लॉकडाऊन आणि शहरी पक्षी

वेडा राघू - Green Bee Eater
वेडा राघू - Green Bee Eater

कोरोना साथीशी सामना करण्यासाठी महाराष्ट्रात २३ मार्चला लॉकडाऊन जाहीर झाला, त्याला आता एक महिना लोटला आहे. सुरवातीला १४४ कलम (पाच पेक्ष्या जास्त लोकांनी सार्वत्रिक ठिकाणी एकत्र येऊ नये) लावण्यात आले. नंतर सार्वत्रिक संचारबंदी लागू झाली. पुण्या-मुंबईत जसजशी कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली तसतसे नियम अधिक कडक होत गेले.अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी आणि त्यांची वाहने यांनाच रस्त्यांवर प्रवासास अनुमती देण्यात आली. अन्य नागरिकांना अत्यावश्यक कारणानेच तेही ठराविक वेळेत व घरटी फक्त एकाच व्यक्तीने बाहेर येऊन, खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली. हळूहळू विनाकारण फिरणारे गणंग,जॉगिंगला बाहेर पडणारे सुशिक्षित-अडाणी,यांच्यावर कारवाईचा जोर वाढत जाताच रस्त्यावरची गर्दी बऱ्याच प्रमाणात कमी झाली,होत गेली. रस्ते, महामार्ग, बाजारपेठा, मॉल्स, थिएटर्स, कचेऱ्या, बागा-उद्याने, टेकड्या, नदीकाठ सगळीकडेच माणसांचा वावर एकदम आटला. केवळ माणसेच नाही तर त्याची प्रचंड संख्येने धावणारी वाहने मोठ्या प्रमाणात गायब झाली.

लॉकडाऊनच्या काळात काही अपरिहार्य कारणामुळे मला किमान दोन आठवडे शहराच्या विविध भागात (अधिकृत पाससह) फिरण्याची संधी मिळाली. तसेच राहत्या घराच्या आसपासच्या निसर्गाचे,विशेषतः पक्ष्यांचे निरीक्षण चालूच होते व आहे. या काळातली काही पक्षी-संबंधी निरीक्षणे अशी :-

१. पक्ष्यांचे आवाज व गाणे सहजी ऐकू येणे : शहरी कोलाहलात,अगदी पहाटेची वेळ सोडल्यास,दिवसाचे इतर वेळी,पक्ष्यांची किलबिल,बोल,गाणी सहजा-सहजी ऐकू येत नसत. माझ्या अंदाजे सुमारे ९५ टक्के जनता आणि तेवढीच वाहने रस्तावर नसल्याने सर्वत्र बऱ्यापैकी शांतता आहे.भर दुपारी तर मध्यरात्री असते साधारण तशीच शांतता आमच्या परिसरात आहे. त्यामुळे अनेक पक्ष्यांचे बोल व गाणी सहजी कानावर पडत आहेत. पूर्वी शहरातल्या कोलाहलात त्यांची गाणी हरवून जात.कावळ्याचा अपवाद सोडल्यास इतर पक्ष्यांचे बोल क्वचित कानावर पडत किंवा ते ऐकण्यासाठी विशेष ध्यान द्यावे लागे.आता मात्र अनेक पक्ष्यांचे बोल प्रयत्न न करता सहजी कानावर पडू लागले आहेत.जसे तांबट पक्षी (Coppersmith barbet). याचे ‘टुक-टुक-टुक’ असे बोल आता सहजी कानावर पडतात. तीच गत दयाळ (Magpie robin) पक्ष्याच्या गाण्याची.सध्या त्याचा विणीचा हंगाम सुरु आहे. दयाळ नर विणीच्या हंगामात सुरेल गातो.एखाद्या झाडाचा शेंडा, खांबाचे टोक, किंवा छतावर बसून तो त्याचे सुरेल बोल बोलत असतो. पहाटे आणि दुपार संपताना त्याची मैफल विशेष रंगात येते.हे गाणे तो प्रतिस्पर्धी नरांना इशारा तसेच भावी पत्नीला आकर्षित करण्यासाठी म्हणतो. पूर्वी त्याचे सुरेल गाणे फक्त पहाटेच्या शांततेत कानावर पडे.मात्र सायंकाळचे गाणे, शहरी कोलाहलात कुठल्या-कुठे विरून जाई.आता मात्र त्याचे दिवसाच्या कोणत्याही वेळी काढलेले आणि चार सोसायट्या दुरून येणारे सूरही सहजपणे कानावर पडतात. पूर्वी त्यास ‘घसा’ जरा जास्त ताणूनच गावे लागे, तर सध्याच्या शांत परिस्थितीत तो सहजी, विनाकष्ट गातो आहे असे वाटते. चार-पाच वेळा चक्क पावशाचे गाणे टेकडीच्या बाजूने ते ही दिवसा ऐकू आले. पूर्वी मोराची केका फक्त पहाटेचे वेळी ऐकू येई. आता एक-दोन वेळा तर दुपारच्या वेळी त्याची केका कानावर पडली. नाचरा (Fantail), हळद्या (Oriole), सूर्यपक्षी (Sunbird), चष्मेवाला (White-eye), बुलबुल यांची गाणी/बोल आता सहज, विनाकष्ट कानावर पडू लागले आहेत. सूर्यास्तानंतर ज्यांचा दिवस चालू होतो, त्या पिंगळयाच्या जोडीचे एकमेकांशी चाललेले गुलुगुलू संभाषण आताशा लगेचच कानावर पडते.

