कोरोना महासाथी नंतर काय ?

कोरोना महासाथी नंतर काय ?

जाईल , हि साथ जाईल . अगदी लगेच नाही तरी काळाच्या ओघात , पुढच्या एक दीड वर्षात आजार/साथ यावर नियंत्रण येईन नक्की असे किमान सद्यस्थितीत वाटत आहे.
पण या साथीच्या वेळी व्यवसाय फार काळ बंद करायला लागल्यामुळें अनेक व्यवसायांची गणिते व अस्तित्व धोक्यात आली आहेत .
नोकऱ्या , आर्थिक चलनवलन सगळे धोक्यात येईल का ?
काय होईल पुढे ? कशाकशावर परिणाम होईल ?
गेली दहा वीस वर्षे जे गृहीत धरले ते जग , त्या सुविधा राहतील ?
ज्या सर्व्हिस सेक्टर्स च्या आधारावर आलेल्या /वाढलेल्या शिक्षणव्यवस्था राहतील ?
आज त्या शिक्षणव्यवस्थेतून शिकून बाहेर आलेले विद्यार्थी काय करतील ?
आपण परत १९८० च्या दशकात राहत होतो तसे रहाणे

मला खालील गोष्टी नक्की होतील असे वाट्ते , किमान :

१. जागतिक पातळीवर आधीच अत्यंत नाजूक अवस्थेत असलेला विमान वाहतूक व्यवसाय ढासळेल . कदाचित निम्म्याहून जास्त एअरलाईन्स बंद पडू शकतील . परिणाम म्हणून अतिशय सोयीचा व मर्यादित किमती असलेला जागतिक विमान प्रवास हा इतिहासजमा होईल
२. परिणाम म्हणून यावर अवलंबून असलेले पर्यटन व हॉस्पिटॅलिटी यांच्या किमती वाढू शकतील. सद्यस्थितीत लोकं पैसे जपून वापरत असलयाने हे व्यवसाय ढासळू शकतात . " आम्ही युरप केलं " छाप पर्यटनाला आपोआप मर्यादा येईल .
३. लोकं खर्च करायला फारसे उत्सुक नसल्याने सर्व प्रकारच्या चैनीच्या वस्तू खरेदी करण्यावर मर्यादा येईल .

एक ना अनेक , शंभर शक्यता
तुम्हाला काय वाटतं ते लिहाल ? .

field_vote: 
0
No votes yet

पर्यटन व्यवसायावरच अवलंबून असणारी बेटे आणि प्रदेश यांचं कठीण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेच्या टुरिस्ट व्हिसाला जी कायम गर्दी असते, तीही कमी होईल. कसंही करुन एकदा अमेरिकेत जाऊन पडायचं, ही वृत्तीही कमी होईल. तसंही 'अमेरिकन ड्रीम' उरलं नव्हतंच हल्ली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोनदा झाल्यामुळे डिलीट !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

आताच्या परिस्थिती मधून जग काही शिकल तर शासवत विकासाची कल्पना जोर धरेल.
आणि तोच मानव जातीच्या कल्यानाचा योग्य मार्ग असेल..

संधीच एकत्रीकरण केल्यामुळे शहरीकरण वाढलं आणि त्या मुळे असंख्य समस्या सुद्धा उभ्या राहिल्या.
बजबजपुरी ,मोकळ्या जागांची कमतरता,
पूर, भुकुंप,रोगाच्या साथी,पाणी टंचाई,गुन्हेगारी अशाच असंख्य समस्या शहरांनी निर्माण केल्या.
खेडेगाव, ओस पडली आणि वेगळ्याच सामाजिक समस्या निर्माण झाल्या
वरील पैकी एक जरी संकट तीव्र पने आले तर त्या वर मात करणे सरकारला कदापि शक्य होणार नाही .
खूप मोठी लोकसंख्या संकटात सापडेल. संधीच विकेंद्रीकरण,मोठ मोठ्या कंपन्याच खच्चीकरण हे करावाच लागेल

नाही तर बेकारी ही समस्या सुद्धा corona पेक्षा जास्त घातक ठरेल जगासाठी .
अजून एक दुसरी भीती ही पण आहे की विषाणू जगाला जेरीस आणू शकतो.
प्रगत विज्ञान विषाणू चे काही वाकड करू शकत नाही ह्याचा पुरावा आताच्या साथी नी मिळाला आहे.
विकृत मनोवृत्तीची लोक किंवा निराशेने पछाडलेला समाज आर्थिक पिळवणूक ला विरोध करण्यासाठी त्यांनी हा मार्ग अवलंबिला तर?
म्हणून च बेकारी ही corona पेक्षा भयानक धोकादायक आहे असे मत मी. वर व्यक्त केले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोरोना कधीही न जाण्याची शक्यता आहे. जगण्याचा अविभाज्य घटक म्हणून कोरोना अंगिकारावा लागेल. ओव्हरॉल मोरटॅलिटी कमी होऊन जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"आम्ही युरप केलं " छाप पर्यटनाला आपोआप मर्यादा येईल .

मुद्दे योग्य असले तरी हा टोन अनावश्यक.

प्रथम जाणवलं म्हणून प्रथम नोंदवलं.

इतर काय काय "पर्यटन प्रकार" हे असा "छाप" न वापरता सांगता येतील की जे चालू राहतील?

कोण ते उच्च उदात्त पर्यटक चालू राहतील? "वी डिड इथीओपिया" छाप का? की "nomad backpacker solo in Guatemala" blogger छाप?

  • ‌मार्मिक4
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दे योग्य असले तरी हा टोन अनावश्यक.

प्रथम जाणवलं म्हणून प्रथम नोंदवलं.

सहमत.

