प्रतिजैविकांचा भडिमार आणि वस्तूस्थिती

टीप: या चर्चेतून कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. तसे वाटल्यास हा धागा लगेच काढून टाकावा ही संपादक मंडळाला नम्र विनंती!

सगळीकडे पावसाचे वातावरण आहे. जीवसृष्टी फुलत आहे. मग "विषाणू" .... जे जीवच असतात ते याला अपवाद कसे असणार? या दिवसात तो एक ताप असतो. केव्हा विषाणूसंसर्ग होईल याचा नेम नसतो आणि मग फ्ल्यू, चिकन गुनिया असे अनेक आजार होतात आणि बळावतात.मग आपण दुखणे अंगावर न काढता फॅमिली डॉक्टर कडे धाव घेतो. बऱ्याच वेळा हे डॉक्टर त्यांच्याकडील औषधे आणि इंजेकशन्स देतात आणि त्याशिवाय काही औषधे लिहून देतात. त्यातील ९९% औषधे ही प्रतिजैविके ज्याला इंग्रजीत अँटी बायोटिक म्हणतात ती असतात पण हि औषधे लिहून देताना डॉक्टर रॅशनल विचार करीत नाहीत आणि त्याचे गंभीर परिणाम रुग्णाना भोगावे लागतात. प्रतिजैविकांचा धंदा वाढत चालला आहे. पण प्रतिजैविके ही सरसकट वापरावयास सांगणे अनैतिक आहे. याबद्दल मि माझी मते येथे मांडत आहे. या विषयावर साधक चर्चा व्हावी म्हणून हा लेखनप्रपंच !

माझा अनुभव...... मी घराजवळच असलेल्या डॉक्टर कडे जातो आणि ते वरील प्रकार नेहमी करतात. परंतु नंतर नंतर मी त्यांना अशा प्रकारची औषधे देऊ नका म्हणून विनंती केली मग त्यांनी सुरुवातीला डोस कमी करून नंतर नंतर ती लिहून देणे बंद केले, पण इतरांचे काय?

आता अँटी बायोटिक बद्दल वस्तुस्थिती :

१. अँटी बायोटिक म्हणजे असे औषध जे विषाणूंची वाढ खुंटवते किंवा विषाणू मारून टाकते.
२. असे औषध सरसकट देणे योग्य नाही.
३. अँटी बायोटिक आणि हर्बल मेडिसिन एकत्र घेतल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.
४. अँटी बायोटिक च्या सेवनाने कीडनि निकामी होऊ शकते. याशिवाय अनेक गंभीर साईड इफेकट होतात.
५. आजकाल उठसूट अगदी सध्या आजारातही, अँटी बायोटिक घ्यायला सांगितले जाते यात औषध कंपन्या , केमिस्ट आणि डॉक्टर यांचे हितसंबंध गुंतलेले असतात.
६. अँटी बायोटिक चा कोर्स पूर्ण करावाच लागतो. त्यात हलगर्जी झाल्यास विषाणू औषधाला दाद देत नाहीत .
७. आपणाला आठवत असेल की चार पाच वर्षांपूर्वी ब्रिटनच्या लॅन्सेट जनरल मध्ये एक संशोधन आले होते त्यात भारतातील अँटी बायोटिक च्या अयोग्य वापरामुळे एक नवीन विषाणू "न्यू दिल्ली व्हायरस " उद्भवला आहे असे उल्लेखिले होते. याबद्दल खूप गोंधळ माजला होता आणि भारतातील वाढत चाललेले मेडिकल टूरीजम रोखण्यासाठी हा कांगावा केला होता अशी चर्चा होती.

एकंदरीतच अँटी बायोटिक चे अनेक वाईट दूरगामी परिणाम असतात पण कंपन्या उत्पादन वाढवण्यासाठी याकडे दुर्लक्ष करतात हे माझे मत आहे.

आपला व्यवसाय चालवणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे पण त्यासाठी नैतिकता महत्त्वाची असते हे समजले पाहिजे.

याबद्दल जाणकारांनी आपलीही मते मांडून एक निरोगी चर्चा करावी ही नम्र विनंती!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

मी घराजवळच असलेल्या डॉक्टर कडे जातो आणि ते वरील प्रकार नेहमी करतात. परंतु नंतर नंतर मी त्यांना अशा प्रकारची औषधे देऊ नका म्हणून विनंती केली मग त्यांनी सुरुवातीला डोस कमी करून नंतर नंतर ती लिहून देणे बंद केले, पण इतरांचे काय?

