अलीकडे काय पाहिलंत? - ३२

आधीच्या धाग्यात १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू केला आहे.

या धाग्याचा वापर करणाऱ्या सर्वांना विनंती - कृपया लिंक द्यावी. शक्यतो व्हिडियो एम्बेड करू नये. धागा लोड होईपर्यंत वृद्धापकाळ येतो.

-------

नागराज मंजुळे यांची शॉर्ट फिल्म 'पिस्तुल्या' आता अधिकृतरीत्या यूट्यूबवर उपलब्ध आहे.

https://www.youtube.com/watch?v=ovimYnrk07o

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नेफि वर 'द विण्डसर्स' ही एक मालिका दिसली. पहिले दोन भाग पाहिलेत. जबरी धमाल वाटले. ब्रिटिश राजघराण्याच्या लाइफस्टाइल वर स्पूफ सारखे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोम चॉम्स्कीबद्दलचा 'मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट' हा माहितीपट यूट्युबवर पाहिला. एडवर्ड हर्मन व नोम चॉम्स्की लिखित 'मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट' ह्या पुस्तकासंदर्भात चॉम्स्कीच्या भाषणांचे, मुलाखतींचे संकलन असे माहितीपटाचे स्वरूप आहे. सत्ताधारी गट हे प्रसारमाध्यमांना हाताशी धरून कन्सेंट तयार करतात असा काहीसा सिद्धांत आहे. अमेरिकन माध्यमांची, विशेषतः न्यूयॉर्क टाईम्सची, कंबोडियातील ख्मेर राजवटीतले अत्याचार व इंडोनेशियाचे ईस्ट तिमोरमधले अत्याचार ह्यांना वेगवेगळी प्रतिक्रिया ह्या उदाहरणाची विशेषत्वाने चर्चा केली आहे. दोन्ही ठिकाणचे अत्याचार साधारण सारख्याच तीव्रतेचे (?) असले तरी इंडोनेशियाला अमेरिकन सरकारचा पाठिंबा असल्याने कंबोडियाच्या तुलनेत ईस्ट तिमोरबद्दल न्यूयॉर्क टाईम्समध्ये खूपच कमी लिहून आले होते. अगदी सगळेच मुद्दे मला पूर्ण समजले नसले तरी माहितीपट एकुणात अत्यंत रोचक वाटला व मूळ पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाटते आहे.

माहितीपटाच्या मुख्य विषयाशिवाय अजून एक भागही अतिशय रोचक वाटला. फ्रान्समधल्या फॉरिसन नावाच्या प्राध्यापकाने एका पुस्तकात होलोकॉस्ट झालेच नव्हते असे म्हटले. चॉम्स्कीने फॉरिसनला अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून असे म्हणण्याचा अधिकार असला पाहिजे असे म्हटले. इथे दोन तास पाच मिनिटांपासूनची दहा मिनिटे पहा. ह्या सगळ्या घटनांमुळे चॉम्स्की होलोकॉस्ट डिनायलचे समर्थन करतो असा समज होऊन त्याची फ्रान्समधली प्रतिमा खालावली व तो त्यानंतर अनेक वर्षे फ्रान्समध्ये गेला नाही असे विकिपीडियावर म्हटले आहे. ह्या प्रकरणाबद्दल इथे कोणाला जास्त माहिती आहे का? नक्की काय झाले, बारकावे, त्याबद्दलची मते? अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या समर्थनामुळे एखाद्याची फ्रान्समधली प्रतिमा खालावली हे वाचून गंमत वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फ्रान्समधल्या फॉरिसन नावाच्या प्राध्यापकाने एका पुस्तकात होलोकॉस्ट झालेच नव्हते असे म्हटले. चॉम्स्कीने फॉरिसनला अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून असे म्हणण्याचा अधिकार असला पाहिजे असे म्हटले. इथे दोन तास पाच मिनिटांपासूनची दहा मिनिटे पहा. ह्या सगळ्या घटनांमुळे चॉम्स्की होलोकॉस्ट डिनायलचे समर्थन करतो असा समज होऊन त्याची फ्रान्समधली प्रतिमा खालावली व तो त्यानंतर अनेक वर्षे फ्रान्समध्ये गेला नाही असे विकिपीडियावर म्हटले आहे. ह्या प्रकरणाबद्दल इथे कोणाला जास्त माहिती आहे का? नक्की काय झाले, बारकावे, त्याबद्दलची मते? अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या समर्थनामुळे एखाद्याची फ्रान्समधली प्रतिमा खालावली हे वाचून गंमत वाटली.

एक गोष्ट लक्षात घ्या. जसं नास्तिकांना किंवा मांजरांना एका कळपात एकत्र आणणं अवघड (किंबहुना अशक्यच) असतं, तसंच फ्रान्सबद्दलचं (किंवा भारताबद्दलचंही) सरसकटीकरण करताना होतं. त्यामुळे एखादी गोष्ट कशी बघितली जाते हे ठरवणं कठीण होऊन बसतं. तुम्हाला उत्तर म्हणून एक फ्रेंच दुवा देतो. गूगल ट्रान्सलेट त्याला न्याय देईल अशी आशा आहे. 'नूव्हेल ओब्जेर्वातर' ह्या प्रतिष्ठित नियतकालिकातला तो २०१४मधला लेख आहे. लेखाचं निमित्त म्हणजे चोम्स्कीवर एका फ्रेंच माणसानं केलेला एक हँड-पेंटेड अॅनिमेशन माहितीपट. हा फ्रेंच इसम कोण, तर मिशेल गोंद्री. त्यानं केलेले काही इंग्रजी चित्रपट गाजले होते. विशेषतः 'इटर्नल सनशाइन आॅफ द स्पाॅटलेस माइंड'. थोडक्यात, ज्या माणसावर मिशेल गोंद्री चित्रपट बनवतो आणि ज्या चित्रपटाची दखल 'नूव्हेल आॅब्ज' घेतं, तो माणूस फ्रान्समध्ये खालावलेल्या प्रतिमेचा असतो असं म्हणायला माझी जीभ तरी धजत नाही.

चित्रपट इथे पाहता येईल :

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुम्ही दिलेला माहितीपट आताच पाहिला. अतिशय रोचक! बरेच वेगवेगळे रोचक प्रश्न व चॉम्स्कीची उत्तरे ह्यांनी खिळवून ठेवले. ट्रेलर पाहून अॅनिमेशने फार आवडणार नाहीत असे वाटले होते, त्या तुलनेत प्रत्यक्षात बरीच जास्त आवडली. मात्र कॅमेऱ्याचा खर्र आवाज, काही चित्रांमध्ये पार्श्वभागाचा रंग सतत थोडाथोडा बदलत राहणे (हा कॅमेऱ्याचा परिणाम असावा का?), काही वेळा निवेदकाचा न कळणारा फ्रेंच अॅक्सेंट आणि जिथे निवेदनाचा भाग पडद्यावर लिहिलेला होता तेव्हा तो बारक्या अक्षरात कर्सिव्ह लिपीत असणे इ. गोष्टींमुळे थोडा रसभंग झाला. पण ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून नक्की बघावा असा माहितीपट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विषय वेगळा आहे पण रोचक आणि अतिशय दुर्मिळ असा व्हिडियो आहे
दिग्गजांची जुगलबंदी !
https://www.youtube.com/watch?v=3wfNl2L0Gf8

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

धन्यवाद मिहीर . हे इंटरेस्टिंग आहे . बघणे आले हे आता .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद मिहिर सर, आता हे पाहणे आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

मुक्ती
बांग्लादेश युद्धाच्या अखेरीस जनरल जेकब वि. जनरल नियाझी यांच्यात ज्या वाटाघाटी झाल्या त्याच्यावरचा १७ मिनिटांचा चित्रपट.
कलाकार - मिलिंद सोमण व यशपाल शर्मा.

https://www.youtube.com/watch?v=6bGdIAf2J_k

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"आम्ही दोघी" हा दिवंगत मराठी लेखिका गौरी देशपांडे यांच्या "पाऊस आला मोठा" या कथेवर आधारलेला सिनेमा आज पाहिला.

कथेचा पैस तसा लहान आहे. अनेक उपकथानकं असलेली दीर्घकथा अशी ही नव्हे. आधीच सिनेमा बनवण्याकरताचा जीव लहान असलेलं, दोन प्रमुख स्त्रीव्यक्तिरेखांचं कथानक. त्यामुळे यात आणखी एक पात्र आणि पर्यायाने त्या अनुषंगाचं उपकथानक सिनेमात आणण्यात आलं.