आणि हे प्रथमच नव्हे. असा उल्लेख पूर्वी कधीतरी लिहिलेल्या बॅरोमीटर हाटेलाच्या रिव्ह्यूतही दिसलेला आहे. बापटसरांची केसरी/वीणासोबत 'युरोप केलेल्या' ममवंबद्द्लची मतं तीव्र आहेत बहुतेक.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय भटोबां.
मते तीव्र आहेत.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझीही मतं तीव्र आहेत. पण माझ्या थर्डपार्टी मतांना वाट मोकळी करायचं टाळतो. घेणारादेणारा आनंदी, कोठावळ्याचे का पोट दुखते म्हणतील.
माझ्या मित्राचा मुलगा युअरोप टुरवर म्यानेजर आहे बरीच वर्षं. "आराखड्याप्रमाणे नेतो. जुलिएटने केस सोडली ती बाल्कनी, खाली आपण- फोटो काढा. काढतात. शेक्सपिअर वाचलेला नाही. युरोप करून आणतो. अरे, एवढ्यावेळा जातोस तिकडे मग आइबाबांना नेले नाहीस? म्हणून नेऊन आणले. "

बाकी इस्टीम कस्टमर्सना ममव का म्हणता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केवळ शायनिंग किंवा प्रतिष्ठा म्ह्णून केलेल्या युरोप वा तत्सम टूरवर आपोआप मर्यादा येतील असा अर्थ घ्यायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

होय.मी हे मुद्दाम लिहिले आहे.
याला काही कारणे आहेत.
विषय बॅग पॅकेर्स बरोबर आहेत हे नाही.
विषय बेगडीपणाचा आहे.
आचरट बाबा यांच्यासारखे अनेक नबॅगपॅकेर्स ही विशिष्ट हेतूने प्रवास करतात. ते आवडते.
माझ्या लिखाणात सेल्फी पर्यटकांच्या बाबतीत तीव्र उल्लेख येतात ,कारण मला तिव्रतेने ते वाटतं.
तुम्हाला ते पटत नाही तेही ठीक.
लेट्स ऍग्री टू डीस ऍग्री.
चिल !!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बापटांशी सहमत. हे फेमस झालेले बहुसंख्य टूर अरेंजर्स, जास्तीतजास्त स्थळे दाखवण्यापेक्षा, जास्तीत जास्त खायला घालतात आणि कमीतकमी स्थळे फक्त लांबून किंवा अत्यंत कमी वेळ देऊन दाखवतात. ज्या देशांत जाल तिथले खाऊन पहावे. श्रीखंड, बासुंदी आपल्या देशांत मिळतेच, ती तिथे जाऊन कशाला? तर अशा टूर्स करुन आलेले, आमचं युरोप उरकलं, याच कॅटेगरीत बसतात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदा सबमिट केलेले दोनदा दिसतंय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पर्यटनाचे भाग तेच पण त्यांचा हेतू हा तिथल्या अमुक जागा वेळ देऊन पाहायच्या असतात, त्यामुळे आयोजित सहली बाद करणारे. गाईडसुद्धा बाद. स्थानिकांशी संवाद साधणारे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतातील सरकारी विद्यापीठांना गेल्या काही आठवड्यांत एकदम online lectures वर उडी मारावी लागली. ९७ सालापासून जे शिकायला टाळाटाळ केली ते गेल्या एका आठवड्यात शिकलो असं माझ्या ५५ वर्षीय सहकाऱ्याने आज कबूल केलं. याचा शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. चांगलाही आणि वाईटही.

लॅपटॉप व तत्सम वस्तू विकत घेण्याची ऐपत नसलेले, ग्रामीण किंवा डोंगराळ भागात राहणारे - जिथे पुरेश्या वेगात किंवा अजिबात नेट चालत नाही आणि online lectures व इतर वाचनसाहित्य डाउनलोड करण्यासाठी पुरेसा डेटा विकत घेऊ न शकणारे विद्यार्थी(नी) आताच मागे पडले आहेत. आमच्या राज्यात (बंगाल) शिक्षणसंस्था १० जूनपर्यंत बंद असणार आहेत.

गेली काही वर्षे विद्यापीठ अनुदान आयोग e-learning agenda दामटत होता त्याला आता अचानक यश मिळाल्यासारखं झालं. त्यांच्या e-learning model मध्ये दोन मोठे दोष आहेत - एकतर्फी संभाषण आणि विद्यार्थ्यांच्या गरज, क्षमतेनुसार शिकवण्यात बदल न करणे. त्यांना आता चान्स पे डान्स असं झालंय

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मार्मिक प्रतिसाद!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यातून व्हॉट्सॅप विद्यापीठाचे पदवीधर मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतील, अशी भीती वाटते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा नेहमीच जास्त रिस्की व्यवसाय राहिला आहे. त्यामुळे अण्णांचे

जागतिक पातळीवर आधीच अत्यंत नाजूक अवस्थेत असलेला विमान वाहतूक व्यवसाय ढासळेल . कदाचित निम्म्याहून जास्त एअरलाईन्स बंद पडू शकतील . परिणाम म्हणून अतिशय सोयीचा व मर्यादित किमती असलेला जागतिक विमान प्रवास हा इतिहासजमा होईल

हे मत पटले नाही. काही कंपन्यांनी खुर्च्यांची संख्या कमी करण्याची चाचपणी केली आहे, पण फक्त प्रायोगिक स्तरावर. बाकी गविंना ठाऊक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

सगळीकडे स्मरणरंजनाला ऊत येईल.
त्यामुळे नटसम्राटांनी भरगच्च अशा झी मराठीच्या भीषण कट्यारछाप चित्रपटांची सद्दी नशीबी येणार आहे बहुदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