हे फार भारीये. एक तर तुम्ही डॉक्टरला काय औषध द्यायला पाहिजे ते सांगता. वर तुमचा डॉक्टर तुमचे ऐकुन तुम्हाला औषध देतो. त्या डॉक्टर ला स्वताच्या ज्ञानाबद्दल काहीच खात्री नाही का?
खरे तर तुम्ही डॉक्टर बदला.

टीप: या चर्चेतून कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. तसे वाटल्यास हा धागा लगेच काढून टाकावा ही संपादक मंडळाला नम्र विनंती!

ह्यानी गोंधळले आहे मी. म्हणजे तुम्हाला ह्या धाग्यात असे काय आहे असे वाटले की कोणी दुखावले जाइल. किंवा इथल्या कोंणाचे व्हेस्टेड इंटरेस्ट आहेत असे तुम्हाला वाटते का प्रतिजैविकांचा मारा करण्यात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे तुम्हाला ह्या धाग्यात असे काय आहे असे वाटले की कोणी दुखावले जाइल. किंवा इथल्या कोंणाचे व्हेस्टेड इंटरेस्ट आहेत असे तुम्हाला वाटते का प्रतिजैविकांचा मारा करण्यात?

अखिल भारतीय विषाणू महासंघाने विरोध केला तर?
छ्य्या!! तुमच्यासारक्या झंटलमन म्याडमना इक्ती शिंपल गोश्ट कलत नाय?
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थातच! प्रतिजैविके खुप महाग असतात. आणि डॉक्टर , केमिस्ट, एम आर यांची साखळी असते. ते रुग्णाला(आर्थिक द्रुष्त्या) वाटुन खातात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओम शान्ति ओम

अर्थातच! प्रतिजैविके खुप महाग असतात. आणि डॉक्टर , केमिस्ट, एम आर यांची साखळी असते. ते रुग्णाला(आर्थिक द्रुष्त्या) वाटुन खातात

असतील की, पण इथे कोणाचे असे काही आहे असे वाटले का? काही आतली बातमी असली तर व्यनित कळवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अँटाय-बायोटिक ने विषाणू (व्हायरस) नाही जीवाणु (बॅक्टेरीया) मरतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!
माझी मराठी प्रतिशब्दात चुक झाली.
तुमचे बरोबर आहे.
पण डॉक्टर व्हायरल इन्फेक्शन म्हणतात आणि प्रतिजैविके देतात. "व्हायरल" आणि "व्हायरस" हे जवळचे शब्द नाहित का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओम शान्ति ओम

डॉक्टर व्हायरल इन्फेक्शन म्हणतात आणि प्रतिजैविके देतात. "

साहेब, तुम्ही खरच डॉक्टर बदला. अहो तो व्हायरल इन्फेक्शन ला प्रतिजैविके देतोय***. जाम गडबड आहे.

----------
*** : ह्या कृतीला ला दुसरी कारणे असु शकतात ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. मुळ विषय बाजुला राहु नये म्हणुन ही तळटिप.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हायरल इन्फेक्शन आपोआप बरे होते. बॅक्टेरीअल इन्फेक्शनला अँटायबायोटिक्स लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉक्टर व्हायरल इन्फेक्शन म्हणतात आणि प्रतिजैविके देतात. "व्हायरल" आणि "व्हायरस" हे जवळचे शब्द नाहित का?

तुमचे डॉक्टर व्हायरल आजारांसाठी प्रतिजैविकं देत असतील तर सर्वात आधी डॉक्टर बदला. मग हौस असेल तर डॉक्टरवर काही कारवाई करता येईल का ते पाहा.

विषाणू = व्हायरस. विषाणूंमुळे होणाऱ्या गोष्टी = व्हायरल. जीवाणू = बॅक्टेरिया. प्रतिजैविकं = अँटीबायोटिक्स; ती जीवाणूंशी लढतात. प्रतिजैविकांचा विषाणूंवर काहीही परिणाम होत नाही. व्हायरल आजार झाल्यावर प्रतिजैविकं खाणं म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी (पूर येणं). प्रतिजैविकांच्या अतिवापराचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे जीवाणूंच्या गुणसूत्रांमध्ये बदल घडतात आणि पूर्वी बरे होऊ शकणारे आजार आता आटोक्यात येत नाहीत. ऐसीवरचे आडकित्ता, साती आणि इतर डॉक्टर लोक तपशीलात माहिती देतीलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमचे डॉक्टर व्हायरल आजारांसाठी प्रतिजैविकं देत असतील तर सर्वात आधी डॉक्टर बदला.

