवात आहे. अमेरीकेता असले न्युइसन्स नसण्याचे एक कारण आहे प्रत्येकाकडे बंदूक असते/असू शकते. न जाणो पंगा घ्यायचो आणि आपलाच मुडदा पडायचा. तेव्हा लोकं लॉ & ऑर्डर पाळून असतात.
(५) बायडेन म्हणतो माझ्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये प्रत्येक स्तरावरती मुस्लिम असतील. असे धर्माचे राजकारण छातीठोकपणे करणारा राजकारणी सर्वांना काय समान लेखणार? - https://www.c-span.org/video/?476966-1/joe-biden-remarks-muslim-advocate...
(६) अमित जानी म्हणून 'डिव्हर्सिटी' कँपेन / ग्रुप चा प्रमुख होता, मला वाटतं मुस्लिम आऊटरीच कोऑर्डीनेटर. ताबडतोब तो छुपा भाजपा समर्थक आहे, म्हणुन मुस्लिमांनी आरडाओरडा सुरु केला व बायडेनने त्याची त्या पदावरुन हकालपट्टी केली. इतके आऊट ऑफ वे जाउन मुस्लिमांना हे लोक खूष ठेवायला बघतात. अमित जानी चांगला ऑर्गनायझर होता, केपेबल होता म्हणुन त्याच्या मेरीटवर त्याला हे पद दिले बरोबर, मग या कोल्हेकुईनंतर का लगेच काढले. असा 'धरसोड' नेता काय कामाचा? - https://timesofindia.indiatimes.com/world/us/biden-sidelines-pro-modi-in...
(७) कमला हॅरिस तर म्हणते - काश्मिरी एकटे नाहीत. आम्ही काश्मिरवरती लक्ष ठेउन आहोत व प्रसंग आल्यास आम्ही हस्तक्षेप करु. डेमोक्रॅटस प्रो पाकिस्तान आहेत असा निष्कर्ष काढता येतो की नाही यावरुन? एकंदर लक्षणं हिंदूंना भारतियांना डोकेदुखी व्हायचीच. - https://www.dawn.com/news/1509674
(१८) प्रमिला जयपालचा सेक्रेटरी मुस्लिम (पाकिस्तानी) आहे. हा मुद्दा लक्षणिय आणि रिप्रेझेंटेटिव्ह वाटतो. https://www.washingtonpost.com/opinions/2019/12/23/indias-foreign-minist...

India’s foreign minister refused to meet me. I won’t stop speaking out on human rights.

डेम्स रिप्रेझेन्टेटिव्ह प्रमिला जयपाल उवाच
(१९) बी एल एम चे अनेक लोक जाळपोळ करत, लुटालूट करत धुडगुस घालत फिरत होते तेव्हा बायडेनने चकार शब्दाने निषेध केला का? गोऱ्या लोकांचा चुकार व्हिडीओ दाखवु नका, काळे लोक 'ब्लॅक लाइव्हज मॅटर' या नावाखाली धुडगूस घालत होते हे त्या व्हिडीओने लपत नाही.
(२०) डेमोक्रॅटिक्स यांचा स्वत:चा अजेंडा आहे पण त्यातला मोठा पार्ट 'तिरस्काराचे (हेट) राजकारण' हाही आहे. हेट एव्ह्रीथिंग दॅट रिपब्लिकन्स हॅव्ह डन/डुईंग.
------------------------------------------------------------------
डेमोक्रॅटस चे काही चांगले मुद्दे - पोलिस फोर्स डिफंड करायचा नसेलही, पण रिफॉर्म नक्की करायचा आहे. पोलिसांवर थोडे नियंत्रण हवेच आहे हे सत्य आहे.
ॲबॉर्शनवरचा रिपब्लिकन्सचा स्टँड चूकीचा आहे. डेम्स बरोबर आहेत.

मला तर कोणाचबद्दल खास ममत्व नाही. शेवटच्या क्षणीही हात थरथरत होता - हा पक्ष की तो/ हा की तो? पण तेच आहे ना - दोन्हीकडचे समर्थक/विरोधक इतके प्रखरतेने आपापल्या पक्षाची बाजू घेतायत.
आज नवरा करणारे व्होटिंग. तो म्हणतोय तू ट्रंपला दिलस म्हणुन मी बायडेनला देतो म्हणजे न्युट्रल राहील कारण दोघंही शेवटच्या क्षणापर्यंत न्युट्रल होतो. ठरतच नाही भेंडी!! मी हिय्या करुन ट्रंपला मत दिले. माझ्याकरता - बायडेन - कमलाचे प्रो-पाकिस्तान धोरण टिपिंग पॉइन्ट ठरला. मुलगी कट्टर डेमोक्रॅट आहे. ती चर्चा करताना, आम्ही ऐकल नाही की तावातवाने निघून जाते. ओबामाकेअरची कट्टर समर्थक आहे, आम्हाला माणुसकी नाही म्हणते. रिझनेबल कॉस्ट इन्श्युरन्स प्रत्येकाचा हक्क आहे म्हणte

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मध्यंतरी 'हुलू'वर मालिका बघितली - Little Fires Everywhere. त्यातली काळी आई आपल्या मुलीबद्दल जागरुक असते. गोऱ्या बाईच्या संगतीनं आपली मुलगी गोऱ्यांसारखा विचार करायला लागेल, अशी भीती तिला वाटत असते. ती भीती मलाही स्वतःबद्दल अनेकदा वाटते. गोऱ्यांसारखा विचार म्हणजे एक उदाहरण, एकीकडे पोलिस अटक करण्याच्या नावाखाली काळ्या लोकांचा जीव घेतात, त्याबद्दल चकार शब्द नाही. पण निर्जीव वस्तू मोडल्या, जाळल्या की लगेच केवढा आवाज होतो! भारतात उच्चवर्णीय आणि अमेरिकेत गोरे, तसलेच!! माणसाच्या जिवापेक्षा वस्तू महत्त्वाची वाटते.

ती काळजी तुझ्या मुलीबद्दल करावी लागणार नाही, असं वाटतंय. More power to her.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देअर इज ऑल्सो समथिंग कॉल्ड 'रिव्हर्स रेसिझम'. प्लेयिंग व्हिक्टिम कार्ड. डेम्स यांच्या चांगल्या पॉइन्टसमध्ये मी म्हटले आहे की पोलिसांवरही निर्बंध जरुरीचे आहेत. बायडेन काळ्या लोकांना काहीही बोलायला तयार नाही. तीच गोष्ट टेररिझमची.

https://pbs.twimg.com/media/El4Y7GoU4AIh83w?format=jpg&name=360x360
.
https://pbs.twimg.com/media/El4Y7eyVkAAueTF?format=jpg&name=large

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असो. किमान मुलीसाठी तरी Little Fires Everywhere पाहाच, जमलं तर तिच्याबरोबरच, असा आगाऊ सल्ला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मलाही फार आवडली सीरियल. रीस आवडते म्हणून पाहायला चालू केली आणि बिंजवॉचिंग झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला आढावा. काही ठिकाणी अमेरिकेची हेजेमनी आणि सध्याची वर्ल्ड ऑर्डर चांगली आहे आणि ट्रंप तिला अडथळा आणतोय असा काहीसा राष्ट्रवादी (?) सूर जाणवला त्यातल्या पूर्वार्धाशी असहमत आहे. ट्रंपच्या राड्यांची दिलेली बहुतांशी उदाहरणं पटण्यासारखीच आहेत, मी त्यात इराणसोबत जवळजवळ सुरू केलेल्या युद्धाचाही समावेश करेन, पण हे अमेरिकेच्या गेल्या अर्ध्या शतकातल्या परराष्ट्रधोरणाच्या संदर्भात पाहिलं पाहिजे असं वाटतं.

नोबेल पुरस्काराने गौरवलेल्या युएनच्या (UN) 'पीसकिपींग फोर्सने' जगातील अनेक तंटे सोडवण्यात महत्त्वाचे कार्य केले आहे. यामध्ये आफ्रिकेतील अनेक यादवी युद्धं, दक्षिण अमेरिकेतील युद्धं आणि बंड, युरोपमधील युगोस्लाव्ह युद्ध आणि बोस्नियन युद्ध, मध्य पुर्वेतील तंटे, आशिया खंडातील भारत-पाकिस्तान, इंडोनेशिया-तिमोर, रशिया-अफगाणिस्तान या आणि अशा अनेक ठिकाणी या फोर्सने शांतता राखण्यास मदत केलेली आहे. पिसकीपींग फोर्सच्या वार्षिक खर्चातील सुमारे 28% योगदान अमेरिका करते (2019 साल).अमेरिका हा सर्वाधिक योगदान करणारा देश आहे.