काही वर्षांपूर्वी अशाच एका धाग्यावर हा विषय निघाला होता की आपण समृद्धीची चरमसीमा पार केली आहे आणि आता उतरणीला लागलो आहोत.
कोविडने त्या प्रक्रियेला त्वरण दिले आहे.
चीन-अमेरिका व इतर देशांतले व्यापारयुद्ध आता अधिकच तीव्र होणार. ग्लोबलायझेशन आधीच आक्रसायला लागले होते ते अधिक वेगाने आक्रसणार.
चीनला टाळण्यासाठी बऱ्याच कंपन्यांनी व्हिएतनाम वगैरे देशांची चाचपणी सुरू केलीच होती. त्या देशांचा थोड्या काळासाठी फायदा झाला असला तरी आता आणखी फायदा होणे कठीण वाटते.
विकसित देशांमध्ये आऊटसोर्सिंगविरुद्ध प्रचंड जनमत तयार होऊ शकते.
रिसोर्स लिमिट्सवर धडकून जागतिक अर्थव्यवस्था झिडपिडत असतानाच कोविडने सणसणीत चपराक लावून पारच भुईसपाट केली आहे.
परत उठून पळायला बरेच कष्ट घ्यावे लागतील.
ह्याचा फायदा असा की लोकल अर्थव्यवस्थांना वाव मिळेल.
लोकल उद्योग करायला लोकांना भागही पडेल आणि वावही मिळेल. जे लोकांनी स्वत:हून कधीच केलं नसतं ते करायला ह्या पॅन्डेमिकमुळे भाग पडेल ही एक चांगली गोष्ट म्हणायला हवी.
वाईट गोष्ट म्हणजे स्थानिक परिस्थिती व दुर्गुणांमुळे होणारी वाताहत.
उदाहरणार्थ भारतासारख्या ठिकाणी तिथे समाज भंगलेला आहे तिथे जातीपातींमुळे गरीब वर्गाला जास्त त्रास होणार; तेच स्वीडन वगैरे सारख्या ठिकाणी फार काही फरक पडणार नाही.
भारतीय सेवा क्षेत्राला ग्लोबलायझेशनच्या आक्रसण्यामुळे त्रास होऊ शकतो.
मार्जिन्स कमी होतील. परदेशगमनेच्छुकांचे मनसुबे पूर्ण होणे अवघड होईल.
१९६५ ते १९८५ ह्या काळात जन्मलेल्या पिढीने खूप चांगले बदल पाहिले व त्यांनाच मानव जातीने निर्मिलेली उच्चतम समृद्धी अनुभवता आली. पुढच्या पिढ्यांचे ते भाग्य नाही. जे हळूहळू होणार होते ते कोविडने थोडे आणखी जवळ आणले.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण समृद्धीची चरमसीमा पार केली आहे आणि आता उतरणीला लागलो आहोत.

जसं १९२९च्या मंदीत झालं होतं तसे आपण काही काळापुरते उतरणीला लागू शकतोही, पण समृद्धीला चरमसीमा कधीच नसते. नव्या गरजा निर्माण केल्या जातात तद्वत् समृद्धीला नवनवे आयाम दिले जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सहमत आहे; समृद्धीची व्याख्या बदलू शकतेच.
मला तरी स्थानिक अर्थव्यवस्था असलेले, कमी ताण, कमी स्पर्धा, आणि सर्वांना काही ना काही वास्तविक भूमिका देणारे जीवन जास्त समृद्ध असेल ह्यात शंका नाही; पण इथे मला विशिष्ट प्रकारची कंझुमरिस्ट समृद्धी अभिप्रेत होती. वर म्हटल्याप्रमाणे “आम्ही युरप केलं” छापाची.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा आशावाद वाटतो. 'युरप करण्याची' वृत्ती अमर आहे. सध्या काही काळ ती शांत राहील, मग पुन्हा डोकं वर काढेल. श्रीमंत देशांतले लोक 'धारावी करतात'... तसंच.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आशावादच आहे तो; आणि कंझ्युमरिस्ट प्रवृत्ती डोकं वर काढतील हेही खरं आहे;
पण १९३० आणि २०२० मध्ये फरक हा आहे की १९३० मध्ये ऑईलचं म्हणजे चीप एनर्जीचं युग नुकतंच सुरू होत होतं.
आत्ता असा कुठलाही पर्याय समर्थपणे दिसत नाहीय. किंबहुना कोविड व्हायच्या आधीच डिमांड फार कमी झाली होती ह्याचं कारणच हे आहे. लोकांची प्रवृत्ती काहीही असली तरी फीजिकल लिमिटपुढे काही करू शकत नाहीत.
दुर्दैवाने प्रवृत्तीच्या बाबतीत आपण फार प्रगती करू शकलो नाही समृद्धीच्या ७०-८० वर्षांत. त्यामुळे लोक प्रवृत्ती बदलून नव्या परिस्थितीचा स्विकार करून सामोपचाराने सामोरे जातील हा आशावाद बाळगण्याशिवाय काय करणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निरंजन, तुम्ही हा लेख वाचला आहेत का? (किंवा ऐकला आहेत का?) ह्या अशा 'खुजल्या', 'उंगल्या' असलेले लोक आणि 'युरोप करणारे' ह्यांत काही मूलभूत फरक असतो असं तुम्हाला वाटतं का?

Survivor’s Guilt in the Mountains

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बराच मोठा लेख आहे. आधी वाचला नव्हता हा; परंतु एव्हरेस्टवर चढाई करायला येणारे हौशे-नवशे-गवशे, पैसे देऊन भारीतलं ॲडव्हेंचर करायची त्यांची इच्छा व त्यामुळे होणारे शेर्पा लोकांचे एक्सप्लाॅयटेशन यावर असाच एक लेख वाचला होता. लिंक सापडली की देईन.
इकडे आल्यावर टिंडर व तत्सम ॲप्सवरव गेलो तेव्हा असं दिसलं की जवळजवळ प्रत्येक बाई “वर्ल्ड ट्रॅव्हलर” आहे. फोटो सुद्धा असेच कुठल्या आफ्रिकेतल्या माउंटनवर ढगात काढलेले, किंवा बाली, पॅरिस वगैरे.
कदाचित “युरोप करणे” फार काॅमनप्लेस असल्याने वेगळं करण्याची गरज या लोकांना वाटत असेल; पण काॅलिंग वगैरे असणे असा काही मुलभूत फरक मला तरी वाटत नाही.
“Because it’s there” हे एडमंड हिलरीचं वाक्य मला फार त्रासदायक वाटतं.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'त्या' वाक्याबद्दल सहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“Because it’s there” हे एडमंड हिलरीचं वाक्य मला फार त्रासदायक वाटतं.