अदिती तै, तुमचे माझे एकमत झालय, तसे हल्ली होते अधुन मधुन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीही झालं तरी मी माणूस आहे, आनंदध्वज नाही. π घसरायचाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काहीही झालं तरी मी माणूस आहे, आनंदध्वज नाही. π घसरायचाच.

_____/\______

मनापासून हंसलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रचंड विनोदी.
तिरशिंगरावांशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधु, साधु!
"प्रतिजैविकांचा विषाणूंवर काहीही परिणाम होत नाही." हे सतत म्हणत रहायला पाहिजे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://en.m.wikipedia.org/wiki/DRACO
आता विषाणुजन्य आजारावर ड्रॅको नावाचे antiviral आले आहे,ज्याने कॉमन कोल्ड पासून ते एड्सपर्यंत कशावरही उपचार करता येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

तर आदितीने आठवण काढली म्हणून लिहित्येय!
Wink

प्रतिजैविके /अँटीबायिटिक्स वापरण्याला भारतात काहीच धरबंध नाही हे माहित आहे.
पण तुम्हाला हे माहित आहे का की भारतात दरवर्षी बॅक्टेरियल आजारांनी आजारी पडण्याचे आणि दगावण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. दरवर्षी साध्या बॅक्टेरियल न्यूमोनियाने आपल्याकडे लाखो मुले दगावतात आणि हे लहान मुलांच्या मृत्यूचे एक महत्त्वाचे कारण आहे.
का? तर योग्यवेळी योग्य ती अँटीबायोटीक्स न मिळाल्याने.

अँटीबायोटिक्सचा वापर रुग्णाचा त्यावेळचा आजार आणि डॉक्टरचे त्या औषधांविषयीचे ज्ञान या दोनच गोष्टींवर अवलंबून नसून विविध सामाजिक/आर्थिक/ राजकीय गोष्टींवर आधारित आहे.

अँटीबायिटिक्स रेझिस्टंसचेही तसेच. विविध कारणे आहेत.
त्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भारतात ज्या लोकांना अँटीबायोटीक काय आणि कसे आणि कुणावर काम करणार आहे हे माहित नाही त्यांनाही ते प्रिस्क्राईब करायचा अधिकार आहे.
आणि प्रिस्क्रीप्शनशिवाय ते विकू शकण्याचा अधिकार/स्वातंत्र्य केमिस्टांना आहे.

दुसरं म्हणजे भारतातल्या अस्वच्छ /अनहायजेनिक वातावरणामुळे नुसतं व्हायरल म्हणून सुरू झालेलं इन्फेक्शन हे सुपरअ‍ॅडेड बॅक्टेरियल इन्फेक्शनने काँटामिनेट व्हायचे चान्सेस जास्त.
म्हणजे 'साधा' व्हायरल सर्दी खोकला झालेला रूग्ण असतो. सततचे नाक गळणे, सुजलेला म्युकोजा यांनी एक मस्तं सुपिक जमीन तयार होते बाहेरच्या बॅक्टेरियाने येऊन वसायला. आणि मग ते साधं व्हायरल कधी जीवघेणं बॅक्टेरियल ठरतं सांगता येत नाही.
काही आजार सुरूवातीस अगदी व्हायरल वाटले तरी ते बॅक्टेरियल इन्फेक्शनची सुरूवात असू शकते.

जेव्हा मी माझ्या ओपिडीत बसून पेशंट पहात असते तेव्हा समोर सर्दी पडश्याने आजारी असलेला पेशंट कुठूनतरी साठ किमी वरून १००-१५० रू प्रवास खर्च करून आलेला गरीब शेतमजूर्/शेतकरी असतो.
आज सिंप्टोमॅटीक ट्रीटमेंट घे आणि उद्या परवा वाढलं तर परत ये असं मी त्याला सांगितलं तर ते कितीही एथिकल असलं तरी सामाजिक्/आर्थिक कारणांनी फिजीबल नसतं.
हा पेशंट सिंप्टोमॅटीक ट्रीटमेंट घेऊन घरी गेला आणि त्याचा आजार बळावला/वरती बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर तो परत एवढा खर्च करून शहरात येईल याची शाश्वती नसते. माझ्या सिंप्टोमॅटीक ट्रीटमेंटच्य भरवश्यावर तो आण्खी दोन दिवस आजार अंगावर वाढवणार.

त्यापेक्षा मी काय विचार करते की देऊया चांगल्या पण स्वस्त अँटीबायिटिक्सच्या तीन गोळ्या तीन दिवसांकरता.
लहानमोठे बॅक्टेरिया कव्हर होतील आणि फक्त पन्नास रूपयेच जातायत बिचार्‍याचे.