ह्यासोबतच १९५३चा सीआयएने इराणमध्ये घडवून आणलेला सत्ताबदल, १९७३ साली चिलेमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवून टाकून हुकूमशाही सरकार स्थापणे, इंडोनेशियाच्या ईस्ट तिमोरवरच्या आक्रमणादरम्यान इंडोनेशियाला सढळ हाताने शस्त्रपुरवठा करणे आणि संयुक्त राष्ट्रांत इंडोनेशियावरील निर्बंध अगदी पोकळ राहतील हे बघणे, इस्रायलच्या गुंडगिरीला आणि पॅलेस्टाईनवरच्या बेकायदेशीर व्याप्तीला समर्थन देणे इ. गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ नये.

---
सोव्हिएत संघाच्या पतनानंतर नेटो का अस्तित्वात असावी हा माझ्या मते वैध प्रश्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का अस्तित्वास असावा, चुका काय झाल्या, गुण-दोष वगैरे आहे. पण म्हणून डाव उधळून फतकल मांडून रडणे म्हणजे पॉलिसी नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

पण म्हणून डाव उधळून फतकल मांडून रडणे म्हणजे पॉलिसी नव्हे.

अर्थात. ट्रंप ह्या विषयावर खूप विचार करून बोलतोय असं म्हणायचं नाहीच, किंबहुना तो ज्या प्रकारे वागतो ते धोकादायकच आहे. पण ट्रंप असं म्हटल्यावर सत्ताधारी माध्यमं ज्या जोमाने नेटोबद्दल फारशी चिकित्सा न करता नेटो आवश्यक आहेच म्हणायला धावतात त्याची गंमत वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माध्यमं काय म्हणतात यापेक्षा सभासद देश काय म्हणतात हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. ट्रंप यांच्या निर्णयाबद्दल स्पष्ट मतं त्यांनी व्यक्त केलेली आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

एका जर्मन न्यूज चॅनलने याच विषयावर केलेले वृत्तांकन नुकतेच पाहण्यात आले. जर्मन एम्बॉसीडर वगैरे लोकांच्या मुलाखती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

तात्याने कोर्टकचेरीची सुरुवात केली बी. म्हातारबा जिंकता जिंकता राहतेतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

सध्या फक्त धमकी दिली आहे - न्यू यॉर्क टाईम्सच्या बातमीनुसार.

"Biden Urges Patience as Trump Threatens Court Action"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ट्रंप म्हणतोय 'पेनसिल्व्हेनियातलं व्होटिंग थांबलं पाहीजे' , मिडीया ते उलटं करुन सांगतेय 'ॲज अपर ट्रंप काऊंटिंग थांबलं पाहीजे"
अरे .... ३ तारखेला, व्होटींग थांबायला नको होतं? या ज्या काउंटीज मधुन जी मेल-इन मतं येतायत ती ३ तरखेनंतर टाकलेलीही तुम्ही घेणार? काही टाईम स्टँप नाही. १० दिवस आपली मतं येतच रहाणार?

हे मिडीया कसं ध चा मा करतं त्याचे उत्तम उदाहरण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेनसिल्व्हेनियातलं मतदान कालच, ३ तारखेला थांबलेलं आहे. तात्या लोकांना कसा गंडवतो, ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. सर्वोच्च न्यायालयानं, जिथे तात्यानं, तात्याप्रेमी सेनेटनं घाईघाईत आणि पुरेशी चौकशी न करता किमान दोन न्यायाधीश बसवले आहेत, त्यांनीही ह्या प्रकाराला संमती दिलेली आहे.

तात्या खोटारडा आहे, तात्याचं बोलणं सत्यवचन मानू नका. त्याला लोकांमध्ये फूट पाडण्यात रस आहे. आणि तो यशस्वी होत आहे.

तात्याच्या ट्वीट्सवर तर अजिबातच विश्वास ठेवू नका. कारण तिथे तो ध-चा-महाबळेश्वर करतो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

https://www.foxnews.com/politics/pennsylvania-mail-in-ballot-postmark-ch...

A postmark could be particularly important in Pennsylvania after the Supreme Court ruled that ballots received by Friday, Nov. 6 can be counted, so long as they are postmarked by Election Day.

जर एन्व्हलप्स प्रि-पेड असतील तर युजवली 'टाइमस्टँप' नसतो. आता प्रश्न हा आहे की पोस्टल सर्व्हिसने ती काळजी घेतलेली आहे का की ३ तारखेपर्यंत आलेल्या, प्रत्येक, प्रिपेड एन्व्हलप्सवरतीही टाइमस्टँप आहे?
मग फक्त टाइमस्टँपवाली काऊंट करा. इतर मेल-इन बॅलटस काउंट करु नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तु्म्ही स्वतः दिलेलं उद्धरण वाचलंत का? ६ नोव्हेंबरपर्यंत मिळणारी मतं, ३ नोव्हेंबरपर्यंत पोस्टात टाकावी लागतात. मतदान कालच बंद झालेलं आहे.

Typically these prepaid envelopes are not automatically postmarked.

जर एन्व्हलप्स प्रि-पेड असतील तर युजवली 'टाइमस्टँप' नसतो. आता प्रश्न हा आहे की पोस्टल सर्व्हिसने ती काळजी घेतलेली आहे का की ३ तारखेपर्यंत आलेल्या, प्रत्येक, प्रिपेड एन्व्हलप्सवरतीही टाइमस्टँप आहे?
मग फक्त टाइमस्टँपवाली काऊंट करा. इतर मेल-इन बॅलटस काउंट करु नका.

हे पोस्टखातं ट्रंपच्या मित्राच्या अखत्यारीत आहेत, हे तुम्ही विसरलात, तात्या विसरला आणि फॉक्सन्यूज म्हणजे तर तात्यांचं घरचंच कुरण! सोयीसवडीनं, हवं तेवढं लिहायचं!

आता सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतरही त्यावर तात्या रडतोय. हेच ते सर्वोच्च न्यायालय, जिथे त्यानं अगदी गेल्या आठवड्यात नवी न्यायाधीश बसवली. हेच ते न्यायालय जिथे तात्या आणि त्याच्या सेनेटनं बलात्काराच्या आरोपाची चौकशी दडपून ब्रेट कॅव्हनॉ बसवला. हाच तो ब्रेट कॅव्हनॉ ज्यानं निकालपत्रात धडधडीत खोटारडेपणा केला आणि मतदारांना मतदानापासून परावृत्त करण्याचा निवाडा दिला. व्हरमाँट राज्याच्या मंत्र्यानं त्याला निकालातला विवक्षित भाग मागे घ्यायला लावला तरीही कॅव्हनॉनं निकाल बदलला नाही. तो तात्याला सोयीचा ठरणाराच ठेवला.

आणि हेच ते सर्वोच्च न्यायालय जिथे आता ६ सनातनी आणि रिपब्लिकनांना झुकतं माप देणारे आणि ३ पुरोगामी आणि डेमोक्रॅटांना झुकतं माप देणारे न्यायाधीश आहेत!

जर पेनसिलव्हेनिया राज्याचा निवडणुकांचे तपशील ठरवण्याचा अधिकार मान्य करायचा नसेल तर सगळ्याच राज्यांचे काही निर्णय घेण्याचे अधिकार अमान्य करावे लागतील. ते झेपणारे का ह्या बायबल बेल्टातल्या, माजी कन्फेडरेट राज्यांतल्या, गोऱ्या वंशवाद्यांना? न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्नियासारखे उदारमतवादी कायदे केलेले टेक्सस आणि फ्लोरिडाला चालणार नाहीत. तर केक खा किंवा ठेवा. दोन्ही एकदम जमणार नाही.