अगदी. एखादीच व्यक्ती ते करत होती तोवर त्यातला रिकामपणा टोचला नसता; पण आता तसं नाही. गिर्यारोहक म्हणून तो थोर असेलही, पण 'हे का करायचं' ह्याचं त्यानं दिलेलं उत्तर आता अगदी बालिश वाटतं.

त्या मोठ्या लेखातला एक भाग मला आवडला, ते म्हणजे ह्या गिर्यारोहणासारख्या गोष्टींत यश मोजता येत नाही. एक हजारांश मिलीसेकंदानं जिंकला वगैरे मोजमापं नसतातच. पण ह्या लोकांना जाहिरातदार, स्पॉन्सर्सवर अवलंबून राहावं लागतं. ती मिळण्यासाठी केली जाणारी धडपडही दुसऱ्या बाजूला आहे. मग 'मी एव्हरेस्ट/के२ केलं' आणि 'युरोप केला' ह्यांत फार फरक राहत नाही. तीच ती जगण्याची, मिरवण्याची धडपड.

(न्यू यॉर्करमधले मोठे लेख ऐकायची सोय आहे. बहुतेकसे लेख ऐकून समजण्याइतपत हलकेफुलके असतात. वाचनही चांगलं असतं. धावताना, बाकी घरकामं करताना वगैरे मी ते ऐकते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. ऑनलाईन व्यवहारांना लोक आता जास्त रूळतील. पूर्वी जे काही ऑनलाईन करायला लोकं बाचकत होते, ती दरी आता फटकन पार केली गेल्याने लोकं ऑनलाईन पर्यायांचा जास्त विचार करतील.
२. अमेरिकेतले मॉल्स आणि रिटेल्स आधीच आचके देत होते, त्यातले काही पूर्ण बंद पडतील. ही प्रक्रिया ॲमेझॉनने सुरूच केली होती, ती आता वेगाने पूर्ण होईल.

३. माझ्या मते लोकं प्रवास करतील. विमानं/हॉटेलं/रेस्टॉरंटस - हे सगळं चालेल, पण सोशल डिस्टन्सिंग ठेवून. निदान वर्षभर तरी.

४. २००१ सप्टेंबर ११ नंतर अमेरिकेतला विमान प्रवास कायमचा बदलला. आता कोविड१९ मुळे कदाचित विमानप्रवासाच्या पद्धतींवर मूलगामी परिणाम होईल.
म्हणजे प्रवास करताना तुम्ही किती धोकादायक आहात? ह्या प्रश्नाच्या निकषांमधे कदाचित "खूप ताप आलेले लोक" हा एक निकष असू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१.असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मुसलमान कामकऱ्यांना वाळीत टाकले जाऊ शकते. फळविक्रेते,एसीचं काम करणारे मेकॅनिक, गॅरेजवाले, पंक्चर काढणारे , भाजीवाले, रिक्षावाले इत्यादी. झोमॅटो / स्वीगी ची डिलिव्हरी करणारे वैगेरे लोकही येतील यात.

२.असं वाळीत टाकणं अजिबात अयोग्य नाही अशी बहुतांश उर्वरित लोकांची धारणा असेल. ती अधिक सहज आणि समाजमान्य होईल. हे लोण अगदी गावखेडी आणि तळागाळापर्यंत पोचेल. वेगळीकरण (otherization)पक्कं होईल.

३.भारतात करोना साथीसाठी मुसलमान समाज सर्वात जास्त जबाबदार आहे / होता हे आता जवळजवळ माध्यमांनी जनमानसात पक्कं करुन टाकलंय. त्यासाठी त्यांनी सतत अपराधभाव बाळगून वागलं पाहिजे अशी नवीन अपेक्षा निर्माण होईल. मुसलमानांना दहशतवादाशी जोडून पाहिलं जाई ते आता महामारी, आजार आणि अनारोग्याशीही जोडून पाहिलं जाईल.

४.दबावामुळे स्वतः मुसलमानच असा अपराधभाव घेऊन वावरताना दिसतील, तबलिग म्हणजे सगळे मुसलमान एकसमयावच्छेदेकरून नाहीत अशी स्पष्टीकरणं देतील.

५.करोना साथीनंतर NRC, 'मुसलमानांसाठीच असलेलं लोकसंख्यानियंत्रण' असे काही कायदे नव्याने वा आणखी तीव्र /कडक रूपात व्हावेत अशी मागणी होईल आणि सरकारही तसं मनावर घेईल. CAA आणि NRC ला विरोध हि साक्षात देशद्रोहाला समकक्ष कृती ठरेल.

६.एखाद्या ठिकाणी दिल्लीत झाल्या तशा दंगलीही उसळू शकतात. त्यात पोलीस प्रशासन, माध्यमं बघ्याची भूमिका घेऊ शकतात.

७.इतर लोकांच्या मानाने मुसलमान अधिक संख्येने आणि तीव्रतेने गरीब आणि बेरोजगार होतील. संघर्ष वाढेल.

८. 'मुस्लिम हे देशाला खतरा आहेत' ह्यास मुख्य आधार बनवून भाजप २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवेल. मोदी परत पंतप्रधान होतील.