हाच पेशंट जर शहरातला / माझ्या क्लिनिकच्या आसपास रहाणारा असला आणि आजार बळावतोय म्हणजे काय हे समजण्याइतका शहाणा असला तर मी त्याला तसे समजावून सिंप्टोमॅटीक ट्रीटमेंट देऊन परत पाठविते.
तसेही एकदा पाहिल्यावर आठवडाभरात पेशंट कधीही परत आला तर फुक्कट तपासतो.
त्यामुळे पेशंटही बरे न वाटल्यास तीन चार दिवसात परत येऊन दाखवतात.

डेंग्यू, मलेरिया हे बॅक्टेरियल आजार नसतानाही या आजारांनी अ‍ॅडमिट झालेल्याना आम्ही एखादे अँटिबायिटिक का देतो?
तर यात विशेषतः डेंग्यूत सगळीकडे इन्फलमेशनमुळे रॉ एरिया असतात, फुफ्फुसांमधे सिक्रीशन वाढलेली असतातच पण त्या बरोबर अल्प प्रमाणात रक्तस्रावही होण्याची शक्यता असते.
हे तर बॅक्टेरियांसाठी कुरणच!
मग त्याकरिता आग लागल्यावर बंब शोधण्यापेक्षा एखादे अँटीबायोटिक देऊन ठेवणे पेशंटसाठी फायद्याचे असते.

बर्‍याचदा आम्हाला लॅब फॅसिलिटीज उपलब्ध नसतात किंवा असल्याच तर पेशंटकडे पैसे नसतात्. असले तर रिपोर्ट्स येईपर्यंत त्याची शेवटची के आर टी सी ( एस टी) निघून जाणार असते.

हे झाल आम्ही अँटीबायोटिक्स का देतो यावर.

मात्र काहीजणांना आपण अँटीबायिटीक का देतोय याचं काहीही घेण देणं नसतं.
हा आजार करणारे पॅथिजेन्स्/बॅक्टेरिया कोणते असू शकतात याचा विचार करून त्यानुसार अँटीबायोटिक देण्यापेक्षा जे आपल्या दुकानात उपलब्ध आहे /ज्याचं मार्केटींग जोरात चालू आहे असे अँटीबायोटिक्स देणारे डिग्रीधारी आणि उपटसुंभ - दोन्ही प्रकारचे लोक पाहिले आहेत.

प्रायोजित औषधे पैशाच्या लालचीने देणारे पाहिले आहेत.

पेशंटांना ओवर द काऊंटर शेड्यूल एच ड्रग्ज देणारे विक्रेते पाहिले आहेत.

पेशंटचे वय्/प्रेग्नन्सी इत्यादी विचार न करता मनाला येईल ती अँटीबायोटिक्स प्रिस्क्राईब करणारे पाहिले आहेत.

तेव्हा..
तारतम्य महत्वाचे.
सगळ्याच आजारांत अँटीबायोटिक देणारा डॉक्टर जितका चुकीचा आहे तितकेच नेटवर वाचून आजारांविषयी ज्ञान मिळवलेला एखादा 'अमुक आजार बॅक्टेरियल नसताना तुम्ही अँटीबायोटीक देता म्हणजे तुम्ही फ्रॉड आहात' असे म्हणणारा पेशंट/पेशंटचा सग्गेवाला चुकीचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेव्हा मी माझ्या ओपिडीत बसून पेशंट पहात असते तेव्हा समोर सर्दी पडश्याने आजारी असलेला पेशंट कुठूनतरी साठ किमी वरून १००-१५० रू प्रवास खर्च करून आलेला गरीब शेतमजूर्/शेतकरी असतो.
आज सिंप्टोमॅटीक ट्रीटमेंट घे आणि उद्या परवा वाढलं तर परत ये असं मी त्याला सांगितलं तर ते कितीही एथिकल असलं तरी सामाजिक्/आर्थिक कारणांनी फिजीबल नसतं.
हा पेशंट सिंप्टोमॅटीक ट्रीटमेंट घेऊन घरी गेला आणि त्याचा आजार बळावला/वरती बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर तो परत एवढा खर्च करून शहरात येईल याची शाश्वती नसते. माझ्या सिंप्टोमॅटीक ट्रीटमेंटच्य भरवश्यावर तो आण्खी दोन दिवस आजार अंगावर वाढवणार.

