सम(ज)लैंगिक
तर मुद्दाम पोस्ट
साधी सोपी बंदिस्त गोष्ट...!!
ती आणि ती
तो आणि तो..!
थोडं ऐकायला
विचित्र
पण सत्य चित्रं..!
समाज नाही काही
मानत..
बसतात ते
त्यांच्या भावना कण्हत..!!
तिला ती आवडते
त्याला तो आवडतो
आणि त्या दोघांना ,
तो अडवतो...
समाज ,
समाज देणं
बुरखा पांघरूण
असतो सदैव टीमक्या
मिरवीत...
समलैंगिक समजलैंगिक
भावना ऐच्छिक ..
तिची तिच्याबद्दल अन
त्याची त्याच्याबद्दल..!
नैसर्गिक अनैसर्गिक
वाद विवाद मांडती
तथाकथित मंडळी...!
हाती न लगे काही...!!
यत्र तत्र सर्वत्र
थोडं ऐकायला
विचत्र
पण सत्य चित्रं....!!
थांबवू विचार अनिष्ट
समजून ,
मुद्दाम पोस्ट
साधी सोपी बंदिस्त गोष्ट...!!!
प्रतिक्रिया
ठीक वाटली.
ठीक वाटली. सत्य चित्र आहे.