  • ‌मार्मिक4
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

शेवटच्या वाक्याला दचकलेच ... पण आधीचे ७ मुद्दे खरे ठरले, ज्याबद्दल दुर्दैवानं फार शंका वाटत नाही, तर तेही खरं ठरेल...

फेसबुकवर मेधा कुळकर्णींनी लिहिलं होतं - "विष होतंच, विषाणू आता आला."

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Sad
सत्य आहे. लोक उचलली जीभ लावली टाळ्याला करतायत. भडक वक्तव्ये करतायत. या पार्श्वभूमीवरती अन्य संस्थळावर मी काही कवितांचे दुवे टाकले होते. मुंबईत तर ठाकऱ्यांनी भडक वक्तव्ये करणाऱ्यांना ताकीद दिलेली आहे. पण .....

रुखसाना का घर-1

रुखसाना का घर-2

रुखसाना का घर-3

रुखसाना का घर-4

रुखसाना का घर-5

रुखसाना का घर-6

रुखसाना का घर-7

रुखसाना का घर-8

रुखसाना का घर-9

रुखसाना का घर-10

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हायरस जगात धुमाकूळ घालत आहे हे जग जाहीर होते .
त्यांनी चीन ची सीमा ओलांडून भारतात प्रवेश करू नये म्हणून काय काय करायला हवे हे जग जाहीर होते.
लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे हे सरकार घसा फोडून सांगत होते तरी
चांगल्या नागरिकांची कर्तव्य न बजावता धार्मिक कार्यक्रम घेणे आणि त्या साठी देशभरातील आणि बाहेरील देशातील सुद्धा लोकांना बोलवून गर्दी जमवणे ही कृती खूप भयंकर आहे.
ह्या कार्यक्रमाचे आयोजक आणि तिथे उपस्थित असलेले सर्व हे देशाचे दुष्मन च आहेत .
आणि अशा घटना घडू नये म्हणून राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारनी काळजी घेणे गरजेचे आहे.
केजरीवाल च्या काळात अनेक देशविघातक कृत्य दिल्ली मध्ये झाली आहेत.
Caa,विरोध,कान्ह्येया कुमार वर खटला भरण्यास परवानगी n देणे
आता हा मुस्लिम चा धार्मिक कार्यक्रम
.अशा कृत्यांना मुस्लिम नेते,धर्मगुरू,विरोध करत नाहीत उलट त्यांचं कसे योग्य हे सांगून गैर कृत्याचे समर्थन करतात ही गोष्ट च मुस्लिम समजाविष्यी.
बाकी समाजात गैरसमजूत पसरविण्यास कारणीभूत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१.हा व्हायरस चीनची सीमा ओलांडून भारतात यायची शक्यता नव्हती.( या विषयी माहिती हवी असेल तर फोनवर बोलूयात)
सीमा प्रचंड मोठी असेल (लांबी ,किलोमीटर) तरीही बहुतांश भागात माणसे येजा अजिबात नाही.हा व्हायरस माणसांची येजा असेल तर पसरतो.आपली आणि चीनची सीमा बर्फाळ निर्मनुष्य भागात जास्त.
२. धार्मिक कार्यक्रम 10 मार्च च्या आसपास चालू झाला होता.तेव्हा सरकारकडून असे काहीही डायरेक्टिव्ह नव्हते.
परदेशातून लोके अधिकृत व्हिसा काढून आली होती.( त्यांची माहिती सरकारकडे होती)
गांभीर्य लक्षात आल्यावर सरकारने वॉर्निंग देऊन कडक तंबी देऊन कारवाई करायला हवी होती.सरकारने हा हलगर्जी पणा का केला कळेना ( विरोधी पक्ष लिबरल वगैरेवर हे खापर नको. एक तर ही लोके फारशी अतित्वात नाहीत , आहेत ती फक्त रिपब्लिक, झी इत्यादी भडकावू भाषा वापरणाऱ्या चॅनेल वर सोयिकरिता आहेत.)
३.कन्हैया चा इथे संदर्भ नाही.काढलाच आहात म्हणून सांगतो.आप सरकारने परवानगी देण्यात उशीर केला हे खरेच , पण त्याही आधी पोलिसांनी किती वेळ 'काढला' याची माहिती घेणे , मग बोलू
४. अशा धर्मगुरूनवर सर्वात कडक कारवाई करावी .तात्काळ , कुठल्याही धर्माचे असले तरी
५.श्री हारून शेख यांनी अनेक दिवस या ताब्लिगी प्रॉब्लेमवर सर्व माध्यमांमध्ये प्रखर विरोध आणि त्या लोकांविरोधी प्रचार केला आहे, हे आपल्या माहितीसाठी.
,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याचप्रमाणे या महासाथीत अस्पृश्यतेला प्रतिष्ठा मिळाल्यासारखं झालं आहे. Social distancing साठी मराठी वर्तमानपत्रांत साथसोवळे हा शब्द सतत वापरला जात आहे तो मला चुकीचा वाटतो.
https://thewire.in/rights/the-coronavirus-pandemic-and-class-segregations
या लेखात म्हटल्याप्रमाणे
There is a growing acceptance within the middle classes that everybody is ‘untouchabl’e today. From someone at the highest levels of power to a beggar on the street, anyone can be the carrier of the deadly disease. Each body is suspect and dangerous as it can contaminate with a mere touch. We are treating each one as an impure ‘other’ and disciplining ourselves to keep a safe social distance. ‘Your touch may kill!’ we are told in each news bulletin. Ostracising oneself from the social is the new norm. Under the burden of several deaths, families, societies, religions, nation-states, ethics and even the Gods are collapsing. Only the secluded, alienated ‘untouchables’ will survive.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आताच्या साथी मुळे माणूस काहीच करू शकत नाही.
प्रगत विज्ञान आपण समजतो तेवढे प्रगत नाही.
विषाणू आणि जगातील खूप साऱ्या गोष्टी बद्द्ल माणसाला काहीच माहिती नाही .
अशी मनोवृत्ती लोकांची झाली आहे .
त्या मुळे उलट देवा वरचा विश्वास वाढला आहे.
औषध, डॉक्टर,विज्ञान हे आपल्याला वाचवू शकणार नाही तर देव च(निसर्ग म्हणा पाहिजे तर) आपल्या ल वाचवेल आणि हे फक्त तोच करू शकतो
नैसर्गिक रित्या हा विषाणू नष्ट होईल हीच अशा माणूस बाळगून आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठलाही विज्ञानावर विश्वास असणारा माणूस हा विज्ञानाच्या मर्यादा ओळखून असतो.
त्यामुळे अडचण नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हारुन शेख यांनी केलेल्या भयचकित करणाऱ्या भाकितांशी सहमत आहे. हे असे होणे देशाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी ठरेल. हे न होण्यासाठी अतिरेकी आणि भडक चॅनेल्सवर बंदीच आणायला हवी. झी, रिपब्लिक आणि एबीपी हे त्यांतले मूर्खशिरोमणी आहेत. तसेच सुशिक्षित पण भक्त झालेल्या जनतेने या गारुडातून सुटका करुन घेतली पाहिजे आणि निपक्षपाती विचार करायला शिकलं पाहिजे.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