देशातल्या सगळ्या व्यवस्था तात्याला भ्रष्ट करता आलेल्या नाहीत. तरीही तात्या जमेल तितपत व्यवस्था पोखरतो आणि न्यायपालिकेबद्दलही सामान्य लोकांची दिशाभूल करून, समाजात फूट पाडतो. हरला तर तो निकाल स्वीकारण्याची आणि जबाबदारी घेण्याची तात्याची तयारी नाही, म्हणून हे सगळं सुरू आहे. तात्याच्या ट्रंप टॉवराभोवती मोठी सुरक्षा व्यवस्था उभारावी लागली. वॉशिंग्टन डीसीतही. ह्याची जबाबदारी सर्वस्वी त्याच्यावरच आहे. गेली चार वर्षं तो जे पेरत आला, तेच उगवतंय.

तात्या खोटारडा आहे. तात्या दुष्ट आहे. तात्याला तुम्ही मत द्या किंवा देऊ नका. फूट पाडणारे लोक कुठल्याही देशाच्या सर्वोच्च स्थानावर असणं कुणाच्याही हिताचं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फूट पाडणारे लोक कुठल्याही देशाच्या सर्वोच्च स्थानावर असणं कुणाच्याही हिताचं नाही.

ही टोपी खूप जणांना फिट बसेल नै ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तात्याला नावं ठेवली, तात्याला तात्या म्हणलं की मराठी ट्रोलधाड चालून येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कुठल्या ना कुठल्या आधारावर फूट पाडल्याशिवाय कोणाला देशाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचताच येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंधरा दिवसांपूर्वीची बातमी: Pa. Republican Lawmakers Remain Unwilling to Allow Early Vote Counting (दुवा)

With 15 days until the Nov. 3 presidential election, Republican lawmakers in the battleground state of Pennsylvania appeared unwilling Monday to authorize counties to process mail-in ballots before Election Day, seen as crucial to producing a prompt election result.

A spokesperson for the House Republican majority said in a statement that they have no plans to consider changes to election laws that will affect the Nov. 3 election.

County officials are still pushing for the change and say it could ensure the vast majority of ballots are counted within hours of polls closing.

They say that waiting until Election Day to dig into roughly 3 million mail-in ballots could require days to process enough ballots to project a winner in the presidential contest.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेनसिलव्हेनियाची मतं यायच्या आतच निकाल लागेल असं सध्या तरी दिसतंय. फज्जेची मज्जा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>> पेनसिलव्हेनियाची मतं यायच्या आतच...
--- PAs de quoi? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तू मेल्या संधी सोडू नकोस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

च्यामारी!
एकदमसे वक्त बदल दिया, जज्बात बदल दिया, हालात बदल दिया!
तात्याची बत्ती गुल! म्हातारबा पॉवरफुल!
पावसात भिजून भाषण दिलं की सत्ता मिळते हे पुन्हा एकदा सिद्ध!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

जहाज बुडायलं की उंदरं आधी पळ काढतेत!
तात्याच्या गच्छंतीबरोबर फॉक्स न्युज वगैरे जुने शय्यासोबती त्याच्यावर उडायला लागले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

ढोल ताशा मिरवणुकांसाठी तयार असतील ना लोक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकन माध्यमांतले बरेच लोक म्हणतायत की जरी ट्रंपतात्या जरी पडला तरी त्याला बक्कळ मतंही पडली आहेत. सबब तात्या गेला तरी तात्यागिरी संपणार नाही, उलट अधिक जोमाने सुरु होईल असे दिसते. आता मला राज्यनिहाय मतांची टक्केवारी, त्यातली दोही पक्षांची हमखास ठरलेली मतांची कुरणे वगैरे तपशील ठाऊक नाही. पण म्हणून मी विचारलेला मूळ प्रश्न - की एवढं सगळं असूनही ट्रंपला एवढी मतं कशी मिळतात? याचा अर्थ नंदनरावांनी दिलेल्या आणि माध्यमांत दिसणाऱ्या इतर काही कारणांच्या यादीप्रमाणे असा काढायचा का?
१. गोऱ्यांचा वर्णवर्चस्ववाद/कट्टर धार्मिकता - अमेरिका अधिकाधिक वर्णवर्चस्ववादी आणि कट्टर धार्मिक होत चालली आहे?
२. पक्षनिष्ठा - रिपब्लिकन्सची पक्षनिष्ठा केवळ त्या आधारावर अजूनही तात्याला मतं देण्याएवढी खरंच मजबूत असेल तर मग डेमॉक्रॅट्सची पक्षनिष्ठा कमी पडते असे म्हणावे लागेल.
३. आणि मग जर ट्रंपला लाभार्थी (आठवा: 'मी लाभार्थी, हे आहे माझं सरकार' वगैरे) वगैरे पब्लिकने निवडून दिलं असेल तर मग खरंच हे लोक आधी त्रासलेले होते आणि तात्याने त्यांचं भलं केलं म्हणावे लागेल.
४. कोव्हिड साथ - या निवडणुकीत करोना साथीची हाताळणी वाईट केल्याबद्दल सगळ्यांनी तात्याला लै झोडला. पण त्याला मिळालेली मतं पाहता लोकांना करोन साथीची हाताळणी त्याने घेतलेल्या इतर निर्णयांपेक्षा (जरी आपल्याला ते कितीही मूर्खपणाचे वाटत असले तरीही) कमी महत्वाची वाटली का?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>कोव्हिड साथ - या निवडणुकीत करोना साथीची हाताळणी वाईट केल्याबद्दल सगळ्यांनी तात्याला लै झोडला. पण त्याला मिळालेली मतं पाहता लोकांना करोन साथीची हाताळणी त्याने घेतलेल्या इतर निर्णयांपेक्षा (जरी आपल्याला ते कितीही मूर्खपणाचे वाटत असले तरीही) कमी महत्वाची वाटली का?>>>>> तात्याने इकॉनॉमी ओपन ठेवलेली आहे म्हणुन डिप्रेशन आलेले नाही. बायडनचा प्लॅन काय तर सॅनिटायझर्स आणि मास्क वाटणार, बरं आधी तर दे वेअर सिंगिंग अ डिफरंट ट्युन की देश बंदच ठेवा. त्यांचं राज्य असां तर बहुधा रिस्क न घेता सगळां बंदच राहीलं असतं. अजुन तरी सॅनिटायझर्स वाटण्यापलिकडे नक्की काय प्लॅन आहे कुणालाच ठाउक नाही
_______________
सिनियर सिटीझन्स प्रो-ट्रंप आहेत तर नवतरुण पीढीला सोशिआलिझमचे आकर्षण वाटते - असे सामान्य नीरीक्षण आहे. ज्यांना इकॉनॉमीबद्दल जास्त जिव्हाळा वाटला त्यांनी ट्रंपला मते दिलेली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

डेमक्रेट म्हणजे capitalist विचारसरणी?
युएस नकाशात अगदी पश्चिम आणि पूर्व भाग प्रो बिडेन ( निळा) दिसतो.
किंवा असा काही शिक्का नाहीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डेमोक्रॅटस म्हणजे ओबामाकेअर म्हणजे जे लोक अतिशय दारिद्र्यात आहेत, होमलेस आहेत त्यांना देखील टॅक्स्पेयर्स च्या पैश्यातून हेल्थ केअर देणार. हेल्थ्केअर फॉर ऑल. मिनेसोटात एक बाई बसस्टॉपवरती टंगळमंगळ करायची. बस/बसस्टॉप सर्वत्र असे लोक दिसत. मी तिला विचारले व्हेअर डु यु वर्क ती म्हणाली - आय गेट अनएम्प्लोयमेन्ट बेनेफिटस. तर अशा लोकांनाही टेक्स्पेयर्स च्या पैशातून सुविधा डेमोक्रॅटस देणार. म्हणजे सोशिॲलिझम.

कॅपिटॅलिझम म्हणजे प्रत्येक व्यक्तीने इतरांच्या हक्कांवर गदा न आणता, आपला विकास करायचा आणि त्यातून संपूर्ण समाजाची प्रगती आपोआप साधली जाते. अमेरीका या तत्वावरती चालते म्हणुन इथे मार्क झुकेरबर्ग आणि बेझोज तयार होतात. बायडेन कॉर्पोरेटसवरती टॅक्स वाढवणार का तर पैसे नकोत गरीबांना द्यायला. पण त्याने होणारे उलटेच वर्कर्स वेजेस अजुन कमी होउन बसणारेत.

