तज्ज्ञांना विचारा - कोव्हिड-१९बद्दल उत्तरं देत आहेत डॉ. विनायक जोशी

डॉ. विनायक जोशी सोलापूरच्या वैशंपायन मेमोरियल ट्रस्ट कॉलेजमधून डॉक्टर झाले. १९८३-८४पासून ते वैद्यकीय व्यवसायात आहेत. त्यांनी आमच्या काही प्रश्नांना दिलेली उत्तरं. आणखी प्रश्न असतील तर विचारा; डॉक्टर सवडीनुसार उत्तरं देतील.

डॉक्टरांना विचारा

प्रश्न : लहान मुलांना करोनाविषाणूची लागण कमी होत्ये का?

उत्तर :
ह्या संदर्भात काही तर्क, आडाखे आहेत -

१. आपल्या जनुकांवर परिणाम करणारे क्षयाच्या लशीसारखे काही जनुकबाह्य घटक साधारण २५-४० वयापर्यंत आपलं संरक्षण करतात. लहान मुलांमध्ये हे प्रकर्षानं दिसून येतं. पण जिथे क्षयाची लस टोचली जात नाही तिथल्या निरीक्षणांच्या स्पष्टीकरणासाठी हे कारण थिटं पडतं.

२. करोनाविषाणूच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. सध्याची आहे तिचं नाव कोव्हिड-१९.

इतर करोनाविषाणूशी आलेल्या संपर्कानं मोठ्यांची प्रतिकारक्षमता तयार झालेली असते; त्यातून रक्तात अँटीबॉडीज तयार होतात. कोव्हिड-१९‌विरोधात तयार न झालेल्या अँटीबॉडीजचा ह्या विशिष्ट विषाणूचा सामना करता विरोध होऊ शकतो. लहान मुलांचा इतर कुठल्याही करोनाविषाणूंच्या संपर्क आलेला नसतो. त्यांना ह्याचा फायदा होऊ शकतो.

३. मोठ्या माणसांच्या शरीरात श्वसनसंस्थेचा टोकाचा विकार (Acute Respiratory Distress Syndrome) हे करोना विषाणूचं शेवटचं रूप आहे. त्याचं कारण, अँटीबॉडीजमुळे सायटोकिनचा शरीरात महापूर येतो. त्यातून रक्तवाहिन्यांना गळती लागते.

लहान मुलांच्या शरीरात सायटोकिनचा महापूर आला तरी त्यांचा प्रतिसाद निराळा असतो.

हे काही सिद्धांत आहेत. पण अजून पक्कं आकलन झालेलं नाही.

शिवाय रोगांची प्रतिकारक्षमता, विशेषतः बाहेरच्या आजारांसंदर्भात, जनुकांवर अवलंबून असते. काही विशिष्ट आणि ‌अव‌िशिष्ट घटकांमध्ये त्याची विभागणी केली जाते; प्राण्यांची प्रजात, वंश, आणि व्यक्तीनुसार ती बदलत जाते. इथे वंशवादी विचार करण्याचं काहीही कारण नाही.

प्रत्येक व्यक्तीची अंगभूत प्रतिकारक्षमता वय, अंतःस्राव (hormone), पोषण ह्यांवर अवलंबून असते. ती कशी दिसते -

१. उत्क्रांतीमुळे आपल्या नाकात येणार स्राव, नाकाची रचना, डोळ्यांत येणारं पाणी, त्वचेची पेशीरचना…
२. रक्त आणि ऊतींमधला (पेशींचा समूह - tissue) जिवाणूरोधक पदार्थ, त्वचा आणि नाकात असणारा जिवाणूंच्या वसाहती.

कमावलेली प्रतिकारक्षमता -

१. अँटिजेनशी संपर्क आल्यावर शरीरानं केलेला रोध; त्यात आपल्या शरीराचा सक्रिय सहभाग असतो. त्यात नैसर्गिक आणि कृत्रिम, म्हणजे लशींचा सहभाग असतो.

शिवाय शरीराच्या सक्रिय सहभागाशिवाय काही प्रकारची प्रतिकारक्षमता मिळते.

समूहाची प्रतिकारक्षमता (herd immunity) शरीराच्या सक्रिय सहभागाशिवाय, तयार मिळते. ह्यात आपल्या प्रतिकारक्षमतेचा संबंध नसतो. एखाद्या समाजाच्या प्रतिकारक्षमतेचा रोगाचा सामना करण्याशी किती हातभार लागतो. संसर्गजन्य रोगांचा मुकाबला करण्यातलं यश एकेका व्यक्तीच्या प्रतिकारक्षमतेपेक्षा संपूर्ण समाजाच्या प्रतिकारक्षमतेवर अधिक अवलंबून असतं.