८. 'मुस्लिम हे देशाला खतरा आहेत' ह्यास मुख्य आधार बनवून भाजप २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवेल. मोदी परत पंतप्रधान होतील.

म्हणजे २०१४ नंतर हिटलरप्रमाणे 'Concentration Camps' बनवणार होते असा जो अपप्रचार मोदीविरोधकांनी चालविला होता तसेच ना ?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना तबलिगिंवर वेळीच कारवाई का गेली नाही याचं उत्तर आपल्या सगळ्या आणि विशेषकरून शेवटच्या मुद्द्यात आहे. वेळीच कारवाई झाली असती तर नकारात्मक प्रचार करता आला नसता (अर्थात कारवाई केली असती तरी लिबरल लोक शाहीन बागसारखे अंगावर धावून गेले असते ही सुद्धा शक्यता होतीच)

मुसलमान, सेक्युलर, लिबरल, पुरोगामी, डावे आदींना आयसोलेट करण्याचे प्रयत्न गेली पाच सहा वर्षांपासूनच सुरू आहेत. यासंदर्भात मी इथे आधीही लिहिलं आहे असं आठवतं.

"आम्ही वेगळे आहोत" हे दाखवून देण्याच्या मुसलमानांच्या आग्रहाच्या सापळ्यात त्यांनाच पध्दतशीरपणे अडकवण्यात आलंय. या सगळ्याचं पर्यवसान शेवटी मुसलमान हे दुय्यम नागरीक बनण्यात होणार आहे हे नक्की. भलेही त्यासाठी कुठला कायदा करण्याची गरज नसणार. ही एक नवी अस्पृश्यता असेल. त्याला जबाबदार मोदीवादी माध्यमांइतकंच मुसलमानांचं सूचक मौन असेल. स्वत: अभ्यास न करणं, धर्मांध धर्मगुरूंचं बोलणं प्रमाण मानणं, अतिरेकी ग्रंथप्रामाण्य, थोडक्यात आपलं माणूस म्हणून (मुसलमान म्हणून नव्हे ) हित कशात आहे हे न समजणं या गोष्टी कुठलाही कायदा समजावू शकत नाही. अर्थातच हे विवेचन लिबरलांना पटणार नाहीच.

बहुसंख्य हिंदूच्या मनात तर तुम्ही म्हटलं तशी मुसलमानांबद्दल अढी (जी आधी होतीच) अधिकच घट्ट झाली आहे. त्यामुळे हिंदू-मुसलमान हा दुरावा वाढणार आणि सोबतच आजवर जे सेक्युलर, लिबरल हेही मुसलमानांची बाजू घेत होते ते सुद्धा त्यांना "डम्प" करतील. कारण बहुसंख्य बोगस लिबरलांना मुसलमानांच्या हिताशी काही देणघेणं नाही. ते जर असतं तर शाहीन बागसारख्या प्रकरणात मुसलमानांची बाजू घेणारे सेक्युलर, लिबरल्स तबलिगिंना आरोग्य यंत्रणानांना सहाय्य करा, तुमच्या घरी स्क्रीनिंग करायला आलेले आरोग्य कर्मचारी काही एनपीआर चे सर्वेयर नसल्याने त्यांना सहकार्य करा असं सांगताना दिसले असते. त्यासाठी आपल्या हाती असलेल्या एनजीओंना कामाला लावून त्यांनी कॅम्पेन चालवलं असतं. तसा काही प्रयत्न केल्याचं मला तरी अजून दिसलं नाही.

मोदीवादी आपला हिंदुराष्ट्राचा अजेंडा पुढे नेण्यासाठी या संकटाचा उपयोग करत आहेत तर संघ- मोदीद्वेष्टे लोक मोदी कसे अल्पसंख्याकांबद्दल पक्षपाती आहेत हा नेहमीचा राग आलापून आपलं राजकारण साध्य करण्यासाठी धडपडत आहेत. मुसलमानांच्या हिताची कोणालाच पडलेली नाहीये.