प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे यांची कामं चांगली झालेली आहेत. मात्र काही गमतीजमती झालेल्या आहेत. प्रिया बापट यांना चक्क यत्ता नववी-दहावीतली मुलगी (काही भागापुरती) दाखवलेली आहे. आणि तिथे बर्‍यापैकी प्रकरण गंडलेलं आहे. त्यांचं अजिबात टीनेजर न वाटणं, ते करताना आलेलं अवघडलेपण, जूनपण - प्रचंड रसभंग करणारं.

चित्रपटाच्या एकंदर "मूड" किंवा हाताळणीबद्दल : गौरी देशपांडे यांचा wry humor सिनेमामधे अजिबातच जाणवत नाही. त्यांच्या "आहे हे असं आहे" या कथासंग्रहातल्या बहुतेक कथा साठ-सत्तरच्या दशकात आलेल्या होत्या. जवळजवळ सर्व कथा First person मधल्या आहेत. त्या वेगवेगळ्या असल्या - म्हणजे एका मालिकेतल्या नसल्या - तरी त्या वाचताना निवेदिकेच्या , पर्यायाने नायिकेच्या स्वभावातला , विक्षिप्त वाटेल इतका इतरांपासून असलेला तुटलेपणा आणि आत्मकेंद्रितपणा त्या सर्वांमधे आहे. त्याला सिनेमामधे पुरेसा न्याय दिलेला नाही. The narrator-protagonist in this story-collection is never likable. आपल्या कठोर, विक्षिप्त वाटेल अशा स्वभावाकडे निवेदिका स्वतःच भाष्य करते. प्रिया बापट यांनी साकारलेली "सावी" अशी अलिप्त, तुटक नाही आणि "आपण असे आहोत" असं थंडपणे भाष्य करणारी आणि पर्यायाने आपल्या स्वभावातली विसंगती दर्शवणारी नाही.

प्रिया बापटवर हे लिहिताना अन्याय केल्यासारखं वाटेल पण त्यात त्यांचा दोष कमी आणि दिग्दर्शिकेच्या व्हिजनचा थोडा अधिक.

मुक्ता बर्वेंना अगदीच लहान काम आहे. त्यांचं पात्रच फार depth असणारं नाही.

एकंदर या प्रकरणाचा जीव तसा मुळात लहानच असल्याने हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी असणं शक्य नव्हतं. त्यांचा प्रयत्न प्रामाणिक पण मूळ लेखिकेच्या मर्माला चिमटीत पकडण्यात अपुरा ठरलेला वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

ईंटर्नेटीन्सवरच्या एका नव्या मराठी वेबसिरीजमध्ये प्रिया वरियारच्या भूमिकेसाठी प्रिया बापट यांचा विचार चालला आहे असं ऐकलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

इथे कुणी मराठी वेब सीरिज वगैरे पाहत असतं का? हे प्रकरण काही पाहण्यालायक आहे का? आयुष्यातली २२:१६ किंवा त्याहून अधिक मिनिटं त्यावर घालवावीत का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हुच्चभ्रू म्हणा की मुंबईतला विनोदक्षमता करपलेला कीटक म्हणा. विनोद अत्यंत बाष्कळ असतात. अनुराग कश्यपवाला, (त्यात अनुराग कश्यप आहे म्हणून) पाहिला होता. वेळ अक्षरश: वाया गेला. वाईट विनोद, शिवाय टाईमिंगही गंडलेलं. नवमराठीहुच्चभ्रूंसाठी चांगलंय, क्लासिक मानदंड टाईप हुच्चभ्रूंनी ह्या वाटेला न जाणंच बरं.
--
१. जे सीसीडी आणि दुर्गा का काय त्यात सारख्याच उत्साहाने जातात, आयुष्यात 'दर्जा' हवा वगैरे फेबुवर स्टेटस टाकतात, ते मिनिसोटात मोदकांची आणि कॅलिफोर्नियात कालवणाची आठवण काढणारे असतात ना? त्यांचं आधीचं रुप.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

आयुष्यात 'दर्जा' हवा

शिवाय अमुकतमुक गोष्ट 'केवळ' आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

'य' आता डाऊनमार्केट झालंय का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज मध्यरात्रीपासून अॅमेझा‍नवर पद्मावती उपलब्ध होणार आहे. बघावी का?अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी बघावी की दृष्टिसुखासाठी की आणखी कशासाठी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कालच हे गाणं पाहिलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अत्यंत सुंदर सिनेमॅटोग्राफी आहे सिनेमाची त्यासाठी तर नक्कीच बघायला हवा
शेवटचा सीन तर कमाल चित्रीत केलेला आहे तो खरोखर अप्रतिम असा नाट्यमय सीन झालेला आहे तो एकदा तरी पहायला हवाच.
अभिनयपण सुरेख आहे अनेक पात्रांचा एक डार्क मुड आहे सिनेमाभर
इतका काही वाइट नाही सिनेमा अनेक गोष्टी खटकत असल्यातरी अनेक चांगल्या बाबी ही आहेत्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

दहा मिनिटे मोठ्या मुष्किलीने पाहिला आणि बंद केला ..आणि मी हिंदी सिनेमे थेटरात जाऊन पाहणे बंद केल्याच्या माझ्याच निर्णयाबद्दल माझीच पाठ थोपटून घेतली. (मी घरातच थिएटर केलं आहे हा भाग वेगळा Wink )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

नेटफ्लिक्स वर त्यांनी स्वत:च बनवलेली ही डॉक्युसिरीज आहे. जबरी एंगेजिंग आहे. ८० च्या दशकात ओशो रजनीश कम्युन ओरेगॉन मधे आले तेव्हापासून ते तेथून बाहेर पडेपर्यंतच्या घटना, राजकारण वगैरे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुरु म्हणून याच विषयावरची एक डॉक्यु नेटफ्लिक्सावरच पाहिली होती. पुण्यनगरीतल्या आश्रमातले नयनरम्य विडियोज पाहून जीव सुखावला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

बनवत नाही ना ?
तसे असेल तर मोठी गल्लत होइल असे माझे मत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

ॲक्च्युअली ही सिरीज ओरेगॉन मधल्या कम्यून बद्दल, तेथील राजकारणाबद्दल जास्त आहे. यात ओशोंवर टीका किंवा समर्थन असा काहीच प्रोपोगंडा नाही. उलट यातून कुतूहलच जास्त निर्माण होते.

मात्र एका टीपिकल 'स्मॉल टाउन अमेरिका' मधे अचानक एकदम वेगळा ग्रूप येतो आणि आधी कल्चरली आणि मग राजकीय दृष्ट्या तो भाग टेक-ओव्हर केला जाईल अशी भीती त्यांना वाटते, आणि मग राजकारण जी वळणे घेते हे सर्व खिळवून ठेवते बघताना.

यापेक्शा जास्त आत्ता लिहीत नाही. ज्यांना पाहायची आहेत आणि आत्ता फारशी माहिती नाही त्यांना स्पॉइलर नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विधान भवनात नुकतंच पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांचं भाषण झालं. इथल्या काही जणांना ते रोचक वाटू शकेल -

भाग १ (३० मिनिटे)

भाग २ (२ मिनिटे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

रोचक आहे .अतुल देऊळगावकर तज्ञ् तर आहेतच आणि त्यांना कळकळ आहेच . पण असं वाटतं की या सरकारच्या (राज्य आणि केंद्र ) पर्यावरणविषयक धोरणाच्या बाबतीत जरा जास्त स्पेसिफिक बॅटिंग व जास्त करायला हवी होती. पण झालंय हेही नसे थोडके.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

देऊळगावकरांचं बाकी बोलणं ठीकच आहे. पण पर्यावरणाबद्दल करायच्या उपाययोजनेची तुलना "नाझीवादाविरुद्ध चर्चिल व आयसेनहॉवरने केलेल्या" उपाययोजनेशी करतात ते बाकी अंमळ रोचक वाटलं. एकूणच भारत स्पेसिफिक रेफरन्सेस जास्त पाहिजे होते बोलण्यात. नेमके पॉईंटर्स शेवटी आणि घाईघाईत आले ते अगोदरपासून यायला हवे होते. सर्वसाधारण पार्श्वभूमी आणि दोनचारपाच गोऱ्यांची अवतरणे देण्यात पहिली दहा मिनिटे गेली. त्याची काही आवश्यकता नव्हती, ते लगेच गुंडाळता आलं असतं.