हळद्या - golden Oriole
हळद्या - golden Oriole

२. पक्ष्यांचा सहज,अधिक मोकळा वावर : पूर्वी ग्रामीण भागात कच्च्या धूळ भरल्या रस्त्यांवरून बैलगाडीत बसून प्रवास करताना, रस्त्यावरच्या धुळीत उतरून दाणे टिपत असलेले होले, कवडे, पारवे, लावऱ्या, चंडोल इत्यादी पक्षी सहज दृष्टीस पडत. काळाच्या ओघात रस्ते डांबरी झाले, त्यांवरची वाहनांची वर्दळही वाढली.त्यामुळे पक्ष्यांचा राबता कमी झाला.सुमारे तीस-चाळीस वर्षांपूर्वी पुण्याच्या उपनगरी भागात व लागून असणाऱ्या निमशहरी गावांत मातीच्या रस्त्यांवर उतरून अनेक प्रकारचे पक्षी खाद्य शोधताना आढळत. गेल्या तीन-चार दशकांत लोकसंख्या,वाहनांची संख्या आणि त्यांची आवक-जावक इतकी आतोनात वाढली की मध्य रात्रीचे चार-पाच तांस सोडले तर रस्त्यांवरून अव्याहतपणे माणसांची-वाहनांची ये-जा चालू असते.मात्र लॉकडाऊनचा परिणाम म्हणून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर शुकशुकाट दिसू लागला. अशा मनुष्य व वाहन-विरहीत रस्त्यांवर मग पक्ष्यांचा वावर न वाढता तरच नवल. विशेषतः पारवे, होले, कावळे, साळुंक्या, पोपई मैना, चिमण्या (क्वचित बुलबुल आणि दयाळसुद्धा) हे पक्षी मोकळ्या रस्त्यांवर उतरून बिनधास्तपणे खाद्य (धान्य, खाली गळून पडलेली फळे इ.) टिपताना दिसून येत आहेत. रस्त्यांप्रमाणेच घराचे अंगण, परसदारी, सोसायटीतील अंतर्गत रस्ते, हिरवळ, खेळाची मैदाने इ. ठिकाणी पक्ष्यांचा वाढता वावर मोकळेपणाने होताना दिसतो आहे. निमशहरी भागातील बागा-उद्याने, विद्यापीठाची आवारे इथे मोरांच्या झुंडी दिसत असल्याच्या बातम्या फोटोंसकट येत आहेत. मुंबईतील मलबार टेकडीवरील राज भवनाच्या परिसरात मोरांचा वावर वाढता असल्याच्या बातम्या आहेत. भारताच्या राष्ट्रीय पक्ष्याला शहरी अधिवास कधी नव्हे एवढे सुरक्षित वाटत असावेत.