डेमोक्रॅटस वॉन्ट रॅडिकल चेंजेस लाइक ब्रिंगिंग सोशिॲलिझम. बायडेन नाही म्हणतो की सोशिॲलिझम आणायचा विचार नाही पण त्याच्या प्लॅन्स्मुळे लोकं शब्दांपेक्षा कृतीवरती विश्वास ठेवतात व व्होट देत नाहीत.

असो हे प्रत्येकाने आपले आपण वाचून समजावुन घ्यायचे असते. अदरवाईज जो स्पष्टीकरण देत बसतो तो आहेच आयता बळीचा बकरा, रिडिक्युल करता आणि मॉकरी करता. मग त्याला बेस असो नसो. तुमचे कन्व्हिक्शन्स सपोर्ट करण्याचा तुम्हाला हक्क आहे, तुम्हालाही प्रश्न विचारण्याचा हक्क आहे, पण तशीच जबाबदारी आपण होउन वाचून समजावुन घेण्याचीही आहे.

मिडीयाचे कुल एड घटाघट पिउ नका. तात्या भलेही अँटाय्फेमिनिस्ट व नीच माणुस असेल त्याच्या कृतीने इकॉनॉमी तगेल असे वाटले म्हणुन त्याला मत. तो प्रेसिडेन्ट मह्णुन कसा आहे वि. माणुस म्हणुन कसा आहे. बायडेन भला देवमाणुस असेल परंतु त्याने अमेरीकेचा , व्हेनेझुएला करुन ठेवला तर त्याची काय पूजा करायची?

'पर्यावरणाचा पुळका' आहे बायडनला इतका तर पर्यावरण टिकवण्याकरता घ्यावे लागणारे, 'प्रिव्हेन्टिव्ह मेजर्स' चायना, भारत या देशांना तो पटवु शकतोय का (ट्रंपने हा प्रश्न त्याला डिबेटमध्ये विचारला होता)? आपणच 'पर्यावरण-पर्यावरण' फाइन ट्युनिंग करत बसायचं, मग जातायत जॉब्स बाहेर. अजुन कॉर्पोरेटसवरती टॅक्स लावा म्हणजे तर आऊटसोर्सिंगमुळे, अजुन जॉब्स्ची वाट लागेल. असे मित्र असतील तर शत्रू हवेत कशाला देशाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

>>> डेमोक्रॅटस म्हणजे ओबामाकेअर म्हणजे जे लोक अतिशय दारिद्र्यात आहेत, होमलेस आहेत त्यांना देखील टॅक्स्पेयर्स च्या पैश्यातून हेल्थ केअर देणार.
--- अतिशय दारिद्र्यात असणाऱ्या लोकांसाठी मेडिकेड आहे. मेडिकेड गेली पन्नासहून अधिक वर्षं दोन्ही पक्षांच्या . वास्तविक, रेगनच्या कारकीर्दीत मेडिकेअरचा मोठा विस्तार झाला. इतकंच नव्हे, तर ज्यांच्याकडे उपचार करुन घ्यायला पुरेसे पैसे नाहीत; पण आत्यंतिक निकड मात्र आहे - अशांना हॉस्पिटल्स केवळ पैशापोटी दाखल करून घ्यायला नकार देऊ शकणार नाहीत - अशी तरतूदही त्यात आहे.

The Emergency Medical Treatment and Active Labor Act (EMTALA)[1] is an act of the United States Congress, passed in 1986 as part of the Consolidated Omnibus Budget Reconciliation Act (COBRA). It requires hospital Emergency Departments that accept payments from Medicare to provide an appropriate medical screening examination (MSE) to anyone seeking treatment for a medical condition, regardless of citizenship, legal status, or ability to pay.

ओबामाकेअर हा वास्तविक निम्न मध्यमवर्गीयांसाठी उपयुक्त आहे. ओबामाकेअरमुळे मेडिकेडसाठी पात्र ठरण्यासाठी "अतिशय दारिद्र्यात, होमलेस" होईपर्यंत थांबण्याची गरज नाही - तर मेडिकेडला पात्र ठरण्यासाठी जी उत्पन्नाची मर्यादा दारिद्र्यरेषेखाली होती - ती वाढवण्यात आली. परिणामी केंटकी, वेस्ट वर्जिनिया, आयडाहो, नॉर्थ डकोटा ह्यासारख्या राज्यांतल्या निम्न मध्यमवर्गीय जनतेला मोठाच दिलासा मिळाला. (ही सारी प्रामुख्याने गरीब + श्वेतवर्णीय राज्यं आहेत आणि कट्टर रिपब्लिकन).

अर्थात, हा ओबामाकेअरचा एक भाग झाला. प्रिएक्झिस्टिंग कंडिशन्स हा दुसरा (ट्रम्पतात्या कधी याच्या समर्थनात असतात, तर कधी विरोधात!). त्याव्यतिरिक्त अन्य चांगलेवाईट मुद्दे आहेतच. पण तूर्तास इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!! रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

मुळात रिपब्लिकन हा देव-धर्म मानणारा, व्यक्तिपूजाही त्यातलीच, पक्ष. म्हणजे सगळे लोक असेच असं नव्हे. पण ह्या प्रकारचे लोक रिपब्लिकन कल असणारे मुख्यत्वे असतात. मग आपल्या दैवतांवर शंका घेणं सर्वथैव चूक. आता हा तात्याच पाहा. बायकांनी ह्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. मेलानियाशी लग्न केलेलं असताना स्टॉर्मी डॅनियल्सबरोबर तात्या झोपला ही बातही वादातीत आहे. हे ख्रिश्चन धार्मिकांना एरवी चालेल का? पण तात्या आपला तारणहार आहे, असं समजलं की त्याचे सगळे अपराध पोटात घालणार. तात्यामुळे बायकांना गर्भपात करणं कठीण झालं ना, मग ख्रिश्चनांना तो आपला वाटणार.

किंवा तो आपला वाटूनच घ्यायचा असं काहीबाही कारणांनी ठरवलं. तर त्याचं अस्सल खोटं बोलणं चालवून घ्यायचं. निवडणुकीच्या दिवसापासून तो पुराव्याशिवाय घोटाळे झाल्याचे आरोप करत सुटला आहे. ह्यातून समाजात फूट पडते वगैरे बघायचं नाही.

'गुड इकॉनॉमिक्स फॉर हार्ड टाईम्स'मध्ये बॅनर्जी आणि दुफ्लोंनी लिहिलेलं आहे ते काहीसं असं - आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवल्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था सुधारली. पण स्थानिक पातळीवर लोकांच्या नोकऱ्या गेल्या, दुर्दशा झाली वगैरे. आयातकर वाढवल्यामुळे जे चीन-अमेरिकेत जे व्यापारयुद्ध सुरू झालं, त्यात स्थानिकांचं काही प्रमाणात भलं झालं. दुसरीकडे विस्कॉन्सिनचा शेतकरी देशोधडीला लागतो आहे. आणि एकुणातच देशपातळीवर नुकसान झालं असावं (हे शेवटचं वाक्य माझं कंजेक्चर.) पण जिथे रोजगार वाढले तिथली मतं तात्याला मिळाली.

नवभांडवलवादानुसार तुमच्याकडे पैसे आहेत, तर मग तुम्ही यशस्वी. जे लोक काहीबाही कारणांनी मागे पडले आहेत, त्यांचीच चूक आहे. (म्हणजे काळे लोक वंशवादी समाज आणि धोरणांमुळे मागे पडलेले असले तरीही चूक त्यांचीच. हा नवभांडलवाद.) तर आंतरराष्ट्रीय व्यापार वाढल्यावर ज्या लोकांची दुर्दशा झाली, त्या लोकांना कुणी शत्रू हवे होते, दोष देण्यासाठी. हे लोक प्रामुख्यानं गोरेच आहेत. भांडवलवादाच्या ह्या रूपाला अमेरिकेत दोष देणं म्हणजे देशद्रोहच. (आपल्याकडे असं मंदिर किंवा मोदींना काही नावं ठेवली की जसं समजतात तसंच.) भांडवलवाद म्हणजे देशप्रेम वगैरे. मग ते खरेखोटे शत्रू तात्यांनी तयार केले किंवा समोर आणले. आणि कुणाच्या बाची भीडभाड न बाळगता, म्हणजे पोलिटिकल करेक्टनेस वगैरे सगळा सोडून, ट्वीटरास्त्र उगारलं. अनेक लोकांना तोही प्रकार आवडतो. आता तर qanon नामक चाळ्यांवर विश्वास ठेवणारी बाई जॉर्जियामधून* खालच्या सभागृहात, अमेरिकी काँग्रेसमध्ये निवडून गेली आहे. ह्या लोकांना ट्रंपसुद्धा धुतल्या तांदळाचा किंवा पोलिटिकली करेक्ट वाटतो, एवढे हे लोक व्यवस्थेवर अविश्वास ठेवणाऱ्यांतले आहेत.