शिवाय ऐकणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भावही "आता आणलाय याला तर बोलूदे काय ते" असे दिसताहेत.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बोर्डावर गावाकडच्या व्होकॅब्युलरीची चर्चा वाचून आठवलं : इथे कुणी 'बबन' पाहिला का? नगर बाजूच्या बोलीतले अनेक शब्द आणि वाक्प्रचार त्यात आहेत. चित्रपट फसलेला आहे, पण सध्या जबरदस्त चाललेला आहे. मराठ्यांमधला पिढीजात माज, त्यांचं चढाओढीचं राजकारण आणि त्यातून गावात होणारा चिखल ह्यात दाखवला आहे. ज्यांना मराठ्यांच्या आजच्या स्थितीमागची कारणं हवी असतील, आणि ज्यांना गावाकडे भाजप का जिंकते हे समजून घ्यायचं असेल त्यांना पाहायलाच हवा असा चित्रपट. त्यातच नगरकडे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे दोन कार्यकर्ते मारले जाण्याची आणि त्यासाठी तीन इतर पक्षांतले आमदार-नामदार-एकमेकांचे-पाहुणे पोलीस कोठडीत असण्याची घटना ताजी असल्यामुळे चित्रपटात दाखवलेलं सगळं आज लोकांची पकड का घेतंय हे आणखी समजत जातं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

होय. हा रडारवर आहे. ख्वाडा पाहिलाय. ट्रेलर पाहून मात्र हा पाहावासा वाटला नाही. पण पाहणार आहेच. काही दिवसांनी यीलच किकॅसवर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

पहायला हवा मग तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सर, तुम्ही एखाद्या जातीचा आणि पिढीजात माज कसा मोजता? मी नगरचा आणि जातीचा मराठाच आहे. तुम्ही म्हणताय म्हणजे नक्कीच मला, माझ्या आई बापाला सगळ्यांनाच असा माज असणार आहे, पण मराठा असल्यामुळे आम्हांला तो समजत नसणार. म्हणून विचारतोय.
बाकिच्या जातिंमधे माज अजिबात नसतो का? की तो पिढीजात नसतो? म्हणजे मागच्या पिढीत होता आणि आताची पिढी माजमुक्त झालीय? की बाकीच्या जाती कायमच्याच माजमुक्त होत्या? समजून घ्यायला आवडेल.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही म्हणताय म्हणजे नक्कीच मला, माझ्या आई बापाला सगळ्यांनाच असा माज असणार आहे

माझ्या ह्या वाक्याचा अर्थ तुम्हाला 'सगळ्या मराठ्यांमध्ये माज असतो' असा लागला असेल, तर तो तुमचा प्रश्न आहे. त्यावर मी काय प्रतिवाद करणार? -

मराठ्यांमधला पिढीजात माज, त्यांचं चढाओढीचं राजकारण आणि त्यातून गावात होणारा चिखल ह्यात दाखवला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

...बोले तो, 'सगळे मुसलमान हे दहशतवादी/गुन्हेगार नसतात, परंतु सगळे द.वा./गु.गा. हे मु.मा. असतात'-छापाचे जे 'लॉजिक' आजकाल फेकले जाते, तद्वत काहीसे?

(पण मग, 'कोरिलेशन म्हणजे कॉझेशन नव्हे' असेही कायसेसे ठोकून देण्याची आजकाल जी पद्धत आहे, तिच्याशी हे कितपत जुळते? की, असे काही कोरिलेशन असते, इतकेच मांडायचे आहे?)
..........

वस्तुतः, हेही तितकेसे खरे नसावे. बोले तो, सगळेच माजोरी लोक हे 'मराठे' नसावेत (किंवा, इतर जातींना नावे ठेवणारे सगळेच लोक हे 'ब्राह्मण' नसावेत), तद्वत.

असलेच तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट2
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हि भिकारचोट फिरवाफिरवी आहे.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे उदाहरणार्थ, पुणेरी लोकांना आपल्या 'शुद्ध' मराठीचा माज असतो. मुंबईच्या लोकांना जगात मुंबई सोडून इतर काही बरी जागा नाहीच, याचा माज असतो. ते तुम्हाला दिसत नाही का? ठाण्या-मुंबईत राहणारे कायस्थ लोक सीकेपी हॉल वगैरे बांधतात, ते नाही दिसत!

तुम्हाला फक्त पच्छिम महाराष्ट्रातल्या मराठा लोकांना, मुंबईत राहूनही मुलीनं फक्त आपल्या जिल्ह्यातल्या मराठा मुलाशीच लग्न करावं; मुलगी किती शिकली आणि कमावती झाली (अपवादालाच असल्या या मुली) तरीही तिनं घरात येऊन भाकरी बडवलीच पाहिजे आणि पगार नवऱ्याच्या हातात दिलाच पाहिजे हे दिसते; अर्थातच मुलगी आहे म्हटली की लग्नाशिवाय राहणं शक्यच नसतं; किंवा लग्नाच्या वेळेस १७६० पदर काढतात, तेवढंच दिसतं.

पुण्या-ठाण्या-मुंबईतला चिखल या माजुर्ड्या लोकांमुळेच झालेला आहे. तो बघू नका! चिखलात उमललेली कमळं जातात अमेरिकेत ते नका बघू! मराठा मोर्चे पाहा फक्त.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'ऑक्टोबर' पाहिला काल. खूप आवडला. विजुअली रिच म्हणता येईल असा आहे. पारिजातकाच्या रूपकाचा वापर आणि चित्रिकरण जमलं आहे. हॉटेल आणि हॉस्पिटल या दोन ठिकाणी घडतो सिनेमा. नक्की काय म्ह्णायचय या दोन टोकांच्या जागांच्या वापरातून ते नाही समजलं. पण सिनेमा नक्की बघावा असा आहे.
---
लेखक आणि दिग्दर्शक जोडी ही विकी डोनरा आणि पिकु फेमची आहे. जुही चतुर्वेदी आणि शुजित सरकार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हरिशंकर परसाई यांच्या,' निठल्ले की डायरी' या व्यंगसंग्रहावर आधारित नाट्यप्रयोग रविवारी नागपुरात राष्ट्रभाषा भवनाच्या अंगणात खुल्या रंगमंचावर सादर झाला.जबलपुरच्या विवेचना रंगमडलने सादर केलेल्या या अफलातून नाट्यप्रयोगाने रसिकांना जिंकून घेतले.प्रयोग सुरु झाल्यावर थोड्याच वेळात जोरात वारा वाहू लागला ,पालापाचोळा उडू लागला ,माईक मध्ये अधूनमधून खरखर येऊ लागली तरीही कलावंत तन्मयतेने प्रयोग सादर करत होते.एका कलावंताने,'अबे कितना झुठ बोलोगे ,ये देखो तुम्हारे झुठसे ये आंधी ,तुफान चलने लगे है'अशी अॅडिशन घेतल्यावर प्रेक्षक फिदाच झाले.झिरमिर पाउस आणि धूळ,वारे यांची पर्वा ना करता नाट्यरसिक संमोहन झाल्यागत नाटक बघत होते.नाटक संपायला फक्त अर्धा तास शिल्लक असताना पावसाच्या धारा जोरात कोसळू लागल्यावर नाईलाजाने नाटक थांबले. आयोजकांनी त्वरेने तिथल्याच एका लहानशा हॉलमध्ये आशावादी नाट्य रसिक आणि कलावंतांना नेले. सतरंज्या घालून आणि ज्यांना खाली बसणे शक्य नाही त्यांच्यासाठी थोड्या खुर्च्यांची व्यवस्था करून तिथे प्रयोग सुरु करण्यात आला.जराही रसभंग न होता प्रयोग उत्तरोत्तर रंगतच गेला.

निठल्ला म्हणजे रिकामटेकडा माणूस कधी डायरी लिहिल का ? तर हो हरिशंकर परसाईंनी एका निठल्ल्याच्या डायरीतून समाजातल्या दांभिकतेवर उपहासातून कठोर प्रहार केले आहेत.हा आगळावेगळा निठल्ला अधूनमधून काम करत असल्याने बदनाम असतो.आता मी लोकांचं भलं करेन असं तो ठरवतो.'अरे तू स्वतःचं भलं करू शकला नाहीस तर लोकांचं भलं काय करणार' असे टोमणे ऐकत तो कामाला लागतो.शिवशंकरला एका नेत्याचा नातेवाईक असलेल्या जागेवर बदली करून हवी आहे म्हणून तो त्याला मदत करायला जातो.रामभरोसेवर रुग्णालयात उपचार व्हावे म्हणून तो धावतो.तिथे डॉक्टरांचे दोन गटातील हाणामारीत रुग्णाचे प्राण वाचवणे असंभव झाल्याने तो रामभरोसेला रामभरोसेच सोडतो. एका भ्रष्ट कर्मचाऱ्याला वाचवणे, नोकरी सोडून हनुमान कथा नव्याने लिहिणाऱ्या रामसेवकाचे मन वळवणे ,अशा काही घटनांमधून समाजातले ढोंग दिसत जातं आणि हसवतानाच अंतर्मुख करून सोडतं .

