पुढील पाच मिनिटात,
पुढील पाच मिनिटात,
"अ" अतिरेकी बधीर करतील आपला मेंदू
"ब" बलात्कारी झुकवतील आपली मान शरमेने खाली
"क" कोवळी बालपणं विकली जातील छुप्या बाजारात
"ड" डोकी फुटतील धर्म/सत्तामार्तंडांच्या एका भृकुटीभंगाने आपल्या डोळ्यादेखत
ई-पेपर्स रिफ्रेश करून थकतील "अ" "ब" "क" "ड" च्या मिनिटागणिक वाढत जाणाऱ्या किंमती
आपल्या जीर्ण-शीर्ण त्वचेच॑ रोम-रोम जळताना
हे उत्सवी फिड्ल आता मीच वाजवायला घेईन म्हणतो
प्रतिक्रिया
सुंदर कविता!
खूप खूप छान. केऑस शब्दांत पकडता येणं इतकं सोपं नव्हे. आजच्या काळात ही कविता करायला धाडसही हवं.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
१४ टॅन,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
अवांतर: मिपा वर याच कवितेवर आलेली एक प्रतिक्रिया "याला कविता किंवा रचना म्हणणे मनाला पटत नाहिये. जे काही लिहिले आहे त्याला 'र' ला 'ट' जोडणे म्हणतात. ..."
मनापासूनची प्रतिक्रिया वेगळी
आणि आपल्या प्रतिक्रियेलाही दुजोरा/दाद मिळावा/वी ह्या अपेक्षेने लिहीलेली वेगळी.
कविता बाऊन्सर जाणं त्याहूनही वेगळं.
तरीही, असतात आवडीनिवडी आपापल्या. असो.
मिपावर ह्याच मुख्य कारणासाठी मी लिहीत नाही.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
ती
ती प्रतिक्रिया मीच दिली आहे. मात्र आजच्या तुमच्या दोन्ही कवितांना "चांगला" प्रतिसाद दिला आहे. (तिकडच्या आणि इकडच्या !)
अवांतर सुचना : कोण कोठे काय म्हणाले ह्याच्या खतावण्या लिहिणे सोडा. आयुष्य सुख:मय होईल. तिकडची धुणी इकडे धुण्यात काही पॉईंट नाही.
धमु, प्रतिसादांबद्दल
व सुखमय आयुष्यविषयक सूचनेबद्दल धन्यवाद.
आमच्या वस्त्रस्वच्छालयाच्या अनेक शाखा असल्या तरी तिकडची धुणी इकडे धुणार नाही. अगदी खतावणी शपथ.
धमु
धमु वरुन धमाल मुलगा हा आयडी आठवला. गेले ते दिवस.
नीरो
सर्व विचारवंत ज्याला नीरो म्हणताहेत त्याच्या हातचं फिडल का काढून घेता ? विचारवंत रागावतील ना ?
येथे विचारवंतांच्या
रागाकडे यथायोग्य दुर्लक्ष केले जाईल. तरी राग मानू नये.
खूप छान कविता.. आवडली!!
खूप छान कविता.. आवडली!!
या वाक्याशी लई वेळा सहमत..
धन्यवाद May.
.