  • ‌मार्मिक5
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

अजंड्यावर असलेल लोकसंख्या नियंत्रण/ नियमन विधेयक संसदेत मंजुर होईल. जे अगोदरच व्हायला हव होत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्या दहा पंधरा वर्षात जी मॉल* संस्कृती उभी राहिली त्या मॉल्स पैकी मोजके मॉल्स वगळता बहुतेक मॉलना आधीच घरघर लागलेली होती. ठाण्यातील दोन तीन मॉल्स सोडता मॉल्स मधील फूटफॉल उतरणीला लागलेला होता. मॉलमधील वर्दळ मुख्यत्वे त्यातील किराणा मालाची दुकाने (बिग बझार/स्टार बझार वगैरे) आणि मल्टिप्लेक्स सिनेमागृहे यांमुळे होता. त्याखेरीज मॉल मध्ये असलेल्या बाकी "लक्झरी सेगमेंटची दुकाने" (शॉपर्स स्टॉप इतर प्रीमियम कपड्यांची, सौंदर्य प्रसाधनांची दुकाने, ब्राण्डेड स्पोर्ट्स गुड्स, डिझायनर साड्या वगैरे) यथातथाच चालत होती. त्यांना अधिक फटका बसेल. त्यांना बसलेल्या फटाक्याचा मॉलच्या एकूण गणितावर परिणाम होईल.
कदाचित मॉल संस्कृती लयाला जाईल.

प्रीमियम उपहारगृहांचा सेगमेंटही मार खाईल- मार खाईल म्हणजे त्यांना पूर्वीप्रमाणेअत्युच्चभ्रू ग्राहकांवरच अवलंबावे लागेल.

मल्टिप्लेक्स मधील पॉपकॉर्नच्या बादल्यांचा आकार कमी होईल का ते सांगू शकत नाही.

*अनेक ठिकाणी डीमार्ट किंवा बिग बझार यासारखी सुपरस्टोअर्स असतात. तिथे इतर कोणतीही दुकाने नसतात. अशांना मी मॉल म्हणात नाहीये.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

डीमार्ट या परिस्थितीतही तगून राहणार आहे. त्यांचे बिझनेस मॉडेलच वेगळे आहे आणि आदर्श आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. स्थानिक लहान व्यवसायांनाच(उदा. किराणावाले, भाजीविक्रेते, फळविक्रेते वगैरे) अचानक बऱ्यापैकी ग्राहकांचं एक्स्पोजर मिळतंय आणि ते चांगला माल घरपोच/सोसायटीपोच देत आहेत. यातली बरीचशी ग्राहकमंडळी वैयक्तिक सेवा + घरपोच डिलिव्हरी आणि कोरोनाची न गेलेली भीती यामुळे या लहान विक्रेत्यांसोबत व्यवहार चालू ठेवू शकतात. मी राहतो तिथे आधीच अशा चर्चा सुरु झाल्या आहेत, विशेषत: अत्यंत व्यस्त नोकरदार मंडळी आणि ज्येष्ठ नागरिक.
२. हॉटेल्स/खाद्यपदार्थ विक्रेत्यांना (टपऱ्या, लहान जॉईंट्स) अधिकाधिक घरपोच सेवा द्यावी लागेल. मेसवालं पब्लिक कदचित डब्यावर शिफ्ट होईल.

आणखीन आठवतील तसे प्रतिसाद एडिट करीन. कृबूमान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी. बिग बास्केट, ग्रोफर वगैरे स्टारटप सायटीनी अगदीच अपेक्षाभंग केला. कोपर्‍यावरचा मारवाडी व्यवस्थित दुकान चालवतो आहे. त्यांची चेन जबरदस्त एफिशंट दिसते. अगदी एक दोन वस्तूच नाहीत त्याच्याकडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मी मुंबईतल्या नवसधन प्रदेशात राहतो. इथे एक अजस्र डीमार्ट आहे. पण ते बंदच. आत्ता मागच्या आठवड्यात उघडलं. बिगबास्केटनेच बऱ्याच गोष्टी पोचवल्या. आता ॲमेझॉन. लोकल वाण्यांकडे साधारण जनता जाते पण त्यांच्या हाती अपेक्षित गोष्टी लागत नाहीत असं एकूण चित्र आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

करोना च्या महासाथीनंतर स्वयंपाक करु शकणार्‍या उपवर/ उपवधूस जास्त बाजारभाव मिळू शकतो. लॉकडाऊनच्या काळात हाताखाली गडी / बाई नाही, पैसा आहे पण नवरा बायको दोघांना स्वयंपाक येत नाही, रोज बाहेर खाण्याची सवय असणार्‍या बिचार्‍यांचे फारच हाल झाले असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑफीसेसमधून बायोमॅट्रिक हजेरी मशीन्स ((हाताचे ठसे नोंदविणारी) जाऊन चेहरा वाचक (फेस रिडर) मशीनचा उपयोग वाढेल. शरीराचे तापमान मोजणार्‍या मापकांच्या विक्रीत वाढ होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही साथ कमी होईल,नष्ट होईल की फोफवेल ह्या काहीच निश्चित विधान करणे धाडसाचे आहे.
जगात ज्या प्रमाणात रोज संख्या वाढत आहे त्याचा आकडा छाती दडपून टाकणारा आहे.
अजून प्रसार रोखण्याचे कोणतेच प्रभावी अस्त्र माणसाकडे नाही .
सर्वांना घरात बसवून सुद्धा प्रसार बिलकुल थांबलेला नाही.
सरकारी यंत्रणा जास्त दिवस अशीच स्थिती राहिली तर टिकाव धरू शकणार नाही.
अन्न ,वस्त्र निवारा,पाणी ह्या basik गरजा भागण्यासाठी पैसा कसा निर्माण होणार,गरजेच्या वस्तू कशा निर्माण होणार.
साठवलेल्या साधनं संपत्ती मधून जास्तीत जास्त पाच सहा महिने कसेबसे निघतील .
त्या नंतर सर्वच व्यवस्था कोलमडल्या जातील.
पोलिस यंत्रणा तरी किती दिवस टिकाव धरेल.
ऊर्जा क्षेत्र,पोलिस यंत्रणा,लष्कर हे सर्व तर माणसं च आहेत .
ती काही कवच कुंडल घेवून आलेली नाहीत.
रोगाचा प्रसार वाढत गेला तर सर्वांना कवेत घेईल .
फक्त ऊर्जा क्षेत्र बंद पडलं आणि वी ज निर्मिती जरी थांबली तरी हाहाकार majel.
आणि हे घडणार नाही असे छाती ठोक पने आत्ता कोणीच सांगू शकत नाही.
प्लेग किंवा तत्सम साथी नी पहिला जगात हाहाकार माजविला आहे.
त्या वेळी लोकसंख्या कामी होती आणि गरजा पण कमी होत्या म्हणून निभावून निघाले.
आता लोकसंख्या प्रचंड आहे आणि गरजा पण प्रचंड आहेत.
आणि ज्या वैद्धकिय ज्ञान वर आपण पूर्ण अवलंबून आहे आणि अशा धरून बसलो आहे ते स्वतःच गोंधळून गेलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रेक्झिटप्रमाणे इतर काही देशान्मध्ये युरोपियन उनियनमधुन बाहेर पडण्याच्या चळवळी पुन्हा डोके वर काढतील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डि ग्लोबलायझेशनकडे कल असेल आता असं वाटतय बातम्या/लेख वाचुन . किमान काही बाबतीत स्वयम्पूर्णता, नियम ठरवण्याची स्वयत्तता यावर भर दिला जाईल असे वाटते. त्यातुन या मागण्या डोके वर काढतील असे वाटते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आणखी एक दूरची शक्यता अशीही आहे, की चीनला काही प्रमाणात जागतिक आयसोलेशनचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकादी देशांत आत्ताच काही बाबतीत स्वयंपूर्णता हवी अशी ओरड सुरू झालेली आहे. हे जर प्रत्यक्षात आलं तर चीनच्या निर्यातप्रधान अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो. मुळात सप्लाय चेन्सचं ग्लोबल मॉडेलच सध्याच्या रुपात किती दिवस तग धरेल सांगता येत नाही. एक मात्र नक्की कोरोनासाथी नंतरचा चीन हा नक्कीच अधिक आक्रमक आणि आक्रस्ताळा असणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विमानवाहतुकीवरचे परिणाम वगैरे माहित नाही. मी ज्याम नीचतम पातळीवरचं मांडायचा एक प्रयत्न करतो बघा.