नाट्यप्रयोगात ढोलकी आणि हार्मोनियमच्या साथीने मस्त ठेका धरणाऱ्या साध्या सोप्या चालीतले कोरस आणि नृत्यमय हालचाली मन मोहून घेतात.दृष्य बदलण्यासाठी ,'एक दो तीन चार एक' चा ठेका तर कहर आहे.वर्तमान राजकीय ,सामाजिक स्थितीवरचे समयोचित उल्लेख आणि कजरारे गाणं किंवा दबंगचं गाणं वापरणं यामुळे रंजकता वृद्धिंगत होत राहते.उत्तम कलावंतांची टीम, कमीत कमी नेपथ्य यामुळे ऐनवेळी पावसाने गोंधळ घालूनही जणू काही व्यत्यय आलाच नव्हता असा हा प्रयोग अविस्मरणीय रंगला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हुकलं म्हणायचं !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

मुंबईत रिकामपणात दोन पिक्चर आणि एक नाटक पाहिले
१. स्पिलबर्गचा रेडी प्लेयर वन- ३ डीत पाहिला : बरा आहे. सुखांतक असला तरी थोडा डिस्टोपिअन आहे. बरंच काही लिहिण्यासारखं आहे.

२. हिंदी ब्लैकमेल : टाइम्पास आहे. देल्ली बेल्ली त असलेला अभिनय देवचा वात्रटपणा जरा टेम झाला आहे. सूचक झाला आहे. काही स्टिरिओटाइप्सना अभिनय देवने चांगला धक्का दिला आहे.

३. Love Prufrock हा इलियटच्या The Love Song of J. Alfred Prufrock या कवितेवर आधारित नाटयप्रयोग.शब्द जवळपास नव्हते. फक्त शरीरनाट्य. मूळ कविता मी वाचलेली नसल्याने हा अंधारात मारलेला तीर होता. बूमरॅंग झाला. (याच तिकीटावर उत्तरार्धात दुसरं एक नाटक होतं. पहिल्यातच आम्ही गारद झाल्यामुळे दुसरा प्रयोग पाहण्याचा प्रश्नच आला नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

शशी कपूर यांच्यावर चित्रीत झालेलं हे गाणं. सोबत रफी सायबांचा मिठासभरा आवाज. पडद्यावर शशी कपूर बरोबर ... फरयाल.. गाणं एकदम गोड.
.
.
https://www.youtube.com/watch?v=Vn_jbKfIgTE

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मध्यंतरी फार व्हायरल होत असलेले हे व्हिडीओ तुम्ही पाहिलेले असावेत अशी आशा आहे, नक्की पहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

मराठी बिग बॉस बघत नाही का कुणी इथं? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुष्कर जोग, आस्ताद काळे, उषा नाडकर्णी, रेशम टिपणीस प्रभृती लोकांच्या फॅन्सना तुम्ही डिवचताय होय! हे बरं नव्हं Smile

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

रंगीत थत्तेचचांचं नाव न घेतल्याबद्दल णिशेद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

रंगीत थत्त्यांच्या चंद्रकोरी त्यांच्या फॅन्सनी अद्याप पाहिल्या नसतील तर त्या इथे पाहायला मिळतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आता चंद्रकोरींसोबत इस्पिक, किल्वर असली चिन्हंही दिसायला लागलीयेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिन्हं जुनीच आहेत; स्थळं नवी आहेत. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काल दोन जाहिरातींमधला एक तुकडा पाहण्याची संधी मिळाली. उघड्याबंब थत्त्यांना बनियन घालायचा सल्ला मिळाल्याने फारच संतापले होते. Wink तोच फोटो फेसबुकवर दिसतोय.

आता बालिश भांडणं सुरु झालीयेत. तिथंही 'हे बाकीचे दुसऱ्या जातीचे असल्याने मला नॉमिनेट करतात', 'तू ब्राम्हण असून आनी-पानी का म्हणतेस', 'ब्राम्हणांनी पूजा करताना उघडं न बसता सोवळं घातलं पाहिजे' वगैरे व्यवच्छेदक मराठी लक्षणं दिसायला लागलीत. या सर्व प्रकाराला 'समकालीन समाजाचा आरसा' म्हणता येईल का हो चिंतातूर भौ? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या सगळ्या 'आपापल्या क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या' कलाकारांपैकी टिपणीस, नाडकर्णी आणि रंगीत थत्ते सोडले तर इतर कुणीही मला माहीत नव्हते . कुठे नेऊन ठेवलेत मराठी कलाकार!

बाकी थत्तेंचा मी फ्यॅन आहे. मी पहिला भाग पाहिला. पुढचे भाग बघायला वेळ मिळाला नाही पण थत्ते काहीतरी जोरदार धमाका करतील असे वाटते. बिग बॉसच्या हौसमधल्या स्विमिंगपूलचा योग्य वापर जेव्हा सुरु होईल ते भाग बघायचा विचार आहे. Wink

पहिल्या भागात मांजरेकर त्या मराठवाड्यातल्या मुुलीला (चुकीचे) मराठी शिकवताना पाहून बोलती बंद झाली!

(आता आठवते त्यानुसार 'मला आमूलाग्र पाठिंबा द्या' वगैरे काहीतरी निरर्थक किंवा भलत्याच अर्थाचे काहीतरी होते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही 'पप्पी दे पारूला' हे प्रासादिक गीत पाहिलेलं दिसत नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

गाणं पाहिलं होतं. पण त्या भक्तीगीतातली देवी कोण हे कार्यक्रमात ओळख करुन देईपर्यंत लक्षात आलं नव्हतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी हेच्च लिहिणार होतो Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नवा हिंदी ब्लॅकमेल चित्रपट पाहिला. इरफान खान नसता तर खूपच कंटाळवाणा झाला असता. टाईमपास म्हणून ठीक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऑक्टोबर नावाचा पिळू चित्रपट पाहिला. इवल्याशा कल्पनेचा विस्तार करता करता दमछाक झाली आहे. त्यातच, कशाबद्दल भावनिक व्हावं आणि मैत्री म्हणजे काय, वगैरे बाबींत पटकथा पातळीवरच फार हुकलेला आहे. बाकी वरुण धवन सर्व काळ एक विशिष्ट बेअरिंग घेऊन वावरलेला आहे ते ठीक आहे. महान अभिनय वगैरे काही वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