Red Whiskered Bulbul
Red Whiskered Bulbul

३. स्वच्छक पक्ष्यांच्या दिसण्यात घट : कावळा, घार, गिधाडे, काही जातींचे गरुड व करकोचे, हे स्वच्छक (scavenger) पक्षी मानले जातात. म्हणजेच हे पक्षी पूर्णतः किंवा अंशत: मेलेल्या प्राणांच्या मासांवर जगतात. मी राहतो तिथे समोर एक मोठा मोकळा भूखंड आहे. या भूखंडावर अनेक पायवाटा इकडून तिकडे गेल्या असून, सामान्य स्थितीत हजारो लोक या वाटांचा वापर करतात. यातले अनेकजण,जाता-येता वाटांच्या कडेला कचरा (प्रामुख्याने घरातले उरलेले खरकटे-उष्टे अन्न, हाडे इ.) फेकतात. त्यामुळे या मोकळ्या भूखंडावर कावळे आणि घरी यांची चिक्कार गर्दी असते. सकाळच्या सुमारास तर एकाच वेळी सहज चाळीस-पन्नास घारी व शेकडो कावळे,कचऱ्याच्या ढिगावर, झाडांवर बसलेले व वर आकाशात घिरट्या घालताना दिसतात. माणसांचा वावर सध्या बंद/कमी असल्याने, खरकटे टाकण्याचे प्रमाणही घटले आहे. खाद्याचा पुरवठा आटल्याने परिणामी एरवी सहजी दिसणाऱ्या घारींच्या संख्येत घट झाली असून, आता केवळ आठ-दहा घारीच या मोकळ्या मैदानात/मैदानावर दिसतात. सध्या कावळ्यांचा विणीचा हंगाम चालू आहे. बहुतेक प्रौढ पक्षी जोड्या जमवण्यात गर्क आहेत. या काळात कावळ्यांची मोठी विवाह संमेलने होतात. आमच्या घरासमोर असणाऱ्या हाय-टेन्शन वायरच्या खांबांवर व तारांवर ही संमेलने भरतात. जमलेले कावळे मधेच उडून थव्याने एखादी गोल चक्कर मारतात आणि पुन्हा खांबांवर-तारांवर स्थानापन्न होऊन जोड्या जमवण्याच्या उद्योगाला लागतात. ही संमेलने सुमारे महिनाभर चालू असतात. यावर्षी या संमेलनात वरकरणी तरी संख्येची घट दिसून येत आहे. जिथे पूर्वी दोन-चारशे कावळे जमायचे तिथे सध्या शंभरच्या वर आकडा जात नाहीये. खाद्य-कचऱ्याचे प्रमाण घटल्याचा हा परिणाम म्हणायचा का? मध्यंतरी असे वाचनात आले की खाद्य-कचऱ्याचे प्रमाण घटल्याने काही कावळे उपासमारीने तडफडून मरण पावले.