या आशाच अनुभवांसाठी मला भारतात रहाणं आवडतं.. इथे सगळं कसं मानवी आहे!
समोरच्याला निव्वळ 'पेशंट' नावाचं ऑब्जेक्ट म्हणून न बघता आर्थिक, सामाजिक, जातीय, धार्मिक पार्श्वभुमी लक्षात घेऊन एका सबोवतालासकटचा माणूस म्हणून इथे बघितलं जातं!

सगळ्याच आजारांत अँटीबायोटिक देणारा डॉक्टर जितका चुकीचा आहे तितकेच नेटवर वाचून आजारांविषयी ज्ञान मिळवलेला एखादा 'अमुक आजार बॅक्टेरियल नसताना तुम्ही अँटीबायोटीक देता म्हणजे तुम्ही फ्रॉड आहात' असे म्हणणारा पेशंट/पेशंटचा सग्गेवाला चुकीचा आहे.

साती तै जियो!

अर्धवट माहितीवरून ढेरेंबद्दल चुकीची का असेना कोणी जराजरी शंका घेतली की शांतं पापं! मात्र त्याहून अर्धवट ज्ञान असूनही डॉक्टरांना झोडपले की मात्र चालते नव्हे आपले (अ)ज्ञान मिरवता येते! डॉक्टर इझी टार्गेट आहेत हेच खरे! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जे तारतम्य तुमच्या लिखाणात दिसतं ते तुमच्या वागण्याव्यवहारात असणारच हे निश्चित. तुमचं हे सामाजिक भान आमच्यासारख्या वाचकांनाही प्रेरणादायी ठरत असतं.
सोप्या भाषेत सगळी प्रक्रिया समजावून सांगणारा प्रतिसाद अतिशय आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साती कौतुक वाटलं. विवेकी प्रॅक्टिस करताहात तुम्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

सातीची आठवण काढल्याचं चीज झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>पेशंटांना ओवर द काऊंटर शेड्यूल एच ड्रग्ज देणारे विक्रेते पाहिले आहेत.

<गब्बर मोड ऑन> असली शेड्युले असणे हेच मुळात चूक आहे. कुठलेही औषध विकण्याचा दुकानदाराला आणि ते घेण्याचा ग्राहकाला हक्क असायला हवा. <गब्बर मोड ऑफ>
पण साधं क्रोसिन शेड्यूल एच मध्ये का असतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

क्रोसिन शेड्यूल एच?
नसतं हो. म्हणजे मी क्रोसिन ब्रॅण्ड पाहून 'य' वर्षे झालीत पण माझ्याकडे ठेवलेलं एकही प्लेन पॅरासिटॉमॉल शेड्यूल एच नाही.
शेड्यूल एच वर एक लाल उभी रेघ असते प्रत्येक स्ट्रिपवर. त्याचा अर्थ ते ड्रग रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टीशनरने प्रिस्क्राईब केल्याशिवाय घेऊ अथवा विकू नये.
(प्रिस्क्रीप्शन दिल्यावरही किती गोळ्या दिल्यात ते फार्मसिस्टने मेंशन करावं अशी अपेक्षा असते.)

बाकी आमच्याकडे पॅरासिटामॉलचे जे ब्रँडस आहेत आणि माझ्या दुकानात जे ओवर द काऊंटर विकतो त्यात एकही शेड्यूल एच ब्रँड नाही.
मात्र त्यांवर 'ओवरडोस कॅन कॉज लिवर टॉक्सिसिटी' असे क्लिअरली लिहिलेले असते.

(कोण वाचतंय म्हणा! Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म्म रैट्ट.

क्रोसिन नाहीये शेड्यूल एच !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शेड्यूल एचचं लई झंझट असतं हो. वाटतं तितकं सोपं नाही.
(म्हंजे आमच्यासारख्या नियम पाळणार्‍यांनाच हां, बाकीच्यांना सगळ सोपं आहे.)

हल्लीच चांगल्या रेप्युटेड कंपनीचं एक पॅरासिटॉमॉल अधिक अजून एक औषध असलेलं काँबो त्यावर शेड्यूल एच असं लिहिलेलं स्पष्ट दिसत नाही असं लक्षात आल्यावर दुकानातून काढून टाकावं लागलं होतं.
त्या कंपनीने छापील स्टीकर देऊन ते चिकटवतो प्रत्येक स्ट्रिपवर अशी प्रशासनाला विनंती केल्यावरही ते मान्य झालं नव्हतं.
सगळा स्टॉक परत घेऊन कंपनीने नविन ठसठशीत लाल लाईन आणि शेड्यूल एच लिहलेल्या स्ट्रीप आणि बॉक्सात घालून रिप्लेस केलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हाइरस - आपल्या पेशित असणारा,
बॅक्टिरिआ - स्वतंत्र अस्तित्व असणारा अमिबासारखा जीव
असं आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा गेस - व्हायरस हे सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवरचं काहीतरी आहे. त्याला पुनरुत्पादन असते पण प्रॅक्टिकली मरण नसते. म्हणजे उच्च तापमान किंवा उच्च ऊर्जेचे किरण (अल्ट्राव्हायोलेट/गॅमा किरण) यांनीच त्यांचा डीएनए तुटू शकतो.