संडे संध्याकाळ कारणी लावावी म्हणुन थेट्रात गेलो तर ॲवेंजरसाठी झुंडी लोटल्या होत्या. पण मी स्पेशली ऑफीस मधला जिम हाल्पर्टचं पात्र केलेल्या जॉन क्रासिंकी ने दिग्दर्शित केलेला अ क्वाएट प्लेस पहायला गेलो होतो. काही चित्रपट असे असतात की ट्रेलर पाहुन पहायचाच, असं डोक्यात फिट झालेलं असतं, त्यातला हा एक. चित्रपटाने बिलकुल निराश केलं नाही. अप्रतिम सुंदर चित्रपट. अशाच प्रकारच्या ष्टुरी असलेले खुप सिनेमे येउन गेले असले तरी खुपच वेगळा अनुभव; साउंड एफ्फेक्ट्स वर घेतलेली मेहनत जाणवते, विशेषत: कानाने अधु असणार्या मुलीच्या प्रसंगात आवाज पुर्णपणे बंद करणे इत्यागदी... खरं सांगतो, थेट्रात आपल्या आजुबाजुला एवढे आवाज होत असतात ते आपल्याला जाणवत नाहीत, पण हा सिनेमा पाहताना, छोट्यात छोटा आवाज अगदी बाजुच्या सीटवरचा माणुस जागच्या जागी चुळबुळला तरी खुर्चीचा होणारा बारीकसा आवाजही जाणवत होता आणी सिनेमातल्या कॅरेक्टर्स बरोबर आपणही आवाजाला सेंसिटीव्ह झालोय, हे जाणवत होतं... नक्की पहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Baby Jesus, Joseph Marie
'अ क्वाएट प्लेस'नं फारच निराशा केली. अगदी घड्याळ लावून बसल्यासारखे थोड्या थोड्या वेळानं आवाज होत. मग खलनायक प्राणी येत. कोण मरणार का नाही ह्याचाही हिशेब नीट केलेला. सगळ्यात भयानक म्हणजे अगदी येशूच्या जन्माप्रमाणे नायक-नायिकेच्या बाळाचा जन्म वगैरे. मग सगळ्या जगाचं भवितव्य ह्या एका बाळाच्या सर्व्हायव्हलवर अवलंबून असल्यासारखं. बायका-मुलांना सारखं सारखं धोक्यात घालून तर अगदी बायाबापड्यांनी माहेरच्या साडीगत डोळ्यांना पदर लावून बसावं अशी तजवीज. जगाच्या भवितव्याचं सांगता येत नाही, पण हाच जर अलीकडचा सर्वोत्कृष्ट भयपट असेल, तर एकंदर भयपटांना आता काहीच भवितव्य दिसत नाही. ह्याच्यापेक्षा मी जॉज पुन्हा बघेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चिंजं,
आपल्या मताचा पुर्ण आदर ठेउन, आपला चित्रपटाचा मुख्य प्रिमाईस बद्दल काहीतरी घोळ झाला आहे असे वाटते. सर्व जगाचं भवितव्य बाळावर अवलंबुन असल्याच मलातरी दिग्दर्शकाने सुचित केल्याचं दिसलं नाही. इन फॅक्ट बाळ हाच कथेचा मुख्य प्रिमाईस आहे. कोणत्याही सर्वायव्हल चित्रपटाचा एक हाय पॉइंट असतो. जिथे प्रेक्श्क (क्ष कसा काढायचा इथे? हा क्ष कॉपी केला दुसरीकडुन) विचारात पडतात की आता काय होणार. मग तुमच्या फेवरेट जॉ मधे बोट सिंक होउ लागते तो सीन असो कींवा अगदी गुलाम मधल्या आमीर खान ने शेवटी खाल्लेला मार असो. सगळंच आल्बेल होणार असेल तर सर्वायवल चित्रपटाची काय मजा?
>क्वाएट प्लेस मधे हा हाय पॉइंट बाळ आहे. असं वातावरण जिथे घरातील लाकडी फ्लोअरींगचा करकर आवाज आलेलाही चालत नाही तिथे नायक नायिका अशा जिवाचं (ज्याला आवाज करणे हाच एक इन्स्टिंक्ट आहे) रक्षण कसं करणार हाच तो पश्न जो पाहणार्याला पहिल्या दहा मिनिटात पडतो.
> आणि घड्याळ लावुन आवाज येण्याबद्दल म्हणाल तर, परत एकदा प्रिमाईस. चित्रपट अपोकॅलिप्स होतं त्या पहिल्या दिवशी सुरु होत नाही. तो सुरु होतो ते ७५ व्या दिवशी, जे स्पष्ट करतं की कसलाही आवाज न करण्याबद्दल ह्या कुटुंबाचं पोस्ट अपोकॅलिप्टिक सर्वायवल लर्निंग आधीच झालेलं आहे. मग तुम्हाला अपेक्शित आवाज कसे दाखवायचे बुवा?>
एनिवे, हा सर्वोत्क्रुष्ट भयपट आहे का? तर नाही. आणि प्रत्येक चित्रपट शायनिंग, रोज्मेरीज बेबी, सायको, जॉज यांच्या पंक्तित बसवलाच पाहिजे असंही नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्व जगाचं भवितव्य बाळावर अवलंबुन असल्याच मलातरी दिग्दर्शकाने सुचित केल्याचं दिसलं नाही. इन फॅक्ट बाळ हाच कथेचा मुख्य प्रिमाईस आहे.

असं मी म्हणत नाही, तर सगळं कथानक त्या बाळाभोवती फिरवलंय जणू काही सर्व जगाचं... (वर 'असल्यासारखं' हा कळीचा शब्द आहे)

नायक नायिका अशा जिवाचं (ज्याला आवाज करणे हाच एक इन्स्टिंक्ट आहे) रक्षण कसं करणार

माझा मुद्दा तो नाहीच. पहिल्या दहा मिनिटांत मुलगा मरतो, मग त्याची रिप्लेसमेंट पैदा केली जाते (एक मुलगी असूनही) आणि मग सगळं कथानक त्याच्या सर्व्हायव्हलभोवती फिरतं, हे फारच 'वंशाला दिवा हवाच, मग काहीही होवो' टाईपचं वाटतं. शिवाय, वंशाच्या दिव्याच्या जन्माचं ख्रिस्तजन्माशी इतकं साधर्म्य दाखवून ते आणखीनच कुटुंब-धर्म-देशप्रेम टाईपचं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ऐसी अक्षरे वर नवीन असल्याने आधी याबद्दल काही आसंय का पाहिलं, तर फक्त एक कोणी पाहिलंय का अशी विचारणा.
मी पाहिलं परवा. नाट्य गुंफलंय चांगलं, दोघी कलाकार गातातही उत्तम, पण या संगीत नाटकातलं एकही गाणं मनात रुंजी घालत नाही. ना चाल ना शब्द. शिवाय तुकारामाच्या समोर न दिसणा-या पात्राचे अस्तित्तव आनंद भाटे यांच्या आवाजात योग्य ठिकाणी पेरलंय, ती गाणीही तुलनेने अधिक ओळखीचे शब्द असूनही लक्षात राहात नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी नुकतंच पाहिलं. थोडा दवणीयपणा सोडला तर आवडलंच.

'संगीत नाटकातल्या गाण्यांनी मनात रुंजी घालावी' ही अपेक्षाच मला चुकीची वाटते. जुनी सं० नाटकं जाऊदे, पण नव्या संगीत नाटकांबाबत माझी मर्यादित अपेक्षा असते:
(अ) गाणी 'फिट फॉर पर्पज' असावीत. म्हणजे उगाच फापटपसारा नको, किंवा संगीत दिग्दर्शकाने प्रतिभेचा दांडपट्टा चालवलाय असं नको.
(आ) गाणी नटांना पेलवतीलशी असावीत.
(इ) गाणी लाईव्ह म्हटली जावीत.

देवबाभळी तिनापैकी अडीच अपेक्षा पूर्ण करतं.

उलट, भीमसेन-खळे-लता प्रभृतींनी गाजवलेल्या (पण आता घिस्यापिट्या झालेल्या) अभंगांना परत एकदा छापलेलं नाही याचं कौतुकच वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बरोबर आहे तुमचं, जर गाणं केवळ गोष्ट पुढे न्यायला आलं तर ते चांगलंच आहे. वेगळे अभंग निवडलेत हेही चांगलंच आहे. पण मग ते सरळ गद्य नाटकच असायला काय हरकत होती ! दोनच पात्रं म्हणून असेल पण त्या दोघींना दिलेल्या सततच्या हालचाली, तशीच गाणी. गाण्यातून रसपरिपोष व्हावा की नाही, जे जुन्या संगीत नाटकांत गवयांच्या गायकीच्या प्रदर्शनामुळेही एकंदर कलाकृतीचा तोल गेल्यामुळेही साध्य व्हायचं नाहीच. याउलट नुसतं पांडुरंग पांडुरंग हे आळवणं (आनंद भाटेच्या आवाजातील तुकारामाच्या अस्तित्वाची पहिली खूण) चांगला प्रभाव पाडून जाते. सुधारित मजकूर पहावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरोबर आहे तुमचं, जर गाणं केवळ गोष्ट पुढे न्यायला आलं तर ते चांगलंच आहे. वेगळे अभंग निवडलेत हेही चांगलंच आहे. पण मग ते सरळ गद्य नाटकच असायला काय हरकत होती ! दोनच पात्रं म्हणून असेल पण त्या दोघींना दिलेल्या सततच्या हालचाली, तशीच गाणी. गाण्यातून रसपरिपोष व्हावा की नाही ? ते जुन्या संगीत नाटकांत गवयांच्या गायकीच्या प्रदर्शनामुळे, एकंदर कलाकृतीचा तोल गेल्यामुळेही साध्य व्हायचं नाहीच. याउलट नुसतं पांडुरंग पांडुरंग हे आळवणं (आनंद भाटेच्या आवाजातील तुकारामाच्या अस्तित्वाची पहिली खूण) चांगला प्रभाव पाडून जाते.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'संगीत नाटकातल्या गाण्यांनी मनात रुंजी घालावी' ही अपेक्षाच मला चुकीची वाटते.