पारव्यांच्या दिसण्यात व संख्येतही घट झाल्याचे दिसते. पुण्याच्या सर्व भागात किराणा मालाचे दुकानदार पारव्यांना धान्य खाऊ घालतात. त्यामुळे अशा दुकानांच्या पुढच्या फुटपाथवर पारव्यांची गर्दी दिसणे हे आता विशेष राहिलेले नाही. मात्र लॉकडाऊनमुळे किराणा मालाची दुकाने थोडाच वेळ उघडी असतात. पारव्यांना धान्य टाकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. आमच्या घराजवळच्या टेकडीवर अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांच्या परिसरात नियमितपणे पारवे आणि इतर पक्ष्यांसाठी धान्य टाकले जाते. तिथे सकाळ-संध्याकाळ पक्ष्यांचा राबता असतो. एका वेळी सहज तीन-चार हजार पारवे इथे जमलेले दिसतात. आकाशात त्यांच्या कवायती चालू असतात. मात्र लॉकडाऊन काळात धान्यसेवा बंद झाल्याने हजारोंच्या संख्येने दिसणारे पारव्यांचे थवे व त्यांच्या कवायती सध्या तरी गायब झाल्या आहेत.

छोटी सहेली - small Minivet Male
छोटी सहेली - small Minivet Male

४. पूर्वी कमी दिसणाऱ्या वा न दिसणाऱ्या पक्षीजाती दृष्टीस पडणे : राखी धनेश, हळद्या, टिकेलचा मक्षाद (Tickell’s blue flycatcher), शिपाई बुलबुल, छोटी सहेली (Small Minivet) यासारखे परिसरात पूर्वी कधीही दिसले नव्हते वा क्वचित दिसत असत असे पक्षी सध्या नियमितपणे आवारात दर्शन देत असल्याचा अनेक पक्षी निरीक्षकांचा अनुभव आहे. राखी सातभाईचा एखाद-दुसरा थवा समोरच्या मोकळ्या भूखंडावर नेहमी दिसतो, पण एरव्ही हा थवा आमच्या सोसायटीच्या आवारात येणे टाळतो. मात्र सध्याच्या लॉकडाऊनचा चमत्कार म्हणजे हा थवा दररोज आमच्या आवारातही दिसू लागला आहे.

५. आसपासच्या जंगल-डोंगर भागातील पक्ष्यांनी शहरी भागात दर्शन देणे : पुणे शहर चहूबाजूंनी टेकड्यांनी वेढले आहे. कात्रज दरी,सिंहगड परिसरात बऱ्यापैकी जंगल-झाडोरा शिल्लक आहे. इथे दिसणारे पक्षी प्रामुख्याने वनातले आहेत. हे पक्षी पुण्यात क्वचित दिसतात. मात्र लॉकडाऊनच्या काळात तुरेवाल्या सर्प गरुडाचे (Crested serpent eagle) दर्शन विशेषतः नांदेड सिटी, धायरी, धनकवडी, पद्मावती, बिबवेवाडी या परिसरात अनेकदा घडले आहे. रानभाई, काळटोप कस्तूर (Common blackbird), तुईया पोपट हे एरव्ही सिंहगडच्या रानातले पक्षी शहरातल्या टेकड्यांवरही वारंवार दर्शन देऊ लागले आहेत.

६. पाणपक्ष्यांचा मुक्त संचार : लॉकडाऊनच्या काळात बऱ्याचदा मुठा नदीवरच्या पुलावरून जाण्याचा प्रसंग आला. खाली नदीकडे पहिले असता, नदीच्या दोन्ही काठांवरील भिंतींवर बसलेल्या बगळ्यांची संख्या नेहमीपेक्षा जास्त वाटली. पाणपक्ष्यांची विविधता आणि संख्या लॉकडाऊनपूर्व काळात होती त्यापेक्षा सध्या वाढल्याचे निरीक्षण अनेक पक्षी निरीक्षक नोंदवत आहेत. नद्या-तळी (तात्पुरती) शुद्ध व शांत झाल्याचा हा परिणाम असावा का? एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बातमी आली की नवी मुंबईत ठाण्याच्या खाडी काठावर हजारो रोहित उर्फ अग्निपंखी पक्षी उतरले आहेत. अर्थातच या परिसराला रोहित पक्षी नवीन नाहीत. दरवर्षी हजारो-लाखोंच्या संख्येने त्यांचे दर्शन होत असते. लॉकडाऊनमुळे प्रदूषण पातळी घटली असून,ठाणे खाडीच्या पाण्याचा दर्जा सुधारला आहे. तसेच रोहित पक्ष्याचे खाद्य असणाऱ्या शैवाल उर्फ अल्जीचे प्रमाणही वाढले असावे. त्यामुळेच अशा अवेळी, तेही हजारोंच्या संख्येने रोहित पक्षी इथे आगमित झाले असावेत.