व्हायरस शरीरात शिरला तर शरीराची प्रतिकारव्यवस्था व्हायरसला फक्त शरीराबाहेर काढते. त्याला 'मारू' शकत नाही. सर्दी झाल्यावर पांढर्‍या पेशी व्हायरसला आच्छादन घालून त्याला शेंबडाच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बहुतांशी हो. बॅक्टेरिया किंवा जीवाणू या स्वतंत्र पेशी असतात. त्यांच्यात पेशीकेंद्रक असतं, आत डीएनए असतो. आणि त्यांचं पुनरुत्पादन पेशीविभाजनाने होतं. याउलट व्हायरस ही अगदी लहान रेणूंची रचना असते. त्यांच्यात पेशींवर हल्ला करून त्यांत घुसण्याची व्यवस्था असते. एकदा पेशीकेंद्रकात ते शिरले की आपल्या रासायनिक गुणधर्मांमुळे केंद्रकातल्या डीएनेच्या यंत्रणेवर ताबा मिळवून पेशीसाठी आवश्यक रेणू तयार करण्याऐवजी ते स्वतःच्या प्रतिकृती निर्माण करायला लागतात. पुरेशा प्रतिकृती तयार झाली की ती पेशी फुटते आणि नवीन तयार झालेले विषाणू इतर पेशींवर हल्ला करायला मोकळे होतात. ही प्रक्रिया चेन रिअॅक्शनप्रमाणे पसरू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीजणांकडून असे ऐकले आहे की, लोकं अ‍ॅंटीबायोटीक्सचा कोर्स पूर्ण करत नाहीत, त्यामुळे जीवाणूंचे फावते, मोठ्या प्रमाणावर बर्‍याच लोकांनी असे केल्याने, जीवाणू कमी ताकदीच्या अ‍ॅंटीबायोटीक्सना दाद देत नाहीत म्हणून पुढच्या वेळेला अजून जास्त पॉवरचे अ‍ॅंटीबायोटीक घ्यावे लागते.
यात कितपत तथ्य आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिजैविकांचा अर्धवट डोस घेतल्याने काही जिवाणू त्या प्रतिजैविकाला resistant होतात . असे झाल्यास ते resistant झालेले जिवाणू त्या प्रतिजैविकाने मरत नाहीत . या resistant जिवाणूंनी infection केल्यास त्याच आधीच्या प्रतिजैविकांचा त्या जिवाणू वर फारसा परिणाम होत नाही. असे बऱ्याच लोकांनी वर्षानुवर्षं बऱ्याच प्रतिजैविकांच्या बाबतीत केल्यामुळे सध्या multi drug resistant जिवाणू हा एक मोठा ताप झाला आहे. (. बाकी तुमच्या खरडवहीतील दगड आणि लोळ आवडले )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सातीजी, मी याबाबतीत एक लेमन आहे. त्यामुळे ऐकलेल्या , वाचलेल्या अनुभवांवरुन मत बनवुन लिहिलेय.
तुम्ही फार संयत, आणि समतोल प्रतिसाद दिलात. धन्यवाद!
माझे काही चुकले असल्यास क्षमस्व!
"न्यु दिल्ली व्हायरस" बद्द्दल काहि माहिति असल्यास लिहा.(विकिपेडीया सोडुन)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओम शान्ति ओम

काय असतं हे?
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी डॅाक्टर बदलणे परवडणारे नाही.त्याने त्याच्याकडच्या गोळ्या दिल्या तर त्यात बहुतेक पॅरसिटॅमोल,बीप्लेक्स,व्हिट सी,अर्धी डायझिपम आणि बय्राचदा टेट्रासायक्लिनही असते.लिहून दिलेल्या औषधात कोणते अँ-बायो आहे ते कळतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>अर्धी डायझिपम

डायझेपॅम ? बापरे !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

डायझेपॅम ? बापरे !!