मनात रुंजी घातली नाही तर संगीत नाटकातल्याच काय, इतर कोणत्याही गाण्याला अथवा संगीताला अर्थ काय उरतो?

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'संगीत नाटक' म्हणजे 'संगीत वापरून केलेलं नाटक' आहे की 'नाटक वापरून केलेलं संगीत' आहे हा मुख्य प्रश्न आहे. माझं मत स्पष्टपणे पहिल्या पारड्यात आहे - नाटक महत्त्वाचं, संगीत तुलनेने कमी महत्त्वाचं. त्यामुळे रुंजीबिंजी नाय घातली तरी चालते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

संगीत वापरून केलेलं नाटक असेल तरीही त्यातलं संगीत मनात रुंजी घालूच शकतं. दुसरा प्रकार अर्थातच ऑब्व्हिअस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

'प्रेमविवाह' म्हणजे 'प्रेम वापरून केलेला विवाह' आहे की 'विवाह वापरून केलेलं प्रेम' आहे हा मुख्य प्रश्न आहे. माझं मत स्पष्टपणे पहिल्या पारड्यात आहे - विवाह महत्त्वाचा, प्रेम तुलनेने कमी महत्त्वाचं. त्यामुळे ... नाय घातली तरी चालते.

(बाकी चालू द्या. आणि हो, गाळलेल्या जागा अॅप्रॉप्रियेटली भरा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...'संगीत नाटक' असे ट्रॅडिशनली ज्यास संबोधले जाते, ते एकीकडे ऑपेरा तर दुसरीकडे तमाशाचा बोर्ड अशा दुहेरी प्रेरणेतून जन्मलेले रसायन आहे. बोले तो, त्यात गाणे ('संगीत') महत्त्वाचे; बाकी ते नाटक/ष्टोरी/प्लॉट वगैरे दुय्यम, निमित्तमात्र. म्हणजे, 'नाटक वापरून केलेले संगीत'च.

(हं, बऱ्यापैकी कथानक वगैरे असलेली संगीत नाटके झालीच नाहीत, असे नाही. परंतु लोक गडकऱ्यांचे 'एकच प्याला' पाहत, पुन्हापुन्हा पाहत, ते 'कशि या त्यजू पदाला'ला दाद देण्यासाठी; त्यातला सामाजिक संदेश पटला/आवडला/भावला, म्हणून नव्हे. (किंबहुना, खुद्द गडकरी पीत, या आयरनीकडे चाहत्यांचे सारासार दुर्लक्ष लक्षात घेता, तो सामाजिक संदेश तरी कितपत रजिष्टर होत असावा, याबद्दल शंकाच आहे. किंबहुना, 'एकच प्याला'चा खरा नायक तळीराम, सुधाकर नव्हेच, असा एक फाटा पु.लं.नी फोडलेला आहेच, जो आम्हांस सयुक्तिक वाटतो - त्यातून त्या नाटकाकडे पाहण्याचा एक वेगळाच 'नज़रिया' मिळतो. पण ते एक असो.))

सांगण्याचा मतलब, 'संगीत वापरून केलेले नाटक' (ज्यात संगीत हे दुय्यम आहे) अशी काही (नवी) 'जॉन्र' असावयास हरकत काहीच नाही. (आम्ही कोण हरकत घेणार?) फक्त, त्यास 'संगीत नाटक' म्हणून संबोधू नका ब्वॉ. दॅट टर्म हॅज़ ऑलरेडी बीन टेकन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या सगळ्या ऊहापोहात एक दिलासादायक गोष्ट म्हणजे गाणी लक्षात राहतात असा उलटा आक्षेप आला नाही. हुश्श. नाहीतर मीच औरंगजेब ठरले असते. पण आता मला ते पुन्हा पाहावंसं वाटतंय. आणि काही नाही तरी निदान त्या दोघी नट्यांना अनुल्लेखाने मारायला नको. त्यांची नावं शुभांगी देवकाते आणि मानसी जोशी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Blurred Lines: Inside the Art World (2017)
ही अप्रतिम डॉक्युमेंटरी पाहीली. समकालीन कला जगताचा व्यवहार कसा चालतो यावर झोत टाकणारी वेगळीच डॉक्युमेंटरी फार आवडली. यातील अनेक व्यावसायिक बाबी तर नविन आहेतच पण हे कारण दुय्यम झाले
ही डॉक्युमेंटरी अनेक समकालीन आधुनिक कलाकारांचे अप्रतिम असे भन्नाट आर्ट वर्क्स , पेंटींग्ज आणि अफलातुन प्रयोग डॉक्युमेंटरीच्या ओघात जे काय
दाखवते ( अगदी थोड्या सेकंदासाठी झलक इतकीच ) ते इतके सुंदर बघण्यासारखे आहे की निव्वळ नेत्रसुखासाठी या उपभोगासाठी ही डॉक्युमेंटरी एकदा तरी अवश्य बघावी अशी शिफारस करतो.

नॉस्टॅल्जीया हा आन्द्रेइ तारकोव्हस्कीचा सिनेमा दोन वेळा बघितला. हा सिनेमा वा यांचे इतर चित्रपट पाहतांना माझ्यावर जो परीणाम होतो तो साधारण असा
एक माझ्या मनाला जी "गती" एरवी च्या रुटीन ने आलेली असते ती हा वा असे चित्रपट पाहतांना एकदम मंदावु लागते. माझ्यात पेशन्स वाढतो
या सिनेमातील पाण्याचे वेगवेगळ्या अवस्थेतले विविध छ्टा दाखव्णारे चित्रीकरण, यातील एकदम सुक्ष्म सुक्ष्म जाणवणारे साउंड्स जे त्या त्या दृश्याशी व पात्राशी व त्याच्या मनोवस्थेशी कमालीचे एकरुप झालेले व परीणामी आपल्या मेंदुवर परीणाम करणारे, यातील प्रॉफेटीक मॅडमॅन , यातील उदासीनता, पोएट्री इज अनट्रान्स्लेटेबल सारखे अनेक मार्मिक डायलॉग्ज, म्हणजे अनेक अनेक तुकडे व बाबी आवडुन शेवटी सिनेमाने डोक्याचा भुगा केला इतकेच
मी म्हणु शकतो.
एकवार बघावा असा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

व्हेनेझुएलातल्या एका स्त्रीची कहाणी

सुमारे साडेतेरा मिनिटांचा चित्रपट. समाजवादाने केलेले अनंत उपकार. बायदवे - हे सगळं आत्ता घडतंय.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही एक मराठी यू ट्यूब चॅनेल सुरू केले आहे. मराठीमध्ये वेगवेगळ्या बैठ्या खेळांबद्दल माहिती सांगणारे व्हिडीओ/वेबसाईट्स जवळपास नाहीतच, म्हणून आम्ही दहा वेगवेगळ्या खेळांची माहिती देणाऱ्या व्हिडीओची मालिका बनवणार आहोत.

या मालिकेतील पहिला व्हिडीओ इथे पहा https://www.youtube.com/watch?v=gKOqhO2-1q8

काही सूचना असतील तर जरूर कळवा. व्हिडीओ आवडल्यास मित्र-मैत्रिणींना पाठवा.

ईमेल - teaandbiscuitproduction@gmail.com

धन्यवाद!

Disclosure: I'm associated with this channel.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी वरच्या लोकांकडून तांत्रिक किंवा इतर फीडबॅकच्या अपेक्षेत ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://www.youtube.com/watch?v=stNh_di8OM8

काही ठिकाणी फार मार्मिक अशा टीप्पणी रविश कुमार ने केलेल्या आहेत.
प्रेझेंटशन फार विनोदी आहे हा बोनस

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

सध्या भारतात काही शहरांत स्कॉटिश दिग्दर्शिका लिन रॅमजीचा 'यू वर नेव्हर रिअली हीअर' लागला आहे. फार चालणार नाही त्यामुळे शक्य असल्यास लवकरात लवकर बघा. गोष्ट तशी नवी नाही - एकाकी, मानसिक आघात झालेला भाडोत्री मारेकरी एका कामगिरीसाठी जातो आणि एका खोल गर्तेत अडकत जातो. ह्या चित्रपटासाठी गेल्या वर्षीच्या कान महोत्सवात जोकिन फीनिक्सला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि रॅमजीला पटकथेचा पुरस्कार मिळाला होता. संवाद जवळपास नाहीत. मोठ्या पडद्यावर पाहण्यासारखा चित्रपट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अजीज अन्सारीची ही सिरीयल नेटफ्लिक्स वर आहे. पहिला एपिसोड इतका खास नाही. पण नेटाने पाहिलेत तर दुसऱ्या तिसऱ्या भागापासून आवडेल. अमेरिकन डेटिंग लाइफ, इमिग्रण्ट लाइफ वगैरे वर मार्मिक शेरेबाजी आहे.