विषाणूचे वेगवेगळे जनुकीय प्रकार (genotypes) शोधणं हा संसर्गशास्त्रातला महत्त्वाचा भाग असतो. त्याचे वेगवेगळे प्रकार, त्यांत जनुकीय बदल (म्यूटेशन) होतात का, कशा प्रकारची, किती, हे सगळंच त्यात येतं. रेणू-जीवशास्त्रज्ञांनी ह्या कोव्हिड-१९ रोग देणाऱ्या विषाणूचे २९ जनुकीय प्रकार, म्यूटेशन्स, शोधले आहेत. लस तयार करताना नक्की कोणता प्रकार सध्या चलनात आहे, हे माहीत असणं महत्त्वाचं आहे. कारण एका प्रकारच्या विषाणूविरोधातली लस दुसऱ्या जनुकीय प्रकारच्या विषाणूविरोधात चालणार नाही.

भारतात दोन प्रकारचे कोव्हिड-१९ विषाणू सापडले आहेत.

प्रश्न : बंदीचा नक्की काय फायदा होत आहे, होईल?

उत्तर :
सध्याचा सगळा भर जास्तीत जास्त व्यवहारबंदीवर आहे.

WHOशी संबंधित भारतीय वंशाचे विषाणूतज्ज्ञ ह्या उपायाशी सहमत नाहीत. व्यवहारबंदीमुळे आपल्याला चाचण्यांची व्याप्ती वाढवायला, आणि त्यानुसार बेड्स, औषधं, माणसं, आयसीयूची क्षमता वाढवण्यासाठी वेळ मिळेल. पण तो मौल्यवान वेळ सध्या वाया जात आहे. चाचणीची किंमत ४५०० ₹ करून नक्की काय मिळणार, कोण जाणे! सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करून, खाजगी प्रयोगशाळांना चाचण्या फुकट करणं आणि पुढे सरकारकडून भरपाई मिळण्याची मागणी केली आहे. पण मधल्या काळात कॉर्पोरेट प्रयोगशाळा स्वतःची धन करत आहेत.

प्रश्न : तुम्हाला असं का वाटतं हे जाणून घ्यायला आवडेल. कारण :
१. लस यायला किमान १६ ते १८ महिने.
२. खात्रीशीर औषधाचाही सध्या पत्ता नाही.
३. १३० , १४० कोटी लोकांच्या चाचण्या (मर्यादित काळात) जवळजवळ अशक्य.

अशा वेळी भिलवाडा मॉडेल ला पर्याय काय असू शकतो (तेही १००% उपयुक्त आहे असं नाहीच.) याहून जरा जास्त भरवशाचा मार्ग कोणता असावा तुमच्या मते ?

उत्तर : एकशेतीस कोटींचं टेस्टिंग अपेक्षित नाहीच.

सामूहिक चाचणीचा आकडा सरासरीशी तुल्यबळ असावा हे उद्दिष्ट हवं. दहा लाख लोकांसाठी पाचहजार विरुद्ध अठरा हा फरक फार मोठा आहे. आजही सोलापूरसारख्या मोठ्या जिल्ह्यात रोज बोटावर मोजता येतील इतक्या कमी लोकांच्या चाचण्या करताहेत. फक्त सोलापूर शहराची लोकसंख्या दहा लाखांवर आहे .
It’s almost as if lockdown was selected as an alternative over testing.

लक्षणं असणारे आणि other usual suspects we have come to know, हा टार्गेट साम्पल निवडावा .

चाचण्या न करण्यामुळे, चाचणीनुसार बाधित लोकांना वेगळं केलं नाही तरी व्यवहारबंदी उठल्यावर हे संसर्ग झालेले लोक समाजातल्या साठीच्या पुढच्या, इतर आजारांमुळे सहज बळी पडू शकणाऱ्यांना संसर्ग देणार. This is precisely what happened with 1918 Spanish flu, I have read.

प्रश्न : हिच चाचण्या करण्याची मर्यादाही नाही का? देशभरात किती चाचण्या पुरतील? भारताची सध्या क्षमता असेल का? मर्यादित किट्स असताना न्यूमोनिया छापाची लक्षणं असली तर टेस्टिंग आणि (गरज पडल्यास) विलगीकरण (isolation) हे जास्त योग्य वाटत नाही का?