*बरं, ह्याच जॉर्जियातून डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवाराला १९९२नंतर राष्ट्रध्यक्षपदासाठी पुरेशी मतं मिळालेली नव्हती. सध्या तात्या तिथून १५००+ मतांनी मागे पडला आहे. (आज पहाटे हा बदल दिसला, तोवर तात्या पुढे होता.)

ह्या सगळ्यात भांडवलवाद निराळा आणि नवभांडलवाद निराळा. किंवा साम्यवाद निराळा आणि करुणा निराळी, वगैरे गुंतागुंतीची विधानं करायची तर त्यासाठी ट्विटर किंवा फेसबुक पुरत नाही. तिथेही काही साधी विधानं केली तर त्याला उठाव येत नाही. आरडाओरडा, टणटणाट केला तरच ती विधानं लोकांपर्यंत पोहोचतात. तात्या हेच करतो.

सामोंनी इथे एका बाईचं उदाहरण देऊन डेमोक्रॅट आणि त्यांना मत देणारी अर्धी अमेरिका चूक आहे, अशा छापाचं विधान केलं आहे. ती बाई किती प्रातिनिधिक आहे, वगैरे तपशील नाहीतच. ह्या विधानाचा विरोध करायचा तर मला किंवा कुणाला निदान अर्धा तास खर्चून ते सिद्धासिद्ध करावं लागेल. अशा प्रत्येक भावनातिरेकी विधानांमधली फोलपटं काढणं अशक्य आहे. मग कुठला पक्ष, कोणती व्यक्ती अशा प्रकारची विधानं करते? सध्याही पाहा, तात्या इमोसनल अत्याचार, रडारड, खोटारडेपणा करतोय. जो बायडेन 'सगळी मतं मोजल्यावर हॅरिस आणि मी, आम्ही जिंकू अशी खात्री आहे' असं म्हणतोय. Just read the sentiments in the two rhetorics.

ज्यांना देवपूजा, व्यक्तीपूजा ही अंगं कमी असतात, असे लोक साधारणपणे डाव्या विचारांचे असतात. आणि सदर संदर्भात अमेरिकी डावं हो; युरोपात ह्यांना मध्यममार्गी समजलं जाईल. भावनातिरेकी विधानांचा सुकाळ समाजमाध्यमं नामक तंत्रज्ञानामुळे होतो. त्याला भुलणारे लोक उजवे. बाकीच्या सगळ्या अर्थकारण, कोव्हिड, वंशद्वेष वगैरे कारणांबरोबर हेही कारण आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ती बाई किती प्रातिनिधिक आहे, वगैरे तपशील नाहीतच.

हे सत्य आहे. मला हे माहीत नाही की होमलेस लोकांमधील किती परसंटेज हे आपण होउन म्हणजे आळशीपणातून दारिद्र्य स्वीकारतं व किती एक जणांना परिस्थिती लाचार बनवते हे मला सापडत नाही. बिकॉज ऑफ धिस लॅक ऑफ एक्सेस / अद्न्यान यातून आपल्या नीरीक्षणावर भर द्यावा लागतो. बाई हा एक विदा बिंदू असे १५ तरी बिंदू असतील पण मला हे माहीत आहे की तेवढे पुरेसे नाहीतच. पण नक्की हा विदा कोठे शोधायचा ते न कळल्याने 'जंपिंग टु कन्क्लुजन' होते हे मान्य आहे.
>>>दुसरीकडे विस्कॉन्सिनचा शेतकरी देशोधडीला लागतो आहे. >>> हे मान्य आहे. एका बातमीत वाचल्यानुसार विस्कॉन्सिनमधील एक प्रदेश जगातील सर्वाधिक उत्तम प्रतीचे जिन्सींग बनवते आणि चीन हा जिनसिंगचा मुख्य भोक्ता. परंतु तात्याच्या आक्रमक पणास उत्तर म्हणुन देशभक्त चीनी लोकांनी विस्कॉन्सिनचे जिन्सिंग घेणे बंद केले व त्यातुन पिढ्यानुपिढ्या चालत आलेली जिनसिंग शेतकरी मटकन खाली बसले. देशोधडीला लागले.
हे मला मान्य आहे.
परंतु मी विस्कॉन्सिनच्या शेतकऱ्यांच्या अर्थार्जनाची पर्वा करायची की वैयक्तिक सर्व्हायवलला मत द्यायचे? जर तात्या 'अमेरीका फर्स्ट्' म्हणत असेल तर त्या प्रचाराची भूल पडणे सहज शक्य आहे परत ती फक्त प्रचारकी बडबड आहे किंवा काय तेही पहायलाच हवे बरोबर आहे. परंतु सारे काही पहाता येत नाही, ॲक्सेस नसतो, क्वचित समजत नाही यातून जर माझ्यासारख्या व्यक्तीला (म्हणजे विविध संस्थळांवरुन वाद ऐकून मते बनविणाऱ्या, बातम्या वाचणाऱ्या) जर मत बनविणे कधीकधी अवघड होत असेल तर सामान्य लोकं जे की संस्थळांवर नसतात, बातम्या वाचत नाहीत, त्यांना किती जड जात असेल. अशा वेळी ऐकायचे कोणाचे कारण जो तो आपला अजेंडा राबवतो. ५ आंधळे व हत्ती अशी गोष्ट होउन बसते.
मग तुटपुंज़या द्न्यानावरती निर्णय जरुर घेतले जातात हे मान्यच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

'माझा स्वार्थ जपणारा नेता म्हणून मी तात्याला मत दिलं'; हे व्यक्तिगत पातळीवरचं मत मला १००% मान्य आहे. पण म्हणून समाजवाद आणि त्याचं घोडं दामटणारे डेमोक्रॅट, ओबामाकेअर वगैरे गोष्टी सरसकट, सगळ्यांसाठी वाईटच आणि लोकांना फुकटेपणा शिकवतात, असं सुचवणारी विधानं मी करायला जात नाही. माझ्याकडे जेव्हा पुरेशी विदा नसते, संदर्भ नसतात तेव्हा मी 'मला पुरेसं आकलन झालेलं नाही म्हणून मत देणार नाही' म्हणते.

माझी शाळेतली एक मैत्रीण म्हणत होती, "डेमोक्रॅट माझे पैसे काढून घेतील आणि रिपब्लिकन माझा गौरेतर वर्ण बघून मला गोळी घालून मारतील. त्यामुळे मी नाईलाजास्तव डेमोक्रॅटांना मत देईन." मला तिचं मत कितीही पटलं किंवा पटलं नाही तरी ते व्यक्तिगत पातळीवरचं मत आहे. मी त्याबद्दल तिच्या चुका काढत नाही. तिला मताधिकार आहे; प्रत्येकीलाच आहे. आपला स्वार्थ सगळ्या सज्ञान लोकांना समजतो, असं मी मानते. स्वार्थ समजणं किंवा त्यानुसार वर्तन करण्यात खूप मोठं काही गैर आहे, असं मला बहुतेकदा वाटत नाही. व्यक्तिगत आयुष्यातल्या निर्णयांची कारणं इतरांना देण्याची गरजही नाही. पण जिथे तथ्यं सोडून लोक भावना भडकवणारी विधानं सुरू होतात, तिथे मला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार मिळतो, आणि मी तो वापरते.

व्यक्तिगत ते प्रत्येक वेळेस राजकीय नसतं. The personal isn't always political. तसं करण्याची गरजही नसते. तात्या ते करतो आणि लोकांची माथी भडकवतो. म्हणून तात्या दुष्ट आहे असं मी म्हणते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण आपला स्वार्थ ही सुद्धा गुंतागुंतीची कल्पना आहे. मला असे वाटते की अमेरीका कॅपिॲलिस्ट आहे म्हणुन तिने मला इथे येण्याचा, कॉन्ट्रिब्युट करण्याचा हक्क दिला, अ लँड ऑफ अपॉर्च्युनिटी.