ॲमेझॉन प्राइम वर गोलायाथ चा दुसरा सीझन आला आहे. त्याचा पहिला एपिसोड तरी इण्टरेस्टिंग आहे. पुढे बघू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्राईमवर 'येस मिनिस्टर' ही जुनी ब्रिटिश सिरियल बघत आहे. नोकरशाही आणि राजकारण्यांमधील रस्सीखेच उत्तम दाखवलेली आहे. पहिल्यांदा ब्रिटिश पद्धतीचे उच्चार समजायला कठीण जातं पण एकदा कानांना सवय झाली की मजा येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुन्हा एकदा बघायची आहे सुरूवातीपासून शेवटपर्यंत. उच्च सिरीज आहे ती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अलबत्या गलबत्या बालनाट्य नवीन संचात पाहिलं. जुन्या संचातलं आठवत नव्हतं.

पण अगदी लहान होऊन पाहण्याचा प्रयत्न करूनही रटाळ, ओढून ताणून विनोद केलेलं, कालानुरूप करायचं म्हणून कायच्या काय अडिशन्स घेतलेलं असं वाटलं.

लेखक मतकरी, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर, गाणी अवधूत गुप्ते, चेटकीण: वैभव मांगले असं असूनही फारच कंटाळा आला.

सेटवर पुष्कळ खर्च, पण कपडे मात्र अगदीच कामचलाऊ असंही जाणवलं. तरीही आत्तापर्यंतचे सर्व 53 शोज हाऊसफुल झालेत अशी घोषणा तिथे केली. आश्चर्य आहे. पालक नॉस्टॅल्जीयापोटी मुलांना नेताहेत का ? फक्त वय वर्षे पाचच्या खालची बालकंच जरा हसत खिदळत होती. मोठी मुलं सहन केल्यासारखी चुळबुळत होती. मधेमधे मोबाईल, व्हिडीओगेम्स यावर संवादात कानपिचक्या होत्याच.

मुलांची नाळ दर्जेदार (आपल्या वेळच्या) बालनाट्यविषयाशी तुटू नये असा काही सांस्कृतिक गिल्टोद्भव उद्देश असावा का पालकांच्या गर्दीचा? मुलांचं जग आणि इनोसंस लेव्हल पूर्णपणे बदलली आहे याचं भान नाटकात दिसलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुलांची नाळ दर्जेदार (आपल्या वेळच्या) बालनाट्यविषयाशी तुटू नये

ग्रिप्स थिएटरची बालनाट्यं हा दर्जेदार पर्याय उपलब्ध आहे. नुकतंच पुण्यात प्रयोग झालेलं "यंबा बंबा बू" वय वर्षे आठ आणि अकरा या प्रेक्षकांना लय आवडलं असा रिपोर्ट हाती आला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बहुचर्चित 'लस्ट स्टोरीज' कुणी पाहिला का?
(सिनेमागृहांत प्रदर्शित न करता थेट 'नेटफ्लिक्स'वर नेण्याने कमी लोकांपर्यंत पोहोचतोय का?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

"काला" या तमिळ सिनेमाबद्दल सोशल मिडियावर असलेली चर्चा पाहिली आणि शक्य झाल्यास हा सिनेमा पहायचा असं ठरवलं.

वर्तमानपत्रं आणि सोशल मिडियावर या सिनेमाबद्दल बरंच वाचलेलं असल्यानेच मुळात सिनेमा पाहायला गेलो होतो. त्यामुळे तिथे आधीच ज्यांची नोंद घेतली आहेत ते मुद्दे मांडणं यात काही विशेष हशील नाही.

भारतीय सिनेमामधे विद्रोह या घटकाचं महत्त्व या निमित्ताने पुन्हा अधोरेखित व्हावं आणि काहीशा परिचित असलेल्या जातीवास्तवाच्या संदर्भातल्या विद्रोहाच्या रसायनाला कसलाही मुलामा न चढवता पडद्यावर आणलं जाणं हे या चित्रपटाचं मला जाणवलेलं श्रेय होय.

विद्रोह हा घटक भारतीय सिनेमाला नवा नाही. १९५० च्या दशकापासूनची अनेक उदाहरणं घेता येतील. मात्र सर्वात ठसठशीतपणे अमिताभ बच्चनची १९७०च्या सुरवातीची कामगिरी आठवणं अपरिहार्य आहे. मला "दीवार" सिनेमा अगदी यत्ता दुसरीतिसरीमधे असताना पाहिल्याचं आठवतं आणि "या सिनेमामधे एकदासुद्धा अमिताभ हसत नाही, हसवत नाही" हे अगदी तेव्हाही अंधुकपणे जाणवल्याचं आठवतंय. शोलेमधे तो मरतो पण विनोद करतो. मुकद्दर का सिकंदर मधे मरतो पण आपल्या मित्रांबरोबर रात्रीबेरात्री मजा करतो. मनात कुठेतरी मेमसाबबद्दलचा कोवळेपणा आहे. "दीवार"मधे मात्र नाही. "दीवार"मधे तो अँग्री यंग मॅन खर्‍या अर्थाने आहे. रागावलेला. "मेराबाप चोर है" हातावर लिहिणार्‍या जगाबद्दलचा विद्रोह गुन्हेगारीत शिरून करणारा.

त्याआधी आणि नंतर आपल्या हिंदी सिनेमाने "अन्यायाविरुद्ध बंड करणारे नायक" या जनरल लेबलखाली बराच माल खपवला आहे. पण दीवारचा अस्सलपणा कुठे नाही.

रजनीकांत या, तमिळ सिनेमातल्या लोकदैवताची प्रतिमा "तळागाळातल्यांचा देव" अशीच. या दैवताची महती अशी की , ७० सालच्या दशकात रजनीकांत जे अतिमानवी चमत्कार वाटावेत असे एकहाती ढिशूमढिशूम चमत्कार करायचा त्याच चमत्कारांचे अगदी एकवीसाव्या शतकामधे चकचकीत सीजीआय-स्पेशल इफेक्टस सकट शंभर दोनशे कोटी गोळा करणारे कित्ते गिरवले जातात. आज सलमान खान जे करून पाचशे कोटी कमावतो किंवा तेलुगु सिनेमामधे जे चित्तचक्षुचमत्कृतीयुक्त पहायला मिळतं त्याची सुरवात मारामारी करता करता हवेत सिगरेट फुंकून बंदुकीच्या गोळीने शिलगावणार्‍या "थलैवा"मुळे झाली हे आपण लक्षांत घ्यायला हवं.

तर या लोकदैवताने अलिकडेच सक्रीय राजकारणात भाग घेण्याची घोषणा केली. "काला"च्या निमित्ताने रजनीकांतने बदललेली कूस, याचा संदर्भ हा आहे हे लक्षांत घेतलं की आता "रोबोट"मधे ऐश्वर्या रायबरोबर चकचकीत डान्स करणारा "रजिनी" आता धारावीत राहाणारा लोकनेता का बनला असावा तेही लक्षांत येतंच.

असो. चित्रपटातल्या आंबेडकर-बुद्ध यांच्या प्रतिमा, बुद्ध विहार, खुद्द धारावीमधे केलेलं चित्रण, तिथले स्थानिक संदर्भ, रजनीकांतच्या एरवीच्या "ओव्हर द टॉप" कामगिरीला वजा करून त्या जागी केलेल्या (रजिनी ष्टांडर्डने!) वास्तववादी चित्रणाची, नाना पाटेकर यांनी रंगवलेल्या (अभ्यंकर आडनावाच्या नेत्याच्या!) उघडुघड शिवसेना-हिंदुत्ववादी विचारसरणीची, अंजली पाटील या मराठी अभिनेत्रीने रंगवलेल्या कडकलक्ष्मी भूमिकेची, हुमा कुरेशी आणि "सेल्वी"ची भूमिका करणार्‍या तमिळ अभिनेत्रीच्या कामाची - आणि यांच्या निमित्ताने, या चित्रपटातल्या स्त्रीवादी कोनाची - आणि त्या सर्वाबरोबर सिनेमा बटबटीत आणि "हिंदुत्वविरोधी" असल्याचीही - चर्चा बरीच झालेली आहे. त्यावर मी नव्याने काही लिहू शकेन असं वाटत नाही.