मज्जा आहे अचरट रावांची. डॉक्टर देतोय थेट "डायझेपॅम"

साती तै : डॉक्टर अशी औषधे त्याच्याकडुन थेट पेशंट ला देऊ शकतो का? दिल्यास त्याचे काय रेकॉर्ड ठेवावी लागतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही अर्धी गोळी रात्री घ्या सांगतात ती मी बाजूला काढून ठेवतो.डॅाक्टरकडे गेल्यावर त्याला लगेच समजते आपलं दु:खणं गंभीर आहे की नाही.जरा दुध वगैरे घ्या आणि या गोळ्या घ्या म्हटलं की ओळखायचं घाबरायचं कारण नाही." या गोळ्या लिहून देतो त्या घ्या सांगितलं" की केमिस्टला दाखवून विचारतो या कसल्या गोळ्या आहेत.तो सांगतो एक नंबर अँबा आहेत,दुसरं टॅानिक,तिसरं व्हिटामिनस.मग सांगतो फक्त १ नंबर द्या दोन आणि तीन नको.

बाकी हे अदिचशे पानांचं पुस्तक घरी ठेवाच
हे पुस्तक कामाचे आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या गोळ्या लिहून देतो त्या घ्या सांगितलं" की केमिस्टला दाखवून विचारतो या कसल्या गोळ्या आहेत

खरे तर डॉक्टर नी लिहुन दिलेल्या प्रत्येक गोळ्या काय आहेत आणि कशासाठी आहेत हे सांगणे मस्ट आहे. काही डॉक्टर सांगतात, काही सांगत नाहीत, त्यांना तिथेच विचारावे.

तुम्ही सांगीतलेले पुस्तक आहे माझ्या कडे.

सांगतो एक नंबर अँबा आहेत,दुसरं टॅानिक,तिसरं व्हिटामिनस.मग सांगतो फक्त १ नंबर द्या दोन आणि तीन नको.

हे वागणे बरोबर नाही. व्हीटॅमिन घ्यायला सांगण्यामागे कारण असु शकते, किंवा व्हिटॅमिन ट्रीटमेंट चाच भाग असु शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे वागणे बरोबर नाही. व्हीटॅमिन घ्यायला सांगण्यामागे कारण असु शकते, किंवा व्हिटॅमिन ट्रीटमेंट चाच भाग असु शकतो.

याच्याशी सहमत. विशेषतः बी कॉम्प्लेक्स वगैरे प्रिस्क्राईब केले असेल तर घ्यावेच.

शक्यतो डॉक्टरकडे जायची वेळ येणार नाही इतपत आरोग्याची काळजी घ्यावी हे सर्वात महत्त्वाचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यावरुन आठवलं व्हायटॅमिन डी लगेच घेते. आमच्याकडे सूर्यप्रकाशाची वानवा असल्याने, व्हायटॅमिन डी चे दूध, गोळ्या वगैरे घ्याव्या लागतात. डॉक्टरांच्या मते या व्हायटॅमिनच्या कमतरतेचा परीणाम मूडसवरती होतो. कॅल्शिअमच्या अ‍ॅब्सॉर्बशनकरताही हेच जीवनसत्व लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

की केमिस्टला दाखवून विचारतो या कसल्या गोळ्या आहेत.तो सांगतो एक नंबर अँबा आहेत,दुसरं टॅानिक,तिसरं व्हिटामिनस.मग सांगतो फक्त १ नंबर द्या दोन आणि तीन नको.

बुद्ध्यांक चाचणी (तुमची व केमिस्टाची) करून घ्या असे सुचवितो.

उदा. लेप्रसीच्या उपचारांसाठीचे औषध पिंपल्ससाठी वापरतात. किंवा मलेरियाचे क्लोरोक्विन संधीवातावरही वापरतात, हे तुमच्या केमिस्टास ठाऊक आहे का?

दिलेल्या अँटीबायोटिक्समुळे "नॉर्मल गॅस्ट्रोइंटेस्टिनल फ्लोरा" नष्ट होते ती वाचविण्ञासाठी काही मल्टिव्हिटॅमिन्स द्यावे लागतात, हे ज्ञान आपणास आहे काय?

आपण आधा हकीम खतरे जान आहात, हे आपल्या लक्षात येते आहे का? अडीचशे पानांचे पुस्तक वाचून डॉक्टर(पेक्षा हुशार) होता येऊ लागले तर झालेच की! एस्टी स्टँडावरही ३० दिन में डॉक्टर बनें किताबें मिळतातच की!