उत्तर : होय, हे विचार करण्यासारखे मुद्दे आहेत.

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलचं उदाहरण बघा. तिथे न्यूमोनिया झालेले लोक करोनाग्रस्त आहेत का जिवाणूंमुळे (एरवी न्यूमोनिया जिवाणूंमुळे होतो) हेही न चाचण्यांअभावी समजत नाहीये.

शिवाय हा परीघ वाढवून ब्राँकायटिस, ब्राँकिओलायटिससारख्या, श्वसनमार्गाच्या खालच्या भागाचे संसर्ग झालेले असतील तरीही करोनाच्या चाचण्या झाल्या पाहिजेत.

प्रश्न : अशा प्रकारचे उपचार नेहमीचे आहेत का? प्लाझ्मा ट्रान्फ्युजम देताना क्रॉस मॅचिंगची गरज नसते का ? (जरी सर्व पेशी आणि प्लेटलेट्स काढल्या असतील तर कुठले रक्तातले इतर घटक ऊतमात घालू शकणार नाहीत का? हे टाळण्यासाठी काय केलं जातं?

उत्तर : उत्तम प्रश्न आहे.

प्लाझ्मा देणं नेहमीचं आहे. त्यात लाल रक्तपेशी नसतात, त्यामुळे क्रॉस-मॅचिंगची गरज नाही. जर प्लाझ्मा स्वच्छ, गवताच्या रंगाचा असेल तर अजिबात नाही. पण थोडाही लाल असेल तर मग क्रॉस मॅचिंग करावं लागतं. नव्या उपकरणांमुळे एक लाल रक्तपेशी असेल तरीही लगेच समजतं, त्यामुळे प्लाझ्मा देणं फारच सुरक्षित झालं आहे.

रक्तातले इतर घटक ऊतमात घालू शकतात; कारण त्यांतली काही प्रकारची प्रथिनं. रक्तपेढ्यांना ह्या गोष्टींचा सामना करावा लागतो. रुग्णांना ह्याची माहिती देऊन मग ते रुग्णांची परवानगी घेतात, अ, ब आणि क प्रकारची कावीळ, सिफिलीस आणि एचआयव्ही ह्यांचं अस्तित्व असू शकतं.

field_vote: 
0
No votes yet

वुहान सारख्या मध्यम शहरात हा विषाणू निर्माण होवून फक्त खोकल्य द्वारे ८ फीट अंतरावरील व्यक्तीला संसर्ग करत हा विषाणू जगातील १२ की १३ लाख लोकांना मध्ये संक्रमित झाला हे पूर्ण सत्य आहे का?
की काही संशोधकांच्या मता प्रमाणे हा विषाणु मानवी शरीरात पहिल्या पासूनच आहे आता धोकादायक झाला आहे.
नक्की काय सत्य आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

From Bats to Human Lungs, the Evolution of a Coronavirus

ह्याचा मराठी सारांश बहुतेक लवकरच येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नैसर्गिक टाईम सायकल पूर्ण होऊन/ म्युटेशन्स होऊन हा विषाणु निष्प्रभ होऊ शकतो का ? की लशी शिवाय पर्याय नाही ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'O' ग्रुपचा प्लाझ्मा A किंवा B ग्रुपच्या रुग्णाला दिल्यास O प्लाझ्मातील A आणि B अँटीबॉडीची रुग्णाच्या रक्तातील अँटीजनशी रिअँक्शन होत नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या विषयी मी डॉ जोशी यांच्याशी चर्चा केली.
त्यांच्या मते आता तंत्रज्ञान पुरेसे प्रगत आहे.
व लाल रक्तपेशी विरहित plasma तयार करणे आता तितके अवघड नाहीये(आपल्या प्रश्नाच्या रोखावरून आपणास याविषयी क्रॉस मॅचिंग याविषयी पुरेशी माहिती आहे असे दिसते त्यामुळे जास्त खोलात जात नाही)
पूर्वीच्या काळी मात्र आपण सांगत आहात , तसे व इतर काही प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्याकडे एक आयडीया आहे. काय करायच की आपल्या दोस्त गटातल्या विषाणूला किंवा जीवाणुला या कोरोना विषाणुचा खात्मा करायची सुपारी द्यायची. असा दोस्त विषाणु शोधला पाहिजे. मग सिनेमास्टाईल फाईटिंग होउन आपला दोस्त विषाणु जिंकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

' दोस्त बनकर भी नही साथ निभानेवाला ' म्हणण्याची वेळ येऊ शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0