ओबामाकेअर वगैरे गोष्टी सरसकट, सगळ्यांसाठी वाईटच आणि लोकांना फुकटेपणा शिकवतात, असं सुचवणारी विधानं मी करायला जात नाही.

पण हे 'भडकाउ विधान' नसून, कन्व्हिक्शन असू शकते मग भलेही ते अद्न्यानातून जन्मास आलेले असो वा नसो. अप्रत्यक्षरीत्या माझे पैसे या लोकांना जाणारेत हे आपल्याला ते लोक होस्टाइल वाटण्याचे जेन्युइन कारण असू शकते. हे लोक फुकटेच आहेत, नाहीतरी काय ड्रग्ज्वरतीच खर्च करणार ना.... वगैरे खरोखर वाटूही शकते.

भडकाउ विधान करायला म्हणुन तसे विधान फार कमी लोक करत असतील. याउलट भावनेच्या आहारी जाउन, साधकबाधक/सुसंगत विचार शृंखला न निर्माण करता आल्याने लोक विधाने करतही असतील. विवेकातून विचार करुन बोलण्याचे कौशल्य त्यांच्याकडे नाही पण आवेश तर आवरत नाही असे लोक असतात. आणि असे लोक असणार. म्हणुनच त्यांना काउंटरपार्ट ऑब्जेक्टिव्ह थिंकिंग करणारेही लोक लागतात. जिथे सुई लागते तिथे तल्वार चालत नाही & व्हाइसे व्हर्सा.

आणि मग अशा सरमिसळीतून काहीजण डेमोक्रॅटिक तर काहीजण रिपोअब्लिकन बनतात. पैकी कोणीच पूर्णत: चूकीचा नसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'हे माझं मत आहे' आणि 'ती बाई असं म्हणाली' ह्यात फरक आहे. कारण 'ती बाई असं म्हणाली' ह्यातून 'सगळे साले फुकटे असतात' असं सुचवलं जातं. ज्याला काही आधार देता येत नसेल तर अशी विधानं करू नयेत. त्याजागी सरळस्पष्ट 'ती बाई भेटल्यावर मला शंका यायला लागली' असं पुन्हा व्यक्तिगत मताच्या पातळीवर उतरता येतं.

माहिती नाही म्हणून, ते गर्भपातावर बंदी आणायला मदत करतो म्हणून अशी काहीही कारणं असू शकतात, तात्याला मत देण्याची. ती व्यक्तिगत पातळीवर ठेवायला काहीच अडचण नाही. ते राजकीय विधान बनवणं सोपं नसतं. भावना भडकवून ते राजकीय विधान बनवण्याचा प्रयत्न करता येतो. पण तो प्रत्येक वेळेस यशस्वी होईल असं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>>>'हे माझं मत आहे' आणि 'ती बाई असं म्हणाली' ह्यात फरक आहे. कारण 'ती बाई असं म्हणाली' ह्यातून 'सगळे साले फुकटे असतात' असं सुचवलं जातं. ज्याला काही आधार देता येत नसेल तर अशी विधानं करू नयेत. त्याजागी सरळस्पष्ट 'ती बाई भेटल्यावर मला शंका यायला लागली' असं पुन्हा व्यक्तिगत मताच्या पातळीवर उतरता येतं.>>>>> बाकी सर्व दरीद्री लोक फुकट्ते असतील अथवा नसतील, टॅक्स्पेयर्सच्या पैशातून त्यांना संधी देउ नका. वी बस्टेड अवर बट टु रीच व्हेअर वी आर. लेट देम डु द सेम. पण डेमोक्रॅटस सर्वांना वेठीला धरणार. इत्यलम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

बाकी सर्व दरीद्री लोक फुकट्ते असतील अथवा नसतील, टॅक्स्पेयर्सच्या पैशातून त्यांना संधी देउ नका. वी बस्टेड अवर बट टु रीच व्हेअर वी आर. लेट देम डु द सेम. पण डेमोक्रॅटस सर्वांना वेठीला धरणार. इत्यलम.

हेच, हेच, हाच तो आक्षेपार्ह टोन. 'मला आवडलं नाही सगळ्यांना असं वेठीला धरलेलं' म्हणालात तर त्याकडे दुर्लक्ष करता येईल. पण तुम्ही ज्यांना मतही दिलं नाहीत, त्यांना सल्ले देता, तर ते कोण ऐकून घेणार?

करदात्यांच्या पैशांतून कुणाला संधी द्यायची नाही, आणि का? भारतात करदात्यांच्या पैशांतूनच आपण जवळजवळ फुकटात शिकलो आहोत. आता त्यावर माज करायचा, एवढ्या बटबटीत विसंगती चारचौघांत दाखवायच्या तर जरा गोरगरीबांबद्दल करुणा दाखवा. नाही तर तेलही जातं आणि तूपही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

करदात्यांच्या पैशांतून कुणाला संधी द्यायची नाही, आणि का? भारतात करदात्यांच्या पैशांतूनच आपण जवळजवळ फुकटात शिकलो आहोत. आता त्यावर माज करायचा,

वेगळाच सेट अप आहे तिथे चॉइसच नाहीये.
>>>>>>>>जरा गोरगरीबांबद्दल करुणा दाखवा>> आय अंडरस्टँड की काही अतिशय तळागाळाच्या लोकांना मदतीचा हात लागणारच. ते इतके तळागाळात असततात की मदत अनिवार्य आहे.
.
असो माझेही विचार काही संपूर्ण 'सुलझे हुए' नाहीत. पण जेवढे माहीत आहे त्या जोरावर मी तात्यांना मत दिलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

त्यावर माज करायचा, एवढ्या बटबटीत विसंगती

अजुन एक माज नाहीये हा. अमेरीकेत खरच यु आर ऑन युअर ओन. अनलेस यु बस्ट युअर ॲस, काहीही फुकट्ता/वडिलोपार्जित मिळात नाही. संपूर्ण आयुष्य ग्राउंड झीरो पासून उभं करावं लागतं, वेळप्रसंगी कुटुंबापासून दूर राहून, वेळप्रसंगी (एकाने) बेरोजगार राहून, भाड्याच्या घरात राहून, मुलाबाळांकरता तरतूद न करता येता. अर्थातच कोणी सांगीतलेलं नाहीये अमेरिकन लाईफ स्वीकाराच म्हणुन.... तो वेगळा मुद्दा झाला. पण अशा हालापेष्टांतून, जाउन परत पैसे कपात होत राहीले तर आपण तर आहोत तिथेच रहाणार बरोबर!! अंडरस्टँड व्हेअर मायग्रंटस कम फ्रॉम. त्यांची मेंटॅलिटी समजुन घ्या. अधिकाधिक गरजू लोक येतच रहाणार इथे. कारण हा देशच स्थलांतरीत लोकांचा आहे,
असो. हा मुद्दा माझा पहीला स्वतंत्र मुद्दा आहे. बाकीचे बरेचसे खरं तर सर्वच मिडीया वाचून/समजून घेतलेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

आणि अमेरिकेत येण्यासाठी, अमेरिकेत नोकरी मिळवण्यासाठी जे उच्चशिक्षण वापरलं गेलं, अजूनही उपयोगी पडतं, ते भारतात लोकांनी भरलेल्या करांतून आलेलं आहे! त्यातून वरच्या जातीत, सुस्थित घरांत निव्वळ अपघातानं जन्माला आल्यामुळे होणारा फायदा निराळाच. ह्या दोन्हींमध्ये आपली काहीही कर्तबगारी नाही.

ज्यांना ह्यांपैकी एक किंवा दोन्ही गोष्टी मिळालेल्या नाहीत, ते मागे पडले तर त्यांना हिणवणं किंवा त्यांना जगण्यापुरती मदत नाकारणं हा फक्त दुटप्पीपणा नाही, दुष्टपणा आहे. एरवी दर रविवारी आणि गर्भपाताचा विषय आला की देव-देव करणारे रिपब्लिकन मतदार निवडणुका आल्या की अगदी सहजरीत्या 'जे का रंजले गांजले' त्यांना सरळ टाकून देतात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ज्यांना ह्यांपैकी एक किंवा दोन्ही गोष्टी मिळालेल्या नाहीत, ते मागे पडले तर त्यांना हिणवणं किंवा त्यांना जगण्यापुरती मदत नाकारणं हा फक्त दुटप्पीपणा नाही, दुष्टपणा आहे.