च्याय्ला, बंद पडलेल्या गाडीचा कार्ब्युरेटर खोल्ल्यानंतर ३ पैकी २ च स्क्रू परत लाव, असं सांगणार आहात का, दुकानदाराला विचारून मेक्यानिकला? डॉक्टरकडे कशाला कडमडायचं होतं मग? डायरेक्ट केमिस्टालाच तब्येत दाखवत जा की! फुकटात कन्सल्टेशन?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

लेप्रसीच्या उपचारांसाठीचे औषध पिंपल्ससाठी वापरतात.

हे खरे आहे का ( म्हणजे असेलच ), डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय हे करता येते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते तुम्हाला (किंवा अन्य कोणा उपचारेच्छुकाला) लेप्रसी झालीय का पिंपल्स यावर अवलंबून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

प्रश्न सिंसिअर होता आबा. पिंपल कीती कॉमन प्रॉब्लेम आहे. काही उपाय असला तर विचारत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिंपलवर माईल्ड सल्फ्युरिक अ‍ॅसिड पण लाऊ शकता. (उत्तर सिंसिअर आहे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे खरे आहे का ( म्हणजे असेलच ), डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय हे करता येते का?

हे डॉक्टर्सच करतात. व हे करणे संपूर्णतः एथिकल व योग्य आहे. प्रॉब्लेम हा आहे, की जर केमिस्टने हे लेप्रसीचे औषध आहे असे सांगितले, तर लोचा होतो. आपल्याला मेडिकलवर जाऊन (किंवा डॉक्टरलाही) "ही गोळी कसली?" असे विचारायची सवय असते.

फॉर सीम्पल रिझन, आयुर्वेद/होमिओपथीत 'कल्पिल्या'प्रमाणे 'तापाला अमुक औषध' अशी मॉडर्न मेडिसिनची कन्सेप्ट नाही. इथे खर्‍या अर्थाने सिम्प्टम नव्हे, तर मूळ आजाराची ट्रीटमेंट असते.

उदा.

तुम्हाला मलेरिया झाला, तर क्लोरोक्विन तुमचा ताप (ताबडतोब) घालवू शकत नाही. तापासाठी तात्पुरते का होईना पॅरासिटामॉल, अन पॅरासिटामॉलने उत्पन्न झालेली अ‍ॅसिडिटि कमी करण्याचे, तसेच, तुम्हाला तापाने व शरीरातल्या असंख्य लाल पेशी अचानक फुटून उत्पन्न होणार्‍या अशक्तपणासाठी "टॉनिक" दिले जाऊ शकते. पण, आजाराचे मूळ, तो प्लास्मोडियम नामक पॅरासाईट मारून टाकण्याचे मूळ काम क्लोरोक्विन करीत असते. ते कसे होते, मूळ झाडपाला औषधातून आधी क्विनिन, मग क्लोरोक्विन अन त्यानंतर अधिक प्रगत मलेरिया विरोधी औषधे कशी निर्माण झाली हा एक प्रवास आहे.

तर,

क्लोरोक्विन, संधिवातावरही देतात. ते कसे? याबद्दल जरा गूगलून अभ्यास करा. माझा चमचा हरवलाय, सबब स्पून फिडिंगला प्रॉब्लेमेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मी हे सर्व लिहिले कारण ते फर्स्ट हँड आहे ,ऐकीव नाही.यातून कल्पना येऊ शकते की रुग्णलोक कशाप्रकारे औषधांकडे बघतात.कसे उचापत्या करतात.देणारे डॅा देतात तसे घेणारेही रुग्ण उपद्व्यापी असू शकतात.
दुसरा एक मुद्दा की डॅाक्टर बदलल्यावर अगोदरच्या ट्रीटमेंटची नवीन डॅाक्टरला सांगत नाहीत मग तो आणखी औषधे देतो.असे शरिरावर अत्याचार करवले जातात.शिवाय भेटायला येणाय्रा नातेवाइकांनी रेकमंड केलेले काढे सुरू केलेलेच असतात.अंगारे ,होमिओपथीपण सुरूच असते.थोडक्यात कोणतीतरी गोळी लागू पडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होमिओपथीपण सुरूच असते

हे बिनधास्त चालू ठेवावे, जर मधुमेह नसेल तर साखरेच्या गोळ्यांनी काहीही नुकसान होणार नाही. ( फायदा होणार नाही हे.वे.सां.न )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साती यांचा प्रतिसाद खूप आवडला. डॉ. खरे यांनी यावर प्रतिसाद म्हणून मिपावर वेगळा धागाच काढलाय. तोही अप्रतिम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लिंकबद्दल धन्यवाद!
तो धागाही उत्तम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0