अर्थातच ही स्थिती तात्पुरती आहे. एकदा का कोरोनाचा बिमोड झाला की माणसाचे सर्व व्यवहार पूर्वीसारखेच चालू होतील. मग आता मोकळेपणाने फिरणारे पशु-पक्षी परत त्यांच्या कोशात जातील.

पौड रस्ता लॉकडाउन - Paud Road Lockdown
पौड रस्ता लॉकडाउन
Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

उत्तम निरीक्षणे.
लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटोसुद्धा भारी !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुश.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.

Red Whiskered Bulbul पुणे विद्यापीठाच्या परिसरात अनेकदा दिसत असे. (आता मीच तिथे नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आप मेला, जग बुडाले?

की, जंगल में मोर नाचा, किस ने देखा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आताचं मला माहीत नाही; एवढंच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्ही पुणे विद्यापीठाचा परिसर सोडलात, म्हणून आख्ख्या जगानेसुद्धा तो सोडला पाहिजे, असे थोडेच आहे?

त्या शहरी पक्ष्याने (रेड-व्हिस्कर्ड बुलबुल की कोण तो) तुमच्या मागेमागे तेथून बाहेर नक्की का पडावे?

(मध्यंतरी तो मेलाबिला नसल्याखेरीज) 'कदाचित तो आजमितीस तेथे येत नसेलही', या गृहीतकास आधार काय? पुणे विद्यापीठ (आता 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ') जागच्या जागी आहे ना अद्याप?

----------

हिंदी चित्रपटांमुळे, या वाक्प्रचारातून काही भलतेच चित्र मनश्चक्षूंसमोर उभे राहाते. (तसे 'शहरी पक्षी' या संज्ञेतूनही राहाते म्हणा! असो चालायचेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

तुम्ही ह्यापेक्षा जास्त बरे विनोद करू शकता!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुणे विद्यापीठ , ए आर ए आय टेकडी इत्यादी ठिकाणी रेड व्हीसकर्ड बुलबुलच काय पण इतरही अनेक दाट लोकवस्तीच्या ठिकाणी न दिसणारे पक्षी आजही दिसतात.
दाट लोकवस्तीच्या ठिकाणी मात्र ... असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या आमच्याकडे दिसणारे पक्षी -
कावळा
कोकिळ आणि कोकिळा
पारवे
मॅगपाय रॉबिन्
तांबट
ग्रेट टिट
पोपट
राखी धनेश (घराशेजारच्या व्हावळाच्या झाडावर एकदा ३ जोड्या बघितल्या होत्या)
खंड्या
वेडा राघू
नाचरा
पर्पल सनबर्ड - घराशेजारी उंदीरमारीच्या झाडाचा फुलोरा नुकताच संपला, त्यापूर्वी रोज दिसत होते
बुलबुल - तुरेवाला (रेड व्हिस्कर्ड्) आणि साधा (रेड व्हेण्टेड) लालबुड्या
साळुंक्या
घारी - जवळच्या पिंपळावर घारींचं घरटं आहे
कधी कधी पिंगळ्यांचे आवाज येतात, त्यामुळे जवळपास आहेत हे कळतं पण अंधारात दिसले नाहीत कधी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास. कुठल्या भागात राहता आपण भटोबा ?
आणि ग्रेट टिट की ग्रे टिट ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0