  1. सरासरी स्वच्छतेचं भान जऽरासं वाढेल. रस्त्यावरचे ठेले, गलथान हॉटेलं, प्रसाधनगृहे इ. मध्ये जरा जास्त स्वच्छता येईल, लोक ते असण्याची कटाक्षाने मागणी करतील. ज्यांना हे परवडणारं नाही, ते अस्तंगत होतील.
    1. प्रसाधनगृहांच्या अस्वच्छतेमागे आजूबाजूला जमलेले झोपडीवासीय हेच मुख्य कारण असल्यामुळे त्यांच्यावर गदा येईल.
    2. थुंकणे, नाक शिंकरणे इ. बद्दलच्या शिक्षा कडक होतील.
    3. कदाचित (हे म्हणजे फ्यांटसीच, पण) रेल्वे स्थानकं, बस डेपो, चित्रपटगृहे इ. मध्ये गुटखा/पान चघळत जाणाऱ्यांवर सरळ बंदी येईल.
  2. एकूणातच स्वच्छतेबाबत जरासं समाजभान का काय ते येईल. हे मी साधारण शहरी भागाचा लसावि असलेल्या लोकांबद्दल बोलतोय आणि बाकीचे विदा उपगट ह्यातून रद्द समजावेत. गावांकडे, खेड्यांत, आदिवासी पाड्यांवर कितपत ह्या सगळ्याची अपेक्षा करावी हे माहीत नाही, बहुतेक अप्रस्तुतच आहे.
  3. पाण्याचा बेसुमार वापर होईल. अतिशुचितेचा पगडा जो आहे, त्यामुळे लोक हात फक्त धुवायचे सोडून अंघोळीच करू लागतील. प्लास्टिक पिशव्या, नाणी इ. बाहेरून आणलेल्या गोष्टी धुणे वगैरे प्रकारही सुरू होतील. संदर्भ. गेल्या वर्षी राक्षसी पाऊस झाल्यामुळे हे चित्र इतकंतरी भयावह नाही, अन्यथा परिस्थिती अतिशय दारूण असती.
  4. अन्नधान्य, साबण, नेहमीच्या वस्तू साठवणे, साठवण्याइतपत प्रमाण विकत घेणे हे वाढीस लागेल. एकूणातच साठेबाजीला चालना मिळेल. ह्याचे परिणाम वगैरे माहित नाहीत. वर म्हटल्याप्रमाणे नीचतम पातळी.
  5. सगळ्यात वाईट म्हणजे देवधर्म, अध्यात्म आणि बाकी आचरटपणाला बेस्सुमार ऊत येईल.
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

३. पाण्याचा बेसुमार वापर होईल. अतिशुचितेचा पगडा जो आहे, त्यामुळे लोक हात फक्त धुवायचे सोडून अंघोळीच करू लागतील.

पुढचे भारत-पाकिस्तान अणुयुद्ध जर झालेच, तर ते पाण्यावरून होईल, असे मागे कधीतरी कोठेतरी वाचले होते. कारण दोन्ही देशांना जलसंसाधनांचा तुटवडा भासतो, आणि परिस्थिती दिवसेंदिवस दोन्ही देशांकरिता गंभीर होत चाललीये म्हणे.

(अर्थात, मला कोणी विचारले नाही, हे खरेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दरवर्षी नद्या पात्र सोडून वाहत आहेत आणि शहर पाण्यात तरंगत आहेत तरी पाण्या साठी युद्ध होईल.
पाणी हे खासगी मालकी चे झाले पाहिजे अशी तीव्र इच्छा असणारे असले ज्ञान वाटत असतात.
म्हणजे बिसलेरी सारख्या कंपन्या पाणी विकातील.
आणि सामान्य लोक पाण्यावरच हक्क गमावून basatil

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0