भारतियांना कोणीही हिणावत नाहीये. भारतियांना मिनिमम वेज लागते त्याशिवाय ते येउच शकत नाहीत. आणि ही मिनिमम वेज भरपूर पुरेशी असते.

& आय नो ह यु नो इट ऑलरेडी. आय मस्ट बी मिसिंग समथिंग. असो.

आता येतायत ना बायडॅन. तात्याचं राज्य आलय संपुष्टात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

खूप डीप आहे. सविस्तर उत्तर आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'कॅरन' या सामान्यनामाचे मराठी भाषांतर काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी हा संदर्भ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तात्याचं ट्वीट तात्यालाच परत.

तात्याची फडफड बघून मला आसुरी आनंद होत आहे. तो फार टिकणार नाहीये, पण सध्या फार आनंद होतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सोशलिझमचे बुजगावणे दाखवणे हा पण एक मीडियाचा कुल एड घोट आहे असे मला वाटते.
बर्णी सँडर्सला नॉमिनेशन मिळावे असे मला मनापासून वाटत होते. त्याचा जो रोगन सोबतचा पॉडकास्ट पाहिलेला, तिथे त्याने आपली योजना, हेल्थकेअर बाबत काहीशा तपशिलात सांगितलेली. तिथे त्याचे म्हणणे अजिबात रॅडिकल नाही वाटले. जे भरमसाट पैसे शस्त्रास्त्र आणि सैन्यात जातात ते, आणि स्पेक्युलेटिव्ह खरेदी विक्रीवर लावलेला टॅक्स, ह्या दोन स्रोतांतून, मेडिकेड ची वयोमर्यादा चाळीस करणार, आणि शिक्षणावरचा खर्च कमी करणार असे त्याचे म्हणणे होते.

१) शिक्षणाबाबत- आत्ता अडनिड्या वयात जन्मभरासाठीचे कर्ज घ्यावे लागते हे चुकीचे आहे. काही राज्यांमध्ये वेल्फेअर चेक्स सुद्धा कर्ज कंपन्या घेतात (जे रास्तच म्हणावे लागेल.)

२) आरोग्यसेवेबाबत- आरोग्य हा मूलभूत हक्क आहे आणि तो मिळाला पाहिजे. कॅनडामध्ये पर कॅपिटा आरोग्य खर्च अमेरिकेच्या निम्मा आहे, एकनेक सुविधा नागरिकांना मोफत आहेत, औषधे भयंकर स्वस्त आहेत, कारण औषध कंपन्यांना मनमानी करण्याचे स्वातंत्र्य नाही.

हि बाजू पण विचारात घेण्यासारखी आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आठ-नऊ वर्षांपूर्वी, अमेरिकेतच कुठे तरी एक माहितीपट बघितला होता. (बहुतेक) पोर्तुगालमध्ये केलेल्या प्रयोगाबद्दल.

ड्रग्जच्या आहारी गेलेल्या लोकांना तुरुंगात टाकण्याजागी तेच पैसे वापरून, त्यांच्यावर उपचार करून, त्यांना समाजात पुन्हा समाविष्ट करण्याचा उपक्रम होता. काही काळानंतर त्यांनी ह्याची पैशांत किंमत मोजली. तुरुंगात टाकण्यापेक्षा उपचारांचा खर्च कमी होता. आणि ह्यांतले बरेचसे लोक शिक्षेच्या काळाच्या आधीच सोबर होऊन पुन्हा कामंधंदे करायला लागले. त्यातून त्यांचं समाजावरचं अवलंबित्व कमी झालं. इत्यादी.

हीच गोष्ट शिक्षण, सार्वजनिक आरोग्यसेवा, गर्भपात वगैरेंबद्दल म्हणता येईल. समाजातली गुन्हेगारी कमी करावी, ठरावीक लोकांचं नाही तर बहुतेकशा समाजाचं शिक्षण, राहणीमान, आरोग्य सुधारावं ह्याचा सगळ्यांना फायदा होईल. पण फक्त पैशांत यश, आनंद आणि सगळं काही मोजणाऱ्या अमेरिकी संस्कृतीमध्ये सेन्सिबल काही बोलणं म्हणजे समाजवाद आणि समाजवाद म्हणजे गोत्रगमनी शिव्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ड्रग्जच्या आहारी गेलेल्या लोकांना तुरुंगात टाकण्याजागी तेच पैसे वापरून, ..... त्यांचं समाजावरचं अवलंबित्व कमी झालं. इत्यादी.

उतम माहीती आहे.
https://sullivanfdn.org/new-leaf-project/
हे माझ्याही वाचनात आलेले आहे की कॅनडात ५० बेघर लोकांना ५७०० डॉलर्स दिले गेले. आणि पारंपारीक विचारसरणी अशी असते की सहसा हे लोक दारु व अन्य मादक द्रव्यांवरती खर्च करतील. पण झाले उलटेच. Most spent the money on vital needs such as food, housing, transportation and clothing, and many even saved money over the next year. ही काही उदाहरणे आशेचे किरण वाटतात, हेही खरे आहे.

One cash recipient in the study, identified as Amy, said the money gave her a much-needed confidence boost. “[Receiving the money] made me feel important,” she said. “It’s like a silent cheering squad in the back of my mind … They have faith in me, so I have faith in myself.”

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आलं.. आलं.. म्हातारं आलं..!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

थांबा! इतक्यातच हुरळून जायचे कारण नाही.

नाही म्हणजे, बायडेन निवडून आला, ही चांगलीच - नव्हे, उत्तम! - गोष्ट आहे, परंतु...

१. सेनेटचा ताबा तूर्तास रिपब्लिकनांच्याच हातात आहे, नि मिच मकॉनल आणि लिंडसी ग्रॅहम यांसारखी हरामी मंडळी (विशेषतः मिच मकॉनल) यावेळेस पुन्हा सेनेटवर निवडून आलेली आहेत. त्यामुळे, पुढची चार वर्षे, सेनेटमध्ये पास करण्याकरिता आलेली बिले मतदानासाठी पुढे न आणता टेबलावर तशीच (कायमची) कुजवत ठेवणे, मध्यंतरी सुप्रीम कोर्टावरचा एखादा न्यायमूर्ती जर कर्मधर्मसंयोगाने गचकलाच, तर त्याची जागा भरून काढण्याकरिता (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, खालच्या पातळीवरील फेडरल कोर्टांत रिकाम्या झालेल्या जागा भरून काढण्याकरिता) बायडेनने सुचवलेल्या उमेदवारास चौकशीअंती फेटाळून लावणे हे एक वेळ समजण्यासारखे आहे - सेनेटचा तो अधिकार आहे - परंतु, त्याला नेमावा की फेटाळावा हे ठरविण्याकरिता सेनेटमध्ये जी चौकशीकरिता सुनावणी आणि त्यानंतर मतदान होणे आवश्यक आहे, ती सुनावणीदेखील काहीबाही कारण पुढे करून बायडेनची चार वर्षे संपेपर्यंत (किंवा, दोन वर्षांनंतरच्या निवडणुकांत सेनेटमधील रिपब्लिकनांचे बहुमत ढळून सेनेट त्यांच्या ताब्यातून जाईपर्यंत) घडवून न आणणे (मग भले त्या जागा पुढची तेवढी वर्षे रिकाम्या राहिल्या, तरी बेहत्तर!), तीच गत परराष्ट्रवकिलांच्या नेमणुकांबाबत; किंबहुना, जेथे जेथे म्हणून सेनेटकडून कन्फर्मेशनची वैधानिक आवश्यकता आहे, तेथे तेथे प्रत्यक्ष विरोध न करतासुद्धा केवळ काहीही कार्यवाही न करून अडवणूक करणे, हा रिपब्लिकन हरामी कार्यक्रम मागील पानावरून अव्याहतपणे पुढे चालू राहण्याची (मागील अनुभवावरून) पूर्ण अपेक्षा आहे.