प्रस्तुत चित्रपटामधे Product placement असावी तशी, विद्रोहाची - मग तो जातीवाचक असो की लिंगाधारित असो - त्या विद्रोहाची चिन्हं ठायीठायी आहेत. विद्रोहाचं सौंदर्यशास्त्र बर्‍यापैकी डिटेलमधे इथे आलेलं आहे. "beauty is only skin deep" असं गमतीशीर विधान इंग्रजीत आहे. हे विधान इथे protest बद्दल लागू करावं का असं मनात सतत येत होतं. जो विद्रोह आहे तो शहरी लँड-माफिया विरोधातला आहे. मग तो जातीसंस्थेविरोधातला कसा? या प्रश्नाचं नेमकं उत्तर किमान मला तरी सापडलं नाही.

द्राविडी अस्मितेच्या नाळेला महाराष्ट्रातल्या विद्रोही परंपरेशी जोडण्याची कल्पकता आणि त्याकरता रजनीकांतच्या, निम्नआर्थिक स्तरातली आणि युवकांमधली लोकप्रियता पणास लावण्याची खेळी म्हणजे हा चित्रपट इतकं साधं माझं त्याबद्दलचं आकलन म्हणता येईल.

पा रंजीत या दिग्दर्शकाचं यश म्हणजे हे रसायन त्याने जमवलं. मुख्य म्हणजे ते जमवताना कधी नव्हे ते द्राविडी आणि आंबेडकरी विचारांचा संगम घडवून आणला. त्याची प्रतीकं मांडताना कुठेही हात आखडला नाही. त्याचं माझ्यापुरतं अपयश म्हणजे "अरे, हा सिनेमा नागराज मंजुळे किंवा अनुराग कश्यपने बनवला असता तर काय लई मज्जा आली असती!" हा विचार वारंवार मनात येणं.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक3
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

उगाचंच ...
आमचे लाडके . ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे वेस अँडरसनचे किती चाहते आहेत? सध्या त्याचा 'आयल ऑफ डॉग्ज' भारतात प्रदर्शित झालेला आहे. फार चालेल असं वाटत नाही, पण वेगळी विनोदबुद्धी आणि दृश्यशैली ह्यासाठी माझ्याकडून शिफारस.

ट्रेलर -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अर्थातच भारतात खूप उशिरा प्रदर्शित झालेला दिसतोय. मी kikaass वरून घेतला आणि आरामात पाहिला. ग्रँड बुडापेस्टसाठी सुद्धा असंच झालं होतं. नेटवर तो सहज आणि अत्युच्च दर्जात उपलब्ध होता आणि मग भारतात रिलीज झाला.
वेसचा मी खूप चाहता आहे.
वेगळ्या शैलीच्या पदराखाली तो मनोरंजनाला दुय्यम वागणूक देत नाही म्हणून तो अधिक आवडतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

मी kikaass वरून घेतला आणि आरामात पाहिला.

दृश्य परिमाणावर पुष्कळ काम केलेलं असतं असे सिनेमे मला शक्यतो मोठ्या पडद्यावर पाहायला आवडतात. इथेही एखाद्या लघुचित्राप्रमाणे अनेक छोटेछोटे तपशील होते. मोठ्या पडद्यावर पाहतानाही ते टिपताना दमछाक होत होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जंतूजी,
मी लॅपटॉपवर नाही म्हणत. 55" इंचाच्या डिस्प्लेवर 4के सारख्या फॉरमॅटमध्ये चित्रपट पाहणे, तेही हातपाय पसरून आरामात, मला कोणत्याही मल्टिप्लेक्सपेक्षा अधिक सुखदायी, स्पष्ट, भव्य, तपशीलवार आणि सोयीचं वाटतं. उलट थिएटरमध्ये काही गोष्टी सुटून जातात त्या रिपीट पाहण्यात सापडतात. पब्लिकचा त्रास तर अजिबात होत नाही. दर्जेदार प्रिंट मिळवताना थोडा धीर धरावा लागतो इतकंच. (मूल्यांचा प्रश्न असेल तर तो वेगळा). आता 40 जीबी पर्यंतचे टोरेंटसुद्धा उपलब्ध आहेत.

माझा हा प्रतिसाद पाहा.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

लेथ जोशी अखेर महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. विविध शहरांत कुठे कधी खेळ आहेत ह्याची माहिती इथे मिळेल. एरवीच्या व्यावसायिक सिनेमापेक्षा वेगळ्या प्रकारचा सिनेमा पाहण्यात रस असेल, तर आवर्जून पाहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दिनांक ६ जुलै २०१८ ते १२ जुलै २०१८ या कालावधीत , पुण्याच्या NFAI मधे हा चित्रपट महोत्सव झाला. रिकामटेकडा असल्याने यातील बऱ्याच फिल्मस मी पाहिल्या. मागच्या वर्षीच्या तुलनेने, या वर्षी चांगले म्हणता येतील, असे चित्रपट कमी होते. ढासळलेली कुटुंबव्यवस्था, त्याचा बालमनांवर झालेला परिणाम आणि त्यातून आलेले वैफल्य, हे प्रकार बऱ्याच चित्रपटांत, एक समान धागा वाटले.
विशेष उल्लेखनीय चित्रपटांत, सायप्रसचा 'बॉय ऑन द ब्रिज, इस्टोनियाचा , मॅन हू लुक्स लाईक मी हा बाप-मुलाच्या संबंधावर भाष्य करणारा वाटला. त्याशिवाय, टायगर थिअरी हा झेक चित्रपट , बायकोचा पारंपारिक डॉमिनेशनच्या विरुद्ध बंड करणारा म्हातारा व्हेट डॉक्टर फारच मजेशीर वाटला.
जर्मनीचा हाऊस विदाऊट रुफ, कर्डिश कुटुंबाच्या संघर्षाचा आणि आयएसच्या इराकमधल्या आक्रमणामुळे, तिथल्या लोकांवर झालेल्या परिणामांचा चटका लावून गेला. हंगेरीचा किल्स ऑन द व्हील्स, वास्तव आणि काल्पनिक कथेची बेमालुम सरमिसळ दाखवून गेला.
सर्वात आवडलेला चित्रपट, डेन्मार्कचा, लँड ऑफ माईन, हाच होता. आपण दुसऱ्या महायुद्धावर, दोस्तांच्या बाजूने असलेले अनेक चित्रपट पाहिले आहेत. पण पराभूत जर्मन सैन्यातल्या काही तरुण पोरांविषयी, कणव उत्पन्न करणारी ही फिल्म मन सुन्न करुन गेली. युद्ध संपल्यावर, डेन्मार्कच्या समुद्रकिनाऱ्यावर, जर्मन सैनिकांनी पेरलेले असंख्य भूसुरुंग निकामी करायचे असतात. त्यासाठी, पकडलेल्या जर्मन सैन्यापैकी, अनुभव नसलेल्या अगदी तरुण पोरांना या कामी जुंपण्यात येते. त्यांच्यावर देखरेख करायला जो डॅनिश सार्जंट असतो त्याला, जर्मन सैन्याविषयी टोकाचा तिटकारा असतो. प्रारंभी तो फारच कठोर वागतो. काम संपल्यावर घरी जायला मिळेल, या एकाच आशेवर ती बिचारी मुलं, जीव धोक्यांत घालून हे काम करत असतात. अनेक मुलं(तसे जर्मन सैनिकच) स्फोटांत मरतात. सार्जंटला हळुहळू, या मुलांबद्दल थोडी दया येऊ लागते. शेवटी १८ पैकी केवळ चारच मुले जिवंत रहातात. तो त्यांना परत पाठवायचे ठरवतो. पण वरिष्ठ अधिकारी नकार देतात. नाईलाजाने, तो स्वत: त्या चार मुलांना सीमेलगत सोडून येतो.फिल्मच्या शेवटी दाखवले की हे काम नंतरही चालू राहिले आणि त्या कामासाठी लावलेल्या जर्मन सैनिकांपैकी निम्म्याहून जास्त सैनिक स्फोटांत मेले.
जर्मन सैनिकांनी अनन्वित अत्याचार केले होते, पण एकदा ते हरल्यावर सगळ्या पीडित देशांमधे त्यांच्याविरुद्ध जो बॅकलॅश आला, त्याचे प्रभावी चित्रण या चित्रपटांत केले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

पाने