किंबहुना, अध्यक्ष निवडून आल्यानंतर त्याचे जे कॅबिनेट असते (म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट, सेक्रेटरी ऑफ डिफेन्स, सेक्रेटरी ऑफ ट्रान्स्पोर्टेशन, सेक्रेटरी ऑफ द इंटीरियर, सेक्रेटरी ऑफ होमलँड सेक्युरिटी, वगैरे यू.एस. प्रशासनाच्या पंधरा खात्यांचे प्रमुख (सेक्रेटरीज़); थोडक्यात, भारतीय शासनपद्धतीतील कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांचे समतुल्य), त्याची नेमणूक करणे हे अध्यक्षाच्या अखत्यारीत जरी असले, तरी सेनेटकडून त्या नेमणुकींचे कन्फर्मेशन झाल्याशिवाय त्या नेमणुकींना वैधता नसते. सामान्यतः, सेनेट या नेमणुकी स्वीकारते किंवा फेटाळते, आणि, फेटाळल्यास, अध्यक्ष त्या जागी नव्या नेमणुका सेनेटला सादर करू शकतो. मात्र, या खेपेस, डेमोक्रॅटिक अध्यक्ष सत्तेत असतानाच्या आपल्या नेहमीच्या मोडस ऑपरंडीस अनुसरून, मिच मकॉनल आणि कंपनीने या नेमणुकी थेट फेटाळून न लावता केवळ काहीही कार्यवाही न करून बायडेनला पुढची चार वर्षे कॅबिनेटविना ताटकळत ठेवून पूर्णपणे निष्प्रभ जरी केले, तरी मला व्यक्तिशः आश्चर्य वाटणार नाही. हे लोक सत्तेत असताना काय वाटेल त्या थराला जाऊ शकतात, द कंट्री बी डॅम्ड, याला इतिहास साक्षी आहे. (आणि, समजा, काही देवाची करणी घडली आणि ही मंडळी तितक्या थराला जरी नाही गेली, तरी या नेमणुका बायडेनच्या हातात न राहता या मंडळींच्या मर्जीवर अवलंबून राहणार आहेत.)

एकंदरीत, 'लिबरलांना धडा शिकवा!' ('Own the liberals!') या एकसूत्री कार्यक्रमाखाली हा प्रकार गेली काही वर्षे अव्याहत चालू आहे. विशेषतः ओबामा नावाचा ब्लॅक माणूस व्हाइट हाऊस व्यापता झाल्यापासून या मंडळींची टाळकी फिरलेली आहेत, नि त्यानंतर न भूतो न भविष्यति असा निव्वळ अडवणुकीचा अजेंडा ही मंडळी राबवीत आलेली आहेत. नि यापुढे राबविणार नाहीत, असे मानण्याचे काहीही कारण तूर्तास दिसत नाही.

त्यामुळे, बायडेन निवडून जरी आलेला असला, तरी, पुढची चार वर्षे तो कितपत काय करू शकेल, ते पाहावे लागेल. (अनलेस, जानेवारीतल्या रनऑफ निवडणुकीत जॉर्जियातून सेनेटला जाणाऱ्या दोन्ही जागा डेमोक्रॅट्स जर पटकावू शकले, तर चित्र कदाचित वेगळे असू शकेल. त्या परिस्थितीत, डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स दोघांनाही सेनेटमध्ये सारख्याच जागा राहून कोणाचेच बहुमत नसेल, नि त्या परिस्थितीत, कमलाबाईंचे टायब्रेकर मत जमेस धरून इफेक्टिवली सेनेटमध्ये डेमोक्रॅटांचे वर्चस्व राहील. जॉर्जिया हल्लीहल्ली किंचित निळसर होऊ लागली आहे, हे लक्षात घेता, या दोन्ही जागा डेमोक्रॅटांनी पटकावणे हे अगदीच अशक्य नाही; परंतु, तूर्तास तरी, ते प्रचंड अवघड आहे, असेच मानावे लागेल. पाहू या काय होते ते. कीपिंग फिंगर्स क्रॉस्ड.)

(समजा या दोन जागा जर डेमोक्रॅट्स पटकावू नाही शकले, तर, निदान पुढची दोन वर्षे तरी बायडेनला सेनेटमधील रिपब्लिकनांच्या वर्चस्वाला शरण जावे लागून पडखाऊ धोरण स्वीकारावे लागेल, नि दोन वर्षांनंतरच्या सेनेटच्या निवडणुकीत डेमोक्रॅटांचे वर्चस्व प्रस्थापित होईल, या आशेवर राहावे लागेल.)

२. दुसरी, आणि महत्त्वाची, गोष्ट म्हणजे, या क्षणी तरी बायडेन हा निव्वळ एक निवडून आलेला भावी अध्यक्ष (president-elect) आहे, अध्यक्ष (president) नव्हे. २० जानेवारी २०२१ रोजी जेव्हा तो अध्यक्षपदाची शपथ घेईल, तेव्हा त्याची सत्ता सुरू होते. तोवर तूर्तास ट्रम्पच अध्यक्ष आहे. अर्थात, मध्यंतरीच्या काळात तो (दग्धभू धोरण स्वीकारून) काय वाटेल तो धुमाकूळ घालू शकतो, नि त्याला आवर घालण्यात रिपब्लिकनांना यत्किंचितही स्वारस्य नाही. (आणि, आता अचानक दैववशात् स्वारस्य निर्माण जरी झाले, तरी यापुढे नेमके काय करणे त्यांना शक्य आहे, याबद्दल मी साशंक आहे.)

त्यामुळे, बायडेन निवडून आला, ही जरी अत्यंत चांगली आणि आनंददायक बातमी असली, तरी, लेट अस होल्ड ऑफ ऑन द सेलेब्रेशन्स, इतकेच तूर्तास अत्यंत नम्रपणे सुचवू इच्छितो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सगळं मान्यच आहे.

पण हा हरामी इसम जर राष्ट्राध्यक्ष राहिला असता तर काय काय करून दाखवलं असतं; सिनेट ह्यांच्या ताब्यात राहिली असती तर आणखी काय गुल खिलवले असते, ह्याचा विचार करता, येत्या चार वर्षांसाठी आशा वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म्हणूनच, ट्रम्प हरल्याचा आनंद आहेच (otherwise, things would have been even worse), नि बायडेन जिंकल्याचाही आहे, परंतु बायडेनच्या मार्गातले अडथळे संपलेले नाहीत, इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण माझ्या मार्गातले कमी झाले ना! आता दिलखुलासपणे बायडनवर टीका करता येईल.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता दिलखुलासपणे बायडनवर टीका करता येईल.

That's the beauty of the scheme!

बायडेनवर अवश्य टीका करा. I can assure you, एक पण डेमोक्रॅट (किंवा लिबरल) तुम्हाला जिवे मारायला येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या तरी असं दिसतंय की किमान पुढची दोन वर्षं हे वंशवादी, हलकट लोक काय वाटेल त्या थराला जाऊन बायडनला काही कामं करू देणार नाहीत.

लोकशाही आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी, सध्या ते दोन्ही ज्या काही अशक्त अवस्थेत आहेत, ते जरा सुधारण्यासाठी बायडन निवडून येणं गरजेचं होतं. बायडनच्या जागी बर्नी किंवा वॉरन असते तर मला मनापासून, खरा आनंद झाला असता. ते म्हणजे सगळंच मागणं झालं.

पण बायडन निवडून आला नसता तर आणखी चार वर्षं कायकाय पणाला लागलं असतं, ह्याचा विचार करता सध्या फार आनंद होतोय. सध्या तरी फार नाही मागणं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माहितीपूर्ण!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

जागतिक महासत्तेच्या, नवराष्ट्रपतींचे हार्दिक अभिनंदन!!! Smile
वे टु गो प्रेसिडेंट बायडेन!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

बुडाला खोटारडा, ग्रोपी;
रेसिस्टाचा क्षयो झाला;
बायडेन श्वेतभुवनी!

  • ‌मार्मिक4
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

जागतिक साथीच्या काळात व्हायरस अस्तित्वातच नाही म्हणणार्‍या, देशाच्या आरोग्यखात्याच्या (साथीचे रोग) अध्यक्षपदी असणार्‍या डॉक्टरला जिवे मारण्याची धमकी देणार्‍या, जगातील अनेक रोगांवर नियंत्रण आणण्यास मदत करणार्‍या गेट्स फाऊंडेशच्या अध्यक्षांवर लैंगिक गुन्ह्यांचे खुळचट आरोप करणार्‍या लोकांचा नेता विजयी झाला नाही ही अमेरिकेबरोबरच जगासाठीही चांगली बातमी आहे.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

पाने